ई बे वरिल ऑनलाईन खरेदी
ई बे वर नुकताच मी एक मोबाइल फोन खरेदी केला. फोन ची कंडीशन व पर्फोर्मन्स हे दोन्ही पण योग्य वाटत आहे. हा फोन इम्पोर्टेड असल्यामुळे तो बराच स्वस्त मिळाला. (२६००० रुपये ओरिजनल किंमत असलेला फोन १२००० ला मिळाला ) फोन चेक केला असता तो unsealed होता. विक्रेत्याला याबाबत विचारले असता त्याने सांगितले कि हे फोन इम्पोर्टेड असल्यामुळे त्यांचे कस्टम कडून चेकिंग होते. तसेच या फोन मधले अक्सेसरीज देखील थोडी वेगळी आहेत. याबद्दल त्याने स्पष्टीकरण दिले कि हे सर्व अक्सेसरीज भारतासाठी नसून ते इतर देशांसाठी केले जातात त्यामुळे ती वेगळी आहेत. हे सर्व त्याने त्याच्या जाहिरातीमध्येही नमूद केले होते.