खव्वयांसाठी पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापुर, चिपळुण, रत्नागिरी आणि हैदराबाद मधिल हॉटेलांची यादी [त्यातल्या त्यात सामिश भोजन]

संताजी धनाजी's picture
संताजी धनाजी in जनातलं, मनातलं
22 Nov 2008 - 10:45 am

मित्रांनो आणि मैत्रिणींनो,

ही घ्या हॉटेलांची यादी. ज्या लेखावरुन यादी बनवली तो येथे आहे.

तुम्ही प्रतिक्रिया देवुन यादिमध्ये वाढ करु शकता.

पुणे
१. सुगरण्स कोल्हापुरी - पुणे-३०
झक्कास कोल्हापुरी थाळी मिळण्याचे ठिकाण.
मटण्/चिकन सोबत तांबडा पांढरा रस्सा, दहीकांदा, भाकरी एकदम टकाटक चव Smile
पत्ता: सदाशिवपेठेत, भरत नाट्य मंदीरावरुन टिळक रस्त्यावर टिळक स्मारक मंदीराकडे येताना लागणार्‍या शेडगेवाडीत हे सुगरण्स कोल्हापुरी आहे.

२. आवारे लंच होम - पुणे ३०
चिकन/मटण थाळी.
सन १९०१ पासुन सातत्याने गर्दी खेचणारी ही मांसाहारी खानावळ केवळ अप्रतिम चवीचे चिकन मटण देते. एका हाताने नाक डोळे पुसत आणि दुसर्‍या हाताने रस्सा भुरकत जेवण्याची इथली मजा औरच.
पत्ता: अलका टॉकिजच्या चौकातून कुमठेकर रस्त्यावर आल्यानंतर काहीसं पुढे येऊन उजव्या हाताला पहात जावं, कुलकर्णी पेट्रोल पंपाच्या पुढे आल्यावर ताबडतोब दिसेल, जोंधळे चौक

३. निसर्ग [मासे]
पत्ता: कर्वे रस्त्यावर नळस्टॉप ला डावीकडे वळाल्यावर एक सर्कल लागते तिथे उजव्या हाताला

४. गोमंतक
पत्ता: डेक्कन जिमखाना परिसर. पुनम हॉटेल च्या लगतच्या (उजव्या हाताला) इमारती मधे एकदम वरच्या मजल्यावर

५. मालवण समुद्र [मासे]
मोरी मसाला आणि भरलेले पापलेट.
पत्ता: पिंपरी चिंचवड नाट्यगृहाच्या शेजारी. चिंचवड टेल्को समोर. (टाटा मोटर्स)

६. हॉटेल आशिर्वाद, पुणे
मासे आणि कोळंबी थाळी साठी चांगलेच प्रसिद्ध आहे.
पत्ता: डेक्कन वरुन कुमठेकर रस्त्यावर या. सिटि प्राईड शुजच्या चौकात उजवीकडे वळा. उजवीकडची दुसरी इमारत.
गुरुवार बंद.

७. स्वराज्य
मालवणी जेवण खासच
पत्ता: टिळक रोड वरून, एसपी कॉलेजच्या चौकात, निलायम टॉकीजच्या दिशेने वळा.
निलायम टॉकीजच्या चौकात कुणालाही विचारा.

८. जनसेवा

९. जयश्री

१०. दुर्गा [बिर्याणि]
पत्ता: टिळक स्मारक मंदिरासमोरच्या बोळात आणि दुसरे मंडईत आहे कुठेतरी

११. कलकत्ता बोर्डिंग हाउस [मासे]
पत्ता: जंगली महाराज रस्ता

१२. कलिंगा [मासे]
मत्स्यावतारांसाठी बेष्ट... लाल करी अप्पम किंवा नीर डोसा याबरोबर झकास लागते.
पत्ता: नळस्टॉप चौकाच्या मागच्या बाजूला, जुने टेक महिंद्रा - शारदा सेंटर च्या समोर किंवा नवीन पर्सिस्टंट च्या बाजूला.

१३. हॉटेल सौंदर्य
मटण केशरी बिर्याणी
पुणेरी मटण (पुणेरी मटण म्हणजे गावरान हिरवे मटण. लाल तिखटाऐवजी मिरची आणि इतर हिरव्या पदार्थांचा वापर करून हे मटण तयार केले जाते. हिरवी मिरची, ओला नारळ, खसखस, धने व तीळ यापासून तयार केलेल्या मसाल्याच्या जोडीला कोथिंबीर व पुदिना यांचे वाटण वापरले जाते. लाल तिखट कमी आणि सांगितले तर तेलाचा वापरही कमी, या गोष्टी ध्यानात ठेवून हे मटण घरगुती पद्धतीने तयार करतात. )
पत्ता: डेक्कनवर रानडे इन्स्टिट्युट समोर
ओरिजिनल, लालबहाद्दूर शास्त्री रस्त्यावरील

१४. हॉटेल सर्जा [हे लता मंगेशकरांचे आहे.]
चिकन थाई, चिकन मंगोलियन, चिकन कॅश्‍यू, चिकन व्होल्कॅनो, "प्रॉन्स विथ मिक्‍स व्हेजिटेबल्स हॉंगकॉंग स्टाईल', गोल्डन फ्राईड फिश, पुदीन मच्छी, फिश अमृतसरी, बोल्हाईच्या मटणाचे चायनीज पद्धतीने केलेले पदार्थ व कबाबच्या पंचवीसहून अधिक "व्हरायटी' येथे आहेत.
"स्टार्टर्स'मध्ये "फिश तवा' अनेकांना आवडतो. तव्यावर करीमध्ये मासा टाकून ती करी माशामध्ये पूर्णपणे मिसळून तवा कोरडा होईपर्यंत मासा शिजवितात.
(औंधसारख्या उच्चभ्रू वस्तीमध्ये असल्यामुळे येथील पदार्थांचे दर साहजिकपणे इतर ठिकाणपेक्षा थोडे अधिक आहेत)
पत्ता: "सर्जा रेस्तरॉं', 127-2 सानेवाडी, आयटीआय रस्ता, औंध,पुणे - 411007

१५. समुद्रा रेस्तरॉं
गोवन तसेच मालवणी पद्धतीने बनविलेले मासे व कोल्हापुरी पद्धतीने बनविलेले पदार्थ.
मत्स्यप्रेमींसाठी इथे गोवन आणि मालवणी अशा दोन्ही पद्धतीने तयार केलेले मासे.
फिश प्लॅटर
फिश करी
खिमा गोली पुलाव
पत्ता: म्हात्रे पुलाजवळ, कर्वेनगर, पुणे - 411052. 09422943742 (म्हात्रे पूल संपला, की डावीकडे वळून डीपी रोड)

१६. वाघोली गावातील हॉटेल कावेरी
बोल्हाईचे मटण
पत्ता: एकूण पाच शाखा आहेत. मार्केट यार्ड (कृषी उद्योग भवन), पुणे-सोलापूर रस्ता (शेवाळेवाडी), कोथरूड (चांदणी चौक), देहूरोड- कात्रज बाह्यवळण मार्ग (बालेवाडी जकात नाक्‍याजवळ) येथेही "कावेरी'चे बस्तान बसले आहे.

१७. दोराबजी अँड सन्स
इथे चिकन बिर्याणी जबरा
दालगोश, चिकन किंवा मटण सालीगोश, मटण किंवा चिकन धनसाक, पात्रा फिश, शामी कबाब आणि "कस्टर्ड' हे पारशी पदार्थ
पत्ता: वेस्ट साइड शेजारचं आणि जुनं इस्ट स्ट्रीट वरचं
845, दस्तूर मेहेर मार्ग, सरबतवाला चौकाजवळ, पुणे 411001. 020-26145955, 020-26834595

१८. सिगरी रेस्तरॉ
कबाब, उत्तर भारतीय पदार्थ- अमृतसरी मछली, दक्षिणी मुर्ग, बुऱ्हा कबाब, रान-ए-सिगरी यांच्यासह जवळपास पंधरा "नॉनव्हेज' कबाब
पत्ता: "सिटी टॉवर्स' इमारत, ढोले-पाटील रस्ता,पुणे - 411001.
वेळ- सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० आणि सायंकाळी ७.३० ते रात्री ११

१९. "बोरावकेज बिर्याणी हाउस'
पाया सूप, मटण दालचा व राइस, चिकन खिचडा, चिकन दम बिर्याणी, रमजान स्पेशल चिकन, खिचडा, व्हाइट गोश, जंगबादी गोश, चिकन-मटण हंडी, चिकन-मटण मसाला, खिमा पराठा, चुल्हा मटण
पत्ता: 254, चिरंजीव अपार्टमेंट, शॉप न. 7, कर्वे रोड, कोथरूड, पुणे-411029, 020-25442279

२०. हॉटेल वाझवान
'ऑर्डर' दिल्यानंतरच पदार्थ तयार करण्याची पद्धत.
तबकमाझ, गुश्‍ताबा, मुर्ग याखनी, रवा, सर्वांत शेवटी- दूध, केशर आणि सुकामेव्यापासून बनविलेला "फिरनी' ही खास काश्‍मिरी खीर.
पत्ता: बाणेर रस्त्यावर "पॅनकार्ड' क्‍लबकडे जाणारा फाटा सोडला, की थोडेसे पुढे गेलात की वाझवान.

२१. हॉटेल अभिषेक
पत्ता: म्हात्रे पूलाकडून संत गुळवणी महाराज चौकातून स्वप्नशिल्प सोसायटीकडे जाणारा रस्ता.

२२. चायनीज रूम
पत्ता: चायनीज साठी, कर्वे रस्त्यावरील

२३. ऑफ बीट
पत्ता: कर्वे रस्त्यावरून झाला कॉम्प्लेक्स च्या चौकात डावीकडे पिज्झा हट कडे वळालं (स्वप्नशिल्प सोसायटीच्या रस्त्याला/कोथरूड सिटिप्राईड थिएटर कडे) की उजव्या बाजूस आहे १ल्या मजल्यावर.

२४. हॉटेल सदानंद
पत्ता: कर्वे रस्त्यावरचं मॅक्डोनल्ड च्या आधी आहे, यांचचं पुणे-मुंबई बाह्यवळण मार्गावर बाणेरपाशी दुसरं आहे.

२५. हॉटेल गुडलक
पत्ता: डेक्कन

२६. हॉटेल खैबर, हॉटेल पूनम
पत्ता: दोन्ही, डेक्कन

२७. हॉटेल निमंत्रण
पत्ता: बिबवेवाडी रस्त्यावरचं, पुष्पमंगल कार्यालयाजवळचं

२८. हॉटेल सृष्टी [मासे]
पत्ता: सदाशिव पेठेतलं.
टिळक स्मारक मंदिरासमोर एक रस्ता जातो पेरूगेट(पो.चौ.)कडे...
१. जर तुम्ही स.प महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या म्हणजेच टिळक रस्त्याने आलात, अलका टॉकिजच्या दिशेने, तर तुम्हाला उजवीकडे वळता येणार नाही (टि.स्मा. चौकात)...
२. त्यामुळे स.प महाविद्यालयावरून थोडं पुढे आलात की डाव्या बाजूला महाराष्ट्र बँक आहे त्याला लागूनच एक छोटी गल्ली टि. स्मा कडे जाते...त्यातून पुढे जा आणि उजव्या हाताला वळा, जसा रस्ता जातो तसं...मग तुम्ही आपोआप सिग्नल पाशी याल्...सिग्नल ओलांडून सरळ जा.
३. उजव्या हाताला दुर्गा हॉटेल आहे...त्याच लायनीत उजव्या बाजूलाच 'सृष्टी' आहे...सिग्नल पासून हार्डली १०० मी.

