एका गारुड्याची गोष्ट ७: नाग: अंधश्रद्धेचा बळी !

जॅक डनियल्स's picture
जॅक डनियल्स in जनातलं, मनातलं
19 Aug 2013 - 8:38 am

एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !
एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !
एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ !
एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !
एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग.
एका गारुड्याची गोष्ट ६: नागपंचमी चे विदारक सत्य !

भाग ६ ....तेच आपल्या पूर्वजांनी केले, नागाबद्दल अंधश्रद्धाने भरलेल्या गोष्टीलिहून त्याची निगेटिव्ह पब्लिसिटी केली आणि मग त्याने काम नाही झाले म्हणून दिसेल तिकडे ठेचला......

या अंधश्रद्धा प्रामुख्याने नागाबद्दलच का ?

कॉलेज मधल्या सुंदर मुलीबद्दलच अफवा पसरवल्या जातात, त्याच नियमाने राजबिंड्या नागाच्या निगडीत अंधश्रध्दा पूर्वापार चालत आल्या आहेत.
आजच्या सारख्या 'बँक ऑफ इंडिया' पूर्वीच्या काळी नव्हत्या त्यामुळे सोन-नाणे कुठे साठवायचे हा प्रश्न असायचा. तसेच पासवर्ड ने चालणारी कपाटे, तिजोऱ्या या कल्पना ज्युल व्हर्न च्या कादंबऱ्या मध्ये पण आल्या नव्हत्या. भिंतीच्या भोकात, मंदिराच्या दगडात सोनं लपवले तरी प्रोब्लेम, कारण आपली मनुष्यजात फारच चौकस, भोकात काही दिसले की काढलेच बाहेर. आधीच्या भागत लिहिल्या प्रमाणे मनुष्य हा फार भित्रट प्राणी आहे. लहान मुलांना आपण बागुलबुवा ची भीती दाखवतो तशीच या मोठ्या चोर लोकांसाठी-

त्या सोने लपवलेल्या जागी 'भुजंग'(नाग) रक्षा करतो, या अंधश्रद्धेचा जन्म झाला असावा.

वास्तविक पाहता, अश्या सोनं लपवलेल्या जागा नेहमी किल्ल्यांची, मंदिराची तळघरे, घरातले चोर कप्पे अश्या असल्याने तिकडे निसर्गतः थंडावा असायचा आणि जमीन खूप भुसभुशीत असल्याने उंदीर-घुश्यांची बिळे पण असायची. म्हणजे राहायला 'येसी घर' आणि वरती पाहिजे तेंव्हा सुग्रास जेवण, त्यामुळे कोणता नाग ती जागा सोडेल. बहुतेक खूप कष्ट करून (किंवा हुंड्यात ;)) त्याला ती जागा मिळत असेल.

जर अश्या ठिकाणी, कधी कोणी चोर संपत्ती लुटायला गेलाच, तर तो जाणार कंदिलाच्या-चिमणीच्या प्रकाशात, मग त्याला काय दिसणार डोंबलं ! आधीच भित्रट त्यातून अंधार, जशी आपल्याला कोथळीगडाच्या गुहेतली सावली मल्लिका शेरावत पासून ते वेताळापर्यंत वाटू शकते तसेच त्याला, मग तो जळमटे लागलेला काळा नाग (अंधारात काळांच दिसणार.)अंगावर केस असलेला २० फुटी भुजंगच वाटणारच.

नागाच्या अंगावर केस असतात ही दुसरी अंधश्रद्धा.

पोटात कावळे ओरडायला लागल्यावर आपण जे अन्न खातो, त्याचे रुपांतर ऊर्जेमध्ये होते. अंगावरील केसांचे मुख्य काम म्हणजे कुठल्याही सस्तन प्राण्याच्या (माणूस, कुत्रा, बैल इ.) शरीरात जी उर्जा निर्माण होते त्याचे उत्सर्जन कमी करणे आणि शरीर थंड राखणे.(जिम नंतर घाम वाळल्यावर जे थंड वाटते ते ;)) थोडक्यात म्हणजे केस हे शरीरासाठी इन्सुलेशन चे काम करतात.

सरपटणारे प्राणी त्यांचे शारीरक तापमान कमी झाले की उन्हात बसून आणि वाढले की बिळात थंड जागी बसून कमी-जास्त करत राहतात. म्हणून उन्हात बसलेला नाग हा त्याची बॉडी ट्यान करत नसून त्याच्या शरीरातले तापमान वाढवत असतो.

निसर्ग हा अनुराग कश्यप च्या पिच्चर सारखा आहे, ज्याची कशाची गरज नसते, असे त्यात काही आढळत नाही.

म्हणून नागासारख्या थंड रक्ताच्या प्राण्यांच्या (भाग ५ वाचा) अंगावर केस असूच शकत नाही, त्याची त्यांना नैसर्गिक गरजच नाही.

या नागाच्या अंगावरील केसांचा उगम 'भिंतीवरच्या जळमटामध्ये' आहे. आत्ताच्या काळात ती अंधश्रद्धा बळकट करण्यचे श्रेय धंदेवाईक गारुड्यांच्या शिवणकामाला देता येईल. (गारुडी घोड्याचे,डुकराचे केस नागाच्या अंगावर शिवतात.) ज्यांना हे शिवणकाम येत नाही ते गारुडी नागाच्या उरलेल्या कातीला (पेटीतला नाग स्वतः कात टाकू शकत नाही म्हणून ती हाताने काढवी लागते.)कोळसा घासून काळे करतात.

केसांच्या सारखीच दुसरी अंधश्रध्दा म्हणजे नागाच्या डोक्यावर नागमणी असतो.

याचा उगम पणे लोभातून झाला असावा, असे नागमणी शोधायच्या नादात लोकांना लपवलेले सोने-नाणे शोधायला प्रवृत्त करतात येईल, असा शिम्पल विचार चोराने केला असेल.

हा फोटोशॉप केलेला फोटो बघा, नागमणी कसा हेड लाईट सारखा चमकतो आहे.

