नमस्कार मित्रांनो ( आणि मित्रांच्या मैत्रिणींनो ) !
मिसळपावच्या कट्ट्यावर दिवसेंदिवस नवनविन सदस्यांची भर पडते आहे.सर्व नविन सदस्यांचे मिपा परिवारातर्फे स्वागत !
मिपाचे रुपडे पालटले आहे. अनेक नवे, चांगले बदल होत आहेत.
ह्या नव्या बदलाबरोबरच अनेक नवे सदस्य मिपावर डेरेदाखल होते आहेत, काही ओळखीचे आहेत तर काहींनी आंतरजालाच्या ह्या 'रोचक' जगतात नव्यानेच प्रवेश केला आहे.
अनेकांसाठी हे वातावरण नवे आहे, जी जागा नवी आहे, माणसे नवी आहेत आणि त्यामुळे त्यांना ह्या एकुणच नव्या वातावरणाची 'नवलाई' नक्की वाटत असेल.
इथल्या जुन्या आणि प्रस्थापित आयडी ( नपेक्षा आयडीमागच्या व्यक्ती ) आपापसात मौजमज्जा, चेष्टामस्करी करताना पाहुन नव्यांनाही ह्यात सामिल होण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे, पण इथे त्यांना अडचण वाटत असेल की "आपली अजुन कोणाशी ओळख नाही, मला कोणी ओळखत नाही, ओळख नसताना मी केलेली मस्करीची इथे कुस्करी तर होणार नाही ... इत्यादी इत्यादी" असे असंख्य प्रश्न असतील तर नव्या सदस्यांना हा धागा तुमच्यासाठीच आहे.
चला, आपण सर्व एकमेकांची ओळख करुन घेऊयात.
तुम्हाला नव्या सदस्यांना इथे काही तुरळक समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी इथले होणारे मित्रच तुम्हाला मदत करतील, पण त्यासाठी आधी ओळख तर व्हायला हवी ना !
द्या तर तुमची ओळख करुन ...
ह्यासोबत माझी मिपाच्या 'जुन्या आणि प्रस्थापित सदस्यांना'ही विनंती आहे की त्यांनीही आपल्याबद्दल ४ शब्द लिहावेत. इथे असणार्या जुन्या-जाणत्यांचे कित्येक फॅन्स आहेत, त्यांना तुमच्याबद्दल वाचायला नक्की आवडेल. :)
ओळख म्हणजे 'खरे नाव' आणि इतर डिटेल्सच सांगावे अशी अपेक्षा नाही, सांगितले तर हरकत नाही. मात्र तुमच्या आयडीबद्दल, आवडीनिवडीबद्दल, छंदाबद्दल अशीतशी अवांतर माहिती हवी आहे. तुम्ही काय करता, कुठे असता ह्यासंबंधी माहिती दिलीत तरीही हरकत नाही.
तुम्ही स्वतःबद्दल काय हवे ते लिहु शकता ...
( मात्र शक्यतो संपर्क क्रमांक आणि इतर व्यक्तिगत डिटेल्स देणे टाळावे )
अवांतर :
माझी ओळख मी ह्याच धाग्यावर एका सेप्रेट प्रतिसादातुन करुन देईन ...
( तसेही सर्वजण मला ओळखत असतीलच की ) ;) हॅ हॅ हॅ !!!
ता.क. :
१. ह्या धाग्याचा वापर केवळ उपरोक्त कारणापुरताच व्हावा अशी अपेक्षा आहे. इथे ओळखीतुन नव्या सदस्यांना थोडेसे हलकेफुलके वातावरण उपलब्ध करुन देण्याचा हेतु यशस्वी व्हावा व त्याला सर्वांकडुन साथ मिळावी अशी अपेक्षा.
२. माफक थट्टामस्करी चालणार असली तर धागा भरकटु नये ह्याची काळजी घ्यायला 'संपादक मंडळ' समर्थ आहे.
प्रतिक्रिया
11 Aug 2010 - 12:34 am | बबलु
पिडाशेठ _/\_ (इन फॅक्ट... साष्टांग नमस्कार).
>>मी फुलवंती, पिवळी शेवंती,
हा हा हा !!!!
10 Aug 2010 - 10:27 pm | सुनील
नाव : सुनील
राहण्याचे ठिकाण : ठाणे. सध्या वास्तव्य संयुक्त संस्थाने.
माझ्याविषयी : मिपाचा जुना सदस्य. कोणत्याही कंपूचा सदस्य नाही वा स्वतःचा कंपू नाही.
फावल्या वेळातील छंद :
स्वयंपाक (केवळ उदरभरण नोहे!)
बागकाम (विशेष आवड - फुलझाडे)
खाणे (शाकाहारी तसेच मांसाहारी. विशेष आवड - मत्स्याहार)
पिणे (सर्व प्रकारची जहाल आणि मादक पेये - माफक प्रमाणात!)
वाचन (ललित आणि गैरललित, मराठी आणि इंग्रजी)
लिहिणे (माझे मिपावरील आत्तापर्यंतचे लिखाण - येथे)
भटकंती (कोठेही!)
इत्यादि इत्यादि.......
10 Aug 2010 - 10:33 pm | वहिनी
नमस्कार, मी तुमची वहिनी. आता शोधा पाहू तुमचा भाऊ...
10 Aug 2010 - 10:52 pm | पंगा
... 'आई' म्हणून आयडी नाही घेतला.
(अवांतरः
हरयाणाच्या ग्रामीण भागात मुली एकमेकांच्या झिंज्या उपटताना शिवी म्हणून 'भाभी' या शब्दाचा सर्रास वापर करतात. मुलाला शिवी द्यायची असल्यास, 'भाई का साळा'.
या अशा वापरामागील गर्भितार्थ फार गहन आहे.
'भाभी' हा शब्द अशा प्रकारे शिवी म्हणून वापरायचा असल्यास त्यावर विशेष आघात दिला जातो. (जसे, 'ओ मेरी भ्भाभ्भीऽऽऽऽऽऽ'.) शिवीऐवजी सामान्य शब्द म्हणून वापरायचा झाल्यास असा आघात दिला जात नाही.
ही माहिती फारा वर्षांपूर्वी माझ्या महाविद्यालयीन दिवसांत माझ्या तत्कालीन हरयाणवी वसतिगृहमित्राकडून साभार मिळाली.)
10 Aug 2010 - 11:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बरंय ना, आपला भाऊ आणि वहिनी दोन्ही हरयाणवी नाहीत ते!
बाकी वहिनी, तुम्ही आणि आमचे भाऊ आयटीतले का हो? आणि आमच्या भावाला कुकिंग जमतं का?
10 Aug 2010 - 10:33 pm | बरखा
नमस्कार
मी पल्लवी,आयडीतील पल्लवि
मिपाची नियमित वाचक्.मिपानि बरेच काही शिकवले.सुरुवातिला टाईप करताना खुप वेळ लागायचा,पण आता बर्याच लवकर टाईप करायला जमायला लागले.सगळी मिपाचि क्रुपा.माझि आवड्-फिरणे ट्रेकी॑गला जाणे,जमल्यास मिपावर लिखाण करणे,मिपा वरिल वाद्-विवाद वाचणे.
10 Aug 2010 - 10:40 pm | सूर्यपुत्र
मी ध्येयहीन. कारण मी "ध्येय"हीन. अ'नगरचा.
