पोरगीपटाव शास्त्राचे नियम

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in काथ्याकूट
16 Jan 2015 - 2:31 am
गाभा: 

डिस्क्लेमर -
१)A - फक्त प्रौढांसाठी ! यत्ता दुश्ली तुकदी ब च्या विद्यार्थी विद्यार्थीनींनी ताबडतोब ही टॅब बंद करावी आणि पुढील लेख वाचणे टाळावे . शॉव्हिनिझम शॉव्हिनिझम म्हणुन दांभिक दंगा करणार्‍यांना दुर्लक्षित करण्यात येईल.
२) स्टॅच्युटरी वार्निंग - पोरगी पटवणे हे येर्‍या गबाळ्याचे काम नव्हे तेव्हा खालील लेखातील गोणत्याही गोष्टींची अंमलबजावणी स्वतच्या रिक्स वरच करावी .
३) माणणीय स्पांडुजींनी लाल रंगाचा डबा संपवला असला तरी मी थोडाफार उरल्या सुरल्या लाल रंगाचा वापर करुन धागा लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे . तेव्हा राग लोभ मानु नये .

_______________________________________________

पोरगीपटाव शास्त्राचे नियम

सर्वप्रथम सांगतो की मी जे सांगत आहे ते बेशर्त मान्य करणे हा पोरगी पटवण्याच्या एक सोपा उपाय आहे .

लग्न ही एक अत्यंत रीडंडंट टाकाऊ संस्था आहे .
मुळ प्रेरणा तीनच - लोकेषणा वित्तेषणा आणि पुत्रेषणा !(काहीलोक दारेषणा म्हणतात पण ते धाधांत असत्य आहे) आता ह्यात कोठेही पुत्र हा पत्नी पासुन व्हावा असे म्हणले नाहीये .तेव्हा लग्न ह्या निष्कारण बेडीची काडीमात्र आवश्यकता नसते असे माझे ( नेहमी प्रमाणेच ) टोकाचे मत आहे जे आचार्य रजनीश ह्यांच्या मताशी तंतोतंत जुळते . तर सर्व लग्नाळु पुरुषांनी खरच लग्नाची गरज असते का ह्यावर पुन्हा एकवार चिंतन करावे असे सुचवत आहे . असो !
_______________________________________________

तुम्ही टवाळ कार्ट्याची "बाईक्स घेताना" ही लेखमालिका वाचत आहात का ? साला लाखभर रुपायची गाडी घेताना आपण ईतका विचार करतो मग लग्नसारखी आयुष्यभराची करोडो रुपायांची इन्वेस्टमेन्ट नुसतीच अंदाजे कशी करता ? तर मुद्दा काय मुद्दा काय , आधी मुलींचे क्लासिफिकेशन करा , मग स्वत चे क्लासिफिकेशन करा आणि मगच योग्य ती पोरगी ठरवा. (पी.एस- मुली म्हणले आहे , स्त्रीया आणि महिलांनी राग मानुन घेवु नये मुलींनी राग मानला तर प्रत्यक्ष भेटुन राग दुर करण्यात येईल .)

तर जाणकार अभ्यासकांच्या मते मुलींच्या ABCDEFG अशा ७ कॅटेगरी असतात .( आणि मुलीही मुलांच्या अशाच केटेगरी पाडत असाव्यात असा एक अंदाज आहे ) त्यांचे वर्णन पुढील प्रमाणे -

A
अप्सरा कॅटेगरी - अतिचषय सुंदर निव्वळ अप्सरा म्हणता येतील अशा मुली . ह्यांना बघता क्षणीच तुमच्या लक्षात येते की ये अपने बस की बात नही ! स्वप्न सुंदरी ! रुप गर्विता ! उदाहरण द्यायचेच झाले तर आमची एव्हा ग्रीन किंवा मर्गॉट रॉब्बी . तर ते असो . माणसाने नेहमी आपल्या चड्डीत रहावे . उगाच अव्वाच्च्या सव्वा अपेक्षा ठेवु नयेत .

B
बायको कॅटेगरी - ही महत्वाची कॅटेगरी . ज्या मुलगी पाहता क्षणी आवडेल , ती अगदी स्वर्गीय सुंदर नसेल अन अगदीच अलिबागचीही नसेल . जिला तिच्या सौंदर्याची हुशारीची जाणीव असेल पण गर्व नसेल. जिने कोणताही ड्रेस घातला , अगदी बिकीनी पासुन ते ९ वारी भरजरी शालु तरीही जी तुम्हाला आवडेल. उदाहरणार्थ - ही कॅटेगरी फारच सब्जेक्टीव्ह आहे . मला आजवर ह्या कॅटेगरीतील फक्त एकच मुलगी भेटली आहे तरीही उदाहरण द्यायचे झालेच - प्रिया बापट !

C
C म्हणजे Cच कॅटेगरी . अधिक माहीतीकरिता इच्छुकांनी व्यनि करावा . उदाहरण द्यायचेच झाले तर सौ. सन्नीताई लिऑन .
a

( इतरांचे फोटो टाकण्याचा मोह आवरला पण सन्नीताईंचा फोटो टाकण्याचा मोह काही केल्या आवरला नाही हो )

D
दीदी कॅटेगरी - अर्थात जी मुलगी खुप सुंदर असेल पण तिच्याकडे पाहुन तुमच्या मनात लग्नाचा वगैरे विचार येणार नाही , उदाहरणार्थ कोण ती आपल्या सारेगमपची अँकर ...ती . तिच्या साठी होऊन जाऊदे परत एकदा टा़ळ्या !

E
एक्सेट्रा एक्सेट्रा कॅतेगरी अर्थात संपुर्ण दुर्लक्षणीय . उदाहरणार्थ ?????????

F

फ्रेंड कॅटेगरी - ही अजुन एक महत्वाची कॅटेगरी . काही मुली असतात की ज्या खुप सुंदर असतील , सुस्वभावीही असतील पण तरीही तुम्हाला त्या केवळ मित्र म्हणुनच हव्या असतील ( प्लीक नोट मित्र ... नॉट मैत्रीण ) .
बर्‍याचदा बी आण एफ ह्या कॅटेगरीत घोळ होताना पाहिला आहे लोकांचा . फार डेंजरस घोळ . चुकुनही एफ केतेगरीतल्या मुलीशी लग्न करु नका . वाईट ट्रेड ऑफ्फ . एका जिवाभावाच्या मित्राला मुकाल !

G
जी म्हणजे ग्रॅन्नी केटेगरी . (खरंतर अशी काही केटेगरी नाहीये तरीही वरील कॅटेगरायझेशन वाचुन बर्‍याचदा "शी कसले मेल शॉव्हिनिस्टीक विचार आहेत " अशी टिपिकल आज्जीबाईटाईप दांभिक मते मांडणार्‍या सर्वांना कुठे तरी टाकायचे म्हणुन बनवलेली केटेगरी . एक गोष्ट लक्षात घ्या , इफ यु कॅन , जग आहे हे असं आहे ! तुम्हाला पाहुनच जग तुमच्या भेटीविषयी आखाडे बांधत असते . फर्स्ट इम्प्रेशन इज लॉन्ग लास्टिंग इम्प्रेशन ...
समोर जे दिसत आहे त्याची बेशर्त स्वीकृती हा मायेतुन बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे असे गुरुदेवांनी म्हणुन ठेवले आहे .
आता समोरची पोरगी निव्वळ काकुबाई सारखी दिसत असताना तिला गर्लफ्रेंडभावाने पहाणे किंव्वा समोरची मुलगी तुमच्याकडे जीवनसाथी ह्या द्रूष्टीकोणातुन पहात असताना तिच्याविषयी मातृभाव धारण करा म्हणणे हे ठार दांभिकपणा आहे . तेव्हा ह्या ट्रॅप मधे न अडकण्याची व्यवस्थित काळजी घ्यावी .

