✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

“पडणे” एक कला

द
दशानन यांनी
Mon, 12/15/2014 - 12:05  ·  लेख
लेख
दुसरा कोणी पडला तर त्याच्याकडे पाहून फिदीफिदी हसण्याची आपल्याकडे वाईट सवय आहे. पण त्यांना पाडणाऱ्या व्यक्तीने घेतलेले कष्ट दिसत नसतात असे माझे स्पष्ट मत आहे म्हणून मी “पडणे” एक कला हा लेख लिहितो आहे. सतत पडण्याची माझी दीर्घकालीन वाटचाल आहे, मी रस्तावर पडलो आहे, पाण्यात पडलो आहे, डोंगरावर पडलो, स्कूटर, बाईक, कार मधून देखील पडलो आहे, तसेच अनेक वेळा खड्यात देखील पडलो आहे, तसेच एकदा हवेतून देखील पडलो आहे. आता तुमच्या लक्षात आले असेच की “पडणे” या विषयावर बोलण्यासाठी माझ्यापेक्षा जास्त योग्य व्यक्ती या भूतलावर नाही आहे. काही लोक केळाच्या सालीवरून घसरून पडतात व मी “पडलो” असे तोंड वर करून सांगतात, अहो पण हे पडणे नाही आहे, हे चुकून केळाच्या सालीने तुमच्या पायाखाली यावे व तुम्ही पडावे एवढी साधी घटना आहे. पडणे एक कला आहे, एक आर्ट आहे. अनेक जण तर उभ्या उभ्या पडतात, का म्हणे तर चक्कर आली. अहो, दिवसभर व्यवस्थीत पाणी ढोसले असते, पोटाला मुठभर अन्न दिले असते तर काय बिशाद तुम्ही चक्कर येऊन पडाल? पडणे म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो, तुम्ही २०-२५ च्या वेगाने धावत जिना उतरत आहात व पाच एक जिने उतरल्यावर तुम्ही एका मोक्याच्या क्षणी उडाण करता व पुढे जिन्यावर पायाचा स्पर्श न होऊ देता तुम्ही शरीराच्या मदतीने बरोबर तळ मजल्यावर येता व लगेच हात झटकत उभे राहून मला काय झाले नाही, असे नाकातून आलेले रक्त शर्टाच्या उजव्या बाहीने फुसत सांगू शकलात म्हणजे तुम्ही योग्य रीतीने पडलात. अनेकदा आपण पडलो हे इतरांना सांगता यावे म्हणून काही महाभाग ठेचकाळले असले तरी “किती, जोरात मी पडलो!” असे बिनधास्त खोटे बोलून जातात, पण अश्या लोकांच्या मुळे आमच्या सारख्या सतत अभ्यास करून पडणारया लोकांच्यावर मान खाली घालण्याची वेळ येते हे त्यांना कळत नाही. पडण्याचे दुसरे सुंदर उदाहरण म्हणजे वाहन चालवताना पडणे (या विषयावर मी माझा पिय-चडी प्रबंध सादर केला आहे) वाहन चालवताना पडण्याचे अनेक प्रकार आहेत पण नेहमी ज्याचा आनंद घ्यावा म्हणजे वाहन घसरणे! वाहनावरून घसरून पडणे आणि वाहनासहित घसरून पडणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, अनेक महाभाग आम्ही पाहिले आहेत जे वाहनावर बसतानाच पडले. मी त्यांच्याबद्दल लिहित नाही आहे, मी वाहनासहित जे पडतात अश्या थोर लोकांच्याबद्दल सांगत आहे. तुमची गती किती ही असू शकते पण निदान नीट पडण्यासाठी ६०-७० किमी वेगाने चालणारे वाहन तुमच्याकडे हवेच हवे. डोक्यावर कायम हेल्मेट असावे (नाही तर हे पडणे तुमचे शेवटचेच पडणे होऊ शकते) गाडी योग्य जागी आली म्हणजे काहीतरी गाढवपणा करावा, उदा. उगाच पुढील ब्रेक मारणे, समोर रस्तावर खडी दिसत असली तरी वेग वाढवणे, समोरचा खड्डा आपल्याकडे पाहून खदाखदा हसतो आहे व आपण