आवड : वाचन, उंडारणे, कमेंट्स करणे,
"मिसळपाव" आधी खाण्याचा; आणि आता वाचण्याचा छंद....
10 Aug 2010 - 10:47 pm | आमोद शिंदे
परेड मस्तच! डॉनचा धागा म्हंटला की शतक लागलेच.
मी आमोद शिंदे. गप्पा हाणायला इथे येतो. इथले सदस्य एकमेकाचे काय भरभरुन कौतुक करतात. मला तर ते बघूनच आनंद झाला. मिसळपाव हे साइटचे नाव असले तरी सदस्यांचा हा गोडवा पाहून मला तर हा साखरपाकच आठवतो. माझ्यासारख्या गोडघाश्यासाठी परफेक्ट!
बाकी संस्थापक तात्यांची ओळख कधी?
10 Aug 2010 - 10:54 pm | राजेश घासकडवी
मला मिपाचा आयडी मिळून पाचेक महिनेच झाले त्यामुळे मी तसा नवखाच आहे. पण इतक्या थोड्या काळातच मिपाशी नातं घट्ट झालं आहे.
माझ्या आवडीनिवडींच्या बाबतीत मी प्रचंड गोंधळलेलो आहे. कारण काहीतरी विधायक कार्य वगैरे करणं सोडलं तर मला सगळंच आवडतं. जमो न जमो, सगळंच थोडं थोडं करून बघायला आवडतं. मिपावर आल्यापासून इथे प्रतिसाद लिहिणं, वाचणं, लेख वाचणं यापलिकडे खरडवह्या उचकून बघणं वगैरे छंद लागले आहेत. कविता, रसग्रहणं या माझ्या विशेष आवडीच्या गोष्टी.
माझ्याबद्दल, मिपाबद्दल, व इथल्या लोकांबद्दल मला काय वाटतं हे मी एका लेखात लिहिलं आहे.
माझं लेखन इथे वाचायला मिळेल.
10 Aug 2010 - 11:02 pm | शानबा५१२
मी सुशांत,नावाप्रमाणे शांत आहे.पण जीवनात पाहीजे ती शांतता कधीच मिळाली नाही.
'वाल्याचा वाल्मीकी' झाला की जे सहन करावं लागत ते सर्व सहन करतोय.
ईथे सर्वांना ह्या निमित्ताने एकच सांगीन.........
"एकतर कधीच बिघडायच नाही,आणि एकदा बिघडलात की परत कधीच सुधरायचं नाही"
ईतर सर्व गोष्टी आम्ही पिल्यावर बोलतो.माझ्या लिहण्यावरुन कळत त्याप्रमाणेच मी बावळट आहे,कधी कधी 'मंदबुद्धी' वगैरे विशेषण लावण्यासारखा वागतो.
पण माझ्याबद्दल गैरसमज नाही करुन घेतलेत,तर आपल्यासारखा मित्र मिळणे अशक्य!!
अणि हो,रसायनशास्त्र म्हणजे आपलं प्रेम!!!
हे प्रेम अगदी तुम्ही तुमच्या आयटमवर्,बायकुवर करता त्याच्या हजारपट जास्त खरं!!!!
10 Aug 2010 - 11:05 pm | पंगा
तुम्हाला, बाय एनी चान्स, 'होताना' असे म्हंणायचे आहे का हो?
नाही म्हणजे, अजून पोहोचला नाहीत तिथे, म्हणून विचारले...
10 Aug 2010 - 11:26 pm | शानबा५१२
पंगाभाव,
माझ्या वलखीच्या मानसानला इच्रा की!
आवं म्या पियाय्च साम्गु की लफडीचं,लय नको त केल रं.
आयबापसाना लय त्रास व्हयला लागला म्हणुन सर्वासनी रामराम केलया!
दुनिया लय खराब रं मित्रा,मित्र च्यामारी कामापुरते मामे रे!!
खराब टायमावर हात वरती करत्यात्,लय लंब्या टांगा देतात.
आन हे प्रेम नी सर्व म्हण्जी बुलषीत!!(कोल्ह्याला द्राक्ष आमट!!)
आता मी का सुधारलु ती आतली गोष्त हाय!
10 Aug 2010 - 11:46 pm | निशिगंध
काय सांगु माझ्याबद्दल,
मी मुळचा सोलापूरचा पदवी यांत्रीकी अभियांत्रीकी नंतर गेट व नंतर म. टेक...
अगदी जॉब नसल्यापासुन ईथे येतो. आज एक दिड वर्ष झाले असेल...
नोकरी शोधायला म्हणुन यावे अन मिसळपाव चापुन जावे असे दिवस मोजायचो...
खुप वेळ वाचनमात्र राहुन मग प्रवेश घेतला... कधी लिखाणपण जमले नाही अन कंपुबाजीपण... म्हणायला चुचुतै अन क्रांतीतै अधुनमधुन बोलायच्या... काहीतरी फुटकळ लिखाण अन दुर्लक्षित प्रतिसाद आम्ही अजूनपण टंकतो कधीमधी...
मध्ये मध्ये पुर्ण निराश होतो नोकरीसाठी...
पण आता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात परळी वैजनाथ (महानिर्मिती) इथे पाट्या टाकणे चालु आहे...
नोकरी मिळाल्यामुळे मोबाईलवरच जास्तकरुन वाचनमात्र असतो...
येथील सर्वजण खुप चांगले लिहतात. दोनघटका मनाला विरंगुळा मिळतो. अन खानावळीत खात असल्यामुळे प्राकृ बाबत बोलावयासच नको.
10 Aug 2010 - 11:49 pm | चिंतामणी
नाव सरळ सरळ लिहीले आहे त्यामुळे परत सांगायची गरज नसावी.
मीसुध्दा तितकाच सरळ आणि साधाभोळा माणूस आहे.
सदस्य कालावधी 1 वर्ष 29 आठवडे (मि.पा.च्या रेकॉर्डप्रमाणे)
बराचकाळ वाचक होतो. आता थोडे थोडे लिहायला लागलो आहे (भीड चेपल्यामुळे. हाडाच गरिब आहे ना मी)
चांगले खायला आणि प्यायला आवडते. (बोलावुन बघा. माझी कंपनी आवडेल नक्की. येथल्या मुरलेल्या काही "निवडक" सदस्यांना अनुभव आहे.)
11 Aug 2010 - 12:53 am | पारुबाई
माझे खरे नाव अश्विनी .
( मला पारूबाई हे टोपण नाव गमतीदार वाटले म्हणून घेतले.)
राहणार बे एरिया ,कॅलिफोर्निया पण पक्की पुणेकर.
पेरेनटिंग ,सेल्फ हेल्प या विषयावरची इंग्रजी मधील आणि मराठी मधील सगळ्या प्रकारची पुस्तके वाचणे हा छंद आहे.
मिपाचे सदस्यत्व नुकतेच मिळाले आहे त्या आनंदात आहे.
11 Aug 2010 - 12:56 am | पुष्करिणी
नमस्कार,
मी पुष्करिणी, नविन सदस्य.
रहाण्याचे सध्याचे ठिकाण - इंग्लंड् ,जर्मनी
एका अशाच चिडचिड्या , कंटाळवाण्या दिवशी गुगलवर मिसळीचे वेगवेगळे प्रकार पाहुया म्हणत केलेल्या उचकटीत मिपा सापडलं आणि महाराज, वाचलेलं पहिलंच लेखन 'मोकलाया दाही दिशा' आणि त्यावरचे प्रतिसाद...अहाहा. तेंव्हापासून नियमित वाचक होतेच आता लिहायचाही प्रयत्न करते अधून मधून.
