*******************************************************
धनाजीरावांनी कुठूनतरी "धनाजीराव आणि पार्टी" चा उल्लेख करून सखूची आठवण काढली. सखूचा धागा वर आला नाही पण त्या गीताच्या (?) तालावर आम्हाला बरेच काही सुचत गेले..
सखूचे विडंबन समजणार असलात तर जरूर समजावे, मात्र कुणा व्यक्ती / पात्राशी सांधर्म्य आढळयास योगायोग समजण्याची चूक करू नये.
*******************************************************
शब्द खरडतो 'मी' घाई घाई, अर्थाची आठवण राहीलीच नाही
बुध्दी, ज्ञान, मती सर्व 'माझ्याच' ठायी, आजही तू सहमत होशील ना?
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
संस्थळांवर उडवलाय धुरळा, 'मीच' काढलाय 'माझाच' गळा
'मी' सांगतो तीच पूर्व दिशा, 'मी' सांगतो तोच अर्थ खरा
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
जगातले सर्व ज्ञान आहे 'मला', तुझे बरोबर मुद्दे पण पटेनात 'मला'
'मी', 'माझे' मत, 'माझे' प्रतिसाद, 'माझे' विचार, 'माझे' ज्ञान.. पण आज्जिबात अहंकार नाही 'मला'
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
सांगत असतात बरेच जण 'मला', सांभाळून वाग बोल रे मित्रा
'मी' म्हणतो 'माझ्या' ज्ञानाचा ते तिरस्कार करतात, सतत 'मलाच' टारगेट करतात
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
तू कसे काय म्हणतेस 'मी' चुकलो, छे छे नाहीच्च 'मी' चुकलो.
बरोबर असले मुद्दे तुझे तरी, अंतीम सत्य नेहमी 'मीच' बोलतो
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
"आजपण ऐकशील ना..?" मध्ये दिसते विनंती, आज्ञा सोडायची सवय 'माझ्या' ठायी .
'मी' आता त्या विनंतीला आज्ञेमध्ये बदलतो, आजच्या दिवसातला एक विजय (?) प्राप्त करतो.
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तुला ऐकावाच्च्च्च्च्च्च्च्च्च्च लागेल.
कदाचित तू असशील बरोबर, मुद्देही असतील लॉजीकल, पण ते 'मी' मान्य कसे करेन??
तुला माझ्यासारखे वागायचेय? मग सभ्यता, मर्यादा, संकेत सर्व विसरावे लागेल.
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तुला ऐकावाच्च्च्च्च्च्च्च्च्च्च लागेल.
प्रतिक्रिया
19 Jan 2013 - 9:53 am | स्पा
ना यमक ना छंद
कविता आहे कि गद्य ..
असो
पण जे काही आहे ते लई भारी आहे :D
19 Jan 2013 - 10:11 am | मोदक
ना यमक ना छंद कविता आहे कि गद्य ..
या अभिप्रायाबद्दल तुम्हाला वरील लेखनविषयामधील 'व्याकरण' हा लेखनविषय सप्रेम भेट. ( 'औषधोपचार' प्रेझेंट देणार होतो पण तुम्ही कंपू घेवून मागे लागलात तर आम्हाला लपून बसण्यास जागा शोधावी लागेल ;-) )
असो, पण जे काही आहे ते लई भारी आहे
या अभिप्रायाबद्दल तुम्हाला वरील लेखनविषयामधील 'मौजमजा' हा लेखनविषय सप्रेम भेट
आपल्या अभिप्रायाबद्दल मी आणि (धनाजीरावांची) सखू आपले आभारी आहोत. :-D
19 Jan 2013 - 10:12 am | प्रचेतस
नशिब!!! काव्यरसातील भूछत्री नाही दिलीत ते
19 Jan 2013 - 10:10 am | स्पा
भूछत्री
तो मान फक्त आणि फक्त मांडीवाल्या बुवाचा
19 Jan 2013 - 10:14 am | मोदक
स्पाशी सहमत.
काय पण दिवस आलेत तेजायला. :-))
19 Jan 2013 - 11:36 am | पैसा
कोढाईकनाळ??
20 Jan 2013 - 9:16 pm | मोदक
बुवा, कुठे हैसा..?
