नमस्कार! १९ ऑगस्ट १८३९ ला पॅरिसमधे छायाचित्रणकलेची अधिकृतरीत्या सुरुवात झाली. या घटनेला आज १७५ वर्षे होत आहेत.
या निमित्ताने मिपावर छायाचित्रणाची स्पर्धा घ्यावी असा एक प्रस्ताव श्री सर्वसाक्षी यांच्याकडून आला आहे. मिपावर अनेक गुणी कलाकार, छायाचित्रकार आहेत. मिपा सदस्य-स्पर्धकांना कोणताही एक विषय देऊन एकच एक स्पर्धा घेण्यापेक्षा स्पर्धामालिका सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्वात पहिल्या स्पर्धेचा विषय मानवनिर्मित स्थापत्य हा आहे. नव्या, जुन्या, प्राचीन, अर्वाचीन इमारती आणि स्थापत्य यांची तुम्ही काढलेली छायाचित्रे इथे या धाग्यावर प्रकाशित करावीत ही विनंती. आजपासून आणखी ७ दिवस, म्हणजे २६ तारखेपर्यंत प्रत्येकी ३ छायाचित्रे प्रकाशित करू शकता. त्यानंतर ७ दिवसपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय या धाग्यावर प्रकाशित केला जाईल.
स्पर्धेचे अन्य नियमः
१)प्रत्येकजण ३ चित्रे अपलोड करू शकतो.
२)सर्व सदस्य मतदान करणार असल्याने संपादकही सदस्य म्हणून स्पर्धेत भाग घेऊ शकतात.
३)पहिल्या भागानंतर यापुढेही अन्य विषय घेऊन ही स्पर्धा सुरू राहील. यात सदस्यही विषय सुचवू शकतात.
४)छायाचित्राचा exif data शक्यतो असावा.
५)ह्या शिवाय छायाचित्र कुठे काढलेले आहे, ठिकाणाची थोडक्यात ओळख आदि माहिती चित्रासोबत द्यावी.
६)प्रोसेसिंग वैगरे केले आहे का याची माहिती द्यावी.
७)फक्त मोबाईलवरून काढलेल्या फोटोंसाठी स्वतंत्रपणे स्पर्धा घेण्यात येईल. पाहिजे तर अशी छायाचित्रे या स्पर्धेतही भाग घेऊ शकतात, पण क्रमांकाबद्दल अंतिम निर्णय मिपा सदस्यांचा असेल.
८)स्पर्धेच्या विजेत्यांना प्रशस्तीपत्रके ईमेल करण्यात येतील.
स्पर्धेत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्यास हातभार लावावा ही विनंती. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!
प्रतिक्रिया
22 Aug 2014 - 12:58 pm | प्रशांत
+१
शांघाईच्या पर्ल टॉवर सुद्धा भारीच
22 Aug 2014 - 12:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
फोटोंच्या विषयांबद्दल थोडी माहिती:
१. बांतेय श्रेई मंदिर :
१० व्या शतकातले बांधकाम.
२. लेशान बुद्ध :
बांधकाम इ स ७१३ ते ८०३ पर्यंत.
मूर्तीची उंची ७१ मीटर (२३३ फूट).
३. पर्ल टॉवर :
उद्घाटन इ स १९९४ मध्ये.
एकूण उंची ४६८ मीटर (१५३५ फूट).
काचेची जमीन असलेल्या पर्यावेक्षक सज्जेची उंची २५९ मीटर (८५० फूट)
21 Aug 2014 - 10:33 pm | संजय क्षीरसागर
याबाबतीत माझा सॉलीड गोंधळ व्ह्यायला लागलायं. त्यापेक्षा प्रत्येक सदस्याला शंभर मार्कांचा कोटा द्या म्हणजे हात सैल सोडता येईल.
21 Aug 2014 - 11:38 pm | खटपट्या
बरोबर !!
21 Aug 2014 - 11:59 pm | किल्लेदार
गोल गुम्बज, बिजापूर. second largest dome in the world.
कॅनन ४५० डी , १८-५५. HDR प्रोसेसिंग
22 Aug 2014 - 12:06 am | किल्लेदार
जुना फोटो आहे. चांगल्या रीसोल्युशन चा सापडला नाही.
22 Aug 2014 - 12:17 am | किल्लेदार
इसा खान टोम्ब … दिल्ली
22 Aug 2014 - 10:07 am | संजय क्षीरसागर
तुम्हाला विजयी घोषित करुन टाकू!
22 Aug 2014 - 10:32 am | सूर्य
दोन्ही फोटो खुप छान.
- सूर्य.
22 Aug 2014 - 10:34 am | सुहास..
सुर्य , तुझ्या ईन्ट्रीची वाट बघतोय ...
22 Aug 2014 - 10:26 am | स्पा
अप्रतिम फोटो येतायत
सहीच .
वेल्लाभट चा पायऱ्यांचा फोटू कहर आलाय
