आमची प्रेरणा: http://www.misalpav.com/node/20789
आमच्या एका मित्राला तुम्ही कुणीच ओळखत नाही. दरवेळी अडचणीत सापडला किंवा एखाद्या नवीन ध्येय धोरणाने पछाडला गेला की आमचा हा मित्र, हा सखा, सुहृद आमच्याकडे धाव घेत असतो. त्याच्या दृष्टीने तो म्हणजे सुदामा आणी मी म्हणजे कृष्ण, तो म्हणजे हृतीक आणि मी म्हणजे राकेश, तो म्हणजे ओमार अब्दुल्ला आणि मी म्हणजे शेख अब्दुल्ला, तो म्हणजे दीप दासगुप्ता आणि मी म्हणजे गांगुली असे बरेच काय काय आहे. त्यामुळे आज सकाळी सकाळी त्याने अवकाळी पावसासारखे पिंग केल्याचे आम्हाला मुळीच आश्चर्य वाटले नाही.
"झाली का प्लेसमेंट?" त्याचा सवाल
अस्मादिकः "नाही रे"
"छान! आधी असलेला जॉब सोडायचा, अन मग जरा कुठे प्रगती होतेय असं दाखवायचं अन २ वर्षांतच परत जॉबसाठी वणवण भटकायचं का?"
"अरे दादा, चालायचंच." मी स्पष्टीकरण द्यायचा फुटकळ प्रयत्नात. अजुन विषय वाढवायला नको म्हणून मीच पुढचा प्रश्न टाकला
"आज आमची कशी काय आठवण??"
"का ? पिंग करायलापण आता तुझी परवानगी घ्यायची का ? का मित्र काम असल्याबिगर कसे पिंग करत नाहीत, कसे मॅनरलेस असतात ह्यावर एक लेख पाडायचाय?"
"तसे नाही रे. पण तुझ्या बोलण्यावरुन काहीतरी निश्चय केल्यासारखे ठाम भाव वाटत आहेत, म्हणून विचारले." ह्या आमच्या वाक्याने मात्र त्याची कळी खुलली. (स्मायलीमुळे बरंच काय काय कळते, पण काही सदस्यांना त्यात काय खुपते कुणास ठावूक ;) )
"मिपाचा सभासद व्हायचे ठरवले आहे."
ठरवले आहे ? हा सगळे परस्पर ठरवून मोकळा होतच असतो म्हणा.
"अरे असा कसा थेट सदस्य होशील ? ग्रुपमध्ये तुझ्या कॉमेंट्सना कुणी भावसुद्धा देत नाही. तुझे लिखाण वाचायला शाळेत सायन्सचे सरदेखील घाबरायचे." अजुन काही गोष्टी त्याला स्पष्टपणे सांगितल्या असत्या, पण मुद्दामच अस्पष्ट राहिलो.
"अरे ढापण्या ! किती अकलेचे तारे तोडायचे ? अंपायर व्हायला, त्या खेळातले वर्ल्ड रेकॉर्ड नावावरती असण्याची गरज असते का? माइक बनवणार्याला गाणे गाता येण्याची गरज असते का ? किरवंताला आधी स्वतः लाकडावरती झोपायची सवय असावी लागते का? सदस्य होण्यासाठी भरभरून आणि वाचनीय प्रतिसाद लिहिण्याची, खूप सारे प्रतिसाद मिळण्याची गरज असते असे कोणी सांगितले तुला ? आणि प्रतिसाद काय, तुझ्या सारख्या फडतूस माणसाला देखील तुझ्या कंपूकडून मिळतातच की. "
"अरे पण सदस्य होण्यासाठी अंगात काही गुण असावे लागतात, स्वभाव सुद्धा एका ठरावीक वळणाचा हवा. अजून बरेच काय काय असते. कसे समजावू तुला?"
"ते समजवून घेण्यासाठीच आलो आहे तुझ्याकडे. तसेही रस्त्यावरचे काळे कुत्रे देखील तुला विचारत नाही. मीच एक आपला तुझ्यावरती दया करतो झाले. आता फालतूपणा बंद कर आणि काय काय आणि कसे कसे करावे लागेल ते चटचट बोल."
'आलीया भोगासी' ह्या न्यायाने आम्ही त्याला सल्ला द्यायला सिद्ध झालो.
"बाबा रे, तुला आधी कुठला सदस्य व्हायचे आहे ते तू ठरवले आहेस का? "
"हो ! पुरुष सदस्य" मित्राने मख्खपणे उत्तर दिले.
"अरे $^$%#^%$ ! मी तुला स्त्री का पुरुष सदस्य असे विचारलेले नाही. तुला कोणत्या प्रकारचा सदस्य व्हायचे आहे ? सदस्यांमध्ये अनेक प्रकार असतात. नुसते सदस्य, चाय शिग्रेट वाले सदस्य, खव/खफ सदस्य, हेकट सदस्य, कंपूबाज सदस्य, ज्ञानी सदस्य, एकोळी सदस्य, वकिल सदस्य इ.इ.."