२९. हॉटेल कोयला [द हैद्राबाद हाउस]
हैदराबादी बिर्याणी, एकदम निजामी थाटाचं
पत्ता: कोरेगाव पार्क, नॉर्थ मेन रोड

३०. कोकण एक्स्प्रेस
पत्ता: कोथरुड, दशभुजा गणपती वरुन सरळ महर्षी कर्वे पुतळ्याकडे या[२किमी], दोन रस्ते फुटतात, डावीकडचा रस्ता घ्या, तेथुन १किमी वर आहे. रस्त्याला लागुनच आहे.

३१. मिर्च मसाला
पत्ता: इथली सोलकढी पण चांगली असते, कोथरुड

३२. न्यु मराठा कोल्हापुर दरबार
एकदम झकास मटण थाळी. सोलकढी खलास असते.
पत्ता: यांच्या पुण्यात दोन शाखा आहेत. एक सदाशिव पेठेत, ज्ञानप्रबोधिनी च्या समोरच्या बोळात आणि दुसरी मोरे विद्यालय बस-स्टॉप च्या थोड आधी.

३३. शीश महल
इराणी पध्दतीचे खाद्यपदार्थ मिळतात. चेलो कबाब विशेष छान. हवा असल्यास हुक्का पण मिळतो (निरनिराळ्या स्वादांमधे)
पत्ता: ए.बी.सी. फार्म्स, कोरेगाव पार्क

३४. सिंहगडावर जवळपास सगळे ढाबे (विशेष करुन बाळुचा ढाबा)
इथे मस्त पैकी गावरान चिकन आणि भाकरी हाणायची

३५. पुरेपुर कोल्हापुर
कोल्हापुरी पद्धतीने बनवलेल मटण
पत्ता: पेरुगेट पोलिस चौकीजवळ आणि दुसरे मेहेंदळे गैरेज जवळ, अभिषेक हॉटेल शेजारी, कोथरुड

३६. शेतकरी नॉनव्हेज
सुक्कं मटण , कडक भाकरी, खिमा फ्राय, पांढरा आणि तांबडा रस्सा
हवे असेल तर जोडीला सुरमई फ्राय.
तांबड्या रस्श्यात कडक भाकरी चुरून वरून सुक्के मटण हाणा इथे.
*[याची एक खासियत: लता मंगेशकर, आशा भोसले, श्रीकांत मोघे वगैरे सारखे मोठे लोक्स इथे जेवायला आले त्याचा एक छोटासा अल्बमही बघायला मिळेल.
आशा भोसलेंचा एक छानसा अभिप्राय सुद्धा वाचल्याचा आठवतोय.
तसेच, 'यहां शराब पीना मना है' सारख्या टिपिकल ढाब्याच्या सुचना ही .. Smile]
पत्ता: निलय कॉम्लेक्स शेजारील गल्ली, संतोष हॉल जवळ,
आनंदनगर, नरवीर तानाजी रस्ता,(सिंहगड रोड), पुणे.

३७. रानमळा
गरम गरम चुलीवरचे non veg मिळते.....khup sahi asate.....
पत्ता: चाफेकर चौकाजवल जो जकात नाका आहे , तिथुन सरळ गेल्यावर जो कच्चा रस्ता लागतो, तिथे आहे

३८. हॉटेल नागपुर
इथले मटण रस्सा, पुलाव, अ प्र ति म. बिर्याणी अनेक ठिकाणी मिळते पण
मटण पुलाव मात्र इथे सुरेख मिळतो. अजून एक खासियत म्हणजे इथला भेजा फ्राय.
पत्ता: टिळक स्मारक मन्दिराकडून पेरुगेट पोलिस चौकीकडे जावे.
साधारण शन्भर कदम चालल्यावर (पन्चनामा) डावीकडे हे हॉटेल आहे.
हॉटेल ओळखायची खूण म्हणजे इथे भिन्तीकडे तोन्ड करुन जेवणारे लोक
दिसतील. आणि बाहेर किमान १०-१५ जण आशाळभूत नजरेने त्यान्च्याकडे
पहात असलेले असतील!!!!!

३९. जंजिरा
एक मासे खाण्या साठी चांगले हॉटेल आहे..
पत्ता: अलका टॉकिज वरुन खाली गांजवे चौकात आला कि हे हॉटेल लागते....

४०. यज्ञकर्म उपहारगृह
चमचमीत निरामिष आणि चटकदार सामिष पदार्थांची रेलचेल
पत्ता: सहवास कॉर्नर, कर्वेनगर, पुणे ४११ ०३८.

१) सिहगड रस्त्यावरून राजाराम पुलावरून येताना येताना: समोर 'मातोश्री' वृद्धाश्रम आहे. वृद्धाश्रमाची हद्द संपल्यावर डाव्या हाताला जो रस्ता जातो त्या रस्त्याने आल्यावर डाव्या हाताला 'विठ्ठल मंदिर' लागते, त्याच रस्त्याने पुढे आल्यावर डाव्या हाताला
'स्पेन्सर्स डेली' नांवाचे सुपरमार्केट लागते, तसेच पुढे आल्यावर पुढच्याच चौकात उजव्या हाताला 'गुलाबराव ताठे मित्र मंडळा'चा गणपती आहे. त्या गणपतीला टेकूनचह 'यज्ञकर्म उपहारगृह' आहे.

२) कर्वे रस्त्याने येताना कोथरूड बस स्टँड नंतर डाव्या हाताला (सिग्नलपाशी) 'कोकण एक्स्प्रेस' उपहारगृह आहे, तिथून तसेच पुढे आले की डाव्या हाताला 'कामत उपहारगृह' आहे, तसेच पुढे गेल्यावर डहाणूकर कॉलनी नंतर डाव्या हाताला 'पृथ्वी उपहारगृह' आहे. 'पृथ्वी उपहारगृहा' नंतर डाव्या हाताला एक लहानसा रस्ता खाली उतरतो. काहीशा झोपडपट्टीतून (पण रस्ता चांगला आणि सुरक्षित आहे) 'भुजबळ बंगल्या'वरून सरळ पुढे आल्यावर एका रिक्षा स्टँडच्या छोट्याशा चौकात आपण येतो तिथे रस्ता जसा वळतो तसे उजव्या हातास वळल्यावर सरळ जात राहायचे त्या रस्त्याच्या शेवटास 'क्षिप्रा सहनिवास' नांवाची सोसायटी आहे. पुन्हा रस्त्याबरोबरच उजव्या हातास वळल्यावर किंचीत पुढे उजव्या हातास 'होंडा' सर्व्हिस स्टेशन आहे, तसेच सरळ जात राहिले शेवटी 'T' जंक्शन येते त्या जंक्षनवरच आपले 'यज्ञकर्म उपहारगृह आहे. (शेजारीच 'कोंबडी-वडे' नांवाचे उपहारगृह आहे, पण आपल्याला तिथे जायचे नाहीए.)

३) खुद्द कर्वेनगरात 'प्रतिज्ञा हॉल' हा प्रसिद्ध स्पॉट आहे. 'प्रतिज्ञा हॉल' समोरील रस्त्याच्या एका बाजूस 'अलंकार पोलीस चौकी' आहे तर विरूद्ध बाजूस 'T' जंक्शनवर 'सोलकढी' नांवाचे उपहारगृह आहे. (हा रस्ता राजाराम पुलाकडून येतो) त्या जंक्शन वर उजव्या हातास वळल्यावर दुसर्‍या चौकात 'गुलाबराव ताठे मित्रमंडळाचा' गणपती आणि त्याला लागूनच 'यज्ञकर्म उपहारगृह' आहे.
पत्ता इतका व्यवस्थित देवुनही चुकलात तर याद राखा. :D

४१. मालवणी सोलकढी
पत्ता: कर्वे नगर मधे, 'मातोश्री' वृद्धाश्रमाच्या पुढे

४२. मल्लाका स्पाइस
पत्ता: कोरेगाव पार्कात 'ओशो' आश्रमाशेजारी (थाई)

४३. बाँबे ब्राझरी
पत्ता: बोट क्लब रोडवर

४४. मेन लँड चायना
पत्ता: बोट क्लब रोडवर

४५. प्रेम्स
पत्ता: कोरेगाव पार्कात 'ओशो' आश्रमाशेजारी

४६. ल मेरिडियन
इथलं 'अंगारे' (बहुतेक) हे भारतिय रेस्तराँ फारच जबरी आहे ... तंदुर प्रॉन्स तर एकदम जबरी ..
पत्ता: पुणे स्टेशनच्या मागच्या बाजुला.

४७.आर्थर्स थिम
पत्ता: कोरेगाव पार्कात 'ओशो' आश्रमाशेजारी [फ्रेंच]

४८. चिंगारी
पत्ता: ए बी सी फार्म शेजारी, कोरगाव पार्क जवळ

४९. सिझलर्स साठी -
योको - ढोले पाटील रोड वर
झामुज - ढोले पाटील रोड वर
याना - फर्गुसन कॉलेज रोडवर
द प्लेस - कॅंपात वेस्ट साइड शेजारचं
कोबे - लॉ कॉलेज रोडवर
द चार्कोल पीट - कॅंपात वेस्ट साइड शेजारचं

५०. हॉटेल सिध्दगिरी
स्पेश्यालिटी: मटण भाकरी
लिमिटेड डिश असतात म्हणून लवकर जावे. फक्त संध्याकाळी, [आपली बाटली घेऊन बसायची सोय आहे], जेवण १ नंबर, म्हणून मापात टाकावी.
पत्ता: वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटाच्या पहिल्या वळणाच्या आधी डाव्या हाताला.

५१. हॉटेल तोरणा विहार
कमीत कमी दोन दिवस उ पा शी राहुन नंतर जेवणासाठी जाणे
लईईईच्च भारी.
पत्ता: वेल्हा - तोरण्याच्या पायथ्याशी, पोलीस स्टेशन शेजारी

५२. फ्रेंड्स हॉटेल
जोशीबाईं बनवतात तसा मासा पुण्यात मिळत नाही अशी त्या ठिकाणची ख्याती बर्‍याच वर्षांपासून आहे.
पत्ता: फर्ग्युसन कॉलेजजवळ ज्ञानेश्वर पादुका चौकातून पुणे युनिव्हर्सिटीकडे जाताना एका चौकाच्या कॉर्नरलाच आहे ते.
त्याच्या पलिकडच्या बाजूलाच भाजीवाल्यांचे गाळे आहेत, ही ओळखायची खूण

५३. करी ऑन द रूफ
कॉन्टिनेंटल साठी
पत्ता: प्रभात पो. चौ. समोरील. कमला नेहरू पार्क कडून कर्वे रस्त्याला जाताना, घोडके बंधू मिठाई चौकात उजवीकडे वळालं की डाव्या हाताला. वीटकरी रंगाची इमारत आहे.
किंवा एस्.एन्.डी.टी कॉलेज कडून 'कल्याण' भेळवाल्याकडून पुढे आलं की 'टी' जंक्शन ला उजवीकडे वळाल्यावर डाव्या बाजूस प्रभात पो. चौ. आहे आणि बरोब्बर त्याच्या समोर उजव्या हाताला 'करी ऑन द रूफ' आहे.

५४. http://www.foodinpune.com
***********************************************************************************************

मुंबई
१. समर्थ भोजनालयः गिरगाव [मासे]
पत्ता: बसने ठाकुरद्वार बसस्टॉपला उतरा आणि "मिरबत लेन"ची चौकशी करा. बस रुट पासुन दोन मिनिटाच्या अंतरावर आहे हॉटेल. जरा शोधावे लागते.

