स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया ... भाग-२

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in जनातलं, मनातलं
26 Feb 2009 - 9:18 am

नमस्कार मंडळी,

ह्या आधीच्या धाग्यात बिपीनदा, रंगाशेठ व पिडाकाकांनी मस्त व्हॅल्यु ऍडीशन केल्याने एकदम धुमशान मज्जा आली.
आता प्रतिसाद ५० च्या पुढे गेल्याने वाचणे अवघड होत आहे म्हणुन हा खास दुसरा धागा ...
ह्या आधीचा भाग आपल्याला स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया ... इथ पहायला मिळेल ...

नुसता कोरडेपणाने दुसरा भाग सुरु करणे हे अभद्रपणाचे लक्षण, म्हणुन काही मसाला टाकत आहे ..
सर्वांनी आत्तापर्यंत राजकीय नेते व काही निवडक मिपाकरांच्या प्रतिक्रीया पाहिल्या / वाचल्या, पण कोणी "वॄत्तपत्रांकडे" लक्ष दिले का ? भले त्यांनी दमदार अग्रलेख छापले असतील पण संपादक मनातुन काय म्हणतात ते पहा ...

=============================

* कुमार केतकर , लोकसत्ता :
कल्पनेच्या तीरावरील जग सेल्युलॉईडच्या पट्टीवर जिवंत करण्यात आयुष्य घालवलेल्या कलावंतांच्या आयुष्याला सोनेरी किनार प्राप्त करून देणार्‍या या ऑस्करच्या सोहळ्यात एकदम ८ पुरस्कार मिळवुन निर्भेळ यश मिळवणर्‍या स्लमडॉगचे अभिनंदन. गेल्या निवडणुकीत माननीय सोनिया गांधीच्या नेतॄत्वाखाली काँग्रेसने असेच यश मिळवले होते पण ते भाजपा आणि त्यांच्या बगलबच्च्यांना पहावले नाही, त्यांनी थयथयाट करुन सोनियाजींना पंत्रप्रधान होण्यापासुन रोखले.

"...ऍण्ड ऑस्कर गोज टू स्लमडॉग मिलेनियर!' या घोषणेनंतर लॉस एंजलिसच्या कोडॅक थिएटरबरोबरच नरिमन पॉईंटवरच्या उत्तुंग इमल्यापांसून धारावीतल्या झोपडपट्टीपर्यंत आणि बनारसच्या दशाश्वमेध घाटापासून झुमरीतलय्यातल्या हवेलीपर्यंत सर्वत्र जल्लोष झाला. भारताच्या धर्मनिरपेक्ष एकात्मतेचे हे एक उत्तम उदाहरण आहे. मात्र मोदी आणि विहिंप यांनी गुजरात बरोबरच आता कर्नाटक राज्यही हिंदुत्वाची प्रयोगशाळा बनवुन तिथे अमानुष हिंसाचाराचे तांडव चालवले आहे व धार्मीक सौर्हाद्याच्या गळ्याला नख लावले आहे, महाराष्ट्रात तर ठाकर्‍यांचा कुणानाही न जुमानता नंगा नाच सुरुच आहे. अशा परिस्थीतीत आपल्याला एका समर्थ नेतॄत्वाची गरज आहे व त्यासाठी आमच्या मते सोनिया गांधींपेक्षा योग्य उमेदवार देशात शोधुन सापडणार नाही.

शेवटी पुरस्कार घेताना रेहमान म्हणतो "'आयुष्यभर मला प्रेम व तिरस्कार यांच्यातून निवड करावी लागली. मी कायम प्रेमाचाच पुरस्कार केला आणि म्हणूनच मी आज येथे उभा आहे! ". धर्माधिष्ठीत राजकारण करणार्‍यांना ही एक सणसणीत चपराक आहे. “धर्म ही अफूची गोळी आहे" असे कार्ल मार्क्सने म्हटले आहे. पण आत ह्याच लालभाईंनी अणुकराराच्या मुद्द्यावर ऐनवेळी पाठिंबा काढुन घेऊन युपीएचा कात्रजचा घाट करण्याचा प्रयत्न केला व त्यांना भाजपा व जात्यंध राजकारण करणार्‍या मायावतींची फुस होती. पण सोनिया गांधींनी एकाच तडाख्यात सर्वांना आस्मान दाखवले.