"च्यायला, हे येवढे प्रकार असतात ? खुलासेवार डिट्टेल मध्ये सांग, म्हणजे मग तौलनिक अभ्यास करून ठरवता येईल की मी काय बनावे." सुहृदाने हुकूम सोडला.
"कसे आहे, चाय शिग्रेटवाले सदस्य असतात ते आपले रोज चाय शिग्रेट मिळाली की खूश असतात. आपण बरे आपले काम बरे अशी ह्यांची वृत्ती. हे सदस्य असतात ते चार टाळकी सोडली तर बाहेर कुणाला माहिती नसते. फक्त हपिसातून फुकटात मिपा उघडायला मिळाले की बास! कधीही प्रतिसाद द्यायचा नाही, खरडींना उत्तर द्यायचे नाही हे त्यांचे लक्षण. नेहमीच वाचनमात्र राहतात.
कंपूबाज सदस्य पूर्वी जनाधार वगैरे असे उदात्तीकरण करायचे म्हणे. हल्ली ट्रेंड बदललाय. हे नेहमीच संधीच्या शोधात असतात. पाकृ असो वा कविता; एखाद्या सदस्याला सळो की पळो करुन सोडायची किमया यांना साधलेली असते. त्यासाठी कधी कधी कंपूतल्याच एखाद्याचा बाजार उठवायला हे लोक मागे-पुढे बघत नाहीत.
"आणि बाकीच्या सदस्यांचे काय ?" आमच्या माजोरड्या मित्राने आता चक्क स्वतःच्या फोनवरुन आम्हाला कॉल केला होता. याचा अर्थ घ्यायचा तो घेतला मी.
"वत्सा.. आता आपण माहिती करून घेऊ पेश्शल सदस्य म्हणजे काय ते. ठरावीक विषयांतच त्यांचा हातखंडा असतो. त्याच व तेवढ्याच विषयांना वाहिलेल्या धाग्यांना प्रतिसाद देतात. यांची मते नेहमीच प्रस्थापित गृहितके वगैरे वगैरेला तडा देणारी असतात. कधीकधी परस्पर विसंगत विधाने करुनही त्यात संगती वगैरे असल्याचे भासवणे हे यांचे कौशल्य.
खव/खफ सदस्य जे असतात ते सहसा स्त्री आयडी किंवा स्त्री-सदृश पुरुष आयडी असतात. यांच्या खरडवह्या या अतिसामान्य लोकांच्या डायरी सारख्या असतात; "मागील पानावरुन पुढे चालू" टाईपच्या.ऑफिस अवर्सपैकी काही तास मिपावरील खव/खफसाठी देतात. इतर सदस्यांनी आज डब्यात काय आणलंय, खवतील चित्र कसे गोग्गोड आहे.... इ. इ. खरडी करत बसतात. प्रतिसाद द्यायला नेहमीच वेळ कमी असतो.
वकिल सदस्य, पेशाने वकिल आहेत काय? हा प्रश्न इतरांना पडतो. कारण कुठल्याही धाग्यावर कायद्याचे कुठलेसे कलम सांगत असतात. एकेकाळी अमेरिकेतील कायद्याच्या तरतूदीही सांगायचे. कालांतराने त्यांच्या मिपा सदस्यतेवर कोणी विरजण टाकले कुणास ज्यामुळे ते आता फ्रोयो होऊन बसलेत.
एकोळी धागा सदस्य म्हणजे ट्विटरचे बापच जणू! एक-दोन फारफार तर तीन ट्विट्सचा मजकूर टंकून हे लोक धागे काढत असतात. त्यावरुन नेहमीच पाण उतारा झाल्याने ही जमात सध्या आपले अस्तित्व गमावून बसली आहे.
हेकट सदस्य एखाद्या विषयाला वाहिलेले असूही शकतात किंवा नसूही शकतात. पण हेकटपणा हे त्यांच्या जालीय स्वभावाचे व्यवच्छेदक लक्षण. आपल्या मताशी सहमत असणार्या प्रतिक्रियांनाच 'धन्यवाद' 'थॅंक यू' अश्या उपप्रतिक्रिया देत सुटतात. विरोध करणार्या प्रतिक्रियांची दखल घेत नाहीत. कदाचित त्यांच्या तत्वातच बसत नसावे. सहृदयी (हे फक्त म्हणायलाच बरं का!) असतील दुसर्या संस्थळावर जातात व मिपावर वाचनमात्र राहतात. निबर असतील तर मात्र परत परत तसलेच धागे काढत राहतात. अश्या सदस्यांचे धागे हे विडंबकांसाठी उत्तम प्रतीचा कच्चा माल असतो.
