एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग.

जॅक डनियल्स's picture
जॅक डनियल्स in जनातलं, मनातलं
5 Aug 2013 - 11:29 am

एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !

एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !

एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ !

एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !

या लेखमालेपासून मी सापांची ओळख करून देतो आहे. विचार केला की, विषारी सापांपासून श्रीगणेशा करू. सापांची पुस्तकी ओळख-त्यांचे निवास स्थान, मादी किती अंडी घालते, रंगाची रेंज, भक्ष इ. तुम्हाला कुठल्यापण 'सरपटणाऱ्या' प्राण्यांच्या पुस्तकात मिळेल. संग्रही ठेवावीत अशी दोन पुस्तके म्हणजे " निलीमकुमार खैरेंचे-भारतीय साप " आणि थोडे अजून पैसे (~७०००रु.)टाकायचे असतील तर "अशोक कॅप्टन आणि रोम्युलस विटेकरांचे-Snakes of India, The Field Guide."

अश्या प्रकारची मी पुस्तकी माहिती लिहिणार नाही, कारण तेवढा माझा अजून व्यासंग आणि अनुभव नाही. माझे सगळे लेख हे थोडी माहिती आणि जास्त स्वानुभवावर आधारित असतील. या सर्व भागातील फोटो माझा मित्र आमोद झांबरे आणि चिराग रॉय यांचे आहेत. आमोद झांबरे याने TIFR मध्ये wildlife conservation मध्ये मास्टर केले आहे आणि आत्ता उच्चशिक्षणाचे पर्याय शोधात आहे. त्याची पेशालीटी 'भारतीय विंचू' आहे, त्याने नवीन जाती पण शोधून काढल्या आहेत. चिराग हा प.बंगाल मध्ये राहून सापांवर संशोधन करतो.

नाग ('बेक्कार' विषारी):

आपल्याकडे महाराष्ट्र आणि गोवा मध्ये जो नाग मिळतो त्याला -चष्मा नाग (spectacled cobra)किंवा लोकांच्या भाषेत 'दहाचा आकडावाला नाग" म्हणतात. पुण्यामध्ये सदाशिव पेठ्तल्या वाड्याच्या जिन्याखाली,सहकारनगरमधील बंगल्यात-अडगळीच्या खोलीत, धनकवडीला चुली मध्ये, आंबेगाव पठारावर विहिरीमध्ये, लुल्लानगर मध्ये स्वीमींग तलावामध्ये,पार्वती जनता वसाहतीत मोरीच्या बोळात, (सिंहगड रस्ता) वडगाव बुद्रुक मधील इमारतीच्या पिण्याच्या प्यायच्या टाकीत आणि शेवटी कर्वेनगर मध्ये स्कूटर च्या डिक्कीत मला हा मिळाला आहे.( अजून अनेक जागा आहेत, पण हे अनुभव संस्मरणीय होते ;)). नागाचे अजून प्रकार भारतात सापडतात-मोनोसिलेट नाग (प.बंगाल) आणि काळा नाग(पंजाब,राजेस्थान इ.)पण आपल्या एकडे फक्त हा 'चष्मा' नाग सापडतो.

नाग.

खालचे फोटो बघा , म्हणजे समजेल की तो 'चष्मा' हा नागाच्या शिकाऱ्यांला घाबरवण्यासाठी असतो. म्हणजे आपण जसे अभियांत्रिकीच्या परीक्षेत १ पानाच्या जागी ५ पानी उत्तर लिहून परीक्षकाला गोंधळात टाकतो, तसला हा प्रकार ;). प्रत्येक नागाच्या फण्यावर वेगळी नक्षी (फेशन-फण्याची नक्षी )असते पण सगळ्यांचा उद्देश तोच असतो.ती फेशन मात्र फारच मोहक असते,नागपंचमीमुळे का होईना ती आपल्या सर्वांनी पाहिलेली असते.शास्त्रीयदृष्ट्या पण त्याचे महत्व म्हणजे त्यावरून नागाचा विझुअल जेनेटिक्स समजू शकते.

फणा

फणा १

नंतर चा हा फोटो बघा,आपण छत्री मिटतो तसा नाग फणा मिटतो आणि तो तसाच सरपटतो. त्यामुळे खूप वेळा कॉलवर नाग ओळखणे अवघड जाते, लोकं त्यामध्येच फसून अपघात करून घेतात. एखाद्याला कोपच्यात घेतल्या वर तो जसा आधी बॉडी फुगवत आये-माई काढतो तसा नाग फणा काढून फुत्कार टाकतो, त्यामधून त्याला फक्त समोरच्याला सांगायचे असते- "आपण लई डेंजर ए, पुढे आला तर बघ"...जर समोरच्याने वाट दिली तर तो लगेच कल्टी मारतो(दुनियादारी मधल्या साईनाथ सारखी ;)). शेवटचा पर्याय म्हणून चावतो, नागाला पण त्याच्या विषाची पूर्ण किंमत माहिती असते त्यामुळे जेंव्हा चावतो तेंव्हा तो मोजून-मापून चावतो.(दुसऱ्याचे डोके विनाकारण चावणाऱ्यानी हे लक्षात ठेवले पाहिजे !).

