एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग ९

प्रसन्न केसकर's picture
प्रसन्न केसकर in जनातलं, मनातलं
19 Jun 2009 - 3:16 pm

(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?)

आधीचे भाग येथे वाचा :

भाग एक - http://misalpav.com/node/8127

भाग दोन - http://misalpav.com/node/8138
भाग तीन - http://www.misalpav.com/node/8149
भाग चार - http://misalpav.com/node/8172
भाग पाच - http://www.misalpav.com/node/8189
भाग सहा - http://www.misalpav.com/node/8204
भाग सात - http://www.misalpav.com/node/8219
भाग आठ - http://misalpav.com/node/8233

३० जूलै
आज पगाराचा चेक मिळाला. सगळे टॅक्स, प्रॉव्हीडंट फंड वगैरे कापून हातात सहा हजार सातशे सत्तर रुपये आले. सहजच महिन्याचा हिशेब मांडला - फोनचे बील दोन हजार, पेट्रोल खर्च तीन हजार रुपये, हॉटेलमधे चहापाणी करण्याचा खर्च एक हजार.... एकूण खर्च वजा करता उरतात रुपये ७७०..... तरी बरे बापाच्या घरात रहात असल्याने अन लग्न झालेले नसल्याने घरभाडे, राशन, वीज बील, दूध बील असे खर्च नव्हते. एकदम डोळ्यासमोर तोड़कर आला - तीन वर्षे काम केल्यावर त्याचा पगार होता चौदा हजार अन त्याला तर दोन मुले आहेत. कॉर्पोरेशन बीट्चा दोगले साडेचार वर्षे काम करतोय अन त्याचा पगार सोळा हजार. बाराथे साहेब तर सतरा वर्षे काम करतायत अन त्यांचा पगार तीस हजार..... एकूणच ही पत्रकारितेचा म्हणजे आतबट्याचा धंदा दिसतो. घरचे खावून लष्कराच्या भाकर्या भाजणे म्हणतात ते हेच असावे बहुधा. पण हरकत नाही. एकदा उखलात डोके घातले ना? मग मुसलाना काय घाबरायचे? काहीही झाले तरी बेईमानी करायची नाही. बाराथे साहेब नाही रहात प्रामाणिक? त्यांची तर किती इज्ज़त आहे सगळीकडे....

१ ऑगस्ट
परवा संपादक आगलावेनी सगळ्या संपादकीय स्टाफची मीटिंग घेतली त्यातून सगळ्या उपसम्पाद्कानी एकच मेसेज घेतलेला दिसतोय, "लेट अस शॉक द पीपल" असा. काहीही करत असतात. काल मी एका खुनाची बातमी दिली तर तिचे हेडिंग छापून आले "गेम झाली." आज दिवसभर सगळे पोलिस मी दिसलो की म्हणत, "गेम झाली पण कुणाची" अन हसत. डोक्याची मंडई साला....ऑफिसमधे चीफ सबएडीटरना सान्गितले तर ते खदाखदा हसले अन म्हणाले..... याचा अर्थ आपल्या हेडिंगची चर्चा सुरु आहे.... व्हेरी गुड! साला हसतायत मला.... यांचे काय जाते व्हेरी गुड म्हणायला? लोकांना थोडेच माहिती हेडिंग कोण देते ते? लोकांना फक्त रिपोर्टर माहिती असतो. तरी माझी अवस्था बरी.... कॉर्पोरेशन बीट्चा दोगले तर वैतागलाय. त्याच्या तर बातम्याच छापून येत नाहीत. साठलेला कचरा, रस्त्यातले खड्डे, गढूळ पाणी हे त्याचे नेहमीचे विषय तर फक्त संक्षिप्त बातम्यातच छापून येताहेत....
रात्री बाराथे साहेबांची स्कूटर बंद पडली होती म्हणून त्याना घरी सोडले. त्यांच्या घरात गेलो तर सगलीकडे पुस्तकेच पुस्तके. साला घर आहे की लायब्ररी? विचारले तर म्हणाले, "अरे प्रमोद, आपण पत्रकार बुद्धीवादी लोक. वाचू तरच वाचू." मग सहजच विषय आमच्या पेपरच्या बदलत्या स्वरूपाकडे वळला. मी म्हणालो की मला काही हे मनाला पटत नाही तर ते वेगळेच बोलले. म्हणाले, "संपादक फार काही चुकीचे नाही बोलले. असे बघ, चॅनल, वेबसाईट सगाल्यांशी आपण स्पर्धा करणार. त्यात शेवटी टिकणार कोण तर ज्याला लोकांची पसंती मिळेल तो. त्यालाच जाहीराती मिळनार अन पैसे त्याच्याचकडे जाणार. हे खरे आहे की सेक्स, गुन्हे, सनसनाटी बातम्या याखेरीजही अनेक विषय असतात लोकांच्या जिव्हाळ्याचे पण असे विषय हातालताना जी संवेदनक्षमता लागते, लोकांशी जुळलेली नाळ लागते ती थोड्याच लोकांकडे असते. समाजातच असे लोक मिळने अवघड असते तर मग त्यातले किती थोड़े पत्रकारितेसाठी उरतील? अन मग रोज पेपर काढून विकायचा तर अश्या तडजोडी कराव्या लागतात. मी स्वत: आगलावेसाहेबांच्या बरोबर कायम काम केले आहे त्यामुले मी समजतो त्यांनी किती दू:खाने असा निर्णय घेतला असेल ते. पण मला खात्री आहे जर कुणी चांगला विषय घेऊन बातमी केली तर ते योग्य तो न्याय त्या विषयाला देतील अशी." साला! असा आपण कधी विचारच केला नव्हता. यालाच ऑप्टीमिस्टीक विचार म्हणत असावेत.

