कवितेचा नायक ..गावातील बँक अधिकार्राचा मुलगा
काॅॅलेजमद्ये नायक व नायिका एकत्र शिकतात
पहिलं वहिलं प्रेम माझं
मुकंच राहुन गेलं .
आयुष्याचं इंद्रधनु फिकंच राहुन गेलं .
कुणीच कुणाला काही नाही बोललेलं
पण डोळ्यातलं प्रेम डोळ्यांना समजलेलं.
एक दिवशी मी लवकर येउन
त्याच्या बाकावर लाल गुलाब ठेवलेले.
सगळ्या वर्गाने त्याला चिडव चिडव चिडवलेले .
मग तो काही दिवस दिसलाच नाही ....
अचानक त्याच्या वडीलांची बदली झाल्याचं कानावर आलं.
अन् डोळ्यातलं प्रेम आसवांबरोबर वाहुन गेलं.
पहिलं वहिलं प्रेम माझं
मुकंच राहुन गेलं .
आयुष्याचं इंद्रधनु फिकंच राहुन गेलं .