मित्रांनो ,
या वर्षी (किंवा सलग गेले 3 वर्ष) १९७२ च्या दुष्काळा पेक्षाही भयानक असा दुष्काळ उभ्या महाराष्ट्राने अनुभवलेला आहे.
उपलब्ध असलेल्या पाण्यासाठी प्रादेशिक पातळीवर राजकारण चालू आहे. दुष्काळ निवारणासाठी वेगवेगेळे packages जाहीर केले गेले.. काही ठिकाणी अक्षरशः अशी परिस्थिती होती कि घरी आलेल्या पाहुण्यांना खायला जे पाहिजे ते देतो मात्र पाणी मागू नका अशी विनंती करावी लागल्याच्या बातम्या वृत्तपत्रात येऊन गेल्या. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात तर महिन्याकाठी रु.३०००/- पेक्षा जास्त फक्त पाण्यासाठी खर्च करावे लागत होते.
दुसऱ्या बाजूला मात्र आर्थिक दृष्ट्या संपन्न असणारा गट मात्र पाणी आणि पैसा फुटकळ समारंभ आणि मेजावाण्याद्वारे वारेमाप खर्च करीत होता. ईतर वेळी कधीच न जाणवणारी ‘पाण्याची किंमत’ नक्कीच निसर्गाने लक्षात आणून दिली.
एखाद्या वस्तूची टंचाई निर्माण झाल्याशिवाय त्या वस्तूची खरी किंमत काय हा विचार आपण कधीच करत नाही. म्हणूनच पाण्याच्या खऱ्या किमतीविषयी चर्चा करणे गरजेचे आहे. पाण्याच्या बाबतीत असाच हेळसांडपणा चालू राहिला तर नक्कीच काही काळाने सगळ्या वस्तूंची किंमत हि पाण्याच्या स्वरुपात द्यावी लागेल. अशी कोणतीच वस्तू नाही कि जी प्रत्यक्ष किवा अप्रत्यक्षपणे पाण्याशिवाय निर्माण होऊ शकत नाही.
तांत्रिक दृष्ट्या, कोणत्याही वस्तूच्या निर्मितीमागे आवश्यक असलेल्या पाण्याचा हिशोब जेव्हा अभ्यासाद्वारे आकड्यात मांडली जाते त्यावेळी येणाऱ्या अशा पाण्याच्या स्वरूपातील किमतीला ‘water footprint’ अशी संकल्पना रूढ आहे. यामध्ये एखादी वस्तू निर्माण होत असताना तिच्या निर्मिती प्रक्रियेमधील विविध टप्प्यावर अपेक्षित असणाऱ्या पाणीवापराचा हिशोब करून तो लिटर्स मध्ये मांडला जातो. त्यामध्ये एखाद्या पिकासाठी लागणारे पावसाचे पाणी अथवा सिंचनाचे पाणी लागते त्याला ‘green water footprints’ असे म्हणतात, तर ते पिक पूर्ण हातात येई पर्यंत जे पाणी बश्पिभावानाद्वारे अथवा इतर करणा मुले वाया जाते त्याला ‘blue water footprint’ असे म्हणतात. आणि त्या पिकाचे रुपांतर शेवटी एखाद्या पदार्थ मध्ये अथवा ‘product´’ मध्ये होत असतना जे पाणी प्रदुषित होते त्याला’grey water footprints’ असे म्हणतात. या तिन्हींची बेरीज करून त्या पदार्थाचा अथवा वस्तूचा ‘total water footprint’ या स्वरुपात पाणी वापर काढला जातो.