आता काही मंडळी भारताच्या इमेजचे हनन केले म्हणुन स्लमडॉगच्या नावाने कंठषोश करत आहेत, चांगल्या कामात नाक कापुन अपशकुन करण्याचा हा प्रकार, ह्याला कट असेच म्हणणे योग्य ठरेल. असाच कट भाजपा व त्यांच्या पिल्ल्यांनी मुम्बई हल्ला घडला त्या वेळी करुन सरकारचा राजीनामा मागितला होता, डाव्यांनी अणुकराराच्या मुद्द्यावर सरकारला कट करुन अडचणीत आणले होते. सोनिया गांधींना व पर्यायाने काँग्रेसला अडचणीत आणुन भारतीय लोकशाहीच्या मुळावर उठणार्‍या असल्या हलकट प्रवॄत्तीचा आम्ही निषेध करतो.
असो.
स्लमडॉग चे अभिनंदन ...!!!

* डॉ. अरुण टिकेकर :
कसल्याही लोकशाहीवादी निवडणुकीतुन झालेल्या निवड प्रक्रीयेत मिळणारे यश हे निर्भेळच असते, म्हणुनच स्लमडॉगचे अभिनंदन. आता भारताच्या सांप्रत काळात एकंदरच समाजवादी व उदारमतवादी विचारप्रणाली नामशेष होत असताना स्लमडॉगने असे यश मिळवणे ही एक स्पॄहणीय घटना आहे. लोकहितवादी आगरकर, टिळक व न्या. रानडे ह्यांनी समाजात रुजवलेला उदारमतवाद व सामाजीक सौर्हाद्य ह्याची जर पुन्हा रुजवणी झाली तर भविष्यात यशाच्या अनेक पायर्‍या आपण चढु याबद्दल मनात किन्तु नाही ...

* आनंद आगाशे , पुणे सकाळ :
स्लमडॉगने पुरस्कार मिळवुन अख्ख्या जगात आपले नाव करणे ही महत्वपुर्ण घटना आहे. तसेही जगात आजच्या घडीला स्लमडॉग सोडला तर पुणे सोडुन पहाण्यासारखे आहेच काय ? पुण्यातल्या राजकारण्यांनी बीआरटी, रस्ते, पाणी ह्यासारखे मुलभुत प्रश्न आधी सोडवणे गरजेचे आहे. पुणे महोत्सव हा कुणाच्या नेतॄत्वात व्हावा हा मुद्दा गौण आहे. लवकरच आम्ही सप्तरंगमध्ये ह्याबद्दल लिहणार आहोत ...
स्लमडॉगच्या निमीताने युवा पिढीला बोलते करण्यासाठी पुन्हा "युवा सकाळ" सुरु होत आहेच...

* संजय राऊत, सामना :
मराठी माणसाचा मानबिंदु असणार्‍या मुंबईवर बेतलेल्या स्लमडॉगला ऑस्कर मिळण्याची घटना ही अभुतपुर्वच म्हणावी लागेल. काही दळभद्री, पोटार्थी, भिकारड्या, नेभळट व भाकरी शैली असणार्या पत्रकारजंतुंनी आधी ह्याविरुद्ध बरीच आरडाओरड केली होती. तो चित्रपट परकीय आहे म्हणुन का त्यावर असा हल्ला करावा ? ही लोकशाही आहे का मोगलाई ? व्यक्तीस्वातंत्र्याला नख लावणा-या या औरंगजेबी प्रवृत्तींना जागीच ठेचले पाहिजे. असल्या सुपारीबाज व मराठी माणसाच्या मुळावर उठणार्‍या प्रवॄत्तीला आत्ताच जागा दाखवली पाहिजे. काही निवडक धनदांडग्या व आपमतलबी लोकांच्या दाड्या कुरवाळण्याचे प्रकार थांबणार कधी ???

