एक डेअरीचा व्यवसाय नीट सुरु असतानाही मी डेअरीच्या ठिकाणीच पान सुपारीचा ठेला स्थापित केला होता. (झक मारलीन ठेला सुरु केला असं झालंय, कारण पैसे देऊनही ठेल्याचं अधिकृत लायसन्स मिळू शकत नाहीय )
त्यात धंद्याच्या जागेत पार्टिशन वगैरे भानगडी आल्याच. बरेच महिने दोन्ही व्यवसाय व्यवस्थित चालू होते. पण गेल्या काही दिवसात ठेल्यावरच्या गांज्याने गोंधळ झाला , आणि त्यानंतर लगेच दुसर्या दिवशी धाड पड्ल्यानं ठेला आणि डेअरी पण बंद करावी लागली.
आम्ही काय करावं? आम्ही चांगला एक माननीय (पक्षी एजन्ट, चांगली भरभक्कम दक्षिणा देऊन हेवेसांनल) शोधला आणि मनपा नि पोलिस ठेसनासमोर अनुष्टाणाला बसवला. गेले आठ दिवस त्याचं हे अनुष्ठाण चालूच आहे पण त्याला ना बन्द झालेल्या ठेल्याला जीवंत करता येत आहे, ना आमच्या डेअरी व्यवसायाला.
धंदा गांज्याचा असल्याने ठेल्यामध्ये कोणतीच वस्तू ( पक्षी: तंबाखू, पान, चुना वगैरे) या क्षणी स्थापित होऊ शकत नाहिये असं तो डेअरी/ठेला पुनरुज्जीवन अनुष्टाणादरम्यान म्हणाला, वरुन 'बहोत खर्चा करना पडेगा' वगैरेही कुजबुजला आणि मलाही त्यानं या डेअरी/ठेला पुनरुज्जीवन अनुष्ठाणात ओढ्लं आहे, म्हणून हे यज्ञकुंड पेटवलं आहे. जेणेकरुन सध्याची व्यवसायहीन आणि उत्पन्नहीन अवस्था दूर व्हावी आणि लवकरात लवकर पूर्ववत डेअरीचा तरी धंदा नीट करता यावा.
गांजाचा धंदा वापरणार्या कुणाच्या मागे पूर्वी असले शुक्लकाष्ट लागले होते काय? असेल तर काय उपाय करुन ठेला पुनर्जीवित केला हे कृपया सांगावे.
१. हा माननीय भाडया आपलं पैसे देऊन असल्यानं भाडोत्री आहे.
२. डेअरी च्या लायसन्सचं दुखणंबहाणं अन्न औषध प्रशासनाकडनं होऊ शकतं, पण त्यासाठी बरंच लांबवर जाणे आले.
तर कृपया सांगा ह्या दुखण्यावर काय उपाय करता येईल?
दुसरे,
१. डेअरी बरोबरच यापुढे पार्टिशन करुन हुक्का पार्लर स्थापन करावे की न करावे?
प्रतिक्रिया
17 Apr 2012 - 4:28 pm | यकु
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
पार बाजार उठवलास रेऽऽ !!!
बुकणाच!!
17 Apr 2012 - 4:31 pm | कुंदन
इतर मोकळ्या वेळात MS-CIT , CET अन झालेच तर नेट्-सेट क्लासेस पण चालवा
17 Apr 2012 - 5:38 pm | प्रचेतस
टकमकावरून उतरताना घाबरलात ना, म्हणून. आता प्रायश्चित्त म्हणून माळ घालून तिथून व्यवस्थित उतरून दाखवा आणि ते ठेला आणि गांजाचे फ्याड बंद करा. मग बघा तुमची डेअरी कशी जोरात चालतेय ते.
(ह्या हल्लीच्या पोरांची व्यवसायावर निष्ठाच नाय!!!)
17 Apr 2012 - 8:37 pm | पैसा
आणि दोन दोन धंदे हवेत कशाला? :D
18 Apr 2012 - 7:49 am | ५० फक्त
बाजार उठवण्याच्या नादात बाजार उघडुन बसणे म्हणजे हे असे.
असो,
उरलेला गांजा अन दुधं दोन्ही घेउन थंडाई करुन विका काही दिवस, उन्हाळ्यात चांगली असते तब्येतीला.