२. कोकण्यांची खानावळ
पत्ता: HOTEL HIGHWAY GOMANTAK
44/2179, Gandhi Nagar, Behind Maratha Store, Highway Service Road, Bandra (E), Mumbai
Timings: 11:00 am to 3:30pm and 7:00pm to 10:30pm
Thursday Closed

३. सायबिण
पत्ता: दादर, सेनाभवनच्या बाजुला

४. गोमांतक
पत्ता: दादर

५. सिंधुदुर्ग
पत्ता: शिवाजी पार्क, दादर

६. क्षीरसागर
उत्तम कोंबडी-वडे आणि सागुती पुरवणारे घरगुती उपाहारगृह
पत्ता: आयकर ऑफीस जवळ, लालबाग[?]

७. जयहिंद
पत्ता: पोर्तुगि़ज चर्च च्या बरेच पुढे.

८. योगी
पत्ता: सायन

९. वैशाली
पत्ता: चेंबुर

१०. समर हारवेस्ट् व गजाली
पत्ता: विलेपार्ले पुर्व.

११. दर्या
पत्ता: विलेपार्ले पुर्व.

१२. दाराज चा धाबा
पत्ता: दहिसर चेकनाक्याजवळ.

१३. फोर्ट
महेश लंच होम [मासे]: फिरोजशा मेहेता रोड
संदीप गोमांतक [मासे]: संदीप बोराबाजार
प्रदीप गोमांतक [मासे]: गनबो स्ट्रीट
अपूर्व लंच होम [मासे]: फिरोजशा मेहेता रोड

१४. गजाली
महाग असली (~८००-८५० रू.), तरी तंदुरी क्रॅब ही डिश आवर्जून खाण्यासारखी.
पत्ता: पार्ल्याला हनुमान रोडवर आहे

१५. ग्रॅन्ट हाऊस कॅन्टीन
पत्ता: क्रॉफर्ड मार्केट, व्हीटी स्टेशनला उतरून १ नंबर फलाटाबाहेर पडून उलटे मशीदबंदरच्या दिशेने चालत या आणि कुणालाही विचारा..

१६. निलदुर्ग
खास मालवणी
पत्ता: निलदुर्ग चेंबुर-गोवंडी रोड

१७. कोकणरत्न
पत्ता: दहिसर हायवेजवळ

१८. वैभव
तिथे सगळ्या प्रकारचे नॉनव्हेज एकदम मस्त मिळते.... एवढे चविष्ट नॉनव्हेज खूप कमी ठिकाणी मी चाखले आहे.
मासे ऑर्डर करताना वेटरच विचारतो की मालवणी पद्धतीचा मासा करुन हवा आहे की दुसर्‍या?
[पण मुंबईत असलेल्यांनी तर जरुर तेथे भेट द्यावी
वेळ आणि पैसा दोन्ही सत्कारणी लागेल
घेणार्‍यांची सोय पण चांगली आहे तिथे]
टिपः शिंपले शुक्रवारी खावे. भांडूपहून पुण्याला जाण्यापूर्वी.
पत्ता: मुंबईला ऐरोलीत (भांडूपच्या अलिकडे ) वैभव नावाचे एक झकास हॉटेल आहे.
तिथे मनसेचे ऑफीसपण आहे जवळच...
सेक्टर पाच मधे येते ते
भांडूपकडून येताना पुलावरुन आला की सर्कल लागते, दुसर्‍या सिग्नल वरुन उजवीकडे गेला की मनसेचे ऐरोलीगड लागते
त्याच्या जवळच आहे ते....

१९. सत्कार
उत्तम मासे आणि भाकरी, शिवाय परवडणारे दर..
पत्ताटीळक टॉकीज मागे, डोंबिवली
**********************************************************************************************

ठाणे
१. मालवण (पांच पाखाडी)

२. फिशलॅन्ड (खोपट)

३. कोंकण दरबार (के विला)

४. दर्यासारंग (एलबीएस मार्ग, चेकनाका)

५. विजयदुर्ग (गोल्डन डाइज जंक्शन)

६. सिंधूदुर्ग - बहुधा, नक्की नाव आता आठवत नाही
पत्ता: वागळे इस्टेट, चेकनाका

७. निलम हॉटेल
सर्व प्रकारच्या मांसाहारी जेवणासाठी
पत्ता: विजयनगरी च्या जवळच घोडबंदर् रोड ठाणे.
**********************************************************************************************

कोल्हापुर
१. वामन गेस्ट हाऊस
मालवणी पद्धतीचे जेवण, मोरी मटण मिळते [मोरी मटण म्हणजे शॊर्क माशाची एक जात असते त्यापासून तयार केली जाणारी डीश. ही मालवणी खासियत आहे. ज्याने मोरी मटण खाल्लेले नाही त्याने खरे मालवणी मत्य्स्याहारी भोजन केलेलेच नाही असे म्हणता येईल. एकदा चव घेऊन बघा. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल!]
पत्ता: शाहूपुरी, ऍम्बेसेडर लॉजवळ

२. जुन्या कोल्हापुरात म्हन्जे पेठांत असाल तर सरळ कुठल्याही घरगुती खानावळीत घुसायचं ..(फक्त बघुन काही खानावळी फक्त शाकाहारी आहेत) चांगलं जेवण मिळनार..
पुण्यात कोल्हापुरी च्या नावखाली जो फक्त लाल तिखट जाळ असनारं फुळुक पाणी देत्यात च्यामारी... चक्कीत जाळ होतो ! (जाळ हा त्यातल्या तिखटा मुळे नाही ).

अवो शहरातल्या नवीन भागात ही कीती तरी चांगली हॉटेलं आहेत...
ओपेल >>जुना पुणे बेंगलोर रोड
तंदुर >> जुना पुणे बेंगलोर रोड
अयोध्या >> कावळा नाका
राजधानी >> रुईकर कोलनी
सायबा >> राजारामपुरी जनता बझार मागे
शेतकरी धाबा >> फुलेवाडी
पद्मा गेस्ट हाऊस >> धैर्यप्रसाद हॉल शेजारी
पर्ल >> सी.बी.एस. जवळ
**********************************************************************************************

चिपळूण
१. अभिषेक

२. दिपक
चिपळुणात अभिषेकमध्ये मालवणी जेवणारा माणूस हा नेहमीच हायवेवरून ये-जा करणारा असतो. त्याला खरा कोकणातल्या जेवणाचा (मालवणी नव्हे, ती चव वेगळी!)स्वाद माहीतच नसतो. तो स्वाद घ्यायचा असेल तर हॉटेल दीपकला भेट द्या. तळलेले मासे, मच्छी करी, चिकन मसाला आणि मटण फ्राय ही देखिल येथील खासियत आहे. साधी खाणावळ वाटावी असे हे हॉटेल चवीमुळे ग्राहक राखून आहे. तांदळाची गरमागरम भाकरी आणि झणझणीत मटण एकदा चापलेत की तुम्ही तिथे जातायेता कायम थांबाल.
आणि आदरातिथ्याचे म्हणाल तर तिथे असलेला टोपीवाला वाढपी मामा तुमच्या पानातल्या वाटीमधला रस्सा तुम्ही जरा मनापासून चापताय असे वाटले तर सढळ हाताने पुन्हा आणून वाढतो. त्यासाठी टीप मिळावी अशी बिचार्‍याची अपेक्षाही नसते. आणि बिल घेताना तुमच्या चेहर्‍यावरचे समाधान टीपत मालक हसर्‍या चेहर्‍याने बिल घेतात. ज्यांची घरात सामिष भोजनाबाबत उपासमार होते असे स्थानिक ग्राहक कित्येकदा दुपारच्यावेळी येथे मटण भाकरीवर आडवा हात मारताना दिसतात.
ता.क. स्थानिक ग्राहक अभिषेकपेक्षा दीपकमध्ये जास्त असतात! सार लक्षात आले असेलच!
पत्ता: तहसीलदार कचेरीसमोर हायवेला लागून जरा आत हे हॉटेल आहे.

**********************************************************************************************

रत्नागिरी
१. हॉटेल आमंत्रण
पत्ता: एसटी डेपो(वर्कशॉप) जवळ आहे चौकशी करतेवेळी 'माळनाका' असा उल्लेख करावा

२. प्रशांत लंच होम
टिपीकल मालवणी जेवणाचा स्वाद घ्यायला उत्तम ठिकाण! उत्तम मासे खायला मिळतात. अस्सल मालवणी सोलकढी कशी असते याचा स्वाद येथे जाऊन घ्यावा, म्हणजे अनेकदा सोलकढीच्या नावाखाली आपण जे काही पितो ते किती फिके आहे याचा अंदाज येतो.
पत्ता: विहार वैभव लॉज व जिल्हा माहिती कार्यालयाजवळ, बंदर रोडला आहे.

३. मारुती मंदीरला उतरल्यावर डाव्या हाताला एक/दोन चांगली हॉटेल्स आहेत. बटाटेवड्यासाठी 'खाली' १९५२ पासुनचे विहार हॉटेल.गोखले नाक्याजवळ भिडे उपहार ग्रुह. ही शाकाहारी आहेत.

४. खालच्या आळीतल्या विहार लॉज जवळची सतीशकाकाची खाणावळ्..तिचं नाव कधीच नाही विचाराची वेळ नाही आली. पण "सतिश खानोलकराची खाणावळ" असं तिथे जाऊन विचारता येईल. (मला वाटतं प्रशांत लंच होम आहे नाव्..पण गॅरेंटी नाही ) ताजं फडफडीत पापलेट खावं तर इथेच.
**********************************************************************************************

हैदराबाद
१. बावर्ची
पत्ता: आर टी सी क्रॉस रोड

२. कॅफे बहार
बिर्यानी वोक्के असते.
पत्ता: हिमायतनगर

३. पॅराडाइज
पत्ता: पॅराडाइज सर्कल, सिकंदराबाद

४. बडे मिया
पत्थर का गोश्त खायचे असेल तर.
पत्ता: टँक बंड (हुसन सागर)

५. नायगारा
पाया - इरानी रोटी वगैरे खायचे असेल तर
पत्ता: कवाडीगुडा किंवा मदीना...

६. अभिरुची
आंध्रा चवीचे मटनबिटन, मासेबिसे (मटन फ्राय मसाला, चापल पुलुसु/ अपोलो फिश)
तित्तर-बटेर 'फिश लँड'-लकडी - का- पूल कधीकधी मिळतात. मरोळ (गोड्या पाण्यातला मासा) फस्क्लास!
पत्ता: आरटीसी क्रॉस रोड.

७. ईरानी चाय शौकिन बहार
बिर्यानीसुद्धा लै भारी.
पत्ता: वाय एम सी ए , सिकंदराबाद

टिपः हैदराबादी बिरयानी आणि दख्खन चवींसाठी 'हैदराबाद हाऊस' च्या आता ठिकठिकाणी शाखा सुरू झाल्यात.
सर्वच उत्तम!

८. मिनर्व्हा
पिव्वर शाकाहारी ("तिकडचे चमचेसुद्धा चालत नाहीत आम्हाला!") लोकांसाठी
पत्ता: हिमायतनगर, पंचरत्न- काचीगुडा

टिपःअन्नपूर्णा- शंकरमठ इ. ठिकाणे ट्राय करावीत.
बाकी आजकाल अप्टाऊन ईटरीज सगळ्या बंजारा हिल्स, ज्युबिली हिल्स परिसरात आहेत.
अंगिठी, तबला ही काही प्रसिद्ध नावे. तिकडे खान-पान इ. सोयी आहेत.
मेक्सिकन, थाय वगैरे तेथे मिळेल.

