तुम्हाला मिपावर कधी कोणी टोमणा मारला आहे का? कधी तुमच्यावर शाब्दिक किंवा वैयक्तिक हल्ला झालाय का? आणि तो होऊन वर त्याबद्दल तुम्हालाच दोषी धरलं गेलंय का? तसं असेल तर चला, आपण सगळे मिळून मिपावर उठवळ मोर्चा काढू...
आता तुम्ही मला विचाराल, की उठवळ मोर्चा म्हणजे नक्की काय? तर उठवळ मोर्चा हे स्लटवॉकचं मराठी भाषांतर आहे. कॅनडा का कुठल्याशा देशात एका पोलिस अधिकाऱ्यांने बायकांना सांगितलं की 'तुम्हाला जर बलात्कार करून घ्यायचा नसेल तर हे असले उठवळ बायकांसारखे उत्तान कपडे घालणं थांबवा'. त्यावरून बायका खवळल्या. एक तर पुरुष प्रधान संस्कृतीत पददलित म्हणून रहायचं. वर वेळोवेळी पुरुष बलात्कार करतात. आणि त्याच संस्कृतीचा आधिकारिक प्रतिनिधी धोरणाचा भाग असल्यासारखा त्यांना नाक वर करून सांगतो की ज्यांच्यावर बलात्कार होतात त्याच उठवळ! तोही स्वतः पुरुष. याचा निषेध झालाच पाहिजे. म्हणून त्यांनी जगभर जागोजागी मोर्चे काढले. स्लटवॉक. त्यामागचा उद्देश असा होता की स्त्रीने कुठचे कपडे घातले यावरून बलात्कार होतो की नाही हे ठरू नये. नाहीतर प्रत्येकीलाच मुकाट्याने बुरखा घालून रहावं लागेल.
तर ही पार्श्वभूमी झाली स्लटवॉक अथवा उठवळ मोर्चाची. आता तुम्ही म्हणाल की 'मिपावर या उठवळ मोर्चाचा काय संबंध? मिपावर तर कपड्यांचा प्रश्नच येत नाही. चेहरेदेखील दिसत नाहीत, सगळेच आयडीच्या मुखवट्याआड लपलेले असतात. हा, आता काही लोक पूर्वी कपडे काढून टाकल्यासारखे निर्लज्जपणे वावरत. पण ती पूर्वीची गोष्ट झाली. मिपा आता थोडंसं मध्यमवयीनाळलेलं आहे. प्रभू गुरुजीदेखील क्रिप्टिक कमी, समुपदेशक जास्त असं लिहितात. आजच्या रसभरीत खादाडी बरोबर येणारे रसरशीत युवतींचे फोटो देखील थांबले. आता पेंड्यूलम दुसऱ्या दिशेला स्विंग झालाय की काय असं वाटावं असे जॉन, सलमान वगैरेंचे टॉपलेस फोटो येतात. वाताबरोबर बऱ्याच कुक्कुटांनी दिशा बदलली आहे. आता उठवळपणा वगैरे करायला जागाच राहिली नाही!' :-(
हा मुद्दा अगदीच चुकीचा नाही, पण एवढ्यात हिंमत सोडू नका. उठवळपणासाठीचा लढा हा केवळ हवे ते कपडे घालण्याचा (नको ते न घालण्याचा), लैंगिक स्वरूपाचा लढा वाटतो. 'मी स्त्री आहे. मला हवे ते कपडे घालण्याचा हक्क आहे. त्यासाठी मला शिक्षा होता कामा नये.' पण उठवळ मोर्चाची कल्पना अधिक व्यापक आहे. 'मी अमुकतमुक आहे. मला हवी तशी अभिव्यक्ती करण्याचा मला अधिकार आहे. त्याबद्दल मला कोणी सोम्यागोम्याने मला शिक्षा करता कामा नये'. आपण कोण आहोत याची जाणीव असणं व त्याप्रमाणे अभिव्यक्ती करण्याचं स्वातंत्र्य मिळणं महत्त्वाचं. पुलंनी म्हटलेलंच आहे की उंट तिरका म्हणजे तिरकाच चालणार, हत्ती सरळ म्हणजे सरळच चालणार. पण समाज हा काही बाबतीत क्रूर असतो. पुलंच्या वाक्यांना टाळ्या देतो, पण प्रत्यक्षात सर्वमान्य चालीपेक्षा तुम्ही वेगळे चाललात तर तो तुम्हाला फटकारतो, सुनावतो.
मिपावरती वेगवेगळ्या भूमिका घेणाऱ्यांचंदेखील हेच होतं. आपलं स्वत्व, आपली आयडेंटिंटी आपल्या शब्दांतून उघडी केल्यावर तोकड्या कपड्यांतून दिसणाऱ्या अंगाकडे जशा आंबटशौकीन, वाईट नजरा वळतात तशाच इथेही वळतात. मग वैचारिक बलात्कार होतात. आणि कॅनडाच्या त्या पोलिसाने जसं स्त्रियांनाच, व त्यांच्या अभिव्यक्तीलाच दोषी ठरवलं तसं इथेही होतं. म्हणून मी म्हणतो की सर्व पीडितांनी एकत्र होऊन याविरुद्ध आवाज उठवायला हवा
तुम्ही सामान्यांसारखाच विचार करता म्हणून सो कॉल्ड विचारवंत तुम्हाला सडके किंवा भडके म्हणतात का?
की तुम्ही लिबरल विचारसरणी बाळगल्यामुळे कोणीही उठून सडक्या प्रतिक्रिया देऊन तुम्हाला विचारजंती म्हणतो?
तुम्ही केवळ नवे आहात, तुमचा कंपू नाही किंवा जुन्या कंपूएवढा मोठा नाही म्हणून जुनेजाणते तुमचा छळ मांडतात का?
तुम्ही दारू पिता म्हणून दारू न पिणारे तुम्हाला तुच्छ लेखतात का?
तुम्ही शाकाहारी आहात म्हणून मांसाहारी तुम्हाला हिणवतात?
तुम्ही सश्रद्ध आहात म्हणून निरीश्वरवादी तुमच्या विरोधात धागे काढतात?
तुम्ही संपादक आहात म्हणून काही संधीसाधू तुमच्याविरोधात चौपाटी, भेळपुरी, उपोषण वगैरे हत्यार उपसतात का?