आता वळूयात ज्ञानी सदस्यांकडे. जे अगदी जेन्युइन लोक असतात. जंटलमन टाईपचे. वाळवीसुद्धा जेवढी पाने+लाकूड खात नाही त्याच्या दसपट पुस्तके यांनी खाल्लेली असावीत. अफाट विचारशक्ति असते. सोशल असतात. एखादी लेखमाला पूर्ण करण्यासाठी यांच्या मागे पराकाष्ठेने लागावे लागते. या प्रकारच्या सदस्यांमुळेच मिपावर आल्याचे सार्थक होते."
'हम्म्म असे असते काय?' मित्रवर्य मोठे गहन विचारात गढलेले दिसले.
"आता मला सांग तुला कुठला सदस्य व्हायचे आहे?"
"पण मी काय म्हणतो... राहू दे, ह्यावर तुझ्याशी चर्चा करून फायदा नाही. मी ठेवतो आता." असे बोलून आणि त्याने फोन ठेवला.
दुसर्या दिवशी मेल अकाउंट उघडून बघतो तर आमच्या दुसर्या एका मित्राचा मेल आलेला. उघडून बघतो तर काल ज्याने मला कॉल केला होता त्याने त्याची सर्व अकाउंट्स (चेपु, जी+ इ. इ.) कायमची बंद करुन टाकल्याचा मजकूर खरडलेला!!!
प्रतिक्रिया
23 Feb 2012 - 8:20 pm | जेनी...
मी सदस्य होणारच!
:D
23 Feb 2012 - 8:22 pm | गेंडा
>>>सदस्यांमध्ये अनेक प्रकार असतात. नुसते सदस्य, चाय शिग्रेट वाले सदस्य, खव/खफ सदस्य, हेकट सदस्य, कंपूबाज सदस्य, ज्ञानी सदस्य, एकोळी सदस्य, वकिल सदस्य इ.इ.."
एक प्रकार राहीला की हो.
मंगळागौर करणारे सदस्य.
23 Feb 2012 - 8:28 pm | शुचि
:D
23 Feb 2012 - 8:36 pm | वपाडाव
हे वाक्य जसेच्या तसे पर्याच्या लेखातुन आले आहे... याचा अर्थ चोप्य पस्ते लेखकांची/सदस्यांचीही मिपावर कमतरता नाही हे दिसुन येते... ;)
बाकी, प्रयत्न उत्तम... जराशी कळ काढुन वेळ देउन लिहिला असता तर अजुन मस्त झाला असता... नीट वाचले असता चुका झाल्या आहेत असे दिसुन येते... हे आपला लेख चांगला व्हावा या हेतुने... सध्या चांगल्या चवीची जिल्बी वाटत आहे...
अन हा प्रतिसाद अश्या सर्व मिपाकरांसाठी जे म्हणतात, की कंपुत काहीही छापुन आले तर त्याचे नेहमीच गोडवे गायले जातात.
23 Feb 2012 - 8:42 pm | असुर
आज फर्ष्ट टैम वपाडाव यांच्याशी सहमत व्हावं लागतंय. :-)
बराच वेळ सदस्यत्वाची जिलबी वाचत होतो, मध्येच हा संपादकाचा खडा टोचला. आणि 'पिंग' चाही 'फोन' झालाय अचानक.
धागाकर्ते, हे आपला लेख चांगला व्हावा या हेतुने... सध्या चांगल्या चवीची जिल्बी वाटत आहे... ;-)
--असुर
25 Feb 2012 - 12:23 am | किचेन
चांगल निरिक्शण आहे.
23 Feb 2012 - 9:05 pm | अन्या दातार
@ वपाडाव, असुर:
योग्य तो बदल करण्यात आला आहे.
असुर,
हे वाचायचे राहिलेले दिसते तुमचे बहुतेक
23 Feb 2012 - 9:17 pm | असुर
हेच लिहायला आलो होतो.
टोचणारे खडे काढून टाकल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद. :-)
विडंबनाचा विषयच विशेष असल्याने इथेच प्रतिसादांच्या शतकाबद्दल बेटींग घ्यायला हरकत नसावी.
त्यासाठी आगाऊ शुभेच्छा! :-)
--असुर
23 Feb 2012 - 9:05 pm | पैसा
मस्त जमलाय लेख!
23 Feb 2012 - 9:37 pm | प्रास
आयला, मस्तच विडंबन की!
आवडलं आपल्याला!!
सदस्यांचे प्रकार आणखी उलगडले असते तर अधिक मजा आली असती असं वाटून राहिलंय....
बाकी मला तर ब्वॉ कुठे काही चूक दिसली नै...... ;-)
23 Feb 2012 - 9:40 pm | पैसा
स्री आयडीधारी पुरुष सदस्य आणि दुसरा म्हणजे स्त्री आयडी सदस्यांच्या खरडवह्यात "मज्याशी मय्यतरी कर्नार कं?" विचारत फिरणार्यांचा!
24 Feb 2012 - 4:35 pm | पियुशा
पैसा ताइ एकदम राइट बोली ;)
मज्याशी मय्यतरी कर्नार कं अस विचारुन नाकात दम करणारे सदस्य ;)
रोज रोज एकच प्रश्न विचारणारे सदस्य ;)
एखादा नवा( दन्गा घालण्याजोगा ) धागा दिसला रे दिसला धाग्याची सुतळी करणारे सदस्य ;)
नवकवि /लेखकाच्या धाग्याचे विड्म्बण पाडून त्याना सळो की पळो करुन सोडणारे सदस्य ;)
क्रुपया ह्.घे या मथळ्याचे धागे काढुन " साले " काढ्णारे सदस्य ;)
गमतीदार प्रतिसादाना सिरियसली घेणारे सदस्य ;)
दुसर्याना डु आय डी चिड्वणारे सदस्य ;)
बाल की खाल निकालनेवाले सदस्य ;)
झैरात करणारे सदस्य ;)
( या लिस्टमध्ये मी ही आलेच ;) )
( ब्बास आता पळ्ळा )
लै लै प्रकार आहेत सदस्याचे मि पा वर ;)
24 Feb 2012 - 4:58 pm | वपाडाव
कारण नसताना उगाच २ लिटर स्मायल्या वापरणारे सदस्य...
शुद्धलेखन येत नसताना दुसर्यांना त्याबद्दल उपदेश देणारे सदस्य...
खुप आठौलं आहे पण तुर्तास एवढ्यावरच समाधान मान बरं...
24 Feb 2012 - 4:59 pm | पियुशा
अरे व प्या एक राहील ना .........
विनाकारण खुसपट काढ्णारे सदस्य ;)
मलापण खुप आठौलं आहे पण तुर्तास एवढ्यावरच समाधान मान बरं... ;)
25 Feb 2012 - 12:26 am | किचेन
नवोदितांना खच्ची करणारे सदस्य.
25 Feb 2012 - 6:07 am | सूड
नाही, तो प्रकार कंपू या सदरात मोडतो. आता त्यातही प्रकार उपप्रकार असतात. त्यावर एक वेगळा लेख होईल.
25 Feb 2012 - 2:51 pm | ५० फक्त
नवोदितांना खच्ची करणारे सदस्य. - हो आणि अश्या सदस्यांना जुन्या पुराण्या प्राचीन काळातल्या तोफेच्या तोंडि देण्याची धमकी देणारे पण सदस्य असतात, त्यापासुन जपुन रहा.
24 Feb 2012 - 5:06 pm | अत्रुप्त आत्मा
@लै लै प्रकार आहेत सदस्याचे मि पा वर >>> ही> ;-) >एक-मेव स्माईली वापरणारे सदस्य
भागो....![](http://www.easyfreesmileys.com/smileys/free-scared-smileys-320.gif)
23 Feb 2012 - 10:48 pm | मन१
:)
एक प्रकार राहिला की रे
अजून एक म्हणजे "टेन्शन सदस्य " किंवा "डोंगराला आग लागली पळा पळा " छाप सदस्य.
झांबियात हगवणीच्या पसलेल्या साथीच्या बातमीने "बाप रे भारताचे भवितव्य कसले धोक्यात आहे" असे म्ह्णत कपाळावर आठ्या घालणारे लेखन ह्यांचे.
अजून एक म्हणजे "पानभर सदस्य" :- ह्यांना जर्रा कुठे स्कोप दिसला की चालले आपले पानच्या पानं भरायला.
ह्यांना चुकुन जरी "कसा आहेस" हे विचारले तर स्वतःच्या व इतरांच्या आख्ख्या घराण्याची हिष्ट्री सांगतील.
किंवा "लाल बहादूर शास्त्री युद्धानंतर ताश्कंदला गेले. " असे वाक्य दिसले की लगेच "सदर वाक्यात लालबहादूर शास्त्री हे ताश्कंदला विमानाने गेले " हे स्पष्ट न लिहिल्याचे सुचवतील, वर पुन्हा आख्ख्या विमानाची हिष्ट्री सांगतील. कोण वाचतय ह्यापेक्षा आप्ल्या नावाखाली पानभर प्रतिसादाचा झेंडा आहे ह्याच कल्पनेने ह्यांना गुदगुल्या होतात.
23 Feb 2012 - 10:53 pm | प्रचेतस
हाण्ण तेजायला.
भन्नाट विडंबन जमलाय.
नवसदस्य किंवा नवकवींवर टिप्पणी हवी होती.
23 Feb 2012 - 11:04 pm | यकु
काय काय अन्या
तुझा तो मित्र डुआय होता का रे?
जालावर एवढे नग भरले आहेत सदस्यांचे किती प्रकार ते सांगण ब्रह्मदेवालाही शक्य नाही.. तरी बर्याच खूब्या आल्या आहेत.. ;-) पण थोडा अभ्यास कमी पडतो आहे ;-)
अवांतर: नवनिर्मितीसाठी कुठल्या ना कुठल्या रुपात गर्भ आवश्यक असतो.