नागमणी

वरती वर्णलेला अनुराग कश्यपचा पिच्चर आठवा- या मण्याचा नागाला काय उपयोग असेल, नागीणीला इम्प्रेस करायला असता तर सगळ्या नागांना असला पाहिजे. विज्ञानाप्रमाणे कधी कधी नागाचे विष काही गोष्टी बरोबर मिसळून किडनी स्टोन सारखा खडा तयार होऊ शकतो. पण ती शक्यता पण फार कमी असते कारण नागाचे विष हे cyanide hydrate salts असते आणि त्याची पाण्याबरोबर रसायनीक अभिक्रिया होत नाही. हल्लीचे गारुडी करड्या रंगाचे नाग मणी विकतात ते खरे बेन्झाईट चे खडे असतात. हे कडे जास्त भोका-भोकाचे असतात त्यामुळे त्याची porosity जास्त असल्याने त्याची द्रावण शोषून घ्यायची क्षमता जास्त असते. नाग चावलेला माणूस हा खडा लावला की वाचतो, हा खडा ज्या च्या कडे असेल तो अब्जाधीश होतो, असा यांचा दावा असतो. विचार करा, असे असते तर हे गारुडी मर्सिडीज मधून फिरले असते आणि ताज मध्ये पुंगी वाजवली असती.

अश्याच प्रकारच्या अनेक अंधश्रद्धा वापरून पूर्वी लोकं आपली संपती टिकवून ठेवत असतील.

प्रत्येक अंधश्रद्धेच्या मागे कोणा-कोणाचा तरी स्वार्थ दडलेला असतो.

हेच बघा, आधी बागुलबुवा -मग मांजर -मग शेवटी पोलीस मामा अश्या चढत्या क्रमाने आपण लहान पोरांना भीती घालत असतो त्याच पद्धतीने मोठ्या माणसांसाठी जेंव्हा एका अंधश्रद्धेची भीती कमी होते तशी नवीन अंधश्रद्धा होत निर्माण जाते.

साध्या भुजंगच्या इस्टोरी मधून भीती निघून गेल्यावर हायर वर्जन ची अंधश्रद्धा आली की "नाग डूख धरतो."

डूख धरणे ही भावना आहे, नागाचा मेंदू डूख धरण्यासाठी विकसित झाला नसून खाणे कसे शोधायचे यासाठी विकसत झाला आहे. आपल्या घरी बायको- आई ने स्वयंपाक नाही बनवला तर नाक्यावर जाऊन आपण भाजी-पाव खाऊ शकतो पण नागाला मात्र उंदीर (२ आठवड्यातून एकदा का होईना ) स्वतः शोधायचा असतो. जो काही नंतर वेळ उरतो त्यामध्ये स्वतः चे इतर भक्षकापासून (गरुड, घार, माणूस इ.) रक्षण करायचे असते. त्यांची वधूवर सूचक मंडळे नसल्याने दरवर्षी नवीन नागीण (:)) स्वतः शोधून आपली प्रजा वाढवायची असते. त्यामुळे त्याला डूख धरणे वगैरे अश्या फालतू कामांसाठी वेळच नसतो. जर आपल्याला खुन्नस काढायचीच असली तर आपण आपल्या साईजचा आणि ताकदीचा विचार करतो, उगाचच तालिबान माजले आहे म्हणून ओसामाला मारायला जात नाही.

मग नाग तरी कशाला त्याच्या पेक्षा अतिविशाल मनुष्य प्राण्यावर खुन्नस काढेल, ते शक्यच नाही. विज्ञानिक दृष्ट्या पण हे सिद्ध झाले आहे की नागाचा मेंदूची माहिती साठवण्याची क्षमता खूप कमी असते, मग तो त्याचा उपयोग खुन्नस ची माहिती साठवायला कशाला करेल. हे म्हणजे ५१२ एमबी च्या मेमरी मध्ये संजय लीला भन्साळीचा सिनेमा दोन वेळा साठ्वण्यासारखे आहे.
जी माणसे साप पाळतात (शास्त्रीय प्रयोग करायला किंवा फेसबुकचा अल्बम भरवायला ! ) त्यांना हे माहित असते की ५ वर्ष सांभाळलेला नाग पण टॉमी बोलावल्यावर त्यांच्याकडे येत नाही. तसेच नागाला सगळी दुनिया काळी-पांढरी (black and white) दिसते त्यामुळे त्याला दोन मनुष्य प्राण्यात भेद करणे खूप वेळा शक्यच नसते. त्यामुळे 'नागाचे डूख धरणे' हे माणसाने निर्माण केलेली अंधश्रद्धा आहे.

त्याची सुरवात वरती लिहिल्या प्रमाणे संपत्तीच्या रक्षणासाठी झाली नंतर ती पारंपारिक कथेतून सर्वातोंडी झाली. सगळ्यात जास्त ती लोकांमध्ये पसरली असेल तर ती 'नागीन आणि नगीना' या तद्दन गल्लाभरू चित्रपटातून. या चित्रपटातून नागाबद्दल च्या अंधश्रद्धा स्वाईन फ्लू सारख्या तळागाळातील लोकांपर्यंत पसरल्या. आपल्या समाजातली लोकांचे वाचन खूप कमी त्यातून वैज्ञानिक वाचन तर जवळ पास शून्य. त्यामुळे खूप साऱ्या काल्पनिक कथांना सत्य कथांचा दर्जा देण्यात येतो. बॉलीवूड ला तर काय पैसा पाहिजे त्यामुळे अंतू बर्वाच्या चालीवर "चित्रपट काढणारे काय, कायपण काढतात आणि बघणारे काय कायपण बघतात. !"

या चित्रपटांनी जेवढे सर्पसृष्टीचे नुकसान केले असेल तेवढे पारंपारिक समजुती मधून पण झाले नसेल.

नगीना

"तुमची गर्ल फ्रेंड नागकन्या आहे का ?" हा प्रश्न सहकारनगर मधल्या सुखवस्तू-सुशिक्षित (?) माणसाने विचरला होता. आत्ता विचार करा- चार बुकं शिकलेला माणूस अश्या चित्रपटांचा बळी ठरत असेल तर अशिक्षित माणसाची काय अवस्था. तुम्ही जसे आपल्या प्रजातीच्याच (आणि जातीच्या !)बाईशी लग्न करता तसेच नाग (मेल कोब्रा) हा नागिणी (फिमेल कोब्रा) बरोबरच रत होतो. या सगळ्या नागकन्या- विषकन्या हे या चित्रपटातील अंधश्रद्धाची पिल्ले आहेत. पूर्वीच्या काळी राजेमहाराज्यांकडे 'विषकन्या' असायच्या त्या म्हणजे हेरगिरीचे प्रशिक्षण मिळालेल्या विष प्रयोगात (सगळीच केमिस्ट्री !) निपुण मादक सुंदरी होत्या.
कुठे केवड्याच्या बनातली सळसळणारी ती सुंदर नागीण तर कुठे ही डोक्यावर तांब्याचा नाग लावलेली हिडीस श्रीदेवी !