तर मुलगी पहा ती कोणत्या कॅटेगरीत बसते ते आधी ठरवा , DEFG ह्या कॅटेगरी बाय डेफीनीशन सोडुन द्या , उगाच A च्या मागे लागु नका , स्वतच्या चड्डीत राव्हा . A कॅटेगरीतील मुलगी कशी पटवावी ह्याचा कन्क्लुजीव्ह अ‍ॅल्गोरिदम अभ्यासु जाणकारांनाही अजुनही गवसला नाहीये .
B केटेगरीवर फोकस करा .
( C कॅतेगरीची मुलगी कशी पटवावी ह्यावर मार्गदर्शन हवे अस्ल्यास कन्सल्ट्न्सी फी भरावी लागेल )

तर हे झाले मुलीं विषयी .

आता जरा आत्मचिंतन करु .

मुली पुरुषां इतक्या व्हिजुअल नसतात . त्यांच्या लेखी मानवी भावभावनांना नाते संबंधांना जास्त किंमत असते ( अर्थात पुरुशांनाही मानवी भाव भावनांचा ओलावा जवळीक हे सारे जाणवतेच ... फक्त थोडे उशीराने )
तरीही व्हिजुअल अ‍ॅपीयरन्स कडे अगदीच दुर्लक्ष करुन चालणार नाही . स्वामी विवेकानंदांनी म्हणल्याप्रमाणे तुमच्या इम्प्रेशन पाडण्यामधे ६६% योगदान हे तुमच्या अ‍ॅपीयरन्स चे असते आणि उरलेले ३४% तुमच्या विचारांचे . म्हणुन मुलांनीही त्यांच्या फिटनेस कडे लक्ष देणे गरजेचे आहे .

१) पोट - ठेरपोट्या मुलगा कोणत्याच मुलीला प्रथमदर्शनी आवडणे शक्य नाही .( नंतर १०० वेळा बघितलं तरी काय घंटा वाडणार आहे म्हणा ) तर तात्पर्य काय , तर लग्नाळु असाल अन ढेरी असेल तर पहिल्यांदा पळायला सुरुवात करा. डायट कडे लक्ष द्या पोटावर जे काही तीन चार महिनांचे पाप आहे त्याचे अ‍ॅबोर्शन करुन घ्या . अजुन सांगतो , इथे अगदी सिक्स पॅक मसल्स असणे अपेक्षित नाहीये , कोणत्याही मुलीला कट्स पडलेले मसल्स उर्फ मटन की दुकान आवडत नाहीत , बॉडी बिल्डींगचा शौक पुरुषांनाच असतो , स्त्रीयांना नाही . बॉडी अ‍ॅथलेटीक असणे अपेक्षित आहे . उदाहरणार्थ अकीलीज - ब्रॅड पिट किंव्वा मेट डीमन किंव्वा टॉम क्रुज . कोणत्याही मुलीला विचारा , अत्ताचा सलमान जास्त छान दिसतो की आधीचा हम दिल दे चुके सनम / प्यार किया तो डरना क्या / हम आपके है कोन मधला .... उत्तर हम आपके है कोन मधला असेच येईल !
इव्हन रंग ही गोरा असला पाहिजे असा काही हट्ट नाहीये , मेन्स फेयर अ‍ॅड हॅन्डसम क्रीम हा निव्वळ क्युतियापा आहे . " फार गोरी मुलं गे वाटतात " हे विधान एका मुलीच्या तोंडुन मी स्वत ऐकले आहे . सावळे असाल ठार काळे असाल तरीही हरकत नाही , इतर १७६० उपाय आहेत पण ह्या गोरेपण्याच्या मागे लागण्याचा गाढवपणा कदापि करु नका .

२) टक्कल - लहान वयात टक्कल पडने हा आपल्या पिढीचा एक वाईट शाप आहे , पण आहे तर आहे , त्याची बेशर्त स्विक्रूती करा . उगाच चार अल्याडचे चार पल्याडचे केस घेवुन टक्कल झाकण्याचा पयत्न फार हास्य्यास्पद वाटतो , त्यापेक्षा तुळतुळीत टक्कल कधीही परवडले ( बाकी आमच्या माहीती नुसार टक्कल पडणे हे टेस्टेस्टेरॉन ह्या पुरुषी अंतस्त्रावाशी निगडीत असते जे की इतर पौरुषत्वा संबंधीचे गुण उभारुन आणते तेव्हा खुष राव्हा )

३) दाढी - हा एक ट्रिकी पाँईट आहे , जर फॉर्मल रहाणार असाल दाढी अगदी गुळगुळीतही असली पाहिजे , फ्रेंच चालु शकेल, आणि जर सेमी फॉर्मल रहाणार असाल तर मॉडरेट स्टबल . उगाच अस्ताव्यस्त वाढवलेली दाढी मुलींना आवडत नाही .
( आता लगेच आमचे वेरुलचे फोटो पाहुन मी दाढी का वाढवली आहे असा प्रश्न/ कुरापत तुमच्या मनात आला असेल तर थांबा , लगेच मला तोम्डावर पाडल्याचा आनंद साजरा करु नका. मी किंग जॉज पंचम ह्याच्या सारखी स्टाईल करत आहे . आणि ते छन दिसत आहे अशी एकीकडुन पावतीही मिळाली आहे )
कधीही लग्नाआधी मिशी वाढवु नका . उगाच वयापेक्षा मोठे वाटताल तुमी .

४) ड्रेसिंग सेन्स - ऑफीसात कायम फॉर्मल राव्हा . कडक इस्त्री केलेला शर्ट पॅन्ट . चकाचक पॉलीश केलेले बुट ( मी ऑफीसात एक क्विक पॉलिशची बाटली नेवुन ठेवली आहे ) . शुक्रवारी इन फॉर्मल चालते म्हणुन उगाच झ्यँकी प्यँकी टीशर्ट घालुन जाऊ नका . तेव्हाही सेमी फॉर्मल किंव्वा बिझिनेस स्मार्ट कॅजुअल्स वापरा . शक्य असल्यास टाय घालत चला ( ५००-१००० रुपायचे किमान ३ टाय ठेवाच , बाकीचे चर्च गेट स्टेशनवर १०० रुपयात घेतलेले ३-४ चालतील ). टायच्या डिझाईन वरुन त्या माणसा बद्दल बराच अंदाज लावता येतो . आठवडाभर लोक यड्यात काढतील टाय घातला म्हणुन . पण पुढे तेच लोक एखाद्या दिवशी टाय का घातला नाही म्हणुन चौकशी करतील .
कायम डिओ वापरत चला . फेरोहार्मोन्स हा ठार गाढवपणा आहे आपण माकडाचे माणुन होवुन पन्नास हजार वर्ष होत आली , आता तरी सुधारा . कोणत्याही मुलीला घामाचा वास आवडत नाही हे पक्के लक्षात ठेवा .
घड्याळ - चांगले गोल्डन / सिल्वर / लेदर बॅन्ड चे घड्याळ वापरत चला , पण चुकुनही रोलेक्चेओमीगा चे डुप्लीकेट घड्याळ वापरु नका . खोटारडेपणा लगेच पकडला जातो अन असल्या बाबतीत तर पोरींची नजर लैच शार्प असते .
गॉगल्स - हे ऑप्शनल आहे पण तरीही घालणारच असाल तर ब्रॅन्डेड रेबॅन किंवा फास्ट्रॅकचा घाला , रस्त्याच्या कडेचा १०० रुपायाचा नको . बाकी कार्बन फ्रेमचा ० नंबरचा चश्मा बर्‍याच जणांना सुडो इन्टेलेक्चुअल लूक देवुन जातो की जो काही पोरींना फार आवडतो .
केस नखं दात ह्यांची योग्य निगा घेत चला . स्थानभ्रष्टा न शोभन्ते दन्त केश नख नरा ! असे स्पष्ट सांगुन ठेवलय पुर्वजांनी .
ऑफीसात कधीही कांदा लसुण खावु नका , नाय नो नेव्हर . कायम माऊथ फ्रेशनर वापरत चला . ( मी आमच्या सातारची सुप्रसिध्द भावे बडीशेप खात असतो बेस्ट . मिन्ट शक्यतो टाळा . मिन्टचे 'इतर' काही दुष्परिणाम होतात असे ऐकुन आहे ) सिगारेटही , अगदीच व्यसन असेल तर , ऑफीस सुटल्यावर . नॉट इन ऑफीस टाईम . ( बाकी एक वेळ दारु प्या गांजा प्या लेको पण तंबाखुजन्य कोणतेही व्यसन टाळाच्च , तंबाखु डायरेक्ट पौरुषत्वावर परिणाम करते असे अनेक अभ्यासातुन दिसुन आले आहे .)
गाडी असलीच पाहिजे असा हट्ट नाही पण असेल तर त्यावर अजिबात धुळ नको . चकचकीत पाहिजे . मुलींना चकचकित स्प्लेन्डर ही धुळ बसलेल्या सी बी आर / इन्फिल्ड पेक्षा जास्त आवडते असे आजवरच्या पाहण्यात आले आहे .
पोरगी पटवायची असल्यास आधी स्वत कडे लक्ष देणे फार फार महत्वाचे आहे , जो माणुस स्वतत्चीच काळजी घेवु शकत नाही तो दुसर्‍यांची काय घेणार असे साधे स्पष्ट मुलींचे लॉजिक असते !!

ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्या . शेवटी माणुस हा त्याच्या छोट्या छोट्या कर्मांची समष्टी असतो , म्हणुन इकडे बारकाईने लक्ष दिले तर समष्टी उत्तम होईलच !

सर्वात महत्वाचे
५ ) कायम कॉन्फिडंट रहा . स्वॅगरिंग इज द राईट वर्ड ! स्वॅगरिंग लाईक जेम्स बॉन्ड ! कधीही कोणत्याही परिस्थीतीत तुमचा वीकनेस मुली पुढे येवु देवु नका ( अनलेस ती तुम्हाला कुशीत शिरुन रडु देणार असेल ) . कॉन्फिडंट ... ऑल्वेज कॉन्फिडंट .

!! न अधिकारो न संस्कारो सिंहस्य क्रियते मृगा !
विक्रमार्जित राज्यस्य स्वयमेव मृगेन्द्रता !!

हा अ‍ॅटीट्युड कायम दिसला पाहिजे तुमच्या चालण्यातुन बोलण्यातुन वागण्यातुन . पेबळे पणाने काहीही होत नसते विश्वास ठेवा . किलिंग इन्स्टिन्क्ट असला पाहिजे कायम . का य म . ( मी परवा चुकुन हे विसरलो अन 'एक काम जमणार नाही' असे बोलुन बसलो तर लगेच माझ्या बॉस ने मला मीटींग रुम मधे घेवुन ' नेव्हर एव्हर एव्हर एव्हर से दॅट अगेन' असा ढोस दिला अन जागे केले . )

नेव्हर से नेव्हर !!

आता हे झाले ज्यांना पोरगी पटवुन लग्न करायचे आहे त्यांच्यासाठी .

ज्यांना अ‍ॅरेंज मॅरेजच करायचे आहे त्यांच्यासाठी , काय राव एकदा ट्राय तरी करुन पहा वरचे उपाय . लव्ह मॅरेज हे अ‍ॅरेंज मॅरेज पेक्षा कधीही श्रेष्ठ , ज्या माणसाला स्वतत्च्या आवडी निवडी कळत नाहीत, कळाल्या तर त्या प्राप्त करता येत नाहीत तो खरंच लग्नाच्या लायक झाला आहे का ? हा मोठ्ठा गंभीर प्रश्न आहे . प्रत्येकाला ज्याचं त्याचं आयुष्य जगायचं आहे , आई वडील किती दिवस पुरणार ? स्वत च्या पायावर कधी उभे रहाणार ? आणि मग असे असताना मुलींच्या अव्वाच्या सव्वा अपेक्षा असतात हे कितीही कटु सत्य असले तरी ते रडगाणेच वाटणार .

असो तर ... अ‍ॅरेंज मॅरेजच्या प्रत्येक समाजात वेगवेगळ्या प्रथा असतात , ब्राह्मणांच्यात मुलगी मुलाचे घरी येते पहायला. आता ही प्रथा कितीही प्रॅक्टीकल वाटत असेल तरीही मुलाकरता फार ऑकवर्ड सिचुअशेन असते .
तर मुलीच्या घरचे आपल्या घरी येणार असतील तर आपल्या घरी आपलाच शब्द चालतो का ह्याची आधी खात्री करुन ह्या . आणि वर आधीच सांगितल्या प्रमाणे प्रचंड कॉन्फिडंट वागर रहा . आई वडीलांना मान देत रहा पण तरीही घराचे राजे तुम्हीच आहात असे दिसले पाहिजे . घराची साफसफाई काही खान पान पत्रिका देवघेव वगैरे आई बघुन घेईल उगाच नसत्या गोष्टीत लक्ष आणि वेळ घालवु नका . आजकाल मुलाची एजुकेशनल सर्टिफिकेट्स अन सॅलएरी स्लिप मागण्याची बावळट प्रथा आली आहे त्याला ठाम नकार द्या . तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही बाहेरुन चौकशी करा हे घ्या माझे बिझीनेस कार्ड . असे सडेतोड उत्तर देता आले पाहिजे .
मुलीकडे नीट पहा , पण उगाच नेत्रसुख घेत बसु नका त्या साठी एफ.सी रोड आहे .घर ही ती जागा नव्हे .

आणि इथे सर्वात महत्वाचे
एक खुणगाठ कायम मनाशी बांधा की ज्या अर्थी ह्या मुलीचे लव्ह मॅरेज झाले नाही त्या अर्थी तिलाही तिच्या आवडी निवडी कळत नाहीत किंवा कळत असतील तर त्या मिळवता येत नाहीत आणि मिळवता आल्या असतील तर तुम्ही क्युतिया बनवले जात आहात . ह्या सार्‍या प्रकारची मानसिक तयारी ठेवा .
पण तरीही मुलींची संख्या खुप कमी आहे हे कायम ध्यानात असु दे आणि इथे तर इम्प्रेशन मारायला तुम्हाला फार मोजका वेळ मिळणार आहे तेव्हा तुमचे शब्द नीट विचार करुन वापरा . ज्याप्रमाणे देवाने मोराला लांडोरीला इंप्रेस करायला पिसारा दिला , सिंव्हाला सिंव्हीणीला इम्प्रेस करायला आयाळ दिली त्याचप्रमाणे देवाने माणसांना भाषा दिली आहे . ब्राह्मणांच्यात तरी आनि पानि लोनि लय वगैरे शब्द चालणार नाहीत आणि उगाच अतिसंस्कृताळलेले शब्द सानुनासिक करुन वापराल तरे त्यालाही थम्प्स डाऊन मिळेल .

असो . सांगण्यासारखं बरंच आहे , पण सर्वात महत्वाचं हे की

लग्न करायची खरंच गरज आहे काय ह्यावर पुनश्च एकवार चिंतन करा

अन जर का ठरवलेच करायचे तर तर मात्र जिव तोडुन मेहनतीला लागा .