समजा,आज आपल्या सकाळच्या एक कप चहाची रुपयातील किंमत आहे रु.८/- परंतु याबरोबरच ‘water footprint’ म्हणजेच पाण्याच्या स्वरूपातील किमतीचा जर हिशोब केला तर तो येतो सुमारे १०० लिटर. म्हणजेच एक कप चहा चा आस्वाद प्रत्यक्ष पणे घेण्यासाठी सुमारे १०० लिटर पेक्षाही जास्त पाणी अप्रत्यक्ष पणे वापरण्यात आलेले असते. मग यामध्ये अगदी चहासाठी लागणारी साखर, त्यासाखरेसाठी उसाला लागणारे पाणीवापर प्रत्यक्षपणे तर चहासाठी लागणारे ईतर निर्मीती प्रक्रियेमध्ये लागणाऱ्या पाण्याचा अप्रत्यक्ष वापर गृहीत धरलेला असतो. त्याचप्रमाणे एक कप कॉफी साठी सुमारे १४० लिटर, तर एक किलो चिकन मागे सुमारे ७,७३६ लिटर्स इतक्या अवाढव्य प्रमाणात पाणी लागते. आणि एक किलो कापसासाठी सुमारे ११००० लिटर्स आणि त्यापासून निर्माण झालेला एक cotton t-shirt घेतला तर त्याची पाण्याच्या स्वरूपातील किंमत म्हणजेत ‘water footprints’ असतात सुमारे २७०० लिटर्स.
म्हणूनच जागतिक पातळीवर ज्या गोष्टींचे ‘water footprints’ हे जास्त असतात अशा गोष्टी शक्यतो दुसऱ्या देशाकडून आयात करायच्या अशी संकल्पना रूढ होताना दिसत आहे आणि हे अभ्यासाद्वारे स्पष्ट झालेले आहे की भारत युरोपियन युनियन देशामध्ये वर्षाकाठी जो कापूस निर्यात करतो त्या कापसाचे पाण्याच्या स्वरूपातील मूल्य आहे सुमारे ६,६२,३०,००० लाख लिटर्स ‘water footprints’ म्हणजेच ६६२३००००००००० इतके लिटर्स पाणी आपण एक वर्षात कापूस निर्यात करून युरोपियन युनियन चे वाचवतो. आणि सर्वसाधारण पणे आपण ज्या वस्तू निर्यात करतो त्या बहुतांश वस्तूंचा ‘water footprints’ हा आपण आयात करत असलेल्या वस्तूंच्या तुलनेत अतिप्रचंड आहे.
आणि सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाने आजच्या टंचाई ग्रस्त काळात जेवा लग्न अथवा ईतर समारंभामध्ये मेजवानिद्वारे प्रचंड प्रमाणात अन्नाची नासाडी करन्यात येते तेव्हा फक्त विचार करा कि आपण किती पाणी वाया घालवतो.
त्यामुळेच इथून पुढे ताटात अन्न वाया घालवताना तरी विचार करा कि आपण अन्न तर वाया घालावातोच पण त्यामागे वापरण्यात आलेले लाखो लिटर्स पाणी सुद्धा वाया घालवतो. हाच विचार प्रत्येक वेळी डोक्यात आला तर नक्कीच खात्री आहे कि आपण सगळे पाण्याचा नक्कीच जपून वापर करू. अजून एक महत्वाची गोष्ट अशी कि शाकाहारी भोजनासाठी लागणारा सरासरी पाणीवापर आहे १५०० लिटर्स प्रती दिन आणि मांसाहारी भोजनासाठी ३४०० लिटर्स प्रती दिन. म्हणजेच नुसते शाकाहाराचे आचरण केले तर आपण निम्यापेक्षा जास्त पाणी वाचवू शकतो, अर्थात निर्णय ज्याचा त्यांनी घ्यायचा....
मतितार्थ एकच, काहीही करा पण पाणी वाचवा....!! वाया घालवू नका ....!!
(जरी सध्या पाण्याची टंचाई नसली तरी हे तत्व नेहमीच ध्यानात ठेवावे लागेल)
प्रतिक्रिया
14 Dec 2016 - 3:04 pm | अत्रन्गि पाउस
विचार केलाच पाहिजे ...
मागे अनिल अवचटांनी ह्यावर लिहिले होते ....जसे कि १ लिटर दूध संकलन->शीत प्रक्रिया -> 'थंड' दूध लगेच गॅस वर उकळणे ह्यामध्ये अमुक एक वीज खर्च आणि त्यासाठी तमुक लिटर पाणी खर्च (जलविद्युत प्रकल्प गृहीत धरून) ...
14 Dec 2016 - 3:08 pm | धर्मराजमुटके
सगळा लेख चांगला पण वरील वाक्य टाकल्यामुळे लेखाचा मारुती ऐवजी गणपती होण्याची दाट शक्यता.