* भारतकुमार राऊत, राज्यसभा खासदार, स्तंभलेखक मटा :
एकंदरीतच सर्वंकष विचार केला तर ही घटना स्पृहणीय आहे असेच म्हणावे लागेल. स्लमडॉगचा सन्मान हा फक्त चित्रपटाचा नसुन समस्त भारतीय जनतेचा व त्यातल्या त्यात झोपडपट्टीत हलाखीचे जीवन जगणार्‍या लढावय्यांना दिलेली आदरांजलीच म्हणावी लागेल. मटानायक उद्धवजी यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना नेहमीच अशा वर्गाच्या मागे उभे राहिली आहे, आत्तापर्यंतचा इतिहास जर आपण सुक्ष्मदॄष्टीने पाहिला तर आपल्याला ठायीठायी ह्या गोष्टी जाणवतील ....
( मग ते बराच वेळ उद्धवजी, अफझल गुरु, नरेंद्र मोदी, गोध्रा, ओबामा, मायावती , भाजपा, समाजवाद , सांस्कॄतीक एकता, शिवसेनेचे कार्य , महाराष्ट्राची प्रगती, मुंबईचे स्थान, मुंबई हल्ला, निष्क्रीय राज्यकर्ते ह्या विषयांवर बोलत राहिले ...
शेवटी मुळ मुद्दा काय होता हे विसरुन गेल्याने त्यांनी एकदम गंभीर मुद्रा करुन थोडेसे खाकरुन आम्हाला "आता निघा" असा सिग्नल दिला. )

* निखील वागळे , आयबीएन लोकमत :
अरे ऑस्कर देत नाय म्हणजे काय ? स्वतःला समजता कोण ? भारतीय समाज व चित्रपटांना कमी लेखणे थांबणार कधी , किती दिवस ह्या गोष्टींवर टिका करणार ? माझ्यावर तर अनेकदा टिका होते, आरडाओरड होते परंतु मी कधी डगमगलो नाही. परंतु हे कोठेतरी रोखण्याची गरज आहे असे तुम्हांला वाटत नाही का? आपल्याकडे येथे अनेक मान्यवर आहेत, अपण त्यांचे विचार जाणुन घेण्यासाठी त्यांच्याकडे वळणारच आहोत. पण त्याआधी मी घेतो एक ब्रेक, आपण पहात आहात "आय बी एन लोकमत" .....
( असे म्हणुन त्यांनी २ ग्लास पाणी पिले, व दाढी खाजवत विचार करु लागले )
पुन्हा उसळुन ते म्हणाले " अरे असे पडद्याआडुन वार करणे ****चे लक्षण आहे, हिंमत असेल तर स्वतः चित्रपट बनवुन ऑस्कर मिळवुन दाखवावा. मी इतकी वर्षे पत्रकारीतेत आहे, स्पष्ट बोलायला मी कुणाच्याही **ला घाबरत नाही... हा शुद्ध *** आरोप झाला.."
( शेवटी आम्ही त्यांना हा "आजचा सवाल" कार्यक्रम नाही असे भीतभीत सुचवले, त्यांनी मुद्रा एकदम क्रुद्ध केल्याने आम्ही तिथुन काढता पाय घेतला )