प्रपंच करावा नेमका ! मगचि घ्यावे परमार्थ विवेका !
येथे आळस करु नका ! विवेकी हो !!

अचुक यत्न करवेना ! म्हणोन केले ते सजेना !
आपला अवगुण जाणवेना ! काही केल्या !!

भाग्यासी काय उणे रे! यत्ना वाचुन राहिले !
यत्न तो देव जाणावा ! अंतरी धरता बरे !!

घालुन अकलेचा पवाड ! व्हावे ब्रह्मांडाहुनी जाड !
तेथे कैचे आणले द्वाड ! करंट पण !! श्रीराम !! - समर्थ !!

कितीही दांभिकपणा आणि हिप्पोक्रसी केली तरीही सर्व्हावल ऑफ फिटेस्ट हा निसर्गाचा नियम बदलणार नाही . जे जगायला फिट असतील , जे हा संघर्ष करुन जिंकतील त्यांना पुनरोर्पादन करण्याची संधी मिळेल हे कितीही कटु वाटत असले तरीही सत्य आहे . आहे हे असे आहे

जे समोर आहे त्याची बेशर्त स्वीकृती हा ह्या चक्रातुन बाहेर पडण्याचा एक सोपा उपाय आहे - इति गुरुदेव .

_________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

अवांतर -
१) लेखातील काही भाग काही जणांना बोल्ड वाटण्याची शक्यता आहे . कृपया हलके घ्यावे . आपण गैरसमज करुन घेणार नाही असा विश्वास आहे .
२) इतक्या आधिभौतिक विषयावरील लेखन केल्या नंतर आता आम्हाला आमचा बरेच दिवस तुंबुन राहिलेला अध्यात्मिक लेख
" समष्टीची व्यामिश्रता की व्यामिश्रतांची समष्टी - साधकावस्थेतील काही अध्यात्मिक ट्रॅप्स " प्रायश्चित्त म्हणुन पाड्लाच पाहिजे अता .
३) लेख माझ्या मोजक्या ऑब्झरवेशन मधुन लिहिला आहे , प्रत्येकाचे अनुभव विश्व वेगळे असते त्यामुळे तुम्हाला ह्यातील कित्येक मते पटणार नाहीत . मते न पटणे आणि विरोधी मते स्विकारणे हा एका प्रगल्भ समाजातील एक अत्यंत महत्वाचा गुण आहे . पण उगाच डीनायल मोड मधे जाउन स्वत्चे नुकसान करुन घेवु नका .

४) लाल रंगाचा डबा संपला .
______________________________________________________________________

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

16 Jan 2015 - 2:40 am | खटपट्या

वाचतोय :)

रामपुरी's picture

16 Jan 2015 - 3:05 am | रामपुरी

प्रायश्चित्त म्हणून "बोगद्यातील वळणांची बेशर्त स्वीकृती" असा लेख पाडा.

अवांतर: यातलं काहिही न करता पोरी पटवता येतात

चांगले मार्गदर्शन करीत आहात गुरुदेव ! ;)
बाकी सणी लिऑणीला साडीत पाहण्याची सवय नाही हो... पण तुमच्या भापो ! ;)
पुढच्या जन्मी चिंतन करण्याचीच तयारी करावी ही गाठ याच जन्मी मारुन ठेवतो आहे, या जन्माची ही "संधी" आमच्या हातुन गेल्याचे अतीव दु:ख झाले आहे हे नमुद करु इच्छितो ! तसेही पुढच्या जन्मी शेख किंवा बिसझनेस टायकुन यांचा पुत्र म्हणुन जन्म घेण्याचा मानस आधीच इथे व्यक्त करुन झालेला असल्याने देवाक काळजी ! असे म्हणुन मी टंकन श्रम आवरते घेतो. ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मधुबन खुशबु देता है... { Saajan Bina Suhagan }

मदनबाण's picture

21 Jan 2015 - 8:02 pm | मदनबाण

काही वर्षांपूर्वी तू जशी कॅटॅगरी दिलीस आहेस तसेच पाखरांचे प्रकार दिले होते... ते आज आठवले ! ;)
पण मी काही पाखरांचे प्रकार द्यावे म्हणतो !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Teri Deewani... { Kailash Kher }

आजानुकर्ण's picture

16 Jan 2015 - 3:08 am | आजानुकर्ण

गिरीजाशेठ, विनोदी लेख आवडला. पुढचा भाग येऊद्या.

नगरीनिरंजन's picture

16 Jan 2015 - 4:43 am | नगरीनिरंजन

सटायर आवडले. स्वतःवर विनोद करण्याइतकी आजची तरुण पुरुषमंडळी प्रगल्भ आहेत हे बघून बरे वाटले. (कदाचित लवकर टक्कल पडल्याचा परिणाम असेल).

आदूबाळ's picture

16 Jan 2015 - 3:29 am | आदूबाळ

गुर्देव.... जबर पंचेस :))

भृशुंडी's picture

16 Jan 2015 - 3:32 am | भृशुंडी

ह्या विषयात पुढे जाऊ पहाणार्या इच्छुकांनी नील स्ट्राऊस साहेबांचं Rule of the Game वाचावं. आपल्या जबाबदारीवर.

प्रसाद गोडबोले's picture

24 Jan 2015 - 2:33 am | प्रसाद गोडबोले

Rule of the Game

ज ब र द स्त ग्रंथ !!

पोप संप्रदायाच्या सर्व अनुयायांनी ताबडतोब हा ग्रंथ वाचावयास घ्यावा !
This is not advice , This is prescription !!

__________________________________________________________________________________
अवांतर -- ह्या लेखाचा पुढील भाग "पोपशास्त्र - उत्तरार्ध " २६ जानेवारीला , स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याच्या दिवशी प्रकाशित करता येईल असा प्रयत्न करीत आहे .
फेब महिना नील स्ट्रोस महाराजांनी डुड ने जे सांगितले आहे त्याचे अनुकरण करण्यात घालवावा अन
त्यानंतर ला लेख मालिकेचा सर्वात महत्वाचा तीसरा आणि अंतिम भाग "प्रील्युड टू पोपशास्त्र" प्रकाशित करण्यात येईल !

मुक्त विहारि's picture

16 Jan 2015 - 4:01 am | मुक्त विहारि

आवडला...

स्पंदना's picture

16 Jan 2015 - 6:18 am | स्पंदना

ते टकलाबद्दल....सरळ शेव्ह करायच आख्ख डोकं. उगा चार दोन केस सांभाळण्यापेक्षा हे फार छान दिसतं.
अस आपल माझं मत.
बाकिची मते पियुषाकडुन ऐकायला आवडतील मुलींच्यात.
तशीही मी हे वाचुन माझ्या मुलाला मार्गदर्शन करु शकेन. ;)

बरोबरे. संपुर्ण टक्कलपेक्षा झालरवालं ट्क्कल असेल तर जास्त वयस्कर दिसतो माणूस.