वल्लीचा perspective सहीये
अतिवास - मझार ए शरीफ अप्रतिम .
चिंतामणी काकांनी पुलाचा टाकलेला फोटो खूप आवडला , रिफ्लेक्शन जबर पडलंय
kohalea ह्यांनी HDRI चा झकास प्रयोग केलाय
बोका - हुमायून मकबरा, खल्लास आलाय , लायटिंग आवडले
एक्का काकांनी टाकलेला शेवटचा फोटो धडकी भरवणारा आहे
किल्लेदारांचा इसा खान टोम्ब पण मस्त आहे :)
22 Aug 2014 - 11:10 am | खटपट्या
चिंतामणी यांचा पुलाच्या फोटो मधील आकाश जबरी दिसतंय
किल्लेदार यांचे दोन्ही फोटो कहर आहेत
सागर पराडकर यांचे फोटो अजूनही दिसत नाही आहेत
निकाल काही लागो मी या सर्व फोटोंचे प्रिंट आउट काढणार, जमल्यास फ्रेम करणार.
22 Aug 2014 - 12:06 pm | मदनबाण
मस्तच... सर्व स्पर्धकांना शुभेच्छा ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis
22 Aug 2014 - 12:16 pm | पैसा
तू नाही का फोटो देत?
22 Aug 2014 - 12:20 pm | मदनबाण
प्रयत्न करतो... सध्या कामाच्या ओझ्या खाली गाडलो गेलो आहे. सवड मिळालीच तर नक्की टाकेन. :)
आता जरा आठवभरात येउन जाउन वाचलेल्या लेखांसाठीचा प्रतिक्रिया देण्याचा कोटा पुर्ण करतो आहे. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis
22 Aug 2014 - 12:59 pm | प्रचेतस
एकसे एक भारी फोटो टाकलेत सदस्यांनी.
मतदान लै अवघड करून ठेवलेय.
22 Aug 2014 - 1:39 pm | गणपा
आहाहा !
एकाहुन एक सुंदर प्रकशचित्रं या निमित्ताने पहायला मिळतायत.
सर्व स्पर्धकांना ऑल द बेस्ट.
अन मायबाप मिपाकर परिक्षकांना शुभेच्छा.
(त्यांना खरच याची गरज लागणारे) ;)
22 Aug 2014 - 1:43 pm | इनिगोय
चंगळ! चंगळ!! चंगळ आहे अगदी..
खटपट्याशी सहमत. सगळेच फोटो संग्रही ठेवण्यासारखे आहेत.
22 Aug 2014 - 2:23 pm | nishant
Duomo, Florence, Italy.
Camera NIKON D7000
Lens 18.0-105.0 mm f/3.5-5.6
Focal Length 105mm
Exposure 1/500 secs
F Number f/8
ISO 100
Camera make NIKON CORPORATION
Photo processed in Lightroom 4.4
Krakow market hall, Poland.
Camera NIKON D7000
Lens 18.0-105.0 mm f/3.5-5.6
Focal Length 21mm
Exposure 10 secs
F Number f/8
ISO 100
Camera make NIKON CORPORATION
Photo processed in Lightroom 4.4
Sea link, Mumbai.
Camera NIKON D7000
Lens 18.0-105.0 mm f/3.5-5.6
Focal Length 45mm
Exposure 1/80 secs
F Number f/8
ISO 100
Camera make NIKON CORPORATION
Photo processed in Lightroom 4.4
22 Aug 2014 - 2:34 pm | आतिवास
अनेक फोटो इतके छान आहेत की तीन निवडताना इतर अनेकांवर अन्याय होणार. म्हणून मतदान न करण्याचा पर्याय निवडला जाईल बहुधा :-)
अवांतर : त्यामुळे खरं तर स्पर्धा आणि परीक्षा हव्यात का? निदान प्रौढांच्या राज्यात? इतके सुंदर फोटो पाहायला मिळाले या निमित्ताने; हे पुरेसं नाही का?
22 Aug 2014 - 3:46 pm | सुधीर
धागा डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. तीन फोटो निवडणं कठीणच दिसतेय.
22 Aug 2014 - 3:57 pm | अजया
पोलंड,क्रॅको मार्केटहाॅल फोटो कातिल आहे.
22 Aug 2014 - 7:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा सुंदर म्हणु की तो असं झालं आहे, कोणाला तरी मतदान करण्यापेक्षा कोणावर अन्याय होईलच म्हणुन फक्त आस्वाद घेईन. नो वोटींग. :)
-दिलीप बिरुटे
23 Aug 2014 - 6:07 am | कवितानागेश
नो वोटिन्ग.
22 Aug 2014 - 8:42 pm | बाळ सप्रे
हे माझ्याकडून

