✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?

म — मोदक, Sat, 01/19/2013 - 09:45
******************************************************* धनाजीरावांनी कुठूनतरी "धनाजीराव आणि पार्टी" चा उल्लेख करून सखूची आठवण काढली. सखूचा धागा वर आला नाही पण त्या गीताच्या (?) तालावर आम्हाला बरेच काही सुचत गेले.. सखूचे विडंबन समजणार असलात तर जरूर समजावे, मात्र कुणा व्यक्ती / पात्राशी सांधर्म्य आढळयास योगायोग समजण्याची चूक करू नये. ******************************************************* शब्द खरडतो 'मी' घाई घाई, अर्थाची आठवण राहीलीच नाही बुध्दी, ज्ञान, मती सर्व 'माझ्याच' ठायी, आजही तू सहमत होशील ना? 'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..? संस्थळांवर उडवलाय धुरळा, 'मीच' काढलाय 'माझाच' गळा 'मी' सांगतो तीच पूर्व दिशा, 'मी' सांगतो तोच अर्थ खरा 'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..? जगातले सर्व ज्ञान आहे 'मला', तुझे बरोबर मुद्दे पण पटेनात 'मला' 'मी', 'माझे' मत, 'माझे' प्रतिसाद, 'माझे' विचार, 'माझे' ज्ञान.. पण आज्जिबात अहंकार नाही 'मला' 'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..? सांगत असतात बरेच जण 'मला', सांभाळून वाग बोल रे मित्रा 'मी' म्हणतो 'माझ्या' ज्ञानाचा ते तिरस्कार करतात, सतत 'मलाच' टारगेट करतात 'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..? तू कसे काय म्हणतेस 'मी' चुकलो, छे छे नाहीच्च 'मी' चुकलो. बरोबर असले मुद्दे तुझे तरी, अंतीम सत्य नेहमी 'मीच' बोलतो 'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..? "आजपण ऐकशील ना..?" मध्ये दिसते विनंती, आज्ञा सोडायची सवय 'माझ्या' ठायी . 'मी' आता त्या विनंतीला आज्ञेमध्ये बदलतो, आजच्या दिवसातला एक विजय (?) प्राप्त करतो. 'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तुला ऐकावाच्च्च्च्च्च्च्च्च्च्च लागेल. कदाचित तू असशील बरोबर, मुद्देही असतील लॉजीकल, पण ते 'मी' मान्य कसे करेन?? तुला माझ्यासारखे वागायचेय? मग सभ्यता, मर्यादा, संकेत सर्व विसरावे लागेल. 'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तुला ऐकावाच्च्च्च्च्च्च्च्च्च्च लागेल.

प्रतिक्रिया द्या
50843 वाचन

💬 प्रतिसाद (165)

तुम्ही स्वतः कधी धमकी

कवितानागेश
Sun, 01/20/2013 - 20:14 नवीन
तुम्ही स्वतः कधी धमकी प्रत्यक्ष पाहिली आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

मी चालू आहे हा तुम्हाला

रेवती
Sun, 01/20/2013 - 20:16 नवीन
मी चालू आहे हा तुम्हाला झालेला भास असून भास कुठले? खात्रीच आहे आम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

तुम्ही 'चालू' प्रत्यक्ष

कवितानागेश
Sun, 01/20/2013 - 20:19 नवीन
तुम्ही 'चालू' प्रत्यक्ष पाहिला आहे का? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

चालूगिरी ही न पाहिल्यानेच

रेवती
Sun, 01/20/2013 - 20:21 नवीन
चालूगिरी ही न पाहिल्यानेच जास्त समजते असा आमचा अध्यात्मिक समज आहे. अध्यात्म हे अनुभवायचं असतं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

झाली.. आता माझ्या धाग्याची गाझापट्टी झाली. :-))

मोदक
Sun, 01/20/2013 - 20:33 नवीन
झाली.. आता माझ्या धाग्याची गाझापट्टी झाली. :-)) अध्यात्म हे अनुभवायचं असतं परमपूजनीय रेवतीमाँ.. वरचे विधान नक्की कोणत्या थिअरीनुसार..? जगात अध्यात्माच्या किती थिअरीज आहेत..? तुम्हाला अध्यात्माच्या किती थिअरीज माहिती आहेत..? अवघड प्रश्न म्हणून पळून जायचे नाही हां.. माहिती नसेल तर तसे सांगा. (साध्यासोप्या प्रश्नांना "अधिकारी व्यक्तीकडून" फाट्यावर मारले गेल्याने व्यथीत झालेला) मोदक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

तुम्ही रेवती प्रत्यक्ष पाहिली

कवितानागेश
Sun, 01/20/2013 - 20:36 नवीन
तुम्ही रेवती प्रत्यक्ष पाहिली आहे का? तुम्ही अधिकारी प्रत्यक्ष पाहिला आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

रेवती हा डुप्लीकेट आयडी आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

मोदक
Sun, 01/20/2013 - 20:46 नवीन
रेवती हा डुप्लीकेट आयडी आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का? असला तरी तो एक "मूर्त भास" म्ह्णता येईल, कारण तो आयडी रेवती या नावाने व्यक्त होतो. भले मेंदू दुसर्‍याचा व विचारही दुसर्‍याचे असतील. आणखी एक. तुम्ही तुमच्या स्वाक्षरीमध्ये दिनसमयकालगणना विचारात घेतली गेलेली नाहीये. तुमचा "आजचा सुविचार" कालपण असाच होता, परवा पण असाच होता. तो एकदा सांगितला गेला की त्या दिवसावर रजिस्टर झाला. तो पुन्हा "आजचा" होवू शकत नाही. तस्मात "मीं" म्हणतो, तुमची स्वाक्षरी "दिनसमयकालगणना भ्रम" दर्शविते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

आणखी एक महत्त्वाचे...

मोदक
Sun, 01/20/2013 - 20:59 नवीन
आणखी एक महत्त्वाचे... एखाद्या आयडी चा मेंदू कुणी बघितला आहे का..? नसल्यास त्याला भास भ्रम का म्हणू नये..? असे प्रश्न विचारले गेले तर उत्तर द्यायची जबाबदारी मी घेणार नाही. :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

मौन सोडते

पैसा
Sun, 01/20/2013 - 21:07 नवीन
कालचा उद्या हा आज आहे. उद्याचा काल हा आज आहे. तेव्हा यात कालविपर्यास कुठे आला? काल एकच आहे. आणि एकदिशामार्गाप्रमाणे एकाच दिशेने जात आहे. तेव्हा मा. माऊतैंची स्वाक्षरी रोज तेवढीच सत्य आहे. मेंदूबद्दल नो कमेंट्स. कारण जी गोश्ट अस्तित्त्वात आहे याबद्दल खात्री नाही त्याबद्दल मी बोलू इच्छित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

तुमचा मुद्दा बरोबर आहे

मोदक
Sun, 01/20/2013 - 21:15 नवीन
तुमचा मुद्दा बरोबर आहे पण "मीं" म्हणतोय, त्यांची स्वाक्षरी "दिनसमयकालगणना भ्रम" दर्शविते. संपला विषय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

विषय संपला?

पैसा
Sun, 01/20/2013 - 21:18 नवीन
तुमच्याकडचे मुद्दे संपले वाट्टं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

फक्त स्वाक्षरीचा विषय संपला

मोदक
Sun, 01/20/2013 - 21:21 नवीन
फक्त स्वाक्षरीचा विषय संपला. बाकी लै मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यांमध्ये "माझेच मत" बरोबर असणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

प्रतिसाद खाली शिफ्ट केला आहे.

मोदक
Sun, 01/20/2013 - 21:47 नवीन
प्रतिसाद खाली शिफ्ट केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

ब-याच दिवसांनी मॉनिटरचा उजवा

५० फक्त
Tue, 01/22/2013 - 08:49 नवीन
ब-याच दिवसांनी मॉनिटरचा उजवा खालचा कोपरा गरम झाला, धन्यवाद सर्वांना. अवांतर - उजवा म्हणजे मी समोर बसुन येते ती बाजु, आता तो मॉनिटरच्या बाजुने डावा होतो असा भासयुक्त तर्क मांडायला येउ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

+१

मूकवाचक
Sun, 01/20/2013 - 19:10 नवीन
एकंदर परिस्थिती पाहता तूर्त देवाकडे एवढेच मागतो - दो और दो का जोड हमेशा चार कहाँ होता है, सोच समझ वालों को थोडी नादानी दे मौला! (मोदकरावांचा उकडीचा मोदक मस्तच जमलाय!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

वल्ली साहेबांशी सहमत.