11 Aug 2010 - 1:30 am | Nile
एकाही संपादका/कीने ओळखीत मी संपादक आहे असे लिहलेले नाही (एक पुसट संदर्भयुक्त प्रतिसाद सोडुन =)) ) ही माहीती देणे नविन लोकांना फार उपयोगाचे आहे. ;-)
(प्रॅक्टीकल)नविन मप्कर
स्त्री सदस्यांनी वय अन वैवाहीक स्थिती लिहावी ही विनंती.
(मदतगार) ए. एस. एल.
स्त्री सदस्य असे लिहले आहे, स्त्री आयडीतील भामट्या पुरुषांनी लगेच प्रतिसाद टंकु नयेत
-नुतन (सदस्य)
(लगेच कुंडल्या व्यनीतुन धाडु नयेत, फोटो धाडलेत तर चालतील)
(प्रतिसाद+)इच्छुक
11 Aug 2010 - 1:56 am | विकास
काही संपादका/कीने ओळखीत मी संपादक आहे असे लिहलेले नाही
खरे आहे पण डॉन साहेबांनी काय म्हणले आहे? "ह्यासोबत माझी मिपाच्या 'जुन्या आणि प्रस्थापित सदस्यांना'ही विनंती आहे की त्यांनीही आपल्याबद्दल ४ शब्द लिहावेत. " अर्थात इथे केवळ सदस्य म्हणून लिहायला सांगितले आहे, ते ही चार शब्दच... तरी देखील चार शद्बाच्या ऐवजी माझ्या पाच ओळी झाल्या ;) आता याहून डॉनसाहेबांशी अधिक पंगा* कसा घेयचा?
* ह्यातील सदस्यनामाशी असलेले साम्य केवळ योगायोग आहे.
11 Aug 2010 - 2:06 am | Nile
तुम्ही ओळखच चुकीची दिल्याने नविन सदस्यांच्या भविष्यात होणार्या गोंधळाने मी व्यथित झालो आहे. ;-)
(नव्यांनो, कळले का एक संपादक कोण ते? ;-) )
-थोडा नवा थोडा जुना.
11 Aug 2010 - 1:36 am | piu
सध्याचे रहाते बे एरीया कॅलिफोर्निया.
मुळची आहे दादर मुंबई येथील.
IT मध्ये हमाल म्हणून काम करते.
मिपावर नियमित वाचक आहे.
सद्स्यत्व ५ महिन्यापुर्वीच घेतले आहे.
सध्या सहभाग प्रतिक्रीया देण्यापुरताच असतो.
11 Aug 2010 - 1:58 am | घाटावरचे भट
मी घाटावरचे भट. पुण्यास असतो.
बिल्ला क्र. १३५९.
मिपावर आल्यावर लै चांगले लोक भेटले. नंदन, पिडांकाका आणि भाग्यश्री यांच्याशी प्रत्यक्ष भेटीचा योग आलेला आहे. बाकी पब्लिकशी च्याट/बझ वगैरे माध्यमातून संपर्कात असतो.
फारसे लिखाण केलेले नाही (कारण - अर्थातच 'जमत नाही'). सध्या केवळ वाचनमात्र असतो (किंवा वा, छान, महान, कडक अशा प्रतिक्रिया देतो). मिपावरील रामदास, बिका वगैरे फंडू लेखकांचा फ्यान आहे. बाकी छंद वाचन, शास्त्रीय संगीत वगैरे...
कलोअ.
- भट
11 Aug 2010 - 2:03 am | संदीप चित्रे
माझे नाव आणि आडनाव हाच आय.डी. आहे त्यामुळे ओ़ळख पटणे हा प्रॉब्लेम नस्से !
पु.लंनी सांगितल्याप्रमाणे 'उप'जीविकेचे साधन म्हणून आय.टी. क्षेत्रात सध्या गुणवत्ता व्यवस्थापनात लुडबुड (आर तिच्यायला ! म्हंजी क्वालिटी म्यॅनेजमेंट म्हन की रे भौ !)
'मिपा'चा म्हटलं तर जुनाच सदस्य आहे. मिपावरचे मला प्रत्यक्ष भेटलेले / ना भेटलेले असे अनेक मित्र-मैत्रिणी जमले आहेत.
'वाचन हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे..' टाईप्स प्रत्येक दिवशी एखाद्या तरी पुस्तकातील काही ओळी वाचल्याशिवाय चैन पडतच नाही. अधूनमधून झटका आला की माझ्या ब्लॉगवरही काहीतरी लिहितो.
बाकी बरेच छंद आहेत त्याबद्दल नंतर कधीतरी !
11 Aug 2010 - 2:52 am | वात्रट
तर माझी ओळख अशी
मिसळपाव चा जुना सदस्य पण वाचनमात्र ..
(शक्यतो Positive प्रतिसादच द्यायचे असे ठरवले असल्याने )
लिहिणे वैगेरे आपल्याला जमत नाही अशी समजूत असलेला..
अजून एकाही सदस्याला प्रत्यक्ष भेटलेलो नाही
indiat आलो कि भेटूच
ज्यांना बसल्याशिवाय गप्पा मारायच्या नाहीत त्यांना प्राधान्य दिले जाईल :)
ओळख होईल गप्पा होतील :)
मुल गाव सातारा..
म्हणजे सातारा शहर..
सध्या वास्तव्य Land Of Opportunities ( मला खूप कमी मिळाल्या मला पण असो ) मध्ये ..
नावाला BE MBA वैगेरेची certificates आहेत जवळ पण अजून उपयोग शून्य .
छंद म्हणाल तर हेच आपले नेहमीचे वाचन , picture बघणे
आणि जमतील तेवढी प्रेक्षणीय स्थळे बघणे आणि त्यांची स्तुती करणे
12 Aug 2010 - 4:38 am | वेदनयन
बिल्ला नंबर २०८. खरे नाव सांगणार नाय. आमच्यात पद्धत नाही तशी.
IT मध्ये घाण्याला जुंपलोय. खानदेशी पण मुंबैत स्थायिक; ह.मु. अमेरिकेत (सिएटल). जास्त टायम नाही मिळत नाहीतर काहीबाही खरडले असते इथे. मिपा-वाचन सुद्धा होत नाही पुर्णपणे बरेच दिवस.
सैपाक छान जमतो. पण ह्या गणपा आणि दिपालीतै ने मुस्कटदाबी केली हो आमच्यासारख्यांची.
11 Aug 2010 - 5:35 am | स्वाती२
नमस्कार! मी स्वाती देशपांडे. मुक्काम शेल्बिविल, इंडियाना.
11 Aug 2010 - 6:03 am | अरुण मनोहर
मी अरुण मनोहर.
स्थायिक- सिंगापूर. मूळ गाव- नागपूर.