त्याला टाळू शकत नाही हे माहिती असून देखील टाळण्याचा प्रयत्न करणे, एकादी सुंदरी बाजूने जात असेल तर तिचा चेहरा पाहण्याचा निरर्थक प्रयत्न करणे, तीव्र उतार असेल तर झिगझ्याग पद्धतीने उगाच गाडीचा वेग वाढवत जाणे.. इत्यादी इत्यादी. आता यातील कोणताही एक गाढवपणा केला कि तुम्ही सहजपणे पडू शकता. लगेच पडता येत नाही, थोडा अभ्यास करावा लागतो, पण जमेल. अजून एक वाहनाची दोन्ही चाके वर झाली व तुम्हाला कोणी थोबाडावर पाणी मारून उठवले म्हणजे तुम्ही योग्य प्रकारे पडला नाहीत हे समजून घ्या व पुढील वेळी दक्ष रहा. जेव्हा आपण वाहनावरून पडत असू, तेव्हा शरीराचा धरणी सोबत होणारा प्रत्येक स्पर्श आणि स्पर्श तुम्हाला जाणवलाच पाहिले, जेव्हा धरणीमाते चरणी तुमचे डोके तुम्ही ३-४ दा ठेवाल तर तो सुखद स्पर्श तुमच्या आंतरमनात नाहीतर किमान खोपडीवर कोरला जायलाच हवा. पडताना आपले पाय, आपले हात, आपली उरलेली सर्व हाडे कुठे कुठे आहेत याचा अंदाज तुम्हाला असायलाच हवा जेणे करून नंतर डॉक्टरने एखादे हाड गायब केले तर तुम्हाला समजू शकेल. याचे जिवंत उदा. मीच आहे, मी एक उच्च कोटीची पडण्याची कला दाखवली होती, पायातील हाड बाहेर आलेले मी याची देही-याची डोळे पाहिले होते पण नंतर डॉक्टरने बील दिले कि पायाचे हाड सापडले नाही म्हणून रॉड घातला. तर आपल्या सर्व हाडांची दक्षता घ्या आणि हो, तुम्ही पडलेले आहात, बरं तुम्ही एकटे पडलेले नाही आहात, तुमचे वाहन.. ह्या ह्या ह्या.. विसरला काय राव!!!! तर ते वाहन एकतर तुमच्या पुढून घसरत असेल तर काळजी करण्यासारखे काही नाही, पण ते मागू घसरत येत असेल तरी काळजी करू नका, जे घडणार ते घडणार. मग थोड्यावेळाने सर्वकाही थांबेल, म्हणजे तुम्ही, तुमचे वाहन, मागचे ट्राफिक! घाबरून जायचे नाही, सावकाश हसत हसत उठायचे, हसणे मस्ट आहे, कारण तुमचे नाक तुटले असेल, किंवा बत्तीस पैकी काही शिल्लेदार तोंड सोडून गेले असतील, गालावर कुठे लागले असेल तर लगेच जाणवते. मग हळूच पाय हालवून पहा, पाय हालला, म्हणे तुम्ही हालवल्यावर हालला तर ओके, पण आपोआप लुडकला असेल तर जयपूर फुट स्वस्त झाले आहेत काळजी नसावी. पाय सलामत असतील तर हात हालवून पहा, मग मान, मग पार्श्वभाग.. दुखत तर सर्वत्र असेल पण कळ येत नसेल तर तुम्ही पुन्हा पडण्यास सज्ज आहात.. याची मी खात्री देतो. • नेहमी डोक्यावर हेल्मेटची सवय ठेवा, मी अनेक वेळा त्याचमुळे वाचलो आहे. आणि वाहन काळजीने, काळजीपूर्वक चालवा (आता मीच ३ दिवसापूर्वी पडलो, लगेच दुसऱ्याच दिवशी त्याच जागेवर अजून जोरात पडण्याचा पराक्रम केला आहे, शक्यतो हे विश्वरेकोर्ड माझ्या नावानेच लागेल. तरी घ्या मनावर आणि सुरक्षित रहा!)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
मांडणी
कला
पाकक्रिया
इतिहास
बालकथा
मुक्तक
भाषा
व्युत्पत्ती
विनोद
समाज
जीवनमान
औषधोपचार
प्रवास
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
सद्भावना
शुभेच्छा
आस्वाद
सल्ला
माहिती
संदर्भ
मदत

