हवेतल्या गोष्टी - १

अर्धवट's picture
अर्धवट in जनातलं, मनातलं
16 Aug 2011 - 9:02 am

सकाळी सकाळी मस्त पांघरुणात गुरफटून झोपावं, उन्हं वर येईपर्यंत. बायकोनं मस्त चहाचा कप हातात आणून द्यावा.. पण हे काही घडत नाही. साला नोकरीच अशी आहे की घरी येऊन बॅग टेकतो न टेकतो तोच पुढचं तिकीट मेलबॉक्स मधे येऊन पडतं. खूप जीवावर येतं आपल्या माणसांना सोडून पुन्हा घराबाहेर पडायचं.

पायाला काय भिंगरी लागलीये कळत नाही. दर दोन दिवसांनी एक फ्लाईट पकडायची आणि सारखं पळत रहायचं, दमायला परवानगीच नाही. थांबता येणार नाही असं नाही, कारण माझा कुणीच पाठलाग वगैरे करत नाहीये. मीच कशाचातरी पाठलाग करतोय. कसला कुणास ठाऊक.

सहज म्हणून मोजलं तर मी गेली ६-७ वर्षं सतत प्रवास करतोय, महिन्यातून १५ ते २५ दिवस. सतत आणि अखंड भटकंती. आजवर अनेक रात्री एअरपोर्टवर आणि लाउंजमधे काढल्यात. कधी फ्लाईट लेट आहे म्हणून, कधी रद्द झाली म्हणून. कधी कनेक्टींग फ्लाईट लगेच नाहीये म्हणून. आता प्रत्येक विमानतळावरचा लाउंज हेच घर वाटायला लागलंय. पुणे, दिल्ली, बंगलोर, हैद्राबाद आणि कोलकोता ह्या विमानतळावरचा कोपरान् कोपरा पाठ झालाय. एवढंच कशाला, विमानकंपन्यांचं वेळापत्रक, कुठल्या विमानात कुठला सीटनंबर इमर्जन्सी विंडोशेजारी येतो. कुठच्या एअरलाईनचं बोर्डिंग गेट कुठलं, असला बारीकसारीक तपशीलही तोंडपाठ झालाय.

ह्या कटकटीच्या कार्यक्रमात एकमेव आसरा म्हणजे हातात एखादं जाडसं पुस्तक, आणि लाउंजमधली आरामखुर्ची. त्यातही कवितासंग्रह असेल तर क्या केहने... पुस्तक नसेल तर आयपॉडवर कुमारजी किंवा अभिषेकीबुवा. काय तंद्री लागते म्हणून सांगू.

पण कधी कधी याचाही कंटाळा येतो. मग इअरफोन नुसता कानात अडकवून ठेवायचा, आणि आजूबाजूची गम्मत पहात बसायचं. कानात इअरफोन लावून, शून्यात डोळे लावल्याचा अभिनय करत, आजूबाजूचं संभाषण ऐकायची, निरीक्षण करण्याची कला अवगत करावी लागते. तुम्ही लक्ष देताय असं वाटलं लगेच मंडळी कॉन्शस होतात.

सहज नजर फिरवली तरी असंख्य नमुने बघायला मिळतात. काळाकरडा कोट घालून इंग्रजी वृत्तपत्र वाचत बसलेले आखडू लोकं. सराईत नजरेला यांच्यातले नवखे कोण आणि मुरलेले कोण हे झटक्यात ओळखू येतं. सफारी घातलेले हातात चॉकलेटी ब्रीफकेस घेतलेले म्हातारे, इन्फोसिस, विप्रो इत्यादी कंपन्यांच्या सॅक पाठीवर टाकून ब्लॅकबेरी शी चाळा करत, हळूच इकडेतिकडे बघणारे तरुण. सोळा ते तीस वर्षे वयोगटातल्या, तंग आणि अपुरे कपडे घालून नाक फेंदारत चालणाऱ्या ललना. वय वर्षे दोन ते आठ मधली विमानातळ डोक्यावर घेणारी बच्चेकंपनी, पांढरे कपडे घातलेले आणि प्रंचंड घाईत असल्याचं दाखवणारे पुढारी, कडेवरचं मुल सांभाळत भांबावलेल्या चेहेर्‍यानं इकडेतिकडे पाहणाऱ्या लेकुरवाळ्या बायाबापे, ह्या लोकांना आपापल्यापरीने मदत करणारा लालनिळ्या कपड्यातला ग्राउंड स्टाफ, ह्या सगळ्या धांदलीकडे अत्यंत तुच्छतेने पहाणाऱ्या हवाईसुंदऱ्या, क्वचित कडक इस्त्रीचे कपडे घातलेले आपल्याच गप्पात गुंगलेले पायलट लोक. पाहावं तितकं कमीच.

सुरवातीच्या दिवसांमध्ये, ह्या हवाईसुंदऱ्या, त्यांची टापटीप, तंग कपडे, सतत सावरला जाणारा मेकप, आपल्याच तोऱ्यात चालण्याची ऐट हे पाहून एकतर असूया तरी वाटत असे किंवा राग तरी येत असे. पूर्वी मित्रांच्या बरोबर चेष्टामस्करी करताना माझा रोजचा विमानप्रवास आणि हवाईसुंदऱ्या यावरून काही कॉमेंट्सही होत असत.. पण जितकं त्यांचं काम जवळून पहात गेलो, तितका आदर वाढत गेला, आता कधीच असा वावगा उल्लेख होत नाही. उलट कधी नामोल्लेख झालाच तर आदरानेच होतो. सी.आय.एस.एफ. अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे जवान आणि अधिकारी, हे या खेळातले असेच दुर्लक्षीलेले शिलेदार.

आता इतक्या दिवसाच्या सान्निध्यानंतर हवाई सुंदऱ्या, एअरलाईन स्टाफ, सीआयएसएफ चे जवान यांच्याशी एक नातं नकळतच तयार झालंय. बरेच जण ओळखीचेही झालेत.

एवढ्या वर्षांच्या प्रवासात, एअरपोर्टवर, विमानात, लाउंजमधे, सिक्युरिटीचेकमधे, आतापर्यंत अनेक किस्से घडलेत. अनेक माणसं मनात घर करून बसलीयेत. अनेक चित्रविचित्र प्रसंग आहेत. सहप्रवाशांच्या कानगोष्टी आहेत.

अशा खूप हवेतल्या गोष्टी मनात आहेत. त्या आठवतील तशा आणि वेळ मिळेल तशा सांगणार आहेच..

सध्या इतकंच..

संस्कृतीमुक्तकविनोदसमाजजीवनमानराहणीप्रवासदेशांतरअभिनंदन

प्रतिक्रिया

प्रीत-मोहर's picture

16 Aug 2011 - 9:59 am | प्रीत-मोहर

वाचतिये. आनेदो औरभी
पुलेशु

हवाईसुंद-यांचे फोटु टाकता आले तर बघा.. बाकी वाचतो आहेच..

शैलेन्द्र's picture

16 Aug 2011 - 10:13 am | शैलेन्द्र

मस्त.. या विषयावर खरच खुप बोलण्यासारख, लिहिन्यासारख आहे.. तुम दुध डालो.. हम पाणी डालेंगे..

योगी९००'s picture

16 Aug 2011 - 10:19 am | योगी९००

वाचतोय..लवकर तुमचे हवेतले अनुभव टाका..

ह्या कटकटीच्या कार्यक्रमात एकमेव आसरा म्हणजे हातात एखादं जाडसं पुस्तक, आणि लाउंजमधली आरामखुर्ची. त्यातही कवितासंग्रह असेल तर क्या केहने... पुस्तक नसेल तर आयपॉडवर कुमारजी किंवा अभिषेकीबुवा. काय तंद्री लागते म्हणून सांगू.
आयपॅड असताना हातात जाडसर पुस्तकाची काय गरज? आयपॅड वरच पुस्तक टाकत नाही का?

प्रास's picture

16 Aug 2011 - 10:22 am | प्रास

अगदी विरळा विषय!

आम्ही घर-कोंबडे, तेव्हा तुमचा अनुभव वाचायला नक्की आवडेल.

:-)

निमिष ध.'s picture

16 Aug 2011 - 10:35 am | निमिष ध.

आता प्रतीक्षा तुमच्या अनुभवांची .. तुमचे वर्णन वाचत असताना माझे पूर्वीचे रेल्वे आणि एस टी चे प्रवास आठवले. आता ही संयुक्त राज्यातील विमानतळांवर असेच विविध नमुने बघायला मिळतात.

मज्जा वाटेल तुमचे वर्णन वाचायला.

सहज's picture

16 Aug 2011 - 10:45 am | सहज

वाचायला उत्सुक. जास्त वाट पहायला लावू नका.

नगरीनिरंजन's picture

16 Aug 2011 - 12:09 pm | नगरीनिरंजन

वाचायला उत्सुक. जास्त वाट पहायला लावू नका.

बद्दु's picture

16 Aug 2011 - 11:59 am | बद्दु

वातावरणनिर्मिती चांगली केली ..आता पुढले भाग पण असेच येउद्या..जरा लवकर लवकर टाका..अधुन मधुन फोडणिला / तडका म्हणुन हवाई फटाकड्यांचा ( राग मानु नका) फोटु डकवायला हरकत नाही..

