मिपा ओळख २

चेतन's picture
चेतन in जनातलं, मनातलं
3 Nov 2008 - 12:16 pm

प्रसंग दुसरा : मिपाचे सदस्य होउन पंधरा एक दिवस झालेत.

भाउ पंधरा दिवस झाले बघ तु सांगितलेले आणि न सांगितलेलं सगळ येड्**सारखं वाचुन काढलं. आता मी पण काहितरी लिहाव म्हणतोय. बहुतेक हा मिपावरचा दुसरा गटणे होणार वाटतं तरी बरं पंधरा दिवसात यानि काही चर्चाप्रस्ताव टाकले नाहित. काय म्हणालास? नाही काही नाही हे आपलं खुदं के साथ बातां. हे ही मिपावरुनच ढापलेलं बर का मी आपला पी.जे केल्याच्या थाटात म्हणालो. तर हा हिरो तेव्ह्ढ्याच थंड्पणे म्हणतो कसा दादा मिपावर दुसरर्‍याचं लिखाण प्रसिद्ध करायला परवानगी नाही आहे माहिते ना! माहिते मला ते, बोलायला तर आहे ना. ते जाउ दे मग काय लिहणार? तोच विचार करतोय हे बघ एक्सेल शिट मध्ये लेखन प्रकार आणि प्रतिसाद यांचा आलेखचं काढलाय. मी त्याची ति करामत आणि नको तिथे नको त्या गोष्टिचा वापर आजि म्या ब्रम्ह पाहिलेच्या थाटात पाहिला. सर्वात जास्त प्रतिसाद चर्चाप्रस्तावाला आणि ते ही वादविवाद या उपप्रकारात होते. म्हणलं कार्ट बरच हुशार दिसतयं. खाली एक ठळक अक्षरात टिप होती प्रतिसांदांची संख्या वाढविण्यासाठी मिनसे मध्ये सामिल व्हा. आता पंधरा दिवसातली त्याची एव्हढी प्रगति पाहुन याला माझ्यासारख्या पामराकडुन काय पाहिजे याचचं टेन्शन आलं. याला निट ऊत्तर दिली नाहित तर हा एक तर माझा दंत विमा काढेल किंवा स्वतःचेच दात नको तिथे घुसवुन ड्राकुला बनेल बहुतेक. ( एकंदर हा व्यंकुची शिकवणिचा प्रकार होणार होता)

हा सांगु लागला तसं बघ मी कधी कविता केलीली मला तरी आठ्वत नाही त्यामुळे ते बाद. तसही मला रिक्श्यातुन उतरल्यावर मिटर बघुन किती पैसे झाले ते कळत नाही तर कवितेतला मिटर काय झा* कळणार. त्याचं निरिक्षण आणि शब्द ऐकुन हे नक्की कळल की हा रांत्रदिवस मिपावर पडिक असणारे. मि आपलं उगाचचं बोलायचं म्हणुन म्हणलो बरोबर आहे तु म्हणतोस ते. पण मग चारोळी तर कर आहे काय त्यात? मला मात्र मनात चुपके चुपके मधली जुलाब जोडुन केलेली चारोळि आठ्वली. म्हणला प्रयत्न चालु आहे. मी त्याला फटु साहेबांच नाव सांगणार होतो की मदत घे म्हणुन (ट ला ट आणि र ला र जोडण्यात डॉक्टरेट केली आहे यांनी) पण भकारान्त शब्दांची चारोळी करायचा प्रयत्न चालु आहे हे पुढ्चं वाक्य ऐकुन मनातं म्हणलं बर झालं फटुचं नाव नाही सांगितलं नाहितर उगाच फाट्यावर मार पडला असता. मी आपली मौनं सर्वाथ साधयेत हे जाणुन त्याच्या बोलण्याची वाट पाहु लागलो. स्वतः बनवलेल्या एक्सेल शीटमध्ये बघुन तोच म्हणाला लिहणाच्या द्रुष्टिने दुसरा सोपा प्रकार म्हणजे विडंबन त्यातही गझल व्रुत्त यमक नसलेली कविता किंवा त्रिवेणि उचलायची हा पण एक प्रयत्न करतोय मी. म्हणतो कसा केसुसरांच्या नंतर एकच नामचिन विडंबनकार राहिल्याने कॉम्पिटिशन कमी आहे. मग मात्र मला गप नाही रहावलं म्हणलं बर्‍याच लोकांनी आम्हाला गझलाच जास्त आवडतात विडंबन म्हणजे दुसर्‍याच्या प्रतिभेवर एक परप्रकाशी बांडगुळ असे केसुपंथाच्या गुरुजींच्या बहुतेक विडंबनावर प्रतिसाद देउन गांगुलीसारखी त्यांना निव्रुत्ती घ्यायला लावली. त्याचा विरोध आणि त्यामुळे निर्माण झालेली संधी पाहुन बर्‍याच नवोदितांनी प्रयत्नांची शर्थ केली पण डावखुरा फलंदाज निव्रुत्त झाल्याने डावखुर्‍या फलंदाजाचीच नेमणुक होइल या नियमाप्रमाणे रंगनाथन आनंद या अतिशय प्रतिभावंत बुध्दीबळ्पटुची निवड झाली. केसुपंथाची दिक्षाघेतलेले लोक पंथाला विसरले आणि रंगनाथन यांची एकछ्त्री सत्ता प्रस्थापीत झाली. बुध्दीबळाची उत्तम जाण असल्याने या मधुशालेचा हा भाग कधी येणार असे विचारुनही यांनी वेळोवेळि कॅसलींग करुन आपली विडंबनाची सेवा अबाधित ठेवली आहे. हा जाज्वल्ल्य इतिहास सांगित्ल्याने मला जर बर वाटलं तर म्हणतो कसा बर झालं सांगितलस ते विडंबन टाकण्याआधी बुध्दीबळ शिकाव म्हणतो. मी पुढे टाकलेल्या प्याद्याला त्याने एन् पास करुन मलाच मात दिली होती.