प्रतिक्रिया द्या
14406 वाचन

💬 प्रतिसाद (45)

प्रतिक्रिया

मी पयली

भिंगरी
Mon, 12/15/2014 - 12:08 नवीन
मिपावर पडलेली मी पयली का?
  • Log in or register to post comments

वाचून पडला असाल तर उत्तम आहे!

दशानन
Mon, 12/15/2014 - 12:11 नवीन
वाचून पडला असाल तर उत्तम आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी

वाचल्यावरच

भिंगरी
Mon, 12/15/2014 - 13:29 नवीन
धाडकन पडले आहे,तेही भरपूर खाऊन,पिऊन(पाणी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

जो पर्यंत "प्रेमात" पडत नाहीत

टवाळ कार्टा
Mon, 12/15/2014 - 12:14 नवीन
जो पर्यंत "प्रेमात" पडत नाहीत किंवा "आपटत" नाहीत तो पर्यंत तुम्ही "पडलाच" नाहीत ;)
  • Log in or register to post comments

तो काय माझा "प्रांत" नाही हा

दशानन
Mon, 12/15/2014 - 12:19 नवीन
तो काय माझा "प्रांत" नाही हा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अशांना मग "बायको" नामक "शक्ती

टवाळ कार्टा
Mon, 12/15/2014 - 12:22 नवीन
अशांना मग "बायको" नामक "शक्ती" तोंडघाशी पाडते =)) (कृ.ह.घे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

आज सकाळी फेसबुक वर खालील

दशानन
Mon, 12/15/2014 - 12:25 नवीन
आज सकाळी फेसबुक वर खालील कमेंट दिली होती ;)
"मी प्रेमात पडणे व प्रेमभंग यावर एवढे लिहले मिसळपाव या साईटवर की एका वाचक मित्राने लिहले होते "राजे, तुमची मोनोपॉली झाली आहे प्रेमभंग हा विषय. नवीन रक्ताला वाव दया" तेव्हा पासून तो विषय सोडला! "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

(No subject)

टवाळ कार्टा
Mon, 12/15/2014 - 12:32 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

प्रेमात 'पडल' तर ठिक आहे ,पण

जेपी
Mon, 12/15/2014 - 12:24 नवीन
प्रेमात 'पडल' तर ठिक आहे ,पण 'आपटल' तर.... "तु पारो झाल्यावर,मी देवदास झालो, चंद्रमुखीच्या शोधात,जिंदगी बरबाद केलो" अशी अवस्था होऊ शकते. *wink*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

या बाबतीत "उस्ताद आमिरखां"

टवाळ कार्टा
Mon, 12/15/2014 - 12:33 नवीन
या बाबतीत "उस्ताद आमिरखां" यांचा सल्ला नेहमी लक्षात ठेवावा....बस, ट्रेन और... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

जल्लां

पैसा
Mon, 12/15/2014 - 13:04 नवीन
परवा फेसबुकावर तुमचा पराक्रम पाहिला. टाईप करण्याइतपत हात जागेवर आला का?
  • Log in or register to post comments

डावा हात हातात आला आहे,

दशानन
Mon, 12/15/2014 - 13:09 नवीन
डावा हात हातात आला आहे, उजव्याची ३ बोटे काम करू लागले आहेत. पण सर्व पार्ट व्यवस्थित जागेवर येण्यासाठी १५ दिवस लागतील... बाकी ऑल ओके! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

खिखिखि!

