सांजरंग
किरणांची पाऊले मिटून
हळूच गेली उन्हे परतून
पाखरांचा सूर
सांजपंखी हुरहुर
राहिली उरी रेंगाळून
निळ्या नभी
ढगांची रांग उभी
तांबूस रंग गेला त्यात भरून
घरट्यात किलबिल
पडे काजळी भूल
दिशा साऱ्या गेला हरवून
रातराणीचा गंध
झाल्या वाटा धुंद
पसरले माथ्यावर चांदण्याचे रान