रात्रभर पडणारा पाऊस
सकाळी नकोसा होतो
कितीही हलका का असेना
जेव्हा सतत बरसतो
संध्याकाळी उदास वातावरणात
मुसळधार कोसळतो
तेव्हा नको त्या आठवणींचा
पूर मात्र मनात येऊन जातो
रात्र उदास जाण्याची चाहूल लागते
मग रात्रभरचा पाऊस नकोसा होतो.
- पाभे
१३/०७/२०२२
प्रतिक्रिया
13 Jul 2022 - 8:13 pm | प्रचेतस
एकदम मस्त पाभे
13 Jul 2022 - 8:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाऊस आणि आठवणींचं एक नातं आहेच.
कविताही आवडली. लिहिते राहा.
एक शायर म्हणतो -
तमाम रात नहाया था शहर बारिश में
वो रंग उतर ही गए जो उतरने वाले थे
-दिलीप बिरुटे
(पाऊस आठवणीतला)
14 Jul 2022 - 2:51 pm | कर्नलतपस्वी
बाई या पावसानं, लावियली झीमझीम
भिजविलं माळरान, उदासलं मन
बाई या पावसानं !
कवी अनिल , पु.ल.
भारीच.
आज रेड अलर्ट बघुन कदाचित पाऊस थांबलाय, ग्रीन असता तर बदाबदा पडला आसता.
एक आधांज
15 Jul 2022 - 1:12 pm | पाषाणभेद
धन्यवाद आपणा सर्वांचे.
रात्रीचा पाऊस पडण्यात झालेली सकाळ व पुन्हा दिवसभराचा पाऊस होवून संध्याकाळी पाऊस पडून रात्रभर पडणार्या पावसाची नांदी रेखाटायचा प्रयत्न केला.
रसग्रहण येथे वाचावे.
16 Jul 2022 - 9:51 am | ज्ञानोबाचे पैजार
फारच आवडली,
पैजारबुवा,