आता मात्र माझी उत्सुकता शिगेला पोहचली होती मग मीच विचारलं अजुन काही लिहण्याचा प्रयत्न चालु आहे का? तर मुखातुन अम्रुत पाझरावे तसे स्व्रर्गीय स्वर (जे डोक्यावरुन जातात ते ) बाहेर पडले म्हणलं हे काय? प्.पू तात्यामहाराजांचे लेख वाचुन किर्तनकलेत शास्त्रीय संगिताचा वापर कसा शक्या असे आहे आणि रॉक आन सारख्या चित्रपटात एखादं शास्त्रीय संगितावर आधारित गाणं टाकल्याने मास्तरांच्या चित्रपट्परिक्षणामध्ये काय फरक पडला असता यावर लेख चालु आहे म्हणाला. ते ऐकुन फीट यायच्या अवस्थेतही मी विचारलं ते खर आहे रे पण मगाशी जो काही आवाज काढलास तो काय होता? सात स्वरांनी मिळुन तयार होणारा सप्तक आणि त्यात थोडिशी हिमेशबाबाच्या आठव्या स्वराचं हे मिक्श्चर आहे म्हणाला तुला नाही कळायचं ते. लेख वास्तव्वादी होण्यासाठी जी काही ग्रुहीतके, अनुभुती लागते ती फील करायचा प्रयत्न करतोय. त्याचं ते विदवत्तापुर्ण विचार ऐकुन मनातच म्हणलं एकतर याची नाडी शोधायला दिली पाहिजे हा बहुतेक बर्‍याच जणांची नाडी सोडणारे. (कोणाशी पंगा घ्यायचा झाल्यास त्याचावर सोडायला उपयोगी पडेल.) पुढे तोच म्हणाला खमंग पाककृतींसाठी कोणाकडुन मदत घेउ आणि माझ्यापुढे उस्ताद ग्यानसुद्दीनचे जनक सम्राट सर्कीट ओमप्रकाश आणि हा धर्मेंद्रच्या रुपात साक्षात उभे राहिले. म्हणलं चांगला चान्स आहे एकतर हा तरी स्रर्कीट होइल नाहितर स्रर्कीट तरी अनबॅलन्स होइल. पण म्हणलं तुला कशाला हवे रे पाककॄती? इकडेतिकडे बघितल आणि म्हणाला कांदापोहे खातोय सद्ध्या अरे नको नको ते प्रश्न विचारतात रे. हे करायला येत का ते करायला येत का लय टेन्शन आलयं. म्हणलं इथे मिपावर एक संजिव कपुरकर काका आहेत त्यांना विचार. ( मनातच म्हण्लं हा बहुतेक चायनीज पुरणाची सोडे घालुन केलेली मिसळीची कृती लिहणार बघं )

