कॅपिटल गेन- काथ्याकुटातून माहिती हवी.

चौकटराजा's picture
चौकटराजा in काथ्याकूट
3 Mar 2015 - 1:17 pm
गाभा: 

मी माझा फ्लॅट विकण्याच्या बेतात आहे. तो मी १९८८ मधे एक लाख ५ हजाराला घेतला. त्यांची इंडेक्सेशन प्रमाणे आता किंमत साधारण ७ लाख होते आहे. पण तो २४ लाखाला विकला जात आहे. म्हण्जे मला २४ वजा ७ बरोबर १७ लाख रूपये
३ वर्षासाठी ६ टक्के दराने बॉन्ड मधे गुंतवावे लागतील तर माझा २० टक्के कॅपिटल गेन टॅक्स वाचेल. आता माझा प्रश्न असा की...

अ) जर मी काही सुधारणा या जागेत केली असेल तर त्याच्या सुधारणा खर्चाची इन्डेक्स कॉस्ट मी ७ लाखात भर टाकून १७ लाखास समजा १५ लाखापर्यंत खाली आणू इच्छित असेन तर ही किंमत कोण ठरवणार?. माझ्या माहिती प्रमाणे ही किमतीचे
सर्टीफिकेशन सी ए देतात पण ते चूक आहे. माझ्या मते ही किंमत सरकारने अधिकृत केलेला स्थावर व्हॅल्युएटर ठरवू शकतो व तो सिव्हिल इंजिनिअर किंवा अर्किटेक्ट असतो सी ए नव्हे.

ब) समजा एखाद्याने असे प्रमाण पत्र सी ए कडून घेतले व ते नंतर आयकर विभागाने अनधिकृत ठरवले तर ? त्यावेळी
आपण विकलेल्या फ्लॅटचे स्वरूप पूर्णपणे खरेदी दाराने बदलले असेल तर आपण केलेल्या सुधारणा खर्चाची पहाणी ( सर्व्हे)
कसा होणार त्यावेळी ?

आपल्यापैकी कोणी आपला फ्लॅट विकून त्याचे पैसे केले असतील तर आपल्याला अशा प्रकार बॉन्डमधे पैसे गुंतवावे लागले
असणारच. त्यावेळी मला आलेल्या शंका आपल्याला आल्या होत्या का ? त्यांचे निरसन आपण कसे केलेत ?

प्रतिक्रिया

नेत्रेश's picture

3 Mar 2015 - 1:42 pm | नेत्रेश

सुधारणा केल्याच्या पावत्या, माल, कंत्राटदाराची फी, आर्किटेकची फी, हत्यादीच्या पावत्या आयकर विभागाला चालतात (माझ्या माहीती प्रमाणे).

झकास's picture

3 Mar 2015 - 2:19 pm | झकास

आयकर कायदा कलम ५५ अ मध्ये काही माहिती मिळेल. ती पण लक्षात घ्या.

सिएन बिसी आवाज १८ या हिंदी चानेलचे कार्यक्रम असतात त्यात शनिवारी "टैक्सगुरू"चा नवीन एपिसोड असतो. प्रशनोत्तरे असतात. तुम्हीही प्रश्न विचारू शकता अथवा फ्लैट विकेपर्यँत एखाद्या कार्यक्रमात येईलही. अचूक आणि अदद्ययावत माहिती असते.(बहुतेक हा कार्यक्रम तुम्हाला माहित असेलच).
[ एक शंका- कोणतीही पावती पक्की(तेरा टक्के सेल्स ,सर्विस टैक्स भरलेली रिसीट )असली तरच ग्राह्य धरतात ना ?]

चौकटराजा's picture

4 Mar 2015 - 10:22 am | चौकटराजा

माझ्या अंदाजाने सेवा व वस्तू विकणार्‍या माणसाने अनुक्रमे सेवा कर व मुल्याधिष्ठित कर भरणे आवश्यक आहे.ती जबाबदारी
सेवा वा वस्तू घेणार्‍याची नाही. काही पावत्यांवर व्हॅट खाते क्र, दिलेला असतो. स्वतंत्र सेवा कर हॉटेलच्या बिलात कित्येकदा
दाखवला जात नाही तरी तो हॉटेलने आपल्याकडून वसूल केला आहे असेच गृहित धरले जाते.

होय परंतू तुमच्याकडच्या पावतीवर किंमत रू शंभर अधित कर रू १३ एकूण रू ११३ असे दाखवले नसेल तर?वैट आणि सर्वीस टैक्स नंबर असलेली पावती चालते.