कविता

राजकारणाचा ढासळला दर्जा

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
21 Feb 2022 - 9:27 am

कविता म्हणजे आसपास घडणाऱ्या घटनाचेच प्रतिध्वनी असतात ना ... उगाच कुठे चांदतारे पहावे.
काळ बदलला,
"वोह बुराई करे,
हम भलाई करे,
नही बदले की हो भावना,
ऐ मालिक तेरे ब्लाह ब्लाह हम "
हे राहिले नाही म्हणून संयमीत प्रतिउत्तर कविता..

कविता

निघाले किरीट सोमय्या....

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
19 Feb 2022 - 10:53 am

१९ बंगले कुठे गेले? चौकशी करा -किरीट सोमय्या

https://www.loksatta.com/maharashtra/where-did-the-19-bungalows-go-inves...

रेवदंडा पोलिसांत FIR
19 बंगले चोरीला गेले...

| निघाले किरीट सोमय्या |
|राऊत करी ता था थैय्या ||

| त्यांच्या हाती पावती |
|मिरच्या झोंबती राऊती ||

|चालले पनवेल, पेण, पेझारी |
|शोधायला शुक्राचार्य अन झारी ||

|पोचले गाव कोरलई |
|म्हणाले बंगले चोर लई ||

कविता

तुझ्याचमुळे

सागरसाथी's picture
सागरसाथी in जे न देखे रवी...
18 Feb 2022 - 5:49 pm

सारे तुझेच होते,
सारे तुझेच आहे
तू आहेस म्हणून
स्वप्नांचे येणे-जाणे आहे.

शब्द तुझेच होते
भाव तुझेच आहेत
तुझ्या मुळे इथे
कवितेचे व्यक्त होणे आहे.

गीत तुझेच होते
सूर तुझेच आहेत
तुझ्याच मुळे आयुष्यात
संगीताचे लेणे आहे.

रुप तुझे होते
रंग तुझेच आहेत
तुझ्याच मुळे सदा
रंगपंचमी आहे.

अभय-काव्यकविता

शब्दचित्र

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
17 Feb 2022 - 5:12 pm

संपले का रंग सारे
का कुंचले मोडले
दोन रंगात सारे
विश्व का रे रेखले

नीळा सावळया निर्झराचा
रंग कोठे लपवीला
काय ठावे तुझ्या मानसी
शुभ्र धवल का रे भावला

अंथरुन कालीन धवल
लपवले रंग सारे
उजळून विश्व सारे
दीप तेज मंदावले

नील गगन ,धवल तारे
वाहती उष्ण वारे
शोषून धवल रंग
हळूच फुटती धुमारे

येता ऋतुराज यौवनाचा
उघडेल मूठ त्याची
आशा हीच उद्याची
उधळून रंग सारे
उमटतील चित्रं नव पल्लवांची

कधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीनिसर्गकविताछायाचित्रणरेखाटन

रिमझिमत्या धारातून आलीस.

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जे न देखे रवी...
17 Feb 2022 - 8:55 am

रिमझिमत्या धारातून
आलीस होऊनिया चिंब
मला वाटले फुलावरती जणू जलाचे थेंब.

मातीस स्पर्शती धारा
गंधात नाहते धरा
तुझ्या तनुचा तसा दाटला, मनात मृदगंध.

पापण्या मिटून दूर
लाजून जाहली चूर
थरथरत्या ओठावर देशी तू दातांचा दाब.

दाटले मनी काहूर
डोळ्यात साठला पूर
उगा बावरी होऊ नको, का घाबरशी सांग?