जुनं महाबळेश्वर
टाउन हॉल - शेफिल्ड

स्वामीनारायण मंदीर - लंडन

23 Aug 2014 - 9:46 am | पैसा
पहिले दोन विशेष आवडले.
23 Aug 2014 - 10:27 am | प्रचेतस
पहिला फोटो महाबळेश्वरातल्या कृष्णामाई मंदिराचा आहे. प्रत्यक्षात ते एक शिवमंदिर आहे.
५००० वर्षांपूर्वीचे मंदिर असे तिकडे म्हणतात एकंदरीत बांधकामाच्या शैलीवरून १३ व्या शतकातील आहेतसे दिसते. मंदिरांच्या भिंतीवर असलेली नाग आणि गरुडाची शिल्पे रोचक आहेत.
23 Aug 2014 - 12:03 pm | सानिकास्वप्निल
शेवटून दोन आवडले
खासकरून आमच्या शेफिल्डच्या टाऊनहॉलचा जास्तं ;)
23 Aug 2014 - 12:20 pm | समर्पक
स्थापत्यविशेषः चॅपेल् ऑन द रॉक् विषयी एका 'जगातील सर्वात सुंदर चर्च' अशा नावाच्या लेखात मी पहिल्यांदा वाचले. आणि त्याप्रमाणेच ही जागा खरंच खूप सुंदर आहे. जुन्याचे जुनेपण अधिक खुलवण्यासाठी पिवळ्या फ़ोर्ड मस्टॅंग् चे प्रयोजन (विरोधाभासप्रयोग).
छायाचित्रविशेषः उन्हात या गाडीचा रंग फार पांढरट होतो (bleach effect), त्यामुळे योग्य प्रमाणात ढगाळ वातावरण मिळेपर्यंत तीनदा जाणे झाले.
छायाचित्रविवरणः
Canon EOS REBEL T3i
f/18 1/200 ISO-1600 70mm
स्थापत्यविशेषः हे कोणाचे घर आहे महिती नाही पण गूगल मॅप वर स्नोबोर्डिंग् स्लोप् शोधताना सापडले. गर्द झाडीतला बंगला जाम आवडला, विशेषतः फ़रशीची नक्षी, जणू आकाशातून चांगले दिसावे याच हेतूने बांधले आहे...
https://maps.google.com/maps/@39.1917166,-106.8336454,93m/data=!3m1!1e3
छायाचित्रविशेषः त्या बंगल्यावरून पॅराग्लायडिंन्ग् करत काढलेला हा फोटो आहे. त्यामुळे बरेचसे श्रेय योग्य प्रमाणात आणि योग्य दिशेने असलेल्या वा-याला जाते.
छायाचित्रविवरणः
Canon PowerShot S5 IS
f/4 1/640 ISO=80 30mm
स्थापत्यविशेषः रामेश्वरला जाताना समुद्रावरील हा सेतू.
छायाचित्रविशेषः रेल्वेतून काढलेला हा फोटो आहे. मला आवडण्याचे कारण म्हणजे १/३ नियम अगदी काटेकोर पणे पालन झालेला आहे (१/३ पाणी, २/३ आकाश्)
छायाचित्रविवरणः
Canon PowerShot S5 IS
f/4 1/640 ISO=80 6mm
23 Aug 2014 - 1:16 pm | पैसा
तिन्ही फोटो क्लासिक!
24 Aug 2014 - 7:33 am | राघवेंद्र
तिनही फोटो मस्त आहे.
24 Aug 2014 - 11:23 am | खटपट्या
तिनीही फोटो कहर आलेत
23 Aug 2014 - 1:35 pm | बोका
हंपी येथील पायर्यांची विहिर