तुम्ही निवासी भारतीय आहात म्हणून तुम्हाला भारतात घडणार्या प्रत्येक वाईट गोष्टीबद्दल दोष दिला जातो आहे?
तुम्ही अनिवासी भारतीय आहात तेव्हा तुम्हाला भारतातल्या घटनांवर बोलण्याचाच अधिकार नाही असं म्हटलं जातं का?
तुम्ही भारतीय संस्कृतीचे पाईक आहात केवळ म्हणून काही स्त्री-नामधारक-आयडी तुम्हाला "मोठे व्हा", "इनो घ्या" असले अवमानकारक सल्ले देतात का?
व्यनीमनीच्या गोष्टी करून विडंबक तुमच्या कवितांचं घाऊक प्रमाणात विडंबन करतात का?
तुमची लोकप्रियता बघवत नाही म्हणून निव्वळ तुमच्या प्रतिसादांचं विडंबन होतं का?
तुम्ही ज्योतिष/नाडीचा प्रसार करत असताना तुमच्यावर निव्वळ अविश्वास दाखवून तुमच्यावर जाहिरातबाजीचा आरोप होतो का?
यापैकी कुठच्याही प्रश्नांना तुम्ही हो उत्तर दिलंत तर तुम्ही मिपापीडित आहात. सर्व मिपापीडितांनो एकत्र व्हा. मिपावर उठवळ मोर्चा काढा. आपल्या अभिव्यक्तीचे हवे तितके हवे तसे कपडे करून आपलं खरं व्यक्तिमत्व उघडं करा. बघताय काय, सामील व्हा आंतरजालावरील सर्वात पहिल्या 'उठवळ मोर्चा'त. आपल्या प्रतिसादात 'मी अमुकअमुक आहे व मला त्याचा अभिमान आहे' हे वाक्य लिहून आपल्यावर जुलूमजबरदस्ती करणाऱ्यांचा जाहीर निषेध करा. आपापल्या प्रकृतीला शोभेल त्याप्रमाणे मेणबत्त्या, काळ्या फिती, फेसबुकप्रमाणे लाइक, तलवारी, तुताऱ्या वगैरेचे फोटो डकवून या मोर्चात सहभाग घ्या.
उठवळ मोर्चा, झिंदाबाद!
(हा लेख लिहिताना ३_१४ विक्षिप्त अदिती या आयडीचं प्रचंड योगदान मिळालं. त्याबद्दल त्या आयडीचे टॉपपासून बॉटमपर्यंत आभार)
प्रतिक्रिया
26 Aug 2011 - 10:43 am | मिसळलेला काव्यप्रेमी
आता मैच सुरु होणार!! ;)
मागच्या शीटावर बसून मजा पाहतोय. ;)
26 Aug 2011 - 10:47 am | स्पा
ओये मिका , माझी सीट ठेव रे बाबा
पॉपकॉर्न घिऊन येतो
घासू गुर्जी, उठवळ मोर्चाच नेतृत्व करताना कशे दिसतील याच चित्र डोळ्या समोर अल..
आणि अमळ सद्गदित झाहलो
-- माचो स्पा
26 Aug 2011 - 11:26 am | शाहिर
बेटींग घ्यावे असा विचार करतो आहे ..१०० तर सहजच !
26 Aug 2011 - 10:48 am | मराठी_माणूस
उठवळ धाग्याना तर आधीच सुरुवात झाली आहे.
26 Aug 2011 - 10:51 am | चिरोटा
मस्तच रे राजेश.
साधक बाधक चर्चा होईल ही अपेक्षा.
मोर्चा काढण्यापेक्षा २/३ कि.मी. लांब मानवी शृंखला केली तर?
26 Aug 2011 - 11:31 am | वपाडाव
म्हणजे कसे ऑर म्हणजे काय ते?
-अमानवी अमानुष
26 Aug 2011 - 10:55 am | चेतन सुभाष गुगळे
<< तुम्हाला मिपावर कधी कोणी टोमणा मारला आहे का? कधी तुमच्यावर शाब्दिक किंवा वैयक्तिक हल्ला झालाय का? आणि तो होऊन वर त्याबद्दल तुम्हालाच दोषी धरलं गेलंय का? तसं असेल तर चला, आपण सगळे मिळून मिपावर उठवळ मोर्चा काढू... >>
<< तुमचा कंपू नाही किंवा जुन्या कंपूएवढा मोठा नाही म्हणून जुनेजाणते तुमचा छळ मांडतात का? >>
<< पुलंनी म्हटलेलंच आहे की उंट तिरका म्हणजे तिरकाच चालणार, हत्ती सरळ म्हणजे सरळच चालणार. पण समाज हा काही बाबतीत क्रूर असतो. पुलंच्या वाक्यांना टाळ्या देतो, पण प्रत्यक्षात सर्वमान्य चालीपेक्षा तुम्ही वेगळे चाललात तर तो तुम्हाला फटकारतो, सुनावतो. >>
<< काही स्त्री-नामधारक-आयडी तुम्हाला "मोठे व्हा", "इनो घ्या" असले अवमानकारक सल्ले देतात का?>>
असा अनुभव आलाय पण तरीही उठवळ मोर्चा काढायची इच्छा नाहीय. आम्ही अगदी टोकाचे देव आनंद भक्त, म्हणजे आम्हाला सबकुछ देवआनंद (लेखक/निर्माता/दिग्दर्शक/अभिनेता सारं काही देवआनंदच असलेले) चित्रपटच जास्त आवडतात. अशा चित्रपटांमध्ये (उदाहरणार्थ प्रेमपुजारी, हरे राम हरे कृष्ण, मिस्टर प्राईम मिनिस्टर, सेन्सॉर, लुटमार, हे व असे अनेक) अनेक पात्र देव आनंद ला छळ छळ छळतात तरी तो अगदीच गरज पडल्याशिवाय फारसा कुणाचा प्रतिवाद करीत नाही (सेन्सॉर मध्ये तर ममता कुलकर्णी देव आनंद चा एकेरी उल्लेख करून बराच उपमर्द करते तरी तो स्थितप्रज्ञच. शेवटी जेव्हा तो शांतपणे आपली लढाई लढून जिंकतो तेव्हा तीदेखील आनंद व्यक्त करतेच. कारण उघड ती त्याचा कितीही उपमर्द करत असली तरी मनातून तिला तो फार फार आवडत असतो. तो मिळत नाही म्हणून एक सॅडिस्ट जळजळ ती व्यक्त करीत असते इतकेच.). तो छळ तो एन्जॉय करतो. आम्हीही मिपावर होणारा आमचा छळ एन्जॉय करतो. त्यांना कळत नाहीय ते काय करतात असाच काहीसा छळ करणार्यांविषयीचा आमचा दृष्टीकोन असतो.
