मिपाकरांची ओळखपरेड ( नव्या-जुन्या सदस्यांची ओळख ) ...

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in जनातलं, मनातलं
10 Aug 2010 - 2:39 pm

नमस्कार मित्रांनो ( आणि मित्रांच्या मैत्रिणींनो ) !

मिसळपावच्या कट्ट्यावर दिवसेंदिवस नवनविन सदस्यांची भर पडते आहे.सर्व नविन सदस्यांचे मिपा परिवारातर्फे स्वागत !

मिपाचे रुपडे पालटले आहे. अनेक नवे, चांगले बदल होत आहेत.
ह्या नव्या बदलाबरोबरच अनेक नवे सदस्य मिपावर डेरेदाखल होते आहेत, काही ओळखीचे आहेत तर काहींनी आंतरजालाच्या ह्या 'रोचक' जगतात नव्यानेच प्रवेश केला आहे.
अनेकांसाठी हे वातावरण नवे आहे, जी जागा नवी आहे, माणसे नवी आहेत आणि त्यामुळे त्यांना ह्या एकुणच नव्या वातावरणाची 'नवलाई' नक्की वाटत असेल.

इथल्या जुन्या आणि प्रस्थापित आयडी ( नपेक्षा आयडीमागच्या व्यक्ती ) आपापसात मौजमज्जा, चेष्टामस्करी करताना पाहुन नव्यांनाही ह्यात सामिल होण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे, पण इथे त्यांना अडचण वाटत असेल की "आपली अजुन कोणाशी ओळख नाही, मला कोणी ओळखत नाही, ओळख नसताना मी केलेली मस्करीची इथे कुस्करी तर होणार नाही ... इत्यादी इत्यादी" असे असंख्य प्रश्न असतील तर नव्या सदस्यांना हा धागा तुमच्यासाठीच आहे.
चला, आपण सर्व एकमेकांची ओळख करुन घेऊयात.
तुम्हाला नव्या सदस्यांना इथे काही तुरळक समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी इथले होणारे मित्रच तुम्हाला मदत करतील, पण त्यासाठी आधी ओळख तर व्हायला हवी ना !

द्या तर तुमची ओळख करुन ...
ह्यासोबत माझी मिपाच्या 'जुन्या आणि प्रस्थापित सदस्यांना'ही विनंती आहे की त्यांनीही आपल्याबद्दल ४ शब्द लिहावेत. इथे असणार्‍या जुन्या-जाणत्यांचे कित्येक फॅन्स आहेत, त्यांना तुमच्याबद्दल वाचायला नक्की आवडेल. :)

ओळख म्हणजे 'खरे नाव' आणि इतर डिटेल्सच सांगावे अशी अपेक्षा नाही, सांगितले तर हरकत नाही. मात्र तुमच्या आयडीबद्दल, आवडीनिवडीबद्दल, छंदाबद्दल अशीतशी अवांतर माहिती हवी आहे. तुम्ही काय करता, कुठे असता ह्यासंबंधी माहिती दिलीत तरीही हरकत नाही.
तुम्ही स्वतःबद्दल काय हवे ते लिहु शकता ...
( मात्र शक्यतो संपर्क क्रमांक आणि इतर व्यक्तिगत डिटेल्स देणे टाळावे )

अवांतर :
माझी ओळख मी ह्याच धाग्यावर एका सेप्रेट प्रतिसादातुन करुन देईन ...
( तसेही सर्वजण मला ओळखत असतीलच की ) ;) हॅ हॅ हॅ !!!

ता.क. :
१. ह्या धाग्याचा वापर केवळ उपरोक्त कारणापुरताच व्हावा अशी अपेक्षा आहे. इथे ओळखीतुन नव्या सदस्यांना थोडेसे हलकेफुलके वातावरण उपलब्ध करुन देण्याचा हेतु यशस्वी व्हावा व त्याला सर्वांकडुन साथ मिळावी अशी अपेक्षा.
२. माफक थट्टामस्करी चालणार असली तर धागा भरकटु नये ह्याची काळजी घ्यायला 'संपादक मंडळ' समर्थ आहे.

धोरणवावरसमाजराहणीमौजमजाचौकशीप्रश्नोत्तरेमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

10 Aug 2010 - 3:05 pm | अवलिया

नमस्कार,
मी अवलिया ,
मिपा संकेतस्थळाचा व्यवस्थापक / चालक नीलकांत माझा मित्र.
मिपा संकेतस्थळाचा संपादक चोता दोन हा सुद्धा माझा मित्र. आणि हितचिंतक.

मी घरात राहतो.

आवडी : अनेक आहेत, फिरणे सर्वात मोठा छंद आहे. संगीत आवडते, गाणी आवडतात. प्यायला- खायला आवडते ;)
लेखन करतो काही विषयामध्ये स्पेशेलिस्ट आहे :)
माझे लेखन वाचले की तुम्हाला कळेलच !!

छोटा डॉन's picture

10 Aug 2010 - 4:56 pm | छोटा डॉन

माझी ओळख काहीशी अवलियासारखीच आहे ...
झालच तर अवलिया माझा मित्र आहे ( असे त्याला सारखे वाटते, असो ) आणि हितचिंतकही आहे.

मिपा संकेतस्थळाचा व्यवस्थापक / चालक नीलकांत माझा मित्र.

+१, हेच म्हणतो.

मिपा संकेतस्थळाचा संपादक चोता दोन हा सुद्धा माझा मित्र. आणि हितचिंतक.

हे महाशय कोण आहेत ह्याची मला खरोखर कल्पना नाही, बहुतेक एखादा हलकट छुपा आयडी असावा, असो.

असो, तर आता माझी ओळख.
मी छोटा डॉन, माझे खरे नाव अ‍ॅक्च्युअली छोटा डॉन नाही पण माझे टोपणनाव 'डॉन' आहे.
मिपावर आल्यावर त्याचे डान्राव, डॉन्या, डॉनराव, डॉनबा असे नाना अवतार आले. माझे खरे नावही थोडे हुडकले तर नक्कीच सापडेल ;)
शिक्षण पुण्यातच घडुन गेले ( झाले आणि घडुन गेले ह्यात जमिनाअस्मानाचा फरक आहे, असो ). सध्या पोटापाण्यासाठी काही कमवावे म्हणुन काहीबाही नोकरी वगैरे करत असतो, नोकरी काय लै भारी नाही पण उगाच फारिनर्सना थुका लावायला मजा येते. थोडक्यात सांगायचे तर 'Engine Design' असे आमच्या जॉबचे वर्णन करता येईल.

