सुरुवातीला एक चेंडू घरंगळत येतो आणि एका कश्यातरी बांधलेल्या पट्टीवरून धडपडत जाऊन दुसर्या चेंडूवर आपटतो..की तो दुसरा चेंडू वरुन खाली टूणकन उडी मारतो आणि एक चाक गरागरा फिरायला लागते. मग त्यामुळे पुढे बरेचसे चेंडू पळापळ करून चाके फिरवतात आणि शेवटी अचानक एक म्हातारा दोरांसकट एका बोटीच्या नाळेवर हवेत उचलला जातो. आपली रोझ आणि जॅक जसे टायटॅनिकवर उडण्याची अॅक्शन करतात ना तसं, फक्त हा जरा जास्त हवेत दाखवलाय. हा सीन पुढे पिक्चरमधे किमान चारवेळा येतो आणि उत्तरोत्तर तो तितकाच अनकन्विन्सिंग होत जातो....सीनही आणि साहजिकच सिनेमाही! आपल्या मिकी माऊसचे सायन्सचे प्रयोग यापेक्षा कितीतरी जास्त पटणेबल वाटतात.
शिवकर बापुजी तळपद्यानी नेमकी किती विमानं उडवली? या चित्रपटात त्यांचे पहिले मानवरहीत उड्डाण म्हणजे शास्त्रिजी आणि 'शिवी' च जॉईंट वेंचर आहे. आणि दुसरं म्हणजे 'शिवी' चा एकपात्री मानवसहीत उड्डाण प्रयोग आहे. असं खरच झालं होतं का?
तर थोडक्यात कथा अशी की एका जमिनदाराचा 'शिवी' हा वाया गेलेला, ईयत्ता चौथीत आठवेळा नापास झालेला, दारुबाज पोरगा. ईथेच पहीली डायरेक्टरची डूलकी...शिवकरचे लघुरुप चक्क 'शिवी'! अर्थात पुर्ण चित्रपटादरम्यान दिग्दर्शक झोपलेलाच होता की काय असं वाटण्यासारख वातावरण आहे. तर हा शिवी सिताराच्या म्हणजे एका नाचणारणीच्या प्रेमात पडतो. ओघानेच बाप त्याला घराबाहेर काढतो.
बनारसहून शिकून, खूप ज्ञान मिळवून आलेला आणि उडण्याची स्वप्ने पाहणारा पण लोकांच्या दृष्टिने वेडा असलेला शास्त्रज्ञ आपल्या शिवीला हातोहात उचलतो. तत्पुर्वी सिनेमाचा बराचसा भाग शिवी आणि सिताराच्या लवस्टोरीवर खर्ची पडलेला असतो. सिताराचा एक उत्तान आयटेम नंबर, शिवी-सिताराचे एक प्रेमभरे गाणे ई.ई. झाल्यावर शिवीने 'लग्न करु' असे म्हणल्याबरोबर सितारा त्याला सोडून निघून जाते आणि अचानक दिग्दर्शकाला थोडी जाग येते. अरे पिक्चर विमानाचं आहे नाही का..
येता-जाता 'ब्लडी ईंडीयन्स' म्हणणारे स्टिरीयोटाईप्ड ब्रिटीश पोलीस त्या वेड्या शास्त्रज्ञाचा फुल्ल पाठलाग करत असतात. पण त्यांना मुम्बईच्या लगतच समुद्रात उभे असलेले सुसज्ज जहाज मात्र दिसत नाही. लांबून हे जहाज दाखवतात तेंव्हा तो चक्क पडदा आहे हे दिसतं. मधेच एका दृष्यात तो हललेलाही आहे. अशीच मजा त्या काळची मुंबई दाखवतांना पण झालीय. ढग अगदी खाली जमिनीला टेकलेत आणी राजाबाई टॉवर त्यातून मान वर काढतोय, हे चक्क पडद्यावर रंगवेलेलं ठळक कळतय.
त्याकाळची मुंबई अर्थात एका खोट्या आणि नाटकी सेट्वर उभी केलिय. ईतकी खोटी की २-३ वर्ष्यांच्या काळातही तीच तीच माणसे त्याच रस्त्यांवरुन फिरतांना दिसतात. चौपाटिवर विमानाचे उड्डाण पहायलाही तिच माणसे आणि शेवटच्या कोर्ट सीनमधेही तिच. अगदी शाळेतील वर्गाचे पहिले दृष्य आणि साधारण २ वर्षे गेल्यावरचे दृष्य यातही तीच मुले आणि त्याच उंचीची आहेत. शिवीचा पुतण्याही २ वर्ष्यांच्या काळात एवढासाही बदलत नाही.