एका महिलेला स्लट वॉक विषयी मुलाखतकर्त्याने तिचे मत विचारले (काही दिवसांपूर्वीच्या मटात आले होते). ती म्हणाली, "मला याचा उद्देशच पटत नाही. 'हे पाहा, माझ्याकडे तुम्ही पाहू नका' असा काही तरी विसंगत संदेश हा मोर्चा देतो असे मला वाटते."
स्लटवॉक / उठवळ मोर्चा विषयीच्या त्या महिलेच्या विधानाशी मी देखील सहमत आहे.
<< हा लेख लिहिताना ३_१४ विक्षिप्त अदिती या आयडीचं प्रचंड योगदान मिळालं. त्याबद्दल त्या आयडीचे टॉपपासून बॉटमपर्यंत आभार >>
या विधानाबद्दल विशेष कौतूक.
26 Aug 2011 - 2:11 pm | शाहिर
कारण उघड ती त्याचा कितीही उपमर्द करत असली तरी मनातून तिला तो फार फार आवडत असतो
ऑ !!
27 Aug 2011 - 8:11 pm | बिपिन कार्यकर्ते
=))
11 Nov 2011 - 1:35 am | आनंदी गोपाळ
ये उस्का स्टाईल होयंगा
होटोपे हाँ दिल्मे ना होंगा??
26 Aug 2011 - 10:57 am | विनीत संखे
Love is cliche and cliches doent make you extraordinary but only human.
सामान्य असणं हा मानव असल्याचा मुख्य पुरावा आहे असे मार्टीन ल्युथर किंग यानी म्हटलंय. आपण असामान्य आहोत हे इतरांना किंवा किंबहुना स्वतःला पटवून देण्याची उठाठेप करावीच का माणसानं?
सो कॉल्ड विचारवंत किंवा विचारजंत माझ्या सामान्यत्वाविषयी आपले असामान्य किंवा अतिसामान्य विचार मांडोत अथवा नाही, त्यामुळे माझ्या बायकोचं माझ्यावरचं प्रेम कमी होत नाही.
आणि मिपापिडित असणं हा प्रकार काय बुवा हे मला कळलेलेले नाही... इंटरनेट वर भांडणे हे सामान्य नेटकराचे उदाहरण झाले. म्हणून कुणी अमका तमका तुमच्याशी मिपावर भांडला आणि तुम्हाला त्याने टिकेचं धनी केलं तर काय बिघडलं?
इथंच बघा...
बायको, आई किंवा मित्र प्रेम करतातच ना?
पुरेसं आहे.
उठवळ मोर्चा काढायचा का त्यासाठी?
26 Aug 2011 - 10:58 am | चेतन सुभाष गुगळे
सहमत!
26 Aug 2011 - 11:10 am | गवि
चेतन आणि विनीत,
हा लेख हे एक विनोदी आणि उपरोधात्मक / विरंगुळात्मक वगैरे लिखाण आहे अशी माझी समजूत आहे.
तुम्ही गंभीर स्पष्टीकरण दिले आहेत म्हणून आता मात्र लेखाविषयी पुनर्विचार करुन पाहतो.
26 Aug 2011 - 11:20 am | विनीत संखे
अहो गविसाहेब, आम्हीही उपहासात्मकच प्रतिक्रिया दिलीय... कार्टूनच खटाटोप त्यासाठीच होता.
:-)
26 Aug 2011 - 11:11 am | शुचि
मस्त कार्टून आहे =)) =)) =))
26 Aug 2011 - 11:32 am | राजेश घासकडवी
उठवळ मोर्चाचा उद्देश तुम्ही सामान्य असा वा असामान्य तुमच्यावर तुमच्या अभिव्यक्तीबद्दल हल्ला होऊ नये यासाठीच आहे. जगा आणि जगू द्या.
जर तुम्हाला मिपावरच्या प्रतिसादांपेक्षा खऱ्या माणसांच्या प्रेमाचीच पडलेली असेल तर तुमच्या प्रायॉरिटीज थोड्या और आहेत असंच म्हणावं लागेल. टू इच इट्स ओन.
'नवऱ्याला मिपावर मिळालेल्या अपमानास्पद प्रतिसादांकडे दुर्लक्ष करूनही जी त्याच्या कुशीत शिरते, तीच खरी त्याची वहिदा.'
(वाहिदा या आयडीशी संबंध नाही... हे वपुंचं एक अजरामर वाक्य आहे)
कार्टून लय भारी.
(प्रतिसादात पुरेसे क्लिशे झाले का?)
26 Aug 2011 - 11:37 am | शुचि
होय बाई-बायको-कॅलेंडर या अप्रतिम पुस्तकातील कथेमधील हे वाक्य आहे. :)
26 Aug 2011 - 11:44 am | चेतन सुभाष गुगळे
<< 'नवऱ्याला मिपावर मिळालेल्या अपमानास्पद प्रतिसादांकडे दुर्लक्ष करूनही जी त्याच्या कुशीत शिरते, तीच खरी त्याची वहिदा.' (वाहिदा या आयडीशी संबंध नाही... हे वपुंचं एक अजरामर वाक्य आहे)>>
वपुंचं ते पुस्तक तर बरंच जुनं आहे. मिपा हे संकेतस्थळ तेव्हाही अस्तित्वात होतं. कमाल आहे, मला ठाऊक च नव्हतं.
26 Aug 2011 - 11:48 am | शुचि
नवर्याच्या पिवळ्या बनियनची पर्वा न करता ... त्याच्या कुशीत शिरणारी ,,,,,,,,, का काहीतरी वाक्य आहे
26 Aug 2011 - 11:58 am | मिसळलेला काव्यप्रेमी
पिवळे बनियन घालणार्या माणसाला नवरा म्हणून निवडणे हाच मुळात उठवळपणा आहे. :D
अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. इतरांच्या मताचा आदर, अभिव्यक्तिस्वातंत्र, ई. ई.
