पाकिस्तानी सैन्य भारतीय सीमेवर.

बबलु's picture
बबलु in जनातलं, मनातलं
30 Nov 2008 - 1:19 pm

आत्ताच आलेली म.टा. च्या संस्थळावरील मुख्यपृष्ठावरील बातमी...

अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेले एक लाख सैन्य हलवून ते भारताच्या सीमाभागाजवळ तैनात करणे आवश्यक असल्याचे पाकिस्तानने नाटो आणि अमेरिकन लष्कराला कळवले आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3775546.cms

धोरणवावरसमाजजीवनमानतंत्रराहणीअर्थकारणराजकारणप्रकटनविचारसंदर्भप्रतिसादमाहिती

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

30 Nov 2008 - 1:24 pm | मदनबाण

बघा हे पाकडे स्वसंरक्षणासाठी किती तत्पर आहेत ते !!!!!
हिंदुस्तान फक्त चर्चा करत राहणार !!!

मदनबाण.....

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

स्वप्निल..'s picture

30 Nov 2008 - 1:34 pm | स्वप्निल..

अहो आपण सुरुवात केली ना...सर्व राजकीय पक्षांनी राजकारण करायला सुरुवात केलीय..एक दुसरयावर आरोप प्रत्यारोप होतायेत..जेव्हा साले हे पाकडे भारतात घुसतील तेव्हा कुठे कदाचित आपल्या राजकारण्यांचे डोळे उघडतील .. नाहीतर आपली सामान्य जनता आहेच मरायला आणि बहादुर सैनिक आहेतच लढायला..

स्वप्निल

बबलु's picture

30 Nov 2008 - 1:32 pm | बबलु

अरे,, त्यांना कितिही सैन्य आणूदे.... आपले जवान पुरुन उरतील. आपली आर्मी/नेव्ही/एअरफोर्स चिंधड्या उडवतील त्यांच्या.... ..............

..................पण.......................

आपल्या "माननीय" नेतृत्वाने निर्णय तर घ्यायला हवा.... त्याचं काय ?

पांथस्थ's picture

30 Nov 2008 - 1:49 pm | पांथस्थ

सहमत. आहे आपल्याकडे भवानी तलवार. एक घावात शत्रुला यमसदनी धाडेल / नेस्तोनाबुत करेल अशी. अरे, पण वेळेत म्यानातुन काढाल तर ना??

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...

स्वप्निल..'s picture

30 Nov 2008 - 2:00 pm | स्वप्निल..

वर सांगताय की भारतानी सुद्धा सीमेवर लष्करी हालचाल सुरु केली आहे म्हणुन..

स्वप्निल

बबलु's picture

30 Nov 2008 - 2:04 pm | बबलु

आय बी एन लोकमत वर सांगताय की भारतानी सुद्धा सीमेवर लष्करी हालचाल सुरु केली आहे म्हणुन

आनंद... चला कुठेतरी आशेचा एक किरण दिसतोय तर..

....बबलु

बबलु's picture

30 Nov 2008 - 2:15 pm | बबलु

आता चिदंबरम आणि मंडळी काय करतात ते बघू.

विनायक प्रभू's picture

1 Dec 2008 - 1:16 pm | विनायक प्रभू

चिदंबरम काही करणार आहे ह्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे हे बघुन आनंद झाला.

भडकमकर मास्तर's picture

30 Nov 2008 - 3:19 pm | भडकमकर मास्तर

पाकिस्तानची पश्चिम सरहद्द मोकळी करण्याचा पाकिस्तानी आतिरेक्यांचा डाव यशस्वी होतोय तर....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

ऋषिकेश's picture

30 Nov 2008 - 3:43 pm | ऋषिकेश

अरे हो की!!
मास्तर तुमच्या तर्कशुद्धतेला __/\__

काय डाव खेळला साल्यांनी.. भारत कसाहि वागला तरी ते त्यांना हवेच आहे. बुद्धीबळात काहिहि करून समोरच्याला हवी ती चाल करायला भाग पाडण्यासारखं आहे हे! :(

-(गोंधळलेला) ऋषिकेश

अनामिका's picture

30 Nov 2008 - 5:59 pm | अनामिका

खरच मास्तर हा angle लक्षातच आला नाही :?

"अनामिका"

संजय अभ्यंकर's picture

30 Nov 2008 - 7:14 pm | संजय अभ्यंकर

हा पाकिस्तानी सैन्यदलाचा केवळ एक डाव आहे .
ह्या निमिताने सीमेवर गंभीर परिस्थीती निर्माण केल्याचे भासवायचे.

लोकनियुक्त सरकार पाकिस्तानात आले की, त्यांच्या सैन्यदलांना आवडत नाही.
त्या सरकारला अडचणीत आणण्यासाठी पाकि सैन्यदल मग उचापती सूरू करते.

मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला किंवा सीमेवर सैन्याची जमवाजमव हे त्या उचापतींचेच भाग आहेत.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

प्राजु's picture

1 Dec 2008 - 5:55 am | प्राजु

हे युद्ध होऊदेच आता. खूप झालं.
पाकची हालचाल ही अपेक्षितच होती... आता भारतानेही निर्णायक खेळी खेळावी. देवा.. आमच्या सोकॉल्ड नेतृत्वाला सद् बुद्धी दे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

निखिलचं शाईपेन's picture

1 Dec 2008 - 1:05 pm | निखिलचं शाईपेन

मित्रांनो ...
पाकीस्तान फारच ..डिप्लोमॅटिक .. वागायला लागलाय ..
ठिकाय मग ..

पाकीस्तान (अमेरीकेस): भारताने आमच्यावर अणूबाँब टाकला.
भारत : ऊप्स ... चान्द्र्यान पडलं वाटतं ... सॉरी .. नो ओफेंस ...

तांबडा पांढरा's picture

1 Dec 2008 - 1:33 pm | तांबडा पांढरा

भारताच्या लोकसंख्येचा योग्य वापर करण्याचि हिच वेळ हाय --
परतेकान फकस्त एकदा बारडर वर जाउन

मुतल

तरि बास हाय
मस्त आलिया पाकिस्तानला जिरवायला पाहीजे