ब्राऊ..६
...........
पाप्याने बुलेट उभी केली आणि थेट माझ्याकडे आला. हातातलं ऑम्लेट सँडविच हातातच राहिलं. भूक एकदम नाहीशी झाली.
पाप्याने जवळ येऊन डायरेक्ट माझ्या कॉलरला धरलं आणि काही कळायच्या आत मला एकदम चकचकीत प्रकाश दिसल्यासारखा झाला. त्याचा जोरदार लाफा माझ्या डोळ्याजवळ बसला होता हे जराजरा समजेपर्यंत थड करुन अजून एक आवाज आला आणि दातांतून कळ आली. एकदोन श्वास कसेतरी घेतले तेवढ्यात तोंडात खारट चव आली. रक्त असणार. डोळ्यासमोरही अंधार येतोयसं वाटायला लागलं.
नेमकं काय होतंय हे हळूहळू कळायला लागून माझे पाय लटपटायला लागले. स्वतः पाप्याचा भारी हात मला थोबडवत होता.
लगेचच माझ्या छातीत एक बुक्का बसला आणि मी सटपटून गुढग्यांवर बसलो. एकदम श्वास घेता येईनासा झाला. मला आता आपण एकदम मरतोच की काय असं वाटायला लागलं. जमिनीवरच झोपावंसं वाटत होतं. आडवा झालोच..लगेचच जबरदस्त जड बुटासकट लाथ माझ्या कानाच्या आणि मानेच्या मागे खट असा आवाज करुन बसली.
मला एकदम लुळं पडल्यासारखं वाटलं... पण सरांचे शब्द आठवले. खाली पडलास की सगळे तुझ्यावर चढतील.
आणि मी धडपडत उभा राहिलो.
परांजप्या पाप्याकडे बघून दुरूनच जाऊदे यार..जाऊदे यार करत होता.
..पण मला त्याची पर्वा नव्हती. माझं भान कधी नव्हे इतकं एकवटून आलं. मराठे आठवली. तिच्यासाठी मार खात होतो. ती मला आवडते. तिला कोणी का आवडत असेना. ती मला आवडते. हे परत जोरात उसळून वर आलं. समोर पाप्याचा घामाघूम चेहरा दिसत होता. त्याचे दात किडलेले होते. माझी नजर कधी नाही एवढी स्पष्ट झाली होती. पाप्याच्या जागी जाधवच दिसत होता.
भडवे साले..माझ्या आणि मराठेच्या मधे येतात.. सालं सर्वकाळ यांना घाबरत रहायचं..संपवायला हवा या ढेकणाला..चिरडायला हवा. फुटला पाहिजे जागच्याजागी.. फुट्ट करुन रक्त आलं पायजे बाहेर.
मला अंगात आल्यासारखं व्हायला लागलं. फिट येताना लोक दिसतात तसं थडथडल्यासारखं व्हायला लागलं. मी घाबरलो. पण लगेच लक्षात आलं की मला स्फोट होईल इतका राग आला होता. माझ्या आत्तापर्यंतच्या पांडू आयुष्यात असा राग कधी आलाच नव्हता, कारण आजपावेतो मला कोणी असा हात लावला नव्हता. राग हेच शस्त्र...
याला संपवायचा..माझे दात एकमेकांवर आवळले गेले. इतके घट्ट की जीभ मधे असती तर तुकडा पडला असता..
मागे उभा असलेला रेडकर म्हणाला," आकडी येतेय वाटतं त्याला..पाप्या.. भानगड नको. पळ.."
झपकन डावीकडे वळून मी अँड्र्यूच्या शेगडीकडे बघितलं. त्याचा दांडा लोखंडी होता. बिनलाकडाचा. तरी मी काही कळायच्या आत तो उचलला.. त्याच्याखाली धगधगते कोळसे होते. मला मंतरल्यासारखा भास होत होता.