स्वतः शिवीचे वय हे ही एक गौडबंगालच आहे. तो जेमतेम १८-२० चा दाखवलाय.
या सगळ्या नाच-गाण्यात, प्रेमालापात ते विमान बनतांना कधीच दिसत नाही. आणि विमानाच्या नावाखाली जे काही बनवून आणलं जातं ते ईतकं खिळखीळं खेळणं दाखवलय की त्याला ढकलून आणतानाच त्याच्या ठिकर्या ठीकर्या होतील अशी भिती वाटते. यथावकाश, चौपाटिवर टिळक आणि बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांच्या उपस्थितीत हे विमान चक्क भरारी घेते आणी थोड्या दूर समुद्रात जाऊन नाकावर आदळते.
त्यानंतर शास्त्रीचा मृत्यू आणि मग परत एक स्वतंत्र विमान बनवण्याची शिवीची धडपड! त्यात 'शास्त्रीजींच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत अर्थात मी खूनी आहे' या समजूतीतून खर्ची पडलेली काही हजार फूट लांबीचि असह्य फिल्म!
ह्या सगळ्यामुळे सॉल्लिड्ड हादरलेले ब्रिटिश शिवीला परत एका खटल्यात अडकवतात. कोर्टामधे अचानक एक कळकट्ट क्रांतिकारक आणि क्रांतिकारीण कुठूनसे येतात आणि बाँब फोडतात. त्या हास्यास्पद धुमाकूळात पळून जातांना क्रांतिकारीणीला हसू अनावर होते, आणि ते कॅमेर्याने चक्क तसेच्या तसे टीपलेय! तसच ईतर ठिकाणीही प्रत्येक कलाकार प्राणपणानी अक्टिंग करतो पण त्यावेळी समोरच्याचीही हसु दाबून ठेवण्याची प्राणपणानी अॅक्टिंग सुरु असते...
शेवटी शेवटी 'मेरा विमान उडेगा ना..?' हा डायलॉग ईतक्या असंख्य वेळा बोलला जातो की मी ओरडलेच "उडनाच मंगताय..मैने आठसों रुपयेका टिकट खरिदा है.."
विमानाच्या खर्या ईंधनाचे रहस्य फक्त शस्त्रिजींच्या गुरुलाच म्हणजे चारु सरस्वतीला माहिती असते. तो शिवीला काही कॉमेडी प्रश्ण विचारतो, त्याची म्हणे उलटी उत्तरे शिवीने द्यायची मगच तो ईंधनाचे नाव सांगेल. उदा. ईन्सान को सबसे ज्यादा दु:ख किस बात का होता है...हार का या मौत का? मी मनातल्या मनात उत्तर दिले 'तमौ का'...अर्थात मौत च्या उलट. पण ते उलट उत्तर होते 'नाकामयाबीका'...देवा...डोकं पुर्ण कामातून गेलेलं....
सरतेशेवटी ईंधनाचे नाव...यात काहीच डीस्क्लेमर द्यायच्या लायकिचे नाहिये, म्हणून नाहिच देत. कारण यावेळे पावेतो बहुतेक कोणी चित्रपटगृहात टिकतच नाही. तर, ४१२१ असा एक अगम्य आकडा चारुजी सांगतात. मी पिरीयॉडीक टेबल ई.ई. फालतू डोकं खाजवत बसले. हल्ली आपल्याकडे मराठीत नंबर लिहीलेल्या जंबो एस्युव्ही दिसतात. पांढर्याशुभ्र गाड्या, पाढरेशुभ्र कपडे आणि काळाकुट्ट गॉगल चढवलेले डायव्हर्स...आठवलं..?? तर अश्या गाडीवरची नंबर प्लेट डोळ्यांसमोर आणा, काहिशी खाली दिलीय तशी आणी लढवा डोकं...!!
