स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया ...

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in जनातलं, मनातलं
25 Feb 2009 - 10:45 am

स्लमडॉग मिलेनियर ह्या चित्रपटाला ऑस्कर मिळाले हे सर्वांना माहित आहेच, त्यावर गेले २ दिवस टीव्हीवर रतीब चालु आहे ...

पण काही "मान्यवरांच्या " खर्‍याखुर्‍या मनातल्या प्रतिक्रीया जाणुन घेण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेतली व ह्याबद्दल चर्चा केली. आमचे कॉन्टॅक्ट्स व कनेक्शन्स लै भारी असल्याने आम्हाला हे शक्य झाले ...
पहा बर कोण काय काय म्हणते ते ...

डिस्क्लेमर : हे काल्पनिक व विरंगुळा आहे हे सांगायलाच नको, उगाच त्यावरुन डोक्याला त्रास नको. ;)

* आर्य चाणक्य :
मुळात स्लमडॉगला ऑस्कर मिळाले नसते तर त्याच्या यशस्वीतेला धोका होता, अनेक कारस्थाने रचुन का होईना ऑस्कर मिळणे महत्वाचे होते. ऑस्कर न मिळणे म्हणजे भारतीय पार्श्वभुमीवर बेतलेल्या चित्रपटाच्या व पर्यायाने त्यामधल्या कलाकारांच्या कारकिर्दीला धोका, म्हणजेच संपुर्ण चित्रसॄष्टीला धोका, एकंदर करमणुकीला धोका, सामाजीक स्वास्थ्याला धोका , संपुर्ण प्राणीमात्रांना धोका ...
असे चालु राहिले तर काळाच्या ओघात माणुस ही जमात नष्ट होण्याचा धोका ...!

* लोकमान्य टिळक :
स्लमडॉगने ऑस्कर मिळवणे ह त्यांचा जन्मसिद्ध हक्क होता आणि त्याने तो बजावला ...
मी मुळात स्लमडॉग हा सिनेमाच पाहिला नसताना त्याच्यावर प्रतिक्रीयांची टरफले मी का टाकु ?

* न्यायमुर्ती रानडे :
ऑस्कर मिळवणे ही स्लमडॉगची आर्थीक, सामाजीक, मानसिक व सैद्धांतिक गरज होती. आपल्याला फक्त त्यांनी सरळ मार्गाने ऑस्कर मिळवले आहे का हेच पहायचे आहे. अन्यथा त्याची योग्य ती न्यायालयीन चौकशी देशातल्या संविधानाच्या सन्मानासाठी होणे आवश्यक ठरते.

* महात्मा गांधी :
स्लमडॉगने ऑस्कर मिळवताना कसलाही कायदेभंग केला नाही अथवा असहकाराचा नारा दिला नाही. भुतलावर निर्माण होणार्‍या प्रत्येक चित्रपटाला ऑस्कर मिळणे हाच प्राणीमात्रांच्या जीवनातील एका अद्भुत घटनेचा एक सुंदर अविष्कार असेल.
मात्र शांततामय मार्गाने व सविनयाने काढलेला कुठलाही चित्रपट हा तुम्हाला ऑस्कर पुरस्कार मिळाल्याचा आत्मानंद देईल.

* शाहु महाराज :
इथे जेव्हा प्रत्येक्षात मुंबईमध्ये झोपडपट्टीत कुत्र्यासारखे जीणे जगणार्‍या माणसाची तुम्हाला किंमत नाही तर आम्ही त्या दिडदमडीच्या स्लमडॉग सिनेमाने ऑस्कर मिळाले ह्याची कशाला पत्रास ठेवायची ?

* जवाहरलाल नेहरु :
स्वतंत्र भारतात निर्माण होनार्‍या कुठल्याही सिनेमाला ऑस्कर मिळवण्याचे पुर्ण स्वातंत्र्य आम्ही घटनेद्वारे त्यांना बहाल केले आहे. शिवाय त्यात लहान मुलांनी उत्तम काम केले आहे असे ऐकुन आहे.
लहान मुले म्हणजे देवाघरची फुले.

* अटलबिहारी वाजपेयी :
स्लमडॉगने ऑस्कर मिळवणे हेच "इंडिया शायनिंग" आहे, सध्या मी ह्याच परिस्थीतीवर आणि पर्यायाने देशाच्या उदात्ततेवर कविता करत आहे, लवकरच काव्यसंग्रह प्रसिद्ध होईल.

* लालकृष्ण आडवाणी :
हुं, त्यात काय विषेश ?
मी एवढी रथयात्रा केली, १०० ठिकाणी झोपडपट्टीतुन हिंडलो, अनेक ठिकाणी रथ अडवला गेला तेव्हा कुणी आमचे कौतुक केला का ? उलट मी "जीनांचे" नाव घेतल्यावर सर्व बाजुंनी टिका झाली.
असो. हे माझे वैयक्तीक मत आहे.
पक्षाचे जे काही धोरण आहे त्याप्रमाणे जावडेकर प्रतिक्रीया देतील.