मग मीच म्हणलं तुझे प्रयत्न चालु ठेव अजुन काही विचारचय का? अरे अजुन बरच प्रकार लाइनीत आहेत. एक क्रमशः लिहायचं म्हणतोय . आणि माझ्या डोळ्यापुढे सहाशे पेक्शा जास्त चालणार्‍या चार दिवसकडून प्रेरणा घेउन एलियनवर एप्रिलमध्ये शूट केलेला बांगड्या नावाचा चित्रपट उभा राहिला. आता मला हा आणखि कितीवेळा दिवास्वप्नात प्रवास घडवणारे कोण जाणे. पुढे तोच म्हणाला एक भैयाकथा क्रमशः लिहाय्ची म्हणतो. माझ्या भैयाकथेची सुरवात कंदिल घेउन जाणार्‍या गबाळ्यापासुन करणारे. मग माझ्या डोळ्यासुमार ती शहारे आणणारी कथा आणि तो कंदिलधारी शार्पशूटर जसेच्या तसे उभे राहिले. आत्ता फार वेळ मी जर याच्याबरोबर राहिलो तर हा मलादेखिल छताला चिकटवायला कमी करणार नव्हता. पुढे तोच म्हणाला हा भैया जरी चेंगट असला तरी शेअर बाजारात मुक्तपणे भय पसरवत असतो आणि पुढे ही कथा गुढ होते तो राजेंच्या साथिने बाजारात मंदी आणन्याची धमकी म्हणे अर्थमंत्र्यांना देतो. अबे भो...डिच्या आता बंद करशील का तुझ्या फाट्यावर कट्टा मारु माझी सहनशक्ती आता संपली होती. आता खर तर मला इनोची गरज होती. जाताजाता त्याने मला एक फोटो दाखवला त्यात यात्रीप्रमाणे त्याचाही डोक्यावर हात असलेला साक्षीदेवाने फोटोशॉपमध्ये बनवलेला संसदभवानासमोरचा लकीटाइप फोटु होता. त्याखाली शुद्द संस्कृतात लिहलेलं सातारवी भाउंची कुठलतरी सुभाषित होतं. आंणित्यामागे शुद्दलेखनाचा फायदा या सदरात लिहलेले वेल्यांट्या बद्लुन तयार केलेले प्रा. साहेबांच्या आयडि सारखेच दिसणारे मगधी भषेतील तीन आय.डी. होते.

शेवटि त्याचं हे एव्हढ मिपा ज्ञान आणि करामती बघुन आपल्याला मिपा बद्दल किति ज्ञान आहे, अमुक अमुक लेखात किति ओळी होत्या. किंवा या गझलेतील व्रुत्तात कोणती चुक आहे असे बरेच चर्चाप्रस्ताव , किंवा एखादी लघुकथा स्पर्धा आयोजित करण्याच मनात ठरवुन मी झोपी गेलो.

(समाप्त)

विनोदमुक्तकव्याकरणशुद्धलेखनसुभाषितेकृष्णमुर्तीज्योतिषशिक्षणमौजमजाप्रकटनमाहितीवादआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

3 Nov 2008 - 12:31 pm | अवलिया

पुढे तोच म्हणाला हा भैया जरी चेंगट असला तरी शेअर बाजारात मुक्तपणे भय पसरवत असतो आणि पुढे ही कथा गुढ होते तो राजेंच्या साथिने बाजारात मंदी आणन्याची धमकी म्हणे अर्थमंत्र्यांना देतो.
हा हा हा
राजे बघा हो हा काय म्हणतो ते...

आहे चांगला प्रयत्न आहे. लेखन करत रहा.

अवांतर - भयाचा मुद्दा तुम्ही काढलाच आहे तर एक माहिती.
भय इथले संपत नाही... Worst is yet to come....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Nov 2008 - 12:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मागील भाग वाचून पुढील भाग खुसखुशीत होईल असे वाटले होते. कृपया, नाराज होऊ नका पण,
रटाळ लेखनामुळे मिपाओळख भागाची मजा आली नाही.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा !!!