26 Aug 2011 - 12:01 pm | गवि
बनियन घालायचाच कशाला.
..निदान घरात असताना.. कुशीत शिरण्याच्या वेळी इ इ..
26 Aug 2011 - 12:07 pm | स्पा
बनियन घालायचाच कशाला.
..निदान घरात असताना.. कुशीत शिरण्याच्या वेळी इ इ..
अग्ग्ग्गग्ग्ग्ग
__/\__
:D
11 Nov 2011 - 1:42 am | आनंदी गोपाळ
बायकोने नीट धुतल्यानंतर नीळ लावली तर पिवळा पडत नाही असा अनुभव आहे. इथे नीळ लावायचा कंटाळा दिसतोय. मग पिवळ्याकडे दुर्लक्ष करणे तिला भाग आहे
26 Aug 2011 - 12:10 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
:D :D
26 Aug 2011 - 3:42 pm | सूड
:D
26 Aug 2011 - 4:13 pm | अर्धवट
शुचितै..
एक सुधारणा, हे वाक्य कॅलेंडर ह्या कथेतील नसून, "वहिदा रेहमान" ह्या कथेतील आहे
बाकी चालूद्या, ;)
26 Aug 2011 - 5:54 pm | sagarparadkar
हे वाक्य "मीच तुमची वहिदा" ह्या वपुकथेतील आहे
26 Aug 2011 - 12:24 pm | विनीत संखे
मिपा सोडाच पण संपूर्ण मास मिडिया हे अभिव्यक्तीवरील टिकेहल्ल्यांनी कोळलेलं आहे. वृत्तपत्रांनी कसाबवर तेवढी टिका केलेली नाही जेवढी अण्णांवर केलीय. म्हणून काय अण्णा मिडियाविरुद्ध आंदोलन करत नाहीत.
अण्णांचं सोडा (अगदीच क्लिशे झालाय तो विषय आजकल) पण खुद्द पुलंना रात्री नाट्यसमीक्षक डास होऊन चावतायत असं स्वप्न पडलं होतं म्हणून काही त्यांनी समीक्षकांच्या तोंडांची तुंबलेली गटारं साफ करण्यात आपलं आयुष्य नाही घालवलं.
तुमचं साहित्य हे केर असेल तर आपसूकच कालौघात त्याचं विघटन होतं आणि जर ते कालातीत असेल तर त्याला 'कल्ट' चा दर्जा मिळतोच.
मिपाही त्याला अपवाद नाही.
26 Aug 2011 - 10:59 am | विनायक प्रभू
धन्य जाहलो.
महान घासु गुर्जी कडुन महान लेखात फक्त माझाच नामोल्लेख.
@चे.सु.गु.
तुमचा एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय हो?
26 Aug 2011 - 11:05 am | चेतन सुभाष गुगळे
@ वि. प्र.
तुम्ही प्रतिसाद नीट न वाचताच अस्थानी प्रतिक्रिया देता काय? माझा काही प्रॉब्लेम आहे असं मत मी कुठेच मांडलेलं नाहीय. धागाकर्त्याच्या काही प्रश्नांची उत्तरं होकारार्थी आहे असा माझा अनुभव मांडलाय फक्त त्याबाबत त्यांनी सूचविलेला उपाय मला अवलंबायचा नाहीय एवढंच माझं मत मी मांडलंय.
हा काही माझा प्रॉब्लेम नाहीय. उलट असले अनुभव मी एन्जॉय करतोय असं म्हंटलंय. एन्जॉय करणं प्रॉब्लेम असू शकतं का? अर्थात मी एन्जॉय करतो हा तुमचा प्रॉब्लेम असल्यास त्याविषयी एक्झॅक्टली तुम्हाला च जास्त ठाऊक असणार.
26 Aug 2011 - 11:12 am | विनायक प्रभू
एक खुलासा: प्रॉब्लेम ही प्रतिक्रिया ही आपल्या आतापर्यंतच्या प्रवासावर आहे.(सर्वसमावेशक)
मला वाटला. नाही पटत द्या सोडुन.
एन्जॉय करता आहात तर काहीच प्रॉब्लेम नाही.
एन्जॉय करण्याकरता धरलेला रस्ता तुम्हाला योग्य वाटत असेल तर...
लगे रहो.
26 Aug 2011 - 11:33 am | चेतन सुभाष गुगळे
<< एक खुलासा: प्रॉब्लेम ही प्रतिक्रिया ही आपल्या आतापर्यंतच्या प्रवासावर आहे.(सर्वसमावेशक) >>
तुम्हाला या संकेतस्थळावरील वाटचाली विषयी म्हणायचं आहे का? की माझ्या एकंदर आयुष्याबद्दल बोलताय?
जरा अजून खुलासा करावा.
तुमचा या संकेतस्थळावरचा प्रॉब्लेम तर तुम्ही न सांगताही माझ्या लक्षात आला. तुम्हाला प्रतिसादाला जिथल्या तिथे प्रतिक्रिया देताच येत नाही. तुम्ही जी प्रतिक्रिया देता ती त्यामुळे धाग्यावरचा नवा प्रतिसाद ठरतो. हे कसे करायचे ते कुणाकडून तरी नीट समजून घ्या. अर्थात हा तुम्हाला प्रॉब्लेम वाटत नसेल तर सोडून द्या.
26 Aug 2011 - 11:22 am | इरसाल
बाब्या, बाबी आणि बॉबी
बाकीचा प्रतिसाद नंतर.
26 Aug 2011 - 11:26 am | विनीत संखे
?
26 Aug 2011 - 11:47 am | ५० फक्त
उठवळ मोर्चा चं उठुन वळवळ मोर्चात रुपांतर होउ नये म्हणजे मिळवलं.
26 Aug 2011 - 11:50 am | Nile
आता उरल्यासुरल्या आयुष्यात* अजून काय काय पहावं लागणार आहे कोणास ठावूक! ;-)
*अधिक माहीती करता.. अभ्यास वाढवा म्हणजे आपोआप कळेल.
26 Aug 2011 - 12:00 pm | शुचि
>> मिपावरती वेगवेगळ्या भूमिका घेणाऱ्यांचंदेखील हेच होतं. आपलं स्वत्व, आपली आयडेंटिंटी आपल्या शब्दांतून उघडी केल्यावर तोकड्या कपड्यांतून दिसणाऱ्या अंगाकडे जशा आंबटशौकीन, वाईट नजरा वळतात तशाच इथेही वळतात. मग वैचारिक बलात्कार होतात. >>
:(
सुंदर विश्लेषण!!!