पियुशा's picture

16 Jan 2015 - 11:54 am | पियुशा

मी आले आले आले ....... ;)

कॅटेगरी - बिटेगरी अस कै नसत रे प्रगो :)

मुलगी / मुलगा पहाता क्षनी कलेजा वैगेरे खल्लास झालाच पाहिजे असही काही नाहिये

कधी कधी मुला / मुलिच्या बाबतीत "दिखाउ माल फसवा धन्दा पण असु शकतो "
दिखावे मत जावो अपनी अकल लगाओ " इज बेश्ट "
मग ते लव्ह असो वा अरेन्ज :)

स्पा's picture

16 Jan 2015 - 11:58 am | स्पा

क्षनी

शब्द काळजाला भिडल्या गेला आहे

पियुशा's picture

16 Jan 2015 - 12:15 pm | पियुशा

हे म्हनजे दुसर्याच्या डोल्यातल कुसल पहान्यासारखे आहे आपटे :p:p:p
स्वत कीती कीत्ती चुका कलतो शुद लेकनात आला मोठा :p

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jan 2015 - 12:21 pm | अत्रुप्त आत्मा

@हे म्हनजे दुसर्याच्या डोल्यातल कुसल पहान्यासारखे आहे आपटे >>> =)))))) ... =)))))) .... =)))))

@स्वत कीती कीत्ती चुका कलतो शुद लेकनात आला मोठा>> =))

आज लै दिसानी मारामारी बगाया भ्येटली! :-D
.
.
पांडुब्बा आणि जिल्बुषा च्या खरडवहि हणामारिचा
साक्षिदार:-
आत्मु कलंदर! :-D

डोल्यातल कुसल पहान्यासारखे

मेलो मेलो

स्वत कीती कीत्ती चुका कलतो शुद लेकनात

लेकनात =)) =))

पियुशा's picture

16 Jan 2015 - 12:37 pm | पियुशा

*pleasantry* *db* :db:

सविता००१'s picture

16 Jan 2015 - 12:21 pm | सविता००१

स्पावड्या.........

=)) मायला बराच लाल रंग उरलेला की, मना वाटला संपला का काय?

भन्नाट observations गुर्जी

सविस्तर प्रतिसाद थोड्याच वेळात, बाकी संस्कृती रक्षक येतीलच धावत आता :D

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jan 2015 - 7:27 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

गुरुवर्य =)) _/\_

अगदीच अजाण बालके एवढं वाचुन फार तर नखं कापतील,दात घासतील,डिऒ आणतील.पण पटावशास्त्राऐवजी ,त्याचा एक भाग खुदको चमकाव शास्त्रच जास्त झाले की ^_~
सगळं आणलं आता पुढे काय करायचे रे असे व्यनि येणार तुम्हाला =))

स्पा's picture

16 Jan 2015 - 8:08 am | स्पा

हे काय भुललासी वरलिया रंगा होईल, अशाने पोरगी पटु शकेल, पण कितपत टिकेल हे सांगणं कठीणे.

शास्तरी ब्वा, पुढील अध्यायात पटावपोरगीटिकाव दिल्याबस येउद्या

सुबोध खरे's picture

16 Jan 2015 - 12:00 pm | सुबोध खरे

स्पा बुवा
मुलगी पटवली कि दोन महिन्यात लग्न करायचे किंवा पुढे अडीच वर्ष आत करता येणार नाही अशा अटी घालायच्या. हजार हिश्शाने दोन महिन्यात बार उडतो. एकदा मंगळसूत्र गळ्यात अडकवले कि मग धास्ती नाही

स्पा's picture

16 Jan 2015 - 12:08 pm | स्पा

=))

जेम्स बॉन्ड ००७'s picture

22 Jan 2015 - 9:36 am | जेम्स बॉन्ड ००७

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jan 2015 - 9:28 am | अत्रुप्त आत्मा

@लाल रंगाचा डबा संपला. >>> =))))))

प्रश्नोपनिषदासह पुन्हा लवकरच धग्याला भेट दिली जाणार आहे,तेंव्हा त-यारित रहा रे....

गिरिजा.....काsssssकाsssss!!!!

|____|______|____|_____|
शब्द्श्रेय्य:- महर्षि- आगोबा हत्ती! :-D
वेरुळ-शेवटची लेणी.
औ रंगा बाद! ;-)

पैसा's picture

16 Jan 2015 - 9:57 am | पैसा

ब्वार्र रे प्रगो. ब्लाईंड डेटपासून गिर्जाकाकूंची बरीच प्रगती झालेली दिसतेय.

हा लेख वचून एक स्टुरी आठवली. सातवीतल्या बाळ्याने बराच धीर करून सहावीतल्या पिंकीला प्रपोज केले. आणि ती चक्क हो म्हणाली. बाळ्या पुन्हा चिंतेत पडला. कारण तिने हो म्हटल्यावर पुढे काय करायचं अस्तं हे त्याला म्हैत न्हवतं ना!

अवांतरः लेख मस्त झालाय! लाल रंगाचा डब्बा संपला असला तर गुलाबी घेऊन येणे.

अरेच्च्या! या गिर्जाकाकू आहेत होय! माझा लै गोंधळ होत होता.

प्रसाद गोडबोले's picture

16 Jan 2015 - 6:35 pm | प्रसाद गोडबोले

हा गोंधळ

हा गोंधळ अजुनही बर्‍याच लोकांचा होत आहे . परवाच वेरुळहुन येताना गंगापुरीला जेव्हा जेवण झाल्यावर आम्ही प्रा.डाँ.ना सांगितले की गिरीजा म्हणजेच प्रगो तेव्हा त्यांनीही कपाळाला हात लावुन घेतला :D

आयडी आणि लेखनाच्या मानाने मी दिसायला बराच सोज्वळ आहे हो ;)

अवांतर : पेंटींग ब्रशला राहिलेला थोडासा लाल रंगही संपवण्यात आला आहे =))

लेखनाच्या मानाने मी दिसायला बराच सोज्वळ आहे हो

पॉईंट टू बी नोटेड!!

अगदी हेच्च तुम्हाला प्रतेक्ष पाहून माझ्याही मनात आलं होतं.

गिर्जा = प्रगो हे अर्थातच माहीत होतं, पण माझ्या डोळ्यांसमोर प्रतिमा "दुनियादारीतल्या दिग्याचा मिपीय अवतार" अशी होती.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jan 2015 - 2:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

गुरुबाबुली प्रगो. ब्लाईंड डेट विषयी पण सांगुन ठेवा हो. कधी जायची वेळ आली तर पंचैत नको...!! उगीच ब्लाईंड डेटचं रुपांतर म्युट, डेफ अँड व्हॉट नॉट मधे नको व्हायला =))

नाखु's picture

16 Jan 2015 - 10:19 am | नाखु

पण मालिकेचा विषय बळजुबरीने एकाच चित्रपटात का कोंबला ??
बाकी उपसंहार देताना ओ माय गॉड मधील परेश रावल कोर्टात सगळ्यांना "सोलतो" तो सीन राहून राहून आठवला.

लवह्ली आरेंज मॅरेज वाला

सौंदाळा's picture

16 Jan 2015 - 10:38 am | सौंदाळा

सही लिहिले आहे
विनोदी ढंगाने पण वास्तव.
अधुनमधुन जमेल तशी भर घालेनच.
सध्यापुरते म्हणायचे तर सपोर्ट, सेलेब्रेशन्स, सरप्रायजेस, स्वच्छता मुलींना आवडणारे गुण आहेत असे माझे निरिक्षण

सस्नेह's picture

16 Jan 2015 - 10:57 am | सस्नेह

'काकदृष्टी' ला दाद देण्यात आली आहे. *lol*

सूड's picture

16 Jan 2015 - 2:51 pm | सूड

उकार राह्यला का?

बोका-ए-आझम's picture

16 Jan 2015 - 11:22 am | बोका-ए-आझम

अॅक्स डिओडरंट उर्फ लडकीपटाव फुसफुस याचा कुठेही उल्लेख न करता लेख लिहिल्याबद्दल णिशेध!

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2015 - 11:46 am | टवाळ कार्टा

अप्रतिम \m/

सस्नेह's picture

16 Jan 2015 - 12:12 pm | सस्नेह

असं कसं काय झालं दातांचं एकाएकी ?

नन्दादीप's picture

16 Jan 2015 - 12:16 pm | नन्दादीप

बाकी डीओ म्हणाल तर K.S. चा STORM , DARE ई. वापरून पहावे...... स्वानुभव खूप्प्प्प्प्प्पच चांगला.....