* अर्जुनसिंग :
मिळाले का ? बरे झाले ..!
नाही तर मी म्हणतच होतो की "ऑस्करवाल्यांनी बाहेरच्या देशात चित्रीत झालेल्या / बेतलेल्या चित्रपटांना त्यांच्या मुळ कॅटॅगिरीत आरक्षन ठेवावे" म्हणुन...

* शरद पवार :
पक्षाच्या व सरकारच्या धोरणात बसते का नाही ते पाहुन व कार्यकर्त्यांशी चर्चा करुन योग्य ती प्रतिक्रीया द्यावी लागेल. तसाही चित्रपट उद्योग हा भारतातील सहकार व व्यापार क्षेत्रातील एक महत्वाचा घटक आहे, तळागाळ्यातल्या सर्वसामान्य गोरगरिब जनतेच्या मनोरंजनाचा तो एक मार्ग आहे.
सध्यातरी सर्व पर्याय खुले आहेत एवढेच सांगतो.

* बाळासाहेब ठाकरे :
जय महाराष्ट्र , मुंबईतल्या मराठी माणसांच्या प्रयतनातुन उभारल्या गेलेल्या स्लमडॉग ह्या चित्रपटाला ऑस्कर हे मिळायलाच हवे. कसे मिळत नाही तेच बघतो. माझा कडवट शिवसैनिक आदेशाची वाट पहात आहे.
बर्‍या बोलाने दिलेत ते उत्तम. अन्यथा तुमच्यासारख्या पोटार्थी, भिकारड्या, नेभळट, पुचाट व गांडुळासारख्या औलादीला कसे वटणीवर आणायचे ते आम्हाला चांगलेच माहित आहे.
कानात सांगुन कळत नसेल तर कानाखाली वाजवुन समजवावे लागेल ...

* मनोहर जोशी :
स्लमडॉगला ऑस्कर मिळाले ही घटना अथवा तो चित्रपट मी प्रत्येक्ष पाहिला नाही. परंतु माननीय बाळासाहेबांच्या आदेश व परवानगीशिवाय हा चित्रपट निघणे व त्याला ऑस्कर मिळणे ह्या घटना शक्य नाही हे मी निश्चितपणे सांगु इच्छितो.

* सोनिया गांधी :
हा महात्मा गांधींचा, श्रीमती इंदिरा गांधींचा, राजीवजींचा व त्यांच्यावर श्रद्धा ठेऊन आमच्यामागे व पर्यायाने स्लमडॉगमागे उभे राहणार्‍या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विजय आहे.

* सुशीलकुमार शिंदे :
हॅ हॅ हॅ, स्लमडॉगला ऑस्कर मिळाले काय ? हॅ हॅ हॅ.
सर्वात प्रथम स्लमडॉगसारख्या तळागाळातल्या व मागास वर्गाचे चित्रण दाखवणार्‍या चित्रपटाला पाठिंबा देऊन त्यांना संधी देण्याबद्दल सोनिया गांधींना धन्यवाद.
हा स्लमडॉगचा सन्मानच आहे.

* राज ठाकरे :
स्लमडॉग सारख्या हिंदी-इंग्रजी भाषा असलेल्या मिश्र चित्रपटाला ऑस्कर मिळणे म्हणजे इतर भाषांना कानफाटीत देणे नव्हे.
महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट "मराठीतच" दाखवला गेला पाहिजे व त्याला धनदांडग्या परप्रांतियांच्या मल्टीप्लेक्समध्ये "प्राईम टाईम" मध्ये दाखवले गेले पाहिजे, कसे दाखवत नाही ते मी बघतोच ...!

* अमर सिंग :
ऑस्कर पुरस्कार हे काय फक्त अमेरिकेत चित्रपट काढणार्‍यांचे बापजादांचे आहेत काय ?
स्लमडॉगलासुद्धा तिथे सन्मानाने राहता आले पाहिजे, घटनेत तसे उल्लेख आहे ...
वेळ पडल्यास आझमगडहुन २०००० माणसे आणतो पण अमेरिकेतल्या प्रत्येक थेटरात स्लमडॉग झळकवतोच.
बघु कोण आडवे येते ते ...

( बाकी जमल्यास व इच्छा झाल्यास सवडीने नंतर ... ;) )

मुक्तकविडंबनविनोदमौजमजाआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

25 Feb 2009 - 10:54 am | सखाराम_गटणे™

नारायण राणे.
सत्यम राजु
कुमार केतकर.
प्रिती झिटा आनि इतर बॉलिवुड
दक्षिणी नट-नट्या

----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.

छोटा डॉन's picture

26 Feb 2009 - 9:34 am | छोटा डॉन

ह्या भागातले प्रतिसाद वाढत जाऊल दुसर्‍या पानावर गेल्यावे अजुन "लै भारी ऍडीशन" चालुच असल्याने वाचायला सोपे जावे म्हणुन दुसरा भाग सुरु करत आहे ...
नवे काही टाकायचे असल्यास तिथे टाकावे ...

