एक ताईचा सल्ला: जो खरच फायदेशीर आहे.

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
28 Oct 2009 - 7:53 pm

एक ताईचा सल्ला: जो खरच फायदेशीर आहे.

आज पराशेठ चा ताईचा सल्ला वाचला अन मला माझी ताई लिहीत असणार्‍या 'साप्ताहीक सदर- ताईचा सल्ला' याची आठवण झाली.

हा सल्ला जरी हलकाफूलका, खेळकर वातावरणात लिहीला गेला तरी त्यात माझ्या मते एक अतिशय चांगला सल्ला दिला गेला आहे.

आजकाल सगळीकडे विज, पाणी यांच्या भविष्यातील टंचाईबद्दल बोलले जाते. तस पाहिले तर या दोन्ही गोष्टी आपण फारच हलक्या घेतो. पाणी काय जसे काही फुकटच मिळते, वापरा मनाला येईल तितके.

मी खेडेगावात, तसेच निमशहरी असणार्‍या पाणीटंचाईला सामोरा गेलेलो आहे. एक हंडा व दोन बादल्या सायकलीला लावून किंवा खांद्यावर ३/४ किमी वरून पाणी वाहून आणलेले आहे. त्याच वेळी पाण्याचा भसाभसा वापर करणारे 'सुशिक्षीत' लोकं पण पाहीली आहेत. आपल्याकडे येणारे पाणी केवळ वाया जावू देत दुसर्‍याला न देणारेही पाहिले आहेत. पाण्याची लागणारी झळ ही शहरवासीयांना कमी जाणवते हेही मला जाणवले आहे.

पाण्याची अशी परिस्थीती तर विजेचीही तशीच. ऑफीस, सार्वजनीक तसेच 'भारतीय' सण समारंभ (दिवाळी सोडून द्या. तो तर अधिकृत 'दिव्यांचा' सण. ओबामांनीही ते मान्य केलेय! असो.)गणेशउत्सव, रोषणाई, लग्ने यात कितीतरी जास्त प्रमाणात विज उधळली जाते. गणपती, नवरात्र आदीत तर अधिकृतरित्या आकडे टाकून विज चोरी केली जाते. खेडेगावात, शहरी झोपडपट्यांत तर आजही आकडे टाकले जातात. तसले आकडे माझ्यासारखा सामान्य पाहू शकतो पण विज मंडळाचे अधिकारी पाहू शकत नाही. त्याकडे राजकिय पण डोळेझाक करतात.

असो. सदर सल्यामध्ये विज व पाणी (व आपली लागणारी मेहनत) आपण आपल्या वैयक्तिक प्रमाणात कशा प्रकारे वाचवू शकतो याचा उल्लेख आहे. या सल्ल्यात आपण आपले जिन्स कापडाच्या असलेल्या पँन्टी कमीतकमी तिन दिवस (वेळा) वापरणे व त्यांना ईस्त्री न करण्याबाबत सांगितलेले आहे.

मी स्वत: हा सल्ला अंमलात आणला व त्यानंतरच वरील सल्ला लिहीला होता. (न जाणो कुणीतरी, 'तु ते करून बघीतलेस का?' विचारेल म्हणून आधिच सांगीतले आहे. नाहितरी माझ्या नावात 'पाषाण' आहेच. तो कोरडा न ठरावा अशी ईछा होती. असो.)

मी स्वत: जिन्स पँन्ट ३ /४ दिवस वापरतो. (सलग दिवस नाही हो. मधे मधे.) पँन्ट धुतली की चुरगळते. मग मी जुना उपाय अवलंबतो. पँन्टीची मी सळावर घडी करतो व ती पँन्ट कॉटवरील गादी खाली एखादा दिवस ठेवतो. त्याच पॅंटीला महिन्यातून एखाद्यावेळी सळ चांगले रहावे म्हणून धुतल्यानंतर ईस्तरी करतो.

राहता राहीले आता परत त्याच विषयावर लिहीण्याचे प्रयोजन. तर माझ्या 'ताईच्या सल्याला' लोकांनी हलकेफुलके पणाने घेतले. लेखाचा तोच उद्देश होता पण त्याचा गर्भितार्थ मात्र विज, पाणी थोड्याप्रमाणात का होईना कसे वाचवता येईल याकडे होता.

मला एखादी तरी यासंदर्भात प्रतिक्रिया येईल असे वाटले होते. असो.

मला आता या धाग्यावर प्रतिक्रिया आपेक्षीत नाहीत. केवळ हा धागा वाचून मुळ धागा जास्तीत जास्त वेळा वाचला जावा, मुळ धाग्यात माझी यासंदर्भात प्रतिक्रिया प्रकाशित करून आपलाच धागा वर आणल्याचा आरोप होवून नये, कुणीतरी या प्रकारे विज, पाणी वाचवून पर्यावरणाला हातभार लावावा असला हेतू मनात ठेवून मी हा धागा काढला आहे याची कृपया नोंद घ्यावी हि विनंती.