आवडी-निवडी आणि छंद काय फारसे वेगळे आणि विक्षिप्त नाहीत.
" ऊगाच बोंबलत हिंडणे , तासनतास आंतरजालावर कालापव्याय करणे [ यात वाचन , लेखन व अनेक नसत्या ऊचापती यांचा समवेष होतो .] , ठार मेल्यासारखे झोपणे ,तासनतास कुठल्याही 'अर्थहीन विषयावर ' गप्पा ठोकणे , 'चेंडू झोडपण्याचे' सगळे खेळ खेळणे, मनोसोक्त हादडणे त्यात बल्लवगिरीची हौस , 'सगळ्या प्रकारचे सिनेमे' अतिशय आत्मीयतेने पहाणे , कसलेही गाणे लावून ते तन्मयतेने ऐकणे व कधितरी आपल्या सारख्या ४ मित्रांना गोळा करून "बैठक बसवणे " यासारखे आमचे काही छंद आहेत ....
आजकाल आम्हाला त्यातल्या त्यात "फुटबॉल ( पहायला व त्यावर अफाट लिहायला व बोलायला ) " हा खेळ खुप आवडतो.

कधीमधी माफक लिखाण वगैरे करत असतो पण ते काही खास नोंद घेण्यासारखे नाही.
बाकी मित्र जमवायची आवड आहे ( आणि जमलेल्या मित्रांना वारंवार कल्टी द्यायचा छंद आहे, वाटल्यास कुठल्याही पुणेकर मिपाकराला विचारा ).

हे झाले माझ्याबद्दल, ही माझी थोडक्यात ओळख.

आता सांगतो माझ्याबद्दलच्या काही अफवा ( ज्या तुम्ही कित्येकवेळा वाचल्या असतील किंवा भविष्यातली वाचताल ) :
१. मी म्हणे काही लोकांना 'लेख लिहतो रे' असे वायदा करतो व तो पुर्ण करत नाही. म्हणुन लोक आम्हाला 'वायदेआझम' म्हणतात.
१००% खोटे आहे हे, इच्छुकांनी आमचा ब्लॉग पहावा ( जाहिरात नको म्हणुन लिंक देत नाही ).
२. मी उगाच लोकांचे प्रतिसाद, लेख आणि अजुन बरेच काही उडवतो म्हणे, शुद्ध लोणकढी थाप आहे ही.
३. इथे बरेच लोक मी त्यांचा 'मित्र' असल्याचा दावा करतात.
ह्यावर मी केवळ "हास्यास्पद" इतकेच मत देऊ इच्छितो.

बाकी सविस्तर सवडीने, तुर्तास एवढेच ....

विजुभाऊ's picture

10 Aug 2010 - 5:01 pm | विजुभाऊ

( आणि जमलेल्या मित्रांना वारंवार कल्टी द्यायचा छंद आहे, वाटल्यास कुठल्याही पुणेकर मिपाकराला विचारा ).

वायदे आझम ही पदवी फक्त डॉन्यालाच खर्‍या अर्थाने शोभून दिसते.

एक निरीक्षण (आणि एक अनुमान)!
धागा डान्रावांनी काढला आणि नानासाहेबांचा प्रतिसाद पहिल्या नंबरला, म्हणजे या धाग्यावर किमान १५० प्रतिसाद येणार येणार येणार!!!
चकास!

(ह. घ्या!)

--असुर

असुर's picture

11 Aug 2010 - 12:54 am | असुर

धत्तर तत्तर, धिन्च्यान तिच्यान... नाच्चो तिच्यायला! १५० झाले की राव!!!
येका डावात, येका दिसात १५० मारले की या ध्याग्यानं... अन अजून चालू हाये!!! २००-३०० मारतंय जनू!
चकास!!!

निखिल देशपांडे's picture

10 Aug 2010 - 7:46 pm | निखिल देशपांडे

कोण मी??? असा प्रश्न मला बरेच वेळा पडतो...
आणि या प्रश्नाचे उत्तर आजवर तरी मला उमगलेले नाहिए.... आमचे नाव निखिल देशपांडे हे माझ्या आयडी मधुन तुम्हाला लक्षात आलेच असावे. आमचा पोटापाण्याचा धंदा म्हणालं तर बघा आय टी कंपनीत हमाल आहोत.... आणि आय टी असल्यामुळे अंमळ हळवेपणा हा बाय डिफॉल्ट आलाच???

तर आम्ही मिपा वर आलो तेव्हा आमचा आयडी हा निखील देश्पन्दे असा होता. अर्थात रुळल्यावर आम्ही तो बदलून घेतला हा भाग अलाहिदा. जालावर भटकण्याची सवयीनेच मिसळपाव च्या घोषणे पासूनच शोध लागला होता पण आम्ही जरा सदस्यत्व घ्यायला उशीर केला आणि आमचा बिल्ला नं झाला ५४१.

सदस्यत्व घेतल्यानंतर पहिले २-४ महिने आम्ही फक्त वाचनमात्रच होतो पण एक दिवस असेच लॉगिन केले आणि आम्हाला खरडवही या मिपावर एकेकाळी सगळ्यात हॅपनिंग असलेल्या गोष्टीचा साक्षात्कार झाला. आणि आम्ही लवकरच खरडवही उचकापाचक मंडळाचे अध्यक्ष प.रा. राजवाडे यांचा मार्गदर्शना खाली आम्ही खव उचकापाचक करायला लागलो. त्याच काळात आम्हाला खरडवहीत झेंड्याचा चड्ड्या हा ऐतिहासिक खरडवाद वाचायला मिळाला. तुमचे लाडके चोता दोन आणि आमचे एक आमच्याच गावचे म्हणजेच औरंगाबादचे मित्र आनंदयात्रीजी आणि यांच्यातला वाद गाजला. या वादात आक्रस्ताळी अदिती पण बहुधा सामील होती.

या वादाचा आम्हाला सगळ्यात जास्त झालेला फायदा म्हणजे श्री. धमाल मुलगा बारामतीकर यांची मैत्री. हा माणुस कुणालाही गप्पात कसा गुंतवेल सांगता येत नाही हो.. आणि त्यानंतर एक एक करुन ओळखी व्हायलाच लागल्या, काही चांगले नांतेसंबध जुळल्या गेले. इथल्या मित्रांची यादी आता खुप मोठी आहे. तर असे हे मिपा ज्यावर आम्ही आलो आणि इथलेच झालो.

बाकी माझ्याबाबत लिहायचे राहुनच गेले. अर्थात सांगण्यासारखे काही खास नाही. हळुहळु बोलुयात खरडवहीतुन म्हणजे ओळख होईलच.

