डाव्या हाताच्या मुठी एवढ्या चिमण्या
हा हा करतात
या जीवघेण्या ओसाडीत....
कुठे दाणे टिपत असतील?
कुठे पाणी शोधत असतील?
घरटे कुठल्या आडोशाला असेल?
यांच्यात यांचे दफन कसे करत असतील?
कोण करत असेल?
चिमण्या निमित्त असतात............
आपल्याच छाटलेल्या मनाचे
हे तासनतास भिरभिरणे असते.....
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!
---- शिवकन्या
प्रतिक्रिया
23 Sep 2016 - 8:56 am | जव्हेरगंज
23 Sep 2016 - 9:08 am | शिव कन्या
तुम्ही प्रतिसादात पण सहज फोटो चिकटवता!
या मिपावर आमची तीच एक अडचण!
केवळ फोटो [लै प्रयत्न करून पन[] चिकटवता येत नाहीत, म्हणून बरेच लेखन होत नाही!
आता 'मिपावर फोटो कसा लावायचा' याची लिंक नका देऊ.... झाल्या सगळ्या लिंका लिंकून !
कै नै होत ! :(
23 Sep 2016 - 4:22 pm | जव्हेरगंज
खरं सांगायचं तर लै सोप्पं आहे ते!
- जव्हेरगंज
23 Sep 2016 - 10:08 am | प्राची अश्विनी
वा! ग्रेसच्या चिमण्या आठवल्या.
23 Sep 2016 - 10:55 am | चाणक्य
झकास चालू आहेत 'एकांता'च्या कविता.
23 Sep 2016 - 11:18 am | अंतरा आनंद
सुंदरच
23 Sep 2016 - 11:30 am | टवाळ कार्टा
chimani
23 Sep 2016 - 4:34 pm | अभ्या..
अगदी अगदी, तेवढ्याच.
जवळही काळजाइतक्याच.
मस्त. आवडते असे भिरभिरणे.
29 Sep 2016 - 5:45 pm | शिव कन्या
अभ्या भौ, डाव्या हाताचा थेट ह्रद्याशी असलेला संबंध जाणून वाचल्याबद्दल खास धन्यवाद !
23 Sep 2016 - 4:39 pm | यशोधरा
सुरेख कविता.
23 Sep 2016 - 5:31 pm | अजया
सुरेख
23 Sep 2016 - 10:11 pm | रातराणी
आवडले :)
24 Sep 2016 - 12:59 am | रुपी
मस्त.
27 Sep 2016 - 7:13 pm | प्रभास
अगदी छानच कविता...
27 Sep 2016 - 11:19 pm | पैसा
सुरेख!
28 Sep 2016 - 10:19 am | नाखु
कवीता (अर्थ) भरारी मोठ्ठी!
चिच्चिवाटीतला नाखु
28 Sep 2016 - 2:03 pm | अत्रुप्त आत्मा
व्वाह!
29 Sep 2016 - 6:04 am | मदनबाण
वा...
कालच कावळ्याची देखील बातमी वाचली होती...
पितृपक्षात जखिणवाडीत कावळ्यांचा 'दुष्काळ'... गेल्या 25 वर्षांपासून!
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल ले डूबा मुझको अराबिक आँखों में आज लूटा लूटा मुझको फ़रेबी बातों ने... :- AIRLIFT