आपणही माझ्यासारखा प्रयोग करून पहा व आपल्याला काय वाटले ते सांगा.

धोरणसमाजजीवनमानराहणीअर्थकारणप्रकटनविचारमतप्रतिसादशिफारससल्लाप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

टारझन's picture

28 Oct 2009 - 8:50 pm | टारझन

पँन्टीची मी सळावर घडी करतो व ती पँन्ट कॉटवरील गादी खाली एखादा दिवस ठेवतो. त्याच पॅंटीला महिन्यातून एखाद्यावेळी सळ चांगले रहावे म्हणून धुतल्यानंतर ईस्तरी करतो.

हॅहॅहॅ ... हॅहॅहॅ ... काय हो श्री पाषाणभेद ?

पाषाण-खेड

गणपा's picture

28 Oct 2009 - 8:58 pm | गणपा

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
दगड्फोड्या, जरा जपुन लिव्ह र गड्या...

निमीत्त मात्र's picture

28 Oct 2009 - 8:58 pm | निमीत्त मात्र

श्री टारझन,

प्यांट ह्या शब्दाचे लिंग स्त्रिलिंग आहे. (प्यांट घातला नव्हे, घातली) तेव्हा स्त्रिलिंगी असलेल्या ह्या वस्राचे 'प्यांटी' असे मराठीकरण केल्यास त्यात काही चूक नाही. त्यातून कोणते लिंग ते अचूक कळते.

गणपा's picture

28 Oct 2009 - 9:59 pm | गणपा

मान्य मात्रसाहेब, पण पँन्टीची म्हणण्या पेक्षा प्याँटची /पॅंटची म्हटल तर जास्त योग्य वाटेल.
बाकी व्याकरणातल आपल्याला काही कळत नाही. बाकी मिपाकर व्याकरण आणि शुद्धलेखन फाट्यावर मारतात...

टारझन's picture

28 Oct 2009 - 9:51 pm | टारझन

श्री निमित्त मात्र ,

'प्यांटी' असे मराठीकरण केल्यास त्यात काही चूक नाही. त्यातून कोणते लिंग ते अचूक कळते.

अच्छा .. कशातून लिंग अचुक कळते म्हणालात ? असो ... आपल्याला लिंगाशी खेळण्यात बराच रस दिसतो ...

बाकी मी व्याकरणा बद्दल काही म्हणालो नाही बरंका .. फक्त हॅहॅहॅ केलं .. आता हॅहॅहॅ ही काही कविता नाही .. ज्यातून खरा-खोटा अर्थ काढला जायला =))

- बेशुद्ध छात्र

धमाल मुलगा's picture

28 Oct 2009 - 9:58 pm | धमाल मुलगा

=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))

श्री. टार्‍या मेल्या....
आत्ता चचलो असतो इतकी बेक्कार कॉफी नरड्यात अडकली!

ऍडीजोशी's picture

28 Oct 2009 - 10:58 pm | ऍडीजोशी (not verified)

च्यायला हा टार्‍या १ नंबरचा हि&हि आहे :) :) :) :)

घाटावरचे भट's picture

29 Oct 2009 - 6:20 pm | घाटावरचे भट

मा. श्री. धमालराव, आपण काय ऑफिसात सारखी कॉफीच पीत असता काय? नाही जेव्हा बघावं तेव्हा कॉफी नरड्यात अडकते, कीबोर्डवर फुर्रर्र करून सांडते वगैरे म्हणून विचारलं...

टारझन's picture

29 Oct 2009 - 6:27 pm | टारझन

लेका .. धम्या ऑफिस मधे काय करतो असं तुला वाटलं ?
गॅरेज वाल्याचे हात दिवस भर ग्रीस न ऑइल ने मळलेलेच असतात .

-- घाटावरचा पाटा

धमाल मुलगा's picture

29 Oct 2009 - 6:32 pm | धमाल मुलगा

श्री.घाटावरचे भट,
माफ करा पण हा प्रश्न फारच वैयक्तिक होतो आहे असं नाही का वाटत?
तरीही देतो उत्तर,
होय मी हापिसात सारखं कॉफीच पित असतो. माझ्या डेस्कावर कॉफी व्हेंडिंगमशीनची पाईपलाईन आहे. आपणांस काही त्रास?