26 Aug 2011 - 12:05 pm | नितिन थत्ते
मोर्चा फारच गंमतीदार असेल.
म्हणजे मोर्चातल्या अनेक व्यक्ती एकमेकाविरुद्ध मोर्चात आलेल्या असण्याची शक्यता आहे.
26 Aug 2011 - 12:16 pm | चेतन सुभाष गुगळे
म्हणूनच अशा मोर्चाचा काही उपयोग नाही म्हणतो मी.
26 Aug 2011 - 7:31 pm | राजेश घासकडवी
त्याला काहीच हरकत नाही. पॉलिटिक्स मेक्स स्ट्रेंज मोर्चाफेलोज असं कायसं कोणीतरी म्हटलेलं आहेच.
किंबहुना एकमेकांचा उद्धार करणारे खांद्याला खांदा लावून मोर्चात उभे राहिले तर सगळेच समदुःखी आहेत ही जाणीव होईलच ना. तेच महत्त्वाचं.
26 Aug 2011 - 7:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
होय तर! अण्णांमुळे नाही का सगळे राजकीय पक्ष एकत्र येत आहेत!!
26 Aug 2011 - 12:10 pm | परिकथेतील राजकुमार
26 Aug 2011 - 8:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
या लाह्या खाणर्यांमुळे काही वैचारिक प्रगती होत नाही, मी त्यांचा निषेध करते.
26 Aug 2011 - 8:58 pm | ढब्बू पैसा
काहीही भरीव न लिहिता, नुसता सौंदर्यफुफाटा न्याहळत लाह्या खाणार्या पर्याचा जळळीत निषेध! जागे व्हा! सक्रीय व्हा!
(संतप्त मोर्चेकरी) ढब्बू
27 Aug 2011 - 11:14 am | परिकथेतील राजकुमार
तुमची झाली आहे तेवढी प्रगती पुरी आहे की देशासाठी ;)
म्हणजे नक्की काय करा ?
परदेशात बसून देशात उगा राळ उडवणार्या अदिती व ढब्बीचा तिव्र निषेध !!
27 Aug 2011 - 5:17 pm | राजेश घासकडवी
परा, अदिती, व ढब्बू पैसा यांना:
लोकहो, निव्वळ निषेध हा नकारात्मक आहे. त्याला सकारात्मक डूब हवी. म्हणजे उदाहरणार्थ
'मी हिरवा माजवाली/ला आहे. तसं असणं हा माझ्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. त्याबद्दल टीका करणं म्हणजे माझ्या अस्मितेचीच गळचेपी करणं आहे. त्याचा मी निषेध करते/तो'
किंवा
'मी सौंदर्यफुफाटा निरखून पहाणारा/री आहे. तसं असणं हा माझ्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. त्याबद्दल टीका करणं म्हणजे माझ्या अस्मितेचीच गळचेपी करणं आहे. त्याचा मी निषेध करतो/ते'
उठवळ मोर्चा हा एकमेकांचा निषेध करण्यासाठी नाही. मिळून मिसळून आपल्या समान शत्रूला विरोध करण्यासाठी आहे.
26 Aug 2011 - 12:50 pm | वात्रट
पण प्रश्न असा अही कि ज्यान्च्या विरोधात मोर्चा काढायचा तेच मोर्चात पुढे उभे राहतील..
त्याच काय करणार ते सांगा आधी.
26 Aug 2011 - 1:56 pm | चिरोटा
भडकाउ लिखाण करुन शांत, सोज्वळ मिपाकरांना चेतवू पाहणार्या राजेश ह्यांना संपादक मंड्ळाने अटक करावी अशी विनंती करतो.
चिरोटा मोर्चाअडवी
26 Aug 2011 - 2:02 pm | परिकथेतील राजकुमार
अगदी अगदी.
परदेशात बसून देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करणार्या घासुंची तुलना फक्त दाऊद बरोबरच होउ शकते.
आम्हाला सत्ता दिल्यास त्यांना मुसक्या बांधून इकडे आणतो का नाही बघाच.
परानाथ मुंढे
26 Aug 2011 - 2:16 pm | शाहिर
उठ्वळ आय डी नी बहुधा बहिष्कार घातला आहे
26 Aug 2011 - 2:17 pm | प्रियाली
यात भाग घ्यायचा झाला तर मला माझ्या दोन ड्युप्लिकेट आयडी ३_१४ विक्षिप्त अदिती आणि राजेश घासकडवी सोडून मिपावरल्या प्रत्येक आयडीविरुद्ध मोर्चा काढावा लागेल. ;)
पहिला मोर्चा मिपावरील वयस्क कार्यकर्त्यांविरुद्ध काढावा असे म्हणते. ;)
26 Aug 2011 - 2:20 pm | विनायक प्रभू
वय हे मिपावरले का खरे खुरे.
बाकी तुम्ही मोर्चा॑ काढल्यावर कशी फड्फड होते ते बघत आहे.
आणि एन्जॉय पण करत आहे.
26 Aug 2011 - 2:24 pm | प्रियाली
ती फडफड आणि गळकं नाक, रडके डोळे तुम्ही एन्जॉय करताय मास्तर! आदर वाढला. ;)
अहो मी वयस्क कार्यकर्ते यांच्याविषयी बोलत होते.
26 Aug 2011 - 2:28 pm | ऋषिकेश
तुम्ही केवळ जुने आहात, तुमचा कंपू आहे म्हणून नवी मंडळी तुमचा छळ मांडतात का?
तुम्ही दारू पित नाही म्हणून दारू पिणारे तुम्हाला तुच्छ लेखतात का?
तुम्ही मांसाहारी आहात म्हणून शाकाहारी तुम्हाला हिणवतात?
तुम्ही अश्रद्ध आहात म्हणून ईश्वरवादी तुमच्या विरोधात धागे काढतात?
तुम्ही सदस्य आहात म्हणून काही संपादक तुमच्याविरोधात प्रतिसाद उडवणे, समजुतीआडच्या धमकीचे खरडी/व्यनी टाकणे वगैरे हत्यार उपसतात का?