* प्रविण टोकेकर उर्फ ब्रिटीश नंदी , लोकप्रभा :
ऑस्कर मिळाले ही चांगलीच गोष्ट आहे ह्यात वाद नाही पण महत्वपुर्ण मुद्दा असा की आपण ह्यातुन काही शिकलो आहोत का ?
मी माझी "ब्रिटीश नंदी" ही मालिका ह्यात हेतुन सुरु केली होती, जनजागरण ...!!!
पण कुठलेही मत मांडताना मग ते वॄत्तपत्रात असो वा चित्रपटाद्वारे तेव्हा संयम आणि मर्यादाशीलपणा तसेच एकंदर सामाजीक क्षोभाचे भान राखणे अत्यावश्यक ठरते. माझ्या मते इथे स्लमडॉग थोडासा मार खातो. तरीही हरकत नाही ...
अभद्र, असभ्य भाषेत संवाद वा चित्रण, तसेच श्लीलतेच्या मर्यादा ओलांडणारी आयटम सॉग्स वा खळबळजनक गॉसीप्स दाखवुन मलिदा खाणार्‍या व स्वतःची तुंबडी भरणार्‍यांचा आम्ही निषेध करीत आहोत. हे प्रकार जर थांबले तर ऑस्कर बरोबर जनाश्रयही मिळेल असे आम्ही अंतरात्म्याला साक्ष ठेऊन प्रतिपादन करु इछितो ...

तर असे आहे एकंदरीत ...!

( बाकी अजुन येऊद्यात, मज्जा येते आहे. )

जय हो ...!!!

विषेश आभार : नामवंत वॄत्तपत्रांचे अग्रलेख, बातमीदार ब्लॉग व आजानुकर्णाचा एक जुना लेख ...!

विनोदसमाजजीवनमानमौजमजाविचारप्रतिक्रियाआस्वादलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

दशानन's picture

26 Feb 2009 - 9:25 am | दशानन

>शेवटी मुळ मुद्दा काय होता हे विसरुन गेल्याने त्यांनी एकदम गंभीर मुद्रा करुन थोडेसे खाकरुन आम्हाला "आता निघा" असा सिग्नल दिला.

=))

जबरा !

डॉन्या असा कसा रे तु सुटलास एकदम मोकाट... कालपरवा पर्यंत तर ठीक होतास की रं ;)

लै भारी... अजून येऊ द्या... मिपा वरचे अनेक भिष्मपितामहा आहेत त्यांचे पण इचार येऊ दे .. जाम मजा येईल.

Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.
सत्य वचन :D

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Feb 2009 - 10:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

=))

यापुढे काहीही सुचत नाही आहे! _/\_

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

भाग्यश्री's picture

26 Feb 2009 - 10:12 am | भाग्यश्री

हहपुवा आणि तुझ्या कल्पनाशक्तीला साष्टांग नमस्कार !! :))) भारी लिहीलेय!!!

http://bhagyashreee.blogspot.com/

आनंदयात्री's picture

26 Feb 2009 - 5:07 pm | आनंदयात्री

हेच म्हणतो .. अत्यंत उत्तम जमलाय हा ही भाग.
हा टिकात्मक लेखनप्रकार आपण यापुढे आंतरजालावर रुजवावा अशी आपणास सादर विनंती करतो.

-
आंद्याडॉग मिसेळियर

प्राजु's picture

27 Feb 2009 - 1:12 am | प्राजु

हेच म्हणते..
हेच म्हणतो .. अत्यंत उत्तम जमलाय हा ही भाग.
हा टिकात्मक लेखनप्रकार आपण यापुढे आंतरजालावर रुजवावा अशी आपणास सादर विनंती करतो.

आंद्या भाऊशी सहमत आहे.
जोरदार फटाके फोडलेस रे!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

घाशीराम कोतवाल १.२'s picture

26 Feb 2009 - 10:09 am | घाशीराम कोतवाल १.२

मस्त परत षटकार राव
अजुन थोडे निलकंठ खांडिलकर नवाकाळ
जरा बघा जमल तर
स्वगत हे साहेब स्वताला अग्रलेखाचे बादशाह म्हणवितात

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Feb 2009 - 10:10 am | llपुण्याचे पेशवेll

हा. हे कसे अस्सल आणि अव्वल वाटले.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

दिल्लीचं कार्ट's picture

26 Feb 2009 - 10:28 am | दिल्लीचं कार्ट

असेच म्हणतो

दिल्लीचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला शी चिकटली की त्याचा टिशूपेपर बनतो

सचिन बडवे's picture

26 Feb 2009 - 10:17 am | सचिन बडवे

अतिशय गाढा अभ्यासा शिवाय हे लिहिणे कठिण इतकेच म्हणेन...