पैसा
Mon, 12/15/2014 - 13:12 नवीन
कोण तरी डॉक्टरने सांगा प्लीज, आपल्या शरीरात एकूण किती हाडे असतात, म्हणजे या दशाननाला अजून किती वेळा हॉस्पिटच्या वार्‍या करायचा फर्स्ट टैम चान्स आहे? रिपीट लक्षात घेतलेले नाही! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

यावेळी नाक,खांदे हे दोन पार्ट

दशानन
Mon, 12/15/2014 - 13:14 नवीन
यावेळी नाक,खांदे हे दोन पार्ट माझ्याकडे आहेत हे समजले :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

शरिरात २०६ हाडं असतातं.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 12/15/2014 - 13:16 नवीन
शरिरात २०६ हाडं असतातं. बोले तो २०६ टाईप का सिर्फ हड्डी होता है! तोडते वक्त सोच्ते थे क्या =)) (रेफ्रन्स मुण्णाभाई येम.बी.बी.येस. =)) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आयला!

दशानन
Mon, 12/15/2014 - 13:20 नवीन
आयला! यातील माझी बघा... नाक, दोन खांदे, उजवा हात, एकदा डावा हात, एकदा दोन्ही हात, एका गुढगा.. डावा, एकदा उजवा पूर्ण पाय (तीन हाडे असतात, तिन्ही) तळपाय घे तुटण्यासाठीच निर्माण झालेले असतात म्हणून ते जमेत धरले नाही. एकदा कंबर, डोक्यावर १६ टाके आहेत पण कवटीला काय झाले असेल का नाही ते माहिती नाही म्हणून ती पण मोजत नाही. =)) =)) :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

(No subject)

टवाळ कार्टा
Mon, 12/15/2014 - 13:24 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

तुमचा ऑर्थोपेडिक्स डॉक्टर

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 12/15/2014 - 13:27 नवीन
=)) तुमचा ऑर्थोपेडिक्स डॉक्टर सगळ्यांना आमचा नेहेमीचा पेशंट आहे असं सांगत असेल ना? =)) तुमची हिस्टरी बघता फक्त जिभेचं हाड जागेवर आहे =)) ह.घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

मी सर्व ऑर्थोपेडिक्स डॉक्टर

दशानन
Mon, 12/15/2014 - 13:29 नवीन
मी सर्व ऑर्थोपेडिक्स डॉक्टर यांचे पोट भरावे म्हणून दर वेळी वेगळा पकडतो :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

हे घेउनच टाका आता

टवाळ कार्टा
Mon, 12/15/2014 - 13:29 नवीन
हे घेउनच टाका आता \m/ Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

आयडीया उत्तम आहे

दशानन
Mon, 12/15/2014 - 13:30 नवीन
आयडीया उत्तम आहे :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बरं आहे

पैसा
Mon, 12/15/2014 - 13:33 नवीन
हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर बायको लाटणे घेऊन वाटच बघत बसलेली असेल घरी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

१० डोकी लागतील आयर्न मॅन ला

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 12/15/2014 - 13:31 नवीन
१० डोकी लागतील आयर्न मॅन ला =)) आणि त्यांना आयर्न पेक्षा कॅल्शियमची जास्त गरज आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कॅल्शियमचा रतीब चालू असतोच!

दशानन
Mon, 12/15/2014 - 13:33 नवीन
=)) कॅल्शियमचा रतीब चालू असतोच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

@दशानन

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 12/15/2014 - 13:17 नवीन
@दशानन आपसे गिरा हुआ इन्सान आज तक नै देखा =)). काळजी घ्या. गेट वेल सुन!!! आणि दहाच्या दहा डोक्यांना एक एक हेल्मेट घ्या =))
  • Log in or register to post comments

(No subject)

टवाळ कार्टा
Mon, 12/15/2014 - 13:25 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

आपसे गिरा हुआ इन्सान आज तक नै देखा =))

दशानन
Mon, 12/15/2014 - 13:26 नवीन
=)) अनिल यादव नावाचा माझा दिल्लीत एक मित्र होता, त्याने जानेवारी २००५ ला पहिला अपघात करून घेतला ;) पाय तुटला, सलग त्या वर्षी त्याने त्याच जागी ३ वेळा अपघात करून घेतला ;) व टोटल सहा हाडे त्याची त्या वर्षी मोडली होती :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

पडण्याचा एवढा दांडगा अनुभव

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 12/15/2014 - 14:04 नवीन
पडण्याचा एवढा दांडगा अनुभव असेल तर पुढच्या लोकसभेला उभे रहाच . पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

कोणाच्या तिकीटावर?