तुम्ही अनिवासी भारतीय आहात म्हणून तुम्हाला भारतात घडणार्या प्रत्येक वाईट गोष्टीबद्दल दोष दिला जातो आहे?
तुम्ही निवासी भारतीय आहात तेव्हा तुम्हाला कोणत्याही घटनांवर बोलण्याचाच अधिकार नाही असं म्हटलं जातं का?
तुम्ही भारतीय संस्कृतीचे पाईक नाही आहात केवळ म्हणून काही स्त्री-नामधारक-आयडी तुम्हाला "मोठे व्हा", "इनो घ्या" असले अवमानकारक सल्ले देतात का?
तुम्ही भारतीय संस्कृतीचे पाईक आहात केवळ म्हणून काही पुरुष-नामधारक-आयडी तुम्हाला "मोठे व्हा", "इनो घ्या" असले अवमानकारक सल्ले देतात का?
तुम्ही भारतीय संस्कृतीचे पाईक आहात तरीहि काही स्त्री-नामधारक-आयडी तुम्हाला "मोठे व्हा", "इनो घ्या" असले अवमानकारक सल्ले देत नाहित का?
व्यनीमनीच्या गोष्टी करून कवी तुमच्या मागे आमच्याही कवितांचं विडंबन करा असे मागे लागतात का?
तुम्ही लोकप्रिय नाही म्हणून निव्वळ तुमच्या प्रतिसादांचं विडंबन होतं का?
26 Aug 2011 - 2:32 pm | विनायक प्रभू
खरे म्हटले तर वाईट वाट्ते अशी फड्फड बघुन.
पण काय करणार?
असतात एकेकाचे प्रॉब्लेम.
आता आणखी एक अनावृत्त पत्र लिहीण्याची काही एक इच्छा नाही.
एन्जॉय हा शब्द नो जॉय अर्थाने.
@ आदरः काय सांगताय?
26 Aug 2011 - 2:54 pm | डॉ.श्रीराम दिवटे
चर्चा फक्त रंगलीच नाहीये तर चांगलीच बाळसे धरू लागली आहे. चालू द्या. उठवळ मोर्चाचे आम्ही शुटींग करू...!
26 Aug 2011 - 3:07 pm | विजुभाऊ
व्वा बरे झाले.......... मला एक नवीन पुस्तकाचे नाव सापडले.
फडफड्,गळकं नाक आणि रडके डोळे.......
लय भारी...............
26 Aug 2011 - 3:16 pm | मुक्तसुनीत
उठवळ मोर्च्याची कल्पना आवडली. त्यातल्या "स्वतःच्या मनातले विचार बोलून दाखवावेत" या संदर्भापुरता प्रतिसाद देतो.
आयडी गुम जायेगा
साईट भी ब्लॉक् हो जाएगा
मेरी पोस्टींग्ज़ही पहचान है
... गर याद रहे.
हेच खरं. नाही का ? करंदीकर म्हणाले होते "तो चंद्र छाटो काहिही अन सूर्य काहीही भको; मातीच पायाखालती, नाते तिचे विसरू नको." . तद्वत् , कुणी विचारजंत म्हणो, नाहीतर पाणीपुरीवाला म्हणो , किंवा वैयक्तिक हल्ले चढवो , हीन अभिरुचीच्या कमेंट्स करो. जे योग्य वाटेल ते - व्यासपीठावरील सुसंस्कृतपणाच्या नीतीला धरून - बोलत रहावे. मोर्चात सामील व्हायला मिळालं तरी हरकत नाही. न मिळालं तरी तक्रार नाही.
26 Aug 2011 - 8:09 pm | राजेश घासकडवी
अगदी खरं. दुसऱ्या एका कवीने म्हटलेलंच आहे
इक दिन बिक जायेगा माती के मोल
जग मे रह जायेंगे प्यारे तेरे बोल
असे बोल बोलत असताना, इतर कोणी बोलबच्चन अकारण बोल लावतं. आपलं गाणं आपण गात असताना आरडाओरडा करून रंग मे भंग करून टाकतं. आपलं गाणं बंद करण्याऐवजी, असं करणाऱ्या सर्वांविरुद्ध आवाज उठवा असं या मोर्चाचं आवाहन आहे.
26 Aug 2011 - 3:17 pm | साती
लेख आवडला.
मोर्च्याच्या प्रतिक्षेत.
घासु गुर्जींना बाहेरून पाठिंबा देण्यासाठी आम्ही शांत आयडी मेणबत्ती मोर्चा काढतो.
९१४२०४२०४२० नंबरवर एक मिस कॉल दुया आणि घासुंना पाठिंबा द्या.
isupportghasu@slut.mipa.com
वर लॉग इन व्हा आणि घासुसप्तकाला (प्रियालीच्या लिष्टीतलं आयड्यांचं सप्तक) पाठिंबा द्या.
26 Aug 2011 - 3:20 pm | प्रियाली
साते साते लिहायला लाग परत पहिल्यासारखी मग प्रियालीला आपलं अष्टप्रधान मंडळच बनवून टाकू. ;) किंवा नायल्याला धरून मिपादरबारातील नवरत्ने करून टाकू.
26 Aug 2011 - 3:55 pm | मी_ओंकार
हेच म्हणतो.
सातीचे तात्याबांची आरती हेच शेवटचे लिखाण आठवतयं.
- ओंकार.
27 Aug 2011 - 8:40 pm | बिपिन कार्यकर्ते
साती परत सक्रिय होण्याची वाट बघत आहे!
26 Aug 2011 - 3:27 pm | साती
हो हो !
करतेच प्रयत्न हळूहळू.
26 Aug 2011 - 3:39 pm | श्रावण मोडक
कमाल आहे, मला ठाऊकच नव्हतं.
;) म्हणून मी इथं जास्त फडफड केली नाही. माहिती नसताना मी उगाच कुठंही फडफड करत नसतोच. तर ते असो, हा प्रकार मला कसा माहिती नव्हता? ;)
26 Aug 2011 - 3:42 pm | प्रियाली
तुम्ही प्रियाली हा आयडी वापरता का? मिपावरचा दहातोंडी रावणच बनवा आता प्रियालीला.
(सध्या प्रियाली) राजेश.
26 Aug 2011 - 4:28 pm | श्रावण मोडक
या की. इथं मुक्तद्वार आहे.
तुमच्या प्रश्नावर मात्र मौन.