गणपा's picture

16 Aug 2011 - 1:04 pm | गणपा

प्रस्तावना झकास रे.
आता येउदेत पुढले किस्से. :)

पुढील लेखनाची वाट पाहिली जाईल याची नोंद घेणेत यावी :)

परिकथेतील राजकुमार's picture

16 Aug 2011 - 4:22 pm | परिकथेतील राजकुमार

हा लेख मात्र वाचायला सुरु केला आणि संपून गेला येवढा कमी वाटला.

जरा भरपूर किस्से टाकुन एक मोठा लेख यु द्या :)

मेघवेडा's picture

16 Aug 2011 - 6:04 pm | मेघवेडा

ऐसाच बोल्ताय.. नमनाला घडाभर तेल न वाहिल्यामुळे खंत वाटायला लावणार्‍या मोजक्याच गोष्टींपैकी एक! ;)

लौकर फुडं लिवा मालक.. :)

समीरसूर's picture

16 Aug 2011 - 5:38 pm | समीरसूर

सुरुवात आणि विषय!

बाकी पुस्तक असेल तर प्रवास सुखकर होतो हे नक्की. पण एअरपोर्टवर माणसांची लगबग बघण्यातही एक मजा आहे हे खरे. विविध रंगांची, भाषांची, देशांची, सस्कृतींची, मातींची माणसे पाहण्यात विलक्षण गंमत आहे. मागे एकदा एका एअरपोर्टवर एक बहुधा स्पॅनिश असलेली तरुणी आपल्या ३-४ वर्षांच्या मुलीला सांभाळत असलेली मी पाहिली. ती मुलगी इतकी मस्ती करत होती की तिच्या आईची तिला जागेवर आणून बसवता-बसवता दमछाक होत होती. दर वेळेस मुलगी पळून गेली की ही आई सगळ्यांकडे बघून एक छानसं स्मित देत लाडाने तिच्या मुलीला हाक मारायची. त्या लहान मुलीचं नाव 'बरानजेलीस' की असंच काहीसं होतं. फार गंमत वाटत होती त्यांच्यातली ती उबदार माया बघतांना....

अर्धवटराव, येऊ द्या अजून. मजा येतेय... :-)

श्रावण मोडक's picture

16 Aug 2011 - 5:41 pm | श्रावण मोडक

शीर्षक वाचून एका जुन्या आंतरजालीय दंगलीची आठवण झाली. थोडा घाबरतच लेख उघडला. वाचला, तर ही केवळ प्रस्तावनाच निघाली. सुटकेचा निःश्वास सोडला, पण तात्पुरताच.
पुढं काय वाढून ठेवलं आहे? पण हरकत नाही. सध्या तशी शांतता आहे. ;)

विसुनाना's picture

16 Aug 2011 - 5:41 pm | विसुनाना

वाचनोत्सुक. पुढचे भाग लवकर यावेत.

रेवती's picture

16 Aug 2011 - 5:59 pm | रेवती

लेखन आवडले.
पु. भा. प्र.

शुचि's picture

16 Aug 2011 - 7:22 pm | शुचि

सुरेख लेखन. उत्सुकता चाळविणारे. पुढे काय? पुढे काय? :)

प्राजु's picture

17 Aug 2011 - 5:48 am | प्राजु

+१

प्रभो's picture

16 Aug 2011 - 7:32 pm | प्रभो

मस्त रे अर्ध्या!!!! लवकर लिही बे पुढचा भाग लाउंज मधे बसल्या बसल्या. ;)

स्मिता.'s picture

16 Aug 2011 - 7:37 pm | स्मिता.

सुरूवात छान झालीये. पुढिल भागही लवकर टाका.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

16 Aug 2011 - 11:01 pm | विश्वनाथ मेहेंदळे

"अप इन द एअर" चित्रपटाची आठवण झाली. येऊ दे अजून.

चतुरंग's picture

16 Aug 2011 - 11:35 pm | चतुरंग

हवेतल्या गोष्टी जालावर येऊंदेत! ;)

-(वाचनोत्सुक)हवाईरंगा

बहुगुणी's picture

17 Aug 2011 - 5:55 am | बहुगुणी

अपेक्षा वाढल्या आहेत, पुढच्या भागात आधिक खंड नको, लवकर येऊ द्या.

चला एकूण नमुने वाचायला मिळणार तर. येउ दे लवकर्!

जातीवंत भटका's picture

18 Aug 2011 - 5:05 pm | जातीवंत भटका

मस्तच

--
जातीवंत भटका...

वातावरण निर्मिती साजेशी !
तुमच्या हवेतल्या गोष्टी मनातच ठेवू नका ! पटापट संगणकावर उतरवा अन आम्हालाही परत एकदा छोटीशी सफर घडवा :-)

बेभान's picture

5 Sep 2011 - 8:32 pm | बेभान

टॉम हँक्स चा 'द टर्मिनल' डोळ्यासमोर उभारला.