जुळयाचे नव्हे जुळ(व्)लेले दुखणे
जुळे १:
सासं नसूनही तबला तू
सकल मिपाचा झमेला तू
धाग्यवरील सैरभैर (चि)चुंद्र
अन्... सुप्त बोक्याची जागा तू
मोकळाढाकळा रांगडा तू रे
सुमडीत सोपान डोम ही तू
ज्वर धाग्याचे आरोळी कधी तू
कधी फसलेली चारोळी तू
मिपात असूनही.. एकटाच तू रे
तुझ्या लाट्णीचा आधार तू
जुळे २:
छान छान यावे धागे
छान छान वंदावी थेट
टीआर्पी जसा चॅनेलला
येऊन मिळतो थेट थेट
मग येतो नवा धागा
जुना जातो अंधारात
टीच्भर प्रतीसाद मागून
तोही मिटतो अंधारात
असाच धागा अशीच कवीता
मला खूप आवडते
मन माझं मिपाच्या त्या
स्वगृह-लेखन निवडते
चालेल तुला जेवणात
असा लेट झालो तर?
मैत्री सोबत विचाराला
नवी कल्टी मारली तर!
धोत्रीच्या या फुला मधला प्रस्फुट मी शोधावे.
विलंबीत गोष्टीच्या पूर्णत्वाला नाखुस्पट* बोधावे
==नाखुस्पट (खुस्पट न काढता)
विसू :
प्रेरणा ज्याची त्याने शोधावी आम्ही व.व. सूचक मंडळ चालवीत नाही.
ह्याचा कुठल्याही धग्याशीच काय त्राग्याशीही संबध असू शकतो पण संघटनेच्या घटनात्मक तरतुदींनुसार आम्ही कशालाही जबाबदार नाहीत आणि नसतोही.
लेखन विषय+काव्यरस नजरेखालून घातल्यास क्लेष होणार नाही.
अभामिपाचिहगँगांतर्गत्खफ्तक्रार्निवारणमंच्मेन्बोर्डस्वच्छताअभियान्सामुहिइक चळवळ तर्फे मिपा हितार्थ जारी.
प्रतिक्रिया
2 Oct 2015 - 9:27 am | प्रचेतस
अगगाग्गागा....
णाखुण काका रॉक्स.
2 Oct 2015 - 9:28 am | दमामि
झक्कास
2 Oct 2015 - 9:34 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
दूत्तं दूत्तं नाखुन!!
2 Oct 2015 - 10:26 am | अत्रुप्त आत्मा
2 Oct 2015 - 10:34 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
जुळ्यांवरुन आठवलं. भावंविश्वाचं पुढे काय झाल हो? तो कथानायक वयजुवैनींबरोबर त्या कुठल्या कॉर्पोरेट अध्यात्मिक सेंटरमधे जाउन आला ना? मग त्यांच पुढे फळ काय मिळालं? लवकर येउ द्या. गणपती संपले अता.
2 Oct 2015 - 4:00 pm | बॅटमॅन
असेच म्हंटो. नाखुणकाकांचे क्रिप्टिक तर झेपलेच नाही, मात्र त्यावरून अत्ताच भावंविश्वाची आठवण झाली.
तदुपरि नाखुन काकांनी एकदा स्पेसबार दुरुस्त करून घ्यावा अशी विनंती आहे. ते महासामासिक शब्द पाहून यत्ता धाव्वीत असताना काही मास्तुरे लोक्स लै लिखाण देत तेव्हा असेच्लिहून्घेतासू. संस्कृत्च्यासंधिनिय्मांचाफाय्दाझालातेव्हाएक्दम.
