शुभेच्छा!!

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
2 Aug 2008 - 11:44 pm

माझ्या सगळ्या मिपा कुटुंबातील मित्र आणि मैत्रीणींना मैत्रीदिनाच्या हार्दीक शुभेच्छा! आपली मैत्री अशीच वृद्धींगत होत राहो हीच ईशचरणी प्रार्थना!!!

गंध अलौकिक याचा
क्षणभंगूर जीवन जरी
शुभ्र पाकळ्या कोमल
नाजूक नाभी शेंदरी

छंद समर्पाणाचा आगळा
वेड्याने त्या जोपासताना
मातीलाही गंध दिला
फांदीवरूनी ओघळताना

मैत्री व्हावी ऐसी
जिवाला जीव देणारी
जीवन ऐसे सार्थ व्हावे
पारिजात फुला परी...

- प्राजु

हे ठिकाणकलाधोरणमांडणीसंस्कृतीप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छाप्रतिक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

सुचेल तसं's picture

3 Aug 2008 - 12:15 am | सुचेल तसं

प्राजु,

तुला देखील मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

http://sucheltas.blogspot.com

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Aug 2008 - 12:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सुंदर कविता आणि फोटोही ...
तुला आणि संपूर्ण मिपा परिवारालाही माझ्याकडून मैत्रीदिनाच्या शुभेच्छा.

अदिती

ऋषिकेश's picture

3 Aug 2008 - 1:32 am | ऋषिकेश

प्राजुला आणि सर्व मिपास्नेह्यांना मित्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

-(सस्नेह) ऋषिकेश

मैत्री म्हणजे,
पावसात भिजत बाईक वरून केलेली सफर,

मैत्री म्हणजे,
जंगलातील केलेला अवघड ट्रेक,

मैत्री म्हणजे,
टपरी वर उभारून प्यायलेला कटींग चहा

मैत्री म्हणजे,
मित्रासाठी भांडताना मागे सारलेल्या शर्टच्या बाह्या

मैत्री म्हणजे,
मुलीला प्रपोज करायला गेल्यावर दिलेली साथ

मैत्री म्हणजे,
लग्नात नेम धरून मारलेल्या आक्षता

मैत्री म्हणजे,
कौतुकाच्या नजरेने पाठीवर पडलेली थाप

मैत्री म्हणजे,
चुकल्यावर गालावर उमटलेली चार बोटे

मैत्री म्हणजे
हदयाची हदयाला घातलेली साद.

प्राजु's picture

3 Aug 2008 - 2:39 am | प्राजु

मैत्री म्हणजे,
मित्रासाठी भांडताना मागे सारलेल्या शर्टच्या बाह्या

मैत्री म्हणजे,
लग्नात नेम धरून मारलेल्या आक्षता

मैत्री म्हणजे,
चुकल्यावर गालावर उमटलेली चार बोटे

मस्त आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

छोटा डॉन's picture

3 Aug 2008 - 10:45 am | छोटा डॉन

एकदम जबरदस्त शुभेच्छा !!!
च्यायला, ह्यालाच म्हणतात ना मैत्री ...
आम्ही शितलशी सहमत ....

सर्व मिपाकरांना व त्यांच्या सॄहुदांना "वैश्विक मैत्रीदिनाच्या हार्दीक शुभेच्छा" ...

स्वगत : एवढी मोठ्ठी कविता टाईप करुन मोबाईलवरुन पाठवायची म्हणजे प्रती समस "४.३० रुपये" पडतील.
असो. चांगली आहे.

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

घाटावरचे भट's picture

3 Aug 2008 - 2:54 am | घाटावरचे भट

सर्व मिपाकरांना मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

मैत्री म्हणजे...
कविता झकासच आहे!!

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
रितु आयी सावन की,
रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥

ब्रिटिश टिंग्या's picture

3 Aug 2008 - 4:04 am | ब्रिटिश टिंग्या

सर्व मिपाकरांना मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

प्राजु,
छायाचित्र अन् कविता सुरेख!

- (शुभेच्छुक) छोटी टिंगी :)

अनामिक's picture

3 Aug 2008 - 4:45 am | अनामिक

सर्वांना मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

http://www.youtube.com/watch?v=hRLLupaytOg

सर्वांचा मित्र,
अनामिक

विसोबा खेचर's picture

3 Aug 2008 - 8:24 am | विसोबा खेचर

फटू's picture

3 Aug 2008 - 9:28 am | फटू

मैत्री दिनाच्या शुभेच्छा !!!

आपला दोस्त,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

प्रगती's picture

3 Aug 2008 - 11:47 am | प्रगती

प्राजु फोटो खरोखर सुरेख आहे. तुला आणि सर्व मिपा सदस्यांना माझ्याकडून मैत्रिदिनाच्या शुभेच्छा.

II राजे II's picture

3 Aug 2008 - 6:41 pm | II राजे II (not verified)

प्राजु,

तुला देखील व आणि सर्व मिपा सदस्यांना मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!