२ ऑगस्ट
गल्लीतल्या कट्ट्यावरचा पक्या गेले काही महीने सटकलेला दिसतोय. साला मी नोकरीला लागलो तेव्हाच एका रिकव्हरी एजंसी मधे तो पण कामाला लागला. पगार किती ते काही बोलला नाही पण बक्कळ पैसा मिळत असावा. एकदम पोलिसचा ओरिजनल गॉगल अन सोनेरी घड्याळ वगैरे वापरायला लागला, आम्हा मित्राना सारख्या पार्ट्या द्यायला लागला, नवीन मोटर सायकल पण घेतली त्यावरून. गेले काही दिवस मात्र तो गप्प गप्प असतो. फारसे बोलत नाही कुणाशीच.... शून्यात बघत विचार करत असतो.... खत्रीसाहेब म्हणतात बर्‍याच रिकव्हरी एजंसी गुन्हेगारीत आहेत किंबहुना गँगच त्या चालवतात.... तसे काही नसले म्हणजे मिळवली.....

कथाविनोदवाङ्मयविडंबनसमाजनोकरीमौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

19 Jun 2009 - 4:02 pm | श्रावण मोडक

उखळ, मुसळ, गेम, बुद्धीवाद... कसे मस्त बसतात हे शब्द एकत्र. वा. थीम घेऊन लेखन सुरू आहे की काय?

Nile's picture

20 Jun 2009 - 12:21 am | Nile

मस्त लागलंय पुराण! येउद्या!

ऍडीजोशी's picture

19 Jun 2009 - 4:37 pm | ऍडीजोशी (not verified)

हा भागही झक्कास :)

असेच भराभर येउ द्या पुढचेही भाग

धमाल मुलगा's picture

19 Jun 2009 - 4:55 pm | धमाल मुलगा

इतकी लफडी आणि असा कमी पगार? ह्यांच्यायच्या वाजिवल्या झांजा! निदान पेट्रोल अलाऊंस तरी द्यायचा की नाही?
हॅ:! हे असं केल्यावर तोडकर च्या-पाणी घेईल नायतर काय करेल? पदरात दोन पोरं, सगळा संसार कसा सांभाळणार?
अवघड आहे बॉ!

येऊ द्या पुढचा भाग :)
वाट पाहतोय.

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

घाशीराम कोतवाल १.२'s picture

19 Jun 2009 - 5:23 pm | घाशीराम कोतवाल १.२

साला सोळा हजार पगारात कस भागणार मग का नाय तोडकर घेणार
च्या पाणी राव

**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

19 Jun 2009 - 5:24 pm | घाशीराम कोतवाल १.२

साला सोळा हजार पगारात कस भागणार मग का नाय तोडकर घेणार
च्या पाणी राव

**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

संदीप चित्रे's picture

19 Jun 2009 - 5:24 pm | संदीप चित्रे

ह्या 'अग्निपथ'मधल्या डायलॉगची आठवण आली :)
-------
डायरी मस्त ट्विस्ट्स घेतेय.

दिनेश५७'s picture

20 Jun 2009 - 7:24 am | दिनेश५७

लई डोक्याची मंडई झाली राव... तुमी मुंबईचं की पुन्याचं?
`गेम झाली` हेडिंग बी कुटंतरी वाचल्यासारकं वाटतंय.

श्रावण मोडक's picture

20 Jun 2009 - 6:31 pm | श्रावण मोडक

कुठलं बी असू द्या राव. तुमी काय, पुनेरी काय, आमी काय, सारखंच की सगळीकडं. १६ हजार (त्या किश्न्याच्या नव्हंत) हेच खरं पघा आपल्या धंद्यात. त्या येतात कठनं आणि जात्यात खुटं कायबी कळत नसतं... :)
ह्ये इथलं अनंत छंदी ह्ये नाव बी नीट पघून ठेवा. उद्या त्यास्नी इचारू नका बाकी तुमीबी ह्यातलंच (म्हन्जे आपल्या धंद्यातलं) काय असं? त्येबी ह्यातलेच दिसत्यात. क्राईम बीट इच्यारतात पुनेरीस्नी.

विसोबा खेचर's picture

20 Jun 2009 - 7:54 am | विसोबा खेचर

डायरी अंमळ छान आहे!

वेगळेच लेखन..!

तात्या.

अनंत छंदी's picture

20 Jun 2009 - 9:21 am | अनंत छंदी

पत्रकारितेतील तुटीचा आर्थिक ताळेबंद आणि कराव्या लागणार्‍या तडजोडी यावर प्रकाशझोत टाकलेला आवडला.