नन्दादीप's picture

16 Jan 2015 - 12:17 pm | नन्दादीप

ए नाही... ई कॅटॅगरी असे वाचावे....

काळा पहाड's picture

16 Jan 2015 - 12:44 pm | काळा पहाड

महिला या वस्तू समजून केवळ प्रतिसादांची संख्या वाढावी म्हणून असा बूर्झ्वा पद्धतीचा लेख लिहील्या बद्दल अतीतीव्र निषेध. तसेच एकाही महिला सभासदाने याचा निषेध न केल्याबद्दल आश्चर्य व खेद दोन्ही व्यक्त करतो. संपादक मंडळ इकडे लक्ष देईल काय?

रेवती's picture

16 Jan 2015 - 2:28 pm | रेवती

अहो पण महिलांना मज्जा वाटण्यात आलेली आहे. तक्रार नको करायला.

पैसा's picture

16 Jan 2015 - 2:46 pm | पैसा

महिला तर पुर्शांना वस्तूंत पण मोजत नाहीत भौतेक हल्ली! त्यामुळे कोणीच्च णिशेध केला नैय्ये.

रेवती's picture

16 Jan 2015 - 2:48 pm | रेवती

काय तरी दिवस आले बाई!

यसवायजी's picture

16 Jan 2015 - 3:02 pm | यसवायजी

कुणाचं चांगलं बघवत नाही लोकांना. ;)

एकच नंबर ऑब्झर्वेशन्स!! डिओ वापरण्याच्या बाबतीत प्रचंड सहमत!!

बाकी डिओ वाल्यांसाठी...अ‍ॅक्स आणि KS मध्ये खेळत बसणार्‍यांनी एकदा पार्क अव्हेन्यूच्या सिग्नेचर सिरीजमधले डिओज वापरुन बघावेत ही नम्र विनंती, त्यातला अल्टर इगो तर एकच नंबर!! बाकीच्या डिओजपेक्षा किंचित महाग जाईल बट वर्थ पेयिंग.

ओ, अच्च जाल्ल सुड कक्का

पैसा's picture

16 Jan 2015 - 3:03 pm | पैसा

माझ्यासारख्यांना सिंथेटिक वास आला की मरणाच्या शिंका येतात. डिओ बूमरँग व्हायचा नैतर!

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2015 - 3:15 pm | टवाळ कार्टा

आता या वयात कशाला डियोचा वास घ्यायला जाता...अगरबत्तीच्या दुकानात गेलात तर जरा सात्विकपण वाटेल :)

अनुप ढेरे's picture

16 Jan 2015 - 3:16 pm | अनुप ढेरे

=))

टक्या, मेल्या आता एखादी गोंयकार सासू शोधून दिलंनीत असती तुला...आता तोही चान्स गेला.

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2015 - 3:59 pm | टवाळ कार्टा

मी बायको / ग.फ्रें. शोधतोय ... सासू नाही ;)

धर्मराजमुटके's picture

16 Jan 2015 - 4:02 pm | धर्मराजमुटके

अहो, ताकाला जाताना भांडं लपवावं लागत काही वेळा. सासु शोधलीत की बायको आपोआपच मिळेल हो. पहिले मुळ शोधा. फांद्या आपोआप सापडतील. :)

त्याच्या बेसिक्स मध्येच लोच्या आहे. ;)

प्रमोद देर्देकर's picture

16 Jan 2015 - 4:15 pm | प्रमोद देर्देकर

अरे सुडा त्याला फक्त लॉटरीवाली मुलगी हवी आहे असे दिसते. जिला नातेवाईकांपैकी कोणी नको. म्हणजे सासु, सासरे, वगैरे . होना टका.

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2015 - 4:31 pm | टवाळ कार्टा

तसेनै....पोग्गी मनासारखी मिळाली तर बाकीच्यांचे नखरे फाट्यावर मारता येतात

बॅटमॅन's picture

16 Jan 2015 - 5:13 pm | बॅटमॅन

हो पण पोग्गी जर इतरांना फाट्यावर मारत नसेल तर काय घ्या, नै का?

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2015 - 4:04 pm | टवाळ कार्टा

सासूला दूर ठेवता येते :)

पैसा's picture

16 Jan 2015 - 3:26 pm | पैसा

मला वाटतं नाक आणि वासाची जाणीव सगळ्याच माणसांना अस्ते. त्यात वयाचा काय संबंध? का तू जन्माला आलास तेव्हा बिन-नाकाचा होतास?

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2015 - 3:59 pm | टवाळ कार्टा

खिक्क....डिओ ऐवजी मिरच्या झोंबल्या =))

बॅटमॅन's picture

16 Jan 2015 - 4:10 pm | बॅटमॅन

ट्ठो =)) =)) =))

पैसा's picture

16 Jan 2015 - 6:33 pm | पैसा

मिरच्या झोंबण्यासाठी नाक जागेवर असावं लागतं. तुला नैय्ये का? मग लग्नाला मुलगी मिळणं लै कठीण बावा!

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2015 - 7:48 pm | टवाळ कार्टा

खिक्क....बरेच झोंबलेले दिसतेय...जौदे तुम्ही ठाण्यात आलात तर माझ्याकडून १ मिसळ पार्टी

पैसा's picture

16 Jan 2015 - 8:04 pm | पैसा

तुमचं ठाणे फक्त मेंटल हास्पिटलासाठी प्रसिद्ध आहे. ठाण्याला येण्याएवढी वैट्ट परिस्थिती नै आली अजून!

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2015 - 8:14 pm | टवाळ कार्टा

यावर प्रतिसाद घेउन नवोदित लेखकाला शतकी धाग्याची भेट द्यायचा विचार आहे काय? ;)
असेल तर कळवा...आज वेळच वेळ आहे ;)

पैसा's picture

16 Jan 2015 - 8:18 pm | पैसा

ठाणे मिसळीसाठी पुण्यापेक्षा कसं चांगलं आहे हे पटवून द्या!

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2015 - 8:26 pm | टवाळ कार्टा

तुमचं ठाणे फक्त मेंटल हास्पिटलासाठी प्रसिद्ध आहे. ठाण्याला येण्याएवढी वैट्ट परिस्थिती नै आली अजून!

तुम्ही ठाण्याला आल्यावर फक्त याच ठिकाणाला भेट दिली असे लिहिण्यातच सगळे आले हो ...समजले आम्हाला :P

पैसा's picture

16 Jan 2015 - 9:18 pm | पैसा

जौद्या! सुडने सांगितलेली एक भारी म्हण आठवली होती.

गायनॅक व्हायला स्वतः बाळंत व्हावं लागत नै हो! तुमच्यासारखे ठाणेकर भेटले की ता वरून ताकभात समजायला पुरे!

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2015 - 11:05 pm | टवाळ कार्टा

ठाण्यात इतक्या चांगल्या गोष्टी असताना फक्त तुम्हालाच मेंटल हॉस्पिटल का सुचावे :)

पैसा's picture

16 Jan 2015 - 11:10 pm | पैसा

ते तर १९०१ पासून लै फ्येमस आहे!

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2015 - 11:12 pm | टवाळ कार्टा

मारली पल्टी

बॅटमॅन's picture

16 Jan 2015 - 3:38 pm | बॅटमॅन

ठ्ठो =)) =)) =))

जेम्स बॉन्ड ००७'s picture

27 Jan 2015 - 8:09 pm | जेम्स बॉन्ड ००७

*ROFL*

ह्या अशा शिंका फक्त डिओ आणि पर्फ्युमच्या बाटल्या भसाभस उपसणार्‍यांमुळे येतात. प्रमाणात मारलेल्या डिओ/अत्तराचा भपकारा येत नाही (असं माझं मत आहे.).