भिंगरी
Mon, 12/15/2014 - 14:12 नवीन
कोणाच्या तिकीटावर? काँग्रेस की मनसे?
  • Log in or register to post comments

.......एक कला आहे, एक आर्ट आहे!

आयुर्हित
Mon, 12/15/2014 - 14:33 नवीन
आपण लिहिलेल्या वाक्यावरून मला मै तेरा हिरो आठवला. कि. क.. एक आर्ट है, एक कला है! ओ मेरी जान तेरा यूं बार बार गिरना, तो गलत बात है, अपने हड्डीयोंको को संकट में लाना, तो गलत बात है, Please get well soon!
  • Log in or register to post comments

चान चान!

प्यारे१
Mon, 12/15/2014 - 15:33 नवीन
चान चान!
  • Log in or register to post comments

हिहीहाह हसून हसून पडलो =))

अद्द्या
Mon, 12/15/2014 - 15:34 नवीन
हिहीहाह हसून हसून पडलो =)) =))
  • Log in or register to post comments

मस्तच !

बबन ताम्बे
Mon, 12/15/2014 - 15:35 नवीन
चांगले लिहीलेय.
  • Log in or register to post comments

तुमची गती किती ही असू शकते पण

मदनबाण
Mon, 12/15/2014 - 16:04 नवीन
तुमची गती किती ही असू शकते पण निदान नीट पडण्यासाठी ६०-७० किमी वेगाने चालणारे वाहन तुमच्याकडे हवेच हवे. डोक्यावर कायम हेल्मेट असावे (नाही तर हे पडणे तुमचे शेवटचेच पडणे होऊ शकते) हे चुकुन सुद्धा पुणेकरांना समजवण्याचा प्रयत्न करु नका ! :P स्वहित आणि आत्मरक्षा /सुरक्षा हा विषय त्यांना समजण्या पलिकडचा आहे, असे हल्लीच मिपावर झालेल्या चर्चेतुन मला उमगले आहे ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'मेक इन इंडिया' महत्त्वाकांक्षेला टाचणी!
  • Log in or register to post comments

राजे...दंडवत स्वीकारा...

मुक्त विहारि
Tue, 12/16/2014 - 01:45 नवीन
स्वतःच्या चुका मान्य करत, स्वतः वरच विनोद करणे, फारच कमी लोकांना जमते.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

श्रीरंग_जोशी
Tue, 12/16/2014 - 01:52 नवीन
असे लेखन करण्याची निमित्ते यापुढे तुम्हाला न भेटो ही प्रार्थना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

झोप आलीय

वेल्लाभट
Tue, 12/16/2014 - 11:39 नवीन
पडतो जरा आता.
  • Log in or register to post comments

पडलो..

योगी९००
Tue, 12/16/2014 - 12:53 नवीन
शारिरीक जास्त वेळा पडलो नाही पण "तोंडावर पडलो किंवा आपटलो" असे खूप वेळा झाले आहे... पडण्यावरून गडकर्‍यांच्या एक लेख आठवला. बाळकराम का तिंबूनाना यापैकी कोणाचे तरी वडील एकदम विक्षिप्त असतात. ते एकदा जिन्यावरून पडतात तर जिन्यावर राग काढण्यासाठी .."पाड पाड मला ..बघतोच किती वेळा पाडतोस ते" असे म्हणून मुद्दाम त्याच जिन्यावरून ४-५ वेळा पडून घेतात..(आणि शेवटी हॉस्पिटलात जातात). गडकर्‍यांनी या प्रसंगाचे छान वर्णन केले होते. बाकी लेख आवडला हे सांगायला विसरलोच..
  • Log in or register to post comments

पडण्याची कारणे ...