श्रीदेवी

नागाबद्दलची शेवटची मुख्य अंधश्रद्धा म्हणजे नाग पुंगीवर डोलतो.

या अंधश्रद्धेचा जन्म तर व्यावसाईक गारुड्यांनी केला असावा. नागासमोर काही पण हलवले तर तो फणा काढतो, म्हणजे एखाद्या काठीवर रुमाल लावून ती ती जरी पुंगी प्रमाणे हलवली तर तो त्या समोर डोलेल. पण ही पुंगी ही गारुड्यांच्या पिच्चरला डॉल्बी डिजिटल साऊंड इफेक्ट देते. विज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आहे की नागाला ऐकू येत नाही. जर ऐकू येत असते तर नाग डोलतो तसा कुठला पण साप गारुड्याने डोलवून दाखवला असता.

या सगळ्या अंधश्रद्धा, माझ्या घरात पण होत्या,तिकडून सुरवात करून मी कॉल वरती यांचे निर्मूलनासाठी प्रयत्न केले आहेत. आत्ता आपल्याला डिस्कवरी-national geographic वरच्या खूप चांगल्या नागांवरच्या चित्रफिती पाहायला मिळतात. आंतरजालावर सगळी वैज्ञानिक माहिती, तूनळ्या उपलब्ध आहेत. यांचा वापर करा आणि अश्याच सगळ्या अंधश्रद्धा दूर करायचा प्रयत्न करा. कुठली पण नागाबद्दल माहिती ऐकली तर त्याचा तर्कशुद्ध विचार करा आणि अंधश्रद्धेच्या निर्मितीला आळा घाला.

या लेखात मी खूप महत्वाच्या आणि ज्यांच्यामुळे सर्प-सृष्टी चा सगळ्यात जास्त नाश होतो अश्या नागाबद्दलच्या अंधश्रद्धा समाविष्ट केल्या आहेत. बिनविषारी आणि इतर सापांच्या अंधश्रद्धा पुढील त्या-त्या लेखात समाविष्ट करीनच, पण अजून काही अंधश्रद्धा किंवा प्रश्न असल्यास प्रतिक्रियामध्ये टाका, मी माझ्या परीने उत्तर द्यायचा प्रयत्न करीन.

(या लेखातले सर्व फोटो अंतरजालावरून घेतले आहेत.त्यांना कुठल्या पद्धतीने बदलण्यात आले नाही.)

मांडणीसमाजजीवनमानविज्ञानशिक्षणमाहितीप्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया

"तुमची गर्ल फ्रेंड नागकन्या आहे का ?" हा प्रश्न सहकारनगर मधल्या सुखवस्तू-सुशिक्षित (?) माणसाने विचरला होता. > हसावे की रडावे?

चांगला जमलाय लेख. अख्खी लेखमाला सुरेख सुरु आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

19 Aug 2013 - 8:57 am | प्रकाश घाटपांडे

तुमची गर्लफ्रेंड नागकन्या आहे का हो?

जॅक डनियल्स's picture

19 Aug 2013 - 9:21 am | जॅक डनियल्स

माझी नाही पण, आपल्याला इंटरेस्ट असल्यास नाग कन्येचा पत्ता कळवण्यात येईल. डोक्याला दंश झाल्यास मी जवाबदार नाही. ;)

मुक्त विहारि's picture

21 Aug 2013 - 8:24 am | मुक्त विहारि

ह ह मे

मदनबाण's picture

19 Aug 2013 - 9:02 am | मदनबाण

लेखन आवडले...
जसे नागमणीचे आहे तसेच काहीसे हत्तीच्या बाबतीत देखील आहे म्हणे !

जॅक डनियल्स's picture

19 Aug 2013 - 8:32 pm | जॅक डनियल्स

मल तरी माहित नाही, पण हत्तीच्या सुळ्याना एवढे मार्केट आहे की छोट्या मण्यांकडे कोणाचे लक्षच गेले नसेल.

पण हत्तीच्या सुळ्याना एवढे मार्केट आहे की छोट्या मण्यांकडे कोणाचे लक्षच गेले नसेल.
अहं अस नाही ! याची किंमत सुद्धा जबरा आहे असे म्हणतात. या मण्याचे नाव गजमुक्ता ,गजमणी किंवा Elephant Pearl असे आहे. खरं पाहिलं तर हा हत्तीच्या डोक्यात निर्माण झालेला ट्युमर असावा,पण तो गजमुक्ता याच नावाने प्रसिद्ध आहे हे मात्र खरे.
E1
हा वरील प्रमाणे दिसतो... याची मोठ्या प्रमाणात तस्करी होते,लाखात किंवा कोटी मधे खरा मणी विकला जातो.
एक दुवा :- 5 caught striking Rs 2 lakh deal for precious elephant pearls

वाचनिय दुवा :- imperialpearl

जाता जाता :- विरप्पन ने २ हजार पेक्षा जास्त हत्ती ठार मारले त्यांचे ४ हजार दात झाले. ते कुठे गेले ? तसेच विरप्पन देशातल्या देशात असुन मोकाट होता आणि आपले लोक पाकिस्तान मधल्या दाउदला पकडण्याच्या वार्ता करतात !

जॅक डनियल्स's picture

21 Aug 2013 - 9:50 am | जॅक डनियल्स

जबरदस्त आहे हे प्रकरण ! कधी विचार पण केले नव्हता.
हत्तीला कसे पण करून या जगातून नाहीसे करायचे हाच विचार लोकं करतात बहुतेक.
'डुक्कर मणी' पण शोधून काढला पाहिजे, डुकरे तरी कमी होतील थोडी...;)

सुनाद रघुराम चे 'वीरप्पन' वाचले होते, त्या वरून तरी असे वाटले की तिकडचे सरकारच त्याला हत्ती मारायला सांगायची. सगळे दात श्रीलंकेला जायचे आणि तिकडून सगळ्या जगामध्ये विकले जायचे.

अतिशय उत्तम आणि माहितीपूर्ण लेखमाला.

बाकी ह्या नागाबद्दलच्या श्रद्धा, अंधश्रद्धा बहुत प्राचीन.

ही पहा काही मध्ययुगीन नागशिल्पे

a - a

आणि ह्या पहा त्या विषकन्या =))

a - a

मालोजीराव's picture

19 Aug 2013 - 11:16 am | मालोजीराव

पाटेश्वर ला पण आहेत कारे नागशिल्प ?

प्रचेतस's picture

19 Aug 2013 - 11:23 am | प्रचेतस

हो. :)

खबो जाप's picture

19 Aug 2013 - 12:06 pm | खबो जाप

ते पहिल्या शिल्पतल नागाच/सापाच कडबोळे/गुंता म्हणजे भारतीय सरकारी व्यास्थेचे कडबोळे/गुंता
आणि एव्हढा गुंता होवून सुद्धा "Superpower" चा फना डोलातोच आहे.

वल्ली वरून उजवीकडचे शिल्प कुठे आहे ?
जल्ला हे कायतरी विक्षीप्त आहे, डिट्टो कॉपी आमच्याइथे आणि अजून एक ठिकाणी पाहीलेय, फोटोकॉपी असेल काय हो ?

प्रचेतस's picture

19 Aug 2013 - 8:56 pm | प्रचेतस

ते शिल्प मोरगावजवळच्या पांडेश्वर येथे आहे. अर्थात तशा प्रकारची बरीच शिल्पे इतरत्रही दिसतात.

जॅक डनियल्स's picture

19 Aug 2013 - 8:35 pm | जॅक डनियल्स

मस्त फोटो आहेत.
विषकन्या खात्यापित्या घरच्या दिसत आहेत ;) बहुतेक त्या त्यांच्या वाणी मधून पण विषारी दंश करत असतील.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Aug 2013 - 10:36 pm | अत्रुप्त आत्मा

@विषकन्या खात्यापित्या घरच्या दिसत आहेत >>> =)) एक बदल. "त्या घरी खातपित असाव्या...!" =))

दत्ता काळे's picture

19 Aug 2013 - 10:07 am | दत्ता काळे

नागाच्या बाबतीतले बरेच गैरसमज माहीत होते, पण अजून जास्त माहीती मिळाली.

शिल्पा ब's picture

19 Aug 2013 - 10:17 am | शिल्पा ब

भारी ए ! पण चित्र कै दिसली नैत बॉ !

प्रसाद गोडबोले's picture

19 Aug 2013 - 10:38 am | प्रसाद गोडबोले

माझ्या ऐकीव माहीती नुसार "स्नेक बाईट " नावाचा काही तरी जालीम नशेचा प्रकार आहे (राजस्थानात फेमस आहे म्हणे ). तो खरा आहे का हो ?

अनुप ढेरे's picture

19 Aug 2013 - 11:39 am | अनुप ढेरे

ऐकीव माहितीनुसार मध्यंतरी पुण्यात एकाला पकडलं होतं. तो काडेपेटीत ठेवलेली सापाची पिल्लं विकायचा, त्या पिल्लांनी जिभेवर चावलं तर हाय मिळतो म्हणे !

मालोजीराव's picture

19 Aug 2013 - 5:25 pm | मालोजीराव

खरा आहे…एक्सटसी साठी वापरतात

जॅक डनियल्स's picture

19 Aug 2013 - 8:45 pm | जॅक डनियल्स

मी पण ऐकले आहे की कोरेगाव पार्क आणि गोवा मधल्या काही मोठ्या पार्ट्यांना ही धेंड पुरवली जातात. पण माझ्या अनुमानानुसार ही लोक बिनविषारी किंवा निम-विषारी (semi venomous- हरणटोळ-ज्याचे विष किडे -छोटे बेडून मारण्याइतपत झहाल असते.) वापरात असतील. त्यांचे जे कस्टमर असतात ते आधीच बुंगलेले असतात त्यामुळे त्यांना बिनविषारी पण विषारी वाटत असेल. काही कॉलेज तरुणांना १ ग्लास ओल्ड मोन्क नंतर पाणी घालून कोक दिला तरी त्यांनी तो ओल्ड मोन्क वाटतो, तसला प्रकार.;)

मृत्युन्जय's picture

19 Aug 2013 - 10:50 am | मृत्युन्जय

हा लेख संपुर्ण लेखमालेतला सगळ्यात भारी झाला आहे अर्थात इतर लेखही उत्तमच झालेत म्हणा.

"तुमची गर्ल फ्रेंड नागकन्या आहे का ?" हा प्रश्न सहकारनगर मधल्या सुखवस्तू-सुशिक्षित (?) माणसाने विचरला होता.

त्याला आपण "कोणती?" असा प्रश्न विचारला नाहीत ना जॅकबुवा? ;)
.
लेख लै भारी झाला आहे :)

(फुडचा लौकर टाकने)

जॅक डनियल्स's picture

19 Aug 2013 - 9:02 pm | जॅक डनियल्स

कोणती विचारले असते तर तीच नागकन्या त्याच्या वर सोडली असती. डोकं चावणाऱ्या अनेक नागकन्या मला त्या वेळी माहित होत्या.;)

किसन शिंदे's picture

19 Aug 2013 - 11:31 am | किसन शिंदे

तुमचा या विषयावरचा लेख वाचला कि आपोआपच पुढच्या लेखाची उत्सूकता निर्माण होते. हा लेखही भन्नाटच. मध्ये वापरलेले पंचेस लाजवाब.

हे म्हणजे ५१२ एमबी च्या मेमरी मध्ये संजय लीला भन्साळीचा सिनेमा दोन वेळा साठ्वण्यासारखे आहे.

एकच नंबर! =))

अत्रुप्त आत्मा's picture

19 Aug 2013 - 9:39 pm | अत्रुप्त आत्मा

+१ +१ +१ टु किसनदेव! :)

जेपी's picture

19 Aug 2013 - 12:10 pm | जेपी

7-8 वर्षापुर्वीची गोष्ट ,मे महिण्याचा काळ, आमच्या घराशेजारी लहान औढा आहे .3-4 फुट उंच गवत होते .त्यात एक सापाच्या जोडप्याच प्रणयाराधन चालु होत .जोडी हवेत 5-6 फुट उंच उठत होती . आजुबाजुला पाचपन्नास माणुस

जेपी's picture

19 Aug 2013 - 12:14 pm | जेपी

अंगातले कपडे काढुन त्या जोडीवर टाकयचा प्रयत्न करत होती .यामुळे लोकांना पुण्य मिळेल असे लोंकाची अक्कल .2 तास तरी हा गोंधळ चालु होता

जॅक डनियल्स's picture

19 Aug 2013 - 9:05 pm | जॅक डनियल्स

डोळ्यासमोर चित्र उभे राहिले, मी पण हा प्रकार बंगलोर बाईपास ला कात्रज जवळ पहिला आहे. अशक्य असतो !

चिगो's picture

19 Aug 2013 - 12:18 pm | चिगो

"तुमची गर्ल फ्रेंड नागकन्या आहे का ?"

=)) =))

अत्यंत खुसखुशीत शैलीत लिहीलेला, माहितीपुर्ण लेख.. लिहीत रहा, दोस्ता.. ही पुर्ण लेखमालाच चेपुवर शेअर करायचा विचार करतोय.. :-) चालेल ना?

जॅक डनियल्स's picture

19 Aug 2013 - 9:07 pm | जॅक डनियल्स

धन्यवाद् !
चालेल नक्की चालेल. हे लेख जितक्या जास्ती लोकांपर्यंत पोहचतील तेवढे चांगले.

कपिलमुनी's picture

19 Aug 2013 - 12:29 pm | कपिलमुनी

छान माहिती आहे !

पण "हिडीस श्रीदेवी" हे तितकसा आवडला नाही ..ती बिचारी तिचा रोल करत होती ..

जॅक डनियल्स's picture

19 Aug 2013 - 9:10 pm | जॅक डनियल्स

तुमचे बरोबर आहे, ती तिचे पात्र जगत होती, पण हे लोकांना कळत नाही. माझा खूप राग आहे या सिनेमा वरती, सिनेमा हा सिनेमा म्हणून पाहायचा आणि सोडून द्यायचा. पण नको त्या गैरसमजुती घेऊन गुप्तधन शोधायला बाहेर पडलेले काही लोक मला माहित आहेत.

अनिरुद्ध प's picture

19 Aug 2013 - 12:49 pm | अनिरुद्ध प

पु भा प्र.

बॅटमॅन's picture

19 Aug 2013 - 5:16 pm | बॅटमॅन

जबरी पंचेस!!!

नागकन्या गर्लफ्रेंड आणि ५१२ एम्बी साईझचा संजय लीला भन्साळी पिच्चर हे दोन्ही पंचेस जाम आवडले.

प्रबोधनही अनायासे होतच आहे हेवेसांनल. अतिशय मस्त लेख, लय आवडला.

संदीप चित्रे's picture

19 Aug 2013 - 6:11 pm | संदीप चित्रे

लेखमालांपैकी ही एक अत्यंत वाचनीय लेखमाला आहे.
लिहिता राहा मित्रा.... वाचायला खूप आवडतंय!

भ ट क्या खे ड वा ला's picture

19 Aug 2013 - 6:24 pm | भ ट क्या खे ड वा ला

अक्करमाशी, अधेला अश्या काही जाती / प्रकार सापांमध्ये असतात का?
लहानपणी या बद्दल ऐकले होते.

जॅक डनियल्स's picture

19 Aug 2013 - 9:18 pm | जॅक डनियल्स

सगळ्या सापांना प्रत्येक प्रदेशात काही लोकल नावे असतात. (मण्यार-सूर्), चंद्र कंडार, फुरसे- जलेबी साप(पंजाब)) तशी काही नावे असू शकतील. साप कसा दिसत होता सांगितला तर बरोबर नाव सांगता येईल.

पैसा's picture

25 Aug 2013 - 11:02 pm | पैसा

म्हणजे धामण असावी. म्हणजे आमच्या इथेही आधेले हाच शब्द वापरात होता. खूप लांब आणि बिनविषारी. पिवळा रंग.

चाफा's picture

19 Aug 2013 - 6:53 pm | चाफा

म्हणून उन्हात बसलेला नाग हा त्याची बॉडी ट्यान करत नसून त्याच्या शरीरातले तापमान वाढवत असतो.>>> :D
मी कल्पना केली, मस्त सनलोशन, गॉगल वगैरे लावून लवंडलेल्या नागाची :D
लेखमाला मात्र अप्रतिम. नेमकाच वेळ मिळतो त्यात, गोल्डरश, कॉफिखाने ही अशा लेखमाला वाचता वाचता अर्धवट टाकाव्या लागतात :(
जे डी, नागाची नाही पण काही सापांची वासन (वास घेण्याची ) क्षमता जास्त असते का हो ? खास करून नानेटी..

उपास's picture

19 Aug 2013 - 6:53 pm | उपास

हिंदी चित्रपट सृष्टीबद्दल बरोब्बर लिहिलयस.. लोकं येडपट त्याला कोण काय करणार.. अमिरच्या उमेद्वारीच्या काळात, 'तुम मेरे हो' अस पिक्चर होता असं आठवतय.. असलाच सगळा अचरटपणा..
लेख एकदम सुबक झालाय... पूर्ण लेखमाला झाला की एक पुस्तक किंवा पीडीएफ पब्लिश करता आलं तर बरं पडेल!
सुसाट चाल्लेय गाडी एकदम.. आवडतं आहेच!

मोदक's picture

19 Aug 2013 - 8:12 pm | मोदक

जेडी - एक प्रश्न.

सापाच्या विषाचा मानवी शरीरावर होणारा ढोबळ परिणाम पाहिला तर आपले शरीर दोन प्रकारे रिअ‍ॅक्ट करते.

१) अन्ननलिकेतून विष शरीरात गेले तर (विष रक्तात मिसळण्यावर होणार्‍या हानी इतकी) हानी होत नाही - अन्ननलिका मार्गातील जखमा हा अपवादात्मक मुद्दा बाजूला ठेवूया!

२) विष रक्तात मिसळले गेले तर भयंकर परिणाम दिसून येतात.

(मज्जारज्जूवर होणारा परिणाम किंवा हृदय बंद पडून मृत्यू वगैरे सर्व मुद्दा क्रं. २ चे आफ्टर इफेक्ट्स असल्याने त्यांनाही विचारात घ्यायला नको.)

या परिस्थितीमध्ये जे विषारी जीव आपल्यासारख्या दुसर्‍या विषारी जीवाला चावतात. (एक साप दुसर्‍या सापाला, एक विंचू दुसर्‍या विंचवाला..) त्यावेळी त्यांच्या शरीरातील प्रतिकारके त्या विषाला १००% निष्प्रभ करतात की त्याचेही काही साईड इफेक्ट्स असतात..?

जॅक डनियल्स's picture

21 Aug 2013 - 7:26 am | जॅक डनियल्स

माफ करा मला उत्तर द्यायला वेळ लागला.
माझा जास्त या विषयावरील शास्त्रीय अभ्यास नाही पण जेंव्हा किंग कोब्रा धामणीला चावतो तेंव्हा मी पहिले आहे. ७-८ फुटी संटी धामण ५ मिनिटात जीव सोडते. विषाची किती मात्रा आणि त्याची जहालता या वरती सगळे अवलंबून असेल. म्हणजे किंग कोब्रा चे विष मण्यारी पेक्षा कमी जहाल असते पण त्याच्या विषाने मण्यार मरते (कारण तो चमचा भर विष घालतो) आणि तिच्या चाव्याने किंग ला काही होत नाही. ( बहुतेक माणसाला मधमाशी चावल्यावर जे होते तसे होत असेल.)जर काही अजून माहिती मिळाली तर लिहीनच पुढच्या लेखात.