हात झणझणून भाजला.. त्या चरक्यामुळे आणखी बेभान होत मी दोन पावलं पळत पाप्याकडे वळलो आणि "भडावचोत" असं खच्चून ओरडत सणसणून तापलेला जडशीळ तवा आडवाच्या आडवा पाप्याचा थोबाडावर हाणला. पाप्या उन्मळल्यासारखा खाली पडला. पण लगेच उठला. त्याला चक्कर येत होतीसं वाटलं. त्यामुळे हेलपाडत उभा राहात तो दोन पावलं मागे सरला. त्याच्या चेहर्यावर तव्याचा लालभडक ताजा चरचरीत डाग दिसत होता. पण तो हगण्याएवढा घाबरला आहे असं माझ्या लगेच लक्षात आलं.
त्याने माझ्याकडून अशी काही अपेक्षाच केली नव्हती. माझ्या हातालाही आता तव्याच्या धगीची आच चरचरून लागली. मग मी तव्याची मूठ धरून एका हातातून दुसर्या हातात तवा झुलवत पाप्याकडे बघितलं.
"पिसाळलंय कुत्रं तेच्यायला..चल पाप्या नीघ हितनं.", रेडकर पाप्याला बोलला. त्याचे डोळे पांढरे पडले होते.
"बा झवला..निघतोस काय लेका शेपूट घालून रेड्या.. याला हितल्याहितं गाड.. भिकारचोट माझ्यावर हात उचलतो..? मरणाची आग व्हायलीय तोंडाला..", पाप्या सहन न होऊन अक्षरशः रडत बोलला.
आता मी ठरवलं होतं की कोणत्याही किंमतीवर आणखी मार खायचा नाही.. रेडकर पुढे सरसावला तसा नाईलाज होऊन मी एक पाऊल पुढे होऊन पुन्हा तवा वर केला. माझे झोक जात होते.
तेव्हा ते बघून रेडकर पाप्याला निर्वाणीचं बोलला, "पाप्या. नंतर खलासच करु याला..खरं आत्ता सरबरलंय ते..कायपण करुन बसेल..मरशील फुकटचा..चल गप आता.."
नाईलाज झाल्यासारखं दाखवत पाप्या भरभर बुलेटकडे गेला.. रेडकरनेही गांडीला पाय लावून पळ काढला..
पुढे काय होईल त्याची मला पर्वा नव्हती. आत्ता मी माझ्या वेडामधे करायचं ते करुन बसलो होतो. मी भानावर आलो होतो आणि फक्त ते दोघे जाईपर्यंत अवसान धरुन ठेवत होतो.
ते दोघे गेले आणि धरुन ठेवलेली उत्तेजित अवस्था संपली. मग मात्र मला लागलेला मार अक्षरशः अंगाच्या कणाकणात दुखायला लागला. एकदम भोवळ आली. मी मटकन खाली बसलो. मी मला वाटतोय त्यापेक्षा बराच मार खाल्लाय हे परांजप्याच्या शॉक बसल्यासारख्या चेहर्यावरुन कळलं. परांजप्याने एक रिक्षा थांबवली आणि मला त्यात बसवला. सोबत स्वतःही बसला. ल्यूना तिथेच ठेवून.
रिक्षात बसवून घराचा पत्ता सांगेपर्यंत मला एकदम मळमळायला लागलं. उलटी होईल असं वाटायला लागलं. डोळ्यासमोर पिवळे काळे ढग यायला लागले. मी परांजप्याला म्हटलं," परांजप्या, मला माझं काही खरं वाटत नाहीये.. अंधार होतोय डोळ्यासमोर.." परांजप्या घाबरुन माझ्याकडे बघायला लागला.
मेमरी जाणं वगैरे प्रकार सिनेमात नेहमीच पाहिला होता. इथे मात्र मला सगळं कळत होतं. फक्त जरा धूसर होत चाललं होतं.
परांजप्या म्हणाला, "बाझंव.. कानातून रक्त येतंय केळ्या..दुखतोय काय कान?"
"नाय रे..", मी जाबडल्यागत म्हटलं..पण परांजप्याचा आवाज एकदम खोलातून येत होता.
मग एकदम जोरात झोप आली. मी घाबरुन झोप उडवण्याचा खूप प्रयत्न केला पण काळं काळं होतच गेलं. मी शेवटी काय होतंय कळण्याचा प्रयत्न सोडून डोळे मिटू दिले.
.............