कंफेशन द्यायला चर्चमधे जाणारा ब्राम्हण शिवी, त्याला हजचे साठवलेले पैसे देणारा मुसलमान क्लर्क, टिळक दिसताच पडद्यावर दिसणार्या गणेशमुर्ती आणि त्या बनविणारा चांगल्या मनाचा मुसलमान कारागीर असे सर्वधर्मिय गळ जागोजागी टाकून ठेवलेले आहेत, त्यामुळे तरी लोकं यावित बघायला. आणि तरिही तुम्ही बधला नाहितच तर विमान उडवतांना चक्क 'वंदे मातरम..' ची धून ऐकवून थेट तुमच्या देशभक्तिच्या कासोट्यालाच हात घातलाय...
ईंधन क्ल्यु..
आणि हा पण..
ओळखणार्यास माझ्याकडून हवाईझ्यादाचे फ्री तिकीट..!!
प्रतिक्रिया
31 Jan 2015 - 4:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
इंधन क्लु =))
अगागगगगग!!! हे ह्या टाक्याही भरुन देतात का कॉय!!! =))
31 Jan 2015 - 4:44 pm | पिंपातला उंदीर
लै भारी *lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:
31 Jan 2015 - 4:48 pm | बॅटमॅन
अगागागागागागागागागा =)) =)) =))
बाकी पिच्चरचे नाव अन्वर्थक आहे. ते इंधन 'जादा' झाल्यावर माणूस हवाई होत असावा ;)
31 Jan 2015 - 4:51 pm | अजया
कं लिवलंय!कं लिवलंय!
वाचलेल्या पैशातून पार्टी देते ये तुला!!
31 Jan 2015 - 5:11 pm | पिशी अबोली
=))
31 Jan 2015 - 5:56 pm | सानिकास्वप्निल
भन्नाट लिहिले आहेस =))
31 Jan 2015 - 5:57 pm | विशाल कुलकर्णी
कसलं भारी लिवलय राव *lol*
31 Jan 2015 - 5:58 pm | जेपी
आवडल..
=))
आज तिकीट आणी पॉपकार्न चे पयशे वाचवल्याबद्दल आभार =))
31 Jan 2015 - 6:13 pm | आदूबाळ
+१
31 Jan 2015 - 6:11 pm | रेवती
परिक्षण फाडलयस स्वरातै! मला आत्ता कळतय की हा सिनेमा आहे.
कोडे घातलेल्या गाड्यांवरील दादा आणि राज ओळखून दाखवल्यास तू तिकिट न दिल्यासच जास्त आनंद होईल.
31 Jan 2015 - 6:22 pm | पैसा
लै भारी लिहिलंय! सिनेमाच माहिती नव्हता म्हणून विकिपान शोधले. त्यातले हिरो हिरवीण कोणीच ओळखीचे दिसले नाहीत. पोस्टरवरचा तांबड्या हाप प्यांटीयला मोठे केसवाला १८९० चा हिरो बघून चक्कर आली. दिग्दर्शन वगैरेबद्दल फारसे काही लिहिण्यासारखे नसावे बहुधा.
31 Jan 2015 - 6:23 pm | अत्रुप्त आत्मा
दर वाक्यावक्याला... अत्यंत वाइट्ट वारल्या गेलो आहे!
@अचानक दिग्दर्शकाला थोडी जाग येते. अरे पिक्चर विमानाचं आहे नाही का..
@क्रांतिकारक आणि क्रांतिकारीण कुठूनसे येतात आणि बाँब फोडतात. त्या हास्यास्पद धुमाकूळात पळून जातांना क्रांतिकारीणीला हसू अनावर होते, आणि ते कॅमेर्याने चक्क तसेच्या तसे टीपलेय! >>
@असे सर्वधर्मिय गळ >> =))))))
@आणि तरिही तुम्ही बधला नाहितच तर विमान उडवतांना चक्क 'वंदे मातरम..' ची धून ऐकवून थेट तुमच्या देशभक्तिच्या कासोट्यालाच हात घातलाय...>>
=======================
चिंध्या चिंध्या केल्या आहेत अक्षरशः ! =))))) आता हे प्रिक्षण तिकडे नेऊन वाटा रे कुणितरी! निदान लोकांना पश्चात-ताप तरी व्हायचा नाही! =)) राम राम राम राम..! वारलो रे वारलो आज!