तुमच्यापासून सुरू झालेल्या भूछत्र आणि कोडाईकनालच्या परंपरेचे उत्तर द्यायला या.
(बुवांकडून उत्तराची अपेक्षा असलेला :-D) मोदक.
20 Jan 2013 - 10:24 pm | सूड
>>(बुवांकडून उत्तराची अपेक्षा असलेला )
मोंदकांऽऽऽ अरे त्या बुवाचा संबंध दक्षिणेशीं, कांय समजलांस !!...ती उत्तरा फार तर नक्षत्र म्हणून माहिती असेल त्यांस. ;)
20 Jan 2013 - 10:33 pm | मोदक
अवांतर प्रतिसाद देवून चर्चा भरकटवण्याचा प्रयत्न.
आता प्रतिसाद दिलाच आहात तर आमच्या एका प्रश्नाचे उत्तर द्या. १० दिशा या कल्पना आहेत की भास / भ्रम..?
पूपदउ आणि अवानैई या आठ दिशा आपले स्थान उत्तर दिशेप्रमाणे बदलतात.
उर्ध्व आणि अधो या दिशा वैश्वीक सत्य ठरू शकत नाहीत. कारण आपली उर्ध्व दिशा ही आपल्या वरच्या मजल्यावरच्या माणसाची अधो दिशा असते. आपली अधो दिशा ही खालच्या मजल्यावरच्या माणसाची उर्ध्व दिशा असते.
(सोपे मुद्दे अवघड करणारा :-D) - मोदक.
20 Jan 2013 - 10:38 pm | सूड
>>१० दिशा या कल्पना आहेत की भास / भ्रम..?
ते आमाला काय विचारते, ते तुज्या शालेतला मास्तरला विचार ने !!
20 Jan 2013 - 10:36 pm | मोदक
आणि एक राहिले...
तुमच्या स्वाक्षरीमध्ये कोणते तरी रहस्य लपले आहे असे "मला" वाटते.
:-D
20 Jan 2013 - 10:42 pm | सूड
>>तुमच्या स्वाक्षरीमध्ये कोणते तरी रहस्य लपले आहे असे "मला" वाटते.
हो तर !! मदुराईची एक देवता कोकणातल्या एका तालुक्यात येऊन स्थायिक झाली तर तिचे नाव काय असेल? (संदर्भासाठी गोव्यातल्या काही देवतांची नावे अभ्यासणे. उदा. अन्नपूर्णा कुंकळ्ळीकरीण इ.इ.)
20 Jan 2013 - 10:43 pm | अत्रुप्त आत्मा
@बुवांकडून उत्तराची अपेक्षा असलेला>>> =)) निरुत्तर होणं हा ही कदाचित भ्रम असला,तरी त्यानंतर पळून जाणं/पाठ फिरवणं हे वास्तव आहे.
20 Jan 2013 - 10:58 pm | मोदक
तुमचे उत्त्तर कळाले नाही.
बुवा तुम्ही माझा प्रश्न नीट वाचला का..? वाचला असल्यास माझा प्रश्न कळाला का..? कळाला नसल्यास प्रिंटाऊट घेवून आणखी एकदा वाचला तरी चालेल. :-D
पण समजेल असे उत्तर द्या हो प्लीज.
20 Jan 2013 - 11:13 pm | अत्रुप्त आत्मा
21 Jan 2013 - 10:31 am | गणामास्तर
मोदक, मुळातचं तुमचा प्रश्न त्यातील व्यर्थता दर्शवतोय. तुमच्या लेखनात एक प्रकारचा दुहेरीपणा आहे.
तुम्ही ही एक रिअॅलिटी आहात, तुमचा प्रश्न ही एक वर्च्युअॅलिटी आहे म्हणजेचं इफ यू बिलीव देन देअर इज नो वर्च्युअॅलिटी, इट इज रिअॅलिटी फॉर यू.
वरील जाणकार (!) लोकांची चर्चा पुन्हा एकदा मन लावून वाचा.
मुळात हा चर्चेचा विषय नाही, अनुभवायचा आहे. हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल
तेव्हा तुम्हाला त्यातील गंमत जाणवेल.
21 Jan 2013 - 10:34 am | मोदक
अ र्र र्र र्र र्र र्र र्र
हा भिडू तर पोचलेला दिसतोय, बरोब्बर पकडले आहे मला याने. लॉजीकल उत्तर देणे शक्य नाही याला.