मितभाषी's picture

25 Aug 2010 - 6:40 pm | मितभाषी

डॉनराव हे लै भारी.

मी भाउसाहेब.
तसे मला सगळे हौशा, गवश्या, नवश्या किंवा भावश्या म्हणुन ओळखतात.
म्हणजे त्याचे असे झाले. आम्ही आमच्या पालनकर्त्या मायबापास एका जत्रेत सापडलो त्यामुळे 'गवश्या'.
आम्ही सापडण्याअगोदर आमच्या पालनकर्त्या मायबापानी देवाला नवस केल्ता. त्याणा अपत्यप्राप्ती होन्याअगुद्रच आम्ही त्यांना सापाडलो/गवासलो. म्हणुन नवश्या.
तसेच आम्हाला लहानपनापसुनच लै हौस(हवस नव्हे) म्हुन हौश्या.
आनि ठेवल्याल नाव भाउसाहेब म्हुन भावश्या.

आमचे आवडते लेखक्/लेखिका म्हन्जी, फुस्स, कार्लोस, वहिनी, दादा कोंडके, _अदिती, गणपा, संजोप राव, बिकाशेठ इ इ.
आम्ही कट्ट्यावर लय 'धमाल' करतो. दादा दरोज येगयेगळ्या बाया काखत घालुन येतो नि आम्हाला लै हसवतो म्ह्नुन आम्ही त्याइचे आभारी.
कार्लोस मला इंग्रजी शिकवतो.
फुस्स एक नंबर ठुसक्या आहे. म्हणुन त्याला सरकारने PUC अनिवार्य केले आहे. तो कट्ट्याव आल्याव आम्ही मागच्या वर्षीचे स्वाइन्चे मास्क घालुन बसतो.
मला मिपा फार्फार आवडते. इथले प्रतिसाद फार आवडतात.
मला वाचायला आवडते.

भावश्या.

वैयक्तिक ओळख वाढवावी किंवा कोणत्याही प्रकारची मस्करी करावी ह्या साठी संस्थळावंर येत नसल्याने जास्त काही लिहु शकणार नाही.

-(आवाज आला क्का ?) फुस्स

पांथस्थ's picture

10 Aug 2010 - 3:48 pm | पांथस्थ

मग प्रतिक्रिया तरी कशाला दिलीत.

-(वास आवाज आला क्का ?) ढुस्स

ह.घ्या.हे.वे.सां.न.ल

मला वाटतं इथे प्रत्येकजण आपल्या आवडीनिवडी आणि स्वतःची ओळख / हेतु सांगतोय. बघा, मराठी कळत असलं तर!
ह.घ्या.हे.वे.सां.न.ल

-(आवाज आला क्का ?) फुस्स

पांथस्थ's picture

11 Aug 2010 - 8:45 am | पांथस्थ

बघा, मराठी कळत असलं तर!

हो का? बघू बरं ...

ओळख म्हणजे 'खरे नाव' आणि इतर डिटेल्सच सांगावे अशी अपेक्षा नाही, सांगितले तर हरकत नाही. मात्र तुमच्या आयडीबद्दल, आवडीनिवडीबद्दल, छंदाबद्दल अशीतशी अवांतर माहिती हवी आहे. तुम्ही काय करता, कुठे असता ह्यासंबंधी माहिती दिलीत तरीही हरकत नाही.

...वैयक्तिक ओळख वाढवावी किंवा कोणत्याही प्रकारची मस्करी करावी ह्या साठी संस्थळावंर येत नसल्याने...

या प्रश्नाला तुमची प्रतिक्रिया कसे बरं उत्तर ठरू शकते? ना त्यात आवड सांगितली आहे ना छंद ना काही अवांतर. ह्याला माझा (तात्त्विक) आक्षेप होता :) असोत. जास्त वैयक्तिक होण्यापेक्षा हा (सं)वाद इथेच थांबवूया.

मी ऋचा's picture

11 Aug 2010 - 10:48 am | मी ऋचा

-(वास आवाज आला क्का ?) ढुस्स

ह.ह.पु.वा.

:) लाफिंग गॅस सोडला होता वाट्टं !
असो , पाथस्थांना उत्तर देण्याची गरज वाटत नाही.
टारझनाचे पाहुन सगळ्यांनीच त्याच्या स्टाईलचे अनुसरन करायला सुरुवात केली आहे. प्रत्येकाला जमेलंच असे नाही.

-(आवाज आला क्का?) फुस्स

मी ऋचा's picture

11 Aug 2010 - 1:12 pm | मी ऋचा

हलकेच घ्या की हो!!

अश्लिल अश्लिल अश्लिल :)

हलकेच घ्या.

-(आवाज आला क्का?) फुस्स

मायला, डान्रावांनी धागा काढून १० मिनिट झाली आणि कोणी काय बोलला नाय इथे!! फक्त २ प्रतिसाद!!! फाउल झाला ना!!!

असो!!!
आपण असुर.
बरीचशी माहिती लिहिली आहेच पण परत एकदा.

चकाट्या पिटणे हा आमचा जाहीर व्यवसाय आहे. आणि असुर हे नाव घेण्यामागे काहीही प्रयोजन नाही. "सुहास्य तुझे" हे गाणे ऐकत होतो, आणि "जशी विमोही सुरासुरांची" हे वाक्य ऐकून आपल्याला हे नाव सुचलंय.

बाकी आपण नवीन-जुने हा फरक मानतच नाय! माफक मस्करी करावी, चांगला टाईमपास होतो.. चार बरे लेख पाडावेत, काहीतरी चांगलं वाचल्यासारखं वाटतं.

बास, अजून काय लिहिणे, लेखन-सीमा!

नगरीनिरंजन's picture

10 Aug 2010 - 3:05 pm | नगरीनिरंजन

मी नगरीनिरंजन, मूळचा नगरचा (अहमदनगरचा). सध्या सिंगापुरात. नवीन चांगले मराठी वाचण्याचा आणि काहीबाही लिहिण्याचा किडा आहे म्हणून इथे आलोय.

मला आता माझी ओळख करून द्यायला आणि घ्यायला पण एकदम सोप झाल ...
(गट:- नवीन सदस्य!!!!!!)