-दिलीप बिरुटे

सहज's picture

3 Nov 2008 - 12:46 pm | सहज

लेखातला सर्वात आवडलेला भाग
(समाप्त)

;-)

नाही यार चेतन. गेल्या ३३ आठवड्यात विशेषता ज्या काही दिग्गजांची नावे घेतलीस त्यांचे लेखन वाचुन बघ. मग ठरव तुच "मिपाओळख"ला न्याय दिलास का?

सर्व होतकरुंना विनंती असे लेखन करायच्या आधी सर्किट सरांचे [बिल्ला क्रमांक २२] लेख वाचुन बघणे मगच अश्या विषयांना हात लावणे.

पुलेशु.

जैनाचं कार्ट's picture

3 Nov 2008 - 12:49 pm | जैनाचं कार्ट (not verified)

हेच म्हणतो !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

चेतन's picture

3 Nov 2008 - 1:01 pm | चेतन

बिरुटे सर सहजराव आणि राजे स्पष्ट सांगितल्याबद्दल धन्यवाद. एकंदर काय चुकलं (जाउ दे काय नाही चुकलं ) हे साम्गितलं तर बर होइल. अर्थात सर्कीटसरांकडुन (बिल्ला २२) ते कळल तर आणखिनच चांगलं
असो...

नवशिका चेतन

पिवळा डांबिस's picture

6 Nov 2008 - 4:38 am | पिवळा डांबिस

चेतन,
लिहीतांना शब्दनिवडीला फार महत्व असतं. आपल्या मनातला आशय लोकांपर्यंत पोचवण्यासाठी शब्दांची निवड जर अचूक असेल तर जास्त परिणाम साधला जातो. ते प्रॅक्टिसने येतं, तू लिहीत रहा, तुला जमेल...
दुसरी गोष्ट म्हणजे लेखाची मांडणी! जर एकापुढे एक निबंधासारखे लिहीत राहिले (विशेषतः संवाद!) तर वाचकांना जड जातं. उदा. तुझ्याच लेखातला पहिला परिच्छेद मी रिऍरेंज करून इथे लिहिलाय, वाचून बघ आणि मग ठरव तुला काय वाटतं ते...

"भाउ पंधरा दिवस झाले बघ तु सांगितलेले आणि न सांगितलेलं सगळ येड्**सारखं वाचुन काढलं. आता मी पण काहितरी लिहाव म्हणतोय."
बहुतेक हा मिपावरचा दुसरा गटणे होणार वाटतं! तरी बरं पंधरा दिवसात यानि काही चर्चाप्रस्ताव टाकले नाहित.
"काय म्हणालास?"
" नाही, काही नाही!!! हे आपलं खुदं के साथ बातां! हे ही मिपावरुनच ढापलेलं, बर का!!" मी आपला पी.जे केल्याच्या थाटात म्हणालो.
तर हा हिरो तेव्ह्ढ्याच थंड्पणे म्हणतो कसा, "दादा, मिपावर दुसरर्‍याचं लिखाण प्रसिद्ध करायला परवानगी नाही आहे माहिते ना!"
"माहिते मला ते, बोलायला तर आहे ना! ते जाउ दे, मग काय लिहणार?"
"तोच विचार करतोय. हे बघ, एक्सेल शिट मध्ये लेखन प्रकार आणि प्रतिसाद यांचा आलेखचं काढलाय."
मी त्याची ति करामत आणि नको तिथे नको त्या गोष्टिचा वापर आजि म्या ब्रम्ह पाहिलेच्या थाटात पाहिला. सर्वात जास्त प्रतिसाद चर्चाप्रस्तावाला आणि ते ही वादविवाद या उपप्रकारात होते. म्हणलं कार्ट बरच हुशार दिसतयं!
खाली एक ठळक अक्षरात टिप होती "प्रतिसांदांची संख्या वाढविण्यासाठी मिनसे मध्ये सामिल व्हा!!"
आता पंधरा दिवसातली त्याची एव्हढी प्रगति पाहुन याला माझ्यासारख्या पामराकडुन काय पाहिजे याचचं टेन्शन आलं. याला निट ऊत्तर दिली नाहित तर हा एक तर माझा दंत विमा काढेल किंवा स्वतःचेच दात नको तिथे घुसवुन ड्राकुला बनेल बहुतेक. ( एकंदर हा व्यंकुची शिकवणिचा प्रकार होणार होता).

तू स्पेसिफिक काय ते सांगा म्हणालास म्हणून हे लिहिलं, राग नसावा....

(अवांतरः तू आपला बिरूटेमास्तरांची शिकवणी लाव, ते सेफ आहे! सर्किटमास्तरांकडे गेलास तर (शाब्दिक) छ्ड्या खायची तयारी ठेवावी लागेल (१० पैकी -४ मार्क वगैरे!!), हुशार पण लय मारकुटा मास्तर आहे तो!!!:))

चेतन's picture

6 Nov 2008 - 10:58 am | चेतन

सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. कधि पासुन याचीच वाट पहात होतो. #:S

सुधारण्याचा प्रयत्न राहिल.

अवांतर : गांधिजी म्हणतात आळस हा माणसाचा शत्रु आहे. आणि नेहरु म्हणतात माणसाने शत्रुवर प्रेम करावे.

टारझन's picture

6 Nov 2008 - 11:19 am | टारझन

गांधिजी म्हणतात आळस हा माणसाचा शत्रु आहे. आणि नेहरु म्हणतात माणसाने शत्रुवर प्रेम करावे.
खविस म्हणतो दोघांनाही फाट्यावर मारावे !!!

बाकी पिडु भाउंनी शिकवणी डेमो फुकटात दिला हो , अभिणंदण चेतण राव ... आम्हाला कधी असा फ्री डेमो नाही मिळाला

--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
मी मिपाचा , मिपा माझा

कुबड्या खवीस's picture

6 Nov 2008 - 11:52 am | कुबड्या खवीस

खविस तर मी आहे! मी नाही म्हणालो दोघांनाही फाट्यावर की सोट्यावर मारायला

पिंट्या सर्किट's picture

4 Mar 2009 - 8:29 am | पिंट्या सर्किट

तात्या ह्या कुबड्याच्या वहीत अजुनही एका सदस्याने आयपी ट्रेकर लावले आहेत. सदर सदस्यावर कारवाई कराल का?

पिंटू

विजुभाऊ's picture

3 Nov 2008 - 1:05 pm | विजुभाऊ

लेख वाचून झोप आली. इतके क्रीप्टीक झ्येपत नाही .

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

तात्या टारझन's picture

4 Nov 2008 - 6:09 am | तात्या टारझन

मझ्या सारख्य नव्हा मेमबराला हि ओळ्ख आवड्लि. बाकिच्यनी उगाचशिव्या दिल्या अहेत.

(नवा) तात्या

चेतन's picture

4 Nov 2008 - 10:45 am | चेतन

लेख वाचून झोप आली. इतके क्रीप्टीक झ्येपत नाही .

विजुभाउ स्पष्ट सांगितल्याबद्दल धन्यवाद (प्रभुसरांकडुन टिप घ्यायला पाहिजेत #:S )

तात्या टारझन मंडळ आपलं आभारी आहे (हा कोणता नविन हायब्रीड आयडी आहे :? )

नवशिका चेतन

टारझन's picture

6 Nov 2008 - 2:18 am | टारझन

(हा कोणता नविन हायब्रीड आयडी आहे )
हायब्रिड ची नवी लेटेश्ट जमात आहे , यात दोन्ही पुंकेसर टाकून बियाणे संकरीत केले जाते, आधी सारखी गरज नाही . (क्रिप्ट अफ्रिकाना)

आता पंधरा दिवसातली त्याची एव्हढी प्रगति पाहुन याला माझ्यासारख्या पामराकडुन काय पाहिजे याचचं टेन्शन आलं. याला निट ऊत्तर दिली नाहित तर हा एक तर माझा दंत विमा काढेल

मलाच कुछ भी नही झेप्या .. तो दुसरे लोक को क्या झेपेंगा :) याची एवढी प्रगती ? आणि याने आपल्याकडून काय मागितलं ?

बाकी चालू द्या!!!

--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
मी मिपाचा , मिपा माझा