काय करावे..? फाट्यावर मारतो याचे प्रश्न आणि याचे विचार.
कधीतरी मिपावर धागा टाकेलच, तिथे स्कोर सेटल करतो. इथे बस उत्तराची वाट बघत. (हा आयडी धरून एकूण ८ जणांचे स्कोर सेटल करायचे आहेत आता.)
21 Jan 2013 - 1:11 pm | गणामास्तर
परत तेचं. माझा वरील प्रतिसाद पुन्हा वाचा. प्रश्न ही एक वर्च्युअॅलिटी आहे. ती फाट्यावर मारल्याने प्रश्न रिअॅलिटी होणार नाहीये.
स्कोर सेटल करणे ही एक कल्पना आहे. ही कल्पना तुम्ही जीवनातून काढून टाका आणि पाहा
तुमचा किती वेळ्,पैसा व श्रम वाचतात ते. इथे उत्तराची वाट बघत बसण्यात पर्यायाने वेळ घालवण्यात काही हशील नाहीये. जरी वेळ हा भास असला तरी तो वाचवा कारण आपण ही एक स्थिती आहोत.
मी काय म्हणतोय त्याकडे लक्षपुर्वक पाहा. इथे प्रतिसाद लवकर नाही दिला तरी चालेल,घाई करु नका.
नीट समजून घ्या. समजून घेताना जर तुम्हाला वाटले की "वा! क्या बात है" म्हणजे मग जमले.
- गणामास्तर
भोकरवाडी बुद्रुक.
19 Jan 2013 - 10:17 am | स्पा
काय पण दिवस आलेत तेजायला
असो
हे हि दिवस जातील =))
19 Jan 2013 - 11:31 am | धन्या
खत्राड लिहिलंय मोदकराव.
सखुची त्यावेळी दोन दोन नामवंतांची रसग्रहणं आली. परंतू असं विडंबनही होईल असं वाटलं नव्हतं. :)
19 Jan 2013 - 2:51 pm | शैलेन्द्र
च्यायला, आमचं विडंबन गंडलय.. संपाडक मंडळ ते निट करुन देइल का?
19 Jan 2013 - 12:40 pm | कवितानागेश
काय बै वैयक्तिक धागे काढता तुम्ही लोकं!!
अवांतरः माझा गोंधळ होतोय. थेट अशीच वृत्ती असलेले किमान ५ आयडी आज इथे आहेतच.
अतिअवांतरः मोदका, काईतरी भन्नाट, रहस्यमय, अंगावर काटा येइल असं लिही रे. कुठे त्या सखूच्या मागे लागतोस विडम्बने पाडत! :)
19 Jan 2013 - 12:56 pm | सूड
जी बोलते तीच असते...;)
19 Jan 2013 - 1:10 pm | कवितानागेश
बालिश कुठला!!
:D
19 Jan 2013 - 1:13 pm | निवांत पोपट
विडंबन असेल अथवा काहीही,हे जे काही आहे ते आवडले.फक्त प्रश्न असा पडला की हे "पूर्वधारणा" न बाळगता कसे वाचायचे? बघू कोणाकोणाला जमतेय ते !;)
19 Jan 2013 - 2:18 pm | पिंगू
मोदका, मोठी छत्री विणली आहेस... :D
- पिंगू
19 Jan 2013 - 4:42 pm | ५० फक्त
मोदक रॉक्स
बदलतो सॉक्स
& then rocks
म्हणुन मोदक रॉक्स
19 Jan 2013 - 5:02 pm | प्रचेतस
अखिल शिंव्हगड रोड धायरी जिलबीपाडू संघाचा इजय असो.
19 Jan 2013 - 6:10 pm | स्पंदना
मी कुचुन आखुड शींग अस वाचलं.
21 Jan 2013 - 1:59 pm | बॅटमॅन
कुचल्यामुळेच आखूड शिंग जाहले असावे ;)
20 Jan 2013 - 1:32 pm | धन्या
यातून वारजे तसेच डीयेस्के वगळून आमच्यात फुट पाडण्याच्या केविलवाण्या प्रकाराचा झ्याईर निशेद !!!
20 Jan 2013 - 2:12 pm | प्रचेतस
डीयेस्के धायरीतच समाविष्ट असल्याने वगळले गेल्याचा तुमचा आरोप चुकीचा आहे. बाकी अखिल शिंव्हगड रोड धायरी व्हाया वारजे माळवाडी असे न लिहिल्याबद्दल मी मनापासून दिलगीर असून त्याचे प्रायश्चित्त म्हणून तुमच्या अशिंरोधाव्हावामाजिपा संघाच्या पुढच्या जिलबीचा मनापासून आस्वाद घेतला जाईल याची मी ग्वाही देतो.
20 Jan 2013 - 2:18 pm | पैसा
ही धमकी आहे का?
20 Jan 2013 - 2:22 pm | प्रचेतस
छे छे.
जाहीर दिलगीरी आहे. :)
20 Jan 2013 - 3:30 pm | धन्या
अब रुलायेगा क्या?
बाकी तुम्ही मोदकरावांच्या या जिलेबीबद्दल थेट मत व्यक्त केले नाहीत असे एक निरिक्षण जाता जाता नोंदवतो.
20 Jan 2013 - 3:36 pm | प्रचेतस
=))
20 Jan 2013 - 4:19 pm | मोदक
शब्दरूप प्रतिक्रिया दिलीत तर 'मला' जास्ती आनंद होईल, पक्षी* 'माझा' इगो सुखावेल. :-D
*इथे पक्षी म्हणजे बर्ड असा अर्थ घेवू नये.
20 Jan 2013 - 4:33 pm | धन्या
पुर्ण लेखाचा अर्थ कसा घ्यायचा हे समजवावं लागलं हे एक वेळ समजून घेण्यासारखं आहे परंतू एका शब्दाचा अर्थ "असा घेऊ नये" हे समजावण्याची वेळ यावी याचा अर्थ काय घ्यायचा?
20 Jan 2013 - 4:49 pm | मोदक
याचा अर्थ इतकाच की मिपावर इतर ठिकाणी समज गैरसमजाची धूळ उडत असेल तर ती धूळ इकडे येवून माझ्या धाग्याचे काश्मीर होवू नये या काळजीने आधीच माझा 'एकमेव स्टँड' किल्लर करतोय.
मिपावर इतर ठिकाणी समज गैरसमजाची धूळ उडत असेल असे आपले मत असेल तर आपण हुषार आहात - तुम्ही जिंकलात. :-D
मिपावर इतर ठिकाणी समज गैरसमजाची धूळ उडत नाही असे आपले मत असेल तर, "तुम्ही अभ्यास वाढवण्याची नितांत गरज आहे!" असे मत कुणी व्यक्त केले तर तुम्ही "तुमच्या सखूच्या विडंबनाचे विडंबन" करून स्वसमाधान करून घेवू नका. :-))
देव सर्वांना सद्बुद्धी देवो. :-D
20 Jan 2013 - 5:03 pm | धन्या
देव सर्वांना सद्बुद्धी देवो.
हे देव आहे असं मानणार्यांच्या बाबतीत ठीक आहे. जे देव नाही असं मानतात, त्यांच्या दृष्टीने जो अस्तित्वातच नाही तो त्यांना सद्बुद्धी कसा काय देणार? ;)
20 Jan 2013 - 5:23 pm | मोदक
जे देव नाही असं मानतात, त्यांच्या दृष्टीने जो अस्तित्वातच नाही तो त्यांना सद्बुद्धी कसा काय देणार?
कै च्या कै काय बोलताय वाकडे साहेब.
अहो असे लोकच दिसेल तिथे सद्बुध्दी वाटतात. देवाचे काम तेच करतात. "अहं ब्रह्मास्मि" चा त्यांच्या लेखी अर्थ "मीच ब्रह्म आहे, मीच सर्वस्व आहे, मी जे काही करतो ते बरोबर करतो, माझे मत निर्विवादपणे सत्य आहे, माझ्या मताविरूद्धचे मत निखालस चुक आहे.. "
कंटाळा आला टंकायचा.. वरचे विडंबन इथे टंकले आहे असे समजा :-D
(माझ्या धाग्याचे काश्मीर होईल का अशा प्रश्नात बुडालेला) मोदक
20 Jan 2013 - 6:57 pm | पैसा
तुला भास होतायत मोदका. सगळं जगच भास आहे. तुझा धागा भास आहे. काश्मिर हा एक भास आहे आणि तुला मनातून धाग्याचे काश्मिर व्हायला हवेच आहे, फक्त तू चालू असल्याने तसे कबूल करत नाहीयेस!
