(झाली किती रात सजणी...)

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
24 Dec 2022 - 12:27 pm

मुळ कवी दिपक पवारांची क्षमा मागून....

(आली जरी रात सजणी...)

आली जरी रात सजणी

झाली किती रात सजणी, नावडे मजला "थांब जरा येते", सांगणे.

अधिरला जीव माझा, असे कसे तुझे हे वागणे.

खडबड, खडबड आवाजास, ताल देती तुझी काकणे.

बरे वाटते का असे, सारखे सारखे वाकून माझे पाहणे.

झोपले चंद्र तारे,निद्रिस्त झाल्या उषा निशा.

मोकळ्या झाल्या आता, कुजबूजण्यास दाही दिशा.

ऐकता मंद किंकीण, पैंजणांची, वाढतात स्पंदने

गुलाबी थंडी अन् संग कोरियन घोंगडे, अपसूक माझी झाकतात लोचने

टार्गेट चे लोढणे,आणी टि. ली. चा आकांत

किती दिसांनी मिळाला, सखये शांत हा विकांत.

मन माझे खोळांबले,आली जरी न तू आता,
तर ओघळतील थेंब दवांचे अन् मावळेल नभीचे चांदणे.

नावडे मला तुझे ते उगाच रेगांळणे, अन् "थांब जरा येते", सांगणे.

-कवी पतंग पाॅवर

अनर्थशास्त्रउकळीकैच्याकैकविताविडम्बनकविताविडंबन

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

24 Dec 2022 - 12:36 pm | कर्नलतपस्वी

हल्ली बिग बाॅस मराठी ,हिन्दी रात्री बारा एक वाजेपर्यंत ब्राॅडकास्ट होते. स्त्रिवर्ग याचा मोठा चाहतावर्ग आहे असे मला वाटते.(याला कुठलाचआधार नाही).

मुळ कविता वाचल्यावर असे उगाच वाटले की कवीला काही वेगळाच संदेश द्यायचा आहे.(यालाही काही आधार नाही). म्हणून खरडले.

प्रचेतस's picture

24 Dec 2022 - 2:58 pm | प्रचेतस

=))
कहर आहे

कर्नलतपस्वी's picture

24 Dec 2022 - 4:08 pm | कर्नलतपस्वी

प्रचेतस भौ,धन्यवाद
कहर वगैरे काही नाही.
कवीने, वीता ळवे होऊन चलेली आहे.

दोघेही ऐटीत(आय टी) नोकरीला. एकत्र टि पिण्याची सुद्धा फुरसत नाही. टार्गेट,एण्ड गेम,टिम लिडरचे प्रेशर, गुलाबी पाकीटाची सतत टांगलेली तलवार यात तरूणाई दबून गेली आहे.विकांता मधे थोडा आराम मिळेल या उद्देशाने तो तीला लवकर झोपण्यासाठी विनंती करतोय.

बाकी कोंडक्यांच्या ओडंक्यांना काय अर्थ घ्यायचा तो त्यांनी घ्यावा.

नाताळच्या विकांता साठी तरूणाईलानाठाळ म्हातार्‍या कडून हार्दिक शुभेच्छा.

छान जमले आहे (इडंबन ?)
"खडबड, खडबड आवाजास, ताल देती तुझी काकणे" मधली खडबड कसली ते समजले नाही.
गुलाबी थंडी अन् संग 'कोरियन घोंगडे'... हे फार आवडले.
अलिकडेच वाचलेल्या डॉ. खरेंच्या 'व्यसन' मधील रात्री उशीरापर्‍यंत मोबाइलात रमणार्‍या रमणींमधूनही थोडी 'पेर्णा' मिळाली असावी, असे वाटून गेले.
तिकडे मोबाईलात रमलेल्या आजीची 'आजोबा' वाट बघत आहेत, असे गृहित धरून मुळात ही कविता वाचल्याने मधेच - "टार्गेट चे लोढणे,आणी टि. ली. चा आकांत" - ही काय भानगड, असे वाटले होते, मात्र प्रतिसादातून 'ये आजी-आजोबा का मामला' नसून 'जवां दिलों की दास्तां' असल्याचे कळले.
मिपावर सध्या 'सजणी' मंडळींना पुन्हा एकदा भाव आल्याचे दिसते.

कर्नलतपस्वी's picture

25 Dec 2022 - 2:54 pm | कर्नलतपस्वी

तिकडे मोबाईलात रमलेल्या आजीची 'आजोबा' वाट बघत आहेत, असे गृहित धरून

गेले ते दिन गेले,

दोन खाटांवर दोघे आपण (किंवा एकाच डबल बेडच्या दोन काठांवर) आशी परिस्थिती.

कधी काळी,

इथेच आणी या बांधावर
अशीच शामल वेळ

असे म्हणणारी तीच वेळ म्हणतेय,

दोन ध्रुवावर दोघे आपण.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. ही पीडा आजच्या तरूणाई बद्दलची आहे.

चित्रगुप्त's picture

25 Dec 2022 - 3:23 pm | चित्रगुप्त

आजोबा - आजीची वेगळीच समस्या असते. दोघांपैकी एक झोपलेले असेल, आणि दुसर्‍याला काही कारणाने यायला उशीर झाला की दिवा लावणे, कसलातरी आवाज किंवा "झोप लागलीय का ?" "पाणी आणलेय ना?" "किती घोरताय ?" असे काहीतरी विचारणे यामुळे झोपमोड झाली, की नंतर कित्येक तास झोप लागत नाही, त्यामुळे आपले वेळेवर दोघांनी एकदमच झोपणे बरे. असो.

भागो's picture

27 Dec 2022 - 5:18 pm | भागो

दोन ध्रुवावर दोघे आपण.
कर्नल साहेब,--- मला जे अंधुक आठवते आहे ते अस कि गजाननराव वाटवे हे गाणे अगदी रंगून रंगून गायचे. आणि त्या गाण्याचे प्रास्ताविक ही भन्नाट करायचे.

भागो's picture

27 Dec 2022 - 5:20 pm | भागो

दोन ध्रुवावर दोघे आपण
तू तिकडे अन मी इकडे
कुणी रचली ही कविता?