सुनील
Tue, 12/16/2014 - 14:02 नवीन
अशीच एक जुनी आठवण ... (माणूस कसा पडतो? का पडतो? माणसाचे पडणे कशावर अवलंबुन असते?)
  • Log in or register to post comments

(No subject)

टवाळ कार्टा
Tue, 12/16/2014 - 14:29 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

मोठी किंमत उगाच मोजावी लागते,

दशानन
Sat, 12/27/2014 - 20:53 नवीन
मोठी किंमत उगाच मोजावी लागते, जर काळजी घेतली नाहीतर.. मी आज २२ व्या दिवशी पण बेडरेस्टवर आहे. असो.
  • Log in or register to post comments

सुबोध खरे साहेब तुमच्यासाठी

दशानन
Sat, 07/08/2017 - 21:31 नवीन
सुबोध खरे साहेब तुमच्यासाठी :)
  • Log in or register to post comments

हा! हा!! हा!!!

सचिन काळे
Tue, 07/11/2017 - 16:53 नवीन
मी लक्षात रहाण्याएवढं कधी पडलो नाही, पण कल्याण स्टेशनवर भरगच्च भरलेल्या कर्जत गाडीतून उतरताना धक्काबुक्कीमध्ये एका टोणग्याचा पाय माझ्या डाव्या पायावर पडला आणि माझ्या पायात वाटीवाला चामड्याचा बूट असूनसुद्धा आतमध्ये माझे पाऊल अक्षरशः नाजूक फुलासारखे कुस्करले गेले. पाऊलातील बोटांची हाडे आतल्याआत एकमेकांवर घासली गेली आणि त्यांना स्क्रेचेस आले. चांगला महिनाभर घरी बसावे लागले होते. घरात ह्या खोलीतून त्याखोलीत जाताना सरळ न जाता खोलीच्या चारही भितींचा हाताने आधार घेत घेत पूर्ण वळसा घालत घालत जावे लागत असे.
  • Log in or register to post comments

हा हा

ट्रेड मार्क
Tue, 07/11/2017 - 23:53 नवीन
मी पण खूप वेळा पडलो आहे. डोक्याला २ ठिकाणी खोक, भुवईवर टाके, ओठावर आतून बाहेरून टाके, कॉलर बोन फ्रॅक्चर, उजव्या हाताची दोन्ही हाडे पूर्ण मोडलेली, पावलाला फ्रॅक्चर, म -८० चा एक्सेल घुसल्याने पाठीला झालेली ८ इंच मोठी जखम, हाताच्या एका बोटाचे मीच मारलेल्या कोयत्याने झालेले उभे २ भाग (नशीब हाड शाबूत राहिलं), रेझर ब्लेड माझ्याचमुळे चुकून हाताच्या शिरेवर लागल्याने न थांबणारे रक्त ई उल्लेख करण्याजोग्या आहेत. दुचाकी व कार मध्ये बरेच अपघात झाले पण नशिबाने फारसं लागलं नाही. काही काही अपघात तर फारच विचित्र आणि गमतीशीर होते तर काही सहनशक्तीची परिसीमा बघणारे होते. उजव्या हाताची हाडे एका डोंगरावर फ्रॅक्चर झाली. सकाळी १० वाजता झालेलं फ्रॅक्चर आम्ही तसेच डोंगर उतरून खाली आलो, पुढे चालत स्टेशनवर आणि लोकल मधून घरी. रविवार संध्याकाळ असल्याने डॉक्टर आणि एक्स-रे शोधत पायपीट असं करत करत रात्री १० वाजता प्लास्टर घातलं.
  • Log in or register to post comments

बापरे!!!

सचिन काळे
Wed, 07/12/2017 - 03:49 नवीन
@ ट्रेडमार्क, खरंच ग्रेट आहात तुम्ही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा