ब्राऊ...५
लेखनविषय (Tags)
और गिटार..६
ब्राऊ..१
ब्राऊ..२
ब्राऊ..३
ब्राऊ..४
...........
"काय होत नाय केळकर.. कसला पेद्रट रे तू..", सर माझ्या पाठीत धपाटा घालत म्हणाले, "जा साठ राउंड रनिंग.. स्टार्ट.."
"अँ"..मी आधीच थरथरत होतो.. त्यातून आत्ता क्लासची वेळही नव्हती.. पण या माथेफिरूला काय उलट उत्तर देणार..
लटपटत्या पायाने मी क्लासच्या ग्राउंडवर सिक्स्टी राउंडस पळायला स्टार्ट घेतला..
एक राउंड होईपर्यंत सरांचा ओरडा आला..
"लडबडतोयस कशाला.. चल पळ फास्ट.."....
राऊंड्स संपेपर्यंत मी ब्राऊसारख्या धापा टाकत होतो पण पळण्यावर लक्ष एकवटलं गेल्यामुळे भीती थोडावेळ बाजूला पडली होती. साठावा राऊंड कंप्लीट करुन मी सरांसमोर उभा राहिलो.
"बस इथे", ते म्हणाले.
मी फत्त करुन बसकण मारली.
"घाबरलास काय?"
"हो.. जरासा"
"हे बघ केळकर. माझ्या स्टुडंटना मी फिट ठेवण्यासाठी रोज एवढा व्यायाम करुन घेतो. पण नुसती बॉडी फिट करुन काय फायदा? मनाची ताकद सर्वात मोठी आहे. तीच डेव्हलप नाही केली तर बॉडी कमवून काही होणार नाही. समजतंय का?"
सरांना प्रवचन द्यायची सवय आहे हे एक नवीन माझ्या लक्षात आलं. सर आमच्याकडून व्यायाम करुन घ्यायचे त्यावेळी हे समजलं नव्हतं. मी काहीच उत्तर दिलं नाही तेव्हा सर पुन्हा सुरु झाले.
"ऐक नीट.. आत्ता मी त्या पोराला जसा मारला तसंच तूही मारु शकत होतास. अंगात ताकद कमीजास्त असली तरी काय फरक पडत नाही. तुझ्या मनात तेवढा जोर पायजे."
"मनात जोर म्हणजे काय करायचं सर", मी जरा उखडलो.
"शिकवतो मी तुला कधीतरी. आता जा घरी..", सरांनी मला हाकलला.
घरी आलो तेव्हा भुकेने हेलपाटत होतो. ब्राऊ उदास बसला होता. त्याच्यासमोर त्याची दूधभाकरीची थाळी तशीच पडली होती. एरवी जिभेनंच अशी घासून पुसून चकाचक करतो की नवीकोरी वाटावी. आता ही उदासी मी अचानक सोडून गेल्यामुळे होती की बेगमच्या विरहाने ते समजेना. ब्राऊला घरात घेतला आणि ताट वाढून घेऊन त्याच्यासमोर निर्लज्जपणे बकाबक जेवलो. पोटाला तडस लागल्यावर एकदम वाटलं की ब्राऊ भुकेलेलाच बसलाय.
तसा ब्राऊ एकदम इमोशनल कुत्रा आहे. थोड्याश्या कारणाने कूंकूं करुन कण्हणं चालू...अन खाणं बंद..
"अरे मी ओक्के आहे एकदम ब्राऊल्या..तू का उदास झालास रे?", मी हात धुताधुता विचारलं. ब्राऊ नुसताच उभा होता तो गुर्ब करुन खाली बसला आणि जमिनीला हनुवटी लावून माझ्याकडे टुकुटुकू बघायला लागला.
मग ब्राउच्या गळ्याभोवती हात घालून त्याला जमिनीवर लोळवला आणि डोक्याला त्याची उशी करुन तिथेच आडवारलो. कानात ब्राऊच्या श्वासाचे फासफूस आवाज येत होते.
"अरे उद्या नेईन बोललो ना तुला कुत्री दाखवायला..साल्या, एकादिवशी किती हाव करशील. मला अजून मिळत नाही भडव्या ते तुला मिळतंय. मग जरा दमानं घे की.."
माझ्या शिव्या ऐकून ब्राऊ ताडकन उठला आणि माझं डोकं खाली आपटलं. बहुतेक मी नॉर्मलला आलो हे ओळखून तो खुशीत आला असणार. मग पहिली गोष्ट त्याने केली ती म्हणजे त्याची थाळी बचाक बचाक करत खाल्ली. अगदी रिकामी होऊन ठण ठण आवाज येईस्तोवर चाटून काढली.
मग लडबडत्या तोंडाने मला येऊन लब्बकन चाटलं.
मी त्याच्या समाधानासाठी आणखी एकदोन शिव्या हासडल्या. मग मुटकुळं करुन पडलो आणि झोपच लागली साली.
उगाच दचकून जागा झालो तेव्हा संध्याकाळ झाली होती. ब्राऊला बाहेर राउंडसाठी न्यायलाच हवं होतं. त्याची वेळ निघून गेली होती आणि तरी शी शू दाबून केविलवाणा माझ्या बाजूला वाट बघत बसला होता. मी आतून दार लावून घेऊन त्याला बाहेरच्या बागेत कुत्रमूत्रासाठी ठेवलेल्या वाळूपर्यंत जायची सोयही ठेवली नव्हती. मला दयाच आली.
त्याच्या नरड्याभोवती दोरखंड लावून बाहेर पडलो. रस्त्याला लागेस्तो एकदम परांजप्या उगवला. झालेल्या राड्याचा वास सगळ्या गावात पसरला असणार. लगेच आला हरामखोर विचारायला. पण मला बरं वाटलं. मी त्याची वाटच बघत होतो. परांजप्या फसफसत्या उत्तेजित चेहर्याने आमच्यासोबत चालायला लागला.
"बेकार धुतला की रे सरांनी जाधवाला?", परांजप्याला विचारायची म्हणा की सांगायची म्हणा, अशी घाई झाली होती जशी ब्राऊला धार मारण्याची.
"हो रे..मला काय आयडियाच आली नाही रे डायरेक्ट मारतील म्हणून.."
"अरे, तुला माहीत नाय काय? जाधवला अॅडमिट केलाय संजीवनीमधे"
मी हादरलोच.
"काय वार्ता करतो..अरे पण काय लागलं नव्हतं एवढं त्याला.."
"हट्..बेशुद्ध झालेला नंतर तो. पाप्याने नेलान संजीवनीत. तिथे लगेच अॅडमिट करुन घेतला.."
माझ्या डोळ्यासमोर सगळं जग फिरायला लागलं. अॅडमिट म्हणजे पोलीस केस ठरलेली. आणि याचाच अर्थ पोलीस सरांसोबत मलाही धरणार. म्हणजे सगळंच जगासमोर येणार.. साला गावभर पंचनामा होणार.. का मारला..? त्या चौकशीत कोणीतरी मराठेचं नाव आणलं तर तीही अडकली.
"परांजप्या.. चल आत्ता माझ्यासोबत यार.. क्लासवर जाऊया.."
क्लासवर पोचेपर्यंत छाती धाडधाड उडत होती. सिक्स्टी राउंडनंतरही एवढी उडली नव्हती दुपारी. हात घामाने सारखे ओले होत होते आणि त्यातून ब्राऊचा कासरा निसटत होता.. ब्राऊला काहीतरी इचकलंय एवढीच जाणीव झाली होती आणि म्हणून तो इमानदारीत सोबत चालत होता.
क्लासच्या शेडचं दार बंद होतं. दाराबाहेर मुतनाळ बसला होता.
"सर कुठेत रे..", मी मुतनाळला विचारलं.
"ते मी सांगू नाय शकत..सरांनी परमिशन नाय दिलेली..", मुतनाळ चेल्यासारखा बोलला.
"अरे.. राडा झालाय मोठा.. सरांनी मारला त्या जाधवला..तो हॉस्पिटलमधे आहे.."
"ते मला काय माहीत नाय. तू जा घरी..आज क्लास बंदच आहे ना रविवारचा..", मुतनाळ थंड होता. सराईत गेंड्याला कसला फरक पडणार आहे असल्या गोष्टींनी..त्याला सगळं माहीत आहे आणि तो कबूल करत नाहीये हे त्याच्या चेहर्यावरुनच माझ्या लक्षात आलं.
"तुला कळत नाय का मुतनाळ्या.. पोलीस असतील ना सरांच्या मागे.. मला त्यांच्याशी बोलायला पाहिजे.."
"सर आत्ता इथे नाहीयेत बोललो ना एकदा..पळ आता", मुतनाळ ओरडला.
....
मला एकदम एकटा पडल्याचं लक्षात येऊन थरथरायला व्हायला लागलं. क्लासकडून हळूहळू घराकडे निघालो. परांजप्याही गप्पच होता. घरापर्यंत पोचलो तर बंद फाटकाबाहेर मोमीन वाट बघत उभा.
"काय रे..?", मी धडधडत विचारलं.. मला आता येणारा प्रत्येकजण काहीतरी गलिच्छ माहिती घेऊनच येणार असं वाटायला लागलं होतं. आणि तसंच झालं.
"पाप्या भेटला होता अँड्य्रूच्या गाडीवर.. केळ्या..जाधव सिरियस आहे..त्याचं काही खरं नाही.."
मग मात्र एवढे दिवसभरातले धक्के विसरून नव्याने पायाखालची धरणी फाटायला सुरुवात झाली.
...
(To be continued..)
प्रतिक्रिया
टर्न..
अरे लवकर पुढचा भाग टाक
भलताच सात्विक संताप ....
हेच म्हणतो
पुन्हा छान ... असेच लिहित
आयला
आत मराठे होती काय ? असेच
बाकी मुतनाळचा उल्लेख आधी आला
गवि ते क्रमशः राहिलय ना रे.
गवि, तुम्ही म्हणजे खम्प्लिट
असेच लिहित रहा.. वाचत आहे +१
मस्तच
ब्लू कोरलात एक एक तास
जरा मोठे भाग लिवा गवि असेच
हाही भाग मागील सर्वांप्रमाणे
जाधव सिरीयस आहे हे ऐकुन
>>मनातुन आसुरी आनंद
तुला असुरी आनंद पण होऊ
आधीच्या भागाप्रमाणेच हाही भाग
हम्म.. जाधव नाटक करत असेल असं
उत्तम भाग
आणखी किती कलाटण्या मिळणार
गवि,
मस्तच पण एवढे बारीक बारीक भाग
मस्त एकदम मस्त ओ गवि, अजुन
अनपेक्षित कलाटणी!! पुढचा भाग
मस्त चाललयं.. तुझ्या ब्राउचं
झ्याक..
कधी हसु तर कधी काळजी..नक्कि
ब्राऊ...६ ?