वर्तूळ - एक अनुभव

Primary tabs

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
23 Nov 2010 - 9:23 pm

आपण एखाद्या चित्रपटाने आनंदी होतो किंवा अस्वस्थ होतो. तसं झालं तर आपण म्हणतो “अरे हा चित्रपट मस्त होता हं” अर्थात चित्रपट चांगला असायची ही एकच परीक्षा आहे असं म्हणता येत नाही. उदाहरण द्यायचे म्हणजे इराणी चित्रपट. विशेषत: लहान मुलांवरचे. त्यात काही खास अशी गोष्ट नसते, तरीही पण आपण तो चित्रपट बघितल्यावर काहीतरी वेगळा अनुभव घेतला आहे असे आपल्याला सारखे वाटत रहाते. मला तर सारखे असे वाटायचे की असे चित्रपट आपल्या इथे का नाही निघत ?

आमचा एक नऊ मित्रांचा ग्रूप आहे. त्यात मला स्वत:ला सिनेमा, नाटक, पुस्तके याचे आतोनात वेड. मित्रांना चांगल्या चांगल्या सिनेमाच्या गोष्टी रंगवून सांगायची मला दांडगी हौस. बाकीच्यांनी ते चित्रपट बघायची इच्छा प्रदर्शित  केल्यावर पाहिला सिनेमा मी दाखवला माझ्या आवडत्या दिग्दर्शकाचा “ अकिरा कुरोसावाचा”  देरसू उझाला” याचे परीक्षण मी येथे केलेलेच आहे. हा बघितला आम्ही लॅपटॉपवर. त्याच रात्री निर्णय झाला की एक प्रोजेक्टर, पडदा, साऊंड सिस्टीम घ्यायची. लगेच पैसे गोळा करून आठवड्याच्या आत सगळे साहित्य आणले देखील. त्यानंतर दर आठवड्याला चांगले चांगले सिनेमे दाखवायचा प्रयत्न केला.

अशाच एका प्रयत्नात एक चांगला चित्रपट हाती लागला. तुम्ही हा चित्रपट पाहिला असण्याची शक्यता फार कमी आहे कारण ही चित्रफीत आहे फक्त वीस मिनिटांची त्यामुळे चित्रपटगृहात लागणे शक्यच नव्हते. (ज्यांनी पहिला असेल त्यांच्यासाठी हे वाक्य नाही ) नशिबाने विलासबरोबर या चमूतील दोघेजण मार्शलमधे नोकरीला होते त्यामुळे गाठ पडल्यावर तुम्ही आता काय करता, आम्ही काय करतो, असल्या चौकशांमधून ही चित्रफीत हाती लागली.


ही गोष्ट आहे एका लहान मुलाची व त्याच्या भोवतालच्या वर्तुळाची. आता मी काही याची गोष्ट सांगत नाही कारण मग तुम्ही ती चित्रफीत बघणार नाही. पण एक सांगतो आपण केलेली चूक कबूल करण्याने प्रश्न किती सोपे होतात हे या वीस मिनिटात चांगलेच समजते. आणि वर्तुळं तरी किती प्रकारची असतात माणसाभोवती ! एखाद्या स्त्रीच्या कपाळावर कुंकवाचं वर्तुळ नसलं की काय होते हे आपण बघतोच. त्या मुलाच्या हातातील टायर ज्याने तो चक्कारी खेळत असतो ते मला वाटले करमणुकीचे वर्तुळ. मधेच एका ड्बड्यातील सिनेमाच्या गोल खिडकीला त्याचा मित्र डोळे लावतो, ते त्याचे त्या लहानशा गावातून जगाकडे बघायचे वर्तुळच असते जणू. नंतर दिसते ती त्याची आणि सायकलची शर्यत. त्यात सायकलची पायडलने जोरात फिरणारी दोन चाके ही मला ताकदीची वर्तुळं वाटली. दगडाने पैसे उडवायच्या खेळात जे मातीत वर्तुळ काढतात ते मोहाचे वर्तुळ आणि त्या चिमुकल्या हातातील ते रुपायाचे वर्तुळ ? ते तर सगळ्यात महत्वाचे. या सगळ्या वर्तुळातून एक संदेश जातो आणि सरळपणे आणि साधेपणाने. आडवळणाने काहीच नाही. फारच ताकदीने हा चित्रपट आपल्याला त्या छोट्याशा गावातील एकमेव वर्तुळाकार रस्त्यावर खिळवून ठेवतो. पैसे उडवायच्या खेळात भाग घ्यायच्या अगोदर त्या मुलाच्या हातातून ते टायर निसटून पडते तो सीन निव्वळ अफलातून. खरंच सांगतो त्या वीस मिनिटांनंतर आम्ही सगळ्यांनी उभे राहून त्या सर्व कलाकारांना मानवंदना दिली. फारच छान अनुभव होता तो.

मला तर वाटते हा सिनेमा सर्व शाळातून दाखवला पाहिजे, विशेषत: खेडेगावातून.


