कविता

रिसाँर्ट

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
26 Mar 2022 - 10:03 pm

रिसाॅर्ट बेकायदा हा तोडा
सोमय्या घेवून गेले हातोडा

एसटी प्रकरणी बेफिकीर अनिल परब
चिंताग्रस्त झाले त्यांना सोमय्यांची जरब

फोनवर घेतात आदेश दापोली पोलीस
ते तर बिचारे माफियासेनेचे ओलीस

होऊ शकते हत्या, हो सोमय्या
दिला पोलीसठाण्यापुढे ठिय्या

दापोली जनता अस्वस्थपणे
दंड थोपटती पितापुत्र राणे

पडद्यामागे रहातोय अजाणता राजा
घडामोडी पहातोय मोटाभाई ताज्या.

दोन सांडांची टक्कर पहाते दापोली
मिडीया भाजतय आपली पोळी.

कविता

तरीही…

मनिष's picture
मनिष in जे न देखे रवी...
26 Mar 2022 - 12:27 pm

Gulal

शेंदूर दगडांचा उतरला तरीही,
गुलाल भक्तीचा उधळत राही

धुरळ्यात काही उमजत नाही,
पावलांवर पाऊल पडत राही

झापडे काढली डोळ्यांची तरिही
उजेडाला डोळे हे सरावत नाही

रक्त सांडले कळपात तरिही
मेंढरे लांडग्याला ओळखत नाही

पाणी डोळ्यातले रोखले तरिही
लेखणीतून मग ते झरत राही

~ मनिष

कविता

भरून येईल आभाळ.

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जे न देखे रवी...
25 Mar 2022 - 12:05 pm

भरून येईल आभाळ दाटून येतील मेघ
बुडून जाईल अंधारात जेव्हा सारं जग
तेव्हा तू एक कर.......
माझा हाती हात धर.......

चिंब चिंब पावसात बीज भिजून जातं
झाड बनून मातीतून रुजून येतं
तसंच.... अगदी तसंच
मलासुद्धा तुझ्या मायेत चिंब चिंब भिजू दे
तुझ्या छायेत रुजू दे
फक्त तू एक कर......
बरसून येऊ दे...... तुझ्या मायेची सर..

पाऊसप्रेम कविताकविताप्रेमकाव्य

आनंदयात्री

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
22 Mar 2022 - 10:45 am

सरल्या साऱ्या चिंता खंती
उरल्या नुसत्या खाली भिंती
नाही कुणाचे उगा लोढणे
दुसर्‍या साठी उगा कुढणे

संपून गेले वसंत वैभव
भोगत आहे शिशीराचे यौवन
फणसा सारखे पिकले गरे
आपण बरे,आपले काम बरे

पांघरून भूत भूतकाळाचे
वेध लागले भविष्याचे
खेद ना खंत या भूताचा
विचार आता फक्त स्वताचा

आनंदयात्री या जगातील
वाट चालतो अनंताची
ठेऊन दृष्टी अदृष्यातील
वाट पाहतो गंतव्याची

आयुष्याच्या वाटेवरदृष्टीकोनकविता

मुखवटे

अनुस्वार's picture
अनुस्वार in जे न देखे रवी...
19 Mar 2022 - 6:53 pm

घरातून आलो माणसांच्या घोळक्यात
अचंबित झालो पाहून नाना रूपे.
सुख, दुःख, एकांत वेगळे प्रत्येकाचे
मुकी नजर विचारे, "जायचे आहे कुठे?"

आकाश सम, जमीन विषम आहे
हातात हात घ्यायला पूर्वग्रहांची बंदी आहे.
शरीर सारखेच पण पांघरूण 'लायकी'नुसार
माणूसकी सोडून सगळे बाकी जोरदार.

हाव मनात व्यसन, पैसा अन् वासनेची
भूक मिटते रात्रीपुरती, ओढ नाही झोपेची.
कत्तली करण्यात मशगुल रक्तपिपासू
ओळख न सांगता वाहतात कोरडे आसू.

