वो तो है अलबेला । हजारों में अकेला ।।
सदा तुमने ऐब देखा हुनर तो न देखा।
हिऱ्याला पत्थर समजून दुर्लक्ष केले। ... बांसरीला लाकडाची पुंगळी समजून विर्भत्सले। ... ज्योतीला न पहाता वातीला पाहून हिणवले। ...
गायकाच्या सुरेल तानेला - वा वाह तर म्हणाल,... नृत्याच्या लचकदार आदाकारीला ठेका तरी धराल,... जीवघेण्या कसरतीला टाळी तर द्याल,.. चित्रातील रंगसंगतीला डोळ्यात तरी साठवाल...
नाडी ग्रंथांवरील महर्षींच्या लेखनकार्याची अनुभूती न घेता वाहिलेले प्रतिसाद पाहून पाहून हैयोंहैयैयोंना वाटणारी खंत वरील शब्दातील नाजुक भावनेतून व्यक्त झालेली जाणवले. म्हणून हा धागा.
प्रतिक्रिया
5 Dec 2010 - 11:37 am | अवलिया
जाउ द्या हो ओक साहेब... दुर्लक्ष करा !
हल्ली हिंदू, भारतीय, संस्कृती, धर्म, पौर्वात्य ज्ञान याकडे पुर्वग्रहदुषित मनोवृत्तीने पाहुन त्यावर थुंकण्याची फॅशन विचारवंतांमधे आहे. संत एकनाथांना सुद्धा अशा प्रकारे थुंकुन अपमानित करण्यात आले होते. ज्याने केले त्याला जग विसरले. एकनाथ अजुनही कार्यरुपाने जिवंत आहेत. आपण आपले कार्य करत रहावे. परमेश्वर आपल्या पाठीशी आहे.
5 Dec 2010 - 12:47 pm | अप्पा जोगळेकर
विर्भत्सले
निर्भत्सले असे म्हणायचे आहे का?
हल्ली हिंदू, भारतीय, संस्कृती, धर्म, पौर्वात्य ज्ञान याकडे पुर्वग्रहदुषित मनोवृत्तीने पाहुन त्यावर थुंकण्याची फॅशन विचारवंतांमधे आहे.
काही संदर्भ द्यावा.
5 Dec 2010 - 12:54 pm | शशिकांत ओक
सदा तुमने ऐब देखा