नाग १

जंगलात जे नाग राहतात ते वेगवेगळे बेडूक-सरडे , छोटे जंगली प्राणी, छोटे पक्षी इ.असे अनेक काही खातात पण पुण्यासारख्या शहरातील नागांना चविष्ट पर्याय कमी असतात. त्यांना जास्त करून काळे उंदीर, घुशी, बेडूक आणि कबुतरं,चिमण्या(माणसांनी मारून उरल्या असल्या तर ;)) इ. मिळतात. सगळे नाग १००% नॉनव्हेज खातात ,त्यामध्ये दुध, बत्तासे अश्या शाकाहारी गोष्टी येत नाहीत.

फक्त विकसित बुद्धीच्या (??) माणूस प्राण्याला माहित आहे की गाईचे दुध त्यांच्या आचळातून कसे मिळवायचे आणि त्याचा खरवस कसा करायचा, ही गोष्ट नागांना (कुठल्या पण सापाला) येत नाही. उलट या विकसित माणसाने, अंधश्रध्येमुळे त्यांना दुध कोंबून अनेक वेळा गुदमरून मारलेले आहे. नागपंचमीच्या आधी १ महिना तहानलेले ठेवून, नंतर त्यांच्या समोर दुध काय 'जेडी' जरी ठेवली तरी ते अधाश्यासारखे पितील. दुध हे निसर्गात, (आंबे येतात तसे) नैसर्गिकरीत्या उबलब्ध नसते, त्यामुळे ते कुठल्या पण सरपटणाऱ्या प्राण्याचे खाद्य असूच शकत नाही.

नागाचे विष हे मज्जासंस्थे वर हल्ला करते, म्हणजे मेंदुमधून जे आपले शरीर कार्यरत राहायला संदेशवहन चालते ते गंडवते. थोडक्यात म्हणजे जीमेल मध्ये असा व्हायरस टाकायचा की हळू हळू एक पण इमेल आपल्याला मिळणार नाही आणि शेवटी खाते बंद पडेल. नाग चावल्यावर, सुरवातीला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो, मग हळू हळू ऐक-ऐक क्रिया बंद पडत, कार्डियाक अरेस्ट होऊन माणूस दगावतो.(मिपाकर डॉ.खरे या वर जास्त प्रकाश टाकू शकतील.)

आधी मिपावर एका प्रतिक्रियेत मी लिहिल्या प्रमाणे- हे विष poison नसून venom असते, ज्याचा फक्त रक्ताशी संबध आला तरच त्याचे दुष्परिणाम होतात. हे वेनोम नागाची थुंकी असते, त्यात प्रामुख्याने प्रोटीन,enzymes असतात की जे नागाला त्याचे भक्ष पचवायला मदत करतात. त्यामुळे जर आपण जर हे वेनोम प्यायले तर तो प्रोटीन शेक सारखे काम करेल, पण जर तोंडात किंवा पोटात जखम (ulcer) असेल तर वाट लागेल आणि कोणता माणूस ते पचवू शकेल की नाही ही पण एक शंकाच आहे.

नागच्या (कोणत्याही विषारी सापाच्या) पिल्लामध्ये पण पूर्ण विकसित झालेल्या विष-ग्रंथी असतात, आणि विष पण मोठ्या नागापेक्षा जहाल असते. कारण विष-ग्रंथीचा आकार छोटा असल्यानेमुळे त्यांना कमी विषात जास्त मोठें भक्ष मारून पचवायचे असते.(त्यांना त्यांच्या आया ग्राईप वाटर पाजत नाहीत ;)). म्हणून लहान पिल्लू बघून त्याला हलगर्जी पणे हाताळायला जाऊ नका, ते पण मोठ्या नागासारखेच तुम्हाला पोचवू शकते.
मोठा नाग जास्तीत जास्त साधारण पणे ~२११ mg विष टोचू शकतो,नाग कधीच एवढे विष टोचत नाही, एखादा पूर्ण वाढ झालेला माणूस ११ mg विषामध्ये राम म्हणू शकतो. नागाचे विषाचे गणित हे त्याच्या भक्षाच्या आकारानुसार बदलत असते( म्हणजे छोटा उंदीर असेल तर थोडे आणि घूस असेल तर जास्त विष)पण माणूस समोर आला तर त्याचे हे गणित चुकते आणि 'टू बी सेफर' तो जास्त विष टाकतो किंवा टाकत पण नाही.त्यामुळे नाग चावल्यावर, एकच उपाय -सरकारी रुग्णालय, पुढचे कार्य तिकडचे डॉ. बघून घेतील.