वाचन आणि लेखनाची प्रचंड आवड असल्यामुळे मिपा कडे ओढल्या गेलो. मिपाच्या आधीच्या वर्षांपासून मिपावर होणारे सगळे बदल अनुभवले आहेत. बिल्ला क्र. ८९३
लघु कथा लेखन हा माझा अतिशय आवडीचा विषय. "रोजाक- एक गोपाळकाला" हा विविध लघु कथांचा संग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे. हटके- असे काही तरी लिहीण्याचा नेहमी प्रयत्न करतो. रुळलेल्या वाटांवर वाचना साठी जायचा देखील कंटाळा येतो. विनोदी, विज्ञान-काल्पनिका, गुढ, रहस्य, सामाजिक अशा विविध विषयांवर कथा लिहील्या आहेत. सिंगापूरला शब्दगंध हा कवितांना वाहिलेला उपक्रम आहे. त्यासाठी दरमहा कविता केल्या जातात. माझे मिपावरचे लेखन इथे मिळेल-
http://misalpav.com/newtracker/893
इथे सगळ्यांची ओळख वाचून आनंद झाला. सर्व मिपाकरांना नमस्कार.
11 Aug 2010 - 7:27 am | उपाशी बोका
मिसळपावचा सर्वात जुना सदस्य ( सदस्य क्रमांक ७ - पहिले ६ मालकांकडे आहेत) :)
माणसे मांजरी, बोके पाळतात, म्हणून मी १ माणूस पाळला आहे - त्याचे नाव बंड्या.
अजून एकाही मिपाकराला भेटलो नाही आणि मलाही कोणी फारसे ओळखत असेल असं वाटत नाही.
मी फारसे लिहित नाही, पण बहुतेक दररोज इथे वाचन करतो.
11 Aug 2010 - 7:44 am | सहज
ओह! मी सदस्यत्व घेताना (बिल्ला क्रमांक ८) एक मांजर आडवी गेली होती, तो बोका होता तर! ;-)
असो मी सहज, चोता दोनचा फॅन इतकी ओळख चोताच्या धाग्यात पुरेशी असावी. :P
11 Aug 2010 - 11:39 am | गुंडोपंत
सहजरावांच्या
अवघड विषयावर सहजतेने येणार्या लिखाणाचा मी पंखा आहे!
आपला
गुंडोपंत
11 Aug 2010 - 10:10 am | रुपी
नमस्कार!
मी मिपाची नवी सदस्या आहे. मिपाबद्दल माहिती प्राजक्ताच्या काव्यसंग्रहाची बातमी सकाळमध्ये वाचताना समजली. तेव्हापासून नियमित वाचक आहे. सदस्यत्व एवढ्यातच मिळाले. त्यामुळे अजून बिल्ला क्रमांक वगैरे प्रकार कळले नाहीत. मिपावर टंकलेखन पण अजून जमत नाही. त्यामुळे इ-सकाळच्या प्रतिक्रियेच्या जागेत लिहून इकडे चिकटवते. अजून विशेष काही लेखन केले नाही.
नाव वर दिले आहे, म्हणून 's' कळलेच असेल. विवाहित आहे, म्हणून 'a' पण देत नाही ;)
संगणक अभियंती आहे. वाचन, पाककला असे सध्याचे छंद आहेत. मुळची अहमदनगरची , सध्या बे एरिया, कॅलिफोर्निया मध्ये आहे.
11 Aug 2010 - 10:25 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
रूपी, बिल्ला नंबर म्हणजे सदस्य क्रमांक. माझा बिल्ला नंबर ३०५, तुमचा ११११७!
11 Aug 2010 - 10:36 am | रुपी
ग बाई दिसला ! धन्यवाद!! :)
11 Aug 2010 - 12:35 pm | जोशी 'ले'
माझा बिल्ला क्रमांक काय ?
का अजून अंडर ट्रायल..
11 Aug 2010 - 9:24 pm | बहुगुणी
तुमच्या 'नावा'वर cursor hover केलात की सदस्य क्रमांक तळाशी डावीकडे दिसतो.[www.misalpav.com/user/....]
16 Dec 2014 - 3:44 pm | निलीमा
मला नाही सापडत *sad* .माझा बिल्ला क्रमा. काय?
16 Dec 2014 - 3:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
15651
१. स्वतःच्या नावावर माऊस पॉईंटर ठेऊन राईट क्लिक करा ---> "कॉपी लिंक अॅड्रेस वर क्लिक करा" ---> पेस्ट करा ---> तुमचा बिल्ला क्रमा़क दिसेल :
http://www.misalpav.com/user/15651
किंवा
२. तुमच्या नावावर लेफ्ट क्लिक करा ---> नविन उघडलेल्या तुमच्या वैयक्तिक माहितीच्या खिडकिच्या वरच्या अॅड्रेसबार मध्ये तुमचा बिल्ला क्रमा़क दिसेल :
http://www.misalpav.com/user/15651
16 Dec 2014 - 3:59 pm | निलीमा
सापडला एकदाचा.. आभारी आहे ..हा भारी ये..भारी ये *i-m_so_happy* इस्पीकचा एक्का
16 Dec 2014 - 4:01 pm | भिंगरी
आणि माझा पण मला माहीत नाही.
16 Dec 2014 - 4:09 pm | निलीमा
24701
16 Dec 2014 - 4:14 pm | भिंगरी
सापडला.
16 Dec 2014 - 4:40 pm | टवाळ कार्टा
काय केले बिल्ला क्रमांक घेउन ?
16 Dec 2014 - 10:53 pm | खटपट्या
काय करायचं आस्तं ? माझ्याकडंबी हाय - 17929
11 Aug 2010 - 10:12 am | धुमकेतू
जय महाराष्ट्र मंडळी !
नाव : मी धुमकेतू , नावाप्रमाणे अधून मधून हजेरी लावणार आहे !
सध्या तरी मि.पा. वर एक वाचक म्हणून वावरणार आहे पण लवकरच लेखनाची सुद्धा हौस पुरवण्यास सुरवात करणार आहे !
आणि बहुतांश मि.पा. करा प्रमाणे मी पण संगणक प्रणाली मध्ये काहीतरी घडवेन - बिघडवणे चे काम करत असतो :)
धन्यवाद डॉनराव हा धागा काढल्या बद्दल !!!
-- ------------------------------------------------------------------
!!! शिवराजांनी महाराष्ट्राला जगायचं कसं शिकवलं असेन , तर शंभूराजांनी महाराष्ट्राला मरायचं कसं हे शिकवलं !!! देव, देश आणि धर्मासाठी ...
-- ------------------------------------------------------------------
11 Aug 2010 - 10:56 am | विदुषक
राम राम मंडळी मी विदुषक .. कायम लोकांना हसत ठेवणारा विदुषक
आपली स्तुस्ती संगे तो येक मुर्ख ! . असे मोठे लोक सांगून गेले आहेत पण प्रत्यक्ष 'डॉन' ने धमकी दिली असल्यामुळे सांगतो आता ..
सदस्य तसा एक दीड वर्षापासून आहे पण काही फुटकळ प्रतिसाद सोडले तर लेखन शून्य 'रामदास' , 'बिका' ,'श्रावण मोडक','क्लिंटन',,'प्रभू मास्तर' आणि हो धनंजय,विकास, असे रथी महारथी असताना आपन आपले वाचनानंद घ्यावा ..(हल्लीचे काही धागे बघता आपण हात धुवून घ्यावा असे वाटते आहे !!!)
तर आम्ही तसे बारा गावाचे पाणी पिऊन सध्या पुण्यनगरी मुक्कामी .. मिपा चे बल्लवाचार्य पेठकर काकांच्या 'यज्ञकर्म' जवळ वास्तव्य !!
