"मिपावर का लिहायचे ? न लिहिल्यास अज्ञानातून (आप्लयालाच काय) इतरांनाही आपले अज्ञान कळत नाही."
"इतरांच्या धाग्यातून आणि प्रतिसादातून शिकण्यासाठी तरी आपण धागे का वाचावेत! त्या जिलब्या आपण करून पाहू नये यासाठी!"
"पण मला स्वत:च्या जिलबीतून दाखवायचे आहे. हे जग मोठी कढई आहे. जिलब्या टाकत टाक्त राहणे मला आवडते! माझे स्वत:चे पाकज्ञान मी निर्माण करणार! चकलीच्या जिलबीतून!"
"मान्य आहे. अरे पण, जेवणातल्या सगळ्याच गोष्टी स्वत:च्या हातानी करून करून त्यातील पाकज्ञान कळेपर्यंत आपले वय पण वाढत जाते.(नेमकी शिंची अक्कल तेव्हढीच राहते ) समजा तुला जेवणातून खाता खाता एखादी चव समजली पण तोपर्यंत त्या चवीचा अर्थ लावण्याच्र्र उमज आणि समज निघून गेली असेल तर? आणि तुझ्या जेवणातून आणि जिलबीतून तू जो उपकारक शोध काढला तो जसाच्या तसा जर का या आधीच कुणी महान जिलबीवाल्याने व्यवस्थित धागारूपात टंकून ठेवलेला असेल तर? तेवढा आपला वेळ नाही का वाचणार? एखादी जिलबी होण्यापूर्वीच आपण ती टाळू शकणार!"
"पण जिलबीवाल्याची आणि आपली पार्श्वउर्मी, आजूबाजूची तारस्थिती वेगळी असते. जिलबीवाल्याचे सगळे घाणे तसेच आपल्याला कसे करता येतील? सांग बरे?"
"अरे! सगळे घाणे नाही करता येणार पण काही टक्के तर नक्कीच होईल! जिलबीवाल्याकडून आपल्याला प्रेरणा मिळते. शेवटी, जिलबीवाला हाही एक आपल्यासारखाच माणूसच असतो ना! त्याच्या कढई आणि पाकाच्या अवस्था- उदाहरण पाक अवस्था कडक, कच्चा, एकतारी, सपक, अगोड, ग्गोगोड, नापाकपण वगैरे या आपल्या सारख्याच असतात की! सगळ्या जिलबीवाल्याच्या जिलब्या शेवटी सारख्याच! त्यासंदर्भातील त्याचे अनुभव बऱ्याच प्रमाणात सगळ्या जिलबीवाल्याना लागू होणार नाहीत का? जिलबीवाला वाचक थोडेच असतो? लेखनकंडूच असतो. आपल्यासारखाच! आलं का लक्षात? आणि जिलबीतून विकारांना चालना मिळते, आपण विशिष्ट प्रकारच्या संकुथित विकारांतून बाहेर पडून नवनवीन विकार विस्तारायला शिकतो! आपल्या विकार कक्षा रुंदावतात!
"तुझ्या म्हणण्यात तथ्य आहे असं वाटतंय बरं का!"
"आहे ना! चल मग कोणती जिलबी टाकणार उद्यापासून?"
- निमित्त शोध्णार (एक जिलबी प्रेमी आणि पाकज्ञान समर्थक!
प्रतिक्रिया
31 Mar 2016 - 4:29 pm | DEADPOOL
मस्त जिलबी टाकलीय!
मी पयला
31 Mar 2016 - 4:31 pm | टवाळ कार्टा
खत्रा
=))
मी पयला
31 Mar 2016 - 7:02 pm | DEADPOOL
टकाशेठ मी पयला हाय!!!!!!
31 Mar 2016 - 4:51 pm | अमृता_जोशी
एक नंबर! :-D
31 Mar 2016 - 4:59 pm | पक्षी
खिक्क
31 Mar 2016 - 6:33 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
गोग्गोड खवचट जिलबी
31 Mar 2016 - 6:57 pm | पैसा
:)
31 Mar 2016 - 11:01 pm | प्रचेतस
कसं काय सुचतं ओ तुम्हाला?
1 Apr 2016 - 8:49 am | अत्रुप्त आत्मा
@"पण जिलबीवाल्याची आणि आपली पार्श्वउर्मी,
आजूबाजूची तारस्थिती वेगळी असते. जिलबीवाल्याचे सगळे घाणे तसेच आपल्याला कसे करता येतील? सांग बरे?" >> जब्बरदस्त हाणली आहे!
1 Apr 2016 - 6:18 pm | नूतन सावंत
:)
1 Apr 2016 - 7:00 pm | होबासराव
निमित्त शोध्णार (एक जिलबी प्रेमी आणि पाकज्ञान समर्थक!
हसुन हसुन पुरेवाट झालिय....