भारतात सगळ्यात जास्त सर्पदंशाचे मृत्यू हे नाग चावल्याने होतात, भातशेतीत बेडूक खायला नाग येतात, आणि भात कापणीच्या वेळी विळा चालवताना किंवा चुकून पाय पडून नागदंश होतो. पुण्यामध्ये जिकडे शेत जमिनी घेऊन (सिंहगड रस्ता, आंबेगाव पठार इ.)घरे बांधली गेली आहेत तिकडे अजून खूप मोठें नाग निघतात आणि नाग दंश पण होतात. आधीच्या भाग २ मध्ये लिहिल्या प्रमाणे मी सिहगड कॉलेज मध्ये खूप मोठें (५-६ फुटी) नाग पकडले आहेत. नाग स्वतःहून कोणाच्या वाटेला जात नाहीत, पण कोणीखोडी काढली किंवा त्याला कोपच्यात घेतले तर त्याच्या सारखा दुसरा मोहक लढवय्या नाही.

मावळत्या उन्हात, केवड्याच्या बनात,सळसळणारी नागीण पहायचे भाग्य नशिबात असायला लागते.

नागाबद्द्लच्या अंधश्रद्धा आणि माझे अनुभव पुढच्या भागात....

विज्ञानशिक्षणमौजमजाअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

5 Aug 2013 - 11:40 am | यशोधरा

मस्त लिहिलेय.

नाग स्वतःहून कोणाच्या वाटेला जात नाहीत, पण कोणीखोडी काढली किंवा त्याला कोपच्यात घेतले तर त्याच्या सारखा दुसरा मोहक लढवय्या नाही.

मावळत्या उन्हात, केवड्याच्या बनात,सळसळणारी नागीण पहायचे भाग्य नशिबात असायला लागते.

क्या बात! भा हा री ही :)

बाळ सप्रे's picture

5 Aug 2013 - 11:42 am | बाळ सप्रे

नेहेमीप्रमाणेच अप्रतिम!!
पण

नंतर चा हा फोटो बघा

कुठे आहेत फोटो?

जॅक डनियल्स's picture

5 Aug 2013 - 9:11 pm | जॅक डनियल्स

जरा जागा चुकली, तो परिच्छेदानंतरचा फणा मिटलेला फोटो मला म्हणायचे होते. आधी वरतीच टाकला होता, तो नाग वळवळत अडोषाच्या जागी जाऊन बसला.;)

आदूबाळ's picture

5 Aug 2013 - 11:49 am | आदूबाळ

__/\__

जेड्या, पुढचा भाग एका आठवड्याच्या आत टाकला नाहीस, तर तिथे येऊन मारीन.

जॅक डनियल्स's picture

5 Aug 2013 - 9:14 pm | जॅक डनियल्स

बरे झाले आईडिया दिली, आत्ता तू एकडे मारायला पोहचला की पोस्ट करीन...म्हणजे त्या निमित्ताने भेट तरी होईल...;)

माझीही शॅम्पेन's picture

5 Aug 2013 - 12:19 pm | माझीही शॅम्पेन

मस्त ... एक्दम झकास लेख झालय !!!

नाग अगदी जवळुन पाहिलेला आहे... तसेच अन्य साप सुद्धा जवळुन पाहिले आहेत... नशिबाने त्यांनी मला दंश केला नाही. कात टाकताना सापड्याला पाहिले आहे. कात हातात घेउन त्याचे निरिक्षण सुद्धा केले आहे. केवड्याच्या बनात शिरलो आहे आणि एक वेगळ्याच अनुभवाचा आनंद देखील घेतला आहे... काळाच्या ओघात यातल्या बर्‍याच गोष्टी नष्ट झाल्या... आता राहिल्यात त्या "फक्त" आठवणी.
बाकी लेखन वाचतो आहे... लगे रहो.

कपिलमुनी's picture

5 Aug 2013 - 2:54 pm | कपिलमुनी

चुकून "स्पावड्याला " वाचले ;)

मोहनराव's picture

10 Aug 2013 - 12:20 am | मोहनराव

चुकून "स्पावड्याला " वाचले smiley

अरे जर त्याने कात टाकली तर काहिच शिल्लक राहणार नाही!! :)

तिमा's picture

5 Aug 2013 - 1:03 pm | तिमा

लेख अप्रतिम आणि पिल्लांच्या विषाची माहिती थरकांप उडवणारी, लेख वाचून 'नागा' वलोय.