धन्यवाद.
-धमाल अर्धमात्रे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Oct 2009 - 4:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सर्वश्री अर्धपात्रे आणि घाटावरचे पाट,

रा.रा. तात्या यांनी स्वतःच्या मिळकतीतील काही हिश्याचा व्यय करून आपणांस सर्व (काही अश्लाघ्य सोडून) प्रकारच्या व्यक्तीगत संवादासाठी खरडवहीची व्यवस्था करून दिली आहे. आपण त्याचा उपयोग का करत नाही आहात.

अदिती
(जेव्हा जोक्स संपतात तेव्हा धमाल्याची कॉफीही उडून संपलेलीच असते.)

अवलिया's picture

29 Oct 2009 - 10:50 am | अवलिया

=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))

--गलित गात्र
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

परिकथेतील राजकुमार's picture

29 Oct 2009 - 2:26 pm | परिकथेतील राजकुमार

हि & हि सम्राट टारझना अरे आवर रे स्वतःला ! हा टार्‍या साला कधी कधी बेक्कार 'अन-आवरेबल' होतो !!

=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

प्रभो's picture

29 Oct 2009 - 2:57 pm | प्रभो

हि & हि सम्राट टारझना अरे आवर रे स्वतःला ...तोपर्यन्त आमचा _/\_ घ्या...

=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))

विजुभाऊ's picture

29 Oct 2009 - 9:23 am | विजुभाऊ

चूक प्यान्ट हा लिंग मुक्त शब्द आहे.( उभयलिंगी म्हणाना)
हल्ली स्त्री आणि पुरुषानी घालायच्या प्यान्टीत काहीच फरक नसतो.

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Oct 2009 - 9:25 am | llपुण्याचे पेशवेll

>> हल्ली स्त्री आणि पुरुषानी घालायच्या प्यान्टीत काहीच फरक नसतो. <<
काही काय मालक? फरक असतोच की. मटेरीयल सेम असेल पण आकारात फरक असतोच. :)
का अजून फरक जाणवला नाहीये?

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

प्रकाश घाटपांडे's picture

28 Oct 2009 - 10:10 pm | प्रकाश घाटपांडे

प्यांटीला विस्त्री करताना सावद र्‍हावे. विल्याष्टिक असेल तर अगदी जपुन नाडी असेल तर काय वांदा नाई. परवाच आमच्या यका क्वाश्चुम डिजाइनरला ईचारल जीनच्या प्यांटीमदुन नाडी ववता येईन का? हिकडुन घालायची आन तिकडुन काडायची हाय काय नाई काय? म्हनल पायजे तर जीनची नाडी वव.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विनायक प्रभू's picture

31 Oct 2009 - 4:01 pm | विनायक प्रभू

पका काका,
तुम्ही कॉडि मधुन केंव्हा बाहेर पडणार?

सुनील's picture

29 Oct 2009 - 6:50 am | सुनील

मी स्वत: जिन्स पँन्ट ३ /४ दिवस वापरतो. (सलग दिवस नाही हो. मधे मधे.) पँन्ट धुतली की चुरगळते. मग मी जुना उपाय अवलंबतो. पँन्टीची मी सळावर घडी करतो व ती पँन्ट कॉटवरील गादी खाली एखादा दिवस ठेवतो. त्याच पॅंटीला महिन्यातून एखाद्यावेळी सळ चांगले रहावे म्हणून धुतल्यानंतर ईस्तरी करतो.
मी स्वतः जीन्स ७-८ वेळा वापरतो (सलग नाही, मधे मधे). हां आता एखाद दिवशी जीन्स घालून बारमध्ये गेलो तर मात्र (सिगरेटचा वास भरल्यामुळे) ती जीन्स पुन्हा धुवावी लागते, ते वेगळे.

दुसरे म्हणजे, मी जीन्सला कधीही इस्त्री करीत नाही, कारण जीन्सला इस्त्री हा प्रकार अनावश्यक आहे, असे माझे मत आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पाषाणभेद's picture

31 Oct 2009 - 9:15 am | पाषाणभेद

वा सुनील राव आपण खरेच पर्यावरणवादी आहात. कुणीतरी माझ्यासारखा विचार करतो व ते सार्वजनीकरीत्या प्रकट करतो हे पाहून आनंद झाला.

बरेचशे बॅचलर टाईप लोकांनाही धुणे, इस्त्री करणे याचा तिटकारा असतो. त्या लोकांसाठी या विचारांचे लेबल लावून जर त्यांनी जिन्स कापडाबाबत जर वरील विचार अंमलात आणले तर बरेच सामाजीक काम होईल, नाही का?
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

सूहास's picture

29 Oct 2009 - 6:41 pm | सूहास (not verified)

कारण जीन्सला इस्त्री हा प्रकार अनावश्यक आहे>>>

चुकुन ईस्त्री हा शब्द स्त्री वाचला गेला...

सू हा स...
(http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5111067.cms) नो-बेल ओबामा