मिपाकरांची ओळखपरेड ( नव्या-जुन्या सदस्यांची ओळख ) ...
नमस्कार मित्रांनो ( आणि मित्रांच्या मैत्रिणींनो ) !
मिसळपावच्या कट्ट्यावर दिवसेंदिवस नवनविन सदस्यांची भर पडते आहे.सर्व नविन सदस्यांचे मिपा परिवारातर्फे स्वागत !
मिपाचे रुपडे पालटले आहे. अनेक नवे, चांगले बदल होत आहेत.
ह्या नव्या बदलाबरोबरच अनेक नवे सदस्य मिपावर डेरेदाखल होते आहेत, काही ओळखीचे आहेत तर काहींनी आंतरजालाच्या ह्या 'रोचक' जगतात नव्यानेच प्रवेश केला आहे.
अनेकांसाठी हे वातावरण नवे आहे, जी जागा नवी आहे, माणसे नवी आहेत आणि त्यामुळे त्यांना ह्या एकुणच नव्या वातावरणाची 'नवलाई' नक्की वाटत असेल.
इथल्या जुन्या आणि प्रस्थापित आयडी ( नपेक्षा आयडीमागच्या व्यक्ती ) आपापसात मौजमज्जा, चेष्टामस्करी करताना पाहुन नव्यांनाही ह्यात सामिल होण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे, पण इथे त्यांना अडचण वाटत असेल की "आपली अजुन कोणाशी ओळख नाही, मला कोणी ओळखत नाही, ओळख नसताना मी केलेली मस्करीची इथे कुस्करी तर होणार नाही ... इत्यादी इत्यादी" असे असंख्य प्रश्न असतील तर नव्या सदस्यांना हा धागा तुमच्यासाठीच आहे.
चला, आपण सर्व एकमेकांची ओळख करुन घेऊयात.
तुम्हाला नव्या सदस्यांना इथे काही तुरळक समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी इथले होणारे मित्रच तुम्हाला मदत करतील, पण त्यासाठी आधी ओळख तर व्हायला हवी ना !
द्या तर तुमची ओळख करुन ...
ह्यासोबत माझी मिपाच्या 'जुन्या आणि प्रस्थापित सदस्यांना'ही विनंती आहे की त्यांनीही आपल्याबद्दल ४ शब्द लिहावेत. इथे असणार्या जुन्या-जाणत्यांचे कित्येक फॅन्स आहेत, त्यांना तुमच्याबद्दल वाचायला नक्की आवडेल. :)
ओळख म्हणजे 'खरे नाव' आणि इतर डिटेल्सच सांगावे अशी अपेक्षा नाही, सांगितले तर हरकत नाही. मात्र तुमच्या आयडीबद्दल, आवडीनिवडीबद्दल, छंदाबद्दल अशीतशी अवांतर माहिती हवी आहे. तुम्ही काय करता, कुठे असता ह्यासंबंधी माहिती दिलीत तरीही हरकत नाही.
तुम्ही स्वतःबद्दल काय हवे ते लिहु शकता ...
( मात्र शक्यतो संपर्क क्रमांक आणि इतर व्यक्तिगत डिटेल्स देणे टाळावे )
अवांतर :
माझी ओळख मी ह्याच धाग्यावर एका सेप्रेट प्रतिसादातुन करुन देईन ...
( तसेही सर्वजण मला ओळखत असतीलच की ) ;) हॅ हॅ हॅ !!!
ता.क. :
१. ह्या धाग्याचा वापर केवळ उपरोक्त कारणापुरताच व्हावा अशी अपेक्षा आहे. इथे ओळखीतुन नव्या सदस्यांना थोडेसे हलकेफुलके वातावरण उपलब्ध करुन देण्याचा हेतु यशस्वी व्हावा व त्याला सर्वांकडुन साथ मिळावी अशी अपेक्षा.
२. माफक थट्टामस्करी चालणार असली तर धागा भरकटु नये ह्याची काळजी घ्यायला 'संपादक मंडळ' समर्थ आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
नमस्कार, मी अवलिया , मिपा
माझी ओळख ...
( आणि जमलेल्या मित्रांना
एक निरीक्षण (आणि एक अनुमान)!
१५० झाले की राव!!!
कोण मी??? असा प्रश्न मला बरेच
हा हा हा
वैयक्तिक ओळख वाढवावी किंवा
बर बर...
मला वाटतं इथे प्रत्येकजण
बघा, मराठी कळत असलं तर! हो
-(वास आवाज आला क्का ?)
लाफिंग गॅस सोडला होता वाट्टं
हलकेच घ्या की हो!!
अश्लिल अश्लिल अश्लिल हलकेच
मायला, डान्रावांनी धागा काढून
मी नगरीनिरंजन, मूळचा नगरचा
लई बर झाल बुवा एकदम झक्कास......!!
वा....
अरे भल्या माणसा....
चुकून ३ वेळा प्रकाशित
मी मीच
>>>कधी कधी काही तरी लिहितो
आता डान साहेबांनी इचारालय
'ले' म्हणजे काय?
आम्ही जोशिले ..शहजादे है जमीं
'ले' म्हणजे एकच शिक्का दोनदा
मग जोशी म्हणजे काय?
एक पुर्वाश्रमीच असेल हो.बिका
आता धागाच चौकशी साठी काढलाय
बाब्बो ..कसे धाड धाड परस्न
नमस्कार मंडळी, मी
'हौशी' शब्दावर जोरदार आक्षेप
बिका आरसा दिसतो का पहा बर जरा
आम्ही आरशात दिसत न्हाय!!!
दिसत न्हाय का मावत न्हाय. =))
म्हंजी बिकाला बघितला हायेस दिसते.
+१
हौशी' शब्दावर जोरदार आक्षेप
>>प्रत्यक्षात एका मिपाकराला
आम्ही समजतो त्या मिपाकराला
बिल्ला नं २७०
बिल्ला क्र. १७
कोटी कोटी कोट्यांबद्दल मौन
असा मी, असा मी
गांधीवादी : माझे स्वप्न एकद
मी इन्द्रराज पवार
मी विलासराव............
कलादालन मद्धे फोटो कसे टकाय्चे ते कोणी सागेल का
काका!!! प्रश्नाची गल्ली