एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग २

प्रसन्न केसकर's picture
प्रसन्न केसकर in जनातलं, मनातलं
11 Jun 2009 - 3:54 pm

>(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?)

आधीचा भाग येथे वाचा

http://misalpav.com/node/8127

पम्या म्हणजे मध्यमवर्गीय भोंडे कुटुंबात अगदी भांगेत तुळस. घरातले सगळे एकदम जंट्लमन, पण पम्याचे मात्र अभ्यासापेक्षा राडे करण्यातच जादा लक्ष. असा पम्या पत्रकार व्हायच्या कुठ्ल्यातरी कोर्सला अ‍ॅडमिशन घेतो आणि कुठ्ल्याशा पेपरमधे सुट्टीत ईंटर्नशिप करतो. तिथे त्याला पत्रकारितेतले जे नमुने भेटतात, त्यांच्या वागण्याने प्रभावित होऊन पम्या पत्रकारितेतच करीअर करायचे ठरवतो. त्याची डायरी त्याच्या एका टर्रेबाज मित्राच्या हाती लागते आणि...... आता पुढे वाचा........

२८ मे
च्यायला काहीतरी लोचा आहे. आज गल्लीतल्या मित्रांबरोबर कोपर्‍यावरच्या हॉटेलबाहेर टाईमपास करत बसलो होतो तर आपला मोबाईल वाजला. नंबर अनोळखी होता. घेतलाच नसता पण मग विचार केला की त्या १५२ नंबरच्या बसमधे एका आयट्मच्या पर्समधे आपला नंबर लिहून कागद टाकला होता त्या पोरीचा असेल आणि घेतला तर त्या पेपरच्या टकल्या चीफ रिपोर्टर बोलत होता. साला लय आखडू आहे. उद्या सकाळी १० वाजता ऑफिसमधे भेटायला बोलावलेय पण काम काय आहे याचा पत्ता लागू दिला नाही. त्या नडदा मॅडमने नाटकातल्या नटाचे उगाच सॉलिड माप काढून परिक्षणाला "एका तोतर्‍याची गोष्ट" नाव दिलं अन त्यांची आणि माझी एकत्र बायलाईन दिली त्याने डिफेमेशनची केस केली नसली म्हणजे मिळवली. नस्त झेंगट सालं!

२९ मे
अपनी तो चल पडी!!!!! चीफ रिपोर्टर बाराथे साहेबांनी एकदम गुगलीच टाकली. फोन आल्यावर तशी फाट्ली होती आपली, हो खोटं कशाला बोलायच. पण ऑफिसात गेलो तर साहेबांनी मुंड्क्यावरच टाकले. ऑफिसात गेलो तर बरीच पोरं-पोरी आधीच आली होती. पण त्या यशदा मॅडमनी ओळख ठेवली होती - छान हसल्या, कसा आहे काय करतो चौकशी केली. ईतर रिपोर्टर यायचे होते पण बाराथे साहेब बसले होते जागेवर, संपादक आगलावे पण होते त्यांच्या केबिनमधे. बाराथे साहेबांच्या समोर उभा राहिलो तर त्यांनी सरळ संपादकांच्या समोरच नेले. संपादक पण छान हसले, चहा मागवला आणि टाकला ना राव फुल्लटॉस. मला सरळ विचारले इथे नोकरी करणार का म्हणून. आपली तर बोलतीच बंद! मी गप्प बसलो तर तेच पुढे म्हणाले, "सध्या ट्रेनी रिपोर्टर म्हणून घेवू. महिना चार हजारावर. एक वर्ष ट्रेनिंग, नंतर सहा महिने प्रोबेशन आणि काम बरे वाटले तर नंतर कन्फरमेशन." काय बोलावे तेच सुचेना. बाराथे साहेबच पुढे म्हणाले, "तुमच्याबद्दल सगळ्या रिपोर्टर्सनी शिफारस केली म्हणून तुम्हाला प्राधान्याने विचारले. बघा! विचार करून नंतर सांगा वाट्ल्यास." विचार केला उशीर केला तर आहे ती संधी हातून जायची. लगेच हो म्हणलो आणि १५ मिनिटांत बाराथे साहेबांनी अ‍ॅपॉईन्ट्मेंट लेटर ठेवले. नंतर रिपोर्टिंग सेक्शन मधे नेऊन सगळ्यांना सांगितले पण! सगळ्यांनी अभिनंदन केले आणि वर कोपर्‍यावरच्या अण्णाकडे नेऊन चहा पण पाजला. च्यायला! आज आपण रिपोर्टर झालो. उद्या ड्यूटी सुरू. वाट्तय, मनिषा कोईराला सारखं नाचत गावं, "आज मै ऊप्पर." काय कंडा दिसलीय त्या गाण्यात ती. बाकी आनंदी माणूस छानच दिसतो म्हणा! घरी जाऊन आईला पत्र दाखवलं तर तिच्या अंगात एकदम निरुपा रॉय संचारली. शिरा काय केला, गुणी बाळ म्हणून कौतुक काय केलं! कायम खेकसणारा बाप पण खूष.... त्याच्या स्कूटरची चावी दिली अन म्हणाला, "तुलाच घे. माझे काय? मी बसनं जाईन ऑफिसला. निमी पण छान हसली अन शेकहॅन्ड करून काँग्रॅट म्हणाली. आता टर्रेबाजी बंद! उद्यापासून सिन्सिअरली काम करायचे!

