कविता

(झाली किती रात सजणी...)

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
24 Dec 2022 - 12:27 pm

मुळ कवी दिपक पवारांची क्षमा मागून....

(आली जरी रात सजणी...)

आली जरी रात सजणी

झाली किती रात सजणी, नावडे मजला "थांब जरा येते", सांगणे.

अधिरला जीव माझा, असे कसे तुझे हे वागणे.

खडबड, खडबड आवाजास, ताल देती तुझी काकणे.

बरे वाटते का असे, सारखे सारखे वाकून माझे पाहणे.

झोपले चंद्र तारे,निद्रिस्त झाल्या उषा निशा.

मोकळ्या झाल्या आता, कुजबूजण्यास दाही दिशा.

अनर्थशास्त्रउकळीकैच्याकैकविताविडम्बनकविताविडंबन

पुन्हा

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
17 Dec 2022 - 2:36 pm

कालचक्र उलटे फिरले अन्
पुन्हा जन्मलो
जुन्या चुका विसरून नव्याने
करून बसलो
काचपात्र भंगले तरीही
जोडत बसलो
मुखवट्यांस समजलो चेहरे
तिथेच फसलो
अढळपदी उल्का बघताना
जरी कोसळलो
डोळे कितिदा आले भरूनी
तरीही हसलो
बेचिराख होता होता मग
पुनश्च रुजलो

कवितामुक्तक

दे दवांचे प्याले

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
14 Dec 2022 - 2:43 pm

कितीदा ओठांवरती अव्यक्त राहिलेले
शब्द ते तुझ्या मी, डोळ्यांत वाचलेले

जायचे कुठेशी, मी चाललोय कोठे?
तुझ्या रूपाने, रूपाली, मला भारलेले

माळून दे म्हणालीस, माला तारकांची
केशी तुझ्या टपोरे, चंद्रफूल माळलेले

भेटता तुला उराशी, श्वासात आग येते
क्षण तप्त, दग्ध, तरीही, भान गोठलेले

घनगर्द भावनांचा कल्लोळ माजतो ग
दे दवांचे प्याले, पाकळ्यांत साठलेले

- संदीप चांदणे

कविता माझीकविताप्रेमकाव्यसाहित्यिक

उडून गंध चालल्या...

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जे न देखे रवी...
5 Dec 2022 - 1:58 pm

उडून गंध चालल्या फुलास वाटते
तसे कसे सुने - सुने उदास वाटते.

कधी वसंत येईल, बहरेन मी पुन्हा
झडून पान चालल्या तरुस वाटते.

पवन तुला करीत स्पर्श जातसे अता
दरवळला चहूकडे सुवास वाटते.

कशास जन्म हा जगून काढला इथे
उगाच का असे - तसे मनास वाटते.

निघून चाललीस तू इथून ज्या क्षणी
तिथेच संपला असे प्रवास वाटते.

दीपक पवार.

भावकवितामराठी गझलकविता

झटपट लिहीण्याचा सराव असावा म्हणून नेट-प्रॅक्सीस

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
3 Dec 2022 - 7:58 pm

https://www.loksatta.com/explained/sidhu-moosewala-murder-case-know-who-...

कानून का शिकंजा
हत्यारावर टाकला पंजा

तो गोल्डी बरार
कॅनडात फरार

पंजाब पोलीस भटक
कॅलीफोर्नियात अटक

सिद्धू मूसेवाल ची हत्या
सत्येंद्रसिंग धरला सत्या

होते तसे काल गायक
आज कसे खलनायक

कविता

चालचलाऊ गीता -अध्याय २ (विडंबन)

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
3 Dec 2022 - 12:18 pm

म्हणे मग कृष्ण त्याला| काय अलिबागेहुनि आला?
डोस्क्यावरि तुझ्या मेल्या| वशाड शिरा पडो||  
उगा रडसी मुर्दयासाठी |वरी ज्ञान पाजळसी|
काय जास्त घेतलीसी| रात्रीची नवटाक||
अरे हे राजे लोक| टेम्परावरी आणि फेक |
जन्माचे घेति रिटेक| परमनंट नाही ||
नवी रूपे घेतॊ रोज| कधी बाळ्या कधी आज्जा |
आत्मुच्या भारी गमजा| पण तो बंधमुक्त ||
तोच जाण खरा कुल| कधी न हो दांडी गुल |
केले कुणी जरी फुल|तयासि येताजाता ||
तू म्हणे टपकवशील , जे मी निर्मियेल?
फुका काय बोलशील| काहीही हं अर्जुना||

कैच्याकैकविताकविता

एक झलक तुझी पाहता...

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जे न देखे रवी...
29 Nov 2022 - 9:04 pm

एक झलक तुझी पाहता आयुष्य उधळून जाते
चैत्रातच झरती मेघ शिशिरात बहरून येते.

रूप तुझे पाहुनी बघ सूर्याचे दिपती नयन
चाहूल तुझी लागता वाऱ्याचे थबकती चरण
तू नुसती पाहून हसता रात्र उजळून निघते.

रातीस तुला पाहण्या हा चंद्र नभात तरसे
अंगास चुंबून घेण्या मेघ ही अवचित बरसे
उन्हं कोवळे तू दिसता बाहूत लपेटून घेते.

पाण्यास लावता हात पाण्यास लागे आग
पाहून तुला वैरागी भगव्याचा करती त्याग
डोळ्यांचे गहिरेपण मजनूस डुबवून देते.

प्रेम कविताकविता

गोळ्या आणि गांधी

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
28 Nov 2022 - 3:59 am

विषय : सोलापूर ला विमानसेवा कधी येणार

पिस्तूल दाखवणाऱ्या धर्मराज कडादींना ललित गांधी यांचे आव्हान,

https://maharashtratimes.com/maharashtra/solapur/maharashtra-chamber-of-...

केतन शहा सोलापूर मंच
कधी जाईल विमान उंच?
काय आले त्यांचे मनी
हे म्हणे पाडा चिमणी

कविता

Fifa World Cup: ५ मुलांची आई मेस्सीची चाहती, केरळहून कार घेऊन एकटीच पोहोचली कतारला,

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
26 Nov 2022 - 9:33 pm

Fifa World Cup: ५ मुलांची आई मेस्सीची चाहती, केरळहून कार घेऊन एकटीच पोहोचली कतारला, कारमध्ये स्वयंपाकघर

https://www.thehindu.com/life-and-style/fifa-world-cup-qatar-2022-najira...

नाजी नौशी
खूपच हौशी

काढली कार
गेली ती कतार

पाच मुलांची आई
मेस्सीला बघण्याची घाई.

असेल चँम्पीयन मेस्सी
कोई नही नाजी जैस्सी

अर्जेंटिना ची फॅन
अशक्य? शी कॅन !

कविता

शब्द तू, संगीत तू, तूच गाणे...

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जे न देखे रवी...
24 Nov 2022 - 1:44 pm

शब्द तू, संगीत तू, तूच गाणे
अंतरात निनादती तव तराणे.

बहरलेले झाड तू जे कळ्यांनी
बरसलेले मेघ तू जे सरींनी
सजविले आहे मना तू फुलाने.

रात तू जी भारली चांदण्याने
गीत तू जे गायले पाखराने
रंगल्याले तूच ते ना या नभाने.

तूच दर्या, तू नदी अन् झरा तू
चांदणे तू चांद तू अन् धरा तू
ल्यायलेले रुप तू या धरेने........

गाणेप्रेम कविताकविता