९. चटणीज
याहून उत्तम दक्षिण भारतीय हैदराबाद मध्ये नाही. इडली, "स्टीम डोसा", एम एल ए पेसरट्टू ही विशेष खासियत. दक्षिण भारतीय अनलिमिटेड थाळी ही मिळते.
पत्ता: नागार्जुना हिल्स - ज्युबिलीकडून पंजागुट्टाला जाताना डाव्या बाजूला
टिपःशेजारी एक बफे पण आहे जिथे उत्तर व दक्षिण भारतीय असा अनलिमिटेड बफे आहे. असंख्य पदार्थ आणि डेझर्टस. उत्तम आहे. चटणीज पूर्ण शाकाहारी आहे.

१०. अंगिठी
जबरदस्त उत्तर भारतीय बफे. वेगवेगळे पण मागवता येतात पण बरंच महाग आहे.
शोरबा सही असतो. सामिष निरामिष दोन्ही उत्तम आहे.
पत्ता: केअर हॉस्पिटल समोर. मासाब टँक कडुन पंजागुट्टा कडे जाताना.

११. ओहरीज
बेष्ट चायनीज - अतिशय ऑथेन्टिक चायनीज, सुंदर चायनीज सजावट. बांबू राइस ही पोकळ बांबू मध्ये बांबू शूट्स सह केलेली रेसिपी छान आहे. बिर्याणी बफे असतो. हॅवमोर नावाचे त्यांचे आइस्क्रीम आहे. तिथले आइस्क्रीम आणि संडेज ला तोड नाही.
पत्ता: बशीर बाग आणि बंजारा हिल्स रोड नं १२

१२. व्हेन्यू
निजामी पद्धतीचे शाही सामिष पदार्थ. निजामी सजावट आणि रचना मस्त आहे. महाग आहे पण एका डिश मध्ये पदार्थाची क्वांटिटी बरिच येते.
पत्ता: नामपल्ली, हैदराबाद स्टेशन समोर क्वालिटी इन रेसिडेन्सी हे प्रसिद्ध ३/४ तारांकित हॉटेल आहे. त्याला जोडलेले रेस्टॉरंट.

-संताजी धनाजी

संस्कृतीपाकक्रियाजीवनमानराहणीमौजमजामतशिफारससल्लाअनुभवमाहितीआस्वाद

प्रतिक्रिया

उम्मि's picture

22 Nov 2008 - 11:09 am | उम्मि

पण एखाद्या होटेलचा सविस्तर पत्ता मिळेल काय??
मानलं बुवा!!!
समस्त खवय्यांचे तुम्हांस आशिर्वाद.............................

एक खवय्या,

उम्मि.

संताजी धनाजी's picture

24 Nov 2008 - 2:02 pm | संताजी धनाजी

अहो हे आपल्या सर्वांसाठीच तर केले :)
लोभ असावा.
- संताजी धनाजी

निखिलराव's picture

22 Nov 2008 - 12:40 pm | निखिलराव

जबद्स्त डाटा मिळाला. पुस्तकच काड्तो....
धन्यवाद !!!

सुनील मोहन's picture

22 Nov 2008 - 3:26 pm | सुनील मोहन

हॉटेल नागपूर.
टिळक स्मारक मन्दिराकडून पेरुगेट पोलिस चौकीकडे जावे.
साधारण शन्भर कदम चालल्यावर (पन्चनामा) डावीकडे हे हॉटेल आहे.
हॉटेल ओळखायची खूण म्हणजे इथे भिन्तीकडे तोन्ड करुन जेवणारे लोक
दिसतील. आणि बाहेर किमान १०-१५ जण आशाळभूत नजरेने त्यान्च्याकडे
पहात असलेले असतील!!!!!

पण इथले मटण रस्सा, पुलाव, अ प्र ति म. बिर्याणी अनेक ठिकाणी मिळते पण
मटण पुलाव मात्र इथे सुरेख मिळतो. अजून एक खासियत म्हणजे इथला भेजा फ्राय.
हे लिहून झाल्यावर तडक हॉटेल नागपूर गाठणार आहे कारण लिहितानाच तोन्डाला
पाणी सुटले आहे.

अभिज्ञ's picture

22 Nov 2008 - 4:18 pm | अभिज्ञ

बघा,
पुण्यातच ५० ठिकाणे सापडली.:)
मुंबई व ठाणे मिळून साधारण २५ हॉटेल्स.
पुणेकर लोक किती रसिक व चोखंदळ असतात ह्याचा हा पुरावाच.;)
अरे महाराष्ट्रातली इतर ठिकाणे हि येउद्यात रे.

अभिज्ञ.

घाटावरचे भट's picture

22 Nov 2008 - 6:02 pm | घाटावरचे भट

कृपया यातून पुणे वि. मुंबई असा वाद सुरु करू नये ही नम्र विनंती.
(अभिज्ञराव, कृपय वैयक्तिक घेउ नये.)

संताजी धनाजी's picture

22 Nov 2008 - 7:14 pm | संताजी धनाजी

मीही तेच म्हणणार होतो. :D
महाराष्ट्रातली इतर ठिकाणे जरुर येवुदेत की!

- संताजी धनाजी

कलंत्री's picture

22 Nov 2008 - 6:28 pm | कलंत्री

भारतातील लोक खवय्ये समजले जातात. मिपावर यासाठी वेगळे सदरच हवे, उदा. पाककृती, चर्चा, काव्य इत्यादी सारखे.

म्हणजे देशातील अथवा जगातील उत्तम खाद्यतिर्थक्षेत्राची यादी कोणालाही विनासायास मिळु शकेल.

सरपंचानी विचार करावा.

विसुनाना's picture

22 Nov 2008 - 6:30 pm | विसुनाना

कॅफे बहार हे आर.टी. सी. क्रॉसला नसून हिमायतनगरजवळ आहे.
बिर्यानी वोक्के असते.

पत्थर का गोश्त खायचे असेल तर बडे मिया - टँक बंड (हुसन सागर) ट्राय करावे.
पाया - इरानी रोटी वगैरे खायचे असेल तर नायगारा - कवाडीगुडा किंवा मदीना...
हैदराबादी बिरयानी आणि दख्खन चवींसाठी 'हैदराबाद हाऊस' च्या आता ठिकठिकाणी शाखा सुरू झाल्यात.
सर्वच उत्तम!
आंध्रा चवीचे मटनबिटन, मासेबिसे (मटन फ्राय मसाला, चापल पुलुसु/ अपोलो फिश) अभिरुची - आरटीसी क्रॉस रोड.
तित्तर-बटेर 'फिश लँड'-लकडी - का- पूल कधीकधी मिळतात. मरोळ (गोड्या पाण्यातला मासा) फस्क्लास!

ईरानी चाय शौकिन बहार - वाय एम सी ए , सिकंदराबाद येथे जाऊ शकतात. तिथली बिर्यानीसुद्धा लै भारी.

पिव्वर शाकाहारी ("तिकडचे चमचेसुद्धा चालत नाहीत आम्हाला!") लोकांनी मिनर्व्हा- हिमायतनगर, पंचरत्न- काचीगुडा
आणि अन्नपूर्णा- शंकरमठ इ. ठिकाणे ट्राय करावीत.

बाकी आजकाल अप्टाऊन ईटरीज सगळ्या बंजारा हिल्स, ज्युबिली हिल्स परिसरात आहेत.
अंगिठी, तबला ही काही प्रसिद्ध नावे. तिकडे खान-पान इ. सोयी आहेत.
मेक्सिकन, थाय वगैरे तेथे मिळेल.

संताजी धनाजी's picture

22 Nov 2008 - 7:22 pm | संताजी धनाजी

वरील माहीती घेवुन लेख अद्ययावत केला आहे. आभारी आहे :)

- संताजी धनाजी

कबाब, बिर्याणी बर्‍यापैकी असतात, पण बुफे प्रकारातले उत्तम जेवण.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

दत्ता काळे's picture

22 Nov 2008 - 7:23 pm | दत्ता काळे

१. वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटाच्या पहिल्या वळणाच्या आधी डाव्या हाताला " हॉटेल सिध्दगिरी " - स्पेश्यालिटी : मटण भाकरी,
लिमिटेड डिश असतात म्हणून लवकर जावे. फक्त संध्याकाळी , ( आपली बाटली घेऊन बसायची सोय आहे ), जेवण १नंबर, म्हणून मापात टाकावी.

२. हॉटेल तोरणा विहार - वेल्हा - तोरण्याच्या पायथ्याशी, पोलीस स्टेशन शेजारी
- कमीत कमी दोन दिवस उ पा शी राहुन नंतर जे वणासाठी जाणे
लईईईच्च भारी.

पुण्याच्या जोशीबाईंचे फ्रेंड्स हॉटेल राहिले हो यादीत, तेवढे वाढवून घ्या...

जोशीबाईं बनवतात तसा मासा पुण्यात मिळत नाही अशी त्या ठिकाणची ख्याती बर्‍याच वर्षांपासून आहे.
बहुतेक फ्रेंड्स नाव आहे हॉटेलचे...फर्ग्युसन कॉलेजजवळ ज्ञानेश्वर पादुका चौकातून पुणे युनिव्हर्सिटीकडे जाताना एका चौकाच्या कॉर्नरलाच आहे ते.
त्याच्या पलिकडच्या बाजूलाच भाजीवाल्यांचे गाळे आहेत, ही ओळखायची खूण

(मासाप्रेमी) सागर

व्यंकु's picture

23 Nov 2008 - 11:42 am | व्यंकु

वरती उल्लेख केल्याप्रमाणे रत्नागिरीतील आमंत्रण हॉटेल एसटी स्टॅँडजवळ नसुन एसटी डेपो(वर्कशॉप) जवळ आहे चोकशी करतेवेळी 'माळनाका' असा उल्लेख करावा

आपला रत्नागिरीचा व्यंकु

केवळ_विशेष's picture

24 Nov 2008 - 12:38 pm | केवळ_विशेष

बॉस!

थांकू बरं का! :)

मला एड्रेस नीट माहीत नव्हता...म्हणून जरा घोटाळा झाला...

पुढ्ल्या रत्नागिरी ट्रिप ला जाताना पुन्हा नक्की जाईन!

संताजी धनाजी's picture

24 Nov 2008 - 2:11 pm | संताजी धनाजी

अद्ययावत केले.
- संताजी धनाजी

शैलेन्द्र's picture

23 Nov 2008 - 1:16 pm | शैलेन्द्र

डोंबिवलीचे "सत्कार" टीळक टॉकीज मागे..

उत्तम मासे आणि भाकरी, शिवाय परवडणारे दर..

संताजी धनाजी's picture

24 Nov 2008 - 2:13 pm | संताजी धनाजी

अद्ययावत केले.
- संताजी धनाजी

जुन्या कोल्हापुरात म्हन्जे पेठांत असाल तर सरळ कुठल्याही घरगुती खानावळीत घुसायचं ..(फक्त बघुन काही खानावळी फक्त शाकाहारी आहेत) चांगलं जेवण मिळनार..
पुण्यात कोल्हापुरी च्या नावखाली जो फक्त लाल तिखट जाळ असनारं फुळुक पाणी देत्यात च्यामारी... चक्कीत जाळ होतो ! (जाळ हा त्यातल्या तिखटा मुळे नाही ).