सकाळी सकाळी झोपेतून उठलोय असं वाटत होतं. पण जागा झालो तेव्हा डोळेच उघडेनात. उघडले तरी वेगळीच खोली दिसायची .. वेगळेच पडदे.. आणि बाहेर प्रकाश नाहीच.. सकाळही नसणार म्हणजे...
गपकन परत डोळे मिटून घ्यायचो. परत केव्हा झोप लागायची कळायचंच नाही. स्वप्न पडतंय म्हणून सोडून द्यायचं. परत जागं व्हायचं. असं बराच वेळ चाललं होतं.
एकदा डोळे उघडले. बघितलं तर आई. मग परत मिटून घेतले.
मधेच खूप वेळाने परत जाग आली. बघतो तर बाबा... मग स्वप्न आहे अशीच खात्री झाली. गेलेले बाबा कुठे येणार माझ्यासमोर आता..
पुढच्या वेळी मराठे दिसली तेव्हा मात्र स्वप्न असलं तरी चालेल पण चालू रहायला हवं असं ठरवलं. मी खूप ताकद लावून हसण्याचा प्रयत्न केला. शेवटी माझा चेहरा हसला असावा.
आणि तीही हसली.
माझे डोळे भरले. घशात पाणी आलं.
हाताशी गरम मऊ लागलं. पुन्हा डोळे उघडले हळूच.
माझा हात माझ्या छातीवर होता आणि त्यावर मराठेचा हात..
स्वप्नच च्यायला...
"त्याला झोपू दे आता..", कोणीतरी म्हटलेलं ऐकलं..
..मग परत डोळे मिटले...
...
(टू बी कंटिन्यूड)
प्रतिक्रिया
10 Aug 2011 - 3:46 pm | शाहिर
मान गये गवि आझम ..
अंग्री यंग लुक आवडला बर का !!
मराठे मलम लावायला येनार कि आता ..
पंटर जिकला !!
10 Aug 2011 - 3:46 pm | स्पा
जे बात
10 Aug 2011 - 3:50 pm | इरसाल
म्हणजे ?
संपवलात तुम्ही इतक्यात.
10 Aug 2011 - 3:51 pm | गणपा
एकदम फिल्मी स्टाईल. :)
10 Aug 2011 - 3:53 pm | यकु
आज अगदी मेजवान्या सुरु आहेत बुवा..
पराचे गुमराह तुमचा ब्राऊ..
और आने दो!
10 Aug 2011 - 3:59 pm | वपाडाव
तुफान्न......
मराठेच्या हातुन जर जखम भरली तर काय होइल या विचाराने केळ्या अर्धा तंदुरुस्त होतोय असं दिसतंय.....
10 Aug 2011 - 4:00 pm | धन्या
आता मराठे केळ्याला भेटायला आल्याशिवाय राहत नाही. :)
12 Aug 2011 - 12:21 am | मी-सौरभ
:)
10 Aug 2011 - 4:04 pm | मनिष
तोंडाला मस्त चव यावी आणि डिशच संपावी असे वाटले....मस्त झालाय, पण थोडा मोठा हवा होता हा भाग. क्रमशः नसले तरी पुढे लिहशीलच अशी खात्री. लवकर येऊ दे रे!!!
(गविचा पंखा) - मनिष
10 Aug 2011 - 4:07 pm | नावातकायआहे
ऑ?
संपवलात तुम्ही इतक्यात.??
10 Aug 2011 - 4:13 pm | किसन शिंदे
ऑ! काय हे, केळ्याची फायटींग सुरू होता होता लगेच संपवलीत पण.
10 Aug 2011 - 4:14 pm | छोटा डॉन
गवि, कथा आवडतीये हो !
'भडावचोत' ही नवी शिवीही आवडली ;)
- छोटा डॉन
10 Aug 2011 - 4:25 pm | स्वाती दिनेश
स्वप्नातून/गुंगीतून/बेशुध्दीतून जाग आल्यावर पुढे काय?
लवकर पुढचा भाग येऊ देत..
स्वाती
10 Aug 2011 - 4:28 pm | गणेशा
पुन्हा अप्रतिम ..
खुप आवडला भाग.