मूळ रंगीत चित्र काळेपांढरे केले. रेषा आणि आकारांना उठाव देण्यासाठी कॉन्ट्रास्ट जास्त वाढवला .
अनावश्यक भाग कातरला.
कॅनन EOS 1000D
लेन्स - टॅमरॉन 17-50mm @ 17mm
1/500, f/7.1, आयएसओ 200
23 Aug 2014 - 2:53 pm | सानिकास्वप्निल
नीड नदीवरचा रेल्वे व्हायाडक्ट (पूल) - Knaresborough Castle मधून टिपलाय.
Camera- Canon EOS 550D
F-stop- f/5
Exposure Time - 1/500 sec
ISO - 100
Focal Length - 55mm
Flash Mode - No Flash
Post processing - Picasa
आर्सेलरमित्तल ऑर्बिट - ऑलिंपि़क पार्क, स्ट्रॅटफोर्ड.
Camera - Canon EOS 550D
F-stop - f/4.5
Exposure Time - 1/4 sec
ISO-2000
Focal length- 21mm
Flash Mode - No Flash
Post processing - Picasa
Heage पवनचक्की १७९७ मध्ये बांधली व २००२ मध्ये पुनर्स्थापना केली.
Heage पवनचक्की - चेस्टरफिल्ड रोड, बेल्पर
Camera - Canon EOS 550D
F-stop - f/5
Exposure Time - 1/640sec
ISO -100
Focal Length - 18mm
Flash Mode - No Flash
Post processing - Picasa
23 Aug 2014 - 6:05 pm | एस
क्या बात है. नुसतीच छायाचित्रे नव्हे, तर त्यामुळे कित्येक ठिकाणांचीही ओळख होत आहे. धन्यवाद.
23 Aug 2014 - 9:25 pm | संजय क्षीरसागर
(समर्पकासमवेत, त्यांचा रामेश्वरचा फोटो इथे ठेवून) वेगळ्या विभागात हालवण्यात यावे. आणि दोघांना विजयी घोषित करुन मग स्पर्धा घ्यावी असे सुचवतो.
23 Aug 2014 - 9:59 pm | सानिकास्वप्निल
संक्षी
भारताबाहेरच्या स्थळांचे फोटो टाकू नयेत असा नियम दाखवाल का कृपा करून?
23 Aug 2014 - 10:33 pm | अजया
परदेशी बनावट? बरेच फोटो आहेत की आधीही आलेले परदेशातल्या वास्तुंचे!!
23 Aug 2014 - 10:55 pm | प्यारे१
तै तै, सर तुम्हाला विजयी घोषित करत आहेत हो!
म्हणजे तुम्ही ऑलरेडी जिंकला आहात असं म्हणतात ते.
ग्लास अर्धा भरलाय म्हणा. (मोदी असाल तर अर्धा पाण्यानं अर्धा हवेनं असा पूर्ण भरला म्हणा) बी+ ;)
23 Aug 2014 - 10:04 pm | प्यारे१
किती घाई किती घाई सर?
अवांतरः ह्यासाठी साईपदयात्रा कराव्यात. श्रद्धा आणि मुख्यत्वे 'सबुरी' जमते. ;)
23 Aug 2014 - 11:46 pm | संजय क्षीरसागर
हे निदर्शनास आणून देतो.
24 Aug 2014 - 1:48 am | प्यारे१
त्यांचा प्रश्न चुकीचा नव्हता.
बाकी आपण घाई करता आहात/ नेहमीच असता असं निदर्शनास आणून देतो.
ह्यानंतरचा प्रतिसाद साहजिकच आपण टाकणार आहात नि तो ह्या विषयाबाबतचा शेवटचा असेल.
24 Aug 2014 - 2:10 am | संजय क्षीरसागर
हे निदर्शनास आणून देण्याची गरज नाही.
24 Aug 2014 - 11:45 pm | प्यारे१
मी पामर. चूकच झाली. तुम्ही कुठे... मी कुठे??
23 Aug 2014 - 9:40 pm | जातवेद
१. तोक्यो मधिल राजाचा महाल
EXIF: Canon EOS 550D - F/४.५ - १/२००० - ISO१०० - -१.५ EV - ४०mm
२. लोटस टेंपल, दिल्ली
EXIF: Canon EOS 550D - F/५.६ - १/३५० - ISO१०० - -०.५ EV - १८mm
३. ताज महाल, आग्रा
EXIF: Canon EOS 550D - F/८ - १/४५ - ISO१०० - -०.५ EV - २४mm
23 Aug 2014 - 11:42 pm | संजय क्षीरसागर
तोक्योमधल्या राजमहालाबद्दल परदेशी-वास्तु फोटो विभागात (पुन्हा) पहिला क्रमांक (विभागून), आणि दोन्ही मिळून असलेल्या संयुक्त स्पर्धेत अंतिम विजयी घोषित करतांना मला आनंद होत आहे!
25 Aug 2014 - 8:27 pm | जातवेद
बाकी परिक्षक ठरवतीलच. बघु :)
23 Aug 2014 - 9:57 pm | पैसा
सगळे सुंदर फटु!
23 Aug 2014 - 10:03 pm | जातवेद
सर्वांनी १,२,३ क्रमांक देण्याऐवजी, चढते क्रमांक द्यावेत म्हणजे बाकिच्यांना मत द्यायला सोपे पडेल.
उदा. सदस्य क्र. १ फोटो - १, २, ३
सदस्य क्र. २ फोटो - ४, ५, ६
अर्थात आता बरेच फोटो आलेत त्यामुळे हे सध्यापुरते तरी शक्य नाही.
23 Aug 2014 - 10:26 pm | खेडूत
केरळ मधील हाउसबोट
लंडन येथील टॉवरब्रिज. हा उघडून बोट जाताना पहायला मजा येते. पुलावरचं ट्राफिक तेव्हढा वेळ दोन्हीकडे थांबून रहातं
कोलोझीयम: रोम- इटली येथील क्रीडा प्रेक्षागृह
क्यामेरा: सोनी डी एस सी डब्ल्यू ३५
कसलेही पोस्ट प्रोसेसिंग केलेले नाही
23 Aug 2014 - 11:01 pm | वेल्लाभट
काय जबरा फोटो येताय्त राव!
24 Aug 2014 - 10:23 am | मदनबाण
१} राजवाडा