जेपी's picture

5 Aug 2013 - 1:19 pm | जेपी

*****

झकासराव's picture

5 Aug 2013 - 1:21 pm | झकासराव

सही लेखमाला... :)

अनिरुद्ध प's picture

5 Aug 2013 - 1:42 pm | अनिरुद्ध प

पु भा प्र.

Mrunalini's picture

5 Aug 2013 - 1:56 pm | Mrunalini

मस्त.. पुभाप्र.

कपिलमुनी's picture

5 Aug 2013 - 3:01 pm | कपिलमुनी

लेख छान आहे !

काही शंका आहेत..
१. नागाची१० आकडी नागाची लांबी जास्तीत जास्त किती असते ?
२. फणा काढलेला नसेल तर नाग कसा ओळखायचा ?
३. ट्रेक मध्ये अशा कोणत्या जागा आहेत जिथे सापांसंबंधी काळजी घेतली पाहिजे ?
४. ऊब ! साप नाग ऊब असेल तिथे आकर्षित होतात का ? ( म्हणजे आम्ही गडावर कडाक्याच्या थंडीत स्लीपींग बॅग मधे झोपलो आहे , आणि कानाशी " भावा , थंडी फुस्स करतीये ..थोडा सरक" असा आवाज यायचा)..

भुमन्यु's picture

5 Aug 2013 - 3:28 pm | भुमन्यु

( म्हणजे आम्ही गडावर कडाक्याच्या थंडीत स्लीपींग बॅग मधे झोपलो आहे , आणि कानाशी " भावा , थंडी फुस्स करतीये ..थोडा सरक" असा आवाज यायचा).

"

झकासच...
कल्पना मस्त आहे राव!!!!

:) पुढे काय होईल ते नाही लिहिलं.

जॅक डनियल्स's picture

5 Aug 2013 - 9:38 pm | जॅक डनियल्स

धन्यवाद् !
१)ती लांबी कमी जास्त असू शकते, पण माझा असा अनुभव आहे की जंगलामध्ये चांगल्या फेशन चे नाग मिळतात. काही फण्यावर फेशन नसते, त्या नागला काही सर्पमित्र काळा नाग समजतात.(black cobra ही पूर्ण पणे वेगळी जात आहे.)
२)या प्रश्नांचे उत्तर मला देता येणार नाही, कारण जे उत्तर देईन त्यावरून अपघात होऊ शकतात. जास्त करून तरी नाग माणूस दिसला तर फणा काढून फुत्कारतो आणि स्वतः चे अस्तिव दाखवून देतो.
३)सगळ्याच जागा आहेत, की तिकडे साप-नाग असू शकतात. पण प्रामुख्याने खाणे खाऊन झाल्या वर ती जागा नीट साफ करून ठेवली पाहिजे, कारण सांडलेले खाणे खायला उंदीर आणि त्यांच्यामागे साप येतात.
४)भाग ४ मध्ये लिहिल्याप्रमाणे, साप हा थंड रक्ताचा प्राणी असल्यामुळे तो शरीराचे तापमान राखण्यासाठी शेकोटीपाशी किंवा उबेच्या ठिकाणी येतो,म्हणून ट्रेक मध्ये तंबू च्या बाजूला स्नेक त्रेंच (सापाचा अडकाव खड्डा )खोदतात. गुहेमध्ये झोपत असला तर,उंदीर असतील तर साप यायची शक्यता असते, त्यामुळे झोपायच्या आधी सगळे तपासून घ्यावे आणि जर वाटलेच तर आळीपाळीने पाहारा द्यावा.

सुधांशुनूलकर's picture

5 Aug 2013 - 3:44 pm | सुधांशुनूलकर

वाचतोय. आवडीचा विषय. छानच लेखमाला. पुभाप्र.

सुधांशुनूलकर

सुधीर's picture

5 Aug 2013 - 4:10 pm | सुधीर

माहिती आवडली. काही शंका. नाग (इतर विषारी साप नाही) चावल्यावर डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी करायचे उपाय (ते बांधून ठेवणे,ब्लेडने कापणे वगैरे) उपयोगी पडतात का (कारण तो फारच विषारी असतो म्हणून)? की आपलं डॉ. नेण्यापूर्वीच "हे राम!"? असं पण ऐकून आहे की डॉ. नेल्यानंतर पण नक्की कोणता सर्प चावला यावरून ते औषध देतात. म्हणजे ज्याला सर्पज्ञान नाही तो संपला असं होतं का?