अवो शहरातल्या नवीन भागात ही कीती तरी चांगली हॉटेलं आहेत...
ओपेल >>जुना पुणे बेंगलोर रोड
तंदुर >> जुना पुणे बेंगलोर रोड
अयोध्या >> कावळा नाका
राजधानी >> रुईकर कोलनी
सायबा >> राजारामपुरी जनता बझार मागे
शेतकरी धाबा >> फुलेवाडी
पद्मा गेस्ट हाऊस >> धैर्यप्रसाद हॉल शेजारी
पर्ल >> सी.बी.एस. जवळ

आपला कोल्हापुरी ...बन्ड्या

संताजी धनाजी's picture

24 Nov 2008 - 2:15 pm | संताजी धनाजी

अद्ययावत केले.
- संताजी धनाजी

उमराणी सरकार's picture

8 Nov 2009 - 8:58 pm | उमराणी सरकार

मार्केट यार्ड समोरील 'परख' चा उल्लेख आवश्यक आहे.

उमराणी सरकार

न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे

मैत्र's picture

24 Nov 2008 - 2:39 pm | मैत्र

१. पॅराडाइज - हे पॅराडाइज सर्कल सिकंदराबाद इथे आहे. आर टी सी क्रॉस रोडला नाही.
२. चटणीज -- नागार्जुना हिल्स - ज्युबिलीकडून पंजागुट्टाला जाताना डाव्या बाजूला - याहून उत्तम दक्षिण भारतीय हैदराबाद मध्ये नाही. इडली, "स्टीम डोसा", एम एल ए पेसरट्टू ही विशेष खासियत. दक्षिण भारतीय अनलिमिटेड थाळी ही मिळते.
३. चटणीज - शेजारी एक बफे पण आहे जिथे उत्तर व दक्षिण भारतीय असा अनलिमिटेड बफे आहे. असंख्य पदार्थ आणि डेझर्टस. उत्तम आहे. चटणीज पूर्ण शाकाहारी आहे.
४. अंगिठी - केअर हॉस्पिटल समोर -- मासाब टँक कडुन पंजागुट्टा कडे जाताना. जबरदस्त उत्तर भारतीय बफे. वेगवेगळे पण मागवता येतात पण बरंच महाग आहे.
शोरबा सही असतो. सामिष निरामिष दोन्ही उत्तम आहे.
५. ओहरीज - बशीर बाग आणि बंजारा हिल्स रोड नं १२ - बेष्ट चायनीज - अतिशय ऑथेन्टिक चायनीज, सुंदर चायनीज सजावट. बांबू राइस ही पोकळ बांबू मध्ये बांबू शूट्स सह केलेली रेसिपी छान आहे. बिर्याणी बफे असतो. हॅवमोर नावाचे त्यांचे आइस्क्रीम आहे. तिथले आइस्क्रीम आणि संडेज ला तोड नाही.
६. व्हेन्यू - नामपल्ली - हैदराबाद स्टेशन समोर क्वालिटी इन रेसिडेन्सी हे प्रसिद्ध ३/४ तारांकित हॉटेल आहे. त्याला जोडलेले रेस्टॉरंट. निजामी पद्धतीचे शाही सामिष पदार्थ. निजामी सजावट आणि रचना मस्त आहे. महाग आहे पण एका डिश मध्ये पदार्थाची क्वांटिटी बरिच येते.

रेवती's picture

2 Dec 2008 - 10:11 pm | रेवती

केवळ चविष्ट.
चटनीज् चे बांधकाम चालू असल्यापासून बधत होते.
नंतर बरेच शकाहारी पदार्थ चाखले, अगदी उपमा सुद्धा चविष्ट आहे.
छान आठवणी आहेत चटनीज् च्या.

रेवती

मनस्वी's picture

24 Nov 2008 - 3:48 pm | मनस्वी

हैदराबाद

बिर्याणीसाठी उत्तम पर्याय :
१. पॅराडाइज
२. बावर्ची

शाकाहारी / मांसाहारीसाठी उत्तम पर्याय :
१. अंगीठी (बंजारा हिल्स) - दुपारचा बफेही मस्त, महाग पण उत्तम
२. बार्बेक्यू नेशन (बंजारा हिल्स)
३. पंजाबी ढाबा (गच्चीबोली-कोंडापूर सिग्नलच्या चौकात) - स्वस्त आणि मस्त
४. मालगुडी (निरनिराळी आऊटलेट्स)
५. बी.जे.एन. (बंजारा हिल्स)
६. ईरानी चाय (ज्युबिली हिल्स, रोड नं १०)
७. हवेली (कोंडापूर) - कै च्या कै महाग
८. अवर पॅलेस (बंजारा हिल्स, रोड नं १०)

शाकाहारीसाठी उत्तम पर्याय :
१. चटनीज् (शेजारील बफे टुकार आहे)
२. ओहरीज् (मल्टीकसीन) - कै च्या कै महाग

उमराणी सरकार's picture

8 Nov 2009 - 9:00 pm | उमराणी सरकार

४ मिनार जवळचे पिस्ता हाउस देखील बिर्याणीसाठी उत्तम.
उमराणी सरकार

न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे

संताजी धनाजी's picture

24 Nov 2008 - 4:41 pm | संताजी धनाजी

वा! काय यादी झाली आहे. तोंडाला भयंकर पाणी सुटले आहे. =P~ आता आठवड्यातुन एकदा तरी एकेका हॉटेलात जायचा बेत आहे.

- संताजी धनाजी

केवळ_विशेष's picture

24 Nov 2008 - 5:04 pm | केवळ_विशेष

एक आणखी अपडेट करणार का...

प्रभात पो. चौ. समोरील,

करी ऑन द रूफ
(कॉन्टिनेंटल साठी)

पुणे.

कमला नेहरू पार्क कडून कर्वे रस्त्याला जाताना, घोडके बंधू मिठाई चौकात उजवीकडे वळालं की डाव्या हाताला. वीटकरी रंगाची इमारत आहे.

किंवा एस्.एन्.डी.टी कॉलेज कडून 'कल्याण' भेळवाल्याकडून पुढे आलं की 'टी' जंक्शन ला उजवीकडे वळाल्यावर डाव्या बाजूस प्रभात पो. चौ. आहे आणि बरोब्बर त्याच्या समोर उजव्या हाताला 'करी ऑन द रूफ' आहे.

संताजी धनाजी's picture

24 Nov 2008 - 7:12 pm | संताजी धनाजी

अद्ययावत केले.
- संताजी धनाजी

विजुभाऊ's picture

24 Nov 2008 - 7:09 pm | विजुभाऊ

सदाशिव पेठेतल्या " नागपूर " हाटेलची खासीयत म्हणजे इथे समोरासमोर बसुन खाता येत नाही.
सगळी माणसे भिन्तीकडे तोंड करुन बैलानी गव्हाणीत आम्बोण खावे तशी भिन्तीकडे तोन्ड करुन खात असतात

मुम्बैच्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणार्‍या थंडीची आठवण येऊन तुमचे गाल आरक्त होत असतील तर याचे आश्चर्य बाळगु नका. त्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणारी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

संताजी धनाजी's picture

25 Nov 2008 - 4:31 pm | संताजी धनाजी

आजच पिंपरी चिचवड मधील मालवण समुद्र मध्ये जावुन आलो.

मांदेली फ्राय, बोंबील फ्राय, भरलेला पापलेट, सुरमई फ्राय, पापलेट फ्राय आणि कोळंबी भात मागवला होता.
अतिशय उत्तम जेवण होते. सोबतीला सोलकढी होतीच :)

- संताजी धनाजी

अनंत छंदी's picture

25 Nov 2008 - 6:21 pm | अनंत छंदी

रत्नागिरीत विहार वैभव लॉज व जिल्हा माहिती कार्यालयाजवळ, बंदर रोडला प्रशांत लंच होम आहे. टिपीकल मालवणी जेवणाचा स्वाद घ्यायला उत्तम ठिकाण! उत्तम मासे खायला मिळतात. अस्सल मालवणी सोलकढी कशी असते याचा स्वाद येथे जाऊन घ्यावा, म्हणजे अनेकदा सोलकढीच्या नावाखाली आपण जे काही पितो ते किती फिके आहे याचा अंदाज येतो.
आताही मी कल्पनेत प्रशांत मध्ये मासे हादडतो आहे!

व्यंकु's picture

25 Nov 2008 - 9:32 pm | व्यंकु

वा राव प्रशांत मधले मासे म्हंजी लय बेश्ट बघा

मैत्र's picture

26 Nov 2008 - 9:43 am | मैत्र

प्रशांत लंच होम झकास आहे.

अनंत छंदी's picture

26 Nov 2008 - 9:32 pm | अनंत छंदी

प्रतिसाद थंडावलेला दिसतोय! हॉटेलं संपली की सगळे उपोषण करतायत? हॉटेलं संपली असली तर मला वाटतं खाद्यपदार्थांच्या गाड्या, स्टॉल्स, ठेले , धाबे अजून शिल्लक आहेत. माझ्याकडून काही भर...
कराड बसस्थानकासमोर रात्रीच्यावेळी एक आटीव दुधाची हातगाडी लागते. साखर, वेलची घालून आटवून रवाळ झालेले गरमागरम दूध मोठ्या ग्लासात ओतून तो गाडीवाला चमचाभर खवा घालून आपल्या हातात देतो. अशी मस्त चव लागते, की काही विचारू नका. एका वेळी चार ग्लासचा आपला रेकॉर्ड आहे. तो गाडीवालाही कुठून हा दुष्काळग्रस्त आला? अशा नजरेने पहात राहिला होता.

संताजी धनाजी's picture

2 Dec 2008 - 3:13 pm | संताजी धनाजी

हो ना! आता नेमके मुंबईला पाहुणे आले होते आणि येवुन वरती पण गेले, त्यामुळे सगळे जण त्यांचा समाचार घ्यायला गेले आहेत.

- संताजी धनाजी

भिडू's picture

2 Dec 2008 - 9:09 pm | भिडू

इथे बँगलोर ला कलमी कबाब नावाची चिकन तन्दुरी सारखी मस्त डिश मिळते....हे कबाब खूप सॉफ्ट असतात्..आणि स्पाईसी ही......चव अर्थातच उत्तम....त्यातुन जोडिला बाटली असेल तर चव अजुनच वाढते.हि डीश इथे कुठल्याहि नॉन्-व्हेज होटेल मधे मिळते. पण इथे मी २/३ ठिकाणी चिकन लॉलिपॉप ट्राय केले...चव एकदम बेकार्...आणि आकार पण लहान्.कोनाला बॅगलोर मधली फूड जॉईन्ट्स माहीत आहेत का?

संदीप चित्रे's picture

2 Dec 2008 - 11:33 pm | संदीप चित्रे

संताजी धनाजी...
मुंबईच्या यादीत बांद्रा इथलं सायबा टाका की राव ... मालवणी जेवण, विशेषतः तिसर्‍या मसला अप्रतिअम.
नक्की पत्ता तात्या किंवा कुणी अस्सल मत्स्यप्रेमी मुंबईकर देऊ शकेल

प्रदीप's picture

2 Sep 2009 - 7:18 pm | प्रदीप

एस. व्ही. रोडवर जामा मशिदीच्या समोर आहे. (मला वाटते त्या बिल्डींगचे नाव 'झरीन' असावे--- तेथे सुप्रसिद्ध सरोद वादक श्रीमति झरीन दारुवाला राहतात).-- माहिमकडून बांद्र्याकडे जातांना पश्चिम महामार्गाचा फाटा गेला की जरा पुढे गेल्यावर डाव्या हातास हे लागेल-बरोबर समोर, आपल्या उजव्या बाजूस जामा मस्जिद.

