संदर्भः
http://www.misalpav.com/node/26057
निकालास बराच उशीर होत असल्याबद्दल क्षमस्व.
आमच्या विनंतीस मान देऊन मिपाकरांनी प्रेमाने उतमोत्तम, अभ्यासपूर्ण प्रतिदाद दिले, त्याबद्दल सर्वांचे आभार.
सर्वच प्रतिसाद मननीय आहेत, त्यात डावे उजवे ठरवणे अवघड. तरी त्यातल्या त्यात निवड करणे क्रमप्राप्त असल्याने (एकाच्या ऐवजी) तीन विजेत्यांना मी चित्र देणार आहे:
वल्ली, पैसा आणि प्रसाद गोडबोले.
वल्ली यांनी तात्कालीन राजकारण, शत्रु-मित्र राज्ये, भूगोल इ. च्या अभ्यासातून यथायोग्य मार्ग काढला, पैसा ताईंनी त्या स्त्रियांची 'अबला' या कल्पनेतून सुटका करून त्यांना धीर देऊन, प्रशिक्षण देऊन त्यांचे सबलीकरण केले, तर प्रसाद गोडबोले यांनी समुद्राचा मार्ग मुकरर केला, हे सर्व फार भावले.
चित्रे पाठवणे वगैरे बद्दल व्यनितून संपर्क करू.
अभिनंदन.
प्रतिक्रिया
9 Dec 2013 - 7:33 pm | केदार-मिसळपाव
अभिनंदन... बाकी वल्ली चा प्रतिसाद एकदम छान होता.
9 Dec 2013 - 7:54 pm | दिपक.कुवेत
हार्दिक अभिनंदन.....आता त्यांनी दिलेले प्रतिसाद सवडिने वाचतो.
9 Dec 2013 - 7:58 pm | सूड
विजेत्यांचे अभिनंदन मान्यवरांचे आभार !!
9 Dec 2013 - 8:08 pm | जेपी
विजेत्यांचे अभिनंदन .
टाळ्यांचा कडकडाट ,
टाळ्यांचा कडकडाट .
:-)
9 Dec 2013 - 8:10 pm | चौकटराजा
सर्व विजेत्यांचे अभिनंदन !!
9 Dec 2013 - 8:11 pm | डॉ सुहास म्हात्रे
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !
9 Dec 2013 - 8:38 pm | प्रसाद गोडबोले
हुर्रे !
9 Dec 2013 - 10:48 pm | प्रचेतस
धन्यवाद काका. :)
9 Dec 2013 - 10:51 pm | मुक्त विहारि
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.....
9 Dec 2013 - 11:43 pm | कवितानागेश
हार्दिक अभिनंदन. :)
10 Dec 2013 - 3:19 am | रेवती
सर्वांचे अभिनंदन.
10 Dec 2013 - 7:38 am | शशिकांत ओक
चित्रगुप्त,
आपल्याला ही धन्यवाद. एक अनोखा पायंडा निर्माण केल्या बद्दल. अन विचारांना चालना देणारा धागा टाकल्या बद्दल. त्यातून महाभारत कालीन इतिहासातील घटनांचा भौगोलिक, सामाजिक आढावा घेणारे विचार मिसळपाव वर सादर करता आले म्हणून.
10 Dec 2013 - 8:01 am | पैसा
धन्यवाद! अन सर्वांचे अभिनंदन!
10 Dec 2013 - 4:37 pm | त्रिवेणी
पै ताई मी मदत केली होती तुम्हाला, लक्षात आहे ना.
10 Dec 2013 - 4:46 pm | पैसा
:D कोण आपण? धन्यवाद! ;)
11 Dec 2013 - 1:51 pm | त्रिवेणी
10 Dec 2013 - 10:04 am | चाणक्य
अभिनंदन. चित्रगुप्त काकांनाही धन्यवाद या अभिनव कल्पनेबद्दल.
10 Dec 2013 - 10:32 am | साती
विजेत्यांचे अभिनंदन.