आज खुप काम असुनही मध्येच येवुन वाचला भाग.
10 Aug 2011 - 5:36 pm | प्रास
मजा आली गवि भौ, पण ते पाप्या फार झटकन पळालं हो! (म्हंजे आपलं मला तसं वाटलं) ;-)
मस्त मस्त मस्त!
आणि ते बेशुद्धीच्या तळ्यात-मळ्यात स्थितीतलं वर्णनही एकदम खास.....
आन देव और भी.....
आधी परा नि आता तुम्ही! ;-)
गविफ्याण :-)
10 Aug 2011 - 7:10 pm | श्रावण मोडक
हाहाहाहा... केळ्यानं मार कमी खाल्ला असं म्हणायचं आहे, तर म्हणा की राव तसं. हे आडून-आडून का? ;)
10 Aug 2011 - 7:19 pm | प्रशांत
केळ्यानं मार कमी खाल्ला पण हा.... सरांचे शब्द आठवल्यानंतर नाहि..
| सरांचे शब्द आठवले. खाली पडलास की सगळे तुझ्यावर चढतील.
10 Aug 2011 - 5:42 pm | जाई.
रंगत वाढतेय
10 Aug 2011 - 5:55 pm | मुलूखावेगळी
भारीच!!!
10 Aug 2011 - 6:12 pm | प्रचेतस
नेहमीप्रमाणेच अतिशय सुरेख.
तो पुढचा भाग मात्र टाका लवकर.
10 Aug 2011 - 6:43 pm | sagarparadkar
खरंतर पाप्याला अजून दोन तीन रट्टे पडायला पाहिजे होते .... पण मला वाटतं पुढच्या भागात कराटेचे सर केळ्याला शाबासकी देणार आणि पाप्या आणि रेडकरला ढिलं करणार .... :)
10 Aug 2011 - 6:49 pm | आनंदयात्री
वाह, भडवाचोत पाप्याला चक्क केळकरने फोडला !! एकच नंबर गवि. अन तुम्ही लिहलेय इतके क्लास की जणु पिक्चरच पहात होतो !!
अर्थात आता पुढच्या सीझनची वाट पहाणे आलं ..
10 Aug 2011 - 7:05 pm | प्रशांत
>>>कच नंबर गवि. अन तुम्ही लिहलेय इतके क्लास की जणु पिक्चरच पहात होतो !!
अवांतरः केळ्याला गुडलक.
10 Aug 2011 - 7:40 pm | प्रभो
मस्त!!
10 Aug 2011 - 7:51 pm | मराठे
खतरनाक!
10 Aug 2011 - 8:23 pm | धमाल मुलगा
खुद्द मराठे?
;)
11 Aug 2011 - 6:30 am | स्पंदना
जरा लवकर ह्रदय परिवर्तन झाल अस नाही वाटत?
11 Aug 2011 - 8:36 am | ५० फक्त
मस्त मस्त हो गवि. चालु द्या
11 Aug 2011 - 11:17 am | साती
शॉल्लेट लिहीलंय.
भारीच एकदम.
11 Aug 2011 - 11:40 am | गवि
इथे प्लीज तुमची "केळकर" कविता लिहा. प्लीज.. :)
12 Aug 2011 - 2:22 am | साती
:)
कुठे लिहू?
नविन लेखनात की इथेच प्रतिसादात?
12 Aug 2011 - 5:06 am | गवि
नवीन धागाच येऊ दे की.. किती छान.. नाही तर किमान इथे तरी लिहा..
11 Aug 2011 - 8:56 pm | पल्लवी
"देवा मला रोज एक अपघात कर......." :D ;)
12 Aug 2011 - 12:57 am | रेवती
आता गोष्ट दिसते तेवढी साधी नसावी असे वाटायला लागले आहे.
हे सगळे प्रकार हे पेशंट केळ्याच्या मनाचे खेळ असावेत (हॅल्युसिनेशन).
12 Aug 2011 - 5:14 am | गवि
नाय नाय.. सायको प्रकार नाय.. :)
सध्या मार पडलाय म्हणून तळ्यात मळ्यात आहे..
12 Aug 2011 - 1:18 am | जानम
भाग खुप आवडला