माहिती इथे :- http://en.wikipedia.org/wiki/Rajwada
२} राजवाड्यातील आतील भाग,त्यावेळी त्या जागेचे काम चालु होते असं पुसटस आठवतय.
३} मार्तण्ड मंदिर,जूना राजवाडा {शिवालय} प्रवेश द्वार :-
कॅमेरा :- निकॉन पी-१००
* कोणतेही इमेज प्रोसेसिंग केले नाही, फक्त फोटो कंप्रेस केले आहेत.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा ही जलवा... :- Wanted
24 Aug 2014 - 11:30 am | संजय क्षीरसागर
कॅमेर्याचा अँगल जमलेला नाही.
25 Aug 2014 - 9:01 pm | सूड
तुम्हाला सग्गळ्यातलं सग्गळं कळतं नै?? नवलच हो!!
26 Aug 2014 - 12:55 pm | असंका
आपले तीनही फोटो वेगात खाली स्क्रोल केले तर जवळ जवळ आल्यासारखे वाटतात. आणि वायसे वर्सा. त्यातल्या त्यात तिसरा फोटोत तर फारच.
24 Aug 2014 - 12:29 pm | मदनबाण
१} पहिल्या फोटोत प्रवेशद्वारा सकट अख्खी वास्तु एका फ्रेम मधे घेण्याचा प्रयत्न केला आहे, हा भाग रहदारीचा आहे, त्यामुळे वाहने फोटोच्या फ्रम मधे न येता फोटो काढण्याचा प्रयत्न केला होता. राजवाड्या समोरच एक बाग आहे, त्यावरील कठड्यावर चढुन हा फोटो काढला आहे.
या दुव्यावरचा फोटो पाहुन मी काय सांगतोय ते नीट समजेल :- http://pixeldo.com/showcase/00aerials/rajwadaaerial/rajwada.jpg
३) या फोटोत समोर असलेल्या गणपती बाप्पाला नजरे समोर ठेवुन फोटो काढला आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा ही जलवा... :- Wanted
24 Aug 2014 - 8:37 pm | संजय क्षीरसागर
ताजमहाल भोवती इतकी गर्दी असून देखिल, केवळ त्याच्यावरच नज़र खिळून राहाते आणि ती गर्दी जाणवत सुद्धा नाही.
त्यामुळे प्रवेशद्वाराची भव्यता झाकोळली आहे.
24 Aug 2014 - 3:38 pm | चित्रगुप्त
१. पॅरिस मधील सीन नदीचे एक दृष्य.