गर्भनिर्मितीसाठी नेहमीच दोन एंटीटींची गरज असते असे नाही.. काहीवेळा एकच एंटीटी गर्भधारणा होण्यास समर्थ असते.
तसेच काहीसे मराठी संकेतस्थळांचे आहे.. या अर्थाने प्रत्येक संकेतस्थळ नव्या संकेतस्थळाचा गर्भ वागवत असतेच..
काहीवेळा अशी गर्भधारणा झाली तरी ती फारकाळ टिकू शकत नाही
नवे काही जन्मावे इतपत दिवस तिचे पोषणच होत नाही..
वगैरे वगैरे
24 Feb 2012 - 12:23 am | अत्रुप्त आत्मा
@अवांतर: नवनिर्मितीसाठी कुठल्या ना कुठल्या रुपात गर्भ आवश्यक असतो.
गर्भनिर्मितीसाठी नेहमीच दोन एंटीटींची गरज असते असे नाही.. काहीवेळा एकच एंटीटी गर्भधारणा होण्यास समर्थ असते.
तसेच काहीसे मराठी संकेतस्थळांचे आहे.. या अर्थाने प्रत्येक संकेतस्थळ नव्या संकेतस्थळाचा गर्भ वागवत असतेच..
काहीवेळा अशी गर्भधारणा झाली तरी ती फारकाळ टिकू शकत नाही
नवे काही जन्मावे इतपत दिवस तिचे पोषणच होत नाही..
वगैरे वगैरे![](http://api.ning.com/files/Z*WFeROO64pn6ebwsUP13o2e6pRFBcmCOmMm8gYoKBXPva72GP7bO-UtHEE8Xix40NLxDjaRUjgvSD7MOZhQMnD6jfsB7Rr2/Gopinath.jpg?width=300)
24 Feb 2012 - 2:37 pm | गवि
अगदी अगदी..
पुलं म्हणून गेलेत ना.. दोन मराठी माणसे एकत्र आली की आधी सुरु करतात ते गणेशोत्सव मंडळ आणि पुढच्या वर्षी दोन गणेशोत्सव मंडळे..
24 Feb 2012 - 4:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रत्येक संकेतस्थळ नव्या संकेतस्थळाचा गर्भ वागवत असतेच
वॉव. वाक्य आवडलं. आंतरजालावर मराठी संकेतस्थळांना कोणत्याही काळात लागु होणारं एक उत्तम सत्य.
-दिलीप बिरुटे
24 Feb 2012 - 12:27 am | अत्रुप्त आत्मा
अन्याभाऊ... बेफाम
केलीत हां...
24 Feb 2012 - 7:42 am | ५० फक्त
छान जमलंय रे, ह्यामुळंच हल्ली सदस्य संख्या भयानक वाढते आहे.
24 Feb 2012 - 8:31 am | चौकटराजा
म्या सदश्य त झालू हायेच पर म्या कन्च्या परकारचा सदस्य हाये त्ये कुनी सांगल का ? पर त्ये जाव द्या ! म्या सरपंच , नीलकांत कुनी बी बोल्ल्ले तरी बी म्या कंदीचत्ये काटछाटीचं काम करनार नाय . आपल्याला " शेणसार " च आवडत नाय !
24 Feb 2012 - 9:17 am | प्रचेतस
हुच्च सदस्य हा प्रकार आल्या नसल्याबद्दल निषेध.
24 Feb 2012 - 10:08 am | बंडा मामा
प्रेरणाची लिंक गंडली आहे. तीही दुरुस्त करा. प्रवेश प्रतिबंधीत असे दिसत आहे.
24 Feb 2012 - 10:12 am | अन्या दातार
दुर्दैवाने ती लिंक Beyond repair गेली आहे ;)
24 Feb 2012 - 10:29 am | सूड
भांडखोर आणि भांडकुदळ सदस्य राह्यलं की.
तर या प्रकारचे सदस्य ७५ टक्के वेळा स्त्री सदस्य किंवा तसे आयडी घेऊन लिहीत असतात. भांडखोर म्हणजे भांडण खोर्याने ओढल्यागत आपल्याकडे ओढून घेतात. भांडकुदळ म्हणजे नसलेलं भांडण उकरून अथवा खणून काढतात. अशा सदस्यांमुळे धागा शंभरी तरी गाठतो किंवा त्याला पंख लागतात. किमान प्रतिसादांना तरी पंख लागतातच. असे आयडी अकारान्ती आकारान्ती , ईकारान्ती असतात.