20 Jan 2013 - 7:16 pm | मोदक
जोरदार असहमत.
मी चालू आहे हा तुम्हाला झालेला भास असून "मीं" ("तें" च्या चालीवर वाचावे), "माझा" चलनी पैसा हेच अंतीम व एकमेव वैश्विक सत्य आहे. :-D
वरच्या प्रतिसादातले काही कळाले नसेल तर कृपया विचारू नये. प्रतिसाद प्रकाशित केल्यानंतर विचार करून, अर्थ लावून उत्तर देण्यात लै लै वेळ जातो. "मीं" सांगत असल्याने ते बाय डीफॉल्ट बरोब्बरच आहे.
20 Jan 2013 - 7:24 pm | पैसा
पैशाचा एक फिक्स्ड मालक नसतो. चोराने तुझ्या खिशातले पैसे चोरले तर तो मालक ठरेल. तेव्हा "मी मालक" हा हट्ट सोडून दे. कारण मी म्हणते की "तू मालक". आता बरोबर कोण? यातलं काही कळलं तर गप्प बस. नाही कळलं तर स्पारायण गाळप यांना किंवा लिलाध्राला विचारायला हरकत नाही. तेच का हा प्रश्ण विचारू नये कारण सर्व कंपू एकच आहेत हे सत्य आहे आणि विडंबने मिथ्या.
20 Jan 2013 - 7:28 pm | अभ्या..
धन्यवाद पैसातै. :)
20 Jan 2013 - 7:40 pm | मोदक
अश्लील प्रतिसाद.
तरीही अश्लील प्रतिसादामध्ये लीलाध्राचे नाव आल्याने हा प्रतिसाद निष्पाप आणि निरागस आहे असे "मीं" जाहीर करतो आहे.
बादवे - स्पारायण गाळप. :-))
20 Jan 2013 - 7:45 pm | पैसा
आता आमची मौनाची वेळ झाली आहे. तेव्हा तात्पुरती निवृत्ती घेत आहे. नंतर तुझा आयडी अस्तित्त्वात असलाच तर भेटू परत इथेच. :D
20 Jan 2013 - 7:56 pm | मोदक
ही धमकी आहे का?
o नाहि सहमत o
20 Jan 2013 - 8:02 pm | कवितानागेश
नसावी! :)
20 Jan 2013 - 8:06 pm | मोदक
"मीं" म्हणतो ही धमकी आहे.
20 Jan 2013 - 8:14 pm | कवितानागेश
तुम्ही स्वतः कधी धमकी प्रत्यक्ष पाहिली आहे का?
20 Jan 2013 - 8:16 pm | रेवती
मी चालू आहे हा तुम्हाला झालेला भास असून
भास कुठले? खात्रीच आहे आम्हाला.
20 Jan 2013 - 8:19 pm | कवितानागेश
तुम्ही 'चालू' प्रत्यक्ष पाहिला आहे का? :D
20 Jan 2013 - 8:21 pm | रेवती
चालूगिरी ही न पाहिल्यानेच जास्त समजते असा आमचा अध्यात्मिक समज आहे. अध्यात्म हे अनुभवायचं असतं. ;)
20 Jan 2013 - 8:33 pm | मोदक
झाली.. आता माझ्या धाग्याची गाझापट्टी झाली. :-))
अध्यात्म हे अनुभवायचं असतं
परमपूजनीय रेवतीमाँ..
वरचे विधान नक्की कोणत्या थिअरीनुसार..?
जगात अध्यात्माच्या किती थिअरीज आहेत..?
तुम्हाला अध्यात्माच्या किती थिअरीज माहिती आहेत..?
अवघड प्रश्न म्हणून पळून जायचे नाही हां.. माहिती नसेल तर तसे सांगा.
(साध्यासोप्या प्रश्नांना "अधिकारी व्यक्तीकडून" फाट्यावर मारले गेल्याने व्यथीत झालेला) मोदक.
20 Jan 2013 - 8:36 pm | कवितानागेश
तुम्ही रेवती प्रत्यक्ष पाहिली आहे का?