26 Aug 2011 - 4:16 pm | आत्मशून्य
:)
असो, बाकी लेख मनापासून आवडला. मस्त पिसं काढलीत स्लट्वॉक संकल्पनेची.
26 Aug 2011 - 3:54 pm | विशाखा राऊत
चांगले आहे.. आजकाल मिपाला काहीही लिहिले की शतकी धागे होत आहेत..
लगे रहो :)
26 Aug 2011 - 3:57 pm | अत्रुप्त आत्मा
धागा...धागा...अखंड विणू या
मिसळपाव मिसळपाव मुखे म्हणू या... ;-)
''मिसळ पाव विणकर महा मंडळ''
संस्थापक-
अध्यक्ष-
सचिव-
इ.इ. पदे 'भरायची' आहेत इच्छुकांनी लाइन मारावी....सॉरी सॉरी... आपलं ते,हे--लावावी....अर्ज रात्री ११ ते १ या वेळेत स्वीकारण्यात येतील... :-)
26 Aug 2011 - 4:40 pm | विजुभाऊ
वायफळाचा मळा कसा फुलवायचा हे घासु गुर्जींकडून शिकून घ्यावे.
( विंदांच्या "घेता" कवितेत दोन ओळी अॅड करा.
हिरव्या पिवळ्या घासू कडून
हिरवा पिवळा धागा घ्यावा
३.१४आदिती कडून
विक्षीतपणाचा सहकार घ्यावा
घेता घेता एक दिवस
मिपावर हाहाकार करावा
अवांतर : निळे या सदस्याने या धाग्यावर एकही प्रतिसाद लिहीलेला नसताना त्यांचे कुठेही नाव नसताना नवरत्न मंडळात त्यांचे नॉमिनेशन यावे यात कार्टेलिंग दिसून येत आहे.
26 Aug 2011 - 5:58 pm | रेवती
आजच्या रसभरीत खादाडी बरोबर येणारे रसरशीत युवतींचे फोटो देखील थांबले.
या वाक्यानंतर "अरेरे!" असं (न लिहिलेलं) ऐकू आलं.
26 Aug 2011 - 6:00 pm | चेतन सुभाष गुगळे
जर तुम्ही तुमचं खरं नाव आणि आडनाव युजर आयडी म्हणून वापरत असाल तर तुमच्या आडनावाच्या शब्दांचे अपभ्रंश / विडंबन केले जाते.
हा अनुभव मला आलाय.
मला वाटते हा अनुभव तुम्हाला देखील आलाय. काही सदस्यांकडून तुमचा घासू गुरूजी असा उल्लेख केला गेलाय.
अर्थात तरीही स्लट वॉक हा उपाय योग्य वाटत नाही. त्यापेक्षा थोडा वेगळा उपाय सुचवितो. देव आनंदचा एक जुना चित्रपट आहे काला बाजार (यात देव आनंद चे दिग्दर्शन नाही, पण देव आनंदला आपल्या पुढील चित्रपटांत दिग्दर्शन करण्याची प्रेरणा बहुधा यातून च मिळाली असणार). यात क्लायमॅक्सला देव आनंद आणि मदन पुरीचा वाद दाखविलाय. देव आनंद त्याला म्हणतो, "मैने पहिले तुमसे लडकर तुम्हे हराया है, आज मै तुमसे कोई लडाई नही लडना चाहत।" तरीही चेकाळून मदन पुरी त्याच्यावर हल्ला करतोच. देव आनंद काहीच प्रतिकार करीत नाही. तो इतकेच म्हणतो, "मेरे यह दो हाथ नही उठेंगे, तू जीतना चाहे मारले। मै देखना चाहता हूं की वह बाकी सौ हाथ इनकी मदद के लिए आज उठेंगे या नही?" त्यानंतर देव आनंद ची चूक नाहीय हे ज्या समुदायाला पटत असतं, त्यातले एकूण एक लोक मदन पुरीवर हल्ला करून त्याला निष्प्रभ करून टाकतात.
असं घडू शकतं. नव्हे या संकेतस्थळावरच माझ्या एका धाग्यावर आज घडलंय.
26 Aug 2011 - 6:13 pm | आत्मशून्य
बाकी आजच या धाग्यावर तूम्ही मिपा-कम्यूनीस्टांना त्यांच्या खर्या प्रवृत्तींचे जे उघड दर्शन द्यायला भाग पाडलतं ते बघता तूमच्या सामर्थ्याची कल्पना मिपा-कम्यूनीस्टांना याआधी आलीच नाही असे म्हणावे लागेल. आता वाटत नाही यापूढे कोणताही मिपा-कम्यूनीस्ट तूमच्यावर उघड हल्ला करायला धजावेल. गेल्या दोन दीवसात आपण दोन मोठे कम्यूनीस्ट हीरे टीपले आहेत असं आवर्जून नमूद करतो. मज्या आली.... क्या सॉलीड मारा........ फक्त यापूढील वाटचाल थोडी सावध ठेवा, गाठ मिपा-कम्यूनीस्टांशी आहे हे विसरू नका.
26 Aug 2011 - 6:30 pm | चेतन सुभाष गुगळे
पाठिंबा आणि कौतुकाबद्दल धन्यवाद.
मिसळपाव वरील माझं सदस्यत्व जुनंच आहे. त्यावेळी माझ्या लेखनावर वैयक्तिक हल्ला करणार्या प्रतिक्रिया देऊन काही मंडळींनी मला जेरीस आणलं होतं. त्यानंतर मी बराच काळ या संकेतस्थळावरून दूर होतो. अर्थात इथल्या काही वाचकांना माझे लेखन इथे हवे अशी इच्छा होती, ते मला नियमित संपर्क करून इथे पुन्हा सक्रिय होण्याचा आग्रह करीत होते. त्यानंतर मी इथे पुन्हा सर्व शक्तीनिशी उतरायचं ठरवलं. यावेळी माझी तयारी पुरेशी आहे आणि सावधगिरी ही बाळगित आहे.
तुम्ही व इतर काहींनी उघड पाठिंबा दिला आहेच. याशिवाय वैयक्तिक रीत्या संपर्क साधून पाठिंबा देणार्यांची संख्या देखील लक्षणीय रीत्या वाढली आहे.
26 Aug 2011 - 6:45 pm | आत्मशून्य
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति संस्थळ.........
