नमस्कार मित्रांनो ( आणि मित्रांच्या मैत्रिणींनो ) !
मिसळपावच्या कट्ट्यावर दिवसेंदिवस नवनविन सदस्यांची भर पडते आहे.सर्व नविन सदस्यांचे मिपा परिवारातर्फे स्वागत !
मिपाचे रुपडे पालटले आहे. अनेक नवे, चांगले बदल होत आहेत.
ह्या नव्या बदलाबरोबरच अनेक नवे सदस्य मिपावर डेरेदाखल होते आहेत, काही ओळखीचे आहेत तर काहींनी आंतरजालाच्या ह्या 'रोचक' जगतात नव्यानेच प्रवेश केला आहे.
अनेकांसाठी हे वातावरण नवे आहे, जी जागा नवी आहे, माणसे नवी आहेत आणि त्यामुळे त्यांना ह्या एकुणच नव्या वातावरणाची 'नवलाई' नक्की वाटत असेल.
इथल्या जुन्या आणि प्रस्थापित आयडी ( नपेक्षा आयडीमागच्या व्यक्ती ) आपापसात मौजमज्जा, चेष्टामस्करी करताना पाहुन नव्यांनाही ह्यात सामिल होण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे, पण इथे त्यांना अडचण वाटत असेल की "आपली अजुन कोणाशी ओळख नाही, मला कोणी ओळखत नाही, ओळख नसताना मी केलेली मस्करीची इथे कुस्करी तर होणार नाही ... इत्यादी इत्यादी" असे असंख्य प्रश्न असतील तर नव्या सदस्यांना हा धागा तुमच्यासाठीच आहे.
चला, आपण सर्व एकमेकांची ओळख करुन घेऊयात.
तुम्हाला नव्या सदस्यांना इथे काही तुरळक समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी इथले होणारे मित्रच तुम्हाला मदत करतील, पण त्यासाठी आधी ओळख तर व्हायला हवी ना !
द्या तर तुमची ओळख करुन ...
ह्यासोबत माझी मिपाच्या 'जुन्या आणि प्रस्थापित सदस्यांना'ही विनंती आहे की त्यांनीही आपल्याबद्दल ४ शब्द लिहावेत. इथे असणार्या जुन्या-जाणत्यांचे कित्येक फॅन्स आहेत, त्यांना तुमच्याबद्दल वाचायला नक्की आवडेल. :)
ओळख म्हणजे 'खरे नाव' आणि इतर डिटेल्सच सांगावे अशी अपेक्षा नाही, सांगितले तर हरकत नाही. मात्र तुमच्या आयडीबद्दल, आवडीनिवडीबद्दल, छंदाबद्दल अशीतशी अवांतर माहिती हवी आहे. तुम्ही काय करता, कुठे असता ह्यासंबंधी माहिती दिलीत तरीही हरकत नाही.
तुम्ही स्वतःबद्दल काय हवे ते लिहु शकता ...
( मात्र शक्यतो संपर्क क्रमांक आणि इतर व्यक्तिगत डिटेल्स देणे टाळावे )
अवांतर :
माझी ओळख मी ह्याच धाग्यावर एका सेप्रेट प्रतिसादातुन करुन देईन ...
( तसेही सर्वजण मला ओळखत असतीलच की ) ;) हॅ हॅ हॅ !!!
ता.क. :
१. ह्या धाग्याचा वापर केवळ उपरोक्त कारणापुरताच व्हावा अशी अपेक्षा आहे. इथे ओळखीतुन नव्या सदस्यांना थोडेसे हलकेफुलके वातावरण उपलब्ध करुन देण्याचा हेतु यशस्वी व्हावा व त्याला सर्वांकडुन साथ मिळावी अशी अपेक्षा.
२. माफक थट्टामस्करी चालणार असली तर धागा भरकटु नये ह्याची काळजी घ्यायला 'संपादक मंडळ' समर्थ आहे.
प्रतिक्रिया
10 Aug 2010 - 4:54 pm | मितभाषी
ठॉऑऑऑऑ =)) =)) =))
बिकाशेठ चालु द्या. श्रावणाच्या शुभेच्छा!!! ;)
भावश्या.
11 Aug 2010 - 1:36 am | संदीप चित्रे
कस्सला हसलोय रे बिका :)
11 Aug 2010 - 10:27 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
"अश्लील अश्लील" टिंग्या लिहीणार। मी फक्त कॉपी-पेस्ट करणार।
बिका माझीच कॉपी मारणार। हशा आणि टाळ्या निश्चित॥
23 Aug 2010 - 4:36 pm | दाद
काय पन दाद आहे
10 Aug 2010 - 5:13 pm | विजुभाऊ
टिंग्या अगोदर छोटी टिंगी नाव लावायचा. कोण्या एकाने मझ्यशी मयत्री कर्नार क? हे हे हे कल्जी घेने"
असे विचारल्यानन्तर टिंग्या घब्रला. आणि तो एकदम छोटी टिंगीचा ब्रिटिश झाला.
बाय द वे टिंग्या माझा दुशली ब मद्ला मित्ल हाये
10 Aug 2010 - 4:21 pm | archana2285
मी अर्चना,
तशी मी मिपावर वाचक म्हनून जुनीच आहे, परंतु ID आताच मिळाल्याने नवीन.
मी IT wife :) आहे, आणि स्वयंपाकही छान येतो. वाचनाची फार आवड असल्याने जालावर सहज मिपाची माहिती मिळाली आणि आता दिवसातून किमान १० वेळा तरि मिपा बघितल्याशिवाय दिवस जात नाही. लिहायचा कंटाळा कारण मराठी टायपिंग ची सवय कमी. पण आता आय डि मिळाल्याने मराठी लिहायची सवय वाढवेन.
ऑफिसच्या कामातून वेळ मिळाल्यास चित्रकला, पाककला, शिवणकाम, बागकाम, आणि इ अशा खूप काही कला....
सध्या वास्तव्य : मुंबई
तुम्हा सगळ्या नव्या, जुन्या आणि प्रस्थापित सदस्यांना राम राम...!!!
जास्त काही लिहीत नाही परंतु एकच सांगावेसे वाट्ते की हॅट्स ऑफ टू ऑल यू पीपल हू आर पुटिंग देअर हार्ड अँड सोल एफर्टस इन किपींन मिपा ऑन टॉप.
एवढे बोलून मी माझे ४ (??) शब्द संपवते.
10 Aug 2010 - 4:38 pm | अण्णु
नमस्कार !! मी अण्णु !!
तोच हो आपला ... अण्णु गोगट्या ... कोकणातला :)
मिपावर तसा बर्याच दिवसापासुन आहे... पाहुणा म्हणुन. त्यामुळे सर्व लोक ओळखीचे आहेतच.
गेल्या आठवड्यात तात्यांची कृपा झाल्यने आत्ता तुमच्या समोर येऊ शकलो.
पुण्यात एका I.T. कंपनीमध्ये आहे ... सध्या मिपावर पडीक
असेच चांगलेचांगले लेख वाचायला मिळतील ही अपेक्षा .... :)
10 Aug 2010 - 4:44 pm | स्पंदना
हलो!
लेखाव्यतिरिक्त कुणाशीही बोलण्याची ही पहिलीच वेळ.
खोट आवडत नसल्याने माझ नाव ही खरच ,'अपर्णा' अन 'अक्षय' माझे धनी.
मुळची कोल्हापुरची पण लग्नानंतर फिरस्ती! हल्ली मुक्काम "सिंगापोर".
पोरकेपण म्हणजे काय हे माहित असल्यान सर्वांशी जमेल तेव्हढ चांगल वागायचा प्रयत्न करते मी. पण जर कुणी फारच आडव्यात गेल तर थोडाबहुत लवंगी मिरचीचा ठसका देते मी.