संतोष राम नावाच्या एका कलाकाराने उदगीरसारख्या छोट्या गावातून पुण्याला येऊन हा छोटा चित्रपट केला हे खरोखरंच कौतुकास्पद आहे. त्याच्याशी बोलताना त्याने हे करताना काय काय कष्ट काढले हे कळते पण त्या बद्दलही लिहायला नको, कारण त्याने कष्ट काढले म्हणून हा चित्रपट चांगला म्हणायला पाहिजे असे नाही. असो. पण त्याच्या या पहिल्याच प्रयत्नाची दखल खालील महोत्सवात घेतली गेली आहे यावरून आपण निश्चितच म्हणू शकतो की आहे याच्यात काहीतरी वेगळे आहे. ही बघा त्याची यादी..

Prizes and Awards won
Fourth International Short Film Festival of India 2010, Chennai (India).
Nomination
Mahrashtra Times Awards 2010

Film Festival selection –
2ND Nashik  International  Film  Festival  2009 , Nashik (India).
Third  Eye  8TH Asian  Film Festival  2009 , Mumbai (India).
11TH Osian’s  Cinefan  Film Festival 2009 , New Delhi (India).
7TH Kalpanirjhar  International  Short  Fiction Film  Festival ,Kolkata (India ).
8th Pune International Film Festival 2010 ,Pune (India).
2ND Jaipur International Film Festival 2010 ,Jaipur (India).
9th International Social Communication Cinema Conference 2010 , Kolkata,(India).
The Fourth  National  Short And Documentary  Film  Festival  2010,Karimnagar A.P.
ViBGYOR International Film Festival 2010 , Thrissur ,Kerla (India).
Kala Ghoda Arts Film  Festival 2010 ,Mumbai (India).
Fourth International Short Film Festival of India 2010, Chennai (India).
2nd CMS International Children’s Film Festival (6-12 April ‘2010), Lucknow, (India).
3rd International Documentary and Short Film Festival Of Kerala, 2010 (India).2nd Thendhisai International Short Film Festival of Madurai 2010 ,Tamilnadu ( India)
Third  Eye  2nd Asian  Film Festival  2010 , Kolhapur (India).

सर्व कलाकारांनी कामे अविस्मरणीय केली आहेत. विशेष म्हणजे बालकराकारांनी.
चिन्मय पटवर्धन, अजिंक्य भिसे, कालियन गाडगीळ, आकाश गिरी, चेतन मोरे या सर्वांचे कौतुक केलेच पाहिजे.

बघायची आहे का आपल्याला ही चित्रफित ? बघायची असेल तर श्री. संतोष राम यांनाच लिहा ना ! त्यांचा इ-मेल आहे.... santoshram1@gmail.com आणि फोन नं आहे ९८२२८२७२७७

मित्रांनो ही चित्रफित जरूर पहा आणि त्यांना लिहा.
अशा कलाकारांना आपण दाद देणार नाही, तर कोण देणार ?

जयंत कुलकर्णी.
हे सर्व मी हा चित्रपट आवडला आहे म्हणून लिहीले आहे. ही त्या सिनेमाची जहिरात नाही. पण तो दोष पत्करूनही मी म्हणेन " बघा हा चित्रपट, जरूर बघा"

कलाकथाचित्रपटछायाचित्रणलेखमतअभिनंदनशिफारसअनुभवमाहितीआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

यकु's picture

23 Nov 2010 - 9:39 pm | यकु

चित्रफित पाहाण्याआधीच सर्व कलाकारांचे आणि श्री. संतोष राम यांचे अभिनंदन.
आणि लोकांना चित्रफित दाखण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल तुमचेही अभिनंदन.

मलाही असाच नाद आहे लोकांना कॉम्प्युटरवर काहीतरी, विशेषत: हॉलीवूडचे चित्रपट दाखवत राहाण्याचा.
ब्लड डायमंड, दि किंगडम, हॉटेल रवांडा (हा पाहिल्यावर उगाच बिअर पिऊन आलो होतो) मर्डर बाय डेथ असला एखाद दुसरा चांगला पिक्चर शोधायला सहा-सहा चित्रपटांच्या डीव्हीडी आणा! वेस्टेज डीव्हीडी साठ्वा!
या डीव्हीडींचं काय करायचं त्याचा क्ल्यू द्या हो कुणीतरी - दोन्/अडीचशे डीव्हीडी पडून आहेत.

अनामिक's picture

23 Nov 2010 - 9:47 pm | अनामिक

लघूपट बघण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेच म्हणते..
हा लघुपट बघायची उत्सुकता निर्माण झाली आहे..

अरे वा... एका आगळ्या वेगळ्या चित्रपटाची ओळख करुन दिल्या बद्धल धन्स. :)
हा चित्रपट बघायला मिळाला पाहिजे.

रविंद्र प्रधान's picture

24 Nov 2010 - 9:07 am | रविंद्र प्रधान

पहायलाच हवी ही लघुचित्रफीत. माहिती दिल्याबद्दल श्री जयंत कुलकर्णी यांना धन्यवाद.

चित्रगुप्त's picture

18 May 2015 - 9:22 am | चित्रगुप्त

...."आमचा एक नऊ मित्रांचा ग्रूप आहे."....
......किती भाग्यवान आहात, कुलकर्णी साहेब ....
वर्तुळ ही चित्रफीत तूनळीवर सापडली नाही, कुठे बघता येईल ?

लिंक मिळाली तर बरे होईल …. ईमेल आता करून उपयोग होईल का? पाहूयात !

@ जेपी: संतोष राम यांचा पत्ता काढून थेट विचारा की (फोन लागना गेलाय) - हाकानाका !

धागा वर आणल्याबद्दल आभार.