ब्राऊ....१

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
5 May 2011 - 2:06 pm

....पुढे चालू...

..................................................

गप्पपणे चालत आम्ही तिच्या घरापाशी पोचलो. ती नुसतीच "बाय" करुन गेली. खरंच ती गेल्याचं यावेळी कळलंही नाही.
मला दिसत होतं एवढंच की मी पुरता शेणात गेलो होतो. मराठेकडून लाथ मिळाली होती. त्याउप्पर डोक्यात गोळी घालावी तशी सरांविषयीची न्यूज तिने मला सांगितली होती. जाधव डूख धरून निघून गेला होता. तो नक्कीच दिवसरात्र आता मला तुडवण्याची वाट बघणार होता.

आणि या सर्वात मराठेची कायम मनाशी धरलेली सोबत सुटली होती..

घराकडे जाताना ल्यूना पादल्यासारखे आवाज करत होती. भिकारचोट.

.......................

घरी पोचता पोचता जबरा काळोख झाला होता. ल्यूना दारात लावली तोच ब्राऊ वुफ्फ करुन आला आणि माझ्या अंगाशी झळंबला. फूटभर जीभ लोंबत होती. फुफाट्याचा गरम सीझन त्यालाही सतावत होता.

रात्र असूनही गेले बरेच दिवस गाद्या घामाने भिजत होत्या आणि आज बाजूचे मंत्रीकाका गच्चीत गाद्या टाकायला लागले होते.

ब्राऊने दोन्ही पंजे माझ्या कमरेवर ठेवले आणि तोंड चाटायला बघू लागला. तेच्या मायला वीतभर लांबीचा घरी आणलेला ब्राऊ झटाझट साडेतीन फुटी झाला होता. मला आत्ता मराठेने दिलेल्या फटक्यामुळे काहीच सुचत नव्हतं. मी ब्राऊला ढकलून देत खेकसलो, "येडझव्या, गप बस साल्या ढुंगण टेकून.."

मग मी झटक्यात माझ्या खोलीकडे निघालो.

ब्राऊ कुंई कुंई करत चटकफटक जिना चढून माझ्यामागून माझ्या खोलीत आला. मी रडघाईला आलो होतो. आता एकटेपणा मिळाल्यावर मराठेच्या आठवणीने एकदम रडूच यायला लागलं. आधी घसा आवळल्यासारखा दुखायला लागला आणि मग मोठे हुंदके आले. जितकं दाबावं तितकं आणखी उसळायला लागलं. मी बद्दकन जमिनीवर बसलो.

मी उदास असलो की ब्राऊला लगेच कळतंच. मग तो असहाय्य चेहरा करुन अस्वस्थपणे माझ्या पायाशी बूड टेकून बसला आणि माझ्या मांडीवर हनुवटी टेकली.

मळमळतंय पण उलटी होत नाही अशी अवस्था नकोशी वाटते. रडण्याचंही तसंच वाटतं.

जाउंदे तिच्यायला.. येऊंदे रडू बकाबक..

मग मी ब्राऊला घट्ट मिठी मारुन रीतसर रडायलाच सुरुवात केली. ब्राऊच्या गरम पोटातून कुंई आणि गुर्ब असे आवाज कानात शिरत होते.

खालच्या दिशेने ओरडून माझं बाहेर खाणं झालंय म्हणून सांगितलं आणि न जेवताच आडवा झालो. ब्राऊही बिचारा भुकेला बाजूला पडून राहिला.

जरा वेळाने बरं वाटल्यावर मला लक्षात आलं की उद्या ब्राऊचा स्पेशल डे होता.

ब्राऊ मोठा झाला होता आणि एकदोनदा त्याच्या विचित्र हालचालींवरुन मला हे लक्षात आलं की त्याला कुत्रीची नितांत गरज आहे. नुसतीच भाकरी आणि अंडी खिलवण्याच्या नादात मी ही गरज पूर्ण विसरून गेलो होतो.

यावर उपाय म्हणजे त्याला फक्त गेटच्या बाहेर मोकळा सोडणे. की मग तो बरोब्बर चारपाच जणींना आशिर्वाद देऊन आला असता.

एकदा तो उपाय करुन बघितला, पण त्यात मुख्य अडचण ही की ब्राऊचं धूड रस्त्यात मोकळं फिरताना दिसलं की रस्त्याने पायी आणि स्कूटरवरुन जाणारे सर्व लोक जागीच थांबायचे आणि रस्ता जाम व्हायचा. शिवाय एक बरीशी कुत्री मिळवताना एरियातल्या इतर कुत्र्यांशी बरीच मारामारी करावी लागते आणि आमचा ब्राऊ फक्त आकारानेच मोठा होता.. त्याला मारामार्‍या जमायच्या नाहीत. एका कानाचा टोकाचा तुकडा उडवून घेऊन ब्राऊ परत आला. तेव्हापासून त्याला कंपाउंडबाहेर सोडण्याचा ऑप्शन बंदच होता.

दुसरा मार्ग त्याच्या डॉक्टरांनी सुचवला. नरकुत्रेच्छुक सजातीय माद्यांचे पत्ते त्यांनी मला द्यायचे आणि मी ब्राऊला घेऊन तिथे जायचं असं ठरलं.

यात दोन्ही पार्ट्यांची सोय होती. शिवाय ब्राऊचं हे सुख फळलं तर प्युअर ब्रीडची पिल्ले तयार होणार आणि त्यातलं एक पिल्लू नरकुत्र्याच्या मालकाला मिळणार असा सगळीकडे चालू असणारा नियमही होता.

त्याप्रमाणे उद्या ब्राऊला घेऊन बेगमकडे जायचं होतं.

कर्नल राणे म्हणून एकजण रिटायरमेंटनंतर छंदासाठी कुत्रे पाळत होते. त्यांची बेगम ही कुत्री एकदम तरुण होती. बेगमला या कामासाठी आमच्या घरी आणण्याचा विचार एकदा मी केला. पण तिने नव्या अनोळखी ठिकाणी आल्यावर ब्राऊला जवळही येऊ दिलं नसतं. ब्राऊ मात्र इतका उतावीळ दिसायचा की तो अनोळखी जागेतही ताबडतोब कार्यभाग उरकेल अशी मला खात्री होती.

सकाळी उठून ब्राऊला चार अंडी खायला घातली आणि चालत चालत राणेंच्या घरी पोचलो. बेगम ब्राऊला पाहून जबरदस्त भुंकायला लागली. मी काळजीत पडलो पण तसाच त्यांच्या गेटमधून आत घुसलो. तेव्हा मात्र ती पळून तिच्या कुत्रेघरात जाऊन बसली.

राणेसाहेबांनी भरपूर प्रकारे बोलावूनही ती बाहेर येईना. मग त्यांनी सरळ तिला खेचून बाहेर काढलं आणि साखळीत अडकवलं. ब्राऊ माझ्या हातातल्या साखळीला जबरी खेच देऊन सूं सूं वास घेत तिच्याकडे झेपावे आणि बेगम दात काढून गुरगुरत मागे मागे सरके.

आता पोझिशन अवघड झाली. प्रयोग फसतोसं वाटायला लागलं. राणे म्हणाले, "मी पकडून धरतो हिला तोंडाकडून, तुम्ही लावा कुत्रा मागून..". आणि त्यांनी बेगमला पुढून पकडून तिचं ढुंगण ब्राऊकडे केलं. ब्राऊ अजूनच खसबस करायला आणि खेचायला लागला.

मला त्यांच्या, "लावा कुत्रा मागून" या शब्दांनी एकदम कसंतरी वाटायला लागलं. एकदम बलात्कारासारखा प्रकार वाटायला लागला. असं काही करायला मन मागेना. तरी ब्राउची गरज डोळ्यासमोर ठेवून मी त्याची साखळी ढिली केली आणि त्याला पुढे सोडलं. त्याचा स्पर्श झाल्याबरोब्बर बेगमने जिवाच्या आकांताने सगळी ताकद एकवटून राणेंना हिसका दिला आणि सुटका करुन घेतली. मग उलटे वळून ब्राऊचा धडका कान चावला आणि पळून गेली. ब्राऊ पुन्हा कुंई करुन खाली बसला.

संबंध ब्राऊ आणि बेगमचा करायचा असूनही मी आणि राणे जास्त घामाघूम झालो होतो. शेवटी राणे म्हणाले, "तुमच्या कुत्र्याला मोकळा सोडा. काय व्हायचं ते होऊ दे.."

काय व्हायचं त्याची लालबुंद झलक ब्राऊच्या कानाच्या टोकावर दिसत होतीच. मी तसाच उभा राहिलो.

"सोडा हो.. काय होत नाय..सांगतो ना मी..सोडा..", राणे ओरडले.

मग मी धीर करुन कसातरी ब्राऊला साखळीतून सोडला. तो सुद्धा त्या कुत्रीसाठी एवढा लोचटला होता की आत्ताच खाल्लेला कानचावा विसरून पुन्हा बेगमच्या मागे वास काढत तिच्या डॉगहाऊसमधे घुसला.

मी आणि राणे त्यांच्या घरात शिरलो. राणेकाकूंनी दिलेलं कोकम सरबत रिचवलं आणि टॉवेल मागून घेऊन घाम पुसला.

आता बाहेर किती रक्त सांडलं असेल याची धास्ती पकडून बाहेर आलो.

पाहिलं तर तेच्या आयला, ब्राऊ आणि बेगमचं सुरु झालं होतं. आम्ही पकडून धरल्यावर एवढी व्हायोलंट झालेली बेगम एकदम ब्राऊला वश झालेली दिसत होती..

ब्राऊ तर लट्टू होताच..

राणेंकडे बघून जरा ऑकवर्ड हसताना मी नवा धडा शिकलो होतो.

मराठेलाच नव्हे तर कोणालाही मिळवायचं तर तिच्या मागे लागून, जबरदस्तीने काही होणार नाही.

मोकळं सोडलं पाहिजे..

..

फुफाटलेल्या उन्हातून घरी परत येताना मग माझी विचारांची लाईन जोरात चालू झाली. नाकाच्या टोकावर कचकचीत घामाघूम झालेला ब्राऊ हातभर जीभ काढून माझ्या सोबत धापा टाकत चालत होता. कितीही भेलकांडत चालला असला तरी चेहरा एकदम खूष दिसत होता.

(टू बी कंटिन्यूड..)

कथाभाषाविनोदजीवनमानप्रतिक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

5 May 2011 - 2:20 pm | किसन शिंदे

:D :D :D :D :D :D मान गये उस्ताद..

प्रचेतस's picture

5 May 2011 - 2:45 pm | प्रचेतस

जबरदस्त लिखाण. सर्व प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहिले. हसून हसून फुटलो जाम. सुरुवातीच्या सुतकी वातावरणानंतर पुढे वाक्यावाक्यात हास्याचे स्फोट होत जात आहेत.
पटापट पुढचे भाग टाका आता.

आनंदयात्री's picture

5 May 2011 - 9:00 pm | आनंदयात्री

>>हसून हसून फुटलो जाम. सुरुवातीच्या सुतकी वातावरणानंतर पुढे वाक्यावाक्यात हास्याचे स्फोट होत जात आहेत.

सहमत आहे.

गव्या तु लै भारी लिहतोस यार !! कुत्र्याला कवटाळुन रडतांना कुत्रं काढतं ते आवाज वैगेरे .. जे काहीपण .. सगळेच .. लै भारी लिहले आहे.

-
(गविशेठचा फॅन)

आनंदविहारी

पप्पुपेजर's picture

5 May 2011 - 2:54 pm | पप्पुपेजर

च्याआयला गेले पुढचे काही आठवडे या कथे मध्ये ...:)

मनिष's picture

5 May 2011 - 3:05 pm | मनिष

सही जा रहे हो! पुढच्या भागाची वाट पाहतोय... :-)

हा हा हा हा... मस्त... :D
पुढचा भाग लवकर येउद्या...

प्यारे१'s picture

5 May 2011 - 3:25 pm | प्यारे१

येकदम 'बेशिक इन्श्टिन्क'वर आलासा की पाटील.....!!!

समदी 'डाघाऊस'मदी जाऊन बसली की वो.... ;)

नगरीनिरंजन's picture

5 May 2011 - 3:35 pm | नगरीनिरंजन

:D जबर्‍या!

यकु's picture

5 May 2011 - 3:37 pm | यकु

D :-D :lol: D :-D :lol: D :-D :lol: D :-D :lol:
D :-D :lol: D :-D :lol: D :-D :lol:

ह.ह. पु.वा.!!!!

स्पंदना's picture

5 May 2011 - 4:36 pm | स्पंदना

आई ग! काय म्हणाव या कर्माला? इतक हसु फुटतय की बस.
एक गाण आठवल ..माणसा परास मेंढर बरी..

धमाल मुलगा's picture

5 May 2011 - 6:47 pm | धमाल मुलगा

मराठेलाच नव्हे तर कोणालाही मिळवायचं तर तिच्या मागे लागून, जबरदस्तीने काही होणार नाही.

मोकळं सोडलं पाहिजे..

हा हा! एकदम पर्फेक्ट पाइंट! :)

मस्त!! पुढचा भाग लवकर येऊदे..

अप्पा जोगळेकर's picture

5 May 2011 - 7:45 pm | अप्पा जोगळेकर

तेजायला कसं काय सुचतं एवढं भारी लिहायला. हसून हसून फुटलो.

तिमा's picture

5 May 2011 - 7:46 pm | तिमा

कंचा म्हईना व्हता वो ? भाद्रपदाचा का ? न्हाई, दोगं बी प्येटलेले वाटले म्हनून इचारलं!

लई भारी, गवि, चालु द्या आम्ही आहोतच नैतिक पाठिंबा द्यायला. सध्या एक जवळाचे नातेवाईक या उद्योगात आहेत, त्यांचे अनुभव ऐकुन हसुन हसुन मरायला होतंय.

स्पा's picture

5 May 2011 - 8:45 pm | स्पा

अशक्य हसतोय......

गवि

__/\__

(बादवे अंडा करी कधी खिलवताय ;) )

आनंदयात्री's picture

5 May 2011 - 9:02 pm | आनंदयात्री

>>(बादवे अंडा करी कधी खिलवताय )

कुत्र्याला अंडं खाउ घातल्यावर फिरायला नेलं तर तुलाही नेईल अशी अपेक्षा आहे का ?
इनडायरेक्टली गविसाहेबांवर हा आरोप आहे का ?

निनाद's picture

6 May 2011 - 6:54 am | निनाद

कुत्र्याला अंडं खाउ घातल्यावर फिरायला नेलं तर तुलाही नेईल अशी अपेक्षा आहे का ?

क्काय चाल्लेय काय? हसून हसून मेलो ना... अशक्य आहात लेको!

प्यारे१'s picture

6 May 2011 - 9:33 am | प्यारे१

या स्पावड्याला कुठ्ठं कुठ्ठं म्हणून न्यायची सोय नाही. कुठं काय विचारेल आणि 'पचकावडा' करुन घेईल नेम नाही.

अनाहूत सल्ला: इन्ट्याला सोड लवकरात लवकर. ;)

स्पा's picture

6 May 2011 - 9:49 am | स्पा

तुम्ही मेंदूला आधी मागून "जळवा" लावा.. दुषित रक्त निघून गेल्यावर विचार सुद्धा स्वच्छ होतील :)

आम्ही कोणाला धरायचं व सोडायचं हा आमचा निर्णय असल्याने, सदर प्रतिसादास शिळ फाट्यावर मारण्यात आलेले आहे

स्पा's picture

5 May 2011 - 9:19 pm | स्पा

:D

प्रास's picture

5 May 2011 - 9:42 pm | प्रास

ज ह ब ह रा!

कसलं भारी लिहिलयत हो!

मजा आली.... आपण तर आधीपासूनचे तुमच्या लिखाणाचे फ्यान आहोतच..... आज पुन्हा ते अधोरेखित झालंय...

मेघवेडा's picture

5 May 2011 - 10:00 pm | मेघवेडा

हा हा हा!!

बेक्कार हसतोय!! जबर्‍या!! लावा आता पुढले भाग याच्यामागून भरभर!! ;)

विनायक बेलापुरे's picture

6 May 2011 - 1:07 am | विनायक बेलापुरे

साष्टांग ___/\____

निनाद's picture

6 May 2011 - 7:39 am | निनाद

मस्तच, मोकळे ढाकळे लेखन आवडते आहे हे सांगायला नकोच! :)

रामदास's picture

6 May 2011 - 8:06 am | रामदास

मागे लागायचं नाही हा फंडा फार आवडला आहे .

नन्दादीप's picture

6 May 2011 - 5:42 pm | नन्दादीप

खूसखूसून हसतोय. बाजूच्या टेबलावर एक भैय्याणि बसलीय. मोठ्याने हसलो तर विचारेल "काय झाल" म्हणून... तिला काय सांगू हे सगळ आणी ते पण हिंदीमध्ये ट्रान्सलेट करून..... हा हा हा...