ब्राऊ...४

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
21 Jul 2011 - 6:00 pm

और गिटार..६

ब्राऊ..१

ब्राऊ..२

ब्राऊ..३

.....................

मग एकदम हलकं वाटायला लागलं. मी घशातला गोळा गिळून सरांना म्हटलं, "सर, तो जाधव माझ्यामागे सुटलाय तोपर्यंत मला कुठे जायला सेफ वाटेना झालंय..तो आज माझ्या मित्राला आपल्या क्लासविषयी विचारत होता. म्हणजे मोठा राडा करण्याचा प्लॅन असणार.."

सर एक क्षण विचार करत उभे राहिले. मग मला म्हणाले चल.. कुत्रा घरी बांधून ये.. मग आपण जाऊ त्याला भेटायला.

"कोणाला सर?"

"जाधवला.. समजावतो त्याला मी बरोबर..चल जाऊन ये परत लगेच"

मी अत्यंत एक्साईट होऊन थरथरत्या हाताने ब्राऊची साखळी सोडली. परतीच्या वाटेवर त्याला उद्या बेगमला भेटवण्याचं प्रॉमिस केलं. त्याला तसाही पुन्हा बेगमशी भेटवायचा होताच..कारण एकाहून जास्त वेळा भिडवले तर फळण्याची शक्यता वाढते असं राणे म्हणाले होते.

...

ब्राऊला घरी सोडला आणि ल्यूना काढून परत क्लासवर आलो. सर जमिनीवर बसून ब्राऊला शिंक येते तेव्हा तो जसा उछ उछ असे आवाज काढतो तसं करत श्वास बाहेर सोडत होते. कसलासा श्वसनप्रकार वाटत होता. त्यांना हाक मारल्यावर ते झटक्यात उठले. त्यांची चपळाई आणि फिटनेस बघून खरोखर स्वतःच्या फोतलेपणाची लाजच वाटते.

पुन्हा एकदा मराठे आणि सरांविषयीच्या विचारांनी छातीत गॅस भरल्यासारखी जोरात कळ आली.

सरांनी त्यांच्या विजय सुपर स्कूटरच्या कमरेत लाथ घातली. त्यांची लाथ अशी जोरदार होती की ती जुनी स्कूटर एका दणक्यात विव्हळत स्टार्ट झाली. सरांच्या मागे बसलो आणि खुटुळ खुटुळ करत निघालो.

"कुठे असेल तो आत्ता?"

"सर.. आज कॉलेजची सुट्टी आहे..म्हणून मग दोनतीन जागी शोधायला लागेल. वसंत झेरॉक्सवर रविवारी पडलेला असतो नेहमी..तिकडे बघूया.."

वसंत झेरॉक्ससमोर आलो आणि माझ्या पोटात गोळा आला. कारण तिथे दुकानाबाहेर नुसता जाधव नव्हता.. त्याच्या सोबत पाप्या पाटीलही खुर्चीत बसून बुलेटवर पाय चढवून बसला होता. आता काय होणार त्याची भलती धास्ती एकदम मनात भरली. नको तेवढं हे एकदम ताणलं जातंय हे मला लक्षात आलं.

सरांनी विजय सुपर स्टँडला लावली आणि जाधवसमोर जाऊन उभे राहिले. जाधव त्यांना एकदम आलेलं बघून सटपटलाच होता. पाप्याही दचकला होताच. पण एकदम उभा राहिला असता तर त्याचा रुबाब गेला असता. म्हणून तो नुसताच जरा अस्वस्थ होऊन थोडा पुढे झुकून अवघडल्यासारखा बसला. बुलेटवरचे पाय मात्र थप्प करुन खाली पडले.

आता काय बाचाबाची होते या भयभीतीने मी बघतोय तोच दोन पावलं पुढे होऊन सरांनी एका हाताने जाधवला कॉलरला धरला आणि दुसर्‍या हाताने मिळेल तिथे मारायला सुरुवात केली. जाधव एकदम ओरडायला लागला. पाप्या आता मात्र खडबडून जागा झाल्यासारखा उभा राहिला.

हे भलतंच होत होतं. काहीतरी बोलाचाली, धमकी असं देऊन सर जाधवला कायमचा गप्प करतील असं वाटलं होतं. पण इथे डायरेक्ट सरांनी फाडायलाच घेतलेला. मी उगाच "सर..सर" करत राहिलो पण सरांनी काही शाट लक्ष न देता हाताच्या जोडीला लाथाही आणल्या. मला भयानक आश्चर्य वाटत होतं ते असं की जाधव जरासुद्धा विरोध करत नव्हता. तो पार गळफटला होता आणि फक्त मार चुकवायला बघत होता आणि गुरागत ओरडत होता.

आणखी एक विचित्र प्रकार म्हणजे आम्हाला रोज कराटेच्या एवढ्या पोझिशन आणि युक्त्या शिकवणारे सर प्रत्यक्ष मारामारीच्या वेळी मात्र शुद्ध गावठी प्रकाराने जाधवला रट्टे आणि लाथा मारत होते. पाप्या पाटील मोठा आ करुन नुसता बघत होता..त्याच्या तोंडात लावलेली तंबाखूची की कसलीतरी गोळीही तोंडातून बाहेर गळली..

"ए.. थांबव त्या येडझव्याला", पाप्या एकदम माझ्याकडे बघून ओरडला.."जीव घेईल हा त्याचा..भानगड होईल केळ्या..तू पण अडकशील.."

तितक्या निर्जन ठिकाणी पण चार पाच लोकं जमली तेवढ्या दोनचार मिनिटांत. बघे आले म्हटल्यावर मी अजून खूपच अस्वस्थ झालो.

तेवढ्यात जाधवच्या डोळ्याजवळून रक्ताचा ओघळ येताना दिसला. आणि तो अंगातली शक्ती गेल्यासारखा मुटकुळं करुन खाली पडला. तो हुंदके देऊन रडत होता.

मी जबरदस्त घाबरलो. सरांचा चेहरा मात्र शांत होता. काही म्हणजे काही आवेश नाही, फुरफुर नाही. जणू जाधवाला मारण्याचं काम म्हणजे बागेला पाईपने पाणी घालण्याचं काम होतं. मला अजूनच भीती वाटली.

"परत त्या पोरीच्या मागे गेलास तर पाय काढून हातात देईन..", खरखरीत स्वरात सर जाधवला बोलले. राग नाही, शिवीगाळ नाही.. शांतपणे नेहमीच्या खरखरीत आवाजात एकच वाक्य.

"चल", सर मला म्हणाले.

मला त्या शांतपणाचीच फार भीती वाटायला लागली. कसला हा थंडपणा.. त्यापेक्षा त्यांनी जाधव आणि पाप्याला आयमायवरुन शिव्या घातल्या असत्या तरी जरा बरं वाटलं असतं.

सरांमागे स्कूटरवर बसलो आणि एका विचाराने माझ्या पोटात भयंकर गोळा आला. सरांनी जाधवला फक्त मराठेबद्दल वॉर्निंग दिली होती. माझं काय?

आणि स्कूटर निघतानिघता पाप्या पाटीलचे शब्द कानात घुसलेच.. "केळ्या मरतंय आता कुत्र्यागत.." एवढंच ऐकून माझ्या पाठीत बर्फासारखा थंड ओघळ गेल्याचा भास झाला..

सरांनी क्लासवर सोडेपर्यंत मी गप्पगार होतो. ताप येणार असल्यागत वाटत होतं. क्लासमधे पोचून खाली उतरलो आणि सरांना म्हटलं, "सर.. जास्ती झालं काय प्रकरण..? आता मला हे लोक खलासच करतील सर.."

"काय होत नाय केळकर.. कसला पेद्रट रे तू..", सर माझ्या पाठीत धपाटा घालत म्हणाले, "जा साठ राउंड रनिंग.. स्टार्ट.."

"अँ"..मी आधीच थरथरत होतो.. त्यातून आत्ता क्लासची वेळही नव्हती.. पण या माथेफिरूला काय उलट उत्तर देणार..

लटपटत्या पायाने मी क्लासच्या ग्राउंडवर सिक्स्टी राउंडस पळायला स्टार्ट घेतला..

एक राउंड होईपर्यंत सरांचा ओरडा आला..

"लडबडतोयस कशाला.. चल पळ फास्ट.."....

...(टू बी कंटिन्यूड)

कथाभाषाप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

वाचतिये.
विंट्रेष्टींग आहे प्रकरण.

स्मिता.'s picture

21 Jul 2011 - 6:12 pm | स्मिता.

रोज एक-एक भाग टाकून गवि एकदम ब्येस्ट काम करत आहेत.

पण हा भाग वाचायला सुरूवात करता करताच संपला. कथा आधीच लिहिलेली नसेल आणि आता पहिल्यांदाच लिहित असाल तर पुढचे भाग १-२ दिवसाच्या गॅप नंतर टाकले तरी चालतील.

पुन्हा अप्रतिम... पुढे काय होयीन याची वाट पाहतो आहे....

केळ्याचे राउंड होइस्तोवर मी एक सिक्स्टी घेउन बसतो....
नाहीतर एकटा केळ्याच झळंबायचा.....
सिक्स्टीचं नाव काढलं की झेझरुन आलं अंगाला...

आंदो..आंदो..आंदो..

मृत्युन्जय's picture

21 Jul 2011 - 6:45 pm | मृत्युन्जय

वाचतोय. पण थोडा छोटा झाला भाग. की इतका ओघवता होता की लवकर संपल्यासारखे वाटले? :)

प्रचेतस's picture

21 Jul 2011 - 8:34 pm | प्रचेतस

ताकदवान आणो प्रवाही लिखाण.
पुढच्या भागाची वाट पाहतोय उत्सुकतेने.

आणखी एक विचित्र प्रकार म्हणजे आम्हाला रोज कराटेच्या एवढ्या पोझिशन आणि युक्त्या शिकवणारे सर प्रत्यक्ष मारामारीच्या वेळी मात्र शुद्ध गावठी प्रकाराने जाधवला रट्टे आणि लाथा मारत होते

बेक्कार हसतोय मगा पासुन. =)) =))
साला आखा चित्रपटच उभा राहिलाय डोळ्यांपुढे.

प्रीत-मोहर's picture

21 Jul 2011 - 9:58 pm | प्रीत-मोहर

वाचतेय ..... येउदेत पुढचे भाग...

शिल्पा ब's picture

21 Jul 2011 - 11:52 pm | शिल्पा ब

छान. भाग खुपच छोटा होता.

पुष्करिणी's picture

22 Jul 2011 - 12:02 am | पुष्करिणी

सहीच्...
अगदी चित्रदर्शी झालाय हा भाग ..

आनंदयात्री's picture

22 Jul 2011 - 12:11 am | आनंदयात्री

मस्त हो गवि. कराटे सरांचा काय गेम आहे कायकी !!

इंटरनेटस्नेही's picture

22 Jul 2011 - 12:36 am | इंटरनेटस्नेही

क्या बात है गवि! तोडलंस मित्रा तोडलंस! पुढचे भाग लवकर येऊ द्या!
-
(गविंचा फॅन) इंट्या केळकर. ;)

निनाद's picture

22 Jul 2011 - 7:55 am | निनाद

मारणारे बोलत नाहीत - एकदम प्रॅक्टिकल लिखाण.

किसन शिंदे's picture

22 Jul 2011 - 9:47 am | किसन शिंदे

हम्म्म! जाधव झाला आता केळ्याची बारी!

नेहमीप्रमाणे इंट्रेस्टिंग...

स्पा's picture

22 Jul 2011 - 9:51 am | स्पा

रांनी त्यांच्या विजय सुपर स्कूटरच्या कमरेत लाथ घातली. त्यांची लाथ अशी जोरदार होती की ती जुनी स्कूटर एका दणक्यात विव्हळत(?) स्टार्ट झाली. सरांच्या मागे बसलो आणि खुटुळ खुटुळ करत निघालो.

खिक... आजचा दिवस भारी जाणार... सकाळ पासून बेक्कार हसतोय =))

=))

प्यारे१'s picture

22 Jul 2011 - 10:17 am | प्यारे१

तेंडुलकरची बॅटींग , शारापोव्हाचं मोअनिंग (खेळतानाचं ऐकलंय आतापर्यंत ;) ), भीमसेन जोशींचं गाणं आणि 'असेच' बरेच काही.... हे खर्‍या जगात.

ते

रामदासकाकांचे लेख, प्राजुतैच्या कविता, फारएण्डचं टुकार चित्रपटाचं परिक्षण, टार्‍याची सह्याची आणि अशीही विडंबणं, शरदिनीतै (बस्स नाम ही काफी है), प्रभू मास्तरांची क्रिप्टिक्स, नाना आणि पराच्या प्रतिक्रिया, गणपा,मृणालिनी, सनिका च्या पाकृ आणि गविच्या कथा .... हे आंतरजालावर.

बास्स. आणखी काय पाहिजे जगायला????????

किसन शिंदे's picture

22 Jul 2011 - 10:44 am | किसन शिंदे

प्यारे, अगदी माझ्याही मनातलं लिहलत.:)

प्रसन्ग अगदि डोळ्या समोर घडतोय अस वाटल !!

प्रसन्ग अगदि डोळ्या समोर घडतोय अस वाटल !!

स्वाती दिनेश's picture

22 Jul 2011 - 10:56 am | स्वाती दिनेश

जाधवची धुलाई डोळ्यासमोर घडते आहे असे वाटले पण आता पुढे?
लवकर लिहा पुढे काय ते...
स्वाती

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

22 Jul 2011 - 12:07 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

हे मास्तर तर लै बेरक निगाल की वो!!
जाम भारी गविदा....
आता म्होरं?

मनराव's picture

22 Jul 2011 - 12:26 pm | मनराव

मस्तच.........

गवींची लेखणी पेटली........येऊ द्यात अजुन........

सविता००१'s picture

22 Jul 2011 - 2:45 pm | सविता००१

झकास आहे. मस्तच.

छान.वाचताना मजा येतेय.
पुढचा भाग लवकर टाका असेच म्हणेन.

पल्लवी's picture

22 Jul 2011 - 3:26 pm | पल्लवी

पुन्हा एकदा मराठे आणि सरांविषयीच्या विचारांनी छातीत गॅस भरल्यासारखी जोरात कळ आली.

सर जमिनीवर बसून ब्राऊला शिंक येते तेव्हा तो जसा उछ उछ असे आवाज काढतो तसं करत श्वास बाहेर सोडत होते.

जणू जाधवाला मारण्याचं काम म्हणजे बागेला पाईपने पाणी घालण्याचं काम होतं.

तुम्हाला अशा उच्च उपमा-बिपमा सुचतात कुठुन ओ ?
भारी चाल्लंय.. लिहा बिगी बिगी.

इष्टुर फाकडा's picture

22 Jul 2011 - 5:38 pm | इष्टुर फाकडा

खूप दिवसांनी अशी वाचण्याची खाव खाव अनुभवतो आहे तुमच्या मुळे...
आणि कृपया पुढच्या वेळी जरा अंमळ जास्तच मोठा भाग टाका ब्वा :)

आनंदयात्री's picture

22 Jul 2011 - 9:11 pm | आनंदयात्री

काय राव गवि .. आम्ही सकाळी सकाळी उठुन उन्हा तान्हात रडत खडत हापिसात पोचायचं, हाश्श हुश्श करायचं, मिपा उघडयाचं आणी "ब्राउ ५" तुम्ही टाकायचाच नाही .. हे काय पटलं नाय राव !!

नंदन's picture

23 Jul 2011 - 12:44 am | नंदन

चारही भाग आज सलग वाचले, मस्त पकड घेतेय कथा. पुढच्या भागांची वाट पाहतो आहे.

धन्या's picture

23 Jul 2011 - 1:13 am | धन्या

खुप लवकर संपला हा भाग...

पुढचा भाग लवकरच टाका. केळ्याचं काय होणार पुढे याची उत्सुकता लागली आहे :)

- धनाजीराव वाकडे

पुढच्या भागात केळ्याची शिकरण होणार बहुतेक!

कवितानागेश's picture

23 Jul 2011 - 1:14 pm | कवितानागेश

पुढे काय झाले?
पुढे काय झाले?
पुढे काय झाले?
पुढे काय झाले?
पुढे काय झाले?
..........................................