हा फोटो मुख्यतः ढगाळ आकाश आणि उन्ह-सावलीचा खेळ हे टिपण्यासाठी घेतला होता. उजवीकडील झाडाची पाने फोटोत यावीत म्हणून बराच खटाटोप करावा लागला होता, कारण नेमक्या ठिकाणी उभे राहणे कठीण होते. डावीकडील उंच मनोरावाली इमारत १०व्या ते १४व्या शतकात राजवाडा, नंतरच्या काळात तुरुंग म्हणून वापरात होती.
कॅमेरा: कॅनन पॉवरशॉट एस ९५. (अगदी डावीकडील इमारत जरा गडद केली आहे).
२. मोहाक नदीच्या तीरावरील एक घर (क्लिफ्टन पार्क, न्यूयॉर्क राज्य).

झाडाच्या लहान-मोठ्या फांद्यांचे जंजाळ, रापलेले गवत, आणि त्यातून अस्फुट दिसणार्या लाकडी घराचे खांब-कठडे, या सर्वांमुळे या दृष्याला लाभणारा झिरझिरीत- भंगुर पोत, हा या चित्राचा मुख्य विषय.
कॅमेरा: कॅनन पॉवरशॉट एस ९५.
३. फॉन्तेनब्लू प्रासाद, फ्रान्स.

नेपोलियनच्या आवडत्या या प्रासादाची इमारत आणि तिचे थरथरते प्रतिबिंब, डावी-उजवीकडील एकमेकांना तोलून धरणारी गडद झाडे, खालची अंधारातली जमीन, उजवीकडली जुनी रोमन मूर्ती आणि कलता झाडाचा बुंधा, या सर्वातून जाणवणारी 'स्थिरतेतली गतिमानता' हा या चित्राचा विषय.
कॅमेरा: कॅनन पॉवरशॉट एस ९५.
(हे तिन्ही फोटो मी विकिमीडिया कॉमन्स वर टाकले आहेत).
24 Aug 2014 - 8:28 pm | संजय क्षीरसागर
आणि दुसर्या फोटोत, साध्याशा विषयाला चित्रकाराची नज़र लाभली आहे.
तिसर्या फोटोत मात्र अनेक कल्पना एका फोटोत बसवतांना, नेपोलियनच्या प्रासादाची भव्यता हरवल्यासारखी वाटते आहे.
24 Aug 2014 - 10:27 pm | किल्लेदार
इब्राहीम रोजा , बिजापूर
कॅनन ४५० D , लेन्स १८-५५.
खरं तर हम्पी चा पाषाण रथ टाकायचा होता फायनल एन्ट्री म्हणून पण हा फोटो जमून गेला आहे एखाद्या रेसिपी सारखा.
हम्पी चे फोटोज नंतर कधितरी ………
25 Aug 2014 - 1:46 pm | किल्लेदार
याच वास्तू चे काही वेगळ्या कोनातून काढलेले फोटोज आहेत. ते नंतर शेअर करॆन. आत्ताच टाकले तर मला स्पर्धेतून बाद करतील परिक्षक .
25 Aug 2014 - 4:17 pm | पैसा
बाद करणार नाही, पुढचे फोटो स्पर्धेसाठी नाहीत म्हणून तिथेच लिहून टाकू!
पण या फोटोंचा एक धागा अवश्य काढा! खूपच छान होईल!
25 Aug 2014 - 12:47 am | सर्वसाक्षी
१) रामसिस द्वितिय, अबु सिंबेल - इजिप्त. भव्य मंदिर हा स्थापत्याचा नमुना. आणि ते मंदिर हलवुन पुन्हा बांधणे हा स्थापत्याचा चमत्कार

Camera NIKON D60
Lens -
Focal Length 18mm
Exposure 1/250
F Number f/8
ISO 200
Camera make NIKON CORPORATION
२) जयपुरचा सुप्रसिद्ध हवामहल

Camera C770UZ
Lens -
Focal Length 14.8mm
Exposure 1/200
F Number f/4
ISO 64
३) राजपुतांचा मानबिंदु असलेल्या चितोडगढ येथील विजयस्तंभ

Camera C770UZ
Lens -
Focal Length 8.2mm
Exposure 1/800
F Number f/4
ISO 64
25 Aug 2014 - 4:14 am | जुइ
स्प्लिट रॉक लाईटहाउस - मिनेसोटातील लेक सुपिरिअरच्या काठावरील उंच खडकावर वसलेल्या या दीपस्तंभामुळे गेल्या शतकात बोटींचे अनेक अपघात टळले आहेत. १९६९ मध्ये निवृत्त झाल्यानंतर हे स्थळ पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जसेच्या तसे राखून ठेवण्यात आले आहे.
कॅमेरा - सोनी नेक्स ५ एन
डॉल्बी थिएटर हॉलिवूड कॅलिफोर्निया (पूर्वीचे कोडॅक थिएटर) - ऑस्कर पारितोषिक सोहळा येथे पार पडतो.

