स्वप्न सारे आज पेटले
अश्रूंचे झरे डोळ्यांत आटले
हृदयात माझ्या गहिरी वेदना
जळतो हा प्राण सांगू कुणा
पाश अंतरीचे कसे सुटले
येते रोज आठवणींचे वादळ
थकलेल्या जीवास राहिले ना बळ
डोईवरले आभाळ विस्कटून गेले
दैव माझे झाले खोटे
हातातल्या फुलांचे झाले काटे
जुलूम नियतीचे सारे मी झेलले