24 Feb 2012 - 11:46 am | अत्रुप्त आत्मा
@असे आयडी अकारान्ती आकारान्ती , ईकारान्ती असतात.>>> एक/दोन उदाहरण दिली असती तर बरं झालं असतं ;-)
24 Feb 2012 - 11:48 am | अन्या दातार
व्यनि चेकवा ;)
24 Feb 2012 - 12:10 pm | चिंतामणी
>>>@असे आयडी अकारान्ती आकारान्ती , ईकारान्ती असतात.>>> एक/दोन उदाहरण दिली असती तर बरं झालं असतं
उदाहरणार्थ
अकारान्ती = सूड
आकारान्ती = अत्रुप्त आत्मा
ईकारान्ती = वल्ली
(ह.घे.)
24 Feb 2012 - 12:16 pm | अन्या दातार
हे विसरलात की हो काका!!!
24 Feb 2012 - 12:21 pm | प्रचेतस
ख्या ख्या ख्या.
आता भांडणं उकरून काढायला पाहिजेत मग. ;)
24 Feb 2012 - 12:26 pm | चिंतामणी
24 Feb 2012 - 12:28 pm | अन्या दातार
तुमच्यासारख्या स्पोर्ट्समनकडून अश्या 'बाय' ची अपेक्षा नव्हती काका :(
24 Feb 2012 - 5:00 pm | सूड
अरे बरोबर, ते उरलेल्या २५% ईकारान्तात गणले जाऊ नये अशी माफक इच्छा असेल त्यांची. वल्ली दिसला पण चिंतामणीतला ईकार सोईस्कररित्या विसरले. ;) (आता तुम्ही ह घ्या हो चिंतूकाका)
25 Feb 2012 - 3:16 pm | चिंतामणी
आयडी अकारान्ती आकारान्ती , ईकारान्ती आहे अश्या "भांडखोर आणि भांडकुदळ" सदस्यांबद्दल तुच प्रतिसाद टंकला आहे ना.मी फक्त योग्य नावे दिली.
24 Feb 2012 - 10:53 am | श्रावण मोडक
प्रेरणा हरपली. आता?
बादवे, प्रेरणेचा धागा का उडाला हे कळलंच नाही. संपादकीय कात्री लागलेली दिसते. इंटरेस्टिंग. वयात येताना मुलाचा पाय डगमगतो तसंच हे असावं अशी आशा.
24 Feb 2012 - 11:25 am | चिंतामणी
>>>वयात येताना मुलाचा पाय डगमगतो तसंच हे असावं अशी आशा.
म्हणजे नक्की काय?? प्रेरणेचा धागा की तो उडवणे??
24 Feb 2012 - 12:05 pm | श्रावण मोडक
जाऊ द्या राव... शहाण्यांना... ;)
24 Feb 2012 - 12:15 pm | चिंतामणी
24 Feb 2012 - 1:54 pm | वपाडाव
माझं नालेज तोकडं असेल कदाचित पण, यातुन 'रिडिंग बिटवीन द लाइन्स' अपेक्षित आहे की काय?
तसं असेल तर या अडाण्यासाठी टॉर्च मारा...
24 Feb 2012 - 1:56 pm | यकु
काय येडबिड लागलंय का वप्या तुला?
अंधारात चाललेल्या गोष्टींवर टॉर्च मारायला सांगतोस. आं? ;-)
24 Feb 2012 - 2:04 pm | श्रावण मोडक
हां ना राव... काहीही सांगतो हा वप्या...
24 Feb 2012 - 3:01 pm | वपाडाव
हे तर लैच-वाइच भलतीकडे चाल्लंय की... अहो मी वेगळ्या अंधाराची गोष्ट करत होतो...
ह्या संदर्भात मी हे म्हणत होतो, की पर्याचा पाय तरुणपणी वाकडा न पडता बालपणीच वाकडा पडला होता...
संदर्भ :: पर्याची मंदाकिनी... ;)
24 Feb 2012 - 3:14 pm | श्रावण मोडक
खातंय आता पऱ्याचा मार. आधी धागा उडाला, त्यात आता आवडत्या मंदाकिनीची आठवण देत मारलेले टोले... काही खरं नाही तुझं. ;)
24 Feb 2012 - 3:17 pm | यकु
वप्या तुझ्या पत्रिकेत आज मृत्यू षडाष्टक योग आहे का बघ रे..
बुडत्याचे पाय खोलाकडेच म्हणे ;-)
24 Feb 2012 - 3:21 pm | वपाडाव
चला मी लगेच सुमडी शोधुन घुसुन घेतो... लॉग आउट केलंय रे लगेच... मला शोधु नका...
24 Feb 2012 - 11:33 am | स्वातीविशु
बुंगाट विडंबन. :D
24 Feb 2012 - 12:02 pm | धमाल मुलगा
काढलास मर्दा! :)
पण्णंऽऽ...बंदूक ठासणीची है, दारुकाम जोरदार व्हाया पायजे. म्होरचा बार उडिवताना आधी दारु नीट दाबून ठासून भरा! बार कसा, दसर्याला मंडपाशी वाजतो तसा वाजला पायजे, उगं पट्टणकोडोलीच्या जत्रेतल्या कवठी फटाक्यागत करुन भागनार न्हाई आता. क्काऽऽय?