अव्यक्तआयुष्यकविता

ठेचेचा दगड

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
19 Mar 2022 - 10:05 am

दगडाची ठेच लागता
रक्त येई पायात
कशास होता पडला
दगड असा रस्त्यात

कितीतरी असे अडले असती
ठेच लागून पडले असती
परी न कुणी विचार करती
फेकून द्यावा तो दगड कुठती

असाच आला वेडा कुणी
खाली वाकला तो झणी
उचलूनी दगड तो पायी
लांबवर कुठे फेकूनी देयी

- पाषाणभेद
१९/०३/२०२२

शांतरसकवितासमाज

मुखवटे.

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जे न देखे रवी...
15 Mar 2022 - 6:49 pm

रंग पाण्यास ना, हे तसे चेहरे
थांग लागेच ना मन किती गहिरे
व्देष माडापरी, प्रेम झाले थिटे
चेहर्‍यावर इथे मुखवटे... मुखवटे.

पुण्य गेले कुठे, पाप शिरजोर हे
सभ्य वेषात या नांदती चोर हे
दान देण्या निघे अन जगाला लुटे
चेहर्‍यावर इथे मुखवटे... मुखवटे.

शब्द फुलापरी मनी निखारा जळे
वेष संतापरी हृदयी विषारी तळे
लुच्चे फिरती इथे साव गेले कुठे
चेहर्‍यावर इथे मुखवटे... मुखवटे.

माझी कविताकविता

आनंदी आनंद गडे........मेट्रू

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
12 Mar 2022 - 9:46 am

बालकवी म्या पामरला क्षमा करा

आनंदी आनंद गडे
मेट्रू धावे चोहीकडे
क्षणात पिपंरी,क्षणात चिंचवड
क्षणात पोहचे कोथुरुडे
आनंदी आनंद गडे

डोलत लतीका गंधवती
मेट्रु स्टाफ लगबगती
नटली संध्या प्रेमाने
कुमद ही हसते आहे
सनई चौघडे , हार तुरे
झगमग लगबग चोहीकडे
आनंदी आनंद गडे

नरमुंड रूंड पाहूनी
मनी चितंले,
प्राणनाथ धावले
भान हरले(पुणेकरांचे),
गान स्फुरले
आनंदी आनंद गडे

विडम्बनकविता

एक माणूस....

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
10 Mar 2022 - 3:25 pm

सर्व भ्रष्टाचा-यांच्या गर्दीत
मारेक-यांच्या गारदी त

घराणेशाहीच्या चाटूकारांत
हिंदूविरोधांच्या बाटूकारांत

खोटारड्यांच्या जहरात
फंद फितूरांच्या शहरात

न्यूयाॅर्क टाईम्सच्या पेड लीस्टवर
अतिरेक्यांच्या हिट लीस्ट वर

घरभेदींच्या द्वेषात ही
शिव्याशापांच्या त्वेशात ही

एक माणूस आपल्या कामांमुळे
कसल्या उंचीवर जातो..

550 वर्षांचा रामजन्मभूमी विवाद
सोडवला

70 वर्षांचा काशमीर 370 विवाद
सोडवला

नोटाबंदी चा वादग्रस्त निर्णय
राफेल खरेदीचा अभूतपूर्व निर्णय

देशभक्तिकविता

अजि सोनियाचा दिनु

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
6 Mar 2022 - 6:51 pm

अजि सोनियाचा दिनु
वर्षे अमृताचा घनु
अजि सोनियाचा दिनु
मेट्रो पाहिला रे, मेट्रो पाहिला रे...

बरवा उसंत ट्रॅफिकजॅमु
प्रगटलो अंतराळु
बरवा उसंत ट्रॅफिकजॅमु
प्रगटलो अंतराळु
मेट्रो पाहिला रे, मेट्रो पाहिला रे...

अजि सोनियाचा दिनु
वर्षे अमृताचा घनु
मेट्रो पाहिला रे मेट्रो पाहिला रे....
अजि सोनियाचा दिनु

कृपासिंधु करुणाकरू
कृपासिंधु करुणाकरू
नितिन देवेन मोदीवरु
बाप नितीन गडकरीवरु

कविता