पर्नल नेने मराठे's picture

2 Sep 2009 - 3:46 pm | पर्नल नेने मराठे

'पेनिन्सुला' सायन सर्कलला.
चुचु

अमित बेधुन्द मनचि लहर's picture

2 Sep 2009 - 4:48 pm | अमित बेधुन्द मन...

पुरेपुर कोल्हापुर
लै भरि

तर्री's picture

2 Sep 2009 - 5:52 pm | तर्री

१.गोमांतक : पोस्टाच्या गल्लीत. ( थाळी झकास)
२. विश्व सम्राट व अथीती : मुलुंड (प)
३. निसर्ग : ला.ब. शास्त्री मार्गावर

ठाण्यात गेल्यावर्षी लेरीदा / विहंग / सत्कार रेसिसन्सी ही ३ त्रीतारांकीत हॉटेले झालीत. जरूर जावे आशी. बुफे : अनलिमिटेड , नोन वेज रु.२७५ /-

सुनील's picture

2 Sep 2009 - 9:08 pm | सुनील

ठाण्यात गेल्यावर्षी लेरीदा / विहंग / सत्कार रेसिसन्सी ही ३ त्रीतारांकीत हॉटेले झालीत. जरूर जावे आशी. बुफे : अनलिमिटेड , नोन वेज रु.२७५ /-
आणि विहंगमध्ये अनलिमिटेट बुफेसोबत एक ग्लास वाइन अथवा बियर कॉम्प्लिमेंटरी!! लेरिडा/सत्कारबद्दल कल्पना नाही.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

क्रूपया विहंग चा पत्ता मिळु शकेल का??

अत्रन्गि पाउस's picture

24 Dec 2012 - 9:57 pm | अत्रन्गि पाउस

ओतप्रोत बटर चिकन...

संजय अभ्यंकर's picture

2 Sep 2009 - 7:22 pm | संजय अभ्यंकर

भोपाळ:

मांसाहारा साठी: हकिम रेस्टॉरंट (ह्याच्या शाखाही आहेत).
शुद्ध शाकाहारी: बापु की कुटिया
(दोन्ही रेस्टीरंट्स महाराणा प्रताप चौकात आमोरे सामोरे)

दिल्लीत:
पॉट पौरी, का के दा होटलः दोन्ही कॅनॉट प्लेस मध्ये सुपर बझार जवळ)
दोन्ही मांसाहारी

हॉटेल पेशावरी (शाकाहारी), निरुलाज (सामिष)
अजमलखाँ रोडवर पो. चौकी जवळ

कलकत्ता:
कॅमॅक स्ट्रीटवर (रोबिंद्रो शॉदन स्टेशन कडचे टोक) ३-४ फास्ट फूड वाले आहेत. त्यांच्या कडे फक्त रोल्स मिळतात. पोळी किंवा पराठ्यात शाकाहारी व मंसाहारी पदार्थ भरून रोल बनवतात.

चवीष्ट मॉछे झोल (फिश करी) खायचा असेल तर कुठल्याही भागातले अतीशय कळकट होटेल शोधावे, तशी चव हाय फाय हॉटेलांत नाही.
डमडम विमानतळाजवळ स्टाफ कँटीन बेष्ट.

चेन्नई मध्ये:
सरवणा भवन: शुद्ध व अप्रतीम शाकाहारी. ह्याची कैमा इडली नावाची डीश बेष्ट (संपूर्ण चेन्नई भर शाखा तसेच परदेशातही काही ठिकाणी शाखा.
वसंत भवनः शुद्ध शाकाहारी: संपुर्ण चेन्नईभर शाखा
अंज्जापार: खास मध्य तामीळनाडू मधल्या (चेट्टीनाड स्टाईल)मांसाहारी डीशेस मिळतात. सशाची सागुती मिळते. चेन्नईत सर्वत्र शाखा
कराईकुडी: खास तामीळ सीफूड (राधाकॄष्ण सालै वर (सवेराहॉटेल जवळ, निलगिरिज हॉटेलच्या समोर)

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

संदीप चित्रे's picture

3 Sep 2009 - 2:07 am | संदीप चित्रे

आहाहा.... आता पुन्हा एकदा जायला पाहिजे...सुदैवाने अंजप्पारची शाखा न्यू जर्सीलाही आहे आणि मस्त झणझणीत जेवण असतं !

पर्नल नेने मराठे's picture

3 Sep 2009 - 11:07 am | पर्नल नेने मराठे

सरवणा भवन: शुद्ध व अप्रतीम शाकाहारी. ह्याची कैमा इडली नावाची डीश बेष्ट (संपूर्ण चेन्नई भर शाखा तसेच परदेशातही काही ठिकाणी शाखा.
मलाही आवड्ते सर्वणा भवन.....
चुचु

ब्रिटिश टिंग्या's picture

3 Sep 2009 - 11:18 am | ब्रिटिश टिंग्या

सर्वणा भवन खरोख्रर चांगले!
सात्विक अन् शुद्ध शाकाहारी! :)

पर्नल नेने मराठे's picture

3 Sep 2009 - 12:01 pm | पर्नल नेने मराठे

माझा मित्र म्हण्तो कि तिक्दे सग्ले अण्णा असतात म्हणुन ते सर्वणा भवन ;)
चुचु

विंजिनेर's picture

3 Sep 2009 - 11:10 am | विंजिनेर

चेन्नई मध्ये:

अजून काही:
जी आर टी ग्रँड डेज् : पंचतारांकित (असून सुद्धा!) अतिशय चविष्ट जेवणासाठी प्रसिद्ध. विषेशतः चेट्टीनाड आणि मल्लू पदार्थांसाठी महशूर.
ह्यांचा बफे साधाराणतः ३००/- पर्यंत असतो

चेनैच्या विमानतळावर वडाकरी डोसा मिळतो. तो सुद्धा खासच.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

3 Sep 2009 - 1:24 pm | भाग्यश्री कुलकर्णी

भोपाळला "बापु की कुटीया"
मध्ये शाकाहारी जेवण खरच खुप छान असतं.इंदोरला "गुरुक्रुपा"मध्येही शाकाहारी स्वस्त आणी मस्त.

सुधीर काळे's picture

3 Sep 2009 - 10:03 am | सुधीर काळे

जकार्ता येथे तीन चांगली भारतीय भोजनगृहे आहेतः
१. क्वीन्स,"सुंतर" तलावाच्या किनार्‍यावर (आमच्या भाषेत "दानाउ सुंतर") फोन नं. ६५०-९९६९. त्यांचेच थामरिन रोडवरही एक भोजनगृह आहे.
२. गणेश, एक संस्कृती (सुदिरमान रोड-सुब्रोतो रोड क्रॉसिंग) फोन नं. ५७१३५६७
३. जयपूर (रसूना सईद रोड) फोन नं. ०८५८८०९४३०४३
जकार्ताला सुंतर या विभागात भारतियांची वस्ती बरीच आहे. तिथे "मेहफिल" नावाचे छान जेवण मिळणारे पण 'डेकोर' जरा उडिपीस्टाईलचे असलेले छान भोजनगृह आहे.
आपण दिलेल्या भोजनगृहांचे फोन नं. दिल्यास उपकार होतील!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

चिरोटा's picture

9 Oct 2009 - 11:13 am | चिरोटा

१)हैदराबाद बिर्याणी हाउस्.(फोरम मॉल जवळ)
२)दखनी देख्(जयनगर ४ ट साचा)-बिर्याणी कबाब.
३)नंदिनी-जयनगर्/कोरमंगला/.. आंध्र इश्टाईल
४)हळ्ळी माने- ३ छेद-संपिगे मार्ग- मल्लेश्वरम(कन्नड स्टाइल जेवण-रागी मुड्डे/कुंदापुर पत्रोडे मस्त असतात) शिवाय डोस्यांचे २०/२१ प्रकार मिळतात.
५)बेंगळुरुतले world famous- MTR उर्फ मावळ्ळी टिफिन रूम्.लालबागच्या जवळ्. जगातला सर्वात उत्तम डोसा,शिरा,कॉफी इकडे मिळतात.
६) मैय्याज(maiyya's)- जयनगर ४ साचा. अप्रतिम कन्नड शाकाहारी जेवण.
७)विद्यार्थी भवन- गांधी बाजार्-बसवनगुडी(शिरा/डोसा/कॉफी/वडा)
८)उपहार दर्शिनी- DVG Road बसवनगुडी(शेवगे भात्,शिरा,उपमा,सेट डोसा)
९)कॉफी हाउस- MG Road (ब्रेड ऑम्लेट्,कॉफी,बटाटा चिप्स)
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

yadavrahul143's picture

9 Oct 2009 - 10:55 am | yadavrahul143

पुणे-मुंबई जुन्या हायवेवर कासरवाडी (नाशिक फाटा) रेल्वे स्टेशन च्या आधी एक पेट्रोल-पंप आहे त्याच्या शेजारीच आहे हे विकास लंच होम. कोंकणी स्टाइल चे मासे खूप छान मिळतात पण आधी ऑर्डर देऊन जावे लागते. बसायला जागा खूप कमी आहे पण जेवण खूप छान असते.
नंबर: ९८५००२९९८०

व्यंकु's picture

9 Oct 2009 - 11:28 am | व्यंकु

मारुती मंदीर परिसरात आलं कि अय्यंगार बेकरीजवळचं हॉटेल गोपाळ आणि संगम स्विटमार्ट जवळचं हॉटेल शुभम.
दोन्ही भोजनालये माशांसाठी एकदम उत्तम.

शशिकांत ओक's picture

16 Oct 2009 - 12:00 am | शशिकांत ओक

नगर रस्त्यावरील विमाननगर-कल्याणी नगर, कोरेगाव पार्क भागाला जवळ काही झणझणीत भोजन स्थळे

यलो चिली - कोरेगाव पार्क मधील सातव्या गल्लीच्या टोकावर पाककला विशारद संजीव कपूरचे कबाब लाजबाब.
नॉर्दर्न फ्रॉन्टीयर - नगररस्त्यावरील आगाखान पॅलेसच्या जरा पुढे. पेशावरी व अमृतसरच्या कुकडूकूच्या चवीसाठी प्रसिद्ध
बारबेक्यू - नगर रोडवरील दास शोरुमच्या मागे - डायनिंग टेबलावर मध्यात शेगडी आणून त्यावर अनेक कबाब भाजायचे व अनेक सॉसेस रंगवून गट्टम करायचे त्यातून भूक राहिली तर नेहमीचे मेनूतील पदार्थांचा आस्वाद घ्यायचा. यासाठी लठ्ठ बिलाची तयारी हवी.

आणि
दी वेस्टर्न रॉयल टर्फ क्लब हाऊस - सोलापूर हायवेच्यालगत कॅम्पाच्या टोकाला - एका बाजूला घोडे जीव खाऊन पळतायत तर दुसरीकडे काही लोक निराश तर काही एकदम खुष असे चित्र दिसणारे एकटेच स्थळ. रेस कोर्स.
तिथली आदब, चव विलायती आवडीची. जवानीतील धाक दाखवणारी, गालभर मिशांची, रुपेरी केसांची मिलिटरीतील व्यक्तिमत्वे बियरचे घुटके घेत, रेसिंगची अंदाजपत्रके काळजीपुर्क वाचताना दिसली, की क्लबला आल्याचे समाधान लाभते व दारुची झिंग काही और येते. पण तेथे आत पाऊल ठेवायला आमच्या सारख्या क्लबची मेंबरशिप असलेल्यांशी सलगी नसेल तर मग कठीण आहे.

शशिकांत

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Oct 2012 - 1:49 am | निनाद मुक्काम प...

अक्षर खूण साठवली आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Oct 2012 - 1:53 am | निनाद मुक्काम प...

ह्या लेखाला वाचन खूण केल्या गेली आहे.
अजून माहिती येऊ दे .
माझ्याकडून जमेल तशी देत जाईन.

प्रभाकर पेठकर's picture

9 Oct 2012 - 1:55 am | प्रभाकर पेठकर

पुण्याच्या यादीतील ४० क्रमांकाचे, य॑ज्ञकर्म उपहारगृह, आता दुर्दैवाने बंद झाले आहे. कृपया नोंद घ्यावी.

मैत्र's picture

9 Oct 2012 - 5:28 pm | मैत्र

काका,, ऐकलं होतं की बंद होणार आहे. पुण्यात नसल्याने गेली ३ वर्षं समजलं नाही.
मालवणी /मराठा चिकन आणि भाकरी, पापलेट तंदूर, सुरमई गोवन करी / मालवणी करी अशा अनेक पदार्थांसाठी येत्या वर्षात भेट द्यायचा पक्का प्लॅन होता.
काही अतिशय युनिक व्हेज डिश पण खूप आवडल्या होत्या ...

इतरत्र कुठे शाखा किंवा इतर पद्धतीचे काही नवीन उपहारगृह सुरु केले आहे / करणार आहात का?
म्हणजे येत्या डिसेंबर / जानेवारीत आस्वाद घेता येईल..

प्रभाकर पेठकर's picture

9 Oct 2012 - 5:55 pm | प्रभाकर पेठकर

इतरत्र कुठे शाखा किंवा इतर पद्धतीचे काही नवीन उपहारगृह सुरु केले आहे / करणार आहात का?
म्हणजे येत्या डिसेंबर / जानेवारीत आस्वाद घेता येईल

नजिकच्या भविष्यात, भारतात, कुठलीही योजना नाही. सध्या मस्कत एके मस्कत. पावभाजी, पंजाबी चाट आणि बरोबर कांही खास मराठी पदार्थ (जसे, कांदेपोहे, झुणका-भाकर, साबुदाणा खिचडी, मिसळ-पाव, भाकरी भरीत इ.इ.)असा भरगच्च मेन्यू घेऊन मस्कतमधले दुसरे उपहारगृह, दसर्‍याच्या मुहुर्तावर, सुरु करीत आहे.

भरगच्च मेन्यू घेऊन मस्कतमधले दुसरे उपहारगृह, दसर्‍याच्या मुहुर्तावर, सुरु करीत आहे.

अभिनंदन हो काका.

छान बातमी. अभिनंदन काका.

पप्पुपेजर's picture

10 Oct 2012 - 12:22 pm | पप्पुपेजर

जर कधी मस्कत आलो तर जरुर येउ...

प्रभाकर पेठकर's picture

10 Oct 2012 - 4:47 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद मैत्र, प्रभो, रेवती आणि पप्पूपेजर.

जरूर या. कट्टा करू मस्कतात.

chipatakhdumdum's picture

10 Oct 2012 - 10:45 pm | chipatakhdumdum

काका, नव्या होटेलला शुभेछ्छा.

निलेश देसाई's picture

23 May 2014 - 11:26 am | निलेश देसाई

अभिनंदन काका.....
यज्ञकर्म बन्द केल्याचा उल्लेख निगडी कट्ट्यावेळी झाला होता. तरिही आमच्यासारखे जिभेचे चोचले
करनारांसाठी पुण्याचं तेवढ मनावर घ्या ही विनंती

अर्धवटराव's picture

9 Oct 2012 - 4:17 am | अर्धवटराव

आणि पूर्णब्रह्म देखील :)
मित्रा "जी"द्वय, मोगलांच्या घोड्यांनी तुला पाण्यात बघितलं नसेल तेव्हढं मी तुला येता एक आठवडा प्रत्येक घासात बघणार... पण प्रेमाने बरं का.

अर्धवटराव

वामन देशमुख's picture

9 Oct 2012 - 11:21 am | वामन देशमुख

माहितीबद्धल धन्यवाद, संताजी धनाजी.
पिस्ता हाउसचा उल्लेख केल्याशिवाय हैदराबाद मधील हॉटेलांची यादी पूर्ण होणार नाही.

१. चारमिनारचे पिस्ता हाउस आणि २. मेहदीपट्टणमचे सर्वी रेस्तरों ही हॉटेले हलीमसाठी (आणि हैदराबादच्या पेटंट चिकन दम बिर्याणीसाठी देखील) प्रसिद्ध आहेत. तथापि, इथे हलीम केवळ रमजानच्या महिन्यातच मिळते.

चिकन दम बिर्याणीसाठी माझी प्रथम पसंती केवळ आणि केवळ शाह गौस हॉटेललाच! इथली बिर्याणी खाऊन पहावीच.
चारमिनारहून फलक्नुमा पलेस (आता ताज ग्रुपचे फलक्नुमा हॉटेल) कडे जाताना लाल दरवाजाच्या किंचित पुढे असलेले शाह गौस हे हॉटेल पर्यटकांना फारशे माहित नसले तरी, हैदराबादी खवय्यांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहे.
इथे दररोज नाहारी पाया आणि शनिवारी अप्रतीम चिकन नाहारी (निहारी नव्हे!) मिळते.
("ओल्डसिटी" मध्ये असल्यामुळे की काय) या हॉटेलात चकचकीतपणाचा अभाव आहे.

आयला हा लेख कसा काय नजरेतून सुटला??लय लय भारी बगा संताजीधनाजी!!!!!!!!!

नगरीनिरंजन's picture

10 Oct 2012 - 2:31 pm | नगरीनिरंजन

भूकमार्क करून ठेवला आहे. :-)

मैत्र's picture

10 Oct 2012 - 6:09 pm | मैत्र

बेष्ट प्रतिसाद!

भूकमार्क ... एक णंबर..

मोग्याम्बो's picture

10 Oct 2012 - 4:04 pm | मोग्याम्बो

"लवंगी मिरची"
कोल्हापुरी चिकन आणि मटन थाळी, काळे मटन उत्तमच, पांढरा रस्सा एक नंबर आणि quantity ला सुट्टी नाही.
city pride कोथरूड जवळ, गांधी लौंस समोर, seed च्या बिल्डिंग मधेच

प्रभाकर पेठकर's picture

10 Oct 2012 - 7:48 pm | प्रभाकर पेठकर

अरे व्वा! अगदी घराशेजारीच आहे मला.

प्रियाकूल's picture

10 Oct 2012 - 4:27 pm | प्रियाकूल

बंगलोर मधील काही ठिकाणे:
ग्रामीण हॉटेल,रहेजा आर्केड, कोरमंगला.
अम्मीज बिर्याणी कोरमंगला.
हॉटेल झरोका ,एच एस आर.
BBQ आहेच
शिव सागर आणि त्याच्या काही ब्रान्चेस मध्ये पण छान मिळते.
९९ डोसा हा पण प्रकार इकडे आल्यावर नक्की ट्राय करायला हवा. मस्तच असतो.तो गाड्यावर मिळतो.एच एस आर मध्ये मेक डी समोर असतो हा गाडा.
(मी व्हेज आहे.हि थोडीफार माहितीची ठिकाणे.)

विटेकर's picture

10 Oct 2012 - 5:47 pm | विटेकर

बंगलोर ला.. अल्सूर लेक जवळ, गुरुद्वाराला लागून एक टुकार ( हल्ली बरा केलाय म्हणे !) ढाबा आहे. अफलातून पंजाबी मिळते.. इतरत्र मिळते तसे.. सौदिन्डीयन पंजाबी नाही.. खरेखुरे पंजाबी..
सहस्त्रवेळा चेपले आहे.. शाकाहारी आणि अंडी मिळतात.. मालक पंजाबी आहे . त्याच्या आईच्या हाताला सोन्याची चव आहे.. १९९७ -२००५ मध्ये फारशी गर्दी नसायची .. वैयक्तिक लक्ष असायचे ..

अन्तु बर्वा's picture

10 Oct 2012 - 7:43 pm | अन्तु बर्वा

अल्सूर चा हा धाबा अतिशय टुकार आहे. मी दोन वेळा ट्राय केलं पण...

बंगलोर ला पंजाबी खायच असेल तर "द व्हिलेज" नावाचं रेस्त्रो आहे इन्दिरानगर मधे. ट्राय करा.

बाकि बंगलोर मधे ट्राय कराविच अशी ठिकणे:

१) हैदराबाद हाउस, कोरमंगला- अप्रतिम बिर्याणी.
२) अण्णाची, इंदिरानगर- जर तुम्हि अजुन चेट्टिनाड फूड ट्राय केलं नसेल तर जरुर करा. चेट्टिनाड फूड इज जस्ट अमेझिन्ग!

३) नंदिनी, बर्याच शाखा- इथे दोन गोष्टी ट्राय करा. चीकन बिर्याणी आणी आंध्रा मिल्स. मस्ट ट्राय.

४) चीकन कौन्ट्यी, बनेरगट्टा रोड- इथे ग्रील्ड चीकन ट्राय करा. मस्त!

५) नलपका, राजाजी नगर- इथे भाकरि आणी वांग्याची भाजी मिळते. नोर्थ करनाटका स्पेशलिटी!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Oct 2012 - 10:52 pm | निनाद मुक्काम प...

चेंबूरच्या काही प्रसिद्ध उपहार गृहांची माहिती
स्टेशन च्या बाहेर आल्यावर प्रसिद्ध पावभाजी साठी सद्गुरू हॉटेल
त्याची एक शाखा ५ मिनिटावर बाजूच्या गल्लीत मुंबई महानगर पालिकेच्या कार्यालयाच्या बाजूला आहे.
सद्गुरू च्या समोर आंबेडकर गार्डन आहे . तेथे दाक्षिणात्य जेवणासाठी प्रसिद्ध गीता भवन आहे.( राज कपूर येथे डोसा चापायचा यायचा.
चेंबूर चे प्रसिद्ध डायमंड गार्डन जवळ सरोज हे जुने प्रसिद्ध दाक्षिणात्य उपहार गृह आहे.
चेंबूर ची खाऊ गल्ली म्हणजे सिंधी केंप
येथे जामा नावाचे प्रसिद्ध मिष्टान्न भांडार आहे. त्याची गोड बिर्याणी प्रसिद्ध आहे. समोरच स्वस्त आणि मस्त पराठे वाल्याचा धाबा आहे.
फाळणी नंतर पंजाबी व सिंधी लोकांनी येथे येऊन आपली खाद्य संस्कृती येथे रुजवली.
आहे.
सिंधी जेवणासाठी प्रसिद्ध विग
रात्रीची मौज मजा करून झाली की सकाळी येथे सिंधी नाश्ता करावयास अनेक वेळा आलो आहे.
दाल पकवान ही सिंधी न्याहारी ची खासियत ( हे मुंबई मध्ये नंबर १ आहे ) झकास
येथे पितळ्याच्या पेल्यातील खरे ताक प्यायलो की
रात्रीची .......
२४ तास मद्यपींचा सेवा करणारा व बिर्याणी साठी प्रसिद्ध असलेला राज बार
ही सिंधी केंप ची खासियत
मध्य रात्री नंतर राजच्या बाहेर अनेक गाड्या उभ्या राहतात. आणि काळ्या पिशवीतून चढ्या भावाने ..........
माझ्या माहितीत अशी २४ तास ग्राहकांच्या सेवेस सज्ज एक राज
व दुसरा बार म्हणजे गोकुळ बार जो ताज हॉटेल च्या मागे
बडे मिया च्या बाजूला आहे.
ताज आणि ओबेराय व हॉटेल मधील तमाम कष्टकरी वर्ग रात्री काम संपले की गोकुळ मध्ये अड्डा जमवतात.
मग चर्चा , गॉसिप त्याच बरोबर कुणाला आखतात , क्रुझ वर नोकरी किंवा परदेशी शिकायला जाण्याचे बेत सगळे येथे रंगतात.
सिंधी केंप वरून बाहेर पडलो की चेंबूर नाक्याच्या सर्कल जवळ भटांची झणझणीत मिसळ
प्रसिद्ध आहे
तिचे वैशिष्ट्य म्हणजे सकाळी सहापासून तेथे गर्दी असते.
राम प्रहरी ती मुखी पडली की रात्रीची उरली सुरली नशा झटकन खाली येते.