गाणेकविताप्रेमकाव्य

आशा

निनाद's picture
निनाद in जे न देखे रवी...
16 Feb 2022 - 2:19 pm

नौका ही बांधलेली
राहील का बांधलेली

उरात भरूनी वारे
ही पाहतो निघालेली

वादळे येती तरी
लाटा फोडून ती गेली

थांबलो तेथेच मी
ती निघून गेलेली

मी असेन येथेच
वेळ नाही गेलेली

परत कधी येईल ती
आशा न विझलेली

आशादायककविता

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग..... विठ्ठल विठ्ठल

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
15 Feb 2022 - 9:47 am

बरेच दिवस कविता लिहिली नव्हती ,
पेपरमध्ये वाचले

"आम्हा घरी धन,*
*शब्दांचीच रत्ने..."
_ जगतगुरू तुकाराम

मी सुटलो... बुंगाट

आम्हा घरी धन,
शब्दांचीच रत्ने,
जुळवू प्रयत्ने,
यमके ही.

काय हे जाहले,
कोसळला बाजार,
कोणता आजार
म्हणावा हा?

जगाचा पोलीस पाटील,
तू ते तर मी हे करेन
भेदरला बिचारा युक्रेन
युद्ध ज्वर

लोक हैराण त्यात,
निवडणूक धुरळा,
जणू अंगावर झुरळा,
झटकती

वाहक ही गांजले
इथे ट्रॅफिक जाम
अमृतांजन बाम,
चोपडती

अभंगकविता

व्हॅलेंटाईन दिनी

श्रीगणेशा's picture
श्रीगणेशा in जे न देखे रवी...
14 Feb 2022 - 9:11 am

कोणे एके काळी
व्हॅलेंटाईन दिनी
मोठ्या उत्सुकतेने
मी आणली होती साडी

होती जरी साधी
ती खुश मात्र झाली
प्रयत्न केला खूप तिने
पण नीट नेसता नाही आली

गोंधळली क्षणभर हसली
ती म्हणे हे ध्यान माझ्या भाळी
पण गोड आठवण प्रेमाची
तिने अजूनही जपून ठेवली

आता एवढ्या वर्षांनी
सुचतील कशा प्रेम ओळी
पण मला पाहायची असते
तिच्या गालावरील सुंदर खळी

त्यासाठी कविता विनोदी
ऐकून म्हणे अजून नाही जमली
मला वाटलं कविता
तिला म्हणायचं होतं साडी

(सौं साठी!)

कविता माझीप्रेम कवितामुक्त कविताकविताप्रेमकाव्य

सिर्फ त्रिवेदी बचेगा।

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
5 Feb 2022 - 6:45 pm

पहिली,दुसरीला बसवलं
होतं फाट्यावर
तीसरीने केली कुरघोडी
आणून बसवलं खाटेवर

कधी आली,कशी आली
माहीत नाही कुठं गाठ पडली
अतीरेक्या सारखी घुसली
पहिल्या फळीची दाणादाण उडली

लढवत होती पंजा
आजमावत होती जोर
पण मजबूत ज्याचा माजां
तोच कापणार होता दोर

लढवत होती पेच
टाकत होती डाव
घालत होती सह्याद्रीच्या उरावर
टिकावा चा घाव

तीन दिवस तीन रात्री
घमासान लढाई केली
खूप काढला घाम
आणी खूप दमणूक झाली

अव्यक्तआशादायककरोनाजाणिवजीवनकवितामुक्तक

(शोध)

गड्डा झब्बू's picture
गड्डा झब्बू in जे न देखे रवी...
5 Feb 2022 - 11:34 am

प्रेर्ना :)

बाटलीतुन वाहणारे
ओतताना लहरणारे
सोड्यातून उमलणारे
बर्फाशी झुंजणारे
चषकाच्या पृष्ठभागी
बुडबुडे साकारणारे
ढोसतो मी अल्प काही

जाणिवेला छेडणारे
नेणिवा थिजवणारे
मेंदूस व्यापणारे
तनूस डुलवणारे
ओठांच्या फटीतून
अशाश्वत भासणारे
बोलतो मी मूढ काही

( flying Kiss )मांडणीकलासंगीतपाकक्रियाकविताविडंबनगझलशुद्धलेखनविनोदसमाज