कविता

आठवणींचा पाऊस: रसग्रहण

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
15 Jul 2022 - 12:54 pm

आठवणींचा पाऊस: रसग्रहण

सततचा पाऊस मनावर मळभ साचवतो. मनातील आठव वर येऊ लागतात. एकटेपण असेल एक उदाससवाणी छाया भर पावसात आपल्या आजूबाजूला तयार होते. ना कसले काम करवत ना काही घडते. आपले कुणी जवळ नसल्याची खंत अधीकच जाणवते.
रात्रभर पडणारा पाऊस अशा वेळी झोप घेऊ देत नाही. सतत आठवणींचे उमाळे फुटत असतात. उत्तररात्री कधीतरी डोळ्याला डोळा लागतो.

अशा वेळी कवी म्हणतो:

रात्रभर पडणारा पाऊस
सकाळी नकोसा होतो
कितीही हलका का असेना
जेव्हा सतत बरसतो

कविताजीवनमानप्रतिक्रियासमीक्षा

आठवणींचा पाऊस

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
13 Jul 2022 - 5:33 pm

रात्रभर पडणारा पाऊस
सकाळी नकोसा होतो
कितीही हलका का असेना
जेव्हा सतत बरसतो

संध्याकाळी उदास वातावरणात
मुसळधार कोसळतो
तेव्हा नको त्या आठवणींचा
पूर मात्र मनात येऊन जातो

रात्र उदास जाण्याची चाहूल लागते
मग रात्रभरचा पाऊस नकोसा होतो.

- पाभे
१३/०७/२०२२

आठवणीपाऊसमुक्त कविताकविताजीवनमान

सन्तूर

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
6 Jul 2022 - 10:30 pm

स्वरतत्वाचे तुषार अगणित
भवतालाला व्यापुनी उरले

रोमरोम पुलकित करणार्‍या
स्वरपुंजांनी गारूड केले

स्वरचित्रातील अवकाशाच्या
सुप्त मितीचे दर्शन झाले

स्वरलहरींचे जललहरींशी
निगूढ नाते पुनश्च कळले

स्वरशिल्पातील अमूर्ततेचा
चिरंतनाशी घालुनी मेळ
शब्दावाचून सहज रंगला
विलक्षणाचा अद्भुत खेळ

संगीतकविता

तो पाऊस निराळा असतो..!

राघव's picture
राघव in जे न देखे रवी...
2 Jul 2022 - 3:05 am

पावसाकडे बघून आलेले हे विचार.. शेवटी आपण सर्व अनुभव मनानेच जगतो.
हा मनातला पाऊस कितीतरी वेगवेगळ्या रुपांत जाणवतो. रुपं अनेक आहेत, त्यातली काही मांडण्याचा एक प्रयत्न. :-)

रखरखत्या रेताड धरेचा येतो वर्षाकाळ..
मुरमाड मनाच्या मशागतीला मायेचा फाळ..
तो रुततो, खुपतो, नांगरट धरतो, आनंदे वर्षतो..
तो पाऊस निराळा असतो..

मनामनांतील भाव-धारणा जेणे अंगारती..
स्वराज्य विचारे उभ्या ठाकती, लक्ष-लक्ष ज्योती..
राष्ट्रभावना जागृत धरतो, मनगटांत वळतो..
तो पाऊस निराळा असतो..

कविता

विठू माउली

मालविका's picture
मालविका in जे न देखे रवी...
1 Jul 2022 - 8:42 pm

रखुमाई विठ्ठलावर होती थोडी नाराज
ठरवले तिने फार बोलायचे नाही आज

ठरले होते आधी ते वेळ मला देणार
मग जाऊन भक्तांना दर्शन ते देणार

भक्त आपले सारखे काही ना काही मागतात
विचार न करता हे देऊन सगळे टाकतात

आधीच मला ठेवली यांनी स्वतःपासून दूर
आषाढीला येईल आता भक्तांचा मोठा पूर

लांबूनच मी यांच्यावर लक्ष ठेवून असते
कोण येतंय कोण जातंय सगळं बघत बसते

हे सुद्धा दिवसभर उभे राहून दमतात
मिटल्या डोळ्यांनी सुद्धा जग सगळं पाहतात

कधी एकदा हात खाली घेईन असं त्यांना होत
पण भक्तांकडेच मन यांचं सारखं ओढ घेत

कविता

अतृप्त ओळी

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
29 Jun 2022 - 12:01 am

आत्मसमरूप दिसतात ओळी
आत्मस्वरूप असतात ओळी .
इथे नदीचा दिसतो काठ
तिथे संथ प्रवाह पार लावतात ओळी .