24 Feb 2012 - 1:45 pm | गणेशा
मस्त जमलाय लेख ...
मुळ लेख ओपन होत नाहि.
24 Feb 2012 - 2:31 pm | मी-सौरभ
अभ्यास कमी पडतोय तुझा....
24 Feb 2012 - 3:03 pm | वपाडाव
कमी नाही रे, मागे पडतोय... रोजाने भेट देत नाही तो...
24 Feb 2012 - 3:24 pm | प्यारे१
अॅडजस्ट होत नसेल रे अथवा तो वरच्या कुठल्याही 'कॅटॅगरीत' बसत नसेल बघ ! ;)
24 Feb 2012 - 4:22 pm | अत्रुप्त आत्मा
@तो वरच्या कुठल्याही 'कॅटॅगरीत' बसत नसेल बघ !>>> अबाबाबाबा...पालखितच बशिवलान... ;-)
24 Feb 2012 - 4:51 pm | प्रचेतस
आजून एक क्याटेगरी - फोटू दिसत नसणारे सदस्य
24 Feb 2012 - 5:11 pm | ५० फक्त
होय, सध्या तरी तो एकसदस्यीय पक्ष आहे, होतील कार्यकर्ते जमा हळु हळू..
24 Feb 2012 - 5:26 pm | वपाडाव
ह्या ज्वराने साथ पसरवण्यास सुरुवात केली आहे... बर्याच जणांना ह्या रोगाने ग्रासलेले आहे... हवं असल्यास मा. सं. गंपाला विचारा... लौकरच यांची हपिशियल निशाणी जालावर येइल...
![](http://cyclechargeall.com/chargeHome/images/products/gogglesFolding/gogglesFoldingBlack.jpg)
![](http://1.bp.blogspot.com/_OOocC6619H8/RqS0jdOVouI/AAAAAAAAAA0/I7jlci0LDJg/s400/images.jpg)
किंवा
24 Feb 2012 - 6:32 pm | प्रचेतस
त्यातही २ उपगट आहेत.
एकात फोटू न दिसणारे पण त्याविषयी फारशी वाच्यता न करणारे सदस्य. फोटू न दिसणार्या बहुतेक सदस्यांचा समावेश या गटात असतो.
दुसर्या गटात फोटू न दिसण्याची सतत वाच्यता करणारे सदस्य असतात. जो सध्यातरी एकसदस्यीयच गट आहे.
24 Feb 2012 - 6:35 pm | पैसा
इनो घ्यावं लागेल म्हणून फोटु दिसत नाहीत असा कांगावा करणारा आणखी एक उप उप गट आहे.
24 Feb 2012 - 4:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सदस्य प्रकारात अजुन माल भरायला पाहिजे होता. लै नमुने बाकी आहे. :)
-दिलीप बिरुटे
(म.संस्थळावर असलेला कोणता तरी एक नमुना) :)
24 Feb 2012 - 5:07 pm | अन्या दातार
सर्व प्रतिसादकांचे आभार.
गेंडा म्हणाले की मंगळागौर करणारे सदस्य यात आलेले नाहीत. खरंतर ही कुठलीही सदस्य कॅटेगरी नाही. त्यात वेगवेगळे प्रकारचे सदस्य येऊ शकतात.
काही सदस्यांनी (आता कै. झालेल्या) मूळ लेखातील वाक्ये जशीच्या तशी उचलल्याचे निदर्शनास आणून दिले. पण हे एक गद्य विडंबन असल्याने त्याचा मुख्य आकृतीबंध किंवा ढाचा तोच ठेवून कर्ता बदलला जातो. काव्य विडंबनात जरा वेगळा प्रकार असतो. तिथे कवितेचा छंद. किंवा मीटर तेच ठेवून विषय बदलला जातो.
आता बघूयात काही गद्य विडंबनांची उदाहरणे, ज्यातून मला काय सांगायचे आहे ते स्पष्ट होईल.
लेख क्र. १ ----> विडंबन क्र. १
लेख क्र. २ ---> विडंबन क्र. २
लेख क्र. ३ ---> विडंबन क्र. ३
मा. यकुशेठ येडे(बनव)कर म्हणतात कि अभ्यास कमी पडतोय, पण विडंबन करायची आत्यंतिक उबळ आल्याने शक्य तेवढे प्रकार लिहिण्यात आले. आणि म्हणूनच ह्या इतक्या सदस्यांच्या पसार्यातून फुटकळ सदस्यांना वगळण्यात आले आहे.
वल्लीशेठ जोन्स यांनी हुच्चभ्रू हा प्रकार वगळल्याचे सांगितले. पण नुकतेच एक आख्खे काव्य त्या प्रकारच्या सदस्यांना अर्पण केल्याने मुद्दाम या लेखात स्थान दिले नाही.