31 Jan 2015 - 6:32 pm | टवाळ कार्टा
इंधन "पारा"
31 Jan 2015 - 6:36 pm | चिगो
इंधन "पारा" का? मागे एका धाग्यात गविंनी 'तळपद्यांनी मर्क्युरी वॉर्टेक्स इंजीन' की असंच काही बनवल्याच्या क्लेमच्या चिंध्या केल्या होत्या, त्यावरुन अंदाज बांधतोय..
बाकी लै बेक्कार फाडलाय पिच्चरला.. ते "माझा मायलॉर्ड" का असलं काहीसं गाणं ऐकून चित्रपटात गोवा दाखवलाय का काय असं वाटलं होतं.. चला, पैसे वाचले. आणि तळपद्यांचा उरापुरा अपमानही ह्या चित्रपटानी पुर्ण केलाय असं वाटतंय..
31 Jan 2015 - 7:33 pm | बाबा पाटील
मानवी मुत्र पुरिष चा इंधन प्रोजेक्ट तर नाय ना,मधी पेपरात वाचल होत बुवा,नागपुरात इंधन भरुन गडकरी वाड्यावरुन बस निघते आणी फडणविसांच्या चावडीवर पोहचते,अस काही तरी होत बुवा.
31 Jan 2015 - 7:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
31 Jan 2015 - 8:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
श्या बाबा. लोकांना आपल्या प्राचीन ठेव्यांची काय किंमतच नाय *beee* *aggressive*
31 Jan 2015 - 7:55 pm | स्वाती२
:))
31 Jan 2015 - 8:46 pm | पिलीयन रायडर
बघ.. बॅट्या बिचारा म्हणाला पण होता नको जाऊस म्हणुन..
पण बरं केलस गेलीस ते.. हे असलं खतरनाक परीक्षण तरी वाचायला मिळालं..!!!
ठ्ठो !! ठ्ठो!! ठ्ठो !!!
तीन तोफांची सलामी तुला!!!!! जबरदस्त परीक्षण!!
31 Jan 2015 - 8:58 pm | स्वप्नांची राणी
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद! माझा पहिलाच प्रयत्न होता परिक्षणाचा.
कान प़कडते पिरा!! माझ्या खवमधे डोकाव; बॅटमन ला वैदिक आणि संस्कृत यात चॅलेंज करायची आपली हिम्मत नाय ब्वॉ!
पण गेल्यामुळे खरच बरेच सा़क्षात्कार झालेत बघ. टका ने दिलेले उत्तर अगदी बरोबर आहे. आणि आपण त्याची उगाच टवाळी करतो. आज ईथेच मी टकाला मिपाचा सगळ्यात हुश्श्यार आणि होतकरू मुलगा म्हणून जाहिर करते. चिगो पण आहेतच मागोमाग.. पण ते होतकरू आहेत किंवा कसे ?
31 Jan 2015 - 9:11 pm | जेपी
टक्या सगळ्यात हुश्शार.. *beee*
त्याला सगळ इस्कटुन सांगाव लागत =))
(होतकरु)जेपी =)) मरतय आज हसुन
टक्या हलके घे. =))
31 Jan 2015 - 9:51 pm | टवाळ कार्टा
चायला उग्गीच लिहिलेस हे
या जगात ईस्त्रीया मुलांचे "कौतीक" केव्हा कर्तात हे अजून माहित नाही का तुला
आणि "टक्या हलके घे" हे लिहायची गरज नाही... ते समजते :)
31 Jan 2015 - 9:51 pm | टवाळ कार्टा
अर्रे वा :)
2 Feb 2015 - 5:09 pm | चिगो
नाही हो.. झालंय करुन... लग्न म्हणतो मी. ;-)
(संसारी गृहस्थ) चिगो..
31 Jan 2015 - 9:10 pm | सस्नेह
हवाईझ्यादाचं पार भुस्कट पाडलंस की स्वरा !
आणि ही कळा कधी शिकलीस *lol*
31 Jan 2015 - 9:59 pm | स्रुजा
अरारारारारारा .. काय फाडलंय .. झकास *lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:
मला असा सिनेमा आलाय हे पण माहिती नव्हतं.
31 Jan 2015 - 10:02 pm | श्रीरंग_जोशी
चित्रपटाचं विमान उडू शकलं नसलं तरी परिक्षणाच्या विमानाने यशस्वीपणे उड्डाण केले आहे.