निश
Mon, 01/21/2013 - 16:58 नवीन
वल्ली साहेबांशी सहमत. पक्का डीयेस्के विश्व वाला निश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

श्या! विडंबन पाडायला आधी मुळ

स्पंदना
Sat, 01/19/2013 - 18:12 नवीन
श्या! विडंबन पाडायला आधी मुळ कविता सळ्ळी वाचावी लागते दोमका?
  • Log in or register to post comments

लिमाऊजेटजींशी सहमत. किमान पाच

रेवती
Sat, 01/19/2013 - 18:16 नवीन
लिमाऊजेटजींशी सहमत. किमान पाच आयडी डोळ्यासमोर आले......त्यातला एक माझा आणि तुझाही होता.....बाकीचे तीन कोण याबद्दल व्य. नि.तून चर्चा क्रावी.
  • Log in or register to post comments

मला पण

पैसा
Sat, 01/19/2013 - 19:54 नवीन
आणखी दोन आठवले. एक मी आणि दुसरी लिमाउजेट. आता आणखी एकच उरला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

तो उरलेला आपल्यासारखेच खरे

कवितानागेश
Sun, 01/20/2013 - 00:08 नवीन
तो उरलेला आपल्यासारखेच खरे बोलेल का? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हॅहॅहॅहॅ

अमोल खरे
Sun, 01/20/2013 - 11:11 नवीन
वरील वाक्य हे वाचुन न वाचल्यासारखे केले आहे. त्यामुळे कॉमेंट द्यायचा प्रश्नच येत नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

ओ खरे काका...

मोदक
Sun, 01/20/2013 - 16:28 नवीन
ओ खरे काका.. त्यांना खरे म्हणजे "ट्रू" म्हणायचे आहे. आपले नाव नसताना धागे उद्देशून असल्याचा 'गैरसमज' करून वादावादी करण्याचे, धमकी देण्याचे प्रकार ऐकले आहेत. तुम्ही तर प्रतिक्रिया पण सोडत नाहीये राव*. *हे राव अर्धवटरावांना किंवा कोणत्याही रावांना उद्देशून नाहीये. ;-) मुद्दाम गैरसमज करवून घेवून कोणतेही राव भांडायला आले तर आम्हाला एखाद्या कंपूच्या किंवा मुद्दा असताना / नसताना, अर्थहीन / असंबद्ध शब्दांचे गिगाबायटी प्रतिसाद 'पाडणार्‍या' आणि १० जणांना एका वेळी तोंड देवू शकणार्‍या ' (डिफीटेड) वन मॅन आर्मी' ची मदत घ्यावी लागेल. :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

@मुद्दाम गैरसमज करवून घेवून

अत्रुप्त आत्मा
Sun, 01/20/2013 - 18:22 नवीन
@मुद्दाम गैरसमज करवून घेवून कोणतेही राव भांडायला आले तर आम्हाला एखाद्या कंपूच्या किंवा मुद्दा असताना / नसताना, अर्थहीन / असंबद्ध शब्दांचे गिगाबायटी प्रतिसाद 'पाडणार्‍या' आणि १० जणांना एका वेळी तोंड देवू शकणार्‍या ' (डिफीटेड) वन मॅन आर्मी' ची मदत घ्यावी लागेल. >>> =)) म्हणजे कोण हो..........??? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

फार फार जुना आंतरजालीय पराभव

५० फक्त
Mon, 01/21/2013 - 08:18 नवीन
फार फार जुना आंतरजालीय पराभव आठवुन मग हेलावलं किंचित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