बाकि अदितिच्या मतास अनुमोदन.. _/\_

सचिन

दिल्लीचं कार्ट's picture

26 Feb 2009 - 10:23 am | दिल्लीचं कार्ट

सहमत आहे

दिल्लीचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला शी चिकटली की त्याचा टिशूपेपर बनतो

झेल्या's picture

26 Feb 2009 - 10:24 am | झेल्या

या लेखमालेला माझ्याकडून ऑस्कर...!

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

छोटा डॉन's picture

26 Feb 2009 - 10:32 am | छोटा डॉन

झेल्याशेठ, आपल्या मताबद्दल व सन्मानाबद्दल आभारी आहे.
बरे वाटले.

स्वगत : चला, आता एक आभारप्रदर्शनाचे भाषण तयार करायला हवे ;)

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

सखाराम_गटणे™'s picture

26 Feb 2009 - 10:59 am | सखाराम_गटणे™

>>या लेखमालेला माझ्याकडून ऑस्कर...!
मग अजुन एक लेख येयील.

डॉन्याला ऑस्कर वर लोकांच्या प्रतिक्रिया.

ह. घ्या.

----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.

ऍडीजोशी's picture

27 Feb 2009 - 12:49 am | ऍडीजोशी (not verified)

ऑस्कर मिळाल्या बद्दल बँगलोर कट्ट्याला तू आजन्म ग्लेन ड्रम्माँड सप्लाय करावीश अशी सगळ्यांची इच्छा आहे ती तू पूर्ण करशीलच :)

अवांतर - लेख लै म्हणजे लै भारी झालाय.

निखिल देशपांडे's picture

26 Feb 2009 - 10:27 am | निखिल देशपांडे

कुमार केतकर ची शैली खासच जमली रे मित्रा..... बाकि तु पेटला आहेस सध्या......
मस्तच लिहिले आहेस....

केदार's picture

26 Feb 2009 - 10:38 am | केदार

कुमार केतकर , मटा : > ते बदलून जरा लोकसत्ता लिहाल का?

विनायक प्रभू's picture

26 Feb 2009 - 10:57 am | विनायक प्रभू

मिपा वरच्या 'नगांची' प्रतिक्रियेवर भाग ३ येउ दे रे डॉन्या
लै भारी गंमत होऊन जाउ दे

परिकथेतील राजकुमार's picture

26 Feb 2009 - 11:00 am | परिकथेतील राजकुमार

डॉनबाबा जय जय हो !
मस्तच लिहिले आहेस रे दादा. खरतर तुझे लेखन वाचत नसुन , प्रत्यक्ष ह्या लोकांनी दिलेल्या प्रतीक्रीयाच वाचत आहे असे क्षणभर वाटुन गेले ;) ह्यांच्या बरोबरीने थोडेसे 'प्रहार' आणी 'पांचजन्य' आले असते तर अजुन भेळ मस्त रंगली असती. पण तु जी काही डिश दिली आहेस ती अप्रतीमच.
सध्या निवडणुका जवळ आल्याने आपले दोन्ही मेंदु पुर्ण ताकदिने कामाला लागले आहेत हे लगेच जाणवते ;)

राजकुमार टिकेतकर
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

विनायक पाचलग's picture

26 Feb 2009 - 6:40 pm | विनायक पाचलग

सोनिया गांधींना व पर्यायाने काँग्रेसला अडचणीत आणुन भारतीय लोकशाहीच्या मुळावर उठणार्‍या असल्या हलकट प्रवॄत्तीचा आम्ही निषेध करतो.
असो.
स्लमडॉग चे अभिनंदन ...!!!