मिपावर खुसखुशीत परिक्षणे लिहणार्यांमध्ये आणखी एकीची भर पडल्याने आनंद वाटला.
31 Jan 2015 - 10:49 pm | मुक्त विहारि
आवडले...
31 Jan 2015 - 10:53 pm | अभिदेश
एक नम्बर परिक्शण....
1 Feb 2015 - 12:06 am | मीता
एक नम्बर लिहिलय
1 Feb 2015 - 2:08 am | आनन्दिता
=)) =)) =)) =))
1 Feb 2015 - 4:43 am | vini__a
मस्त लिहिलयं !!!
1 Feb 2015 - 6:22 am | खटपट्या
४१२१ म्हणजे दारु !!
बरोबर हाय का ते सांगा. तिकीट नाय दिलं तरी चालेल. :)
1 Feb 2015 - 3:43 pm | बॅटमॅन
नाय, इथे पारा अभिप्रेत आहे. ४ हा आकडा ष्टायलीत लिहिला तर द किंवा प म्हणूनही खपवता येतो.
1 Feb 2015 - 3:44 pm | आरोही
मस्त मस्त मस्त !!!! काय लिहिलंय सहीच !!
1 Feb 2015 - 5:28 pm | संदीप डांगे
तुम्ही परीक्षण लिहिण्यासाठी जेवढा त्या चित्रपटाचा अभ्यास केला त्याच्या १० टक्के जरी दिग्दर्शकाने चित्रपट बनवतांना केला असता तर किमान ट्रेलर तरी सुसह्य झाले असते.
आमचेही ५:
१. तत्वज्ञानः चित्रपटाच्या नावातूनच त्याची गंभीरता कळली
२. द्रुश्तिकोनः मराठी माणसावर चित्रपट आहे असे कुठल्याही अंगाने वाटत नाही.
३. व्याख्या: लावणी म्हणजे "जी जी रं" असलेलं गाणे (सोरी सोरी, 'आय'टम्म सोंग)
४. टोमणा: याच्या १० टक्के खर्चात १० हरिश्चंद्राची फ्याक्टरी निघतील.
५. जाणीवः आधीच वैज्ञानिक संशोधनाबद्दल दिव्य ओढ असलेल्या आपल्या देशात देशी संशोधकांची खिल्ली उडवायला (जो आपला राष्ट्रीय धर्म आहे) उत्कृष्ट संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल रिलायंस चे धन्यवाद.
मुजीक थोळ्सक बरंय...
हजारो मनुष्यतास आणि बक्कळ रक्कम वाचीवल्याबद्दल स्वरा तैचे लय आभार…
जै हिंद जै म्हाराष्ट
1 Feb 2015 - 6:13 pm | स्वप्नांची राणी
हो, गाणी आणि संगित चांगल आहे. विशेषतः मधले तबल्याचे तुकडे तर भन्नाटच वाजवलेत. पण जे आहे ते अत्यंत अस्थानी आहे. गाण्या-बजावण्यात तब्बल १/२ तास घालवलाय आणि गाण्यांंमूळे पटकथा अजिबात पुढे सरकत नाही...अनावश्यक आहेत गाणी. आणी अर्थातच गाण्यांसाठी कोणी हवाईझादा पहायला जाणार नाही.
त्या काळची वेषभुषा पण सॉल्लीड गंडलीय. शिवी ला भेटायला सितारा चक्क काळा ईविनींग गाऊन घालून येते. ब्राह्मण घरातल्या बायकांचे पदर...याबद्दल न बोललेल बरं. छोट्या पुतण्याची भुमिका उत्तम आहे.
खरतर दिड तासांचा फास्ट आणि फाफटपसारा मुक्त चित्रपट जास्त बघणिय झाला असता.
शेवटी जेंव्हा त्याची आई त्याला विचारते, "तू खरच विमान उडवणार? आणि परत येणार नाहीस?" तेंव्हा बर्याच लोकांनी 'न जाणो, तो खरच परत बिरत आला तर तिसरं विमान बन्वायला घेईल' या भितीने हॉल सोडला...
पण आत्ताच मला कळलय की या सिनेमाविरुद्ध बोलणे हींदूहीतविरोधी (un eslamic च्या चालीवर) ठरले आहे...