निराळ्या वेदनेच्या एकाच गावी
दिसता दिसतो आम्ही सहप्रवासी
कुठे दूर अंधारात हरवले गाव माझे
दिसे मी उगाचच तिथला निवासी

असे शब्द साधे येतात साथी
कविता त्यातुन वाहते प्रपाती .
उरी अंतरी घाव नाजूक खोल
वरी दिसते केवळ शांत ज्योती !

आम्ही नाही ऐसे कवी ज्यास म्हणती
जशी वेदना ती , तसे शब्द हाती.
मनाचेच सारे इथे मांडयाचे ..
न पूर्ती मिळे त्यातूनी .. काय त्याचे?

कविता माझीमाझी कविताशांतरसकवितामुक्तक

लढवय्या

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
28 Jun 2022 - 9:42 am

मी लढवय्या सैनिक आहे
चतुरस्र ही सेना माझी
राजकुमार मी बाबांचा
हे साम्राज्य ही माझेच आहे

मी फोन उचलला नाही
मी भेटही दिली नाही
इंद्रापदा करता सुद्धा
कधी दंगा केला नाही

काकांनी मज समजावले
सिंहासन,बाळा तुझेच आहे
सुखेनैव राज्य कर तू आता
मी तुझ्याच बरोबर आहे

सर्वत्र सुखशांती आहे
काकांनी मज सांगीतले
जा बाळा तू झोपी
मी जागा आहे

उघडले खडकन डोळे
मग सैरभैर मी झालो
सेनेने बंड केले, हे
मज कुणी सांगीतलेही नाही

कैच्याकैकविताहझलकविताविनोद

वळण नसलेल्या वाटेवर

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
27 Jun 2022 - 10:43 am

*वळण नसलेल्या सरळ वाटेवर*
जेंव्हा कोणीतरी खास भेटतं
मग सरळ रेषेतलं आयुष्य
नागमोडी होऊन जातं

वादळ आणी पाऊस
मग नित्याच होतं पण
वादळा पूर्वीची शांतता
सोसण मात्र असह्य होतं

सोसाट्याचा वारा ,गारांचा मारा
संतत श्रावणधार, रस्ता चिबं होतो
आणी हवाहवासा गारवा
वाटेवर पसरतो

भिजलेला रस्ता,दाटलेली हिरवळ
पुन्हा एकदा कुशीत येते
अन वाटेवरली मरगळ
त्वरीत निघून जाते

आसेच कुणीतरी
खास भेटावे
प्रत्येकाला वाटते
मग नागमोडी वाट
सुद्धा सरळ भासते
२७-६-२०२२

आयुष्याच्या वाटेवरमुक्त कविताकवितामुक्तक

राष्ट्रहीतासाठी.

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in जे न देखे रवी...
26 Jun 2022 - 10:24 pm

चीन ची घुसखोरी, नेपाळ ची मुजोरी
कश्मीरींची पळापळी सहण करा! राष्ट्रहीतासाठी!
पेट्रोल ११०, डिझेल ९५,
सीएनजी ९०, सहण करा!
राष्ट्रहीतासाठी!
भरमसाठ टोल, वाढते प्रवासभाडे,
मरती जनता सहण करा!
राष्ट्रहीतासाठी!
निर्यातीवर बंदी, धंद्यात मंदी,
शेअरबाजारतील अंधाधुंदी सहण करा!
राष्ट्रहीतासाठी!
पीएम केअर प्रायवेट, अष्ट हजार करोडी जेट,सेंट्रल विस्टा सहण करा!
राष्ट्रहीतासाठी!
आमदारांची पळवापळवी, सत्तेसाठी हळहळी, ईडीच्या धाडी सहण करा!
राष्ट्रहीतासाठी!

कविता