जबर्‍य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्या
अणखीन आले पाहिजे एवढीच इच्छा आहे
नाहीतर आय बी एन वागळे सारख्या शिव्या घालीन
अवांतर ,सहजच.-बाकी पहा फक्त आय बी एन असे असते .फक्त विसरला वाटते

छानसे वाचलेले

विनायक पाचलग

ढ's picture

26 Feb 2009 - 11:12 am |

त्यांनी मुद्रा एकदम क्रुद्ध केल्याने आम्ही तिथुन काढता पाय घेतला )

=))

परिकथेतील राजकुमार's picture

26 Feb 2009 - 11:45 am | परिकथेतील राजकुमार

काही मिपाकरांनी त्यांच्या प्रतिक्रीया आम्हाला व्यनी मधुन कळवल्या...

टारझन :-
स्लमडॉग हा कितीही एक णंबरचा येडझवा थ्रिलर कॉमेडी असला तरी आपल्या गर्लफ्रेंड सोबत पाहिल्यास मणोकामणा पुर्ण होण्याचा संभव आहे, कारण त्यावेळी शुक्र पंचम स्थानात आणि चंद्र षष्टी मधे फार स्ट्राँग होतो.
छोटा टॉण

||राजे|| :-
कालच दुपारी बातमी कळली ... डोक्याला लै वाईट शॉट लागला... राव...
स्लमडॉगच्या निमीताने युवा पिढीला बोलते करण्यासाठी पुन्हा "युवा सकाळ" सुरु होत आहेच...
आमचा युवाअड्डा त्यापेक्षा भारी आहे बॉ
=))
मिपा x कन्या x वादावादी = दाही दिशांना सुटलेला वारा.
सत्य वचन

विनायक अका कोदा
मी पिकचर वगेरे जास्ती बघत नाही आनी त्यातुन मीपावर आलयापासुन फक्त इकड्चे लेखच वचुन माझ्या ज्ञानची भुक भागव्तो. मिपा चालु केल्यापासुन मी घरचा टिव्ही सुधा विकला.. आता बोला.
अवंतर : आणी काय म्हणतो ?

प्रभु गुर्जी :-
त्यांना ऑस्करायला मिळाल ह्याला कुस्करायला कधी मिळणार बॉ ?

सखाराम गटणे :-
एकदाचा ऑस्कर मिळाल्याने बॉलीवुड वाल्यांचे तुंबलेल बोळे निघाले असतील.

तुम्हाला ऑस्कर मिळवायचे असतील तर परदेशी डायरेक्टरसाठी ट्रॅकर चालु करा.

धमाल मुलगा :-
एक नंबर लेख ;) आम्ही सहसा असल्या चित्रपटाच्या वाटेला जात नाही (अर्थात अंधारात सोबत चांगली मिळणार असेल तर आमची ना नाही.)
हल्ली चालु असलेल्या बेसन्स-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला बेसन्स कसे काय म्हणवता?

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

दशानन's picture

26 Feb 2009 - 11:52 am | दशानन

=))

अनिल हटेला's picture

26 Feb 2009 - 11:59 am | अनिल हटेला

=)) =))

मेलो =))

शॉल्लीट बंगलोरी बाबा & परा !!!

साष्टांग दंडवत !!!!

बैलोबा चायनीजकर !!!(दंडवते)
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सखाराम_गटणे™'s picture

26 Feb 2009 - 12:14 pm | सखाराम_गटणे™

पुर्णपणे वारलो.
आता पेटवायची वाट पाहतो आहे.

----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.