पटाव शास्त्र हेच असेल याबद्दल खात्री नसली तरी धागा वाचुन छान मनोरंजन झाले.
कॅटेगरी मध्ये थोडे फार नाविन्य आले असते तर धागा आनखिन मज्जा देवुन गेला असता

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2015 - 3:20 pm | टवाळ कार्टा

बाकी जुने विचार आणि नवीन विचार यांचा सुरेख संगम या धाग्याच्या निमित्ताने बघायला मिळाला....

साडीतल्या सन्नी"बाई" लिओनी ("बाईच"..."ताई" असेल तुमची) ;)

मोहनराव's picture

16 Jan 2015 - 3:33 pm | मोहनराव

मस्त लेख...

लाल रंगाचा डबा संपला .

हे जाम आवडलं... :)

बॅटमॅन's picture

16 Jan 2015 - 3:38 pm | बॅटमॅन

कं लिवलंय कं लिवलंय!!!!

अन्या दातार's picture

16 Jan 2015 - 4:18 pm | अन्या दातार

म्होरल्या भेटीत अजून चर्चा करु रे ;)

बॅटमॅन's picture

16 Jan 2015 - 4:27 pm | बॅटमॅन

या विषयावर आपल्याशी एकदा चर्चा करायची आहे ;)

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2015 - 4:30 pm | टवाळ कार्टा

मला ती चर्चा ऐकायची आहे ;)

नाखु's picture

16 Jan 2015 - 4:40 pm | नाखु

लोकांशी चर्चा करणार्यांचा "खर्चा"पाणि देऊन सत्कार येइल.
पिंचि मध्ये दोन्ही अन्यांबरोबर चर्चा आयोजीत केली जाईल.
टका येताना कॅमेरा घेऊन येणे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jan 2015 - 5:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मला ही चर्चेत भाग घ्यायचा आहे =))

स्पंदना's picture

16 Jan 2015 - 6:05 pm | स्पंदना

हे चालले गटवण्यासाठी गटणे होउन!! ;)

प्रसाद गोडबोले's picture

16 Jan 2015 - 6:45 pm | प्रसाद गोडबोले

आभार प्रदर्शन सोहळा

सर्व प्रतिसादकांचे आभार !

स्त्री सदस्य आणि संपादकांनी हलके घेतल्या बद्दल त्यांचेही धन्यवाद .

सौ.सनीताई ह्यांनी आपल्या निव्वळ प्रकाशचित्राद्वारे अनेकांना आनंदी केले म्हणुन त्यांचे विशेष आभार !

ह्या लेखाचा जर कोणा लग्नाळुंना काही फायदा झाला तर नक्की कळवा . ( लग्नसंस्थेवर विश्वास नसल्याने मी विवाहसोहळे अटेंड करत नाही पण ब्यॅचलर पार्टीला आवर्जुन उपस्थीती नोंदवेन आमच्या कडुन एक एल्पी सप्रेम भेट !)

असो.

पशा म्हणे लेख श्रेष्ठ पटवेश्वरी | परी एकतरी ओळ आचरावी ||

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2015 - 7:49 pm | टवाळ कार्टा

ब्यॅचलर पार्टीला आवर्जुन उपस्थीती नोंदवेन आमच्या कडुन एक एल्पी सप्रेम भेट ! >> एल्पी संपवण्याची जबाबदारी घेण्यासाठी मी माझी उपस्थिती नोंदवेन :)

लातूरमधील प्रेमविरांनो जरा खबरदारी पाळा व खालील बातमी पण पहा.

‘गनिमी कावा’च्या नावाखाली प्रेमी युगुलावर भ्याड हल्ला

आत्ताच व्हॉट्सअ‍ॅपवर हा विडीओ पाहीला. बापरे! बिचार्‍या पोराला आणि पोरीला अगदी कुत्र्यांसारखं मारलं आहे.
ह्या हरामखोर संस्कॄती रक्षकांना हा अधिकार दिला कोणी? ह्या लोकांना मिळत नाही ना त्याची ही सगळी जळजळ बाकी काही नाही.

साधा मुलगा's picture

16 Jan 2015 - 9:52 pm | साधा मुलगा

एक एका category च्या मुली डोळ्यासमोर येत होत्या वाचताना!
A आणि B category मध्ये कधी कधी confuse व्हायला होते.
बाकी माझ्यासारख्या साध्या सुध्या मुलाला बरेच शिकाया मिळाले.
यातून एखादी पटलीच तर आपला शाल व श्रीफळ देऊन सत्कार आणि ब्यॅचलर पार्टीला आमंत्रण! धन्यवाद!

संदीप डांगे's picture

16 Jan 2015 - 10:05 pm | संदीप डांगे

प्रगो सरांना झालेल्या दिव्य साक्षात्कारांतून त्यांना हे ज्ञान प्रत्यक्ष परमेश्वरानेच दिल्याचे सांगितले आहे, त्यानुसार येत्या गुढीपाडव्याला (उशीर हुइन का बावा?) त्यांच्या शिष्य-अनुयायांतर्फे पोप (पोरगी पटाव) धर्माची स्थापना करण्यात येत आहे. झेंड्याचा रंग गुलाबी असून त्याचे डिझाईन लौकरच वितरीत केले जाइल.

धर्म स्वीकारू इच्छिणाऱ्या तमाम पुरुषांनी प्रेषित प्रगो (परमेश्वर त्यांना प्रगती देवो) यांनी सांगितल्या प्रमाणे वेशभूषा करून येणे. ठिकाण आणि वेळ नंतर सुचल्यावर कळवण्यात येइल. तत्पूर्वी प्रेषित प्रगो (परमेश्वर त्यांना प्रगती देवो) यांनी सांगितलेल्या वचनांचा एक धर्मग्रंथ तयार केला गेला असून त्याची प्रत मनोभावे आपल्या घरी स्थापित करावी, त्याचे रोज पठण करावे. जमेल तसे व सर्वरूपी ऐपत असल्यास पालन करावे. तुम्ही असे धर्मग्रंथातून शिकून पोरगी पटवण्याचा प्रयत्न करत आहात हे कळल्यावर इतर कद्रू लोक तुमच्या हसतील तेंव्हा त्यांना आपल्या जळजळीत कटाक्षरुपी शस्त्राने कापून काढावे. ज्यांना हा धर्म माहिती नाही किंवा त्यांच्या मध्ये "गट्स" नसल्यामुळे तुम्हाला ते भीती दाखवण्याचा प्रयत्न करतील, प्रगो यांच्या मार्गावरून हटवण्याचा बेत आखतील तेंव्हा तुम्ही फक्त आपल्या धर्मावर श्रद्धा ठेवा. शेवटी हीच श्रद्धा तुम्हाला सगळ्या शत्रूंवर विजय मिळवून देईल...
एक न एक तरी पोरगी ...लाभेन! (आमेन च्या धर्तीवर म्हणावे)

इतर आज्ञा धर्मगुरू वेळोवेळी (आपापल्या वकुबाप्रमाणे) देतीलच…
(ते सनी ताई -त्यांना चिरतारुण्य लाभो- यांच्या प्रतिमेचे पूजन करावे काय? तसे असल्यास "अधिकृत" प्रतिमा धर्मपिठातर्फे वितरीत करण्यात यावी. अन्यथा…)
(प्रगो सर, हलके घ्या)

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2015 - 11:06 pm | टवाळ कार्टा

आयला भारी

प्रसाद गोडबोले's picture

16 Jan 2015 - 11:21 pm | प्रसाद गोडबोले

a

खटपट्या's picture

17 Jan 2015 - 12:08 am | खटपट्या

गणेशा !!