26 Aug 2011 - 9:44 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>यावेळी माझी तयारी पुरेशी आहे आणि सावधगिरी ही बाळगित आहे.
तयारी दिसते आहे पण सावधगिरी अजून थोडी बाळगली असती तर बरे झाले असते :-)
26 Aug 2011 - 10:49 pm | आत्मशून्य
विश्वनाथ, अहो ज्याच्या मिपा प्रोफाइलवर सदस्यंता कालावधी 2 वर्षे 49 आठवडे असं दिसत आहे अशा जून्या जाणत्या व जेष्ठ मिपाकरावर असा आरोप जरा अनावश्यकच वाटतो.
27 Aug 2011 - 9:28 pm | विश्वनाथ मेहेंदळे
मी नक्की कुठला आरोप केला असे तुम्हाला वाटते ते एकदा स्पष्ट केलेत तर बरे होईल.
त्यांचा बिल्ला नंबर जुना आहे हे मला माहित आहे. पण निष्णात सेनानी एकाच वेळी एकापेक्षा जास्त आघाड्या उघडताना जितकी सावधगिरी बाळगतो तितकी मला दिसली नाही असे म्हटले :-) सध्यातरी बऱ्याच आघाड्या त्यांनी सांभाळल्या आहेत. बघू पुढे काय होते ते. :-)
28 Aug 2011 - 4:03 pm | चेतन सुभाष गुगळे
<< तयारी दिसते आहे पण सावधगिरी अजून थोडी बाळगली असती तर बरे झाले असते >>
चला तुम्हाला तयारी दिसते आहे, तेव्हा त्याविषयी काहीच मत व्यक्त करीत नाही. राहिता राहिला प्रश्न सावधगिरीचा तर तुम्ही मला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिलात त्यावरून दोन गोष्टी सिद्ध होतात.
१. तुम्ही माझे हितचिंतक आहात कारण शत्रू कधीच असा सल्ला देणार नाहीत उलट ते बेसावध ठेवण्याचाच प्रयत्न करतील.
२. कोणी संकटात दिसला तर त्याचे हितचिंतक पुढे येतात. या निमित्ताने तसे ते पुढे आलेत.
सबब, प्रत्यक्षात पूर्णत: सावध असतानाही मी तुम्हाला बेसावध वाटलो, तुम्हाला तसे वाटणे आणि तुम्ही चिंता व्यक्त करणारे मत मांडणे, त्यामुळे मला जाणवणार्या या जालावरील माझ्या हिंतचिंतकांमध्ये अजून एकाची भर पडणे - हा सगळा माझ्या सावधगिरीचाच भाग होता.
<< निष्णात सेनानी एकाच वेळी एकापेक्षा जास्त आघाड्या उघडताना जितकी सावधगिरी बाळगतो तितकी मला दिसली नाही असे म्हटले सध्यातरी बऱ्याच आघाड्या त्यांनी सांभाळल्या आहेत. >>
हे घडणे ही स्वाभाविकच आहे. शिवाजी महाराजांच्या मुठभर सैन्याला प्रचंड मुघल सैन्यापुढे लढण्याची पाळी येई तेव्हा एकेका मावळ्याला दहा - वीस जणांना सामोरे जावे लागतच असे.
तुमच्या सारख्या एका हिंतचिंतकाच्या एका प्रोत्साहनपर प्रतिसादामुळे देखील हुरूप वाढून अजून दहापट आघाड्यांवर लढण्याची ऊर्जा मिळते.
धन्यवाद.
28 Aug 2011 - 4:07 pm | चेतन सुभाष गुगळे
आत्मशून्य जी
त्यांच्या सल्ल्यावरून तुमच्याप्रमाणेच तेही हिंतचिंतक असल्याचे मला जाणवत आहे. त्यांनी कुठलाही आरोप केला नसून काळजीपोटी सल्ला दिला आहे असेच मला वाटते. तरी त्यांची काळजी दूर करणारा प्रतिसाद त्यांना दिला आहेच.
तुम्ही माझ्या बाजूने सक्रियपणे खिंड लवढत असल्याबद्दल तुमचे देखील आभार.
26 Aug 2011 - 6:32 pm | सन्जोप राव
स्लट या झणझणीत शब्दाला उठवळ हा मिळमिळीत प्रतिशब्द वापरल्याबद्दल घासकडवींचा निषेध!
26 Aug 2011 - 6:49 pm | चित्रा
>>आपल्या अभिव्यक्तीचे हवे तितके हवे तसे कपडे करून आपलं खरं व्यक्तिमत्व उघडं करा.
हे वाक्य वाचून हसू आवरेना. सॉरी.
स्लटवॉक वगैरेची गरज नाही.
आमचे खरे व्यक्तिमत्व पहायचे असले तर हे पहा.
(चित्र विकीपिडियावरून साभार).
26 Aug 2011 - 6:51 pm | सूड
छान आहे हं मांजर !!
26 Aug 2011 - 7:01 pm | चित्रा
कोण बोलले रे ते?
http://fohn.net/lion-pictures-facts/african-lioness.jpg
26 Aug 2011 - 6:51 pm | प्रकाश घाटपांडे
आम्हाला उठवळ मोर्चा हे भाषांतर अश्लील वाटते. तरी बर आम्ही आता नीतीमत्तेच्या गोष्टी करत नाही. व्यनीमनीच्या गोष्टी देखील करीत नाही. असो सद्या आम्हाला लोकांचे सदिच्छातरंग हवे आहेत.
26 Aug 2011 - 7:35 pm | धनंजय
'मी अमुकअमुक आहे व मला त्याचा अभिमान आहे'
26 Aug 2011 - 7:44 pm | मुक्तसुनीत
मिपा अनॉनिमस का हो ?
26 Aug 2011 - 8:12 pm | राजेश घासकडवी
हा धागा सीरियसली घेऊन प्रत्यक्ष मोर्चात सामील होणारे तुम्ही पहिले म्हणून तुमचं अभिनंदन करतो. तुम्हाला जर तमुकतमुक मनोवृत्तीचे लोक त्रास देत असतील तर त्यांचा निषेधही जाहीर करावा ही विनंती.
26 Aug 2011 - 8:16 pm | धनंजय
तमुकढमुक मनोवृत्तीचे लोक मला सारखे छळत असतात. त्याचा मी जाहीर निषेध करतो.
:-|