काही शंका

मोदक
Mon, 01/21/2013 - 10:30 नवीन
काही शंका तुम्ही अंतर्जाल बघितले आहे का? "इंटरनेट रोज वापरतो" हे उत्तर देवू नये. तुम्ही बघता त्या वेबसाईट्स जो अंतर्जालाचा इंटरफेस असतो. तुम्ही या इंटरफेसचा मूलाधार असलेले "अंतर्जाल" बघितले आहे का? तुम्ही "मन" पाहिले आहे का? नसल्यास, ती तुमची कल्पना / भास / भ्रम का समजू नये? अवांतर - तुमची स्वाक्षरी अप्पलपोटेपणा आणि लघुदृष्टी दर्शवते. :-D "मीं" म्हणतो, तुमचा आयडी १०० फक्त असा परिपूर्ण हवा होता. ५० फक्त असे लिहून तुम्ही काहीतरी अर्धेमुर्धे व्यक्त करत आहात. Not failure but Low aim is crime ही म्हण रोज १०० वेळा ५० ठिकाणी म्हणावी मग तुमच्या डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडून तुमचा आयडी बदलण्यास नैतीक पाठबळ मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

तुम्ही अंतर्जाल बघितले आहे का

५० फक्त
Tue, 01/22/2013 - 08:55 नवीन
तुम्ही अंतर्जाल बघितले आहे का? "इंटरनेट रोज वापरतो" हे उत्तर देवू नये. तुम्ही बघता त्या वेबसाईट्स जो अंतर्जालाचा इंटरफेस असतो. तुम्ही या इंटरफेसचा मूलाधार असलेले "अंतर्जाल" बघितले आहे का? - नाही, अजिबात नाही. तुम्ही "मन" पाहिले आहे का? नसल्यास, ती तुमची कल्पना / भास / भ्रम का समजू नये? - नाही मन पाहिले नाही, पण मन नावाचा एक भयाण चित्रपट पाहिला आहे, तो भ्रम नव्हता तर भ्रमनिरास होता हे नक्की. अवांतर - तुमची स्वाक्षरी अप्पलपोटेपणा आणि लघुदृष्टी दर्शवते. - आमच्या पोटाबद्दल शंका घेण्यासारखे काही नाही, जेवढे आहे तेवढे ते दिसतेच पण ते अ‍ॅप्पल मुळे नाही. आणि होय हल्ली जवळचे वाचायला त्रास होतो आहे खरा, तुमच्या माहितीत एखादी नेत्रवैद्य आहे काय ? "मीं" म्हणतो, तुमचा आयडी १०० फक्त असा परिपूर्ण हवा होता. ५० फक्त असे लिहून तुम्ही काहीतरी अर्धेमुर्धे व्यक्त करत आहात. - १०० म्हणजे परिपुर्ण हा तुमचा भास आहे. Not failure but Low aim is crime ही म्हण रोज १०० वेळा ५० ठिकाणी म्हणावी मग तुमच्या डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडून तुमचा आयडी बदलण्यास नैतीक पाठबळ मिळेल. - काल प्रयत्न केला पण लक्ख प्रकाश पडण्याऐवजी घरातली वीज बंद पडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

विडंबन वाचून काही आयडींची

यशोधरा
Sat, 01/19/2013 - 18:43 नवीन
विडंबन वाचून काही आयडींची आठवण नको नको म्हणताना आलीच! ह्याबद्दल तुम्हांला जबाब्दार का धरु नये, सांगता का? :P
  • Log in or register to post comments

हेहेहे!

पैसा
Sat, 01/19/2013 - 19:55 नवीन
हा योगायोग नाही हे त्यांनी आधीच सपश्ट केलंय ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

ज्योताय, हा तुला होणारा भास

यशोधरा
Tue, 01/22/2013 - 09:04 नवीन
ज्योताय, हा तुला होणारा भास असला तर? किंवा तुला भास होतोय असा मला भास होत असेल तर? किंवा हे भास नसून सत्य असले तर? किंवा एखादे सत्य हे सत्यच आहे हाच एक भास असला तर? वगैरे वगैरे :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ग्रेट!