पोटापाण्यासाठी संगणक क्षेत्र मध्ये हमालांचा मुकादम म्हणून काम करतो (कोना ला हि 'मुका' किंवा 'दम' न देता !!)
संगीत आणि वाचनाची प्रचंड आवड . जन्माने भारतीय असल्यामुळे क्रिकेट आणि राजकारण ह्यात रस आहे हे सांगायला नकोच
इतिहास हा छंद !!
घराचे जरा कमी करून लष्कराच्या भाकरया भाजायला मना पासून आवडते ...
बस झाले किती लिहायचे ...
11 Aug 2010 - 11:01 am | प्रकाश घाटपांडे
आमची वळख काय सांगायची? आजुन सोतालाच नीट वळखल नाई. बक्कल नं २७.
तसा आळशी व अल्पसंतुष्ट. कापड घाल्तो ती बी सोताच उन थंडी वारा पाउस या पासुन संरक्षन व इतरांच लज्जारक्षन या हेतुनी. जो देगा उसका भला जो नही देगा उसका भी भला. हे तत्व
आपण काय करता? असा प्रश्न विचारला तर आमचे उत्तर निरोद्योग! पोलिस बिनतारी विभागातुन इ.स.२०२० ऐवजी आत्ताच स्वेच्छानिवृत्ती घेतलीय.
सध्या चिंतन (हॅ हॅ)
11 Aug 2010 - 11:43 am | गुंडोपंत
आणि मी घाडपांडे साहेबांचा भांडकुदळ मित्र!
आपला
गुंडोपंत
11 Aug 2010 - 11:05 am | भीमसेन
आम्हाला सदस्य होऊन आठवड्याचाच कालावधी लोटला आहे. ओळख खालीलप्रमाणे..
नाव: भीमसेन (खरं नाव नाहीये.. पण हे आमचे आवडते गायक + आमचे पाळण्यातले नाव आहे )
पत्ता: सध्या विदेशात. मुळचा औरंगाबादचा पण बरीच वर्षे पुण्यात वास्तव्य (वाण नाही पण गुण लागला हे सांगणे नलगे. पुण्याच्या बाबतीत आम्ही एकही अवाक्षर खपवून घेणार नाही.. :) )
वय: नावावर जाऊ नये..तसा अजून लहान आहे. दोनाचे चार सुद्धा अजून झालेले नाहीयेत !
शिक्षण: शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे, नुकतंच पदव्युत्तर शिक्षण कसेबसे पास झालो आहे.
व्यवसाय: सध्या पोटा-पाण्याच्या व्यवस्थेच्या (अर्थात नोकरी) शोधात.
आवडी-निवडी : चित्रपटांचा दर्दी (अगदी कुठचेही चित्रपट आवडीने पाहतो ), नवी-जुनी हिंदी/मराठी गाणी , वाचन, भटकणे इत्यादी. सध्या मिपा वरील लेखांचा फडशा पाडणे सुरु आहे.
इति लेखनसीमा. सावकाशीने काही साहित्य प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तूर्तास वाचनमात्र.
मंडळ आभारी आहे !
11 Aug 2010 - 11:46 am | sandeepn
मि संदीप. नगरी आहे. सध्या पुण्यात असतो.
पोटा साठी आयटी मधे हमाली करतोय. दुसरे काही करु शकत नसल्यामुळे बहुतेक !
भटकायला आवडते, वाचन पन थोडे फ़ार, तसे रिकामे उद्योग पन भरपुर करतो.
शुध्धलेखनाची पहिल्यापासूनच बोंब आहे त्यामुळे जरा समजुन घ्या हिच माफ़क अपेक्षा.
11 Aug 2010 - 11:54 am | समंजस
मी समंजस. स्वभावानी आणि वागण्यात सुद्धा :)
पुर्वी वैदर्भीयन आणि आता मुंबईकर :)
चर्चा/वाद आवडतात[राजकारण/ईतिहास विशेषकरून] व्यक्तीवर हल्ला न करता त्यांच्या विचारांवर/प्रवृत्तीवर हल्ला करायलं आवडतं :)
दोन्ही बाजूंचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न असतो.
शक्यतोवर कुठल्याही टोकाचे विचार घेउन फिरत नाही. जे आहे जसं आहे तसं स्विकारायचं हा स्वभाव(अटी लागू :))
लेखन अत्यल्प, वाचन खुप. जेव्हा पासुन मिपाचा शोध लागला(मला) तेव्हा पासून नियमीत वाचक.
रोज मिपा वर आल्या शिवाय राहवत नाही ;)
मिपाचा शोध लागण्याचं श्रेय जातं ते गणपाला आणि गणपाच्या चिकन पाकृ ला. गुगलवर चिकन पाकृ शोधत असताना मिपा मिळाली आणि नंतर मिपाचा रसिक :)
मिपावर बरेच चांगले लेखक आहेत. त्यामुळे चांगलं लेखन वाचायलं मिळतं तसेच चर्चेच्या निमीत्ताने सुद्धा बरीच नविन माहिती मिळते आणि उत्तम बल्लवाचार्य सुद्धा असल्यामुळे चांगल्या पाकृ सुद्धा उपलब्ध होतात [रविवारचा हौशी स्वयंपाकी ;) ].
मिपाला कुठल्याही विषयाचे वावडे नसल्यामुळे सगळ्याच विषयांवर सतत काही ना काही तरी वाचायला मिळतं. गंभीर/विनोदी/हिणकस/हलकंफुलकं सगळ्याच विषयांची इथे सरमिसळ झाल्यामुळे ही मिसळ खुपच चवदार आहे :)
नविन सदस्यांचे स्वागत आणि अभिनंदन मिपावर आल्याबद्दल, जुन्या सदस्यांचे आभार मिपाला चैतन्यशील ठेवल्याबद्दल, संस्थापकांचे आभार मिसळपावासारखी चवदार सर्वसमावेशक जालीय संस्था निर्माण केल्याबद्दल, चालकांचे आभार सतत कष्ट घेउन मिपा वरचा माझ्या सारख्या सदस्यांचा वावर सुसह्य केल्याबद्दल, संपादक मंडळाचे आभार सतत लक्ष ठेउन मिपा ही सर्व सदस्यांना सांभाळून घेत राहील ही काळजी घेतल्याबद्दल [एवढे दोन शब्द बोलून मी माझी ओळख आणि आभार प्रदर्शन संपवतो :) ]
11 Aug 2010 - 11:57 am | निनाद
मी निनाद
बिल्ला नं. १९ - पण फारसे लिखाण केले नाही, घडले नाही - वाचक आहे.
सध्या वास्तव्य मेलबर्न, मुळचा नाशिकचा.
सर्व नवीन सदस्यांचे मनापासून स्वागत!
- निनाद
11 Aug 2010 - 12:00 pm | दिपक
मी दिपक
बिल्ला क्रं.
मुंबैत राहतो. सध्या ऍक्टीव्ह डिरेक्टरीशी खेळत आहे कामावर.
मिपाप्रेमी. मिपाच्या जन्मापासुनचा सोबती. :-)
अधीमधी खरडतो. वाचण्यास खुप आवडते.