चित्रांचे फोटो इथे लावा.
10 Dec 2013 - 4:45 pm | प्यारे१
वल्ली, पैसा आणि गिरिजात्मक गोडबोले (तेव्हा 'प्रसाद' मिळाला नव्हता ना? ;) ) ह्या विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
मिसळपाववर असं मूर्त स्वरुपातलं काही करण्याच्या मा. श्री. चित्रगुप्त ह्यांच्या पुढाकाराबद्दल त्यांचंही मनःपूर्वक अभिनंदन नि आभार.
11 Dec 2013 - 11:03 am | ज्ञानोबाचे पैजार
विजेत्यांचे मनःपुर्वक अभिनंदन
नवा पायंडा पाडल्या बद्दल
चित्रगुप्त काकांचे विषेश अभिनंदन
पैजारबुवा
10 Dec 2013 - 4:55 pm | तुषार काळभोर
चित्रे विजेत्यांना पाठवण्याआधी इथे दाखवावीत, ही न्रम इनंती इषेस..
10 Dec 2013 - 10:33 pm | चित्रगुप्त
होय होय, इथे दाखवणारच आहे चित्रे. अजून निश्चित झाले नाही कोणती चित्रे ते. लवकरच करेन.
11 Dec 2013 - 12:24 pm | शशिकांत ओक
चित्रगुप्त, आपल्या चित्रांची बक्षिस योजना राबताना -
विजेत्यांना निवडीची मुभा द्यावी ही विनंती. त्या निमित्ताने आपल्या कलागुणांची पारख करायला मिपाकरांना वाव मिळेल.
काहींना त्यातून विकत घ्यायला ही प्रेरणा मिळेल वा आवडेल.
चित्रांच्या आणणावळीची काय व्यवस्था असेल ते ही समजले तर वाहतूक खर्चाची तयारी करायला विजेत्यांना बरे पडेल. नाही का....
11 Dec 2013 - 3:13 pm | सुखी
चित्रगुप्त,लिखाणाच्या बाबतीत माझा अगदी 'ढ' नम्बर सुध्धा लागत नाही.
तरी सुध्धा आपले एखादे चित्र हवे असल्यास कसे घेता येइल?
11 Dec 2013 - 3:26 pm | ज्ञानोबाचे पैजार
विकत का फुकट ते लिहिले नाहीत.
11 Dec 2013 - 3:28 pm | ज्ञानोबाचे पैजार
चित्रगुप्त काका,
बाकी या प्रश्र्णाचे उत्तर जरा जपुनच द्या हो.
बरेच जण उत्तरा वर डोळा ठेउन बसले असतील.
11 Dec 2013 - 5:11 pm | कोमल
:)) लैच भारी
13 Dec 2013 - 4:06 pm | सुखी
:D :D :D
अहो तो "चित्रगुप्त काका"न्चा अधिकार आहे ना, त्यान्ना मी direct मला चित्रे विका म्हनुन तर नाही ना सान्गु शकत ;)
8 Feb 2014 - 6:03 pm | प्रचेतस
अतीव धन्यवाद काका.
तीनही चित्रे आज सुखरूप घरी पोचली.
लवकरच त्यांचे फोटो येथे अपलोड करेनच.
@पैसाताई, प्रसाद गोडबोले: तुम्ही इतक्यात पुण्यात येणार आहात काय? तुमची चित्रे तुम्हाला कशी पाठवू?
पुनरेकवार अतिशय धन्यवाद ह्या सुरेख भेटीबद्दल.
8 Feb 2014 - 7:11 pm | पैसा
१५ एक दिवसात बहुतेक पुण्याला येणार आहे. तेव्हा तुझ्याकडून घेते.
चित्रगुप्तांना असंख्य धन्यवाद!
9 Feb 2014 - 1:17 am | प्रसाद गोडबोले
मी २२- २३ फेब्रुवारीला पुण्यात आहे ... तेव्हा भेटुयात :)