दादा कोंडके's picture

12 Dec 2012 - 8:29 pm | दादा कोंडके

बंगरुळुमध्ये इलेक्ट्रॉनिक शिटी फेज १ मध्ये अय्यर मेस म्हणून एक उत्तम खाणावळ होती (२००६-२००९, आता माहीत नाही :() तिथं सकाळी ८ ते ११ आणि संध्याकाळी ७ ते १० पर्यंत फक्त इडली, रवा इडली, प्लैन (इथं उच्चार असाच कारायचा असतो) डोसा, पोडी डोसा, सेट डोसा आणि उपमा मिळतो. वर्षभर जवळजवळ रोज केळीच्या पानात वाढलेला गरम-गरम उपमा त्यावर सांबार (आणि मी लोणचं मागून घ्यायचो :) ) खात होतो. मी आयुष्यभर रोज हेच खायला तयार आहे.

कुणितरी बंगळुरुतल्या खादाडीच्या ठिकांणांनी अपडेटवा रे धागा!

प्रियाकूल's picture

26 Dec 2012 - 6:48 pm | प्रियाकूल

सेट डोसा आजकाल माझा फेवरेट झालाय.अजून बिसिब्याले भात आणि सोबत खारी बुंदी..झरोका मध्ये परवा झुकीनीचे सूप ट्राय केले. अप्रतिम स्वाद.आणि रागी डोसा कुठे उत्तम मिळतो?

शादाब विसरलात का? हेइदराबादला चारमिनारजवलच आहे.

वामन देशमुख's picture

27 Dec 2012 - 4:49 pm | वामन देशमुख

शादाब हॉटेलला विसरलो नाहीय. पण अशात फारसं तिकडे गेलो नाही.

झुळूक's picture

24 Dec 2012 - 2:15 pm | झुळूक

1. इन्दिरा नगरचे bbq nation बफे महाग आहे पण quality food आहे

२. the dhaba: outer ring road, marathalli पासून kartik नगर ला जाणारा road
माराथाल्ली पासून 500C बस पकडली तर ती the dhaba चा stop घेते..५ मीन च्या अंतरावर आहे
non-veg साठी famous.

3.hydrabadi cuisine: सर्व प्रकारच्या biryani साठी नि non-veg साठी
kundalahlli gate पासून whitefield ला जाणार्या रोड वर आहे,shell petrol pump नंतर
स्वस्त नि मस्त

4.Biryani zone: कुन्दलहल्लि गेट जवळच, non veg..
माराथाल्ली मध्ये पण एक आहे पण ते जास्त चांगले नाहीये

5. Singhs Punjabi:कुन्दलहल्लि गेट पासून ३ मिनटाच्या अंतरावर आहे.. गेट जवळ असाल तर कुणाला तरी विचारून घ्या
non-veg चांगले आहे पण veg बकवास आहे

6.Gowlkonda chimney: मी पहिल्यांदा कलमी कबाब इथे खाल्ले, मस्त आहे, पण महाग आहे रेस्त्रो थोडेसे
कुन्दलहल्लि गेट पाशीच

7. मस्त कलंदर : टोटल veg पण जेवण छान आहे. माराथाल्ली नि(कॉस्मोस mall)च्या शेजारी.. खूप साऱ्या शाखा आहेत.

8.राजधानी : फोरम value mall , whitefield बफे ३५० मध्ये मिळतो, टोटल veg .
पण रोज एक specilaity थाळी असते,गुजराती, राज्श्तानी नि मराठी पण इतके पदार्थ पानात येतात कि बास..
ऑफिस मधले वेज लोक उपास सोडायला इथेच जातात

9. नंदिनी : इंदिरा नगर चेच, BBQ Nation च्या समोरच आहे..
बाकी cobey सिझ्झ्लेर्स पण छान आहे..
99 डोसा तर गाड्या वरच तरी करा..

दादा कोंडके's picture

24 Dec 2012 - 3:17 pm | दादा कोंडके

अजून भर.

पुर्वी 'लड्डूज' आणि 'घर का खाना' मधले पदार्थ आवडायचे पण नंतर मला तरी आवडेनासे झाले.

बिटीएम सेकंड स्टेज मध्ये स्वीट चॅरियट समोर एक बिहारी माणूस गाडा लावतो. तिथं आलू टिक्की, वेज क्रिस्पी आणि चीझ रोल अफलातून मिळतात. मी कमिशन न घेता त्याची गिर्हाईकं वाढवलियेत.

सन्दीप's picture

24 Dec 2012 - 2:47 pm | सन्दीप

मस्त उप्योगी लीस्ट.

अनुप कुलकर्णी's picture

24 Dec 2012 - 3:46 pm | अनुप कुलकर्णी

बेंगलोर मधील काही ठिकाणे:

चेत्तीयार्स (इंदिरा नगर)
तमिळ पद्धतीच्या जेवणासाठी प्रसिध्द
चिकन कोत्तू परोठा हा खास वेगळा पदार्थ(चिकन, अंड आणि कोत्तू ही चटणी घालून केलेली फोडणीची पोळी)
जर मिळत असेल तर खेकडा सुध्धा must try... मस्त असतो...

कूर्ग (इंदिरा नगर)
इथे शुक्र-शनि-रवी ला बुफे असतो. खास कुर्गी पद्धतीचे जेवण मिळते.
जर पोर्क खात असाल तर इथले पोर्क फ्राय लई म्हणजे लैच भारी!
(शाकाहारी लोकांनी जाऊ नये :P... पैसे वाया जातील)

MTR (लालबाग जवळ/Forum Mall, Whitefield )
MTR मसाले वाल्याची ही खानावळ.
कर्नाटका पद्धतीची थाळी मिळते. भाजी, कोशिंबीर, चटणी, बिसिबेली भात, पोंगल, पुरी/डोसा, डाळवडा, मैसूरपाक, खीर, fruitsalad with icecream, विडा असा भरगच्च मेनू असतो. पण किमान १ तास waiting ची तयारी हवी.
लालबाग जवळच्या शाखेत गेल्यास सकाळी लालबाग आणि दुपारी MTR मध्ये जेवून वामकुक्षीसाठी घरी परत असा छान बेत करता येतो.

या पेक्षा कोरमंगलाच्या कृष्णा काफे मध्ये कमी गर्दीत चांगले जेवण मिळते म्हणतात...!(इथे मी अजून गेलो नाही)

कामत(बसवन्गुडी) ...
बसवन्गुडीच्या बुल टेम्पल जवळच हे ठिकाण आहे.
इथे मस्त उत्तर कर्नाटका पद्धतीचे जेवण मिळते. त्यामध्ये "ज्वारीची भाकरी वांग्याची भाजी" हे हासिल-ए-मैफिल असते!
इथे सुध्धा वीकांत गर्दीचा असू शकतो. पण गर्दीच्या मनोरंजनासाठी कर्नाटकी शास्त्रीय संगीताचा live performance सुरु असतो!

विद्यार्थी डोसा (गांधी बझार)
इथला डोसा खूप प्रसिध्द आहे म्हणून गेलो होतो... पण आमच्या कोल्हापूरचा लोणी डोसा जर तेलात केला तर कसा लागेल तशी चव होती! :(
मूडच गेला राव...
(वर लिहिलेले कामत हॉटेल यापासून जवळच आहे... त्यामुळे तुमचाही आमच्यासारखाच मूड गेला तर तो backup option म्हणून ठेवता येईल :) )

अल्सूरचा धाबा
इथल्या परोठ्याबद्दल ऐकून गेलो होतो. पण काय खास नाय.
पण लस्सी आणि/किंवा ताक must try आहे. नुसते ते पिण्यासाठी तिथे गेलात तरी चालेल.
मुळात त्या पेल्याचा आकारच एवढा असतो की पुढे परोठा खायला पंजाबी पिंडच पाहिजे.

भोजोहारी मन्ना (कोरमंगला)
कृष्णा काफे पासून जरा पुढे गेल्यावर हे ठिकाण आहे. बंगाली पद्धतीचे खाणे ही खासियत!
आम्हाला काही खास आवडले नाही. पण तिथे आलेली बाकीची बंगाली मंडळी खाण्यावर ताव मारत होती त्यामुळे कदाचित आम्हाला बंगाली चवच आवडली नसेल असे समजून आम्ही बाहेर पडलो.

राजवर्धन (जयनगर)
खास मराठी खाणे... साबुदाणा खिचडी, वडापाव, मिसळ, थालीपीठ!

कोर्नर होऊस
खूप ठिकाणी आहे.
लई भारी ice cream आणि sundaes
Death By Chocolate आणि Dry Fruit Sundae एकदा तरी खायलाच हवे.
आंब्याच्या मोसमात Mango with Cream... कमाल पदार्थ आहे.

हायदराबादी हाउस (फोरमजवळ, कोरमंगला)
बिर्याणीसाठी प्रसिध्द. पाया सूप पण छान असते.
ईदच्या महिन्यात हलीम मिळते. हे चुकवू नका!
याशिवाय
राहम बिर्याणी सेन्टर(कमनहळ्ली), नंदना, एम्पायर(फेझेर टाऊन), भगिनी, अम्मी इ. ठिकाणच्या बिर्याण्या आहेतच!

ओशन ट्रीट(बानसवाडी)
मेंगालोरी सी फूड खास करून प्रोन्स घास्सी आणि त्यासोबत अप्पम... क्या बात है!

कोकोनट ग्रोव (मारथल्ली)
इथेही केरळी सी फूड कमाल भारी मिळायचे. करी मीन आणि boiled rice!
मी २ वर्षांपूर्वी त्याजवळ राहायचो तेंव्हा खुपदा गेलो आहे. सध्याची कल्पना नाही.

माजेस्टिक जवळच्या कामत मध्ये रागी डोसा आणि व्हीट डोसा देखील मिळतो कधी कधी... वेगळा प्रकार आहे.

आणि हो ९९ डोसा तर आहेच!

झुळूक's picture

24 Dec 2012 - 4:44 pm | झुळूक

एक तर मराथल्लि ब्रिज पाशी पन आहे..spice garden शेजारी ..मस्त death by chocolate मिळते तिथे ..
Roasted almonds तर माझे favorite आहे

अत्रन्गि पाउस's picture

24 Dec 2012 - 9:53 pm | अत्रन्गि पाउस

तिथे चिकन राजकुमार संतोषी फुल्ल बाजरीच्या भाकरी बरोबर खाल्ल्याशिवाय तुम्हाला चैन पडता काम नये...

अत्रन्गि पाउस's picture

24 Dec 2012 - 9:58 pm | अत्रन्गि पाउस

लक्ष्यातच आले नाही...

पुण्यात कोरेगाव पार्कात ५व्या(की ७व्या) गल्लीत कोयला नामक प्युअर हैद्राबादी हॉटेल आहे, नुकताच गेलो होतो तिथे. अ‍ॅम्बियन्स एक नंबर, अगदी नबाबी स्टाईल. जेवणदेखील तसेच. मटका बिर्यानी विशेष मस्त. मडक्यावर कणकेचे आवरण लावलेली बिर्यानी आणि इतर काही डिशेस लय भारी.