लिहिण हा जन्मजात वारसा किंबहुणा लिखाण हे एकच मन मोकळ करायच ठिकाण. चेष्टा मस्करी, खदखदुन हसण्याची अतिशय आवड.
स्त्री वा पुरुष पेक्षा 'माणुस' ही संकल्पना भावते मला. दुसर्याच चांगले गुण अगदी त्याच्या वाइट वागण्यातुनही ओळखण्याची क्षमता बाळगते मी. स्वतः साठी च नाही पण दुसर्या साठी सुद्धा उभारहायची ताकद बाळगते मी, त्या मुळे बघाव तेंव्हा कुठे तरी जगाच ओझ घेउन फिरते अस 'धनी' म्हणतात.
10 Aug 2010 - 4:45 pm | अवलिया
या धाग्यावर अनेक अनावश्यक प्रतिसाद आहेत. त्यात अनेक संपादकांचे पण आहेत, संपादक मंडळाला आव्हान आहे.. ते प्रतिसाद उडवुन दाखवावे.
10 Aug 2010 - 4:48 pm | बिपिन कार्यकर्ते
नानासाहेब!!! हा धागा सर्वांची ओळख व्हावी, हलकी फुलकी दंगामस्ती व्हावी जेणेकरून ओळख वाढावी इत्यादी उद्देशाने काढला आहे. इथे माफक दंगा केला तर चालेल असेही धाग्याच्या प्रवर्तकाने लिहिले आहे. म्हणून चालू आहे. असो.
- (सदस्य)
10 Aug 2010 - 4:51 pm | अवलिया
चला हरकत नाही. या निमित्ताने कसे नियम सोईस्कर बदलले जातात (धागाप्रवर्तक जर संपादक मंडलापैकी नसते तर काय झाले असते?) हे सुद्धा नव्या सदस्यांना समजेल. नाही का? ;)
10 Aug 2010 - 5:08 pm | छोटा डॉन
:)
जाऊ दे नाना, आता ह्या इथे दंगा नको. आमच्या 'मौना'चा योग्य तो अर्थ समजुन घ्यावा व कृपया आम्हाला आमच्या मौनाचेच सुख उपभोगण्याचा आनंद घेऊ द्यावा :)
प्रतिसादही भरपुर उडवता येतील आणि बर्याच प्रकारची उदाहरणेही बरीच देता येतील पण त्याचे हे स्थळ नव्हे.
धागा वेगळ्या उद्देशाने काढला आहे, चालु द्यावा, उगाच नव्या सदस्यांना पहिल्याच घासात खडा नको.
प्लीज, समजुन घ्या ...
10 Aug 2010 - 6:39 pm | धमाल मुलगा
सगळं चांगलं चालु असताना असं खीळ घालण्याच्या विघ्नसंतोषी प्रयत्नांबद्दल जाहीर निषेध.
10 Aug 2010 - 4:47 pm | घाशीराम कोतवाल १.२
राम राम मंडळी
मी घाशीराम कोतवाल बक्कल क्रमांक ८६३
मिपा वरचे सदस्य कालावधी
2 वर्षे 14 आठवडे
आवडती पुस्तके आणि लेखक
वाचायची होती म्हणुन बरीच वाचली,आता नक्की कोण वाचली,कुठे वाचली..कशी काय वाचली हे सांगणे कठिण आहे.. काही चावली, काहींची चव आवडली,काही बेचव निघाली,म्हणतात ना..वाचाल तर वाचाल..म्हणुन वाचतोय..म्हणुनच वाचलोय..म्हणजे वाचत आलो म्हणुन..वाचतोय..चायला काय कटकट आहे..डोकं पार झिजुन गेलयं..
थांबा ! हे वाचुन काहिसे गोंधळलात ना??
माझेही असेच होते पुस्तकं वाचल्यावर..
10 Aug 2010 - 5:00 pm | मैत्र
बिल्ला क्रमांकाने जुना. मिपावर थोड्या लोकांना ओळखतो. प्रत्यक्ष भेटीचा योग यायचा आहे.
पुणेकर. या वर्षीच बंगळुरास आगमन झाले आहे. डानबाबा बंगलोरी यांच्याशी एकदा संवाद साधला आहे अजून दर्शन नाही.
फारा पूर्वी काही लिहिले होते असे वाटते :)
अधून मधून लेखापेक्षा मोठ्या प्रतिक्रिया लिहितो :)
मिपाच्या प्रवासातल्या बदलांमध्ये काही उत्तमोत्तम लेखकांमुळे आणि इथल्या जिवंतपणामुळे, चैतन्यामुळे येत राहतो.
हापिसात काम नसले कधी तर दिवसभर रिफ्रेश करत राहतो :)
सगळ्यात आवडते लेखक रामदास काका. इतरही अनेक आहेत. खोबार, पुष्करिणींचे लेख, क्लिंटनच्या लेखमाला, तात्यांचे अचानक येणारे व्यक्तिचित्र, व्हाळ ते फ्रांकफुर्ट आणि चतुरंगांनी लिहिलेल्या सावरकर काकांची लेखमाला, असंख्य उत्तम धागे आहेत. टार्याच्या काही intelligent प्रतिक्रिया आणि unlimited सह्यांमुळे खूप हापिसातल्या चिडचिडीचे दिवस सुसह्य झाले. मिपावर काय आवडते / आवडले यावर एक स्वतंत्र धागा काढता येईल इतके उत्तम लेखक आणि धागे आहेत :)
असो तर यामुळे येत राहतो.
व्हॅल्युजच्या फुग्यावर जगाला बनवणार्या कंपनीत पाट्या टाकतो आहे सो कॉल्ड कन्सल्टंट म्हणून.
मिपाचे नवे रुप सोयींनी जास्त चांगले आहे. पण जुन्यात मजा होती हे खरे. एवढ्यात चांदण्यांना फाट्यावर मारून सुपर अवांतर प्रतिक्रियांचा महापूर चालू आहे त्यामुळे थोडे बोअर होते. काही झकास नवे लिखाण वाचायला मिळाले नाही काही दिवसात.
वाचायला आवडतं. नुकताच नवा कॅमेरा घेतला आहे. प्रयोग चालू आहेत. ते जालावर चढवायला वेळ झाला की टाकेन.
तोवर वाचन मात्र...
मैत्र..
10 Aug 2010 - 5:01 pm | सुत्रधार
मी सुत्रधार,
नावात बरच काही ....त्यामुळे सांगत नाही
मिपावर आवड : छोटा डॉन, चतुरन्ग, बिका, अवलिया, जागुतै, ईत्यादि (सदस्य आजुन नक्की वाढतील)
कलादालन आणि पा़क कृति एकदम भन्नाट .... विड्न्बन ... बाकि सर्व वाचनीय
ओळख परेड हवीच होती.
द्विपदवीधर, सध्या वास्तव्य पुण्यात, वेळ काढून गावाकडे जातो. शेती आणि शेतकरी जवळून पाहिलय अन् अनुभवलय. शाकाहरी
मराठी वाचन अन तेहि नेटवर.... अचानक मिपा साईट सापडली. वेड केलय ह्या लेखन साहित्य अन त्यामागील तन्त्राने.
भेटु असेच कधितरी
आपला स्न्नेहान्कीत,
सुत्रधार
10 Aug 2010 - 5:03 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
शिकाऊ उमेदवार..
घाई,गोंधळ करुन चुकीचे,दोन दोन्,आणि बू च कळ्यात टाकणारे धागे चढवण्यात मि.पा. नोबेल देइल...थोड्याच दिवसात.
बाकी पुस्तकं,गाणं,खाणं,पिणं...प्रचंड आवडतं.
खाण्याच्या काही खास आवडी :
alphabet C ने चालू होणार्या काही गोष्टींवर प्रचंड प्रेम.... e.g. Chocolates,Cakes,Cheese,Coffee,Cheesecake and ...Chivas.
10 Aug 2010 - 5:10 pm | पॅपिलॉन
नमस्कार!
माझे मूळ नाव पॅपियाँ. पण इथे ते कळणार नाही म्हणून त्याचे पॅपिलॉन असे मराठीकरण केले आहे.
नावाप्रमाणेच मी स्वच्छंदी आणि लहरी. म्हणूनच येथे अगदी नियमितपणे अनियमित!
तसा मी जुना सदस्य पण फारसा कुणाला ठाऊक नसावा कारण मिपावर माझी चक्कर दर तीन-चार महिन्यातून एकदा होते. आणि आलो तरी, कवितांखेरीज अन्यत्र फारसा फिरकत नाही.
बाकी, कधी भेट होण्याची शक्यताच नसल्याने, गाव-पत्ता वगैरे सांगण्यात हशील नाही.
राम राम!
10 Aug 2010 - 6:04 pm | सुहास..
राम-राम मंडळी ,
मी सुहास.... (जन्मदात्यांनी नेमक स्वभावाच्या विपरित नाव ठेवलय, आम्ही आख्ख्या आंतरजालावर राडेबाज म्हणुन कुप्रसिध्द आहोत!!आणी चिडचिडेही !!)
देवगिरी किल्ल्याच्या बाबतीत मटावर बिरुटेसंराच लिखाण वाचताना मिसळपाव पहिल्यांदा पाहिले (मला खात्री होती की बिरूटे आमच्या औ.बाद चे असणार म्हणुन दिलीप बिरूटे हे नाव गुगलल होते , पहिले दहा निकाल "दिलीप बिरूटे" - मिसळपाव.कॉम, "दिलीप बिरूटे"-मिसळपाव.कॉम असे आले.)
काय को-ईसिडन्ट होता, मिपा वर आलो त्याच दिवशी आख्ख पुणे पेटलेलं होतं आणी ईतर मराठी पुणेकरांविरूध्द , अर्थात आम्ही ही जाज्वल्य अभिमान्यांपैकी एक होतो , पण आमच नशीब आंतरजालाबाबत फुटकं (ईथे आमच्या सहचारिणीचा संदर्भ आहे,काही सुज्ञ मिपाकर ओळ्खतीलच)असल्याने आम्हाला त्या दिवशी(त्या दिवशी कसल, चांगला तीन दिवस वाद पेटलेला होता.) केवळ वाचनमात्रच रहाव लागल.त्यानंतर आम्ही ईथे जन्म घेण्याचा जोरदार प्रयत्न केला, आणी एक दिवस आम्हाला आयडी मिळाला ..एक नाही दोन मिळाले..(ज्या आयडी ने आता लिहीतोय, तो आम्हाला मिळालाय हे काल परवापर्यंत आम्हाला स्वताला देखील माहीत नव्हत.)
अर्थात आमची वाटचाल खुपच छान होती ..आमच्या पहिल्या-वहिल्या एकोळी धाग्याला आम्ही ५० प्रतिसाद खेचले.
मग आम्ही काही फुटकळ,काही-बाही लिहुन दिवस काढले आणी एक दिवस ,अपाची 'कट्ट्यानंतर' एक 'धमाल कार्ट' नावाचं भुत आमच्या खवत आल.(मित्रांचा मित्र,दुष्मनांचापण मित्र, पण एक नंबरचा...हॅ हॅ हॅ) आणी तोवर आम्ही सौताचा कंपु डेव्हलप केला होता(त्याला ईथली काही खवचट मंडळी 'डावा' कंपु म्हणतात.)अशाच काही करामती झाल्या आणी अजुन काही मित्र बनले, त्यात पुपे,राक्या(हा मल्टि-टॅलेन्टेड मॅन ईथे मराठमोळा ह्या नावाने ओळखला जातो )सागर(ह्याच्या विषयी मला सविस्तर लिहाव लागेल कधीतरी) आणी सॅन्ड्या,परा,मनिष ह्यांच नाव अग्रगण्य आहे ...
एक दिवस प्रसन्न केसकरांना भेटायच म्हणुन निघालो आणी परतताना विचार-मळभ लिटरली क्लीन झाल्यासारखे वाटले. प्रॅक्टिकल जगात,राजकारण-समाजकारणाची सांगड घालताना ज्या खाच-खळग्या मी भोगायचो,त्या ह्या माणसाने माझ्या कितीतरी आधी भोगल्या होत्या,फरक होता तो हा की त्यांच्याकडे त्या कचाट्यातुन निघण्याचे मार्ग होते आणी माझ्या कडे नव्हते.सलाम !! आणी त्याच दिवशी आणखी एका महाभागाला भेटलो. त्यांच नाव श्रावण मोडक(मला एक वेगळा लेख लिहावा लागेल , लिहील लवकरच, अर्थात परवानगी मिळाली तर.)
त्यानंतर अशाच एका कट्ट्याला एका 'कार्यकर्त्याशी' ओळख झाली.लोक्स त्यांना बिपीन कार्यकर्ते म्हणुन ही ओळखतात,
(मित्रांनो , माझा एक सल्ला आहे ,जर ह्या माणसाने तुम्हाला काही सल्ला दिला तर अजिबात ऐकु नका.) माझे अनुभव,ह्यांना सांगत असताना, ते लिहुन काढ अस सांगणारे हेच ते !! आज माझी खव,मेल-बॉक्स ,ह्याचा दुसरा भाग कधी, त्याच्या पहिला भाग कधी, ते कधी लिहीणार आहेस , हे कधी लिहीणार आहेस, ते ह्यांच्या कृपेमुळे, पण ह्याच व्यक्तीमत्त्वामुळे आणखी काही नग(शब्द यथार्थ नाही पण तरीही) माणसांना भेटलो.
१) केशवसुमार (ह्या माणसाबरोबर कधीही कट्ट्याला बसु नये ,हसुन-हसुन मराल ,खात्री मी देतो. जर नाही मेलात तर पुढचे सात दिवस भांग पिल्यासारखे हसत रहाल !!)
२)मुक्तसुनीत (कट्ट्याला चांगले फर्लांगभर लांब बसलो होते पण आमची जेवणाची चॉईस एकच आणी राजा माणुस !!)
३)ब्रिटीश टिंग्या (सर्वात ह्याला माणुस का म्हणावे हाच प्रश्न आहे,मिपाचा पहिला कट्टा करणारा हा प्राणी एक नंबरचा हलकट आहे, मी ह्याला विचारतो काय रे ? तु कुठल्या स्किल्सवर काम करतो, हे बेण मला सांगत .हॅ हॅ हॅ ...आता आमच्र स्किल्स काय सांगायचे, नेमके कुठल्या क्षेत्रात विचारतो आहेस.)
...थकलो यार लिहुन ...प्रतिसाद पण क्रमश करण्याची वेळ आली ..सॉरी बॉस
10 Aug 2010 - 6:46 pm | प्रसन्न केसकर
मस्त लिहिलस रे सुहास.
मिसळपावची खासीयत म्हणजे इथल्या लोकांकडुन सतत मिळणारं प्रोत्साहन. मी नविन असताना सहजच मुलाच्या शाळेच्या पहिल्या दिवसावर काहीतरी खरडुन टाकलं अन लगेचच पाच सात प्रतिसाद आले पण. बिकानं तर खरड टाकुन अजुन लिही म्हणुन सांगीतलं. त्यामुळंच डायरी लिहायची स्फूर्ती आली. खरं तर डायरी लिहित होतो तेव्हा मी नक्की कोण हे फारसं कुणालाच माहिती नव्हतं. सगळ्यांच्या संशयाची सुई श्रावणकडे अन त्यालापण माहिती नव्हतं मी कोण ते. जेव्हा आमचं बोलणं झालं तेव्हा आम्ही दोघंपण मनमुराद हसलो. खुप लोकांना संशय होता श्रावणच पत्रकारितेची धुणी धुतोय चव्हाट्यावर म्हणुन पण त्यानं शेवटपर्यंत उघड नाही केलं मी कोण ते. घाटपांडे काका, छोटा डॉन, बिका, श्रावण, धमाल मुलगा, अदिती, निखील, मस्त कलंदर, टारझन, तात्या... प्रोत्साहन देणार्यांची नावं तरी घ्यायची किती?
अन इथंच जिवाला जीव देणारे मित्र भेटले. कुठुनतरी नेटकरी मित्रांनी माझी जन्मतारिख मिळवली अन मला वाढदिवसाची झक्कास सरप्राईझ पार्टी दिली. वर शुभचिंतन करणारा धागा पण काढला. तब्बल २० वर्षांनंतर साजरा झालेला तो वाढदिवस मी जन्मभर विसरणार नाही.
अन जेव्हा गरज पडली तेव्हा इथलेच मिपाकर प्रत्यक्ष कधी भेटलेले नसतानाही मदतीला धावले. रात्र जागुन काढली निखीलनं माझी आई आजारी होती तेव्हा. तिला दवाखान्यात पण अॅडमिट त्यानंच केलं. त्या रात्री नंतर मी, माझा एक नातेवाईक आणि निखील चहा पीताना माझ्या नातेवाईकानं विचारलं, "तुम्ही कसे एकमेकांना ओळखता?" आम्ही जेव्हा उत्तर दिलं की आम्ही आंतरजालामुळं एकमेकांचा ओळखायला लागलो तेव्हा त्याचा थक्क चेहरा, आश्चर्याने विस्फारलेले डोळे अन आ वासलेलं तोंड अजुन आठवतं अन हसु येतं.
10 Aug 2010 - 6:06 pm | रेवती
रेवती या टोपणनावाने वावरते. रेवथी ;) ही दाक्षिणात्य अभिनेत्री एकेकाळी आवडत असे.
सध्याचा छंद: प्रतिसाद अप्रकाशित करणे.
पुणेकर आहे. सध्या हरितदेश, पूर्वकिनारा.;) येथे वास्तव्य!
10 Aug 2010 - 7:25 pm | केशवसुमार
सध्याचा छंद: प्रतिसाद अप्रकाशित करणे.
रेवतीतै म्हणजे पाध्ये पाध्ये म्हणतात त्या तुम्हीच का?
(शंकेखोर)केशवसुमार
10 Aug 2010 - 11:27 pm | रेवती
होय केसू, बरोबर ओळखलेत. मीच ती पाध्ये! ;)
11 Aug 2010 - 1:41 am | संदीप चित्रे
अहो ताई पण ती अभिनेत्री कुणाला आवडत असे?
तुम्हाला की तुमच्या यजमानांना ? ;)
10 Aug 2010 - 6:19 pm | धमाल मुलगा
मस्त धागा रे डान्या. :)
इनोबानं दोन सव्वादोन वर्षांपुर्वी चालु केलेल्या ओळखपरेडीतुन खुप खुप मित्र भेटले...आता ह्या धाग्यातुनही आणखी असेच पुष्कळ मित्र मि़ळतील अशा इच्छा बाळगतो. :)
माझ्याबद्दल काय सांगु दोस्ताहो?
शहाण्याने स्वस्तुती करु नये म्हणतात, पण आम्ही मुर्खशिरोमणि आहोत. दासबोधातील मुर्खांची सर्व च्या सर्व लक्षणं अस्मादिकांस तंतोतंत लागु पडतात. असो,
मी कैवल्य, कैवल्याचा मागमुसही नसलेला, तशी आपल्याकडे पध्दतच आहे नाही, माणसाच्या १००% विरोधी त्याचं नाव असावं अशी? :)
माझी आवड म्हणाल तर मित्र गोळा करणं. ह्या आवडीला बहर आला तो मिपामुळं..बसल्याजागी खुप मित्र-मैत्रिणी मिळाले.. अगदी असं वाटावं की आम्ही शाळेपासुन सोबतच आहोत इतके जवळचे मित्र-मैत्रिणी.
आमच्याबद्दल आणखी जाणुन घ्यायचंय? (कशाला घेता? मिळणार काय म्हणा त्यातुन !)
10 Aug 2010 - 6:52 pm | विकास
वास्तवीक तुमची वोळख, "बारामतीचा बुलंद आवाज" अशी असली पाहीजे असे मला वाटते. :-)
10 Aug 2010 - 7:09 pm | धमाल मुलगा
हा हा हा.....
का विकासअण्णा आमच्या पाटबंधार्याला बळंच कृष्णाखोर्याची उपमा देताय? ;)
10 Aug 2010 - 7:11 pm | प्रभो
मस्त रे धम्या..
दुसर्या पानावर जायचा कंटाळा आल्याने आमचं वरातीमागचं घोडं इथेच... :D
मी प्रतिक....एका मित्राच्या(प्रमेय) बायकोने मला मिपाची लिंक दिली..वाचत राहिलो..कॉलेजफ्रेंड टार्या दिसला...सदस्य झालो.....
मिपामुळे अधून मधून लिहायची संधी मिळीली....छान छान मित्र मैत्रीण मिळाले... इकडे अमेरिकेत आल्यावर जवळ कोणी नातेवाईक नसताना जीव लावणारे रंगाशेठ-रेवतीताई-प्राजूतै-चित्रातै-विकासदादा (सगळे संपादकच) मिळाले.
काय बोलू अजून... :)
11 Aug 2010 - 1:43 am | प्रमेय
का बे,
लै छान छान वाटतयं का?
बाकी,
मी प्रमेय!
सध्या मेक्सिकोत...
जूना वाचक, अल्प लेखक.
रामदास, मास्तर, तात्या, बिका, अवलिया ही मोठी मानसं...
जिंदगी बघणारी... आपण छोटे.... (आपण म्हणून घेउन पण छोटे... ;D)
10 Aug 2010 - 6:50 pm | चिर्कुट
मी चिर्कुट..
मूळचा इचलकरंजीचा आहे. सध्या पुण्यात 'मैत्र'सारखाच व्हॅल्युजच्या फुग्यावर जगाला बनवणार्या एका कुंपणीत पाट्या टाकतोय..
मिपावर खूप कमी लिहितो..रोज वाचनमात्र मात्र अस्तो.. ;-)
मिपाकरांपैकी फक्त टारझन बरोबर एकदा बोललो आहे..
बाकी कुठ्ल्याही विषयावर दळण दळण्यात १ लंबर आहे.
मिपाच्या बर्याच लेखकांचा फ्यान..
- चिर्कुट.
10 Aug 2010 - 6:53 pm | प्रचेतस
मी वल्ली-- सागर. राहायला चिंचवडला. सह्याद्री भटकण्याची खूप आवड. निसर्गाची अनिवार ओढ. मिपावरील भटकंतीच्या लेखांनी मिपावर ओढलो गेलो व मिपाचाच होउन गेलो. विमुक्ताचा, बज्जुचा चाहता.
मिपावरील विविध लेख व त्यावरील खुसखुशित प्रतिक्रीया वाचायला खूपच आवडतात.
10 Aug 2010 - 6:58 pm | कानडाऊ योगेशु
मी योगेश.(आडनाव मुद्दाम लिहित नाही कारण आडनाववरुन माणुस धर्म जात शोधण्याच प्रयत्न करतो..साभार फ्रॉम वेन्सडे! :P )
बेंगळुरात असतो.
मिपा वर कसा आलो बरे?
बहुदा ह्या ब्लॉगवरुन त्या ब्लॉगवर उड्या मारत असताना कुठल्यातरी ब्लॉगवरुन मि.पाची लिन्क मिळाली.
४-५ कविता इथे टाकल्या होत्या पण न चालणार्या दुकानासारखेच फारच कमी मिपाकर तिकडे वळले.
कदाचित खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसल्याने तसे होत असेल असे वाटल्याने खरडवही द्या खरडवही द्या अश्या बोंबा मारल्या त्यासाठी दिसेल त्या धाग्यावर काहीबाही प्रतिक्रिया दिल्या.शेवटी जवळपास वर्षभराने खरडवहीची सुविधा मिळाली.
सध्या माझा स्वतःचाच एक कंपु आहे आणि त्याचा मी एकमेव मेंबर आहे.
(बंगळुर मधल्या मिपाकरांना भेटण्याची इच्छा आहे.)
- कानडाऊ योगेशु
10 Aug 2010 - 7:07 pm | भारतीय
नमस्कार,
मी भारतीय.. व्यवसायाने स्थापत्य अभियंता आहे.. शिवनेरीच्या पायथ्याजवळ माझे जन्मगांव.. शिक्षणभूमी व कर्मभूमी पुणेच.. लोकमतच्या 'ऑक्सिजन' पुरवणीत बर्याच मराठी संकेतस्थळांबद्दल छापुन आलं होतं, पैकी फक्त मिसळपावचे नाव ध्यानात राहीले व एकदा मिसळपावला भेट दिली.. तेंव्हापासून मिसळपावचे वेडच लागले. सदस्यत्त्वासाठी अर्ज केल्यानंतर खूप (अगदी खूपच!) कालावधीनंतर सक्रीय झालो. ईथले लेख खूपच छान असतात हे वेगळे सांगणे न लगे.. ईथे (सध्यातरी) प्रतिसादमात्र अस्तित्त्व आहे..
मिसळपावच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा..
10 Aug 2010 - 7:14 pm | बिपिन कार्यकर्ते
अरे अजून बरेच जुने लोक राहिले आहेत ओळख द्यायचे... आटपा बरं पटपट...
10 Aug 2010 - 7:19 pm | धमाल मुलगा
जुन्यांचं बहुतेक 'जुनवधु प्रिया मी बावरते' चाललं असावं. :D
10 Aug 2010 - 7:59 pm | शुचि
ही ही ही ........ अच्ल्त !! =))
10 Aug 2010 - 10:59 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
काहिही बोलुन राहिले का ओ तुमी आजकल?
जुनवधु प्रिया मी बावरते??
... हि हहहहहिहिहिह्.....मस्त्.....खुप हसवलस!
10 Aug 2010 - 7:23 pm | भाऊ पाटील
मी भाऊ पाटील--मित्रांनी दिलेले टोपणनाव
बिल्ला नं--माहीत नाही
राहणार्--सध्या पुणे
नवीन सदस्य आहे. ऑफीस मधे काम नसेल तेव्हा मिपावर येतो.
रोज एका खिडकीत मात्र मिपा उघडुन ठेवतो. बॉसचा डोळा चुकवून कधीतरी प्रतिक्रिया लिहितो.
मराठी टायपिंग अजुन शिकतो आहे, त्यामुळे खूप वेळ लागतो ४-५ ओळी लिहायलासुद्धा.
10 Aug 2010 - 7:21 pm | शुचि
मी शुचि. सन्जोपरावांच्या लिखाणाची निस्सीम चाहती अशी ओळखच मला आवडेल.
___________________________________
वास्तव्य - अमेरीका
पायाला सदैव चाकं.
आवड - अध्यात्म, ज्योतीष, मानसशास्त्र
अरुंधती, अपर्णाअक्षय,पुष्करीणी,आदिती,जाई, माया यांचं लिखाण देखील खूप आवडतं.
अमेरीकेनी पायाला चाकं दिली पैसा दिला. मिपानी मनाला पंख दिले, कोमलता परत जागवली, हळूवार भावना ज्या करपू पहात होत्या त्यांवर संजीवनी शिंपडली.
मिपा रॉक्स.
10 Aug 2010 - 8:36 pm | धमाल मुलगा
क्या बात है!
मस्त गं शुचि. :)
10 Aug 2010 - 7:24 pm | रामदास
मी रामदास. जुना सदस्य.
लेख, कविता ,कथा लिहीतो. (क्रमशः या रोगाची लागण झाली आहे.)
वयानी ज्येष्ठ वयोगटात.
माझ्या सोबत मी विनायक प्रभूंना घेऊन आलो.
आता इथेच स्थायीक झालो आहे.
10 Aug 2010 - 7:27 pm | मी-सौरभ
असच रिकाम पणी फिरता फिर्ता ईथे आलो ईथला झालो :)
मी पन पुन्यातच हाय पन माझा जिला पुने हाय शहर नाय..
एका मिपाकराचा पंका झालो थोडी वळक बी झाली पन आता तो मिपावरून बाद झालाय :( (हो हो टारुभौ...)
(आता पुस्तकी मराठीत...)
मी एक वाचनाच आणि मित्र जमवायच वेड असलेला मुलगा आहे. वाचन भरपूर पण लेखन काहीही नाही. खफ वर थोडं टंकतो ....
रामदास , तात्या, मिभो, जे पी , गणपा ते नविन प्रविन्भपकर सगळ्यांच लेखन वाचतो :)
(कंपुबाज नाही हं मी)
जय महाराष्ट्र!!
10 Aug 2010 - 7:54 pm | दत्ता काळे
मी दत्ता काळे. पूर्वी मिपावर 'बाळकराम' ह्या नावाने वावरत असे. ( कविता करंत असे ).
गुगलवर 'मिसळपाव ' ह्या पदार्थाचा सहज सर्च मारत असताना. हे संकेतस्थळ कळाले. आवडले. मग इथे लिहायला लागलो. वास्तव्य : पुणे
10 Aug 2010 - 8:02 pm | मस्त कलंदर
मी मस्त कलंदर.... आणि हो, नावावरून वाटते तसे मी "तो" नाही, "ती" आहे.
मी नावाप्रमाणेच मस्त कलंदर आहे... एक वेळ लेख लिहिन.. पण प्रतिसाद लिहायचा लै कंटाळा आहे.. तरी कधी कधी एखाद्या पुण्यवंताला मिळतोच प्रतिसाद आणि चोता दोन ला सतावण्याच्या खरडी/लेख्/प्रतिसादाला मात्र हमखास मिळतोच मिळतो. पुस्तके, गाणी आणि कै तरी रंगवण्यात, बनवण्यात रमलेला मस्त जीव!!!
मी शिष्ट नाही पण आंतरजालावर स्वतःहून नवीन लोकांशी संवाद साधायला जात नाही. अर्थात यालाही अपवाद आहेच. पण स्वतःहून कुणी बोलायला आले तर तिरसटपणा दाखवत नाही. आणि एकदा मैत्री केली की त्याला खरडवह्यांमध्ये दंगा घालून, आख्ख्या कंपूला बोलावून छळल्याशिवाय सोडतही नाही.
पक्की कंपूबाज-मक
10 Aug 2010 - 8:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नमस्कार, मी दिलीप बिरुटे, आता प्राडॉ अशी जालावर ओळख होत चालली आहे. प्रा आहे आणि डॉ.ही आहे. महाविद्यालयात मास्तरकी करतो. मराठी संस्थळावर बर्याच वर्षापासून आहे. फार कमी लिहितो. खूप वाचायला आवडते. त्यातल्या त्यात कविता वाचायला आवडते. विनोदी, मिश्कील लेखन मला आवडते. लेखन वाचतांना चेहर्यावर स्मायली उमटणार नसेल तर जीव गुदमरतो असे वाटते. प्रसंगी गंभीर आणि सामाजिक लेखनही आवडतेच. माझ्या मित्रांशी मला तुकारामावर बोलायला आवडते. प्रतिसाद डकवत भटकंती करणे हा माझा जालावरील छंद आहे. मराठी संकेतस्थळाने खूप मित्र दिले आहेत. इथे एक नवीनच जग निर्माण झाले आहे. लोक आभासी जग म्हणून या जगाकडे पाहतात. पण, लोक भावनिक होऊन एकमेकांशी जोडलेले जातात हेही मला माहित आहे. भावनिक होतांना प्रसंगी बुद्धीही वापरली पाहिजे याचेही पक्के शिक्षण येथेच मिळाले. कितीही ठरवतो आता नेटावर यायचं नाही. पण, नेटाची सवय सुटत नाही. नेटाने वयक्तिक आयुष्य व्यापून घेतले आहे. ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास मला मराठी जालाची खूप मदत झाली. जालावर वावरतांना मान, अपमान, राग, लोभ, आनंद आणि कौतुकही सहज पचवतो. सध्या मिपावर व्यवस्थापकाने दिलेले संपादकाचे काम चोख बजावतो.
[बस का रे छोटा डॉन की अजून काही लिहू....]
-दिलीप बिरुटे
11 Aug 2010 - 11:37 am | गुंडोपंत
या सरांचा मी पंखा आहे...
सरांनी अजून लिहायला हवे असे वाटते.
आपला
गुंडोपंत
10 Aug 2010 - 8:06 pm | आप्पा
मी आप्पा कुलकर्णी, शाळेपासुन आठवते तेव्हा पासुन आप्पा.
मुळ सोलापुरचा बालविकास मंदीर, सिध्देश्वर प्रशाला, दयानंद चा विद्यार्थी
१९७७ पासुन ठाणेकर, एका कंपनीत सिस्टीम अॅडमिनीट्रेटर, नंतर डिझायनर, काही काळ युनीयन सचीव,
मुळात एक वाचक.
गेली पाच वर्षे चिंचवड येथे स्थाईक.
10 Aug 2010 - 8:15 pm | केसुचि
एकदा मुलाला मिसळ्पाव खायचा होता म्हणुन गुगलवर शोधाशोध करताना हे जाल सापडले अन अलिबाबाची गुहाच सापडली कि हो. मग काय मिपाची नियामित वाचक झाले आणि आता सदस्य पण झाले आहे. मी मुळची औ"बादची आता नवरोबाच्या कामानिमित्त्याने गोवा इथे वास्तव्य.
वाचन, टिव्ही बघणे, भटकन्ती, गाणी एकणे, स्वयन्पाक करुन खाऊ घालणे ह्या माझ्या आवडी.
सर्व नविन जुन्या मिपाकराना नमस्कार.
10 Aug 2010 - 8:27 pm | वारा
आपल नाव वारा.....
एकदा चालु झालो की कोणाला चान्स देत नाही....
आजकाल स्मायली सापडल्या पासुन जाम खुश आहे...
आपली सुरुवात पंचगंगे कठावरुन झाली, मुळा मुठेने चांगलीच साथ दिली. नंतर चेन्नई काय कलकत्ता काय दिल्ली काय , गुजरात काय सगळीकडे पाय लावुन झालाय तसा परदेशी ही फज्जा शिवुन आलोय. बाकी सहसा लिहीत काही नाही , वाचायला भरपुर आवडत. पण एकदा ऑन झालो की खरडफळा सांभाळा बॉ... आपली काय पण जबाबदारी नाय..
10 Aug 2010 - 8:44 pm | चेतन
मी चेतन बिल्ला क्र. ६७१. मूळ गाव गोरेगाव आम्ही तसे रायगड वासी. साडेपाच वर्षांच्या उदयपुर निवासानंतर नुकताच बंगलोरमध्ये पहिल्यांदाच दाखल झालोय. (सध्या रुम शोधण चालु आहे. मिपावासी थोडीफार मदत करा):-(
मिपाची ओळख एका मित्राकडुन झाली. उदयपुरमध्ये मराठी वाचायला मिळत नव्हतं ते येथे मिळालं. पहिल्या काही दिवसातच् मिपा आवडलं. (पुर्वीचं मिसळीचा फोटो असलेलं मुखप्रुष्ट अधिक आकर्षक होतं).
थोड्याच दिवसात मिपाचं जणु व्यसन जडलं. कविता, विडंबन, कथा सगळ्यांचा थोड्याच दिवसात अधाशासारखा फडशा पाडला. थोड्फार लिहण्याचा प्रयत्नही केला. असो सध्या वाचनमात्र आहे.
चेतन
10 Aug 2010 - 9:07 pm | बिपिन कार्यकर्ते
कुठलं गोरेगाव हो? रायगडातलं की मुंबईतलं?
11 Aug 2010 - 5:17 am | स्वाती२
तुम्ही गोरेगाव(रायगड) चे म्हणजे माझ्या आजोळच्या गावचे.
10 Aug 2010 - 8:45 pm | धनंजय
बिल्ला क्र १२.
आळशी आहे. म्हणून "माझे खाते" मधली ओळख जवळजवळ जशीच्या तशी येथे चिकटवून देतो आहे.
नाव : धनंजय
राहायचे शहर/गाव : बॉल्टिमोर, अमेरिकेची संयुक्त राज्ये
माझ्याविषयी : मराठी शालेय शिक्षण सुमार, घरगुती वापर बर्यापैकी. ललित आणि प्रगल्भ दोन्ही प्रकारे मराठीतून लिहायला शिकायचा प्रयत्न करतो आहे.
आवडीनिवडी : मिसळपाव संकेतस्थळ! सध्या संक्रमणाच्या काळात विशेष कौतूक वाटते आहे. येथे लिहिलेल्या लेखांवरून माझ्या आवडीनिवडी अधिक कळतील. (लेखांच्या यादीचा दुवा)
10 Aug 2010 - 8:49 pm | मराठमोळा
नमस्कार मंडळी.
ओळख सांगायला आपण काही मोठा माणुस नाही ब्वॉ.
पण थोडसं लिहितोच आता धागा आलाच आहे तर.. :)
लिहायची, वाचायची आवड लहानपणापासुनच होती. मधे बराच काळ शिक्षणामुळे (अभियांत्रिकी) व सोबत पार्ट टाईम नोकरी केल्याने वेळेअभावी हा छंद विरुन गेला. आयुष्यात जिद्द आणी जे हवे ते मिळवुन दाखवण्याची हिंम्मत कधी सोडली नाही. बँकींग, टेलीकॉम, ईंशुरंस, सॉफ्टवेअर यामधे सेल्स एक्जेक्युटीव पासुन सेल्स मॅनजर पर्यंतची पदे व नेटवर्कींग, कॉल सेंटर, टेलीकॉम सब्-डीलर अश्या नोकर्या वयाचा बावीस वयापर्यंत करुन झालेल्या, अधुन मधुन सेकंड हँड कार आणि फ्लॅट खरेदी-विक्री कमिशन एजंट अशीही कामे केली.
आइ वडीलांच्या ईच्छेसाठी आयटीत नोकरी मिळवली ती सुद्धा त्यांना ज्या कंपनीत मुलाने असावे असे वाटत होते त्याच कंपनीत. पण एक गोष्ट नक्की माहिती आहे. जगात आपल्यासारखे आणि आपल्यापेक्षा खुप कष्ट घेतलेले यश मिळवलेले मोठे लोकं आहेत, त्यामुळे कधी स्वतःचा गर्व झाला नाही.
आता आयटीत ४ वर्ष झालीत आणि मला स्वयंपाक येतो.. ;)
काले मृदुर्यो भवती काले भवती दारुण!
सः साध्नोती परमश्रेयं विघ्नांचाप्यधिष्टती!! -
आणि
"कुकर्मामधुन मिळालेले सोने चमकत नसते". "स्वतःवर विश्वास असेल तर जग जिंकता येतं." ही मुल्ये
ही माझी मुख्य ओळख. :)
असो,
नोकरीतच एकदा राघवशी (पुर्वीचा मुमुक्षु) एकाच प्रोजेक्टमधे अस्ल्याने ओळख झाली आणि याच्यामुळे पहिल्यांदा मिपा पाहिलं, जुन्या वह्या पुन्हा उघडल्या घरी जाऊन. खुप बरं वाटलं. वर्तमानपत्राखेरीज मराठी वाचन माहित नव्हतं पन इथे येऊन पुन्हा चालना मिळाली, नवे जीव लावणारे मित्र मिळाले, मराठीची तहान मिटली आणि मग कधीतरी मनात येईल तसे लिहायला लागलो, अर्थात मी काही खुप चांगलं लिहितो अशातला भाग नाही, पण मनाला तेवढच समाधान. :)
मिपामुळे दोन घटका स्वतःमधे, मराठीमधे रमायला मिळतं यासाठी मी मिपाचा आणि मराठी आंतरजालाचा नेहमी ऋणी राहील.
आयला लै सिरियस झालं काय? :P
10 Aug 2010 - 8:50 pm | ईन्टरफेल
राम राम पावन आमि जगताप एकदम छ्योट्याशा गावात राहतो जेम तेम १७०० लोकसंख्या आसलेल गाव हाय आपल गावातच हुंदडत आस्तो आमि शिक्षान काय झाल नाय तवा महारास्ट्रा बाहेर कधि गेलो नाय परदेश लय लांब हाय बाकि मह्याबद्दल माझे खाते मधे समधि मायति साफ खरि लिवलि हाय.........राम राम डॉनराव इथपर्यंतच वळख ठिक हाय घरि च्या प्यायला कुनाला बोलवत नाय कारन गुळाचा च्या कुनि प्यत नाय
10 Aug 2010 - 9:00 pm | धमाल मुलगा
गुळाचा च्या? :) पितळीतून देनार का? तसं आसंल तर मंग आमी येनार च्या पेयाला बी आन गप्पा मारायला बी. :)
10 Aug 2010 - 11:19 pm | शानबा५१२
अवं बीडी भेटल का?
ती बेटली तर काय काफी भी चाललं,चाय नकु,कसाला त्रास तुमासनी.
तवा बोलवा जरुर्,पन बीडी ती 'सागर' बर्का!
11 Aug 2010 - 7:06 am | ईन्टरफेल
च्या मारि भेटल का कायम हात पुढच दे बिडि दे तंबाखु इथ काय दुकान मांडुन रायलोय व्हय कधितरि सवताच्या खिशात बि ठेवत जावा कि ............चाला दुध नाय रायलय लान्यानि सांडवलय आत्ताच कारभारिन वरडत व्हति तव्हा कोरा चा ढोसायचा आसल तर या..देतु चा अन..बिडि बि
10 Aug 2010 - 9:01 pm | jaypal
जयपाल = जयेंद्र पाटील ,मु.पो.ठाणे


मुळाताच भटक्या, खोडसाळ, उचापत्या, कंपुबाज (कंपुला मर्यादा नाहीत) :-)
शक्यतो (उगाचच सर्व गोष्टीत) सिरीयस न होणारा ,व हौशी छायाचित्रकार
मिपावर अनेक खरड मित्र / मैत्रीणी भेटले. काही जणांशी प्रत्यक्ष भेटी झाल्याने जिव्हाळा अजुन वाढला.
लहान मुलांची अतिशय आवड. त्या मुळे तुम्हाला कोण व्हायला आवडल असतं किंवा आवडेल य प्रश्नाच उत्तर = धृतराष्ट्र
माझी आयुष्या विषयी कोणतीही तक्रार नाही. :-)
10 Aug 2010 - 9:06 pm | धमाल मुलगा
>>त्या मुळे तुम्हाला कोण व्हायला आवडल असतं किंवा आवडेल य प्रश्नाच उत्तर = धृतराष्ट्र
बाब्बोय..एव्हढी कर्तबगारी? =))
दाद्या, ती नाचणार्या बाबुरावाची स्मायली तुला कुठं मिळाली आधी सांग रे....दरवेळी पाहिलं की हसुन हसुन जीव जातो राव. =))
10 Aug 2010 - 9:06 pm | छोटा डॉन
>>माझी आयुष्या विषयी कोणतीही तक्रार नाही.
क्या बात है जैपालशेठ, एकदम खल्लास वाक्य की हो !
इथुनपुढे कुनीबी आम्हाला "सुखी मान्साचा सदरा" मागायला आले की आम्ही तुमचा अॅड्रेस देणार त्याचा :)
10 Aug 2010 - 9:07 pm | धमाल मुलगा
हां! आन तु हिंडिव जयप्यादाद्याला उघड्यानं.. सदरं देऊन देऊन सगळे संपले म्हंजे?
11 Aug 2010 - 1:15 pm | Nile
मला सुखी मानसाची प्यांट पन चाललं रे धम्या टेंशन नको घेउस.
10 Aug 2010 - 9:15 pm | गणपा
>>> धृतराष्ट्र
=)) =)) =))
चित्रपाला नावच चुकीच सांगीतलयस तु ;)
मिपावर केवळ चित्रांतुन प्रदिसाद देता येतो हे दाखवुन देणारा जयप्या माझा मित्रं आहे :)
10 Aug 2010 - 9:06 pm | बिपिन कार्यकर्ते
आयला!!! किती नवीन नवीन लोकांची ओळख होत आहे. सगळ्यांना परत नमस्कार.
10 Aug 2010 - 9:08 pm | धमाल मुलगा
नमस्कार! नमस्काऽऽर...नमस्काऽऽर्रऽऽ.....
जाऊ का आता?
10 Aug 2010 - 9:16 pm | बिपिन कार्यकर्ते
खर्रं खर्रं ..... ?
10 Aug 2010 - 9:20 pm | केशवसुमार
आणि वैयक्तीक गप्पांसाठी,
खरडवही अथवा व्यनिचा वापर करावा.. ;)
(जागरुक)केशवसुमार
10 Aug 2010 - 9:09 pm | छोटा डॉन
>>किती नवीन नवीन लोकांची ओळख होत आहे. सगळ्यांना परत नमस्कार.
+१, हेच म्हणतो.
बिका, तुम्हालाही नमस्कार हो !
10 Aug 2010 - 9:10 pm | केशवसुमार
आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताड वेंगाडूनी..
आम्हाला ओळखत नाही..आमच सुदैव
अम्हाला ओळखता..तुमच दर्दैव..
(सर्व जालकवींचा चाहता)केशवसुमार
10 Aug 2010 - 9:11 pm | क्रेमर
माझे सदस्यनाम क्रेमर असे आहे. मिपावरील लेखन वाचणे व जमल्यास प्रतिसाद देणे हा माझा छंद आहे.
10 Aug 2010 - 9:25 pm | चतुरंग
कधीमधी कविता आणि गजलांची 'रंगभूषा' बदलून देतो ;)
चौसष्ठघरातला आणि बत्तीस सोंगट्यांमधला खेळाडू म्हणून चतुरंग! ;)
10 Aug 2010 - 9:42 pm | बहुगुणी
नमस्कार!
- मी सध्या परदेशात, पण मुंबई -पुणे-नासिक या त्रिकोणात प्रामुख्याने वावरलो आहे.
- माझी मराठी, माझा देश यांचा रास्त (तेवढाच) अभिमान, पण त्या बरोबरच जगात इतरत्रही खूप काही घेण्यासारखं आहे असंही वाटतं.
- प्रश्न वादाने वाढतात तर संवादाने सुटतात हे अनुभवाने शिकलो आहे.
- 'मिपा'वरील माझी ओळख? - (गुलझार आणि भूपेंद्र यांची क्षमा मागून,) 'मेरा लिखना ही पहेचान है' असं म्हणेन. दोन वर्षांहून आधिक काळ इथे मिपावर आहे. काही लेखकांचं लिखाण आवर्जून वाचतो, रामदास, पुनेरी, श्रावण मोडक, हृषिकेश, बि. का. हे त्यात अग्रभागी.
- कविता, कथा, जमेल तेंव्हा विडंबन या क्षेत्रांत वेळ मिळेल तसा हात मारायचा प्रयत्न करतो. कळत नसलं तरीही (निदान काही प्रकारचं तरी) संगीत आवडतं, ते सर्वांबरोबर वाटून घ्यायचा प्रयत्न करतो.
- चार डिग्र्या आणि पाच नोकर्यांनंतर हीच समजूत ठाम आहे की समाजातील (वयाने) लहान-थोर मंडळींकडून शिकायला मिळतं ते ज्ञान पुस्तकी ज्ञानाहून आधिक उपयोगाचं असतं. त्यासाठीच, वेळात वेळ काढून, मिपा वर येतो.
- मिपा वरच्या सभासदांपैकी १०-१२ जणांशी इ-मेल्स व फोन यांच्या मार्फत संपर्क, प्रत्यक्ष भेट एकाच सभासदाची झाली आहे (हे आपलं माझ्या अंदाजाप्रमाणे! हो! इथले कुठले आय डी मला प्रत्यक्षात भेटूनही गेले असतील काही सांगता येत नाही!)
10 Aug 2010 - 9:43 pm | बिपिन कार्यकर्ते
खल्लास!!!!!! बेष्ट ओळख.
10 Aug 2010 - 9:45 pm | विकास
नावः विकास
रहाते गावः बॉस्टन
भारतातः ठाणे-पुणे
एक जुना मिपा सदस्य.
आवडी-निवडी: राहूंदेत... लिहायला लागलो तर खालती मूळ धाग्यापेक्षा त्यालाच प्रतिसाद येऊन अवांतर होईल. ;)
10 Aug 2010 - 9:49 pm | चतुरंग
फक्त ५ ओळींत आवरते घेतलेत विकासराव?
छ्या हे काही बरोबर नाही, अशाने आपले प्रतिसाद शिरोमणी डान्रावसुद्धा खचतील हो! ;) (अर्थातच ह.घ्या.)
10 Aug 2010 - 10:01 pm | मस्त कलंदर
हॅ हॅ हॅ!!!
अंमळ गल्लत होते आहे रंगाकाका....
आजकाल डॉन्याच्या प्रतिसादाच्या लांबीशी 'पंगा' घेतला गेलाय हे लक्षात आले नाही वाटते!!! ;)
10 Aug 2010 - 10:45 pm | विकास
त्याचं काय आहे चतुरंग आणि प्रियाली...
मला अजून खूप (म्हणजे खूप) लिहायची इच्छा होत होती, पण नक्की वरच्या कुठल्या प्रतिक्रियेसंदर्भात वाद घालयचा हेच समजले नाही. :-(
10 Aug 2010 - 9:58 pm | प्रियाली
ही विकासरावांची ड्युप्लिकेट आयडी दिसते. पाच ओळींत प्रतिसाद आटोपलाच कसा?
बायदवे,
आमच्या ओळखीसाठी शब्दांची गरज नाही. फोटो दिला आहे. बाकीची माहिती सदस्य पानावर मिळेल.
10 Aug 2010 - 10:07 pm | छोटा डॉन
>>आमच्या ओळखीसाठी शब्दांची गरज नाही.
सहमत आहे.
>>फोटो दिला आहे.
बेश्ट !!!
अहो पन फोटुची ओळख कुठे आहे ? ;)
( पळालो मी, मारलयं लॉग्गाउट,गेलो गेलो .... )
10 Aug 2010 - 10:09 pm | प्रियाली
फोटूची ओळख पानावर आहेच पण इथेही हवी असल्यास ती अशी -
हा पंखधारी सैतान पुढचा गेम कोणाचा करावा या विचारात गढला आहे. ;)
11 Aug 2010 - 1:15 am | Nile
वा वा, तुम्ही हुशार आहात ही ओळख द्यायची तुम्ही विसराल पण आम्ही नाही विसरणार कै! ;-)
11 Aug 2010 - 1:18 am | प्रियाली
मी हुशार आहे, स्वयंपाकतज्ज्ञ आहे आणि ही काहीतरी आहे. मीच विसरले. ;)
11 Aug 2010 - 1:24 am | Nile
हायटेक वाईफ पण आहात. =))
म्हणलं ना आम्ही नाही विसरत ;-)
11 Aug 2010 - 10:34 am | भारतीय
असं आहे होय..
मला वाटलं बाकी जगापासून स्वतःला लपवू पहाणारा मनुष्य आहे..
11 Aug 2010 - 2:04 pm | राजेश घासकडवी
मला तर तो अतिशय दु:खी आणि दीनवाणा वाटला होता. त्याचे खाली झुकलेले खांदे, काहीसा विमनस्क दिसणारा चेहेरा, व एकंदरीत चिंतातूर भाव... पंखांनी त्याला शक्ती देण्याऐवजी त्याला जखडल्यासारखं वाटतं. एखादं भयाण भूत किंवा राक्षसी प्राणी त्याच्या पाठीत रुतला असून त्यानेच आपल्या पंखांनी त्याला काबीज करून ठेवल्यासारखा तो वाटतो. त्याचीच गेम झाली असावी अशी शंका येते.
11 Aug 2010 - 5:16 am | चित्रा
मी चित्रा, मीही अमेरिकेत बॉस्टनला असते. (अजून एक ओळख: विकासची पत्नी).
गाणी ऐकायला आवडतात, आणि एनपीआर रेडिओवरील बरेचसे कार्यक्रम ऐकत असते. जमले की स्वत:साठी लहानसहान कामे तयार करत असते.
10 Aug 2010 - 10:01 pm | कळस
नमस्कार मित्रहो..
मी मुळचा नगरचा. साधारण १८ महिन्यांपासूनचा वाचक.रोज मि.पा.वाचल्याशिवाय राहावत नाही.मी येथिल सर्व लिखाण करनायांना त्यांच्या लिखानातून ओळखतो .खूप प्रतिभावान मंडळी येथे वावतात.मजा येते वाचायला.
मी स्वतः मात्र लिहीत नाही.मराठी टाईप करायचा कंटाळा, त्यामुळे प्रतिसाद ही क्वचितच देतो.
जवळपास सर्वच क्षेत्र आवडतात...वर्ज काहीच नाही.सध्या मुक्काम पूणे.
नवीन सदस्यांचे मनःपूर्वक स्वागत.
10 Aug 2010 - 10:15 pm | अडगळ
मी पुष्कर.
कोल्हापूर .. मग पुणे .. सध्या इतरत्र..
पूर्वी गावाची मापं काढायचो.
आता विडंबन करतो.
10 Aug 2010 - 10:26 pm | पिवळा डांबिस
द्या तर तुमची ओळख करुन ...
इऽऽऽश्य!! ह्ये काय डानराव!!! आमी नायी ज्जा!!!
मी फुलवंती, पिवळी शेवंती,
तुजी नजर लागंल मला!!!!
:)