11 Aug 2010 - 1:10 pm | मी ऋचा
मी ऋचा.. नागपूरची आहे. सदस्य कालावधी २३ आठवडे ४ दिवस...(बिल्ला नं. कसा कळतो ब्वॉ) प्रतिसादांव्यतिरिक्त काहीही अजुन तरी लिहिले नाही..पुढचं माहित नाही..म्हणजे इच्छा आहे पण हिम्मत आणि विषय नाही.:)
मिपावर कुणालाही प्रत्यक्ष ओळखत नाही पण लेखन बहुतेक सगळ्यांचच आवडतं (अर्थातच काही अपवाद आहेत). वाचनाची आवड आणि टिवल्या बावल्या करण्यात विशेष गती..
म्हणण्यासारखी मैत्री कुणाशीच नाही.पण सगळ्यांशीच व्हावी अशी इच्छा आहे आणि ती होईल याची खात्री आहे...
(पॉपकॉर्न घेउन झाडावर बसणे हाही एक प्रमुख छंद) तरीही मैत्रीची ग्यारंटी ;) आताच गणपा आणि मनिशी मैत्री झालीए...
12 Aug 2010 - 12:18 am | रुपी
रुचा,
तुमचा बिल्ला नं. ८७८८ आहे. तुमच्या नावावर mouse न्या. Browser मध्ये डाव्या कोपर्यात खाली दिसेल.
11 Aug 2010 - 1:21 pm | विनायक प्रभू
मी विनायक प्रभू
माझी संपुर्ण ओळख खव च्या फोटो मधे.
मी मिपा वरील सर्व हलकटाचार्यंचा मित्र
11 Aug 2010 - 4:05 pm | नावातकायआहे
नमस्कार! मी गायभने!! (आडनाव नीट वाचा)
माझ्या id वरुन ते खोटे आहे ते कळाले असेच!
एका ढकल पत्रातुन मिसळपाव भेटले आणि प्रेमातच पडलो.
४-५ आठवड्यानी तात्या क्रुपा झाली आणि सभासद झालो.
जन्म, शिक्षण, पुण्यातच.
सध्या मुक्काम: पुणे-अबुधाबी-पुणे.
मी व्यवसायानी प्रक्रिया नियंत्रण अभियंता आहे.
मिपा वर अजुन तरि कुणालाही प्रत्यक्षात भेटलो नाही.
'बसुन' गप्पा मारणारे नक्कि कोण हे अजुन नीट लक्षात आलेले नाही.
12 Aug 2010 - 2:03 am | इंटरनेटस्नेही
माझे नाव 'इंटरनेटप्रेमी' अर्थात 'इंटरनेट वर प्रेम असणारा'. आणि खरंच आहे ते माझ्या बाबतीत, माझा दिवस सुरु होतो तो ओपेरा मिनी वर मिसळपाव ओपन करून, दुपारी मी एफबी वर टीपी करतो आणि रात्र पुन्हा मिपावर.
एका अर्थाने मिसळपाव हा माझा परिवारच आहे असे मी मानतो.
राहणारः मुंबई
प्रोफेशन: विद्यार्थी.
केव्हाही या, माझ्या खरडवहीत आपले स्वागत आहे.
परिचय क्रमांक: ९०२२
12 Aug 2010 - 7:44 am | सोम्यागोम्या
परिचय या नावाचा चित्रपट होवून गेला असे वाटते. तो पहावा. असो. आमचा परिचय शास्त्रीय संगीताचा नि:सीम चाहता एवढाच काय तो खरा आहे असे वाटते. बाकी डिग्र्या, नोक-या आणि देश ही फक्त पोटं बडवायची साधनं आहेत. बोटं बडवायला मिपावर येतो.
प्रतिक्रियारूपेण संचित:
सोम्यागोम्या
13 Aug 2010 - 10:21 am | दिवा
मी "दिवा"- म्हणजे माझ्या नावाला समानअर्थी प्रती शब्द.
बिल्ला क्रमांक: २४८
तसा मी ईथे मिपा च्या जन्मापासुनच, पण आमचा फक्त "Read only" मध्येच वावर असल्याने कोणी मिपा सदस्य आजुन तरी मित्र नाहित.
सध्या पुण्यात, विदेशात असतांना मिपावर पडिक असायचो, सध्याही जेंव्हा वेळ मिळतो तेंव्हा आवर्जुन भेत देत असतो. मुळचा नाशिक जवळचा, पण बरीच वर्षे शि़क्षणानिमित्त पुण्याच्या संपर्कात.
आय टी मध्ये नोकरीला मुंबई मधुन सुरुवात केली (पोटापुरता सैपाक येतो बरका ;) ) आणि जवळ जवळ ६ वर्षे मुंबई होतो, त्यामुळे मुंबई ही खास प्रिय आहे.
नवी-जुनी हिंदी, मराठी गाणी ऐकणे, नेटावरती वाचन, थोडेफार भटकणे, विनोदी चित्रपटांचा खास चाहता (अगदी कुठचेही चित्रपट आवडीने पाहतो), इत्यादी.
- दिवा
12 Aug 2010 - 10:05 am | बोलघेवडा
नाव: बोलघेवडा ('घ' घोड्यातला)
वय: आता गरिबाला काय वय असता का?
राहणार: पुणे
व्यवसाय: लष्करच्या भाकरया भाजणे
छंद:
आपल्या मालकीच्या प्रत्येक वस्तू वर पाट्या लावून दुसरयांना सतत उपदेशाचा डोस पाजणे.
अड्ड्यावर कोंडाळे जमवून आपल्या जिभेची धार वाढवण्याचा सराव करणे.
प्रत्येक व्यक्तीचे दर आठवड्याला बारसे करणे. ( दर आठवड्याला नवीन टोपण नाव ठेवणे)
सिंहगडा वर जाणे. ( फक्त गाडीने!!)
टोमणे मारणे.
"आपले ठेवायच झाकून आणि दुसर्याच पाहायाच वाकून" या उक्तिचे कटाक्षाने पालन करणे.
फोन वर कधीही हेलो चा वापर न करणे.
दुसर्याच्या पार्ट्याना आधी दिवसभर न जेवता जाणे.
स्वता: च्या पार्टीला पाकीट अशक्त आहे म्हणून आयत्या वेळी टांग मारणे.
घरच्या घरी पतंगाचा मांजा बनवणे.
सायकल वरुन जाताना वृद्ध इसमास "ए बाळ बाजूला हो", अश्या आपल्या वयास न शोभणार्या हाका मारत जाणे.
सायकल वरुन जाताना केळिवाल्याला केळ्यांचा भाव विचारत जाणे.
दुपारी एक ते चार दुकान बन्द ठेवणे.
मिठाईच्या दुकानात देखील "इथे हवा भरून मिळेल का?" अशी निरागस चेहर्याने चौकशी करणे.
घरात झुरळे मारायची उदबत्ती लावून बाहेर पसार होणे, आणि शेजार्यांची गम्मत बघण्यासाठी संध्याकाळी उशिरा उगवणे.
वरच्या मजल्यावर ठोका ठोक चालू असल्यास खालून काठीने ठोकून वरच्या मजल्यावरच्या लोकाना इशारा देणे.
मित्रांमध्ये एकमेकाला वडिलांच्या नावाने संबोधणे.
http://bolghevada.blogspot.com/
12 Aug 2010 - 12:57 pm | अरुंधती
नमस्कार सर्व नवी-जुनी सदस्य मंडळी!
माझं मिपावरचं नाव अरुंधती. पक्की पुणेकर. अगदी स.पे.! ;-) फक्त स. पे. सोडून बरेच दिवस झालेत!
