[खो कथा] पोस्ट क्र. ७
मागील भागावरुन पुढे, खुदिराम प्रथम पुरुषी एकवचनी..
...
शालु आणि शशिकांत दोघ्ंही गेले, निदान् या मितिमध्ये तरी मेले, पण मग इतर मितीमध्ये कुठ्ं जिवंत असले तर् काय्, माझा आणि त्यांचा तिथ्ं कधी सामना झाला तर ते बदला घ्यायचा प्रयत्न करतील ना ? त्यांच्या मरणाला मी उघड् उघड् नसलो तरी जबाबदार् आहेच् ना का मिती बदलली की जबाबदारीतुन् देखिल् मुक्तता होते ? तो नैन्ं छिंदन्ती वाला आत्मा, तो कुठं गेला त्या दोघांचा ? तो मिती बदलु शकतो का, बदलुन् देखिल् पुन्हा नव्या शरीरात् प्रवेश् मिळवु शकतो का ? त्या नव्या शरीराला तो या जुन्या आठवणींच्या आधारे वापरु शकतो का ?