तुम्ही अधिकारी प्रत्यक्ष पाहिला आहे का?
20 Jan 2013 - 8:46 pm | मोदक
रेवती हा डुप्लीकेट आयडी आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
असला तरी तो एक "मूर्त भास" म्ह्णता येईल, कारण तो आयडी रेवती या नावाने व्यक्त होतो. भले मेंदू दुसर्याचा व विचारही दुसर्याचे असतील.
आणखी एक.
तुम्ही तुमच्या स्वाक्षरीमध्ये दिनसमयकालगणना विचारात घेतली गेलेली नाहीये. तुमचा "आजचा सुविचार" कालपण असाच होता, परवा पण असाच होता. तो एकदा सांगितला गेला की त्या दिवसावर रजिस्टर झाला. तो पुन्हा "आजचा" होवू शकत नाही.
तस्मात "मीं" म्हणतो, तुमची स्वाक्षरी "दिनसमयकालगणना भ्रम" दर्शविते.
20 Jan 2013 - 8:59 pm | मोदक
आणखी एक महत्त्वाचे...
एखाद्या आयडी चा मेंदू कुणी बघितला आहे का..? नसल्यास त्याला भास भ्रम का म्हणू नये..? असे प्रश्न विचारले गेले तर उत्तर द्यायची जबाबदारी मी घेणार नाही.
:-D
20 Jan 2013 - 9:07 pm | पैसा
कालचा उद्या हा आज आहे. उद्याचा काल हा आज आहे. तेव्हा यात कालविपर्यास कुठे आला? काल एकच आहे. आणि एकदिशामार्गाप्रमाणे एकाच दिशेने जात आहे. तेव्हा मा. माऊतैंची स्वाक्षरी रोज तेवढीच सत्य आहे.
मेंदूबद्दल नो कमेंट्स. कारण जी गोश्ट अस्तित्त्वात आहे याबद्दल खात्री नाही त्याबद्दल मी बोलू इच्छित नाही.
20 Jan 2013 - 9:15 pm | मोदक
तुमचा मुद्दा बरोबर आहे
पण "मीं" म्हणतोय, त्यांची स्वाक्षरी "दिनसमयकालगणना भ्रम" दर्शविते.
संपला विषय.
20 Jan 2013 - 9:18 pm | पैसा
तुमच्याकडचे मुद्दे संपले वाट्टं?
20 Jan 2013 - 9:21 pm | मोदक
फक्त स्वाक्षरीचा विषय संपला.
बाकी लै मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यांमध्ये "माझेच मत" बरोबर असणार आहे.
20 Jan 2013 - 9:47 pm | मोदक
प्रतिसाद खाली शिफ्ट केला आहे.
22 Jan 2013 - 8:49 am | ५० फक्त
ब-याच दिवसांनी मॉनिटरचा उजवा खालचा कोपरा गरम झाला, धन्यवाद सर्वांना.
अवांतर - उजवा म्हणजे मी समोर बसुन येते ती बाजु, आता तो मॉनिटरच्या बाजुने डावा होतो असा भासयुक्त तर्क मांडायला येउ नये.
20 Jan 2013 - 7:10 pm | मूकवाचक
एकंदर परिस्थिती पाहता तूर्त देवाकडे एवढेच मागतो -
दो और दो का जोड हमेशा चार कहाँ होता है, सोच समझ वालों को थोडी नादानी दे मौला!
(मोदकरावांचा उकडीचा मोदक मस्तच जमलाय!)
21 Jan 2013 - 4:58 pm | निश
वल्ली साहेबांशी सहमत.
पक्का डीयेस्के विश्व वाला
निश
19 Jan 2013 - 6:12 pm | स्पंदना
श्या! विडंबन पाडायला आधी मुळ कविता सळ्ळी वाचावी लागते दोमका?
19 Jan 2013 - 6:16 pm | रेवती
लिमाऊजेटजींशी सहमत. किमान पाच आयडी डोळ्यासमोर आले......त्यातला एक माझा आणि तुझाही होता.....बाकीचे तीन कोण याबद्दल व्य. नि.तून चर्चा क्रावी.
19 Jan 2013 - 7:54 pm | पैसा
आणखी दोन आठवले. एक मी आणि दुसरी लिमाउजेट. आता आणखी एकच उरला.