(अखिल्मिपाउचक्पाचक्संघ)
2 Oct 2015 - 4:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
धाव्वी मधे असताना रादर नंतर कालेजात असताना असं कुत्रं मागे लागल्याप्रमाणे पटापट लिहुन देणार्या गुर्जी गुर्जीणींसाठी शाळेत मराठी आणि कालेजात विंग्रजी अशी स्वतःची युणिक शॉर्टहँड लिपी डेव्हलप केलेली. आजपासुन २००० वर्षांनी कोणाला उत्खननामधे ती वही सापडली तर प्लांचेट करुन माझ्या आत्म्यास बोलावुन अर्थ विचारायला लागेल =))!!!
3 Oct 2015 - 2:01 pm | बॅटमॅन
हा हा हा, अगदी अगदी!!!!!
हडप्पा संस्कृतीच्या लिपी आणि भाषेबद्दल जसे वादविवाद होतात तसेच मग याबद्दलही होतील. प्रत्येक अक्षरचिन्हाच्या आकारावरून त्याचा अर्थ काढण्याचा प्रयत्न होईल. =))
2 Oct 2015 - 11:59 am | अभ्या..
नाखूनकाका तुम्हचे क्रिप्टिक पुन्हा कळले नाही. :(
कट्ट्यावर खुलासा करणे.
2 Oct 2015 - 4:10 pm | जव्हेरगंज
:-D:-D:-D:P:P:P:P^O^
2 Oct 2015 - 4:30 pm | नाखु
लाट्णीचा आधार= चिमणशी झालेला तक्रार संवाद
विचाराला नवी कल्टी = कॉलींग प्रगो फोर दांभीकता
अखील
भारतीय
मिसळ पाव
चिमण हटेला गँग
अंतर्गत
खरडफळा वरील
तक्रार
निवारण मंच व
मेन बोर्ड
स्वच्छता
आभियान
सामुहीक
चळवळ
======= हुश्स्श यापूर्वीचे सूचनेनुसार सपाटीकरण केले नाही========
========खुलासा संपला आता पुनर्वाचन करावे लागेल=====
2 Oct 2015 - 5:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
नाखुकाकांना "क्लिष्ट्क्रिप्टिक्लेखन्शिरोमणीआणिलांब्लांबसमासलेखनरत्नऑफ्दशेंच्युरी" हा सन्मान रविवारच्या कट्ट्यात प्रदान केला जाईल. जेपी कट्ट्यास नस्ल्यास पुस्प्गुच त्येंच्याकडून नंतर पार्सलाने येईल. भेट म्हणून पूर्वी हिशेब लिहायला वापरत त्या फोल्डिंफोल्डिंग्फिल्डिंगच्या वहीची शोधाशोध चालू आहे... वही तोकडी पडली तर नाखुंनी त्यांचे दीर्घवाङ्मय कंप्युटर्वर्च लिहावे अशी विनंती करण्या येईल.
3 Oct 2015 - 7:27 am | श्रीकृष्ण सामंत
कविता आवडली
5 Oct 2015 - 2:25 pm | सूड
जुळे १ हे अत्रुप्त गुर्जींनी त्यांच्या शिष्योत्तमासाठी लिहीलेलं आणि जुळे २ व्हायसंव्हर्सा वाटत आहे. ;)
6 Oct 2015 - 8:43 am | नाखु
अचूक निदान. पहिलं गुर्जींनी त्यांच्या शिष्योत्तमासाठी + खफवर तक्रार खोरांसाठी आहे.
विडंबन जमू लागल्याच आनंद मानू की लोकं फलकाकडेच लक्ष्य देतात याची खंत बाळगू तेच कळेना.
किंचीत चिल्लर जास्ती खुर्दा झालेला कवी नाखु
5 Oct 2015 - 5:25 pm | सस्नेह
नाखुकाका तुम्हासही जुळी होवो लागली वाट्टे (ह. घ्या.)
..बाकी स्पेसबारबाबत बॅट्याशी सहमत !
5 Oct 2015 - 5:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
तुमच्या आमच्या मर्हाठीमधे ज्यांना जोडाक्षरं म्हणतात त्यांना त्यांच्याकडे जुळाक्षरं म्हणतात म्हणे!! -)