25 Feb 2012 - 4:13 am | निनाद मुक्काम प...
मस्त चुरचुरीत ,खुसखुशीत विडंबन झाले आहे.
पु ले शु
25 Feb 2012 - 8:56 am | डॉ.श्रीराम दिवटे
झकास मारलीत!
उत्तम विडंबन झाले आहे. शाब्बास, सर्व सद्स्यांचा विजय असो.
25 Feb 2012 - 1:43 pm | सुहास..
हा हा हा !!
आवडले , बाकी अजुन सदस्य-प्रकार राहिले ;)
25 Feb 2012 - 1:49 pm | प्रचेतस
कुठले रे कुठले, अॅडव ना इथे.
25 Feb 2012 - 2:02 pm | अन्या दातार
ते तर मी वरच्या प्रतिसादातही मान्य केलेच आहे की. अन वल्ली म्हणतो तसे अॅडव तु पण. वरती सूड, वप्या, पिवशी यांनीही मौलिक भर घातलीच आहे की. :)
25 Feb 2012 - 4:47 pm | सुहास..
अन्या भौ , माझे टोमणे लोक्स ' विनोद-बुध्दी ' ने घेत नाहीत म्हणे, म्हणून सदस्य - प्रकार लिखाण आटोपते घेतो आहे, पण एक प्रकार मात्र सांगण्याचा मोह आवरत नाहीये ;)
हे सदस्य म्हणजे ' आंतरजालीय सख्याहारी ' ( शब्द प्रयोग दुष्मन-ए-जान कडुन न सांगता उधार !! )
गूण विषेश :
१ ) स्त्री - आय डी चा , मग तो एकोळी, फालतु का धागा असेना धावत-पळत जावुन प्रतिसाद देणे, मग त्या प्रतिसादाची लिंक खव/व्यनी मध्ये देणे , एकदा उत्तर आले की मग चर्चेला सुरूवात होते.. ( हे गुण- विशेष आमच्या देखील वाट्याला आलेले आहे. त्याचे कारण म्हणजे आमचे नाव, त्या महाभागाला असा गैर समज झाला की मालक माझ्याशी पार फ्लर्ट कराया लागल, शेवटी मला त्याला सांगाव लागल की बाळ मी स्त्री आयडी नसून पुरुष आय डी आहे. स्साला आंजावरूनच गायब झाल त्यानंतर ;) )
२ ) हजर सभासद मध्ये नाव पाहिले की मग खरड/ व्यनी मारणे. उत्तरा दाखल काही ही मिळाले की सरळ- सोट ओळख-पाळख वाढवायचा कार्यक्रम हाती घेणे, मग चेपू/नंबर/गबोल वर टिपी करत बसणे ...उद्देश . निरूद्देश ...काही का असेना ...चालायचेच ( आमच्या ओळखीतील एक चांगली प्रतिमा असलेले सदस्य सध्या या गोष्टीत बिझी आहेत, पण समोरचा जो स्त्री आयडी आहे, त्याची अडचण झाली आहे, तोंडावर सांगता येत नाही, आणि धड टाळता येत नाही, हे महाभाग, दिवस रात्र समस करत असतात...)
असो हा प्रतिसाद असाच त्या सर्व स्त्री सदस्यांसाठी ......;)
( नाही म्हणजे, लडका ही लडकी के पिछे भागेगा हे मान्य !! पण काही लिमीट ;) )
26 Feb 2012 - 3:28 pm | सुहास..
.
28 Feb 2012 - 1:06 pm | मी-सौरभ
एकदम ठोकदार प्रतिसाद :)
28 Feb 2012 - 1:20 pm | प्रचेतस
सतत प्रकाटाआ करणारे सदस्य हाही एक प्रकार आहेच.
28 Feb 2012 - 1:13 pm | जेनी...
. स्साला आंजावरूनच गायब झाल त्यानंतर
:bigsmile:
28 Feb 2012 - 2:49 pm | चौकटराजा
एकदा मी ही पुणे ते मुम्बई असा पास काढला होता. पास असूनही छशिट ला पासाच्या डब्यात बसू देइनात . मायला कोणी दखल घ्यायला तयार नाही.
एकाला विचारले का हो आम्हाला कधी घेणार ग्रूप मधे ? तर तो म्हणाला " तीन वर्षे संडासात प्रवास करण्याची तयारी ठेवा ! इथे बदली झाली, खपला किंवा रिटायर झाला की संडास सोडून साईडची जागा मग कालांतराने उलटी खिडकी व तात्या काका, बॉस अशी पदवी मिळाली की वारा देणारी खिडकी असे प्रमोशन मिळते.
इथे आलो. दुनिया गोल आहे.
28 Feb 2012 - 5:25 pm | विश्वनाथ मेहेंदळे
चोख तुलना. एकदम चाबूक !!!
प्रतिसाद ऑफ द मंथ :-)