20 Jan 2013 - 12:08 am | कवितानागेश
तो उरलेला आपल्यासारखेच खरे बोलेल का? :D
20 Jan 2013 - 11:11 am | अमोल खरे
वरील वाक्य हे वाचुन न वाचल्यासारखे केले आहे. त्यामुळे कॉमेंट द्यायचा प्रश्नच येत नै.
20 Jan 2013 - 4:28 pm | मोदक
ओ खरे काका..
त्यांना खरे म्हणजे "ट्रू" म्हणायचे आहे.
आपले नाव नसताना धागे उद्देशून असल्याचा 'गैरसमज' करून वादावादी करण्याचे, धमकी देण्याचे प्रकार ऐकले आहेत. तुम्ही तर प्रतिक्रिया पण सोडत नाहीये राव*.
*हे राव अर्धवटरावांना किंवा कोणत्याही रावांना उद्देशून नाहीये. ;-)
मुद्दाम गैरसमज करवून घेवून कोणतेही राव भांडायला आले तर आम्हाला एखाद्या कंपूच्या किंवा मुद्दा असताना / नसताना, अर्थहीन / असंबद्ध शब्दांचे गिगाबायटी प्रतिसाद 'पाडणार्या' आणि १० जणांना एका वेळी तोंड देवू शकणार्या ' (डिफीटेड) वन मॅन आर्मी' ची मदत घ्यावी लागेल. :-D
20 Jan 2013 - 6:22 pm | अत्रुप्त आत्मा
@मुद्दाम गैरसमज करवून घेवून कोणतेही राव भांडायला आले तर आम्हाला एखाद्या कंपूच्या किंवा मुद्दा असताना / नसताना, अर्थहीन / असंबद्ध शब्दांचे गिगाबायटी प्रतिसाद 'पाडणार्या' आणि १० जणांना एका वेळी तोंड देवू शकणार्या ' (डिफीटेड) वन मॅन आर्मी' ची मदत घ्यावी लागेल. >>> =)) म्हणजे कोण हो..........???
21 Jan 2013 - 8:18 am | ५० फक्त
फार फार जुना आंतरजालीय पराभव आठवुन मग हेलावलं किंचित.
21 Jan 2013 - 10:30 am | मोदक
काही शंका
तुम्ही अंतर्जाल बघितले आहे का? "इंटरनेट रोज वापरतो" हे उत्तर देवू नये. तुम्ही बघता त्या वेबसाईट्स जो अंतर्जालाचा इंटरफेस असतो. तुम्ही या इंटरफेसचा मूलाधार असलेले "अंतर्जाल" बघितले आहे का?
तुम्ही "मन" पाहिले आहे का? नसल्यास, ती तुमची कल्पना / भास / भ्रम का समजू नये?
अवांतर - तुमची स्वाक्षरी अप्पलपोटेपणा आणि लघुदृष्टी दर्शवते. :-D
"मीं" म्हणतो, तुमचा आयडी १०० फक्त असा परिपूर्ण हवा होता. ५० फक्त असे लिहून तुम्ही काहीतरी अर्धेमुर्धे व्यक्त करत आहात.
Not failure but Low aim is crime ही म्हण रोज १०० वेळा ५० ठिकाणी म्हणावी मग तुमच्या डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडून तुमचा आयडी बदलण्यास नैतीक पाठबळ मिळेल.
22 Jan 2013 - 8:55 am | ५० फक्त
तुम्ही अंतर्जाल बघितले आहे का? "इंटरनेट रोज वापरतो" हे उत्तर देवू नये. तुम्ही बघता त्या वेबसाईट्स जो अंतर्जालाचा इंटरफेस असतो. तुम्ही या इंटरफेसचा मूलाधार असलेले "अंतर्जाल" बघितले आहे का? - नाही, अजिबात नाही.
तुम्ही "मन" पाहिले आहे का? नसल्यास, ती तुमची कल्पना / भास / भ्रम का समजू नये? - नाही मन पाहिले नाही, पण मन नावाचा एक भयाण चित्रपट पाहिला आहे, तो भ्रम नव्हता तर भ्रमनिरास होता हे नक्की.