दुसरा भाग आपणास स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया ... भाग -२ इथे पहायला मिळेल ...

पहा, वाचा, हसा आणि धुमशान घाला ..!!!
जय हो...!!!

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

25 Feb 2009 - 10:54 am | परिकथेतील राजकुमार

डॉनबाबा अपला लेख वाचला आणी फार पुर्वी वाचलेल्या एका विनोदी लेखाची आठवण झाली. झकासच अभ्यास आहे भौ आपला !

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

सखाराम_गटणे™'s picture

25 Feb 2009 - 11:08 am | सखाराम_गटणे™

मस्तच कुठे मिळाले हे?
जबरा आहे.

----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.

छोटा डॉन's picture

25 Feb 2009 - 11:15 am | छोटा डॉन

करेक्ट ...!!!

मला आजच ती मेल आली व त्यानुसारच मी थोडे बदल करुन हे लिहले.
लेख हा स्लमडॉग आणि ऑस्कर याच्याशी संबंधीत असल्याने तसा बदलुन घेतले आहे, डायरेक्ट वर दिलेल्या कोंबडीशी त्याचा संबंध आहे हे मान्य आहेच पण अगदी तसेच आहे म्हणणे धाडसाचे ठरेल ...
असो.

मात्र "झकासच अभ्यास आहे" ह्या वाक्यातुन काय नक्की म्हणायचे आहे हे समजले नाही.
बाकी चालु द्यात.

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

25 Feb 2009 - 11:45 am | परिकथेतील राजकुमार

डॉनराव माझ्या "झकासच अभ्यास आहे" ह्या वाक्यातुन मला फक्त येव्हडेच अभिप्रेत होते की तुम्ही ह्या सगळ्यांची नस अगदी अचुक पकडली आहेत. आपल्याला काही वेगळा अर्थ वाटुन राग आला असल्यास क्षमस्व :)

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

पिवळा डांबिस's picture

26 Feb 2009 - 3:59 am | पिवळा डांबिस

:))

आनंदयात्री's picture

25 Feb 2009 - 11:07 am | आनंदयात्री

मस्त रे.

अवलिया's picture

25 Feb 2009 - 11:08 am | अवलिया

क्या बात है !!!!

डानराव कालपासुन लैच फार्मात... लगे रहो!!!!!!!!!!!!

:)

--अवलिया

मैत्र's picture

25 Feb 2009 - 11:20 am | मैत्र

डॉनराव .. लै भारी!!

मिंटी's picture

25 Feb 2009 - 11:10 am | मिंटी

डॉन्या मस्तच रे !!!!!!!! :)
मजा आली वाचताना.... जमलं तर अजुन अश्याच मान्यवरांची मतं पण टाक म्हणजे आपल्या राष्ट्रपती, आपले पंतप्रधान वगैरे.....

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Feb 2009 - 11:11 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

एक लंबर हो डानराव! =)) आजकाल (अर्थ शब्दशः घेणे) तुमची लेखणी फारच हसवते आहे!

माझीही अंमळ व्हॅल्यू ऍडिशनः

साने गुरूजी
माझी आई, तुमची आई, आपल्या सर्वांच्या आया (का आईच?), सगळ्याच मला माझ्या आईसारख्या! तेव्हा स्लमडॉगला पुरस्कार मिळाला काय आणि आणखी कोणाला मिळाला काय, आईला आनंदच होईल आणि त्या माऊलीला आनंद होईल म्हणून मलाही.

प्रकाश जावडेकर
'स्लमडॉग'ला भारतीय चित्रपट न म्हणणे यात परकीय शक्तींचा हात आहे. अमेरिका, तालिबान आणि आय.एस.आय.ची याला फूस आहे.

जाता जाता काही इतर बातम्या: किंवा सरळसरळ अवांतरः

  • संपूर्ण भारतीय बनावटीच्या 'स्माईल पिंकी' या लघुचित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला. जन्मजात वरचा ओठ फाटका असल्यामुळे इतर व्यंग नसतानाही अपमान सहन करायला लागणार्‍या, गरीब घरातल्या पिंकीची ही कहाणी. एका अमेरीकन संस्थेच्या आर्थिक मदतीने या छोटूलीचं ओठ शिवला गेला, तिचा पदोपदी अपमान होणं बंद झालं, आयुष्य बदललं... अशा अनेक पिंकी आपल्या भारतात पैशांविना अपमान सहन करत आहेत.
  • यु.पी.ए.ने 'स्लमडॉग'च्या आठ ऑस्कर्सचा उल्लेख 'स्वतःच्या कामगिरी'त केला पण पुन्हा एकदा 'पिंकी' दुर्लक्षित राहिली. बातमी वाचा.
  • 'स्लमडॉग'च्या दोन शीर्षक भूमिकांमधे आहेत, जमाल आणि लतिका. लहानपणचे जमाल आणि लतिका साकार करणारी दोन चिमुरडी झोपडपट्टीतलीच आहेत. लॉस अँजेलिसवरून ती मुलं जातील आपल्या झोपडपट्ट्यांमधे! पण 'म्हाडा'ने त्यांना घरं देण्याचं कबूल केलं आहे. बातमी वाचा.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

छोटा डॉन's picture

25 Feb 2009 - 11:17 am | छोटा डॉन

तुझी "व्हॅल्यु ऍडीशन" मस्तच आहे.
=))

बाकीच्यांनीही शक्य तितके ह्याच धाग्यात टाकत रहावे, उगाच नवा धाग नको ह्यासाठी ...!

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

निखिल देशपांडे's picture

25 Feb 2009 - 11:12 am | निखिल देशपांडे

सहिच रे डॉन्या...... मस्तच लिहिले आहे.....
कालपासुन चा तुमचा फॉर्म असाच चालु ठेवा

ढ's picture

25 Feb 2009 - 11:28 am |

* सुशीलकुमार शिंदे :
हॅ हॅ हॅ, स्लमडॉगला ऑस्कर मिळाले काय ? हॅ हॅ हॅ.

हे भारी..
मुक्तक मस्तच. कालपासून डानरावांची २०-२० सारखी बॅटिंग चाललीय्ये !

प्रकाश घाटपांडे's picture

25 Feb 2009 - 2:46 pm | प्रकाश घाटपांडे

हॅहॅहॅ

* सुशीलकुमार शिंदे :
हॅ हॅ हॅ, स्लमडॉगला ऑस्कर मिळाले काय ? हॅ हॅ हॅ.

डॉन्या ओळखीचं वाटतय का? सुशील कुमार नव्हे, ऑस्कर नव्हे, हास्य म्हंतोय मी.
डॉन्या जास्त हासवु नको रे बाबा ल्वॉक मपल्याव कातावतीन.

प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

दशानन's picture

25 Feb 2009 - 2:48 pm | दशानन

:)

Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.
सत्य वचन :D

विसोबा खेचर's picture

25 Feb 2009 - 4:26 pm | विसोबा खेचर

आयला! अजून एक सिक्सर..!

डॉन्या आजकाल फुल्टू सुटलाय लेकाचा. नुकतीच त्याला एखादी छानशी, तारुण्याने मुसमुसलेली पोरगी पटलेली दिसते आहे! :)

आपला,
(मध्यमवयीन) तात्या.

विनायक प्रभू's picture

25 Feb 2009 - 4:44 pm | विनायक प्रभू

'मुसमुसलेली' बरेच क्रांतीकारी बदल घडवते म्हणुन 'तात्यांशी' अंमळ सहमत

दशानन's picture

25 Feb 2009 - 4:46 pm | दशानन

म्याबी सहमत.

असेच नवप्रेमी खतरनाक असतात.. जरा जपून !

मृगनयनी's picture

25 Feb 2009 - 4:51 pm | मृगनयनी

डौन्या जी, मस्त!

साबुदाणा-थालीपीठांचा भलताच (चांगला) इफेक्ट झालेला दिस्तोये!
:)

शिवसेनाप्रमुखांची पन्खी,
धनुनयनी.

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

छोटा डॉन's picture

25 Feb 2009 - 5:52 pm | छोटा डॉन

>>नुकतीच त्याला एखादी छानशी, तारुण्याने मुसमुसलेली पोरगी पटलेली दिसते आहे!
अजुन एक ??? ते ही ह्या रिसेशनमध्ये ??? परवडेल का ????
कस्सच कस्सं ...
छ्या, लाजलो बॉ मी ..!

असो, ह्यावर २ ओळी सुचल्या आहेत....
एखादी तारुण्याने मुसमुसलेली छानशी पोरगी पटवली तरच जीवनाला अर्थ आहे,
पण अशी पोरगी पटवल्यावर मिपावर असा टाईमपास करायला मी काय मुर्ख आहे ?

जय हो...!!!

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Feb 2009 - 6:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अजुन एक ??? ते ही ह्या रिसेशनमध्ये ??? परवडेल का ????

जमाना बदल गया है, डानराव! ;-)

चला डानराव कवीसुद्धा झाले ... जय हो, जय हो॥ स्लमडॉगचा हो ... डानरावांना दोन ओळी सुचायला लागल्या आहेत.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

अनामिक's picture

25 Feb 2009 - 6:34 pm | अनामिक

अजुन एक ??? ते ही ह्या रिसेशनमध्ये ??? परवडेल का ????

अजुन एक ना - मग दोघींना मिळून डॉनराव नक्की परवडतील.... नाही का?

डॉन - लै भारी लेख!

-अनामिक

विनायक प्रभू's picture

25 Feb 2009 - 6:21 pm | विनायक प्रभू

'पझेशनचा 'रेसेशनशी संबंध काय

छोटा डॉन's picture

25 Feb 2009 - 6:25 pm | छोटा डॉन

नवे पझेशन घ्यायचे म्हटले की "एफ एस आय" वाढवुन घ्यावा लागतो ;)
ह्याचा संबंध पैशाशी व पर्यायाने रिसेशनशी आहे.

------
( अर्थतज्ज्ञ ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

विनायक प्रभू's picture

25 Feb 2009 - 6:30 pm | विनायक प्रभू

अरे डॉन्या रेसेशन चे पझेशन आयुष्यभर इलेशन

आनंदयात्री's picture

25 Feb 2009 - 6:26 pm | आनंदयात्री

एखादी तारुण्याने मुसमुसलेली छानशी पोरगी पटवली तरच जीवनाला अर्थ आहे,
पण अशी पोरगी पटवल्यावर मिपावर असा टाईमपास करायला मी काय मुर्ख आहे ?

हाण हाण डाण्या !! लै भारी शीघ्र काव्य ..

पण याचा अर्थ इथे टीपी करणारे सगळे तुंबलेले बोळेच आहेत ?

-
आद्य तुंबलेला बोळा

आंद्याराम वहाणे

छोटा डॉन's picture

25 Feb 2009 - 6:29 pm | छोटा डॉन

>>पण याचा अर्थ इथे टीपी करणारे सगळे तुंबलेले बोळेच आहेत ?
=)) =))
हम्म्, असं मी कुठेही म्हणलो नाही ...

तसेही आम्ही फक्त २ ओळी काव्य लिहणारे फुटकळ कवी , त्याचा अर्थही काढुन द्यायला आम्ही काही कुणाला बांधील नाही.
ज्याला जसा पटतो तसा अर्थ त्याने काढावा ...

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

आनंदयात्री's picture

25 Feb 2009 - 6:32 pm | आनंदयात्री

चालेल चालेल तोवर चालवीन नायतर खरडवही बंद करुन निघुन जाईन .. बा*वला तिचायला ..

(असेच म्हणायचे होते ना पुढे तुम्हाला ?)

भडकमकर मास्तर's picture

25 Feb 2009 - 4:37 pm | भडकमकर मास्तर

महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट "मराठीतच" दाखवला गेला पाहिजे व त्याला धनदांडग्या परप्रांतियांच्या मल्टीप्लेक्समध्ये "प्राईम टाईम" मध्ये दाखवले गेले पाहिजे, कसे दाखवत नाही ते मी बघतोच ...!
:)

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

शितल's picture

25 Feb 2009 - 7:17 pm | शितल

डॉन्याची बुध्दी तळपत आहे...
मस्त रे .. मजा आली वाचुन..:)

सहज's picture

26 Feb 2009 - 7:01 am | सहज

तेल लावण्याच्या असा फायदा एक न एक दिवस होतो तर :-)

शंकरराव's picture

25 Feb 2009 - 8:40 pm | शंकरराव

मजाआली वाचून.. :-)

आम्ही सर्वांत देवत्व शोधतो.. चूका दुरूस्ती करून मिळेल
( साक्षीभावपंथी ) शंकरराव

एखाद्याचे देवत्व मान्य करणे हे स्वतःच्या चूका दिसण्या ईतके अवघड काम आहे, चूका दिसल्या की स्वतःला त्रास होतो.
त्यात अजून स्वतःचे "पिल्लू" सोडून पळणे ही तर अजूनच मजेशीर गोष्ट. असो ;-)

प्राजु's picture

25 Feb 2009 - 8:46 pm | प्राजु

जियो!!!
जोरकस आहे की अगदी!
आपल्या या कल्पना शक्तीची दाद द्यायला हवी! जबरदस्त आहे!
लगे रहो.... हम तुम्हारे साथ है!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

भास्कर केन्डे's picture

25 Feb 2009 - 9:12 pm | भास्कर केन्डे

सकाळी सकाळी तुमच्या अफलातून लेखाद्वारे मिपाची तर्री चापायला मिळाली. धन्यवाद!

असेच उत्तमोत्तम लिहित रहा.

आपला,
(पंखा) भास्कर

संदीप चित्रे's picture

25 Feb 2009 - 9:42 pm | संदीप चित्रे

प्रत्येकाची बोलण्याची ढब डोळ्यासमोर उभी राहिली... मस्त आहे धागा.

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Feb 2009 - 10:51 pm | बिपिन कार्यकर्ते

आपल्या मिपावर एवढ्या महान हस्ती आहेत की त्याम्च्याही मनात काय आले असेल हे जाणुन घेणे ही एक फार मोठी गरज वाटली. समाजमनाचा कल जसा त्या त्या समाजातील प्रमुख व्यक्तींच्या मतांवरून जोखता येतो तसेच काहीसे हे. तर हे घ्या....

मुक्तसुनीत

"या एकंदरीत प्रकाराचा गांभिर्याने आणि साकल्याने विचार केला तर असे दिसून येते की एका समूहाने दुसर्‍या समूहाबद्दल काही एक वक्तव्य अथवा वस्तुनिष्ठ भाष्य केल्यास ते सर्व समूहाला मान्य होईलच असे नाही. असे म्हणण्यास काहीच प्रत्यावाय नसावा, किंबहुना हे कालातीत सत्य आहे."

रंगाशेठ (हे फक्त स्वगतातच खरं बोलतात)

"खुद के साथ बाता: रंगा, तुला येतं का रे असलं भारी भारी लिहिता? बाकी पिक्चर तसा ठीकच आहे. आता पिक्चरचं कसं विडंबन करावं ब्वॉ!!! आणि नाही केलं तर लौकिक धूळीला मिळेल."

घाटपांडे काका

"काय कराव बॉ या ल्वॉकान्ला. आमाच्या हिकडं येऊन आमच्याबद्दल आसं दाकवतात आन वर परत आवार्ड बी घ्येतात. फुडच्या येळी या म्हनावं, हानतो एकेकाला. पार ग्वॉतच टाकतो, त्या प्वॉरासारकं"

धनंजय

"एखाद्या कलाकृतीला नीट समजून घेणे गरजेचे आहे. तो चित्रपट असाच का बनला? त्या कथेत अजून काही योग्य बदल करता येतील का? नायकाच्या आयुष्यातल्या सर्वच घटनांचा त्याच्या उत्तरांवर किती खोल परिणाम झाला आहे हे नीट अभ्यासणे खरंच मनोरंजक ठरावे. मला या विषयावर अजून जाणून घ्यायला आवडेल."

आणि 'लास्ट बट नॉट लीस्ट' 'वन अँड ओन्ली'
श्री१००८ संत तात्याबा

"अरे काय हे कौतुक स्लमडॉगचे!!! छे: अगदी लोटांगण घातले पार यांच्या समोर भ**नी... कोण कुठला गोरा येतो आणि काही पण दाखवतो. खरं तर यांना फाट्यावर मारून नेऊन घातलं पाहिजे तिकडे ***च्या **त. बा **ला तिच्या*ला."

अवांतरः माण्णिय व्यक्ति ह. घेतीलच.

बिपिन कार्यकर्ते

शितल's picture

25 Feb 2009 - 11:03 pm | शितल

बिपीनदा,
=))
=))

चतुरंग's picture

25 Feb 2009 - 11:25 pm | चतुरंग

बिपिनभौ एकदम जोरदार प्रतिसाद आहेत.
आमचेही चार आणे घ्या -

पिवळा डांबीस
हे असले गलिच्छ झोपडपट्टया आणि संडासची दृश्ये दाखवणारे चित्रपट बनतात आणि त्यांना ऑस्करही मिळते हे बघितले की माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते!!
इथे यक्षनगरीत नसतात असले आचरट प्रकार. सगळे रस्ते कसे झाडले आणि धुतले जातात वरचेवर. टॅक्सपेअर्सच्या पैशांचा मोबदला असा मिळालेला बघून ऊर भरून येतो माझा!!!

बिपिन कार्यकर्ते
काही वर्षांपूर्वी आमच्या मूळ गावी गेलो होतो तिथल्या गल्लीबोळांची आठवण झाली स्लमडॉग बघताना. अगदी सगळं कसं ओळखीचं वाटत होतं. असं सगळ्यांनाच नेहेमी वाटतं का? का मलाच फक्त तसं वाटलं?
शोधतोय उत्तरं ह्या प्रश्नांची पण तोवर मनात आलेले विचार..
(क्रमशः)

श्रीकृष्ण सामंत
स्लमडॉगमधली ती मुख्य व्यक्तिरेखा बघताना मला शिरोड्याला मागे गेलो असताना भिकू म्हापसेकर भेटलेला आठवला. त्याच्याशी अगदी साम्य होतं असं वाटतं मला. काल संध्याकाळी तळ्याकाठी आमच्या अड्ड्यावर बसलेलो असताना मी म्हणालो देखील प्रो. दीक्षितांना. तसे मोठ्यानं हसून ते म्हणतात की अरे श्रीकृष्ण अशी माणसं इथूनतिथून सगळीकडेच दिसणार त्यात एवढं वावगं वाटण्यासारखं काय आहे? त्यांच्या त्या वाक्यावर विचार करता करता माझा डोळा कसा लागला समजलं नाही.

(सर्वांनी मान्यवर हलके घेतीलच!! ;) )

(खुद के साथ बातां : खातंय आता मार रंग्या! तुला खाजच फार!! :T )

चतुरंग

प्राजु's picture

25 Feb 2009 - 11:27 pm | प्राजु

डब्बल बार आहे हं.. रंगाभाऊ तुमचा. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

26 Feb 2009 - 7:15 am | शितल

चतुरंगजी,
फुल टु धम्माल चालु आहे..
=))

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Feb 2009 - 11:50 pm | llपुण्याचे पेशवेll

यीह्याह्याह्याहाहाहाहा..
बिपीनशेठ आणि चतुरंगशेठ एकदम झक्कास .
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

भडकमकर मास्तर's picture

25 Feb 2009 - 11:53 pm | भडकमकर मास्तर

बिपिनदा आणि रंगराव.... मस्तच...
=)) =))
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्रकाश घाटपांडे's picture

26 Feb 2009 - 10:03 am | प्रकाश घाटपांडे

=))
लईच हास्ल कि मंग रडायची बारी येतीय म्हनुन भ्या वाटतं. लईच दाताड निघालय आमच तव्हा दाढे दाक्तर ला भेट द्यावी लाग्नार असे दिसतय.

प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

गणपा's picture

26 Feb 2009 - 1:58 pm | गणपा

बिपीन भौ सुसाट,
डान्या ची गाडी तर सुपरफास्ट..
लहे रहो लेको...

घाटावरचे भट's picture

25 Feb 2009 - 11:03 pm | घाटावरचे भट

डाण्या आणि बि३का सुटलेत....लै भारी...

प्राजु's picture

25 Feb 2009 - 11:03 pm | प्राजु

बिपिनदा......... जय हो!

=)) =)) =))
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आनंदयात्री's picture

25 Feb 2009 - 11:39 pm | आनंदयात्री

जय हो बिपिन जय हो रंगा !!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Feb 2009 - 9:58 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि जय हो डान्यासुद्धा!
=))

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

यशोधरा's picture

25 Feb 2009 - 11:55 pm | यशोधरा

=))

विसोबा खेचर's picture

26 Feb 2009 - 12:06 am | विसोबा खेचर

रंगाकाका आणि बिपिनभावजींचे डब्बलबार आवडले! :)

छ्या! आणि म्हणे ऑस्कर मिळाला! लागले सगळे नाचायला..!

आपला,
तात्या बर्वा, रत्नांग्री.

--

कुणाचं बरं झाल्याचं सुख नाही की वाईट झाल्याचं दु;ख नाही. आयुष्याची सारवट गाडी वंगण नाही म्हणून कधी अडली नाही आणि आहे म्हणून जोराने धावली नाही! चाल मात्र सदा नागमोडी. कोकणी वाटेसारखी! (अंतुबर्वा - पुलं)

शंकरराव's picture

26 Feb 2009 - 3:17 am | शंकरराव

डान्या बिप रंगा

कडी वर कडी लै भारी

शंकरराव
एखाद्याचे देवत्व मान्य करणे हे स्वतःच्या चूका दिसण्या ईतके अवघड काम आहे, चूका दिसल्या की स्वतःला त्रास होतो.
त्यात अजून स्वतःचे "पिल्लू" सोडून पळणे ही तर अजूनच मजेशीर गोष्ट. असो ;-)

पिवळा डांबिस's picture

26 Feb 2009 - 3:53 am | पिवळा डांबिस

मस्त रे, मस्तच!!!!
पण इथल्या महिलामंडळाकडे दुर्लक्ष झालं की तुमचं!!!!
हे घ्या.....

३-१४ (किंवा जो आकडा सध्या लागला असेल तो!!) अदिती:
आमचा सगळा वेळ पृथ्वीच्या बाहेर निरिक्षण करण्यात जात असल्याने पृथ्वीवरील स्लम आणि त्यातले डॉग वगैरे आम्ही पहात नाही. आणि जरी पाहिले तरी आमच्या निरिक्षणाची कोणतीही वॉरंटी नाही....

प्राजु:
अय्या, अगदीच सोपा दिसतोय की पहायला हा पिच्चर!
मी अजून तरी पाहिला नाही पण नक्कीच पाहून बघीन.
तोवर ही हळदीची शिक्रण खा...

यशोधरा:
(विषय दिलेला नाही)
=))

मृगनयनी:
"पिच्चर अनिल कपूर करणार | झोपडपट्टी मूळ आधार ||
मी बघेन नायतर नाय बघेन | तुम्ही कोण मला विचारणार?"

नीधपः
पिच्चर ठीक आहे पण आम्ही युजीए मध्ये असंच नाटक केलं होतं त्यात सगळ्या पुरुषांनी स्कर्ट आणि बायकांनी विजारी घातल्या होत्या. एकदम इफेक्टीव झालं होतं. खरं वाटत नसेल तर सिनियर डॉगला विचारा....

स्वाती दिनेशः
ह्या! असल्या स्लमडॉग पेक्षा मी करपवलेले हॉटडॉग कितीतरी छान असतात.....

और सबसे आखरी पायदानपर....
वन ऍन्ड ओन्ली....

प्रियाली:
हॅ! असले पिच्चर इसवीसनपूर्व दहाव्या दशकात चालायचे! यापेक्षा त्या पिच्चरमधल्या हिरॉईनचं भूत बनवून प्रेक्षकांना झपाटलं असतं तर आणखी मजा आली असती....