पैसा
Tue, 01/22/2013 - 09:17 नवीन
याची बरीच परम्युटेशन्स-कॉम्बिनेशन्स होतील! सगळ्यांबद्दल विचार करून परत येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

परम्युटेशन्स-कॉम्बिनेशन्स

यशोधरा
Tue, 01/22/2013 - 09:20 नवीन
परम्युटेशन्स-कॉम्बिनेशन्स होतील!- हा एक भासच! सगळ्यांबद्दल विचार करून - च्च! भास! भास! (पळा! ज्योताय लाकूड घेऊन येते आता मारायला!) :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

पाइंटाचा मुद्दा

पैसा
Tue, 01/22/2013 - 09:24 नवीन
विचार प्रत्यक्ष दिसत नाही. म्हणजे भास आहे हे खरे असू शकेल. लाकूड मात्र दिसते म्हणजे तो भास नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

(No subject)

यशोधरा
Tue, 01/22/2013 - 09:30 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

नुसतं दिसतं नव्हे तर लागतंही.

अर्धवट
Tue, 01/22/2013 - 10:13 नवीन
नुसतं दिसतं नव्हे तर लागतंही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

जिलेबी म्हणत म्हणत मोदक पाडला

बॅटमॅन
Sat, 01/19/2013 - 19:04 नवीन
जिलेबी म्हणत म्हणत मोदक पाडला आहेस की रे एकदम!!!!
  • Log in or register to post comments

मोदक पडला

इरसाल
Sat, 01/19/2013 - 22:00 नवीन
असे वाचले. कुठे पडला सांगावे उचलुन आणण्यात येईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अह्म् ब्रह्मास्मी..

प्रभाकर पेठकर
Sun, 01/20/2013 - 12:52 नवीन
हा 'अंधारात मारलेला तीर' नक्कीच वाटत नाहीये. आणि तो निशाणावर लागला असणारच.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

मोदक
Sun, 01/20/2013 - 16:51 नवीन
धन्यवाद पेठकर काका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

अहो काका, मोदक नेहेमीच

अमोल खरे
Sun, 01/20/2013 - 19:00 नवीन
अहो काका, मोदक नेहेमीच व्यवस्थित प्लॅनिंग करुन तीर मारतो. मोदकाला किंवा विमेला नीट निशाणा लागला म्हणणं म्हणजे सचिनला तु काय मस्त फोर, सिक्स मारतोस रे असं म्हणण्यासारखं आहे. सचिनसारखेच ह्या दोघांचे तीर अचुक लागतातच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

कोण सचिन..? कोण विमे..?

मोदक
Sun, 01/20/2013 - 19:35 नवीन
कोण सचिन..? कोण विमे..? तुम्हाला भास होताहेत खरे साहेब. सगळं प्लॅनींग ह एक भास आहे. तीर मारणे हा भास आहे. हे सर्व जगच भास आहे. तुमचे विचार भास आहेत. सचिन आणि विमे ही लोकं पण भास आहेत. हे असले प्रतिसाद खरडणारी पैसाताई आणि ते ढापणारा मी पण एक भासच आहे. :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

@सचिन आणि विमे ही लोकं पण भास

अत्रुप्त आत्मा
Sun, 01/20/2013 - 21:50 नवीन
@सचिन आणि विमे ही लोकं पण भास आहेत. हे असले प्रतिसाद खरडणारी पैसाताई आणि ते ढापणारा मी पण एक भासच आहे.>>> =)) चायला हा त्रासच आहे ;-) कि मला होणारा त्रास पण भास(च) आहे :-b
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

एक शंका..

मोदक
Sun, 01/20/2013 - 22:07 नवीन
शंका नंबर एक. तुम्ही आत्मे पाहिलेत का? (आत्मे पाहिले नसल्यास तुम्हाला भास / भ्रम होतात हे आमचे मत तुम्हाला मान्य करावेच्चच्च्च्च्च्च्च्च्च लागेल.) शंका नंबर दोन. जीवन म्हणजे काय? ("पाणी म्हणजे जीवन" वगैरे 'इयत्ता दुसरी तुकडी ब' छापाचे उत्तर देवू नये) अवांतर - या धाग्याच्या सुरूवातीच्या प्रतिसादांमध्येही तुम्हाला एक प्रश्न विचारला आहे - त्याचे उत्तर द्यावे. अतिअवांतर - तुमचा प्रतिसाद निखालस आत्मकेंद्रीतता आणि आपपरभाव दर्शवितो. तुम्ही केलेल्या विडंबनांवर येणारे प्रतिसाद म्ह्णजे "चर्चा" आणि आम्ही केलेल्या विडंबनांवर येणारे प्रतिसाद म्हणजे "त्रास". (अशिंरोधाव्हावामाजिपा संघाचा स्वघोषीत अध्यक्ष) मोदक. ०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===० तृप्ती हाच्च्च्च्च जीवनाचा मूलाधार आहे. (असे "मीं" म्हणतो!) :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@तृप्ती हाच्च्च्च्च जीवनाचा