अवांतर - तुमची स्वाक्षरी अप्पलपोटेपणा आणि लघुदृष्टी दर्शवते. - आमच्या पोटाबद्दल शंका घेण्यासारखे काही नाही, जेवढे आहे तेवढे ते दिसतेच पण ते अॅप्पल मुळे नाही. आणि होय हल्ली जवळचे वाचायला त्रास होतो आहे खरा, तुमच्या माहितीत एखादी नेत्रवैद्य आहे काय ?
"मीं" म्हणतो, तुमचा आयडी १०० फक्त असा परिपूर्ण हवा होता. ५० फक्त असे लिहून तुम्ही काहीतरी अर्धेमुर्धे व्यक्त करत आहात. - १०० म्हणजे परिपुर्ण हा तुमचा भास आहे.
Not failure but Low aim is crime ही म्हण रोज १०० वेळा ५० ठिकाणी म्हणावी मग तुमच्या डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडून तुमचा आयडी बदलण्यास नैतीक पाठबळ मिळेल. - काल प्रयत्न केला पण लक्ख प्रकाश पडण्याऐवजी घरातली वीज बंद पडली.
19 Jan 2013 - 6:43 pm | यशोधरा
विडंबन वाचून काही आयडींची आठवण नको नको म्हणताना आलीच!
ह्याबद्दल तुम्हांला जबाब्दार का धरु नये, सांगता का? :P
19 Jan 2013 - 7:55 pm | पैसा
हा योगायोग नाही हे त्यांनी आधीच सपश्ट केलंय ना!
22 Jan 2013 - 9:04 am | यशोधरा
ज्योताय, हा तुला होणारा भास असला तर? किंवा तुला भास होतोय असा मला भास होत असेल तर? किंवा हे भास नसून सत्य असले तर? किंवा एखादे सत्य हे सत्यच आहे हाच एक भास असला तर? वगैरे वगैरे :D
22 Jan 2013 - 9:17 am | पैसा
याची बरीच परम्युटेशन्स-कॉम्बिनेशन्स होतील! सगळ्यांबद्दल विचार करून परत येते.
22 Jan 2013 - 9:20 am | यशोधरा
परम्युटेशन्स-कॉम्बिनेशन्स होतील!- हा एक भासच!
सगळ्यांबद्दल विचार करून - च्च! भास! भास!
(पळा! ज्योताय लाकूड घेऊन येते आता मारायला!) :D
22 Jan 2013 - 9:24 am | पैसा
विचार प्रत्यक्ष दिसत नाही. म्हणजे भास आहे हे खरे असू शकेल. लाकूड मात्र दिसते म्हणजे तो भास नाही.
22 Jan 2013 - 9:30 am | यशोधरा
:D
22 Jan 2013 - 10:13 am | अर्धवट
नुसतं दिसतं नव्हे तर लागतंही..
19 Jan 2013 - 7:04 pm | बॅटमॅन
जिलेबी म्हणत म्हणत मोदक पाडला आहेस की रे एकदम!!!!
19 Jan 2013 - 10:00 pm | इरसाल
असे वाचले.
कुठे पडला सांगावे उचलुन आणण्यात येईल
20 Jan 2013 - 12:52 pm | प्रभाकर पेठकर
हा 'अंधारात मारलेला तीर' नक्कीच वाटत नाहीये. आणि तो निशाणावर लागला असणारच.
20 Jan 2013 - 4:51 pm | मोदक
धन्यवाद पेठकर काका.
20 Jan 2013 - 7:00 pm | अमोल खरे
अहो काका, मोदक नेहेमीच व्यवस्थित प्लॅनिंग करुन तीर मारतो. मोदकाला किंवा विमेला नीट निशाणा लागला म्हणणं म्हणजे सचिनला तु काय मस्त फोर, सिक्स मारतोस रे असं म्हणण्यासारखं आहे. सचिनसारखेच ह्या दोघांचे तीर अचुक लागतातच.
20 Jan 2013 - 7:35 pm | मोदक
कोण सचिन..? कोण विमे..?
तुम्हाला भास होताहेत खरे साहेब. सगळं प्लॅनींग ह एक भास आहे. तीर मारणे हा भास आहे. हे सर्व जगच भास आहे. तुमचे विचार भास आहेत. सचिन आणि विमे ही लोकं पण भास आहेत.
हे असले प्रतिसाद खरडणारी पैसाताई आणि ते ढापणारा मी पण एक भासच आहे. :-D