जॅक डनियल्स's picture

5 Aug 2013 - 9:49 pm | जॅक डनियल्स

आधी मिपाकर -मोदक यांच्या 'ट्रेक करताना' या वर दिलेले प्रतिसाद वाचा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.
http://www.misalpav.com/node/24804
http://www.misalpav.com/comment/488139#comment-488139

धन्यवाद!

सुधीर's picture

5 Aug 2013 - 10:34 pm | सुधीर

प्रतिक्रिया वाचल्या. माहितीपूर्ण आहेत. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली. धन्यवाद!

सगळे भाग वाचत आहे...खुपच छान लेखमाला....

मी-सौरभ's picture

5 Aug 2013 - 8:52 pm | मी-सौरभ

पु.भा.प्र.

तिरकीट's picture

5 Aug 2013 - 8:54 pm | तिरकीट

मस्त लेखमाला......
देहुरोडच्या दरम्यान पुणे-मुंबई महामार्गावर १ अस्स्ल दख्ख्नी नाग बघीतला होता..डोळ्यादेखत १ दुचाकी त्यावरून गेली..
त्यानंतर त्या नागाने त्या गाडीचा केलेला पाठलाग 'याची देही याची डोळा' बघीतला आणी थक्क झालो होतो, तो प्रसंग आठवला........

किसन शिंदे's picture

5 Aug 2013 - 9:30 pm | किसन शिंदे

माहितीपुर्ण लेखमाला. प्रत्येक भाग आवर्जून वाचलाय. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

प्रबळगडावरून खाली उतरताना मी न एका मित्राने एका झाडोर्यात फणा काढून बसलेला पाह्यला न जे धुम ठोकली ते खाली तळालाच पोहचलो होतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Aug 2013 - 9:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेखमाला. पुभाप्र.

मोदक's picture

5 Aug 2013 - 10:23 pm | मोदक

वाचतोय..

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Aug 2013 - 12:16 pm | बिपिन कार्यकर्ते

It cant get better than this!

खल्लास!

पैसा's picture

6 Aug 2013 - 9:45 pm | पैसा

खूपच माहितीपूर्ण आणि मनोरंजक! पुढचा भाग कधी?

लॉरी टांगटूंगकर's picture

6 Aug 2013 - 10:53 pm | लॉरी टांगटूंगकर

पुढचा भाग ज्यल्दी लीक्को बॉस.

पिशी अबोली's picture

8 Aug 2013 - 11:03 pm | पिशी अबोली

रॉयल प्रकार आहे.
मी एकदाच बघितला. असा पसरुन उन्हात पडला होता अगदी रस्त्यावर. आम्ही स्कूटर घेऊन वाट बघतोय साहेब जाण्याची.. हा आम्हाला किंमत द्यायला तयार नाही (एवढ्या सुंदर मुलीकडे एवढं दुर्लक्ष! हुं...) . आवडला जामच. तो दिवड वगैरे आधीच एवढा घाबरतो की त्याच्या धावपळीनेच घाबरायला होतं.. हा एकदम भारदस्त चालीमधे (की सरपटीमधे?) गेला...

लेखमाला मस्तच... वाचताना दहा वेळा आमच्या साप दडवण्यासाठी कुप्रसिद्ध कौलांकडे लक्ष जातं वर.. पण लवकर टाका पुढचे भाग. कधी चावला कुणी तर कळेल तरी कोण नक्की होता ते... ;)

जॅक डनियल्स's picture

9 Aug 2013 - 12:00 am | जॅक डनियल्स

उन्हातला चकचकीत नाग खूप सुंदर दिसतो.
तुम्हाला दिसलेली नागीण असेल, म्हणून तुमच्या कडे दुर्लक्ष केले असेल..;)

अत्रुप्त आत्मा's picture

8 Aug 2013 - 11:44 pm | अत्रुप्त आत्मा

जबरी श्टाइल मदी माहिती लिवलीया!

@ म्हणजे आपण जसे अभियांत्रिकीच्या परीक्षेत १ पानाच्या जागी ५ पानी उत्तर लिहून परीक्षकाला गोंधळात टाकतो, तसला हा प्रकार >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif

@ एखाद्याला कोपच्यात घेतल्या वर तो जसा आधी बॉडी फुगवत आये-माई काढतो तसा नाग फणा काढून फुत्कार टाकतो, >>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif

@ त्यामुळे जेंव्हा चावतो तेंव्हा तो मोजून-मापून चावतो.(दुसऱ्याचे डोके विनाकारण चावणाऱ्यानी हे लक्षात ठेवले पाहिजे !). >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif

@दुध हे निसर्गात, (आंबे येतात तसे) नैसर्गिकरीत्या उबलब्ध नसते, त्यामुळे ते कुठल्या पण सरपटणाऱ्या प्राण्याचे खाद्य असूच शकत नाही. >>> http://www.mimarathi.net/smile/congrats.gif http://www.mimarathi.net/smile/congrats.gif http://www.mimarathi.net/smile/congrats.gif

त्यो तिसरा फोटू बगून लै भ्या http://www.easyfreesmileys.com/smileys/free-scared-smileys-366.gif वाटलं !

आनन्दिता's picture

9 Aug 2013 - 10:47 pm | आनन्दिता

त्यो तिसरा फोटू बगून लै भ्या वाटलं !

असंच म्हण्ते.....

सुबोध खरे's picture

10 Aug 2013 - 11:44 pm | सुबोध खरे

नागोबाला दुध हे मिथ्यक आहे. गारुडी नागपंचमी च्या अगोदर बरेच दिवस नागाला पाणी देत नाहीत त्यामुळे नागपंचमीला तहानलेला नाग पाण्याऐवजी दुध पितो.

सुंदर माहिती दिलीत ज्याक भो

उगाच फाफट पसारा नाही. हलक्या फुलक्या ढंगात माहिती येतेय.
हा ही भाग आवडला.
और आंदो.

सूड's picture

9 Aug 2013 - 3:12 pm | सूड

पुभाप्र!!

(चवीने चावणार त्याला विष चढणार) ;)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Aug 2013 - 3:55 pm | निनाद मुक्काम प...

रोचक अनुभव व तेवढेच खुशखुशीत लिखाण
मिपावरील ही संग्रही ठेवावी अशी लेखमाला होत आहे.
मागे किंग कोब्रा चा उल्लेख आला होता
जर्मनीत छोट्या पडद्यावर भारतीय वाहिन्या दिसत नाही मग तू नळीवर अवलंबून राहावे लागते , त्यामुळे अनेक वेगवेगळ्या विषयावरच्या दृश्य फिती पहिल्या जातात
भारतीय सर्पांच्या वर अश्याच काही पाहिलेल्या येथे अडकवतो.

आदिजोशी's picture

9 Aug 2013 - 6:22 pm | आदिजोशी

माहितीने ठासून भरलेली तरीही रटाळ न होणारी एक अप्रतिम लेखमाला. लगे रहो.

नागासारख्या चपळतेने पुढचे भाङ टाका आता :)

जॅक डनियल्स's picture

9 Aug 2013 - 10:45 pm | जॅक डनियल्स

वीकांत पर्यंत नवीन भाग नक्की टाकतो, फोटोच जमवतो आहे.

मोहनराव's picture

10 Aug 2013 - 12:26 am | मोहनराव

सगळे भाग एकदम वाचुन काढले. थरारक अनुभव व माहीती.

चाफा's picture

10 Aug 2013 - 3:49 am | चाफा

आधी पासून ही लेखमाला वाचतोय पण आज प्रतिसादाची संधी मिळाली :)
जॅक डी, फार क्वचित इतके रटाळ विषय इतक्या छान समजावणारे लोक भेटतात. ही माहिती खरंच उपयुक्त आहे :)
२. फणा काढलेला नसेल तर नाग कसा ओळखायचा ? >>> कपिलमुनी, कधी अशी वेळ आलीच तर आधी दोन-चार वेळा जमिनीवर दुरूनच आवाज करा नाग असेल तर फणा काढतोच. मग पळायचं :)
नाग (इतर विषारी साप नाही) चावल्यावर डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी करायचे उपाय (ते बांधून ठेवणे,ब्लेडने कापणे वगैरे) उपयोगी पडतात का >>>> सुधीर, हे फक्त नागाच्याच बाबतीत प्रथमोपचार म्हणून वापरता येतात त्यातही बांधायचे प्रेशरपॉइंट माहित असणं जास्त गरजेचं, ( पण हे केवळ प्रथमोपचार, शक्य तितक्या लवकर दवाखाना गाठणे हे अनिवार्य ) माझ्यामते घोणस फुरसे इत्यादीवर बांधण्याचा उपाय करूच नये..

( अतिसामान्य सर्पमित्र ) चाफा

शिल्पा ब's picture

10 Aug 2013 - 6:21 am | शिल्पा ब

<<<माझ्यामते घोणस फुरसे इत्यादीवर बांधण्याचा उपाय करूच नये..

का?