इथे निरनिराळ्या साहित्य-पाक-कलाकृती वाचायला आवर्जून येते. स्वतःही जमेल तसे काही-बाही लिहिते. तुमचे प्रतिसाद वाचल्यावर अजून उत्साहाने पुढील लेखन काय करावे हे विचार करायला लागते.
मला छंद आहे लष्कराच्या भाकर्या भाजण्याचा, समाजोपयोगी कामात आपला खारीचा वाटा उचलायचा, गाण्याचा व गाणी ऐकण्याचा, वाचनाचा, लेखनाचा व उत्तमोत्तम पाकृ खादडायचा! (आणि त्यांविषयी वाचायचाही!)
असो. तर ही माझी अल्पशी ओळख! :-)
13 Aug 2010 - 6:09 pm | बिपिन कार्यकर्ते
यु कॅन टेक अ पर्सन आउट ऑफ स.पे. बट यु कॅन नॉट टेक स.पे. आउट ऑफ अ पर्सन. ;)
(ह. घ्या. रे सगळ्या स.पे. प्रेमींनो... नाही तर वाळत घालाल मला इथेच. ;) )
- कधी कधी स.पे. मधे येणारा...
12 Aug 2010 - 1:23 pm | निरन्जन वहालेकर
नमस्कार मंडळी ! मी निरंजन वहाळेकर !
मराठी साईट शोधतांना अचानक मिपा चा शोध लागला आणि मिपाच्या प्रेमात पडलो व लगेच सदस्य झालो ते आजतागत. सदस्य कालावधी 23 आठवडे 3 दिवस. मुळंचा विदर्भातला अकोला व खामगाव येथील. पण आता अलिबाग रायगड येथे स्थायिक.थोडाफार प्रयत्न करतो काहीबाही कविता मिपा वर लिहिण्याचा जे मायबाप मिपाकर खपवून घेतात प्रसन्गी योग्य मार्गदर्शन पण करतात.मिपा कुटुंब खूप आवडते पण नवीन असल्यामुळे अजून खूप ओळखी नाहीत त्यामुळे खूप जवळीकीने अभिप्राय देण्यास धजत नाही.बाकी माहिती मिपावर आहेच.
मिपाकरांची ओळखपरेड ( नव्या-जुन्या सदस्यांची ओळख )अतिशय स्तुत्य उपक्रम
12 Aug 2010 - 1:46 pm | बोलघेवडा
संपादक महाशय,
माझा प्रतिसाद का उडविण्यात आला आहे? कृपायां कारण कळेल का?
-बोलघेवडा
12 Aug 2010 - 1:48 pm | बोलघेवडा
संपादक महाशय,
तसदी बद्दल दिलगीर आहे. आता माझा प्रतिसाद दिसत आहे.
- बोलघेवडा
12 Aug 2010 - 6:42 pm | पाटिल-माने
मी तृप्ति,
मी मिपा वर वाचक म्हनुन जास्त असते. आताच खाते उघड्ले.
मी पन IT wife .
वास्तव्य - पुणे (मुळची कोल्हापुर्ची)
जास्त काहि लिहित नाही. पन एका व्यक्तिच कवतिक करावच लागेल ते म्हण़जे "गणपा" चे.
का ते तुम्हाला महितीच आहे? न चुकता त्याच्या रेसिपि चेक करतो आम्ही हपिसातले लोक.
दमले मी टायप करुन
--- तृप्ति
13 Aug 2010 - 4:48 pm | प्राजक्ता पवार
मी प्राजक्ता पवार.
सध्या ठाणेकर . मुळची विदर्भातली.
वाचन , पाककला , बागकाम , गाणी ऐकणे, नाटक अश्या अनेक आवडी आहेत. त्यापैकीच एक मिपाला दररोज भेट देणे. जालावर पाकृ शोधताना मिपाचा शोध लागला . सध्या माझा सहभाग फक्त वाचन आणी कधीतरी प्रतीक्रीया देणे एवढाच आहे ( मराठी टाईप करायची सवय नसल्याने ). हा धागा टाकल्याबद्दल छोटा डॉनला धन्यु. मिपाकरांशी व्यक्तिगत ओळख व्हावी अशी ईच्छा आहे. हळु हळु होईल.:smile:
13 Aug 2010 - 6:56 pm | अनाम
सांगण्या सारख काही खास नाही.
नाव वर दिलय तेच. जालावर गुगलताना मिसळीची तर्री सापडली.
काही दिवस वाचनमात्र राहुन आनंद घेतला. मग वाटलं चला लिहिता येत नाही पण काही चांगली वाटल तर निदान प्रतिसादाची पिंक तरी टाकता येईल.
म्हणुन सदस्य नामासाठी साकडं घातल.
आणि आश्चर्याचा धक्काच बसला. अवघ्या १-२ तासाच्या आत मंजुरी मिळाली तिही चक्क खव आणि व्यनीच्या सुविधेसह.
सरपंचांचा आभारी आहे.
14 Aug 2010 - 5:41 pm | मी-सौरभ
:)
हाबिणंदन..
17 Aug 2010 - 11:15 pm | येडा अण्णा
नमस्कार मन्डळी _/\_,
मी प्रदीप शिंदे. बिल्ला न. १३८६. मूळचा श्रीगोंद्याचा पण पुण्यात स्थायीक आहे. सध्या कामानिमित्त न्युयॉर्क मध्ये आहे.
जालावर भटकताना एक दिवस मिपा ची लींक दिसली. लगेच सभासद होवुन गेलो. मिपा वर लिखाणापेक्षा प्रतिक्रिया द्यायला जास्त आवडते :) विशाल कुलकर्णी, गणपा ह्यांचा पंखा.
नवी-जुनी हिंदी, मराठी गाणी ऐकणे, फिरायला जाणे, झोपणे हे आमचे छंद.
- अण्णा
18 Aug 2010 - 4:44 am | अथांग
नमस्कार !
मी प्रीती. मूळ गाव नाशिक आणि सध्या वास्तव्य अमेरिकेत.
माझे मराठी वाङ्मयाबद्दलचे प्रेम पाहून एका सहृदाने 'मिसळपाव' चा पत्ता दिला आणि मग 'अथांग' या नावाने सदस्यत्वासाठी अर्ज केला. बर्याच कालावधीच्या प्रतिक्षेनंतर सदस्यत्व मान्य करण्यात आल्याची मेल मिळाली, व हायसे वाटले. अर्थात मधल्या काळात मिपावर 'पाहुणी' म्हणून वावर होताच. शिवाय हा ओळख करून देण्या-घेण्याचा धागा पण आनयसे गवसला..अगदी योग्य वेळी! हा धागा सुरू करण्यासाठी छोटा डॉन यांचे मनापासून आभार!
मध्यंतरी 'करा कविता- स्पर्धा' नावाचा धागा बघितला आणि मी पण एक प्रयास केला. कविता मात्र पोस्ट करता येईना, तेंव्हा परत 'तोच' मित्र मदतीला आला व माझ्या वतीने त्याने कविता पोस्ट केली. या धाग्याचे पुढे काय झाले याची कल्पना मात्र नाही. येथील जाणकारांना एव्हाना हे नक्कीच समजले असेल की ही प्रीती 'जे न देखे रवी' या प्रकारात मोडत असावी. अर्थात मी स्वत:ला कवी वगैरे म्हणण्याच्या फंदात पडत नाही कारण अजून बर्याच गोष्टींचा 'थांग' लागायचाय. 'निसर्ग' हा कायमच जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. तसेच सर्व प्रकारचे भारतीय संगीत हे हृदयाच्या खूप जवळ आहे. आयुष्य अर्थपूर्ण बनवणार्या सगळ्याच लहान-लहान गोष्टींचा ध्यास आहे.
