ब्राऊ...५

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
26 Jul 2011 - 6:29 pm

और गिटार..६

ब्राऊ..१

ब्राऊ..२

ब्राऊ..३

ब्राऊ..४
...........

"काय होत नाय केळकर.. कसला पेद्रट रे तू..", सर माझ्या पाठीत धपाटा घालत म्हणाले, "जा साठ राउंड रनिंग.. स्टार्ट.."

"अँ"..मी आधीच थरथरत होतो.. त्यातून आत्ता क्लासची वेळही नव्हती.. पण या माथेफिरूला काय उलट उत्तर देणार..

लटपटत्या पायाने मी क्लासच्या ग्राउंडवर सिक्स्टी राउंडस पळायला स्टार्ट घेतला..

एक राउंड होईपर्यंत सरांचा ओरडा आला..

"लडबडतोयस कशाला.. चल पळ फास्ट.."....

राऊंड्स संपेपर्यंत मी ब्राऊसारख्या धापा टाकत होतो पण पळण्यावर लक्ष एकवटलं गेल्यामुळे भीती थोडावेळ बाजूला पडली होती. साठावा राऊंड कंप्लीट करुन मी सरांसमोर उभा राहिलो.

"बस इथे", ते म्हणाले.

मी फत्त करुन बसकण मारली.

"घाबरलास काय?"

"हो.. जरासा"

"हे बघ केळकर. माझ्या स्टुडंटना मी फिट ठेवण्यासाठी रोज एवढा व्यायाम करुन घेतो. पण नुसती बॉडी फिट करुन काय फायदा? मनाची ताकद सर्वात मोठी आहे. तीच डेव्हलप नाही केली तर बॉडी कमवून काही होणार नाही. समजतंय का?"

सरांना प्रवचन द्यायची सवय आहे हे एक नवीन माझ्या लक्षात आलं. सर आमच्याकडून व्यायाम करुन घ्यायचे त्यावेळी हे समजलं नव्हतं. मी काहीच उत्तर दिलं नाही तेव्हा सर पुन्हा सुरु झाले.

"ऐक नीट.. आत्ता मी त्या पोराला जसा मारला तसंच तूही मारु शकत होतास. अंगात ताकद कमीजास्त असली तरी काय फरक पडत नाही. तुझ्या मनात तेवढा जोर पायजे."

"मनात जोर म्हणजे काय करायचं सर", मी जरा उखडलो.

"शिकवतो मी तुला कधीतरी. आता जा घरी..", सरांनी मला हाकलला.

घरी आलो तेव्हा भुकेने हेलपाटत होतो. ब्राऊ उदास बसला होता. त्याच्यासमोर त्याची दूधभाकरीची थाळी तशीच पडली होती. एरवी जिभेनंच अशी घासून पुसून चकाचक करतो की नवीकोरी वाटावी. आता ही उदासी मी अचानक सोडून गेल्यामुळे होती की बेगमच्या विरहाने ते समजेना. ब्राऊला घरात घेतला आणि ताट वाढून घेऊन त्याच्यासमोर निर्लज्जपणे बकाबक जेवलो. पोटाला तडस लागल्यावर एकदम वाटलं की ब्राऊ भुकेलेलाच बसलाय.

तसा ब्राऊ एकदम इमोशनल कुत्रा आहे. थोड्याश्या कारणाने कूंकूं करुन कण्हणं चालू...अन खाणं बंद..

"अरे मी ओक्के आहे एकदम ब्राऊल्या..तू का उदास झालास रे?", मी हात धुताधुता विचारलं. ब्राऊ नुसताच उभा होता तो गुर्ब करुन खाली बसला आणि जमिनीला हनुवटी लावून माझ्याकडे टुकुटुकू बघायला लागला.

मग ब्राउच्या गळ्याभोवती हात घालून त्याला जमिनीवर लोळवला आणि डोक्याला त्याची उशी करुन तिथेच आडवारलो. कानात ब्राऊच्या श्वासाचे फासफूस आवाज येत होते.

"अरे उद्या नेईन बोललो ना तुला कुत्री दाखवायला..साल्या, एकादिवशी किती हाव करशील. मला अजून मिळत नाही भडव्या ते तुला मिळतंय. मग जरा दमानं घे की.."

माझ्या शिव्या ऐकून ब्राऊ ताडकन उठला आणि माझं डोकं खाली आपटलं. बहुतेक मी नॉर्मलला आलो हे ओळखून तो खुशीत आला असणार. मग पहिली गोष्ट त्याने केली ती म्हणजे त्याची थाळी बचाक बचाक करत खाल्ली. अगदी रिकामी होऊन ठण ठण आवाज येईस्तोवर चाटून काढली.

मग लडबडत्या तोंडाने मला येऊन लब्बकन चाटलं.

मी त्याच्या समाधानासाठी आणखी एकदोन शिव्या हासडल्या. मग मुटकुळं करुन पडलो आणि झोपच लागली साली.

उगाच दचकून जागा झालो तेव्हा संध्याकाळ झाली होती. ब्राऊला बाहेर राउंडसाठी न्यायलाच हवं होतं. त्याची वेळ निघून गेली होती आणि तरी शी शू दाबून केविलवाणा माझ्या बाजूला वाट बघत बसला होता. मी आतून दार लावून घेऊन त्याला बाहेरच्या बागेत कुत्रमूत्रासाठी ठेवलेल्या वाळूपर्यंत जायची सोयही ठेवली नव्हती. मला दयाच आली.

त्याच्या नरड्याभोवती दोरखंड लावून बाहेर पडलो. रस्त्याला लागेस्तो एकदम परांजप्या उगवला. झालेल्या राड्याचा वास सगळ्या गावात पसरला असणार. लगेच आला हरामखोर विचारायला. पण मला बरं वाटलं. मी त्याची वाटच बघत होतो. परांजप्या फसफसत्या उत्तेजित चेहर्‍याने आमच्यासोबत चालायला लागला.

"बेकार धुतला की रे सरांनी जाधवाला?", परांजप्याला विचारायची म्हणा की सांगायची म्हणा, अशी घाई झाली होती जशी ब्राऊला धार मारण्याची.

"हो रे..मला काय आयडियाच आली नाही रे डायरेक्ट मारतील म्हणून.."

"अरे, तुला माहीत नाय काय? जाधवला अ‍ॅडमिट केलाय संजीवनीमधे"

मी हादरलोच.

"काय वार्ता करतो..अरे पण काय लागलं नव्हतं एवढं त्याला.."

"हट्..बेशुद्ध झालेला नंतर तो. पाप्याने नेलान संजीवनीत. तिथे लगेच अ‍ॅडमिट करुन घेतला.."

माझ्या डोळ्यासमोर सगळं जग फिरायला लागलं. अ‍ॅडमिट म्हणजे पोलीस केस ठरलेली. आणि याचाच अर्थ पोलीस सरांसोबत मलाही धरणार. म्हणजे सगळंच जगासमोर येणार.. साला गावभर पंचनामा होणार.. का मारला..? त्या चौकशीत कोणीतरी मराठेचं नाव आणलं तर तीही अडकली.

"परांजप्या.. चल आत्ता माझ्यासोबत यार.. क्लासवर जाऊया.."

क्लासवर पोचेपर्यंत छाती धाडधाड उडत होती. सिक्स्टी राउंडनंतरही एवढी उडली नव्हती दुपारी. हात घामाने सारखे ओले होत होते आणि त्यातून ब्राऊचा कासरा निसटत होता.. ब्राऊला काहीतरी इचकलंय एवढीच जाणीव झाली होती आणि म्हणून तो इमानदारीत सोबत चालत होता.

क्लासच्या शेडचं दार बंद होतं. दाराबाहेर मुतनाळ बसला होता.

"सर कुठेत रे..", मी मुतनाळला विचारलं.

"ते मी सांगू नाय शकत..सरांनी परमिशन नाय दिलेली..", मुतनाळ चेल्यासारखा बोलला.

"अरे.. राडा झालाय मोठा.. सरांनी मारला त्या जाधवला..तो हॉस्पिटलमधे आहे.."

"ते मला काय माहीत नाय. तू जा घरी..आज क्लास बंदच आहे ना रविवारचा..", मुतनाळ थंड होता. सराईत गेंड्याला कसला फरक पडणार आहे असल्या गोष्टींनी..त्याला सगळं माहीत आहे आणि तो कबूल करत नाहीये हे त्याच्या चेहर्‍यावरुनच माझ्या लक्षात आलं.

"तुला कळत नाय का मुतनाळ्या.. पोलीस असतील ना सरांच्या मागे.. मला त्यांच्याशी बोलायला पाहिजे.."

"सर आत्ता इथे नाहीयेत बोललो ना एकदा..पळ आता", मुतनाळ ओरडला.

....

मला एकदम एकटा पडल्याचं लक्षात येऊन थरथरायला व्हायला लागलं. क्लासकडून हळूहळू घराकडे निघालो. परांजप्याही गप्पच होता. घरापर्यंत पोचलो तर बंद फाटकाबाहेर मोमीन वाट बघत उभा.

"काय रे..?", मी धडधडत विचारलं.. मला आता येणारा प्रत्येकजण काहीतरी गलिच्छ माहिती घेऊनच येणार असं वाटायला लागलं होतं. आणि तसंच झालं.

"पाप्या भेटला होता अँड्य्रूच्या गाडीवर.. केळ्या..जाधव सिरियस आहे..त्याचं काही खरं नाही.."

मग मात्र एवढे दिवसभरातले धक्के विसरून नव्याने पायाखालची धरणी फाटायला सुरुवात झाली.

...
(To be continued..)

कथाविचारआस्वाद

प्रतिक्रिया

स्वाती दिनेश's picture

26 Jul 2011 - 6:38 pm | स्वाती दिनेश

एकदम वेगळेच वळण..
पुढच्या भागाची उत्सुकता आता मात्र अजूनच ताणली गेली आहे..
स्वाती

मनिष's picture

26 Jul 2011 - 6:41 pm | मनिष

अरे लवकर पुढचा भाग टाक रे...!! मस्त चाललीय "ब्राऊ"

sagarparadkar's picture

26 Jul 2011 - 6:48 pm | sagarparadkar

>> साल्या, एकादिवशी किती हाव करशील. मला अजून मिळत नाही भडव्या ते तुला मिळतंय. मग जरा दमानं घे की..

भलताच सात्विक संताप झालेला दिसतोय .... काय करणार, माणसाचा 'लाईफ स्पॅन' मोठा असतो ना !

:)

प्रचेतस's picture

26 Jul 2011 - 6:54 pm | प्रचेतस

एकदम वेगळेच वळण. कथा अचानक जाम शिरेस झालीय.
लवकर येउ दे पुढचा भाग.

गणेशा's picture

26 Jul 2011 - 6:54 pm | गणेशा

पुन्हा छान ...

असेच लिहित रहा.. वाचत आहे

आनंदयात्री's picture

26 Jul 2011 - 7:00 pm | आनंदयात्री

आयला मुतनाळ क्लासमध्ये का नव्हता जाउ देत ? आत मराठे होती काय ? (असेल तर केळ्याला नका दाखवू)

बाकी मुतनाळचा उल्लेख आधी आला होता का ?

आत मराठे होती काय ?

;-)
असेच म्हणतो!

बाकी मुतनाळचा उल्लेख आधी आला होता का ?

चिक्कार वेळा !!!!

गवि ते क्रमशः राहिलय ना रे. :(

गवि,
तुम्ही म्हणजे खम्प्लिट पेटलाय... चांगलंय, चांगलंय... येऊद्या अजून दणादण!!!

--असुर

विजय नरवडे's picture

26 Jul 2011 - 7:11 pm | विजय नरवडे

असेच लिहित रहा.. वाचत आहे

+१

स्पा's picture

26 Jul 2011 - 7:44 pm | स्पा

मस्तच

जरा मोठे भाग लिवा गवि

ब्लू कोरलात एक एक तास घालवण्यापेक्षा जरा भाग मोठे करा कि राव ;)

ब्लू कोरलात एक एक तास घालवण्यापेक्षा जरा भाग मोठे करा कि राव

कारे त्यांच्या पोटावर उठतोय्स?
ब्ल्यू कोरलमध्ये बसल्यावर त्यांना स्फूर्ती येत असेल.. ;-)

वपाडाव's picture

27 Jul 2011 - 10:55 am | वपाडाव

जरा मोठे भाग लिवा गवि

असेच म्हंतो...

हाही भाग मागील सर्वांप्रमाणे छानच.

ब्राउ ६ ह्याच आठवड्यात वाचायला मिळेल ह्या आशेत................

(भौ ऊऊऊऊऊ ६६६६६६६६६६६६६६६६.....................)

इंटरनेटस्नेही's picture

26 Jul 2011 - 8:51 pm | इंटरनेटस्नेही

जाधव सिरीयस आहे हे ऐकुन मनातुन आसुरी आनंद झाला.
-
इंट्या.

मनराव's picture

27 Jul 2011 - 11:18 am | मनराव

>>मनातुन आसुरी आनंद झाला.<<<

तुला असुरी आनंद पण होऊ शकतो........... :o :o :o

इंटरनेटस्नेही's picture

30 Jul 2011 - 3:29 am | इंटरनेटस्नेही

तुला असुरी आनंद पण होऊ शकतो...........

नॉट एक्झॅक्टली आसुरी आनंद अ‍ॅज सच, पण केळ्याबद्दल सहानुभुती असल्याने खलनायकाला मार पडल्याचे कळल्यावर समाधन मात्र वाटले.. केळ्याची मानसिक परिस्थीती मी चांगलीच समजु शक्तो, म्हणुन असेल कदाचित. ;)

आधीच्या भागाप्रमाणेच हाही भाग उत्तम
रंगत वाढत चाललीयै

हम्म..
जाधव नाटक करत असेल असं वाटतय किंवा सरांनी मारल्या नंतर आणखी कोणी मारला असेल त्याला.......पूर्वीचा हिशोब चुकता करण्यासाठी.

पैसा's picture

26 Jul 2011 - 10:02 pm | पैसा

आणखी किती कलाटण्या मिळणार आहेत केळ्याच्या प्रेमकहाणीला? पण त्यामुळे उत्कंठा वाढतेय नक्की!

आणखी किती कलाटण्या मिळणार आहेत केळ्याच्या प्रेमकहाणीला?

वाचुन एकदम हसु आले.

प्रास's picture

26 Jul 2011 - 10:40 pm | प्रास

आम्हाला आता भ्या वाटायला लागलंय बुवा.....

हा जाधव करतोय पोलिस केस..... काहीतरी युक्ती करा राव.....

केळ्याची काळजी करणारा ;-)

मस्तच पण एवढे बारीक बारीक भाग का टाकताय?

५० फक्त's picture

27 Jul 2011 - 6:23 am | ५० फक्त

मस्त एकदम मस्त ओ गवि, अजुन काय काय होणार आहे कुणास ठाउक.

किसन शिंदे's picture

27 Jul 2011 - 9:35 am | किसन शिंदे

अनपेक्षित कलाटणी!!

पुढचा भाग पटकन टाका हो गवि.

मस्त चाललयं.. तुझ्या ब्राउचं आणि कहाणी पण.. आता पुढचे भाग जरा मोठे आणि फटाफट येऊ दे..

- पिंगू

पल्लवी's picture

27 Jul 2011 - 4:16 pm | पल्लवी

सगळे भाग ढिंच्याक झालेत..
कचरा करुन मास्तुरे पळाला की काय... :|

स्पंदना's picture

28 Jul 2011 - 8:17 am | स्पंदना

कधी हसु तर कधी काळजी..नक्कि वाचता वाचता मला कोणती भाव्ना चेहर्‍यावर ठेवावी तेच कळत नाही, बाकि गवी मस्तच.

पल्लवी's picture

29 Jul 2011 - 4:58 pm | पल्लवी

ब्राऊ...६ कंदी येनाने ?