शेखर's picture

26 Feb 2009 - 11:58 am | शेखर

सुटलेत सगळे =))

शंकरराव's picture

26 Feb 2009 - 7:23 pm | शंकरराव

व्वा! मस्तच रे परा ,
पार बाँड्री पार फटकेबाजी

शंकरराव
एखाद्याचे देवत्व मान्य करणे हे स्वतःच्या चूका दिसण्या ईतके अवघड काम आहे, चूका दिसल्या की स्वतःला त्रास होतो.
त्यात अजून स्वतःचे "पिल्लू" सोडून पळणे ही तर अजूनच मजेशीर गोष्ट. असो ;-)

सुक्या's picture

26 Feb 2009 - 11:59 am | सुक्या

१ नंबर . .

कुमार केतकरांची प्रतिक्रिया तर एकदम झकास.

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

अवलिया's picture

26 Feb 2009 - 2:26 pm | अवलिया

मस्तच रे डान्या.. झ क्का स !!!!

--अवलिया

शंकरराव's picture

26 Feb 2009 - 3:38 pm | शंकरराव

व्वा! डानराव मस्त जमलीय प्रत्येकाची शैली
=))

तुम्ही कुमार केतकर फार आवडीने वाचता वाटत ?

शंकरराव
एखाद्याचे देवत्व मान्य करणे हे स्वतःच्या चूका दिसण्या ईतके अवघड काम आहे, चूका दिसल्या की स्वतःला त्रास होतो.
त्यात अजून स्वतःचे "पिल्लू" सोडून पळणे ही तर अजूनच मजेशीर गोष्ट. असो ;-)

अंकुश चव्हाण's picture

26 Feb 2009 - 4:48 pm | अंकुश चव्हाण

या चित्रपटाचा निर्देशक जर भारतीय असता तर ऑस्कर मिळाला असता का?
स्माईल पिंकी या लघुपटाचा निर्देशक ही परदेशीच आहे.

श्रीयुत संतोष जोशी's picture

26 Feb 2009 - 5:50 pm | श्रीयुत संतोष जोशी

फारच झक्कास,डॉन राव.

( स्वगत ) : हा कुमार केतकर तर समाजाला लागलेली एक कीड आहे. ( स्वगत )

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

विनायक पाचलग's picture

26 Feb 2009 - 6:44 pm | विनायक पाचलग

आणि ती कीड फैलावत जावुन लोक्मत ,मटा असे करत आता लोकसत्ताला लागलेली आहे
मग काय करायचे .
बाकी डॉनदादा आता जरा सामान्य नागरीक ते पिक्चरवाले असा प्रवास दाखवा
जाम मजा येइल वाचायला

छानसे वाचलेले

विनायक पाचलग

शितल's picture

26 Feb 2009 - 6:39 pm | शितल

डॉन्या,
एक सांग आता तुझ्या मैत्रीण मिपाची सदस्य झाली आहे का:? नाही लै धोबीपछाड चालु हाये तुझी म्हणुन इचारल. ;)
सह्ही बॉस, सकाळी चहा बरोबर तुझ्या ह्या संपादकिय प्रतिक्रीया वाचल्या. चहाची टेस्ट अजुन वाढली. :)

परिकथेतील राजकुमारा आप भी कुछ कम नही हो ! :)

संदीप चित्रे's picture

26 Feb 2009 - 7:17 pm | संदीप चित्रे

डॉन्या आणि परिकथेतील राजकुमार....
शितलच्या मताशी सहमत.... दोघांनीही दंगा केलाय नुसता !

लिखाळ's picture

26 Feb 2009 - 7:56 pm | लिखाळ

हा हा हा .. डॉन्या मस्तरे :)
केतकरांचे स्वगत तर भारीच :)

सध्या लै दंगा कराय लागलायस .. मजा येतेय.. चालूद्या :)
-- लिखाळ.

चतुरंग's picture

26 Feb 2009 - 11:16 pm | चतुरंग

चतुरंग

भडकमकर मास्तर's picture

26 Feb 2009 - 11:35 pm | भडकमकर मास्तर

केतकर भारीच..
लै आवल्डे...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विनायक पाचलग's picture

26 Feb 2009 - 11:25 pm | विनायक पाचलग

.