मला वाटते तूर्तास माझी एवढी ओळख पुरे, नाही का? यथावकाश मिपाकर-कुटुंबियांना समजून घेण्याची संधी पण मिळेलच.
धन्यवाद !
21 Aug 2010 - 8:05 pm | शशिकांत ओक
वरील ओळख पुर्ण आहे.
22 Aug 2010 - 11:59 pm | पैसा
नमस्कार मंडळी,
मिसळपाव बरेच दिवस वाचत होते. सदस्यत्व मिळाल्याची मेल काहीशी उशीर करून मिळाली. (म्हणजे पाहिलीच नव्हती!) आता मराठी वाचण्याची आणि लिहिण्याची हौस पुरी करून घेते. प्रतिसादांचे जंगी सामने मला खूप आवडतात, त्यात आपलेही २/४ खडे मारायला आवडतात.
माझ्या आयडी बद्दल म्हणाल तर, सर्कारी ब्यांकेच्या नोकरीमुळे हातात लाखो रुपये येतात आणि जातात. महागाईमुळे खात्यात फारसं काही उरत नाही. निदान नावात तरी पैसा असावा म्हणून हा आयडी घेतला. गावापासून दूर गोव्यात अर्थात "पैस" रहाते हेही एक कारण आहे.
बाकी ओळख काय सांगणार? इतर १०० जणांसारखीच मी एक!
असेच चकाट्या पिटत आणि मतांचे खडे मारत राहूच!
23 Aug 2010 - 5:59 pm | भडकमकर मास्तर
मी भडकमकर मास्तर...
मिपावरती काही काळ करियर गायडन्स वर्ग चालवले....
नाटक सिनेमांवरती काही लेख लिहिले...
जालिंदर जलालाबादी आणि शरदिनी अशा काही विशिष्ट व्यक्तिमत्त्वांचा जनक.....
पोटापाण्यासाठी डेन्टिस्ट म्हणून काम करतो....
24 Aug 2010 - 11:59 pm | दाद
ओळखपरेड ( नव्या-जुन्या सदस्यांची ओळख )अतिशय स्तुत्य उपक्रम
सध्या माझा सहभाग फक्त वाचन आणी कधीतरी प्रतीक्रीया देणे एवढाच आहे
धागा सुरू करण्यासाठी छोटा डॉन यांचे मनापासून आभार!
25 Aug 2010 - 5:11 pm | सुनील
हा एक जुना फोटो मिळाला.
डावीकडून - तात्या, अस्मादिक, प्रभूमास्तर, सर्वसाक्षी, रामदास आणि दांडीवाले विकास
(स्थळ - महेश लंच होम, ठाणे. काळ - जानेवारी २००९)
25 Aug 2010 - 5:58 pm | छोटा डॉन
>>स्थळ - महेश लंच होम, ठाणे. काळ - जानेवारी २००९)
आयला, महेश लंच होम का ? मास्तरांचीच चॉइस असणार, त्यांचे लै आवडते रेस्टोंरंट आहे हे. :)
सह्ही है !
काळ- जानेवारी २०१० ला आम्ही पण काही थोरं आंतरजालीय व्यक्तिमत्वांसोबत तिथेच बसलो होतो.
प्रभुमास्तर, रामदासकाका, संपादक निखिल देशपांडे आणि अस्मादिक !!!
मस्त कट्टा झाला होता ;)
( फोटु काढला नव्हता, हाच फॉर्म करुन टाकावा काय ? ) ;)
- छोटा डॉन
25 Aug 2010 - 6:07 pm | श्रावण मोडक
थितं काय्काय मिळतं? कैबी दिसत नाय टेबलावर!
25 Aug 2010 - 6:17 pm | अनाम
बहुतेक मंडळी बडिशेपची वाट पहात असावेत.
25 Aug 2010 - 6:19 pm | सुनील
तेवढं बिल दिसतं का तात्याच्या पुढ्यातलं? आता झूम करून वाचून टाका पाहू!!!
27 Dec 2014 - 2:12 pm | बिपिन कार्यकर्ते
आईशप्पथ! किती जुना फोटो!!!! मजा आली!
29 Dec 2014 - 11:30 am | सुनील
आयला, मीच टाकलेला फोटो पण आता हपिसातून मलाच दिसत नाहीए! :(
घरी जाऊन बघावा लागणार!
25 Aug 2010 - 5:42 pm | अविनाशकुलकर्णी
मी अविनाश कुलकर्णी..पुण्याहुन ईजेनर झालो आहे..कारखानदारी करायचो..आता काहि नाहि...

मला एक ओळीचे धागे टाकायला आवडतात...बाकि विषेश असे काहि नाहि..फुकट प्राण वायु मिळतो म्हणुन जिवंत आहे...
बाकि..लाईफ म्हणजे Eat ..Drink and Be Merry.
31 Jul 2011 - 10:45 pm | प्रास
हा भारी धागा आहे.
खूप वेळ वाचतोय आणि मिपाचा बराच इतिहास इथे उकरल्यामुळे कळतोय.
बाकी माझ्याबद्दल इथे टिचकल्यास कळेलच.
31 Jul 2011 - 10:56 pm | मी-सौरभ
मला माझीच महिती दिसतेय :(
1 Aug 2011 - 12:13 am | बिपिन कार्यकर्ते
दुवा सुधरवला आहे. आता टिचका बरं!
1 Aug 2011 - 11:57 am | प्रास
धन्यवाद!
1 Aug 2011 - 2:14 am | गेंडा
ह्यातले १५ आने (तुमच्या भासेत सुमारे ९५ %) वाचनमात्र हायेत. ना ते काही लिवीत ना कोनाला भेटत. काय उपेग त्याचा.
त्या सुनीलभौनी येक फटु टाकला. तेच्यावर काय बी नाही कोनी बी लिवल. पण सोकाजीरावाने चांगल्या हस्तींचा परीचल्य दिला तर एक से एक शेरेबाजी.
असा न्याय नका करूसा.
1 Aug 2011 - 3:51 am | प्राजु
मी प्राजक्ता. इथे 'प्राजु' नावाने आहे...
'प्राजु चे प्राजुताई हे मिपाकरांनी केलेले बारसे...'
1 Aug 2011 - 12:01 pm | स्पा
नमस्कार मी स्पा
इथे स्पावड्या या नावाने वेल(?) नोन :D
8 Mar 2012 - 12:53 am | अत्रुप्त आत्मा
मी अत्रुप्त आत्मा...
व्यवसाय-भटजिगिरी... म्हणजे रोज लोकांचे आत्मे त्रुप्त करत फिरतो ;-)
बिल्ला नं- अजुन माहित नाही,,,,,(किंवा हाच असावा ;-) )
माझ्या विषयी माहिती-इथले बाकिचे लोक सांगतील,कारण तीच खरी असते असं म्हणतात.
विशेष-अंतरजालावर
खेळता खेळता मिपावर आलो..आणी मी,,,पा...चाच झालो