14 Dec 2016 - 3:23 pm | डिस्कोपोन्या
हे फक्त उदाहरणा दाखल दिलेलं तथ्य असून तेवढा एकाच मार्ग आहे अस मुळीच म्हणलेलं नाही.
मी स्वतः मिश्राहारी आहे (वेज+नॉनवेज)..
लेख आवडल्याबद्दल व प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद धर्मराजजी
14 Dec 2016 - 3:11 pm | कंजूस
बिनपाण्याचीच करावी काय आंघोळ?
14 Dec 2016 - 3:17 pm | मार्मिक गोडसे
खाण्याच्या सवयी बदलण्यापेक्षा पाण्याचा गैरवापर टाळावा.
14 Dec 2016 - 3:24 pm | डिस्कोपोन्या
हे फक्त उदाहरणा दाखल दिलेलं तथ्य असून तेवढा एकच मार्ग आहे अस मुळीच म्हणलेलं नाही.
मी स्वतः मिश्राहारी आहे (वेज+नॉनवेज)..नक्कीच पाण्याचा गैरवापर टाळायला हवाच..
14 Dec 2016 - 3:44 pm | मार्मिक गोडसे
मिपा सदस्य उल्लू ह्यांचे अभ्यासपूर्ण दोन लेख.
http://www.misalpav.com/node/36314
http://www.misalpav.com/node/36630
त्यांच्या पुढील लेखांची वाट बघतोय.
14 Dec 2016 - 4:49 pm | डिस्कोपोन्या
लेख वाचले ...नक्कीच चांगले आहेत ... धन्यवाद लिंक टाकल्याबद्दल मार्मिकशेठ !
14 Dec 2016 - 3:51 pm | गंम्बा
एक वेगळाच पुणेरी प्रश्न आहे.
सर्वांनीच असे खुप खुप पाणी वापरले तर पावसा चे जमिनीवर येणारे पाणी न वापर झाल्यामुळे समुद्राला नाही का जाउन वाया जाणार ?
जर कोणी देश, प्रदेश वॉटर टेबल ची पातळी छान मेन्टेन करु शकत असेल तर वॉटर फुटप्रिंट्ची काळजी करायची गरज नाही.
युरोप भारतातुन कापुस आयात करतात ते मजबुरी म्हणुन, कारण तिथे कापुस पीकु शकणार नाही.
14 Dec 2016 - 5:24 pm | डिस्कोपोन्या
तेच तर, आपल्याकडे वॉटर टेबल ची पातळी 'छान' मेन्टेन करता येत नाही ...(सध्या जवळपास सगळ्या रिजन चा water table अलार्मिंग स्टेज ला आहे)
14 Dec 2016 - 4:56 pm | डिस्कोपोन्या
थोड अजून इस्कटुन सांगा म्हणजे समजंल ...नक्की काय म्हणायचंय !
14 Dec 2016 - 5:39 pm | गंम्बा
टायपो हो. खुप कमी पाणी वापरले तर असे म्हणायचे होते.
14 Dec 2016 - 7:16 pm | विवेकपटाईत
लेख आवडला. पाण्यासाठी भविष्यात लोकांना शाकाहारी व्हावे लागेल किंवा सक्तीने शाकाहारी होतील. माझ्या बाबतीत म्हणाल तर मला अंघोळीसाठी ५ लिटर पेक्षा जास्त पाणी कधीच लागत नाही.(एकदा भटकंती करताना अर्थात तरुणपाणी पाण्याअभावी जीव भयंकर कासावीस झाला होता. त्या दिवसपासून पाण्याचे महत्व कळले. जेवढे शक्य होईल पाणी वाचविण्याचा प्रयत्न करतो.
14 Dec 2016 - 9:21 pm | रामपुरी
अंघोळीला फक्त ५ लिटर? अतिशयोक्ती वाटतीये पण भा पो
असो
14 Dec 2016 - 8:07 pm | मार्मिक गोडसे
१) पावसाचा थेंब अन थेंब जमिनीत मुरवणे.
२) शेतात ठिबकसिंचन वापरणे.
३) घरातील ठिबकणारे नळ दुरुस्त करणे.
24 Dec 2016 - 7:07 pm | पैसा
पाण्याचा गैरवापर टाळला पाहिजे.