अत्रुप्त आत्मा
Sun, 01/20/2013 - 22:57 नवीन
@तृप्ती हाच्च्च्च्च जीवनाचा मूलाधार आहे. (असे "मीं" म्हणतो!) smiley>>> =)) म्हणा...आमच्या बा चे काय जाते? :-p @ तुमची स्वाक्षरी "मला" अतर्क्य वाटते.>>> ''तुंम्ही'' गेलात तेल लावत.... :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

आभार...

मोदक
Sun, 01/20/2013 - 23:02 नवीन
रोखठोक उत्तरांबद्दल आभारी आहे. तुमची ही उत्तरे मिपावरच बर्‍याच जणांना बर्‍याच ठिकाणी वापरायच्या मोहात पाडू शकतात - आत्ताच कॉपीराईट करून घ्या. :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

कसचं कसचं (लाजल्याची स्मायली)

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 01/23/2013 - 20:31 नवीन
कसचं कसचं (लाजल्याची स्मायली)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

फक्त स्वाक्षरीचा विषय संपला.

मोदक
Sun, 01/20/2013 - 21:51 नवीन
- - - - - पैसा, लीमाऊजेट आणि "माझ्याशी" वाद घालू इच्छिणार्‍या सर्वांसाठी - - - - - फक्त स्वाक्षरीचा विषय संपला. बाकी लै मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यांमध्ये "माझेच मत" बरोबर असणार आहे. (बाकी स्वतःच्या धाग्यावर स्वतःचेच लै लै प्रतिसाद टंकायची इच्छा आज पूर्ण झाली. :-D)
  • Log in or register to post comments

@स्वतःच्या धाग्यावर स्वतःचेच

अत्रुप्त आत्मा
Sun, 01/20/2013 - 21:57 नवीन
@स्वतःच्या धाग्यावर स्वतःचेच लै लै प्रतिसाद टंकायची इच्छा आज पूर्ण झाली. >>> =)) काय रे मोदका ? आज का पेटलायस इतका ? :-b
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

तुम्हाला "फुल्ल डिटेल" उत्तर हवे आहे की "संक्षिप्त"..?

मोदक
Sun, 01/20/2013 - 22:21 नवीन
काय रे मोदका ? आज का पेटलायस इतका ? तुम्हाला "फुल्ल डिटेल" उत्तर हवे आहे की "संक्षिप्त"..? अवांतर - तुमची स्वाक्षरी "मला" अतर्क्य वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बरोबर शब्द वापरता येतात

रेवती
Sun, 01/20/2013 - 23:07 नवीन
बरोबर शब्द वापरता येतात म्हणून कुठेही वापरण्याला माझा आक्षेप आहे. बाकी माझ्याकडील मुद्दे संपले आहेत. यापुढे गुद्दे वापरले जातील. ;) आज तुझी चलती आहे म्हणून बोलून घेतोयस पण तुझ्या भविष्यातील एखाद्या धाग्यावर जेंव्हा जास्त संख्येने लोक असहमती दर्शवत असतील तेंव्हाच मी दर्शवीन. एकट्याने असहमती दाखवण्याचे बळ नसल्याने असे म्हणत आहे. दहा लोकांने टपल्या मारल्या की अकरावी आपण मारल्यास खपून जाते शिवाय स्कोअर सेटल होतो. ती वेळ माझ्यावर येण्याआधी मी पळून जाईन मिपावरून हेही आत्ताच सांगत्ये. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

प्रतिसादाची प्रिंटाऊट घेतली आहे...

मोदक
Sun, 01/20/2013 - 23:18 नवीन
प्रतिसादाची प्रिंटाऊट घेतली आहे. :-D तरीही माझ्या बुद्धीला झेपले नाही तर तर व्यनी करून अर्थ विचारेन. लॉजीकल प्रश्नाला फाट्यावर न मारता उत्तर द्याल अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा