ती का पडली...
आज दुपारी दुरदर्शनच्या असंख्य चॆनल पॆकी एकावर तो चित्रपट लागला होता. खरंतर त्याच वेळी दुसरी कडे हरे रामा हरे क्रुष्णा लागला होता, पण स्त्रीहट्टापुढे (स्वस्त्री, परस्त्री नव्हे) नाईलाज झाल्याने तो चित्रपट पाहात होतो. त्यातच या अतिशय महत्वाच्या सीननंतर माझ्या ४ वर्षाच्या मुलानं वरील प्रष्ण विचारला. ती का पडली ? त्या संपुर्ण चित्रपटाला कलाटणी देणारा असा प्रसंग,माझी बायको अतिशय गुंग झालेली आणि अचानक हा प्रश्ण, ती का पडली ? बायकोचाच एकदमच मुड्च गेलाच होच.
या चित्रपटाविषय़ी माझे व बायकोची स्वतंत्र व टोकाची व भिन्न (नेहमीप्रमाणे) मते आहेत. तिच्या मते हा पिक्चर, (सारखे सारखे चित्रपट लिहिलं ना की फार अवघड होतंय हो.)फार सुंदर आहे, परिपुर्ण आहे, आणि माझ्या मते सुद्धा हा पिक्चर पुर्णच आहे,फसवणुक,मतिमंदता-शुद्ध मराठीत वेड्छापपणा तर अ.शुद्ध मराठीत येड**पणा या बाबतीत.
अरे आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलं नाही, कोणत्या पिक्चर बद्दल बोलतोय ते. अरे अरे काय ही वेळ आली हो त्या लग्ना -डोहोळजेवणाच्या कॆऎसेट्वर. हांग अक्षी बरोबर लॊक किया जाये हुजुर - हम्म आपके हॆ कॊन.
कचो-या तळणारा प्राध्यापक आणि विश्वविख्यात जगप्रसिद्ध उद्योगपती यांची जोडी पाहिली आणि माझ्या डोळ्यांसमोर द्रोणाचार्य व द्रुपद हीच जोडी उभी राहिली. जरी भगवानांनी संभवामी युगे युगे ह्या वचनाला जागणं विसरलं असेल तरी ही इतर पात्रं जागतात हे पाहुन डोळे भरुन आले, पहिल्याच शॊट्मध्ये. त्यात त्याच्या त्या अशिक्षित किंवा फक्त अर्धशिक्षित कन्या, वाह इथुनच जोड्या सुरु होतात. मग नंतर मुलाला मुलगी बघायला लावली जाते तर तो चित्रंच पाहतो आहे. नव-यापेक्षा घोड्यालाच जास्त उत्साह लग्न जमवण्यात आणि तसेच मुलीकडेही, म्हणजे असं वाटतं की, मोठ्या बहिणिचं लग्न झालं की ही लगेच त्या मंडपात आपल्या प्रियकराला पुढे आणुन लग्न लावुन घेणार आहे.
बरं चला नाच गाणि जोड्या लावा वगॆरे झालं पण त्या धाकट्या घोड्याला जाउ द्या पण या मठ्ठ पोरीला पण तिचं आईवडील आता ’ संदर्भासह स्पष्टीकरण द्या ’ असं कोणत्याही गोष्टीबद्दल सुनावत नाहीत. त्या दोघांत वाढत चाललेली मॆत्री,जवळिक आपल्या सारख्या परक्यांना जाणवते तर त्यांच्या आईबापांनी डोळे का झाकुन घेतलेले असतात ?
लग्नात तर या पिक्चरमधल्या मनुक्षप्राण्यांपेक्षा कुत्रेच जास्त हुशार आहेत हे लक्षात येतं. या मुळेच या घरातले सगळे सो कॊल्ड पुरुष घरांत बसुन गप्पा मारत असताना ते कुत्रं कुठे दिसत नाही, कसं दिसणार ह्यांचे उद्योगधंदे कोण चालवणार मग ते तर ऒफिसात असतं, मिटींग करतं, पॊलिसि ठरवतं वगॆरे. पुढ्च्या लाईनीत चाललेल्या या मतिमंद प्रेमकहाणी पेक्षा सेकंड लाईनला चाललेली दुष्यंत-शकुंतलेची ष्टोरी बरी आणि खरी वाटते, आम्ही पण काही लग्नात अशा लाईनी मारुन घेतल्या आहेत ना ,स्वानुभव अजुन काय.
मला तर पापड आणि बुट हे आयटम जागा बदलुन वापरले असते तरी काही फरक पडला नसता असं वाटतं, अहो बुट सोडा पण पापडावरुन लग्नांत झालेली भांडणं जास्त मजेशीर असतात आणि अनुभवलेली आहेत.
आता बायको उठली आहे, चहा करते आहे, अरे अरे ही ष्टोरी नाही, वर्तमान आहे. थांबवतो आणि उद्या पुन्हा लिहितो नाहीतर चहा मिळायचा नाही.
क्रमश:
हर्षद.
प्रतिक्रिया
12 Dec 2010 - 5:45 pm | चिंतामणी
ती का पडली...
कहानीमें Twist होना चाहीये ना. इसलीये
12 Dec 2010 - 7:38 pm | आत्मशून्य
हा: हा: हा: काही प्रश्नाना ऊत्तरेच नसतात जसे की ....
13 Dec 2010 - 12:26 pm | आदिजोशी
"नदिया के उस पार" ह्या ओरिजिनल चित्रपटात पडली होती म्हणून इथेही भाभी पडली
13 Dec 2010 - 8:23 pm | सुनील
आयला!! शीर्षक वाचून आम्हाला आमचा हा धागा आठवला!!
पुलेशु
13 Dec 2010 - 10:06 pm | अविनाशकुलकर्णी
हम्म आपके हॆ कॊन. सारखाच एक सिनेमा ...हम साथ साथ है ...पाहिला..त्यात सारे नट सारखे खात होते..सार्खा नाष्टा..त्याचे नाव बदलुन ..हम खात खात है..असेच ठेवायला हवे..
14 Dec 2010 - 9:50 am | आंसमा शख्स
सिनेमा फालतूच होता. माझ्या सगळ्या भैणींनी खूपवेळा पाहिला. मी सांगून थकलो की ते तिकिटचे पैसे बँकेत ठेवा पुढे कामाला येतील... आज खरच कामाला आले असते.
15 Dec 2010 - 3:05 am | नेत्रेश
कोल्हापुरला चांगला मोठ्या पडद्यावर पाहीला होता.
या पेक्षा बरेच भंकस पिच्चर्स येतात, पाहिल्यावर अगदी कुठेतरी डोके आपटुन घ्यावे असे वाटते.
त्यापेक्षा कितीतरी छान चित्रपट आहे 'हम आपके है कौन'.
श्रवणीय संगीत, उत्तम सेटस, लोकेशन, सर्वांचा सहज सुंदर अभिनय, बर्यापैकी स्टोरी, आणखी काय पाहीजे.
बाय द वे, हरे रामा हरे कृष्णा मध्ये तरी चांगली गाणी सोडली तर काय आहे?