कथाविनोदविडंबनसमाजनोकरीमौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

11 Jun 2009 - 4:08 pm | घाशीराम कोतवाल १.२

बाकि डायरी छान होती भाग जरा मोठे लिहाना राव वाचायला मग मजा येते हा भाग करा बर कन्टीन्यु
**************************************************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Jun 2009 - 4:24 pm | बिपिन कार्यकर्ते

आयचा घो... मस्तच रे पम्या!!! आता रोज काय काय होतंय ते लिहित जा लगेच, फुकटची नाटकं नकोत. काय?

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Jun 2009 - 8:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हो मग काय? फारच आळस आहे बाबा तुला! पटापट आणि मोठे भाग टाक.

श्रावण मोडक's picture

11 Jun 2009 - 5:51 pm | श्रावण मोडक

लगे रहो...
काय पण एकेक नावं - बाराथे काय, आगलावे काय. खल्लास. संपादक आगलावे - गाईचं गोमूत्र वाटतंय की नाही? चि.री. बाराथे - सॉल्लीडच. महत्त्वाच्या घटनांच्या वेळी बाजीप्रभू की मुरारबाजी कोण तो, त्यासारख्या स्थितीत तो असताना दिसणारी न्यूजरूम आठवली.
पुढचा भाग कधी? आणि थोडा मोठा लिहिला तरी चालेल.

अवलिया's picture

11 Jun 2009 - 7:17 pm | अवलिया

आता टर्रेबाजी बंद! उद्यापासून सिन्सिअरली मोठे मोठे भाग लिहायचे !

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

प्राजु's picture

11 Jun 2009 - 7:31 pm | प्राजु

आता मोठे भाग लिहा. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

संदीप चित्रे's picture

11 Jun 2009 - 7:21 pm | संदीप चित्रे

>> बाकी आनंदी माणूस छानच दिसतो म्हणा
हे वाक्य काय लाखमोलाचं लिहिलयंस बॉस्स !

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Jun 2009 - 9:05 pm | llपुण्याचे पेशवेll

ह्म्म्म.. येऊद्या. आमच्या बारामतकर साहेबांच्या पण एखाद्या कान्फ्रंसला जा .. आणि रिपोर्ट पेपरात घटनेबरहूकूम नाही छापला तरी चालेल इथे छापा.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

घाटावरचे भट's picture

12 Jun 2009 - 2:18 am | घाटावरचे भट

=)) मस्तच. पुढचं लव्कर लिहा.

Nile's picture

12 Jun 2009 - 2:25 am | Nile

च्यायला! आज आपण रिपोर्टर झालो.

लै भारी राव! कॉंग्रॅट्स! :) चला आता येउद्या रिपोर्टींग पटापट! :)