यशोधरा's picture

21 Aug 2013 - 8:35 am | यशोधरा

एक डॉक्युमेंटरी पाहिली होती. किंग कोब्रा नर आणि मादी एकत्र असताना, अजून एक किंग कोब्रा नर त्या ठिकाणी येऊन दोघांचीही जुंपली व पराभूत नर तिथून निघून जाताच विजयी नराने (नंतर आलेला) मादीला मारुन टाकले.तुम्ही इथे किंग कोब्राने धामणीला मारायचा उल्लेख केला आहेत, त्यावरुन आठवले.

भटक्य आणि उनाड's picture

19 Aug 2013 - 8:57 pm | भटक्य आणि उनाड

चालु द्या लेखन... आवडीने वाचतोय.....

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Aug 2013 - 9:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर खुसखुशीत शैलितील लेख. खूप आवडला. पुभाप्र.

छान शास्त्रिय माहितीचा लेख असल्यानेच केवळ इकडे थोडेसे लक्ष वेधू इच्छितो...
अंगावरील केसांचे मुख्य काम म्हणजे कुठल्याही सस्तन प्राण्याच्या (माणूस, कुत्रा, बैल इ.) शरीरात जी उर्जा निर्माण होते त्याचे उत्सर्जन कमी करणे आणि शरीर थंड राखणे.
येथे "...शरीर थंड राखणे." ऐवजी "...शरीर गरम राखणे." असे पाहिजे. शिवाय केसाच्या उपयोगासाठी जी प्राण्यांची उदाहरणे दिली आहेत त्यापैकी माणूस आणि बैल यांच्यात केस हे केवळ अतीप्राचीन पुर्वजांकडून आलेले पूर्णपणे निरुपयोगी अवयव आहेत. कुत्र्यांपैकी काही अतीथंड प्रदेशातील जाती सोडल्या तर इतरांतही केसांची तीच अवस्था आहे. मात्र थंड प्रदेशातल्या पोलार अस्वल, याक, इ. प्राण्यांमध्ये केसांचा शरीर गरम ठेवण्यास उपयोग होतो.

जॅक डनियल्स's picture

19 Aug 2013 - 9:38 pm | जॅक डनियल्स

तुमचे बरोबर आहे. माझी थोडी वाक्यरचना चुकली आहे. थंडीत शरीर गरम राखणे (इन्सुलेशन चे काम करून ) आणि उन्हाळामध्ये (घाम वाळवून) थंड राखणे असे मला म्हणायचे होते मला.

माणूस आणि बैल यांच्यात केस हे केवळ अतीप्राचीन पुर्वजांकडून आलेले पूर्णपणे निरुपयोगी अवयव आहेत

मला माहित नव्हते, आता हिवाळ्यात दाढी वाढवणे बंद करीन.;)

निमिष ध.'s picture

19 Aug 2013 - 9:41 pm | निमिष ध.

एकदम जोरदार लेखमाला चालू आहे. पुलेशु !! वाट पहातो आहे.

अर्धवटराव's picture

19 Aug 2013 - 9:43 pm | अर्धवटराव

फार वर्षापूर्वी "दुध का कर्ज" नावाचा एक नागपट आला होता. त्यात अरुणा इराणी नागाला आपलं दुध पाजते व तो हे "दुध का कर्ज" व्यवस्थीत अदा करतो अशी काहिशी ष्टोरी होती =))

हिंदी सिनेसृष्टीतल्या प्राण्यांच्या वापरावर मागे एक प्रोग्राम बघितला होता. जीव हळहळला अक्षरशः. नागांचे फाईट सीन, प्रणय सीन दाखवायला दोन नागांची तोंडे पारदर्शक टेप ने चिकटवतात. मग ते बिचारे कसरत करत, एकमेकांना वेटोळे देत ते बंधन तोडायचा प्रयत्न करतात... आणि ते चित्रीकरण प्रणय सीन म्हणुन खपवलं जातं. वर सांगीतलेल्या चित्रपटात नागांची टोळी दुष्ट व्हीलन मंडळींवर चाल करुन येते. त्यावेळी काचेच्या खिडक्या फोडुन सर्पगठ्ठे आत घुसतात. आता ते सर्व नकली साप होते कि त्यातले काहि असली होते माहित नाहि, पण त्यात सापांना खुप इजा झाली असणार.

अर्धवटराव

खटपट्या's picture

21 Aug 2013 - 1:19 am | खटपट्या

बघावा म्हणतोय "दुध का कर्ज"

जॅक डनियल्स's picture

21 Aug 2013 - 7:05 am | जॅक डनियल्स

अरुणा इराणी बरोबर काम करायची वेळ आली म्हणजे त्या नागाचे खरच वाईट दिवस चालू असतील. यात सीन मध्ये नीट पहिले तर अरुणा इराणी च्या समोर प्लास्टिक चा नाग आहे आणि दुध प्यायचा सीन वेगळा शूट केला आहे.त्या खऱ्या नागाचे तोंड शिवलेले दिसते आहे.
हो, पूर्वी जेंव्हा भारतात खरे प्राणी सिनेमा मध्ये वापरायला परवानगी होती तेंव्हा खूपच वाईट हाल करायचे. साधरण करून नागापेक्षा धामण ही जास्त करून भारतीय सिनेमा साठी वापरली जाते आणि नाग म्हणून खपवले जाते. फक्त काही महत्वाच्या चित्रीकरणासाठी नाग (तोंड शिवलेला) वापरला जातो.

अर्धवटराव's picture

21 Aug 2013 - 8:46 am | अर्धवटराव

>>अरुणा इराणी बरोबर काम करायची वेळ आली म्हणजे त्या नागाचे खरच वाईट दिवस चालू असतील.
=))
सापांच्या बाबतीत इतका सखोल अभ्यास बॉलीवुडने देखील केला नसेल.

अर्धवटराव

उपाशी बोका's picture

20 Aug 2013 - 9:35 am | उपाशी बोका

संपूर्ण लेखमाला वाचली. खूपच छान लिहिले आहे.
अजून येऊ द्या.

झकासराव's picture

20 Aug 2013 - 5:39 pm | झकासराव

सुरेख लेखमाला... :)

नागमणी, डुख धरणे, नागीन चित्रपटात दाखव्लं तसं मेमरीत फोटु सेव्ह होणे असे बरेच गै स तुम्ही चांगलेच ठोकलेत. :)
मी शाळकरी वयात असताना एक स्टोरी आलेली.
कुठल्या तरी भाजीच्या (ते ही मेथीच्या) टेम्पोने प्रणयधुंड नागाच्या जोडीला चिरडलं.
आणि म्हणुन मेथीच्या पानांवर नागाचं चित्र दिसतय.
ते खाउ नका विषारी आहे...
बायका मेथीच्या जुडीमधली पान अन पान बारकाइने बघत बसायच्या बॉ...

जॅक डनियल्स's picture

20 Aug 2013 - 9:21 pm | जॅक डनियल्स

कमीतकमी ८०% भाजीपाला ट्रक (रात्री प्रवास करणारे) सापांना चिरडत असतील. त्यामुळे प्रत्येक भाजी वर सापांचा वाटरमार्क दिसला पाहिजे..;)

हुप्प्या's picture

20 Aug 2013 - 9:50 pm | हुप्प्या

दाभोळकरांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर हा लेख म्हणजे त्यांना वाहिलेली एक श्रद्धांजलीच वाटते.

नाग ह्या प्राण्यात थक्क करायला लावणारे इतके जीवशास्त्रीय चमत्कार असताना आणखी नवे आचरट, अतर्क्य, अचाट चमत्कार त्यांच्या माथी मारायची गरजच नाही. त्याची ती चाल, जालीम वीष बनवायची अद्भूत वाटणारी ट्रिक, जिभेने हवेचे नमुने घेत भक्षाचा वेध घेणे, कंपनांचा वेध घेऊन धोका ओळखणे, त्यांचे खरेखुरे प्रणयाराधन हे सगळे इतके रोचक आहे की आणखी खोटा मालमसाला लावायची गरजच नाही.

नागावर आधारित सिनेमांना मोठ्ठा डिसक्लेमर लिहिण्याची सक्ती केली जावी की त्यातील इच्छाधारी नाग, नागमणी व अन्य बिनडोक चमत्कार हे पूर्णपणे कपोलकल्पित, बिनबुडाचे आहेत. खर्‍या नागांना हे प्रमाण मानून त्रास देऊ नका.

जॅक डनियल्स's picture

20 Aug 2013 - 10:07 pm | जॅक डनियल्स

हा लेख लिहिला तेंव्हा डॉ. दाभोलकरांचा विचार आला होता, किती अवघड असेल त्यांचे कार्य? आपल्या समाजात अशिक्षित लोकांचे जाऊद्या पण इंजिनिअर, डॉ, फिजिक्स चे संशोधक पण अंधश्रद्धा पाळणारे मी बघितले आहेत. मी तर फक्त लेख लिहितो आहे, आणि ज्यांना कधी भेटलो त्यांची अंधश्रद्धा दूर करायची प्रयत्न केले आहेत. पण हा माणूस एकाकी झुंज देत होता, आणि देतानाच शहीद झाला.

हुप्प्या आपले बरोबर आहे-नाग काय प्रत्येक सापच एक पूर्ण विकासित नैसर्गिक यंत्रणा आहे. खाणे कसे मिळवायचे ते स्वतः चे संरक्षण कसे करायचे यासाठी लागणारे सगळे काही त्यांमध्ये आहे.

कपिलमुनी's picture

22 Aug 2013 - 12:06 am | कपिलमुनी

वरती ट्रक ने साप चिरडल्याचा उल्लेख आहे ..

कोकणात पर्यटक वाढल्यापासून शेकडो साप रोज गाड्यां खाली चिरडले जातात..
मोठे रस्ते , हायवे बनवले कि त्याच्या दोन्हि बाजूच्या जीवसृष्टीवर परीणाम होतो ..

शरभ's picture

22 Aug 2013 - 1:17 pm | शरभ

जे डी, सापाना जरी कान नसले तरी देवाने ती कसर नाकाने भरून काढली आहे असे वाटते. घाणेंद्रिय फार तीक्ष्ण असलं पाहिजे. तुमचा काय अनुभव आहे ह्या बाबतीत?

जॅक डनियल्स's picture

23 Aug 2013 - 10:37 pm | जॅक डनियल्स

या वरती पुढच्या एका भागात लिहिणार आहे, खूप मोठा विषय आहे तो.
आत्ता एवढेच सांगतो की त्यांचे सगळ्यात जास्त तीक्ष्ण इंद्रिय हे घाणेंद्रिय असते. साप जीभ बाहेर काढतो तेंव्हा हवेचे कण जिभेवर घेऊन तो मेंदू खालच्या एका भागात (जेकोबसन ऑर्गन) ते प्रोसेस करतो आणि वास घेतो.

कपिलमुनी's picture

23 Aug 2013 - 12:47 pm | कपिलमुनी

काल रात्री अ‍ॅनाकोंडा लागला होता ..
हॉलीवूड वाले पण काही कमी नाहियेत ..४ पार्टस फुल्ल धमाल आहेत..

जॅक डनियल्स's picture

23 Aug 2013 - 10:28 pm | जॅक डनियल्स

हो हॉलीवूड पण त्याच लायनी मधले लोक आहेत. पण फक्त फरक आहे की ती लोक सापावरचे शास्त्रीय सिनेमे (documentary) पण खूप बनवतात. तसेच त्यांच्या सिनेमात साप हे मोठे किंवा राक्षसी दाखवतात पण तो दुध पितो किंवा पुंगी वर डोलतो असे अशास्त्रीय काही दाखवत नाहीत. त्यामुळे जास्त अंधश्रद्धा पसरत नाही फक्त सापांची भीती लोकांमध्ये जास्त वाढते. ते बरोबर आहेत अस मी म्हणत नाही पण त्यामुळे जास्त सर्पसृष्टी चे नुकसान होत नाही.

काही सीन अफलातून घेतले आहेत पहिल्या अनाकोंडा मध्ये, नंतर नंतर च्या भागात वाट लागली.

पैसा's picture

25 Aug 2013 - 11:05 pm | पैसा

मस्त जमलेला लेख!

दादा कोंडके's picture

27 Aug 2013 - 10:28 am | दादा कोंडके

नुसता लेख जमून काय उपेग? त्यो होमपेजवरचा खूप फन्या असलेल्या नागाचा फोटू काडा अदुगर...

बाळ सप्रे's picture

27 Aug 2013 - 3:38 pm | बाळ सप्रे

+१
:-)

जॅक डनियल्स's picture

27 Aug 2013 - 9:34 pm | जॅक डनियल्स

त्याकाळी आपल्या कडे फोटोशॉप होते त्याचा तो नाग पुरावा आहे. :)

दादा कोंडके's picture

28 Aug 2013 - 2:44 pm | दादा कोंडके

धन्यवाद हो संपादक तै!

असे असते तर हे गारुडी मर्सिडीज मधून फिरले असते आणि ताज मध्ये पुंगी वाजवली असती....!!!!!

आदूबाळ's picture

27 Aug 2013 - 10:59 pm | आदूबाळ

जेड्स, नवीन लेख टाकणे...

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

31 Aug 2013 - 3:26 am | निनाद मुक्काम प...

ह्या लेखमालेचा आमच्यावर कदापि फरक पडणार नाही ,
बॉलीवूड शिनेमे पाहून सर्प जमातीबद्दल आमची गृहितके साफ पक्की झाली आहेत
आमच्या आयुष्यात आलेले हे काही सर्प शिनेमे
,विष कन्या
ह्यात पूजा बेदी विष कन्या असते.
दुध का कर्ज
नगीना
शेषनाग
नाचे नागीन गली गली

नागीन

जॅक डनियल्स's picture

31 Aug 2013 - 5:12 am | जॅक डनियल्स

विनोदी सिनेमे किंवा शी-ग्रेड सिनेमे मी काढू नका किंवा ते बघू नका असे मी म्हणालो नाही, दुध का कर्ज अदा केलाच पाहिजे ;)
काढणारे काहीपण सिनेमे काढणार आणि आपण ते बघणार हा नियतीचा नियम आहे.
पण श्रीकृष्ण टोकीज मध्ये वळवळणाऱ्या या विषकन्या आपल्या बरोबर घेऊन जायच्या, का? तिथेच सिनेमा गृहात सोडून द्यायच्या हे आपण ठरवले पाहिजे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

31 Aug 2013 - 6:05 pm | निनाद मुक्काम प...

सहमत
भयपट पाहून सिनेमागृहात आपले भय व त्यातून निर्माण होणारी अंधश्रद्धा सोडून बाहेर आले पाहिजे.

अन आणखि बरच काही या लेखमालेत आहे. आपले मनःपुर्वक धन्यवाद.

आनंदराव's picture

1 Dec 2013 - 12:23 pm | आनंदराव

सापाचे विश जर रन्गात कलवले
अनि तो रन्ग घराला
दिला तर घरात पाली,झुरले वगैरे किदे होत नाहित असे अम्चे पोहन्यचे लिमये मास्तर म्हनाले.
आहे का हो?

जॅक डनियल्स's picture

1 Dec 2013 - 11:55 pm | जॅक डनियल्स

याचे उत्तर मला माहित नाही. पण तुमच्या मास्तरांच्या बुद्धीची दाद देतो मी !

बुद्धीची का कल्पनाशक्तीची?

बादवे, लिमये मास्तरांनी आनंदरावांना कधी घरी जेवायला बोलावलं नव्हतं ना?

जॅक डनियल्स's picture

2 Dec 2013 - 12:22 am | जॅक डनियल्स

कल्पनाशक्ती च्या पलीकडची अदभूत अल्लीफ-लैला कॉन्सेप्ट आहे ती, म्हणून बुद्धी म्हणालो...;)

अशाच नावाचा एक आनन्दयात्री आयडी होता...
भिंतींच्या पोपड्यावर एक लेख लिहीलेला आठवला त्यानं. दिङ्मूढ करणारा लेख होता.

इथंही तेच झालो आहे. दिङ्मूढ.

आठवणीतला अनमोल's picture

3 Dec 2013 - 11:43 am | आठवणीतला अनमोल

" जर का आपल्याले सरप (साप) डसला तर आपण त्याले डसाच मग ते जनावर (साप) मरते आन आपण वाच्तो (म्हणजे मरत नाही) "......जे डी सर मी हे ५ वर्षाचा असतांना ऐकलेले शब्द आहेत. काय बोलाल या बद्दल??

बुद्धीची का कल्पनाशक्तीची?

बादवे, लिमये मास्तरांनी आनंदरावांना कधी घरी जेवायला बोलावलं नव्हतं ना?

अदुबाल,
लिमये मस्तराना आम्हालाच कधि कधि जेवायला घेउन जावे लागत होते. मास्तर अविवाहित होते.

मस्त.. लेख आणि प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत.

जॅक डनियल्स's picture

2 Jun 2017 - 7:18 am | जॅक डनियल्स

धन्यवाद ! मिपावर , प्रतिसादामुळे लेखाला एक कोंदण मिळते.

खिलजि's picture

3 Oct 2019 - 5:53 pm | खिलजि

जॅक डॅनियल्स ,, अप्रतिम सादरीकरण .. सर्व लेखमाला एका दमात वाचून काढली .. अहाहा काय लिवलंय .. जीव ओवाळून टाकावा तुझ्यावर मित्रा .. खत्तर्नाक .. शब्दच नाहीत .. माफ कर ,, डायरेक्ट अरे तुरे वर आलोय .. पण का आलोय माहित आहे का .. तुझ्या या जीवघेण्या लेखनशैलीमुळे .. इथे थेट आत भिडलं रे तुझं लिखाण .. खड्ड्यात गेली कामं सारी .. सरळ घुसलो आणि थेट सर्व वाचूनच बाहेर पडलो .. सलाम मित्रा .. तुझी सुरुवात तर झक्कास लेका .. एकदम आपल्याच श्टाईलमध्ये फेल झाल्यावर जो काही वेळ सत्कारणी लावलास त्याला तोड नाही .. अर्थात तू साप पकडलेस आणि मी विषकन्यांशी सूत जुळवले .. तेही खत्तर्नाक असत बरं का .. व्यवस्थित हाताळल्या नाहीस तर जीव काय सर्वच जाऊ शकते .. मी तो कोर्स कम्प्लिट केला माझ्या फेल्युअर टैमात .. पण दंडवत स्वीकार .. स्वीकार दंडवत , साष्टांग दंडवत घालतो हा खिलजी तुला .. तुझी लेखमाला , एक उत्तम नमुना ठरू शकते , हि आजकालची कोवळी पोरं , नापास झाली कि स्वतःच आयुष्य संपवतात त्यांच्यासाठी .. एक नवी दिशा ठरू शकते .. मी तर आज नक्कीच याच्या प्रति काढून ठेवतोय आणि माझ्या मोठ्या मुलाला वाचायला देईन ..