सुबोध खरे's picture

10 Aug 2013 - 10:07 am | सुबोध खरे

सापाचे विष हे तुमच्या मासात सोडले जाते तिथून ते रस वाहिन्या द्वारे(lymphatics) हळूहळू शरीराकडे सरकू लागते. हा शरीराकडे जाणारा प्रवाह अधिक मंद करण्यासाठी त्या जागेच्या एक फुट वर एक आवळ पट्टी बांधावी. लांब कापड ( बायकांची ओढणी सारखे) घेऊन ते इतकेच घट्ट बांधावे कि आपलि करंगळी त्यातून जेमतेम फिरवता यावी. कारण त्या भागाचा रक्त पुरवठा बंद होता कामा नये. (अति घट्ट आवळ पट्टीने फायदा होण्याऐवजी नुकसान होते). ब्लेडने चिरा देऊ नयेत त्याने कोणताही फायदा होत नाही. (उलट घोणस किंवा फुरसे यांच्या दन्शानंतर त्यातून जास्त रक्तस्त्राव होतो). विष तोंडाने शोषून सुद्धा काहीही फायदा होत नाही( सिनेमासाठी ठीक आहे ). दंश झालेला भाग खाली लटकत ठेवावा म्हणजे गुरूत्वाकर्षणाने विषाचा प्रवाह अजून हळू होतो. आणि लवकरात लवकर जवळच्या शासकीय रुग्णालयाकडे धाव घ्यावी. मग तो साप विषारी असो कि बिनविषारी. (विषाची परीक्षा घेऊ नये).
फुरसे आणि घोणस यांचे विष हे रक्त वाहिन्या आणि रक्ताचे विघटन करते त्यामुळे रक्त पातळ होऊन रक्ताचे फोड येतात आणि रक्त स्त्राव होतो. अति आणि अंतर्गत (मेंदूत व इतर अवयवात) रक्तस्त्रावाने माणूस दगावतो याला प्रतिविष हाच उपाय आहे आणि ते जितक्या लवकर दिले जाते तितका तुमच्या शरीराचे नुकसान कमी होईल.रुग्ण वाचला तरी अंतर्गत रक्त्स्त्रवचे परिणाम पुढचे काही महिने दिसत राहतात. सहा इंचाचे फुरसे सुद्धा जीवघेणा दंश करू शकते.
म्हणूनच म्हणतात साप म्हणू नये धाकला.

नाग आणि मण्यार यांचे विष आपल्या मज्जा संस्थेवर परिणाम करतात त्यामुळे मेंदूकडून येणारे आणि मेंदूकडे जाणारे संदेशवहन बंद होते त्यामुळे ती भाग बधिर होतो. शेवटी मेंदूकडून श्वसनाच्या स्नायुंना होणारे संदेश वाहन बंद होते आणि माणूस श्वास न घेत आल्याने मृत्यू मुखी पडतो. जर श्वसन थांबले तर रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवून जगवता येते.
पण एकदा रुग्ण वाचला तर त्याच्यावर दूरगामी परिणाम होत नाहीत.
एक विनंती ट्रेक वर जाणार्यांना साप एकदा चावला तर त्याच्या मागे जाऊ नका तो परत परत चावू शकतो आणि जितक्या वेळा चावेल तितके जास्त विष तुमच्या शरीरात शिरेल . उगाच इगो दुखावल्याने काही करू नये.

जॅक डनियल्स's picture

10 Aug 2013 - 10:42 am | जॅक डनियल्स

मस्त माहिती दिली आहे..या इगोमुळेच आणि पोरीच्या पुढे हिरोगिरी करण्यामुळे किती दिस्कोवरीप्रेरित सर्पमित्रांना साप चावला आहे..

शिल्पा ब's picture

10 Aug 2013 - 10:52 am | शिल्पा ब

धन्यवाद.

सुधीर's picture

10 Aug 2013 - 7:52 pm | सुधीर

कापणे हा प्रकार खूप खूप वर्षापूर्वी शाळेच्या पुस्तकात वाचला होता. आता नव्याने प्रथोमोपचाराची माहिती मिळते आहे(या आणि ट्रेकिंगच्या धाग्यात).

उद्याच्या नागपंचमीच्या मुहुर्तावर पुढील लेखाची वाट बघतो.

खटपट्या's picture

10 Aug 2013 - 4:47 am | खटपट्या

फोटो दीसत नाहीत

मीनल's picture

10 Aug 2013 - 7:32 am | मीनल

http://myurmee.blogspot.com/2010/03/blog-post_03.html

आमच्या घरी निघालेला हा साप कोणता?

जॅक डनियल्स's picture

10 Aug 2013 - 7:38 am | जॅक डनियल्स

मी आधी पण उत्तर दिले होते पण बहुतेक मधल्या काळात ते पुसले गेले.
तो पूर्वेचा राजा साप (Eastern Kingsnake ) आहे. आमच्या कडे पण टेनसी मध्ये सापडतो. खूप शांत आणि बिनविषारी साप आहे. दुसरे साप हे त्याचे अन्न आहे. साप पाळणाऱ्या लोकांना अतिशय प्रिय आहे.