कॅमेरा - निकॉन एस एक्स ५७०
मात्री मंदीर औरोविल - स्वामी अरविंद यांच्या आश्रमाच्या मध्यभागी वसलेले आहे.

कॅमेरा - कॅनन एस एक्स १२० आय एस; या चित्रावर पिकासाचे ऑटो एनहान्स वापरले आहे.
25 Aug 2014 - 11:44 am | आतिवास
तिस-या प्रकाशचित्राच्या माहितीत काही दुरुस्ती:
"मातृमंदिर"
"योगी" अरविंद किंवा श्री अरविंद (त्यांचा "स्वामी" असा उल्लेख माझ्या वाचनात कधी आला नाही; कदाचित काही लोक तसा उल्लेख करत असतीलही)
हे स्थान अरविंद आश्रमाच्या मध्यभागी नसून त्यापासून साधारण १० किलोमीटर अंतरावर आहे.
इथं अधिक माहिती आहे.
25 Aug 2014 - 5:45 pm | जुइ
पर्यटक म्हणून घाईगडबडीत भेट दिल्याने चूकीची माहिती दिल्या गेली. याबद्दल क्षमस्व. यापुढे अधिक काळजी घेईन.
27 Aug 2014 - 1:14 pm | आतिवास
"क्षमस्व" ची गरज नाही हो!
मला माहिती होती; म्हणून दुरुस्ती केली इतकंच!
25 Aug 2014 - 11:51 am | स्पा
अप्रतिम फोटो येतायेत जेब्बात
मझा आ गया :)
25 Aug 2014 - 12:02 pm | पैसा
सर्वांना मनापासून धन्यवाद!
25 Aug 2014 - 5:35 pm | प्रशांत
अजिंठा लेणी क्र. १८


फॉन्तेनब्लू , फ्रांस
25 Aug 2014 - 8:05 pm | प्रचेतस
उपरोल्लेखित चैत्यगृह १८ क्रमांकाची लेणी नसून २६वी आहे. ह्यातच महापरिनिर्वाण आणि मारविजयचे प्रसंग शिल्पांकीत केलेले आहेत.
25 Aug 2014 - 9:07 pm | प्यारे१
अरे नक्की कितव्या क्रमांकाची? १७, १८ की २६
26 Aug 2014 - 10:39 am | प्रशांत
काय प्यारे.... वल्ली बोल्ला ना २६ तरी सुद्धा प्रश्न.
25 Aug 2014 - 9:14 pm | प्रचेतस
स्पर्धेसाठी नाही
पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिराची पार्श्वभिंत.
26 Aug 2014 - 4:59 am | रेवती
सर्व चित्रे आवडली.
26 Aug 2014 - 10:49 am | पैसा
आज स्पर्धेत भाग घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
26 Aug 2014 - 7:57 pm | एस
आणि आयएसटी का इडीटी? :-)
26 Aug 2014 - 8:16 pm | पैसा
वाटलंच होतं, कोणतरी विचारणार म्हणून. मला वाटतं, जास्तीत जास्त लोकांना भाग घेता यावा म्हणून आपण पी एस टी रात्री १२ पर्यंत एन्ट्र्या घेऊयात!
26 Aug 2014 - 8:45 pm | श्रीरंग_जोशी
मग मतदान सुरू होण्याची वेळ नेमकी कोणती?
मला वाटले होते भाप्रवे २७-ऑगस्ट-२०१४ ००:००:०१ वाजता.
27 Aug 2014 - 12:11 am | पैसा
तुमच्या हिरव्या देशातले लोक ओरडले असते ना, शिवाय १९ ला धागा टाकायला तसा उशीर झाला होता. आता पी एस टी आणि भा प्र वे यात १२.३० तासांचा फरक आहे ना, म्हणजे सगळ्यांना पुरेसा वेळ मिळेल.
27 Aug 2014 - 12:25 am | श्रीरंग_जोशी
माझ्या माहितीप्रमाणे हिरव्या देशातले लोक शांतताप्रेमी आहेत ;-).
बादवे, मतदानासाठी एखादी आदर्श पद्धत असावी असे सुचवतो.
उदा. प्रतिक्रियेमध्ये सदस्याने लिहावे
यापेक्षा अधिक सुटसुटीत पद्धत कुणी सुचविल्यास उत्तमच.
26 Aug 2014 - 11:06 am | Keanu
१. सिअॅटल शहारात १९६२ मधे World's Fair साठी बांधण्यात आलेलं ज़गवि़ख्यात Space Needle. अमेरीकेच्या पश्चिम किनार्यावरील त्याकाळातील सर्वात उंच इमारत.

(20mm, f/16, 1/2500, ISO 100)
२. शिंदे छत्री - महादजी शिंदे यांची वानवडी, पुणे येथील समाधी.

(18mm, f/22, 1/100, ISO 100)
३. गम वॉल (Gum Wall) - फेसबुक वॉल तशी आमच्या गावच्या बाजारातील गम वॉल.

१९९३ साली सिअॅटल पाईकप्लेस मार्केट मधील थिएटरच्या बाहेरील भिंतीवर एका प्रॉडक्शनच्या माणसाने चुईंगम चिकटवून त्यावर एक पेनी चे नाणे डकवले. थिएटरमधे काम करणार्या कामगारांनी ते साफ करण्याच्या प्रयत्न केला परंतु भिंत साफ नाही झाली. हळूहळू पाईकप्लेस फिरायला येणार्या पर्यटकांनी भिंतीवर चुईंगम लावायला सुरवात केली. आणि त्यातून तयार झालेली ही गम वॉल.
26 Aug 2014 - 12:21 pm | सुहास झेले
चला ह्या निमित्ताने मिपाकरांकडून फोटोंची पर्वणी मिळाली आहे....चला माझ्याकडून पण तीन प्रवेशिका. फोटो फक्त पिकासा अपलोडरने कम्प्रेस केलेले आहेत.
१. वेरूळ - कैलाश मंदिर
Focal Length: 15.4mm, Exposure: 1/250 sec, ISO: 80, Camera: SONY DSC-W370
.

२. किल्ले तोरणा - झुंजार माची ( Focal Length: 10.1mm, Exposure: 1/200 sec, ISO: 200, Camera: SONY DSC-W370 )
.
३. एलिफंटा लेणी (घारापुरी) (Focal Length: 10.1mm, Exposure: 1/30 sec, ISO: 200, Camera: SONY DSC-W370)

.
26 Aug 2014 - 7:42 pm | जुइ
फोटो खुपच सुंदर आहेत. सर्वांना स्पर्धेसाठी खुप शुभेछा
26 Aug 2014 - 7:56 pm | राघवेंद्र
स्पर्धेसाठी खुप शुभेच्छा !!! All The Best !!!
27 Aug 2014 - 8:02 am | अजया
कुठे कधी कसे करायचे मद्दान?
27 Aug 2014 - 8:57 am | श्रीरंग_जोशी
धाग्यात जे लिहिले आहे त्यानुसार प्रतिसादांद्वारेच मत द्यायचे आहे असा अंदाज आहे.
जाहीर आवाहन - अलास्का,हवाई, ताहिती, फिजी स्थित मिपाकरांनो लौकरात लौकर फोटोज टाका अन मतदानाचा मार्ग मोकळा करा.
27 Aug 2014 - 9:08 am | समर्पक
आता मतदान चालू होण्यापूर्वी प्रवेशिकांव्यतिरिक्त सर्व प्रतिसाद उडवले तर माझ्यामते तुलना सोपी जाईल, व निष्पक्ष होईल. व धागाही छान स्वच्छ दिसेल
27 Aug 2014 - 10:31 am | पैसा
अवांतर प्रतिसाद काढायची गरज वाटत नाही. मतदान धाग्यात म्हटल्याप्रमाणे या धाग्यावरच करायचं. श्रीरंग जोशींची पद्धत बरोबर आहे. त्यातूनही आणखी एका प्रतिसादात मी लिहिले होते की ज्यांना आपण कोणाला मत दिले आहे हे इतरांना कळू द्यायचे नसेल त्यांनी संपादक मंडळ आयडीला व्यनि करा आणि इथे फक्त व्यनि पाठवल्याची नोंद करा. म्हणजे लगेच व्यनितील मतही मोजले जाईल.
27 Aug 2014 - 1:04 pm | संजय क्षीरसागर
या पोस्टवरच सगळे प्रतिसाद आले तर फोटोंची मजा राहाणार नाही.