चला सुरवात नावापासून.(अर्थात माझ्या..)
माझ नाव:- मला मनी/ माऊ काहीही म्हणू शकता .... :-)
काम :- मी पुण्यात एका software कंपनी मध्ये नोकरी करतेय पण मुळची अस्सल विदर्भातली.......
छंद :- नवीन नवीन पदार्थ खायला जरा जास्त आवडत(शाकाहारी आणि मासाहारी दोन्हीपण) आणि त्यामुळे पाककृतीची आवड, भटकंती करायला आवडत(पावसाळ्यात जास्त), त्यामुळे पक्षी निरीक्षणाची आवड आणि असाच time pass भरपूर काही आहे पण आता आठवत नैये (आठवलं कि सांगतेच परत).....
सध्याची आवड:- मिपावर हिंडणे बस!!!!...
आणि अशीच थोडक्यात ओळख सगळ्या सदस्यांनी द्यावी(माझी ओळख थोडी जास्त झाली असेल तर तुम्ही थोडक्यात द्या पण द्याच...)
आभारी....
:-)

मनी...

मन's picture

10 Aug 2010 - 3:09 pm | मन

नवीन्-जुने,हिरवे-पिवळे चर्चेला सकारात्मक वळण दिल्याबद्दल डॉन्याचं अभिनंदन आणि आभार.
मी, मन.... मनोबा.
मला दोनेक वर्षापासुन इथं नवीन असल्यासारखच वाटतय. :)
मी क्वचितच लिहितो.(लेख किंवा प्रतिसाद) आणि जितकं लिहिलय त्यातही क्वचितच समोरच्याचं कौतुक करतो.(चांगल्या गोष्टीला "फाल्तु आहे.सवंग आहे" असं म्हटल्याशिवाय मला मोठं कोण म्हणणार?(तसही कुणीच म्हणत नाही म्हणा) )
प्रवेश करत नस्लो तरी बहुतांशी वाचनमात्र असतोच असतो.
इथल्या जवळपास सगळ्याच "हिट" लेखांचा(आणि तो लिहिणार्‍यांचा मी फ्यान आहे)

अधिक काय सांगु?

धमाल मुलगा's picture

10 Aug 2010 - 6:34 pm | धमाल मुलगा

आहेस कुठे तू?
एकदम गायब झालायस की.

मनि२७'s picture

10 Aug 2010 - 3:11 pm | मनि२७

चुकून ३ वेळा प्रकाशित झाल...
क्षमस्व आहे

:-)

मनी...

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Aug 2010 - 3:12 pm | बिपिन कार्यकर्ते

माझं नाव माझ्या नावाप्रमाणेच आहे. सुरूवातीपासून तसंच आहे. त्यामुळे कसं सुचलं वगैरे प्रश्न गैरलागू आहेत. एक नंबर कंपूबाज. फक्त आपल्या कंपूला काही बंधन नाही. गप्पा मारणारे, हसून खेळून वावरणारे कोणीही आमच्या कंपूत बाय डिफॉल्ट सामावून घेतले जातात. कधी कधी काही तरी लिहितो इथे. ( http://www.misalpav.com/newtracker/322 प्लिज प्लिज प्लिज वाचा आणि कौतुक करा )

... नवीन सदस्यांचं स्वागत. मिपावरही आणि आमच्या कंपूतही.

अवलिया's picture

10 Aug 2010 - 3:54 pm | अवलिया

>>>कधी कधी काही तरी लिहितो इथे

मातीचा पुढचा भाग कधी ? (ही चौकशीच आहे. वसकन अंगावर येवु नये.. फाट्यावर मारु)

जोशी 'ले''s picture

10 Aug 2010 - 3:13 pm | जोशी 'ले'

आता डान साहेबांनी इचारालय म्हून सांगतो , नाय तर आपण कुणाला घाबरत नाय,
मी जोशी 'ले'

माझ्या बद्दल सांगण्या सारखे काही नाही , मी खूप दिवसां पासून मि. पा. चा एक वाचक आहे, पण सदसत्व आताच मिळालाय,

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Aug 2010 - 3:21 pm | बिपिन कार्यकर्ते

'ले' म्हणजे काय? :)

आम्ही जोशिले ..शहजादे है जमीं के...

दे

नितिन थत्ते's picture

10 Aug 2010 - 3:26 pm | नितिन थत्ते

'ले' म्हणजे एकच शिक्का दोनदा मारणारे तर नव्हे? (ह घ्या)

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Aug 2010 - 3:27 pm | बिपिन कार्यकर्ते

मग जोशी म्हणजे काय? ;)

एक पुर्वाश्रमीच असेल हो.
बिका तुम्हला भारी चौकशा बॉ.

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Aug 2010 - 3:43 pm | बिपिन कार्यकर्ते

आता धागाच चौकशी साठी काढलाय न्हवं!!! मंग???

जोशी 'ले''s picture

10 Aug 2010 - 4:34 pm | जोशी 'ले'

बाब्बो ..कसे धाड धाड परस्न फेकले

गणपा's picture

10 Aug 2010 - 3:14 pm | गणपा

नमस्कार मंडळी,

मी गणापा.
बिल्ला नंबर ७०७
मुंबईकर, पण सध्या वास्तव्य विदेशात.
प्रत्यक्षात एका मिपाकराला सोडुन अन्य कुणाला पाहिलेल नाही.
पण बरेच मित्र असे मिळालेत की वाटत आम्ही शाळुसोबतीच. :)

विनाकरण कुणाशी वाकड्यात जात नाही. कुणी डिवचल तर मग मात्र खरडी प्रतिसाद फेकुन मरतो ;)

आवड निवड म्हणाल तर कानसेन आहोत. हौशी कुक. आता जालिय मित्रांनी डोक्यावर चढवुन ठेवलय ही त्यांची दर्यादिली.
फिरायला घरातुन पाय बाहेर पडत नाही, पण पडलोच तर मात्र मनमुराद आनंद लुटतो.

बाकी आता आहात इथेच तर खरडत जा इथे अधुन मधुन. तेवढीच ओळख वाढत जाईढ.

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Aug 2010 - 3:22 pm | बिपिन कार्यकर्ते

'हौशी' शब्दावर जोरदार आक्षेप आहे. बाकी कोण मिपाकर आहेत हो तुमच्या ओळखीचे? आय मीन, तुम्ही बघितलेले?

बिका आरसा दिसतो का पहा बर जरा आजु बाजुला ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Aug 2010 - 3:25 pm | बिपिन कार्यकर्ते

आम्ही आरशात दिसत न्हाय!!!

दिसत न्हाय का मावत न्हाय. =)) =)) =))
-असो आता पळतो नाय तर डॉनअण्णा येईल कात्री घेउन ;)

मी गणापा.

प्रत्यक्षात एका मिपाकराला सोडुन अन्य कुणाला पाहिलेल नाही.

प्रेषक गणपा दि. मंगळ, 10/08/2010 - 15:31.
दिसत न्हाय का मावत न्हाय. =))

म्हंजी बिकाला बघितला हायेस दिसते.

(चौकस)चिंतामणी.

विकास's picture

10 Aug 2010 - 4:39 pm | विकास

'हौशी' शब्दावर जोरदार आक्षेप आहे.

अगदी! हे म्हणजे, दहावीला बोर्डात पहीले येणारे मुलाखतीत कसे सांगतात की मी कधी अभ्यास केलाच नाही, तसेच काहीसे हे झाले. ;)

हौशी' शब्दावर जोरदार आक्षेप आहे.
बिका मराठीत "हौशी " हा शब्द फारसी "हवस " या शब्दावरून आलेला आहे ..
( चला पळा................ )

>>प्रत्यक्षात एका मिपाकराला सोडुन अन्य कुणाला पाहिलेल नाही.

म्हणजे १०-१५ आयडी झालेच की.

(पळा आता)

आम्ही समजतो त्या मिपाकराला पाहिले असेल तर पाचशे आयडी पण असु शकतात

ऋषिकेश's picture

10 Aug 2010 - 3:25 pm | ऋषिकेश

मी ऋषिकेश. बिल्ला नं २७०
मुंबईकर
भटकायला - वाचायला - चित्रपट बघायला आणि या सगळ्यावर लिहायला (उतरत्या क्रमाने) आवडतं.. मिपावर गप्पा मारणे, माहीती मिळवणे आणि मजा करणे अश्या तिहेरी हेतूने येतो.

नंदन's picture

10 Aug 2010 - 11:41 pm | नंदन

भटकायला - वाचायला - चित्रपट बघायला आवडतं.. मिपावर गप्पा मारणे, माहीती मिळवणे आणि मजा करणे अश्या तिहेरी हेतूने येतो.

--- +१ :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Aug 2010 - 11:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कोटी कोटी कोट्यांबद्दल मौन का?

गांधीवादी's picture

10 Aug 2010 - 3:35 pm | गांधीवादी

एक सामान्य माणूस
अभियांत्रिकी शाखेतून पदवीधर,
पुण्यातील एका संस्थेतून MBA (finance) करीत आहे.

आवडता विषय एक आणि एकच राजकारण.
माझे स्वप्न
एकद दिवस तरी भगतसिंग/ सावरकर यांच्या सारखे जगायचे आहे.
( DO OR DIE )
हा जन्म भारताच्या सत्कारणी लावायचा आहे.

विजुभाऊ's picture

10 Aug 2010 - 4:11 pm | विजुभाऊ

गांधीवादी : माझे स्वप्न
एकद दिवस तरी भगतसिंग/ सावरकर यांच्या सारखे जगायचे आहे.

हम्म.. नो कॉमेन्ट्स. राजकारणातल्या कोलाम्ट्याउड्या इतिहासातही :)
अवांतर :तुमच्या त्या अवताराला गांधीवादी सावरकर म्हणावे लागेल.
अतीअवांतर : भाजपने कधितरी स्वीकारलेला गांधीवादी समाजवाद तो हा असाच होता का?

इन्द्र्राज पवार's picture

10 Aug 2010 - 3:40 pm | इन्द्र्राज पवार

"माफक थट्टामस्करी चालणार असली तर धागा भरकटु नये ह्याची काळजी घ्यायला 'संपादक मंडळ' समर्थ आहे."
(हे काही धाग्यांतील प्रतिसादाबाबतही व्हावे अशी अपेक्षा आहे. असो.)
===================================================
नमस्कार. मी 'इन्द्रराज पवार' आणि याच मूळ नावाने इथे वावरतो. कलाशाखेचा पदव्युत्तर. मूळचा कोल्हापुरचा पण आता दिल्ली, हरियाणा आणि पंजाब या भागात व्यवसायानिमित्ताने भटकंती. महिन्यातून एकदोनवेळा कोल्हापुरी घरी परत येत असतो. खूप प्रवास त्यामुळे "मिसळपाव" हा प्रवासातील फार जवळचा असा मित्र बनला आहे. (रोहटकच्या वाटेवर "ती" स्वयंपाक धागा मालिका वाचत असताना होत असलेल्या मनोरंजनामुळे प्रवास चालू असताना फार हसू येत होते, आणि माझे त्या हसण्यामागील कारण न समजल्याने माझे शिख मित्र गोंधळुन "ओये, देखो तो अपना बिट्टा पागल हो गया है" असे आपसात म्हणत होते.)

साहित्य (मराठी आणि इंग्लिश), राजकारण, समाजजीवन, इतिहास यांची आवड त्यामुळे या विषयावरील धाग्यात भाग घेणे, प्रतिसाद देणे आवडते. तसा फार जुना सदस्य नाही, तरीही सदस्यत्व घेतलेल्या दिवसापासून इथे रमलो आहे हे तितकेच खरे. संपादक मंडळ "मिसळपाव"साठी स्वतःचा वेळ/पैसा खर्च करत असते याची जाणीव असल्याने त्यांनी आखणी केलेल्या धोरणाविरुद्ध कधीही वर्तन केलेले नाही. शिवाय एखादी बाब व्यक्तीशः आवडली नसेल तर मंडळातील कुणाही एकाला "व्य.नि." केला तर त्यावर कार्यवाही होते असा अनुभव असल्याने तक्रारीस जागा नाही.

अशुद्ध लिखाणाची नावड आहे, त्यामुळे धागा देताना वा प्रतिसाद देताना तो तिथे जाण्यापूर्वी दोन-तीन वेळा तपासतो. (तसेच चर्चेत वाद वाढणार असे दिसल्यास कुठे थांबायचे ते समजते, "क्षमस्व" म्हटल्यास सर्व काही शांत-शांत होते असा अनुभव आला आहे. त्यामुळे एकमेकात कटुता राहात नाही.)

नवीन सदस्यांचे हार्दिक स्वागत आणि त्यांच्या लेखनास शुभेच्छा !

इन्द्रा

विलासराव's picture

10 Aug 2010 - 3:47 pm | विलासराव

मी विलास शिंदे........मला बरेच लोक विलासरावच म्हनतात म्हनुन हि आयडी.मुळचा अहमदनगरचा.वास्तव्य मुंबई येथे.
भटकंती, वाचन ही आवड.
नवीन सदस्य असलो तरी वाचक जुनाच आहे.
खेचाखेची आवडत नाही पण कुनी केलिच तर..............सरळ दुर्लक्ष करतो.
कुणाही मिपाकराला प्रत्यक्ष ओळखत नाही.

कलादालन मद्धे फोटो कसे टकाय्चे ते कोणी सागेल का

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Aug 2010 - 3:44 pm | बिपिन कार्यकर्ते

काका!!! प्रश्नाची गल्ली चुकली.... असो. आधी माहिती द्या ना... डान्या वरडू वरडू सांगायलाय की तुमची माहिती द्या म्हून...

archana2285's picture

10 Aug 2010 - 4:42 pm | archana2285

हा प्रतिसाद वाचून)(ओरड्णार्या)डॉन रावांचे चित्र डोळ्यांसमोर आले, आणि हसून हसून मुरकुंडी वळली.

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Aug 2010 - 4:53 pm | बिपिन कार्यकर्ते

नमस्कार! नमस्कार!! स्वागत आहे. :)

अवांतरः फोटो सुधारला आहे.

मेघवेडा's picture

10 Aug 2010 - 3:46 pm | मेघवेडा

फोटोसकट ओळख देताय का? ;)

archana2285's picture

10 Aug 2010 - 4:47 pm | archana2285

ओळख आधीच दिलीय, पण माझ्या प्रतिसादाला पुरक असा फोटो द्यायचा होता. चित्र नीट दिसत नाहीय . असो ही लिंक

विजुभाऊ's picture

7 Mar 2012 - 3:27 pm | विजुभाऊ

तो कोपर्‍यात डोक्यावर हात धरुन उभा असलेला धम्या आहे

मी-सौरभ's picture

7 Mar 2012 - 4:13 pm | मी-सौरभ

धागा वर काढल्याबद्दल धन्स..

आता नविन सदस्यांनी त्यांची ओळख करुन द्यावी. (ऐच्छीक)

नितिन थत्ते's picture

10 Aug 2010 - 3:43 pm | नितिन थत्ते

मी नितिन थत्ते.
पूर्वी काही काळ खराटा या नावाने लिहित असे.

स्वतः खूप काही लिहीत नाही. (दुसर्‍याने लिहिलेल्यावर कॉमेण्ट मारणे सोपेच असते).
घटना, अर्थशास्त्र, स्त्रीपुरुषसमानता आणि पुरुषमुक्ती, रॅशनलिझम, राजकारण हे जिव्हाळ्याचे विषय.

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Aug 2010 - 3:45 pm | बिपिन कार्यकर्ते

ते नाडीचं राह्यलं का वो?

नितिन थत्ते's picture

10 Aug 2010 - 3:49 pm | नितिन थत्ते

हा हा हा. र्‍हायलं ब्बॉ.
पण ते रॅशनलिझम मध्ये अ‍ॅडजष्ट करून घ्या जरा.

इन्द्र्राज पवार's picture

11 Aug 2010 - 8:55 am | इन्द्र्राज पवार

------

अमोल मेंढे's picture

10 Aug 2010 - 3:43 pm | अमोल मेंढे

माझ्याबद्दल थोडेसे,
मी अमोल मेंढे, मुळचा वर्ध्याचा...सध्या राजस्थानात राहतो. मिपा वर बर्‍याच दिवसांपासुन येतो..पण सदस्यत्व आता आताच मिळाले.
आवडी म्हणाल तर...वाचायला, गायला ,रचायला आणि नाचायला आवडते. जालावर बर्‍याच दिवसांपासुन असल्यामुळे खुप मित्र आहेत.
आणखी काय सांगु? ( माझी बायको मला माझ्यापेक्षा जास्त ओळखते.)

मृत्युन्जय's picture

10 Aug 2010 - 3:49 pm | मृत्युन्जय

मी पुण्याचा . नावात काय आहे. त्यामुळे सांगत नाही. मृत्युन्जय माझे नाव नाही हे तर ओघाने आलेच.

नवीन सदस्य म्हणावा तर आयडी तयार करुन २ वर्षे झाली. आणि जुना म्हणावा तर फारसे काही लिहिलेले नाही. मि पा वरचा सक्रीय वावर सध्याचाच. एवढ्यात इथ खुप "छान" चर्चा चालु आहेत त्यामुळे जरा जास्तच सक्रीय आहे. एरवी आधी फारसे लिहीले नव्हते (म्हणजे मी खुप छान लिहितो तरीही लिहिले नव्हते असे नाही तर वाचण्यासारखे काही आपल्याला लिहिता येते असे वाटतच नसल्यामुळे लिहिले नव्हते. नुकत्याच पेव फुटलेल्या अनेक लेखकांचे लेख बघुन आपणही याहुन वाईट लिहित नाही याची खात्री पटल्यामुळे काही लेख लिहिले आहेत खरे. ) वाचायचो मात्र खुप. मित्राने मिसळपाव वरुन रामदासांचा काटेकोरांटीची फुले स्कॅन करुन पाठवला तेव्हापासुन मि पा चा फॅन झालो. आणि शिंपिणीचे घरटे वाचुन रामदासकाकांच्या लेखणीच्या प्रेमात पडलो.

इथे उत्तमोत्तम लेख वाचायला आणि त्याहुन महत्वाचे म्हणजे त्याचे रसग्रहण करणार्‍या प्रतिक्रिया वाचायला जाम आवडते. इथे मुख्यत्वेकरुन तेच करायचो पुर्वी. अजुनही तेच करतो. पुढेही तेच करत राहीन (नाही म्हणता कुजकटपणा अजुन थोडा वाढला तर कदचित प्रतिक्रिया पण देइन.)

आवडते लेखक अर्थात रामदास काका.

हर्षद खुस्पे's picture

10 Aug 2010 - 3:49 pm | हर्षद खुस्पे

बर झाले! हा धागा सुरु झाला
(गट:- नवीन सदस्य!!!!!!)

माझ नाव:- मला हर्षद म्हणू शकता ....
काम :- मी पुण्यात एका software कंपनी मध्ये नोकरी करतोय पण मुळं मात्र सातारा, सांगली आणी कोल्हापुरची .......
छंद :- नवीन नवीन पदार्थ खायला आवडत(शाकाहारी आणि मासाहारी दोन्हीपण) भटकंती करायला आवडत).....
सध्याची आवड:- मिपावर हिंडणे बस!!!!...
बिपिन कार्यकर्ते
रोचक
विशाल व इतर मंडळींचा प्रचंड फंखा. त्यांच लेखन वाचुनच इथ्ले सभासदत्व घेण्यासाठी धड्पड केली आणी काही अंशी यशस्वी झाली. झालच तर बिकाषेठच्या कंपुमध्ये जागा बळकावि म्हणतो.

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Aug 2010 - 3:57 pm | बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद आणि येल्कम रे बाब्या!!! ;)

शरयुप्रितम२०१०'s picture

10 Aug 2010 - 3:50 pm | शरयुप्रितम२०१०

मी शरयू..
मिपाची नियमित visitor पण सदस्य आता झाले...
पाककृती करयचि आणि भटकंतीची खूप आवड आहे...

स्व's picture

10 Aug 2010 - 3:52 pm | स्व

माहिती माझी....

व्यावहारिकदृष्ट्या बिनकामाच्या माहितीचा अफाट खजिना ...... मी.
भावनिक जगाच्या हिंदोळ्यात डोलणारा..........................मी
नको तितकं खरं नाही त्या ठिकाणी बोलून पस्तावणारा ..........मी
तिला पाहुन खुदकन हसणारा आणि आपलं हसु दाबणाराही....हो ..मी च.

मी गर्दित उभा असतो गर्दितला एक बनून
पण त्या धामधुमीत्,त्या गर्दीतही बघत असतो बाहेरच्या गोबर्‍या गुलाबावरचा
टप्पोरा थेंब तल्लीन होउन
मी असतो अफाट काम करणारा...
तथाकथित "थॅंकलेस्" जॉब करणारा....
पण ते केल्यावर लोकांचं समाधान पाहुन भरुन पावणारा.

माझ्या मनात आहे इच्छा ओंजळभर भूतकाळ बदलण्याची....
माझ्यात आहे उर्मी उद्याचं भविष्य घडवायची.

थोडासा बावळट्,किंचित भोळ्सट दिसत असेनही.
वागायला मात्र थोडासा खट्याळ बराचसा नाठाळ असेनही.
पण तु नसताना तुझ्याच आठवणीत रमलेला मी असेनही....

सगळ्या दोस्तांत एकमेव मी....
भरल्या गर्दित एकटाच मी.......

माझा मलाच पुरत नाही मी!
जगभर सांडुन इथं तिथं सगळिकडं भरुन राहिलोय मी

दोस्तांनो, ह्या सफळ्यातला कुठला तरी "मी" तुम्हीही असणारच.
का ह्याहुन वेगळे, आपल्या सप्तरंगात स्वच्छंद तरी तुम्ही असणारच.
इथं लिहिलय तस्साच आहे मी...
तुम्हीही सांगा कसे,कोण आहात तुम्ही?

अजुन डीट्टेल माहिती हवी असेल तर बोला, मी लिहायला मोकळाच आहे.(मिपा च्या ब्यांडविड्थ चं तेव्हढं माहित नाही. त्यांना हे झेपल की नाही.)

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Aug 2010 - 4:02 pm | बिपिन कार्यकर्ते

तुमचं खरं नाव नानू सरंजामे आहे का हो? (ह. घ्या).

माझ्या मनात आहे इच्छा ओंजळभर भूतकाळ बदलण्याची....
माझ्यात आहे उर्मी उद्याचं भविष्य घडवायची.

माझा मलाच पुरत नाही मी!
जगभर सांडुन इथं तिथं सगळिकडं भरुन राहिलोय मी

विजुभाऊ's picture

10 Aug 2010 - 4:14 pm | विजुभाऊ

तुमचं खरं नाव नानू सरंजामे आहे का हो? (ह. घ्या).
ठ्यॉ.. =)) ह घ्या ....घेतले हसून घेतले

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Aug 2010 - 3:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी अदिती; आयडीतल्या विशेषणाप्रमाणे विक्षिप्त आहे असं प्रत्यक्षात भेटलेले लोकं मला सांगतात. ३_१४ आकडा मी पायपंथी, इरॅशनल, असल्यामुळे तिथून उचलला. तसंही माझी तीनतेराशी असलेली जुनी जवळीक ३_१४ मधूनही दिसतेच (असं मीच म्हणते).
माझ्याबद्दल खास काही सांगण्यासारखं नाही, अर्थात आपली आपण काय स्तुती करायची! पण सदर धागाप्रवर्तक चोता दोन, आपलं छोटा डॉन, आमचे रा.को. असल्यामुळे धाग्यावर लिहीलं.

इन्द्र्राज पवार's picture

10 Aug 2010 - 4:18 pm | इन्द्र्राज पवार

"आयडीतल्या विशेषणाप्रमाणे विक्षिप्त"

मला ही "अदिती" कधीही विक्षिप्त वाटलेली नाही, त्यामुळे या विशेषणाचा (तसेच त्या ३_१४ चा) कधीच विचार केलेला नाही.

इन्द्रा

प्रसन्न केसकर's picture

10 Aug 2010 - 3:57 pm | प्रसन्न केसकर

कशी शाळा-कॉलेजमधल्या, गेलाबाजार हापिसातल्या पहिल्या दिवसाची आठवण आली. हजारो आयडी असलेल्या अश्या संकेतस्थळावर अश्या ओळखी होणं खरच उपयोगी असतं याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. मी जेव्हा परक्या शहरात खुप अडचणीत होतो तेव्हा इथंच ओळख झालेले संपादक निखिल यांनी मला किती मदत केली ते माझं मला माहिती. या धाग्यामुळं सदस्यांमधे सामंजस्य्-सौहार्दाचं मनमोकळं वातावरण निर्मा होईल अन नवनविन मित्रांची ओळख होईल ही अपेक्षा.

असो!

आता माझ्याबद्दल थोडंस. माझं नाव प्रसन्नकुमार केसकर. मुक्काम पुणे. व्यवसाय पत्रकार. सध्या पुण्यातल्या एका इंग्रजी दैनिकात काम करतो आहे.

अर्धवट's picture

10 Aug 2010 - 4:02 pm | अर्धवट

खोटं.. खोटं... अरे सल्ला'गार' ना तू..

प्रसन्न केसकर's picture

10 Aug 2010 - 4:32 pm | प्रसन्न केसकर

अजुन फक्त `गार'च आहे. थोडे दिवस आहेत अजुन सल्ला देऊन लोकांना `गार' करायला सुरुवात करायला. सध्या फक्त पत्रक-कारच आहे रे.

नमस्कार
मी माया ज्ञानेश.
लातूर-औरंगाबाद-पुणे -सध्या बेल्जियम मध्ये राहाते.
स्कूल सायकॉलॉजिस्ट आहे. पण सध्या रिकामटेकडी.
माणसं-पुस्तकं, खाणं-खाऊ घालणं, सैपाकघरात अनेक प्रयोग करणं, आणि सर्वात आवडीचं -भटकायला आवडतं.
अशीच जालावर भटकत भटकत इथे आले, अनेक समानधर्मी दिसले म्हणून थांबले.. :)

इन्द्र्राज पवार's picture

10 Aug 2010 - 4:21 pm | इन्द्र्राज पवार

"आवडीचं -भटकायला आवडतं."