अमोल खरे's picture

10 Aug 2013 - 11:24 am | अमोल खरे

जबरदस्त माहिती आहे. आमच्या बिल्डिंग खाली जाडजुड साप मिळाला होता. बहुदा अजगर होता. कुठुन कसा आला माहित नाही. बहुदा नॅशनल पार्क मधुन आला असावा. अजगर असल्याने काहीच मुव्हमेंट नव्हत्या. कोणाला तरी तो दिसल्यावर लगेच फोनाफोनी करुन पोलिस आणि एक सर्पमित्र आला. त्याने लगेच तो पकडला आणि त्यावर बहुदा फडकं टाकलं. मी घराच्या खिडकीतुन पाहत असल्याने नीट कळलं नाही, पण बहुदा फडक्यात गुंडाळुन त्याने तो पोत्यात टाकला. त्या फडक्यावर पाणी टाकायला तो बिचारा सर्वांकडे पाणी मागत होता, तर एकजण पाणी द्यायला तयार नाही. शेवटी अंगणात एकाने नळ दाखवला, त्या नळाचे पाणी त्याने घेतले आणि त्या अजगराला घेऊन तो गेला. मी सहज तीन मजले उतरुन त्याला पाणी नेऊन देऊ शकलो असतो, पण मी जाईपर्यंत कोणीतरी पाणी देईलच असं वाटुन मी नुसता बघत राहिलो ह्याची रुखरुख अजुन आहे.

जॅक- अजगर अख्खा माणुस खातो असं म्हणतात ते खरं आहे का ? आणि त्या माणसाने खरोखर फडकं टाकलं होतं का ? म्हणजे असं फडकं टाकायची पद्धत आहे का ?

जॅक डनियल्स's picture

10 Aug 2013 - 11:34 pm | जॅक डनियल्स

अजगराची अंधश्रद्धा लेखात मी माहिती देईन.
समोर हालचाल दिसली की साप विचीलीत होतात आणि हल्ला करतात म्हणून अजगराला शांत करायला त्याने फडके टाकले होते. अशी पद्धत अजगरासाठी वापरली जाते कारण तो हल्ला करून चावतो. तो बिनविषारी असला तरी मोठा असल्यामुळे चावणे परवडत नाही. हे वाचून ती पद्धत कोणी वापरू नका, खूप धोक्याची पद्धत आहे ती..

चाफा's picture

10 Aug 2013 - 3:46 pm | चाफा

.
आठवला म्हणून इथे डकवला फोटो,

चिगो's picture

10 Aug 2013 - 11:00 pm | चिगो

भारी लिहितोयस, मित्रा.. पंचेस तर लैच जबराट हाणलेयत, भाऊ.. ;-) लगे रहो..

भटक्य आणि उनाड's picture

11 Aug 2013 - 2:21 am | भटक्य आणि उनाड

see

भटक्य आणि उनाड's picture

11 Aug 2013 - 2:22 am | भटक्य आणि उनाड

Another one

भटक्य आणि उनाड's picture

11 Aug 2013 - 2:23 am | भटक्य आणि उनाड

Last one

जॅक डनियल्स's picture

11 Aug 2013 - 4:16 am | जॅक डनियल्स

फारच भारी फोटो आहेत. मोनोसिलेत नाग आहे.
साधरण पणे एक दिवसात पचवून टाकले असेल किंग ने त्याला.
साधरण पणे माणसाची ढवळाढवळ झाली तर साप त्याचे भक्ष ओकून टाकतो, पण इकडे नशिबाने तसे झालेले दिसत नाही.

पहाटवारा's picture

11 Aug 2013 - 3:33 am | पहाटवारा

जेडि मित्रा , अनवट विषयावर लेखमाला लिहितोयस .. अन तुझि शैलीहि मस्त आहे...
एक विनंती ..

आमोद झांबरे याने TIFR मध्ये wildlife conservation मध्ये मास्टर केले आहे आणि आत्ता उच्चशिक्षणाचे पर्याय शोधात आहे. त्याची पेशालीटी 'भारतीय विंचू' आहे, त्याने नवीन जाती पण शोधून काढल्या आहेत.

या तुझ्या "विंचूमित्रा" लाहि लिहिते कर .. नाहितर तूच त्याचा लेखविता धनी बन !

जॅक डनियल्स's picture

11 Aug 2013 - 4:09 am | जॅक डनियल्स

कल्पना चांगली आहे.
मी त्याला विचारून बघीन. धन्यवाद्.

जव्हेरगंज's picture

14 Sep 2016 - 8:14 pm | जव्हेरगंज

हा भाग एकदभ क ड क !

लै भारी!

फुटूवाला's picture

6 Mar 2022 - 11:29 am | फुटूवाला

1
2

हा घोणस आहे का? घराच्या खिडकीतून काढलेला फोटो आहे हा.