(सगळ्या बायांना "ह. घ्या!" ही कळकळीची विनंती!!!!)
:)

प्राजु's picture

26 Feb 2009 - 3:55 am | प्राजु

बाप नंबरी, बेटा दस नंबरी और दादा सौ नंबरी असं झालं... :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

छोटा डॉन's picture

26 Feb 2009 - 7:10 am | छोटा डॉन

लै लै लै बेक्कार शॉट्ट ...
सकाळी सकाळी मिपा उघडले आणि असे जे हसु फुटले की बाकीचे मित्र एकदम घाबरुन उठले व ह्याला काय झालं असं पहायला लागले ...

बेक्कार टोलेबाजी बॉ ...
बिपीनदा, रंगाशेठ आणि डांबिसकाका लै लै लै भारी टोलेबाजी ...
हसुन हसुन मेलो, हा धागा अक्षरशः क्लास आहे ...

अवांतर :
थोड्याच वेळात "महाराष्ट्रातल्या निवडक वॄत्तपत्रांच्या संपादकंच्या "प्रतिक्रीया घेऊन येत आहे. ;)
शो मस्ट गो ऑन ...!!!

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

पिवळा डांबिस's picture

26 Feb 2009 - 8:58 am | पिवळा डांबिस

थोड्याच वेळात "महाराष्ट्रातल्या निवडक वॄत्तपत्रांच्या संपादकंच्या "प्रतिक्रीया घेऊन येत आहे.
हू केअर्स?
मिपावरच्या संपादकांच्या प्रतिक्रिया घेऊन छापा....................
द शो मस्ट गो ऑन........................
:)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Feb 2009 - 10:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पिडाकाका,

साष्टांग नमस्कार! _/\_ =))

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

शंकरराव's picture

26 Feb 2009 - 3:30 pm | शंकरराव

पिडांकाका,
द शो मस्ट गो ऑन........................ लै भारी
अजुन येउद्यात ..

शंकरराव
एखाद्याचे देवत्व मान्य करणे हे स्वतःच्या चूका दिसण्या ईतके अवघड काम आहे, चूका दिसल्या की स्वतःला त्रास होतो.
त्यात अजून स्वतःचे "पिल्लू" सोडून पळणे ही तर अजूनच मजेशीर गोष्ट. असो ;-)

चतुरंग's picture

26 Feb 2009 - 11:13 pm | चतुरंग

लई म्हणजे लईच्च जबराट हाणलेत हो पिडाकाका!!! एका हातात सुवर्णपेयाचा चषक घेऊन फटकेबाजी झालेली आहे ह्यात शंका नाही!!! ;)
अगदी विवियन रीचर्डस सारखी घणाघाती टोलेबाजी आहे ही! =)) =)) =))

चतुरंग

मुक्तसुनीत's picture

26 Feb 2009 - 4:36 am | मुक्तसुनीत

बाबौ !
हा भयभीषण हास्यस्फोटक धागा मी आताच पाहिला. सॉरी मंडळी सध्या वेळेच्या उपलब्धीच्या बाबतीत परिस्थिती अमेरिकेच्या बाजारासारखी गंभीर आहे ! त्यामुळे हे असले हास्यकल्लोळ फार उशीरा वाचायला मिळत आहेत. वाक्यावाक्याला हसत होतो. पोरांनी कमाल केल्येय !

डॉन , बिपिन , रंगा , पिडा ..... शिसानविवि !! ;-)

- "मुसु"मुसुलेला =))

अनिल हटेला's picture

26 Feb 2009 - 9:40 am | अनिल हटेला

डॉन , बिपिन , रंगा , पिडा ..... शिसानविवि !!

असाच म्हणताव !!! =))

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

धमाल मुलगा's picture

26 Feb 2009 - 11:43 am | धमाल मुलगा

=)) =)) =))

नुसते धमाके उडवून दिले आहेत मंडळींनी!

_/\_ कोपरापासून नमस्कार रे तुम्हाला :)

एक तो डान्या आधीच काय कशामुळे चेकाळलाय कोण जाणे. त्यात बिपीनदा फुल्ल फॉर्मात बॅटिंग करतोय...यॉर्कर्स आणि दुसरा टाकायला रंगाशेठ फुल्ल तयारीत...अन् ते काय कमी म्हणुन डांबिसकाकांनी ज ह ब ह र्‍या षटकार ठोकलेला....
अरे संपलो रे....
हसुन हसुन पोट दुखायला लागलं राव!

ह्म्म :? डान्या, आधी खिचडीचं थालिपीठ, आता हा लेख; लेका मोक्काट सुटलायस की :)
(स्वगतः ह्याचा मेल्,चॅट्,खरड्,व्यनि ह्यातून आभासी पाठलाग करणारी मैत्रिण पिच्छा सोडून शांत झालेली दिसत्ये ;) )

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::