माया.... नवीन सदस्यांची संख्या खूप आहे, त्यामुळे त्यांना केव्हातरी बेल्जियमच्या "त्या निळाई" चा आनंद द्या.

इन्द्रा

मेघवेडा's picture

10 Aug 2010 - 4:28 pm | मेघवेडा

ग्रीस ची निळाई ती! :)

इन्द्र्राज पवार's picture

10 Aug 2010 - 4:35 pm | इन्द्र्राज पवार

ऊप्प्प्प्प्स्स्स्स्स !!

सॉरी.... "माया" ब्रुसेल्समध्ये असल्याने बेल्जियमच डोक्यात राहिले. ("निळाई"चा वरदहस्त त्या देशावरदेखील असेलच.)

इन्द्रा

एक शंका येऊ रहायली कवाधरून... या निळाईचा आणि आपल्या 'निळूभौ'चा काय सबंध हाये का???
कोनिबी शंकाणीरसण करावे!

--असुर

कोण निळुभौ? ;-)

बाकी आपली काय वळक द्यायची राव?
सुतासारखा सरळ मानुस, सुशील, सोज्वळ समंजस (वग्रै वग्रै) गरजेपुरता सैपाक येतो, अगदी साध्या आवडीनिवडी, कसला सोस नाय की काय नाय, अहो एकदम कॉमन मॅनच म्हणा ना.

(डान्या, जमलंय का?)

अप्पा जोगळेकर's picture

12 Aug 2010 - 8:54 am | अप्पा जोगळेकर

ग्रीस नाही आणि बेल्जियम नाही. ती "निळाई" इटलीची. सुर्याला आव्हान देणा वेश घालणार्‍या तरुणी. आठवलं का ? या निमित्ताने पुलंचं ते वाक्य आठवलं जे कायम लक्षात राहिलंय.
"आज माथ्यावरच्या निळ्या आकाशाला मी मोठ्या अभिमानाने सांगतो की तुझ्या निळाईचा अर्थ सांगणार्‍या त्या नीलकुहरातल्या पाण्याला मी भेटून आलो आहे."

इन्द्र्राज पवार's picture

12 Aug 2010 - 12:30 pm | इन्द्र्राज पवार

"पुलंचं ते वाक्य आठवलं जे कायम लक्षात राहिलंय."

हे बरोबर आहे आणि पु.लं.नी तसा "निळाई"चा उल्लेख केलेला हेही वाचले आहेच. पण आम्ही मायाताईंना उद्देशून जे लिहिले आहे त्याचा संबंध त्यांनी केलेल्या "ग्रीस" सफरीचा सविस्तर वृत्तांत इथे कलादालनात अनेक सुंदर फोटोसह दिला होता, तीमध्ये अगदी "इटली" सारख्याच एका निळाईचा समावेश होता. नवीन सदस्यांना (जे अनेक आहेत) कदाचित कलादालनची पाने उपलब्ध नसावीत - 'प्रवेश प्रतिबंधीत' असा इशारा येत असल्याची संपादकांकडे त्यांनी तक्रारही केली आहे - म्हणून पुनश्च फोटोंचा तो खजिना नव्याने द्यावा यासाठीचा तो प्रतिसाद होता.

इंद्रराज, माझ्या नावामुळे काही सदस्यांचा घोटाळा होतो आहे. म्हणून आजपासून मी ' माया ज्ञानेश ' च्या ऐवजी ' मितान ' या नावाने मिपावर असेन. :)

ग्रीस ची निळाई मी दुसर्‍या एका संस्थळावर लिहिली होती. इथे नाही. इथेही टाकण्याच्या विचारात आहे.

मितान's picture

13 Aug 2010 - 6:43 pm | मितान

आजपासून मी माया ज्ञानेश ऐवजी ' मितान ' या नावाने मिपावर असेन :)

हर्षद खुस्पे's picture

10 Aug 2010 - 4:18 pm | हर्षद खुस्पे

बाब्या!!!
हाहाहाहाहाहाहाहा
आवडला आपल्याला बिकाशेठ...मस्त :)

विजुभाऊ's picture

10 Aug 2010 - 4:18 pm | विजुभाऊ

मी विजुभाऊ
रहायला विले पार्ले. सध्या मात्र पुण्यात
वाचायला आवडते. द मा मिरासदार , शंकर पाटील , पु ल ,सु शि , व पु, जी ए , नेमाडे , श्री ना ,मार्क ट्वेन , अंतोन चेकॉव्ह , हॅन्स अ‍ॅन्डरसन्स , डॅन ब्राऊन , सिडने शेल्डॉन , पाउलो कोएलो , इलियाहु गोल्डराट , सोफोक्लीस आर्थर कोनन डॉयल हे आवडते लेखक.
आय ड्रीम ऑफ अ जीनी , डेनीस द मिनेस , थ्री स्टुजेस , हम पांच या आवडत्या सिरीज.
थोडे फार लिखाण करतो , फार पूर्वी कधितरी नाटक करायचो.
पगार देणारे काम : ई आर पी कन्सल्टिंग , प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट इ.
लष्करच्या भाकर्‍या : स्ट्रेस मॅनेजमेन्ट , मेमरी रीटेन्शन, पर्सनल काउन्सेलिंग वगैरे.
खाण्याची आवडः: उंधियो , पिठलं भाकरी ,पापलेट,सुरमयी , सोलकढी
सर्वात आवडते काम : चकाट्या पिटणे, गप्पा मारायला सौंगडी गोळा करणे, टीममधल्या स्वभावाने सिर्यस लोकाना कामाला जुंपणे वगैरे वगैरे.

ब्रिटिश टिंग्या's picture

10 Aug 2010 - 4:20 pm | ब्रिटिश टिंग्या

टिंग्या.......बस नाम ही काफीर है! (असं बिका म्हणतात)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Aug 2010 - 4:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अश्लील, अश्लील, अश्लील!

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Aug 2010 - 4:41 pm | बिपिन कार्यकर्ते

कोण?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Aug 2010 - 4:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लिहीलं असतं, पण नको. तुम्ही छुपे संपादक आहात असं अलिकडेच जाहीर झाल्यामुळे गप्प आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Aug 2010 - 4:45 pm | बिपिन कार्यकर्ते

आधी तुम्ही आरोप करणार | मग आम्ही स्पष्टीकरण मागणार ||
तेव्हा तुम्ही पळून जाणार | (आता पुरे नाहीतर) डान्राव मारणार निश्चित ||