प्रसाद गोडबोले's picture

13 Feb 2015 - 5:53 pm | प्रसाद गोडबोले

पोप संप्रदायाच्या सर्व्ह भक्तगणांना पोपसमिती तर्फे नित्य"उपासने" करिता खाली प्रतिमा प्रदान करण्यात येत आहे ...
goddess

भलतीच संक्लिद्य आहे. धन्यवाद ;)

टवाळ कार्टा's picture

13 Feb 2015 - 10:44 pm | टवाळ कार्टा

संक्लिद्य म्हणजे काय ते शष्प समजले नाही ... पण आम्च्या सन्नीबाईंन्ना बघितल्यावर बाकी काही वाचायची गरजच नै ;)

तुला संक्लिद्य माहीत नाही का माहीत नसल्याचा आव आणतोयस? ;)

टवाळ कार्टा's picture

16 Feb 2015 - 2:36 pm | टवाळ कार्टा

हा शब्द कधी ऐकला/वाचला नव्हता या आधी :(

सूड's picture

16 Feb 2015 - 2:48 pm | सूड

व्हॉट्स अ‍ॅप चेकव!!

बॅटमॅन's picture

16 Feb 2015 - 2:50 pm | बॅटमॅन

आय होप त्या संज्ञेचे संदर्भासहित स्पष्टीकरण केले असशील. ;)

प्रयत्न केलाय, पण आपल्याइतके नीट जमले असे वाटत नाही ब्याटोजीपंत!!

बॅटमॅन's picture

16 Feb 2015 - 2:57 pm | बॅटमॅन

अहो न जमायास कांय झालें? येकदा त्या श्लोकाचा अर्थ समजला की संपले. पुढे आपोआपच सगळं संक्लिद्य संक्लिद्य होऊन जातं. आणि अर्थ आपल्यासमोर अनावृत होतो.

टवाळ कार्टा's picture

16 Feb 2015 - 2:58 pm | टवाळ कार्टा

अग्गागा...अगदी व्यवस्थित समजावला अर्थ सूडभौंनी :)

बॅटमॅन's picture

16 Feb 2015 - 3:25 pm | बॅटमॅन

संक्लिद्य कायम रहे ;)

टवाळ कार्टा's picture

16 Feb 2015 - 3:47 pm | टवाळ कार्टा

=))

त्या खेळणार्या मुलाच्या मालकासारखे नशीब पैजे ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Feb 2015 - 6:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ए मला पण व्यनि करे बाबा....किंवा व्हॉट्स अ‍ॅपवर तरी टाकटक्या =))

सगळ्यांस कर की रे सोडुन...शहाणं म्हणतो मी... =))

सूड's picture

16 Feb 2015 - 6:42 pm | सूड

टक्या व्हॉट्सअ‍ॅपवेल तुम्हाला चिमणराव!!

टवाळ कार्टा's picture

16 Feb 2015 - 9:30 pm | टवाळ कार्टा

तथास्तु :)

चांगलं चालू आहे. जरा ठाण्याची बदनामी झाली तेवढीच...

विशाल कुलकर्णी's picture

23 Jan 2015 - 11:04 am | विशाल कुलकर्णी

हायला, भलताच सुटलायस बे हितं तू. मला तं तो मला भेटलेला साधा, भोळा (कृपया हे शब्द पुणेकराच्या नजरेतुन वाचावेत) पंतच आठवतो ;)

प्रसाद गोडबोले's picture

23 Jan 2015 - 11:53 am | प्रसाद गोडबोले

ऐका ऐका मिपाकर्स ,

मला तं तो मला भेटलेला साधा, भोळा पंतच आठवतो

आधी मी आधी साधा भोळाच होता , ह्या मिपाकरांनी मला बीघडवलं :-\ =))

जेम्स बॉन्ड ००७'s picture

23 Jan 2015 - 12:03 pm | जेम्स बॉन्ड ००७

अच्चं जालं तल

विशाल कुलकर्णी's picture

23 Jan 2015 - 12:09 pm | विशाल कुलकर्णी

ते कंसातलं वाक्य पांशा मधलं नाहीये रे ;)

दादा पेंगट's picture

23 Jan 2015 - 2:39 pm | दादा पेंगट

=))

प्रसाद गोडबोले's picture

23 Jan 2015 - 2:44 pm | प्रसाद गोडबोले

१००

खमक्या's picture

23 Jan 2015 - 2:47 pm | खमक्या

१०० वा.
१००,५००,८०० प्रतिसाद .... जुनं मिपा राहिले नाही राव

मदनबाण's picture

23 Jan 2015 - 2:56 pm | मदनबाण

जुनं मिपा राहिले नाही राव
झालं का कुंथुंन ? म्हणा असं कुंथण्यासाठी सुद्धा इथेच ळॉगिण कराव लागतं नै ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Jan 2015 - 10:52 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ते जुने आहेत. वयोमान २ दिवस दिसत असलं तरी.

खमक्या's picture

24 Jan 2015 - 8:00 am | खमक्या

धन्स साहेब धावून आल्याबद्दल.

-आपला जुना स्नेही (खमक्या)

डिस्क्लेमर वाचलं आणि लेखाला पास देत थेट प्रतिक्रीयांवर आलो तर सनी लहानेंचा फटु !!
त्या आता भारतीय संस्क्रुतीचं दर्शन घडवत दुधाचे महत्व या विषयावरच्या एका शिणेमात काम करत आहेत. लीलामृत का काय नाव हाये.

बॅटमॅन's picture

16 Feb 2015 - 2:36 pm | बॅटमॅन

सौर दुग्धामृत?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Feb 2015 - 6:21 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

O_o

खटासि खट's picture

16 Feb 2015 - 10:01 pm | खटासि खट

सतेज कांतीसाठी दुग्धस्नान.
सौर काय असतंय ?

टवाळ कार्टा's picture

16 Feb 2015 - 10:36 pm | टवाळ कार्टा

आणि दुग्धपानसुध्धा ;)

म्हणजे साध्वी अनुसया नाव आहे का शिणुमामाचं ?

टवाळ कार्टा's picture

17 Feb 2015 - 10:18 am | टवाळ कार्टा

तुम्हाला अस सग्ळ इस्कटून सांगायची पावर नाय मिपावर...वय काय तुम्चे ;)

बॅटमॅन's picture

17 Feb 2015 - 2:07 am | बॅटमॅन

सौर- जरा समानार्थी शब्द इ. बघा. आता यापलीकडे आमी बोलणार नाय. ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Feb 2015 - 8:11 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =))))))

खटासि खट's picture

17 Feb 2015 - 4:05 am | खटासि खट

ओ असं नका करू. स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वतःस कसे क्लीन ठेवावे हे लहानेंनी दृकश्राव्यमाध्यमातून कळवल्याने मती गुंग झालेली आहेच, त्यात हे असं म्हणजे असं कसं हो ?

सूड's picture

17 Feb 2015 - 2:08 pm | सूड

लहानेंनी

म्हणजे केव्हिन क्लाईन का?

टवाळ कार्टा's picture

17 Feb 2015 - 2:39 pm | टवाळ कार्टा

लिओनी चे लहाने केलेय त्यांनी

सतेज कांतीसाठी दुग्धस्नान.

Sunny
अगाध "लीला" म्हणतात ती हीच वाटत !
आता काही दिवसांनी पंचामॄत स्नानाचे महत्व देखील वाढेल असे वाटायला लागले आहे ! *LOL*

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आद्य आम आदमी

आमच्या संस्कृतीचे महत्व गो-या चमडीने सांगितल्याशिवाय काहींना समजतच नाही हा औटडेटेड डायलॉक हितं हाणावासा वाटतो.

रक्तपिशाच्च's picture

17 Feb 2015 - 4:39 pm | रक्तपिशाच्च

पण दादा … "ब्रांडेड " वस्तूच फक्त वापराव्यात असे काही नसते बरे …।!!