1 Feb 2015 - 6:40 pm | संदीप डांगे
शिणुमा jingoistic केला आहे तेवढ्यासाठीच. खूपच खिचडी आहे आणि कशात काय घातलंय काही कळत नाही.
फारीनची लोकं काही ही बनवू देत, ते आपल्याला भारीच वाटतं. आपल्या माणसांनी काही बनवले तर लोक नाक मुरडतात. त्याचवेळेस आत्मभान आणि वृथा अभिमान याचा सोल्लिड गुंता झालाय आताच्या पिढीचा.
फारीनच्या लोकांचा स्वत:चा उदोउदो करण्याचा गुण उचलायचा ठरवले आहे बहुतेक काही लोकांनी. पण त्याआधी किमान काही कर्तृत्व दाखवले पाहिजे कि नाही. आमचे आजोबा दोन मंत्रात साप रिंगणात बांधून टाकायचे, त्याचे कौतुक आणि अभिमान आम्हालाही तसेच करता येत असेल तरच, नाहीतर पुराणातली वानगी पुराणात.
मान्य आहे की आपल्या लोकांनी खूप शोध लावले. ते फारिनच्या लोकांनी चोरले. मग आता नुसती बोंबाबोंब करून उपेग काय?
पॉल बर्टन च्या A Search in Secret India मध्ये एक योगी त्याला एका कागदावर एक आयताकृती आकार काढून काही अगम्य शब्द लिहितो आणि तो त्याला देत म्हणतो कि तुला भविष्यात कधी माझी आठवण आली कि हा कागद समोर धर. मी या चौकोनात तुला दिसेन व तुझ्याशी गप्पा मारेन. आताच्या काळातला टॅब जसा. आणि गम्मत म्हणजे हे सगळे बर्टन साहेबांनी लिहिले आहे तेही साध्या संगणकाचाही शोध लागण्या अगोदर.
भारतीय लोकांत काय दम नाय म्हणणारे पॉल बर्टन हा माणूसच खोटा होता असे म्हणायला कमी करणार नाही.
असे उल्लेख आणि अनुभव खरे मानायचे कि त्याचे पुरावे आणि प्रमाण समोर आल्याशिवाय खरे मानणारच नाही असा हेका दाखवायचा ह्याच गोंधळामध्ये आपण अडकलोय जणू…
2 Feb 2015 - 8:44 am | नाखु
खंग्री.. *clapping*
हवाईजदाचा उगम = बापजादा,दौलतजादा असा ज्याच्यात हवा ("हवा बाण हरडे" तील अपेक्षीत) आणि इतर फुटकळ गोष्टीच जास्त असलेला अशी करावी काय ?
कॉलींग "बॅट्या बिचारा"" *blum3*
2 Feb 2015 - 9:35 am | सविता००१
हॅट्स ऑफ टू यू.
कातील परिक्षण.
मस्तच.
2 Feb 2015 - 9:56 am | स्पा
lol =))
2 Feb 2015 - 10:06 am | गवि
हे राम.
यावर सिनेमा काढलाय? आर यू सिरियस?
2 Feb 2015 - 12:53 pm | बबन ताम्बे
आपले प्रेक्षक हे बिनडोक असतात असा या निर्माते/दिग्दर्शक्/पट्कथा लेखक यांचा बहुतेक समज असतो.
मागे कुठला तरी हर्मन बावेजाचा (तोच तो र्हूतिक रोशन ची नक्कल) पिक्चर आला होता. त्यात २०५० साली मुंबैत उडणा-या बेस्ट बस दाखविल्या होत्या.
एकंदर याबाबतीत कल्पनादारिद्र्य आपल्याकडे खूप आहे.
2 Feb 2015 - 12:59 pm | मिहिर
=))
मस्त लिहिलंय.
2 Feb 2015 - 1:14 pm | योगी९००
छान परिक्षण..!! लिखाणाची पद्धत आवडली.
आज बर्याच दिवसांनी फारएन्ड यांची आठवण आली.
5 Feb 2015 - 9:10 pm | अभिजीत अवलिया
Mast keley parikshan. Bhaarich
5 Feb 2015 - 10:22 pm | प्रीत-मोहर
हे वाचलच नव्हत ग स्वरातै.
दंडवत स्वीकारा __/\__
काय लहिलय्स ग!!!!
18 Feb 2015 - 6:46 pm | सुजल
:-))